मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इस्पिक राजा's picture
इस्पिक राजा in जनातलं, मनातलं
3 Sep 2015 - 3:45 pm

आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत.

ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील. चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते.

प्रत्येक टोळाने हा विचार करावा की ज्यांनी मिपाच्या भल्यासाठी पुर्ण वेळ दिला त्यांच्यावर आपल्यामुळे मिपापासुन दूर जाण्याची वेळ येऊ नये.

एवढे बोलुन मी माझा निबंध संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीनृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजास्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियासमीक्षालेखअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भमदतवाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2015 - 4:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही.

-दिलीप बिरुटे

जे.पी.मॉर्गन's picture

3 Sep 2015 - 4:05 pm | जे.पी.मॉर्गन

मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही.

>> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. <<
+१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही.

आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :)

मिपाचा पंखा
जे.पी.

चैतन्य ईन्या's picture

3 Sep 2015 - 4:10 pm | चैतन्य ईन्या

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात

कंजूस's picture

3 Sep 2015 - 4:21 pm | कंजूस

मग आम्ही कुठं जायचं इस्पिकच्या राजा?
-किलवरची दुर्री.

मनीषा's picture

3 Sep 2015 - 4:32 pm | मनीषा

जय मिपा .. राहीलं की

टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ...
पण लई कंट्टाळा आलाय .

आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

3 Sep 2015 - 4:35 pm | फुलथ्रॉटल जिनियस

ट्रोल मिपावर वाढले आहेत हे खरे,यावर उपाय एकच ,या लोकांकडे दुर्लक्ष करावे.

आदूबाळ's picture

3 Sep 2015 - 5:00 pm | आदूबाळ

हे एक बाकी खरं बोल्लात हो. एकदम सद्गदित झालो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2015 - 5:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोळे पाणावले असतील तुमचे. =))

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

3 Sep 2015 - 5:10 pm | पैसा

तुम्हीच सांगितलंत ते बरं झालं. आता पक्कं लक्षात राहील.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Sep 2015 - 4:36 pm | प्रकाश घाटपांडे

प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स हा राजेश घासकडवींचा लेख जरुर वाचावा

द-बाहुबली's picture

3 Sep 2015 - 5:05 pm | द-बाहुबली

इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 5:42 pm | प्यारे१

+११११

इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!!

दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 5:49 pm | प्यारे१

यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

होबासराव's picture

3 Sep 2015 - 9:33 pm | होबासराव

ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

बलोब्बल :))

ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

>>>>>>
..बैलाचा डोळा !!!

द-बाहुबली's picture

3 Sep 2015 - 5:50 pm | द-बाहुबली

इट्स पार्ट आफ आवर लाइफ..

म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2015 - 7:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात.

-दिलीप बिरुटे
(मा.उपक्रमी)

मराठी_माणूस's picture

4 Sep 2015 - 10:22 am | मराठी_माणूस

धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?

पैसा's picture

3 Sep 2015 - 5:11 pm | पैसा

=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2015 - 5:19 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा ह्हा!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Sep 2015 - 5:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

याचं. धाग्यावर ट्रॉलांची एक जाहिर यादी करावी. त्यांचे धागे आणि प्रतिसादांना फाट्यावर नेउन. मारायचे आवाहन करायचं.

वेल्लाभट's picture

3 Sep 2015 - 5:36 pm | वेल्लाभट

एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते.
तसं न होवो.

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!.
.
.
.

.
.
जय ट्रोलभैरव.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Sep 2015 - 7:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुझ्या ओळखीमधे ह्या पदाला शोभेल असा कोणी आहे का रे? ;) करुन टाकु रेकमेंड.

हाय जेप्या. काय म्हणतोस भावा?
कर कॉल संध्याकाळी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Sep 2015 - 9:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गल्ली चुकली मालक :P

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 9:39 pm | प्यारे१

लै भोळा हैस कॅप्टन.
ते अभ्या सोलापुरचंय.... परत वाच. समजलं तर समजलं नाहीतर सांगूच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Sep 2015 - 9:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नै झेपलं. रादर एवढं जास्तं लक्ष देउन वाचलेलं बी नै. अता सांगा उलगडुन =))

अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे!
कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून.
अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?

अभ्या..'s picture

3 Sep 2015 - 10:33 pm | अभ्या..

कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना.
पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 10:38 pm | प्यारे१

ब्रेकिंग न्यूज़....
अभ्या ने बताया खुदको कई लोगोंसे बड़ा!
- ट्रोलर

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Sep 2015 - 10:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2015 - 7:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!.
सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे.
लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे.

नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर
गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ?

-दिलीप बिरुटे

मम्बाजी सर्वज्ञ's picture

3 Sep 2015 - 8:08 pm | मम्बाजी सर्वज्ञ

सहमत! इतके दिवस काठावर बसून गम्मत बघत होतो पण राहवले नाही म्हणून हि (पहिली) कॉमेंट!

आस्तिक शिरोमणि's picture

4 Sep 2015 - 12:52 am | आस्तिक शिरोमणि

ट्रोल म्हणजे काय असते?

ट्रोल म्हणजे ट्रोल म्हणजे काय असतं
ट्रोल फुकटचं दुखणं असतं
वैतागवाडीचं बेणं असतं
कुठल्याही धाग्यावर कचरा करणं असतं!

ट्रोल फुकटचं दुखणं असतं

आणि
तुमचं अन आमचं, सेमच असत !

सस्नेह's picture

4 Sep 2015 - 10:20 am | सस्नेह

क्या बात है !

कंजूस's picture

4 Sep 2015 - 1:28 pm | कंजूस

ट्रोल = चर्पटपंजरी?

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Sep 2015 - 7:50 am | अनिरुद्ध.वैद्य

अरे बापरे ... इथ तर सिरिअस चर्चा होतेय ... मला वाटलं की भारतात वृद्धाश्रमाच्या धर्तीवर हा निघाला की काय ;)

हेमंत लाटकर's picture

7 Sep 2015 - 10:47 am | हेमंत लाटकर

या ट्रोलांचा बदोबस्त कसा करायचा.

मला वाटले डॉक्टरसाहेबांनी परत जूना आयडी घेतला की काय.