Skip to main content

सुखासन

Published on शुक्रवार, 12/08/2016
आले कोण गेले कोण कवतुक आता वाटत नाही , कुणी थांबले हसून बोलले मनात किणकिण वाजत नाही , पानाफुलापक्ष्यांसाठीही दार सुखाचे उघडत नाही . . . इतके माणूस छिलून निघते एकांताच्या सुखासनावर! -शिवकन्या

वाचन संख्या 4951
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by चांदणे संदीप

+1

ब-याच दिवसांनी लिहीलंत.

मस्त

सुंदर. टोकाला पोचलेला एकाकीपणा आणि मनातून स्वतःला बंद करत जाणे या भावना चार ओळीतूनही ताकदीने व्यक्त झाल्यात. अशीच हौशी पण आयुष्यातल्या अनुभवांनी पोळून एक्टी पडलेली, स्वतःला हळू हळू मिटून घेणारी जवळची व्यक्ती आठवली आणि डोळ्यात पाणी उभं राहिलं.

जबरदस्त, किमान शब्दात कमाल परिणाम.

अप्रतिम! सक्तीचं एकाकीपण आणि विरक्ती दोन्हीला लागू होतय.

सहज सुंदर आणि कमी शब्दात नेमके सांगणारी रचना

आवडली!

छिलून म्हणजे सोलून अशा अर्थाने आहे का? जर तोच अर्थ अभिप्रेत आहे तर छिलून हा हिंदी शब्द का? बाकी थोडक्याच शब्दात खूप काही मांडलेलं आवडलं.