(गड गड गड)
लेखनविषय:
काव्यरस
(गड गड गड)
पाऊस थांबायचे नाव घेईना
खिडकीचे तावदाने थरारत थडथडतायत
तावदानावर एक एक नीरओळ लिहून जातोय पाऊस
गूढ, अनाकलनीय भाषेत
(गड गड गड)
-----
धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट
कौलांवरची टीपटीप थेंबांची लय
चिंचेच्या पानांवरून सरकणारे ओघळ
आणि खालच्या पत्र्याच्या डब्यावर होणारे त्यांचे आघात
(गड गड गड)
------
खिडकीतून हे सगळे बिचकत बघणारा मी
हातात तुझी आणि माझी लग्नातली तस्बीर
त्यात हसणारी तू
आणि तुला हसतांना बघून हसणारा मी
(गड गड गड)
------
रस्त्यांवरच्या पिवळ्या दिव्यांमध्ये
चमचमणारे ते चिंचेचे ओघळ
डोळ्यांखाली निसटणारे ओले अश्रु
स्स... चटका लावणारे
तो चंदेरी-पिवळा रंग मनात घर करून जाणारा
(गड गड गड)
------
पावसाचे तांडव वाढतच जातंय
पावसाने तावदानावर सर सर सर लिहिलेली
आत्ताचीच नीरओळ
चक्क माझ्या मनाच्या, पण तरीही गूढ भाषेत
.
.
आज तू हवी होतीस... स्स
.
.
गड गड गड
गड गड गड
|-मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१२/०८/२०१३)
वाचने
2615
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
सुंदर अभिव्यक्ती, कंसातील
In reply to सुंदर अभिव्यक्ती, कंसातील by वेणू
सहमत!
नीरओळ! कसली खलास कल्पना!
In reply to नीरओळ! कसली खलास कल्पना! by इनिगोय
+१.
वा.....!!!!
मस्त कच्चा माल आहे
व्वाह
छानच आहे कविता.
In reply to छानच आहे कविता. by कवितानागेश
म्हणूनचं
मस्त्त!!!