Skip to main content

(गड गड गड)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 12/08/2013 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
(गड गड गड) पाऊस थांबायचे नाव घेईना खिडकीचे तावदाने थरारत थडथडतायत तावदानावर एक एक नीरओळ लिहून जातोय पाऊस गूढ, अनाकलनीय भाषेत (गड गड गड) ----- धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट कौलांवरची टीपटीप थेंबांची लय चिंचेच्या पानांवरून सरकणारे ओघळ आणि खालच्या पत्र्याच्या डब्यावर होणारे त्यांचे आघात (गड गड गड) ------ खिडकीतून हे सगळे बिचकत बघणारा मी हातात तुझी आणि माझी लग्नातली तस्बीर त्यात हसणारी तू आणि तुला हसतांना बघून हसणारा मी (गड गड गड) ------ रस्त्यांवरच्या पिवळ्या दिव्यांमध्ये चमचमणारे ते चिंचेचे ओघळ डोळ्यांखाली निसटणारे ओले अश्रु स्स... चटका लावणारे तो चंदेरी-पिवळा रंग मनात घर करून जाणारा (गड गड गड) ------ पावसाचे तांडव वाढतच जातंय पावसाने तावदानावर सर सर सर लिहिलेली आत्ताचीच नीरओळ चक्क माझ्या मनाच्या, पण तरीही गूढ भाषेत . . आज तू हवी होतीस... स्स . . गड गड गड गड गड गड |-मिसळलेला काव्यप्रेमी -| (१२/०८/२०१३)
काव्यरस

वाचने 2621
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

छानच आहे कविता. पण ते गड्गडगड वाचताना अडखळल्यासारखं होतय. मात्र या कवितेचं वाचन बॅकग्राउंडला गडगडाट घेउन केले तर छान इफेक्ट येइल. :)

In reply to by कवितानागेश

मात्र या कवितेचं वाचन बॅकग्राउंडला गडगडाट घेउन केले तर छान इफेक्ट येइल.
म्हणूनच ते कंसात आहे. ते वाचण्यासाठी नाही, तो फक्त इमॅजीन करायचे शब्द आहेत.

खूपच मस्त !! अगदी नेहमी सारखीच !!