माझे कसे म्हणू मी माझाच मी न आहे
स्मरतो कधी कुणाला अंतर उगाच दाहे
आवेग भावनांचा माया उतून वाहे
अभिषेक तोष तरिही संवेदना दुखावे
मेघाळ आसमंती संकेत जड पळांचा
वारा थके जरासा अंगी उलाल लाही
श्वासात जीव लाव्हा रुसवा भला इरेला
आतंक सोसलेला शिमगा सुभान देही
………………अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1484
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेहतरीन... आणखी काय म्हणावे?
बेहतरीन...
आणखी काय म्हणावे?
मनःपूर्वक आभार वेणू..........
In reply to बेहतरीन... आणखी काय म्हणावे? by वेणू
मनःपूर्वक आभार वेणू...................... :)