कधी मध्यम कधी पंचम,सुरांचा साज अलबेला
किती समतोल आहे हा,तुझा अंदाज अलबेला!
मनाचा वेगही अाता अनावर वाढला आहे
मला हाकारतो आहे तुझा आवाज अलबेला!
असे भरतेस काजळ तू तुझ्या डोळ्यांत बंगाली
निशाणा बांधतो कोणी निशाणेबाज अलबेला!
फुलांचे अंग मोहरते,तुझ्या केसांत शिरताना
असावा स्पर्शही कोमल किती निर्व्याज अलबेला!
लिहावे वाटते तेंव्हा सतत दिसतेस तू मजला
कसा गझलेमध्ये बांधू सखीचा बाज अलबेला!
कुणी का पाहिला होता?गुलाबी रंग पुनवेचा!
मला तर वाटतो आहे खरा मी आज अलबेला!
—सत्यजित
वाचने
2414
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
गझल छान
धन्यवाद...ऋतु हिरवा!
In reply to गझल छान by ऋतु हिरवा
वा !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
अर्र्
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद by सत्यजित...