सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
4 Oct 2017 - 3:36 pm

हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे...
सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे?
किती अरे, उरात खोल पेरतोस चांदणे!

बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू...
विचारताच, चोर कोण? सांगतोस..चांदणे!

उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर
पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे!

नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा
मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे!

मधाळ चांद, वितळतो..रसाळ रात वाहते...
असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशृंगारकवितागझल

प्रतिक्रिया

विशुमित's picture

4 Oct 2017 - 4:13 pm | विशुमित

छान ..!!
आवडली कविता...

एस's picture

4 Oct 2017 - 4:13 pm | एस

लाजवाब!

तत्काळ प्रतिसादाबद्दल आभार...विशुमित,एस!

अभिजीत अवलिया's picture

4 Oct 2017 - 6:00 pm | अभिजीत अवलिया

आवडली गझल.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2017 - 7:10 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह. ! लाजव्वाब!

Naval's picture

4 Oct 2017 - 7:35 pm | Naval

वाह... क्या बात है!

दुर्गविहारी's picture

4 Oct 2017 - 7:39 pm | दुर्गविहारी

खुपच छान लिहीता तुम्ही ! मस्त. प्रत्येकवेळी दाद देणे जमत नाही. पु.ले.शु.

प्रचेतस's picture

4 Oct 2017 - 7:56 pm | प्रचेतस

सुरेख

अभिजीत अवलिया,अत्रुप्त आत्मा,Naval...खूप खूप धन्यवाद!
दुर्गविहारी ,आपली दाद मिळाली,अनेक धन्यवाद!
प्रचेतस धन्यवाद!

कवितानागेश's picture

7 Oct 2017 - 1:55 am | कवितानागेश

सुंदर कविता.

अनन्त्_यात्री's picture

7 Oct 2017 - 3:39 pm | अनन्त्_यात्री

सुंदर!

रुपी's picture

7 Oct 2017 - 9:13 pm | रुपी

सुरेख!

अबब, एव्हढे चांदणे? छान छान !

आम्हाला फक्त संदीप चांदणे म्हाईतीये :)

आगाऊ म्हादया......'s picture

8 Oct 2017 - 7:03 am | आगाऊ म्हादया......

नेहमीच वाचतो तुमच्या गझला. "स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते..." ही तर अगदी पाठ झालीय आता. तुमचे शब्द एक लय घेऊन येतात, ते फार आवडतं मला.

अभ्या..'s picture

8 Oct 2017 - 3:22 pm | अभ्या..

जबरदस्त लिहिताय तुम्ही.
एकेक ओळ अन साधलेली गेयता. अप्रतिम.

तृप्ति २३'s picture

8 Oct 2017 - 9:23 pm | तृप्ति २३

खुपच छान लिहीता तुम्ही ! मस्त. छान ..!!
आवडली कविता...

Marathi Kavita Aai

सत्यजित...'s picture

9 Oct 2017 - 11:12 pm | सत्यजित...

कवितानागेश,अनन्तयात्रीजी,रुपी,चामुंडराय,आगाऊ म्हाद्या,अभ्या,तृप्ति...आपणासारख्या रसिकांकडून भरभरुन मिळालेली दाद अत्यंत अल्हाद-दायक,प्रोत्साहनीय आहे!
आपणा सर्वांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद!

सत्यजित...'s picture

9 Oct 2017 - 11:33 pm | सत्यजित...

'कविता' विभागातील रचना,त्यातही माझी रचना,रसिकांकरीता 'शिफारस' सदरांतर्गत नोंदविल्याबद्दल,तत्संबंधी कार्यरत टीम तसेच मिपा संपादक,सा.सं.मंडळाचे खूप-खूप आभार!'मिपा'वर लिहिणाऱ्या अनेक उत्तम कवींसाठी ही बाब नक्कीच प्रोत्साहनीय असेल,तसेच रसिक-वाचकांसाठी ही एक उत्तम काव्यपर्वणी ठरावी!
नव-नवीन उपक्रम तथा सकारात्मक बदल राबविण्याबाबत,'मिपा'च्या तत्पर भूमिकेचे,त्यासाठी वेळात वेळ काढून सतत कार्यशील टीम्सचे कौतुक,तसेच आभार,जाहिर मांडणे,केवळ ईष्टच नव्हे, तर अगत्याचे वाटते!
पुनःश्च एकवार, सर्वांचे हार्दिक आभार!

सूड's picture

10 Oct 2017 - 4:12 pm | सूड

क्या बात!!

पिंट्याराव's picture

10 Oct 2017 - 6:50 pm | पिंट्याराव

सुंदर रचना...

आवडल्या गेली आहे.

आनंदयात्री's picture

11 Oct 2017 - 7:22 am | आनंदयात्री

कविता छान आहे, पहिली दोन कडवी तरल आहेत. या कवितेचे दृक्श्राव्य सादरीकरण उदाहरणार्थ सचिन खेडेकरने केले तर ऐकायला अतिशय आवडेल.

शब्दबम्बाळ's picture

12 Oct 2017 - 9:58 pm | शब्दबम्बाळ

तुमच्या गझल नेहमीच आखीव रेखीव असतात हि देखील अपवाद नाही!
आवडली! :)

सत्यजित...'s picture

14 Oct 2017 - 10:13 am | सत्यजित...

खूप-खूप धन्यवाद... सूड,पिंट्याराव,आनंदयात्रीजी,शब्दबंबाळ!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Oct 2017 - 8:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर

drsunilahirrao's picture

16 Oct 2017 - 10:09 am | drsunilahirrao

क्या बात !

अविनाशकुलकर्णी's picture

16 Oct 2017 - 3:27 pm | अविनाशकुलकर्णी

सुदर कविता

Swapnaa's picture

16 Oct 2017 - 10:45 pm | Swapnaa

छान च , लिहित रहा ....

अप्रतिम लाजवाब मस्तच खुप आवडली

सत्यजित...'s picture

1 Nov 2017 - 1:09 am | सत्यजित...

मिसळलेला काव्यप्रेमी,सुनील सर,अविनाशजी,स्वप्नाजी,पंडितजी...सर्वांचे मनापासून धन्यवाद!