कॉफीचं कॅथार्सिस अर्थात चिडचिड-ए-सोमवार

लेखनविषय:
अरबट कॉफी चरबट कॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी || डोक्याची ग्रेव्ही, इनबॉक्सचं मटण | कॅफेनची किक, बुळबुळीत बटण | पहिला ढकलतोय, चारच बाकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||१|| परीट घडी, टायचा बावटा | आकड्यांची उसळ, एक्सेल पावटा | बॉस निकम्मा, टीम पापी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||२|| पायांची घडी, मांडीवर पोट | अप्रेझल मीटिंग, बोका भोट | परफॉर्मन्स मदिरा, रेटिंग साकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||३|| गारगिट्ट पोळ्या, बकाबकाबका | सिग्रेटचा धूर, फकाफकाफका | पगार, पीएफ, बोनस टॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||४||

जगणं

लेखनविषय:
काव्यरस
महाग जगणं कलंकी पदवी, बंबाळ चिरंजीव अश्वथामा !!!! मिळतात गळा घालून माळा, कापतात नरडी माघारी !!!! नेसतात सोवळे घालतात डाका, डोमकावळे रातंदिन !!!! भेटते यश नाहीत पैसं, उघडी मांडी टीचभर !!!! महाग मरण नाही सरण, गटारी भरल्या मूडद्यान्ही !!!! श्री. साजीद यासीन पठाण

शापवाणी

लेखनविषय:
काव्यरस
झडली तुझी जीभ गेली तुझी वाचा होउ दे रे खाचा डोळ्यांचिया पडतील रे पाने कुणी लावीना शेपूट राहशील असाच राणीविना वेचशील कागद मागशील भीक मारुनिया झाडू राहशील झालं रे वाटोळं तुझा वळला संगाड टोचतील कावळे बसुनिया फळवशील रांडा महारोग होईल पडतील कीडे अंगावरी अशी शापवाणी कानाला सवय वाढले ते वय मन नाही

( चला नांगरूया शेत सारे )

आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल. चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा.. *************************************************** बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगर

(तू)

लेखनविषय:
बोटांवर चिकटलेल्या फेविक्विकच्या थेंबासारखा तू . पापण्यांच्या कोपर्‍यांवर साठणार्‍या घाणीसारखा तू . रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन भरकटलेल्या बेवड्यासारखा तू . हवा मारुन मारुन न पेटणार्‍या रॉकेल संपलेल्या स्टोव्हसारखा तू . हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखा तू . टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून वाहणार्‍या घामाच्या धारेसारखा तू . सूर्यास्ताच्या वेळी हटकून नेहमीच्या जागी पाय वळणारा तू . तोंडी नाव आलं तरी ठसठसणार्‍या विखारी जखमेसारखा तू .... तू, तू आणि तू ... सांग रे नालायका, हो तूच तू कुठे चचला आहेस?

नायक क्रमांक एक

लेखनविषय:
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

(मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही)

लेखनविषय:
काव्यरस
खुप दिवसांनी काही ओळी सुचल्या आणि ते ही कॉपी पेस्ट न करता . अस्सल स्वतःच्या .

नेहमीचेच यशस्वी कलाकार

लेखनविषय:
काव्यरस
अ ब क ड अ ब क ड वेगळे विचार वेगळी कृती वेगळी मते अ ला ब पटत नाही तर ब ला क अ क ला अ ड आणि ड ला अ ब नाही नाही अ ला ब क पटत नाही ब ला क पटतो पण क ला ड पटतो हे पटत नाही क ला अ पटत नाही पण अ ला ब पटत नाही हे ड ला अ पटत यापेक्षा जास्त दु:खदायक वाटते नाही नाही थांबा परत सांगतो पहिल्यापासून अ ला...जाऊ द्या ना अ ब क ड ला काहीतरी पटतं काहीतरी पटत नाही एवढं तरी पटल ना तुम्हाला मग पुढे सांगतो अ ब क ड अ एक मुद्दा मांडतो ब सरसावून पुढे येणार तोच य पटकन येवून काहितरी बोलतो य बोलला म्हणून र बोलतो र बोलला म्हणून य गुरगुरतो र च्या बाजूने ल येतो य च्या बाजूने व येतो प आणि फ मधेच येतात पण आपण कोणत्

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..
Subscribe to भयानक