✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इ
इस्पिक राजा यांनी
गुरुवार, 09/03/2015 - 15:45  ·  लेख
लेख
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील. चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. प्रत्येक टोळाने हा विचार करावा की ज्यांनी मिपाच्या भल्यासाठी पुर्ण वेळ दिला त्यांच्यावर आपल्यामुळे मिपापासुन दूर जाण्याची वेळ येऊ नये. एवढे बोलुन मी माझा निबंध संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
kathaa
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
प्रतिक्रिया
समीक्षा
लेख
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
मदत
वाद

प्रतिक्रिया द्या
19006 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

आपल्या विचाराशी सहमत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/03/2015 - 16:05 नवीन
आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मिपावर फारसा नियमित नसल्याने

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 09/03/2015 - 16:05 नवीन
मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही. >> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. << +१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही. आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :) मिपाचा पंखा जे.पी.
  • Log in or register to post comments

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत

चैतन्य ईन्या
गुरुवार, 09/03/2015 - 16:10 नवीन
हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात
  • Log in or register to post comments

मग आम्ही कुठं जायचं

कंजूस
गुरुवार, 09/03/2015 - 16:21 नवीन
मग आम्ही कुठं जायचं इस्पिकच्या राजा? -किलवरची दुर्री.
  • Log in or register to post comments

जय मिपा .. राहीलं की

मनीषा
गुरुवार, 09/03/2015 - 16:32 नवीन
जय मिपा .. राहीलं की टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ... पण लई कंट्टाळा आलाय . आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.
  • Log in or register to post comments

ट्रोल मिपावर वाढले आहेत हे

फुलथ्रॉटल जिनियस
गुरुवार, 09/03/2015 - 16:35 नवीन
ट्रोल मिपावर वाढले आहेत हे खरे,यावर उपाय एकच ,या लोकांकडे दुर्लक्ष करावे.
  • Log in or register to post comments

हे एक बाकी खरं बोल्लात हो.

आदूबाळ
गुरुवार, 09/03/2015 - 17:00 नवीन
हे एक बाकी खरं बोल्लात हो. एकदम सद्गदित झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/03/2015 - 17:08 नवीन
डोळे पाणावले असतील तुमचे. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

+१०००१

पैसा
गुरुवार, 09/03/2015 - 17:10 नवीन
तुम्हीच सांगितलंत ते बरं झालं. आता पक्कं लक्षात राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स हा

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/03/2015 - 16:36 नवीन
प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स हा राजेश घासकडवींचा लेख जरुर वाचावा
  • Log in or register to post comments

इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ

द-बाहुबली
गुरुवार, 09/03/2015 - 17:05 नवीन
इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.
  • Log in or register to post comments

+११११

प्यारे१
गुरुवार, 09/03/2015 - 17:42 नवीन
+११११ इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!! दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

यात एक अ‍ॅडिशन राहीली ती

प्यारे१
गुरुवार, 09/03/2015 - 17:49 नवीन
यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे

होबासराव
गुरुवार, 09/03/2015 - 21:33 नवीन
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात. बलोब्बल :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे

सस्नेह
Fri, 09/04/2015 - 10:17 नवीन
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
>>>>>> ..बैलाचा डोळा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

इट्स पार्ट आफ आवर लाइफ..

द-बाहुबली
गुरुवार, 09/03/2015 - 17:50 नवीन
इट्स पार्ट आफ आवर लाइफ.. म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

उपक्रमचा साक्षीदार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/04/2015 - 07:23 नवीन
उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात. -दिलीप बिरुटे (मा.उपक्रमी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती

मराठी_माणूस
Fri, 09/04/2015 - 10:22 नवीन
धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

पैसा
गुरुवार, 09/03/2015 - 17:11 नवीन
=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.
  • Log in or register to post comments

ह्हा ह्हा ह्हा!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/03/2015 - 17:19 नवीन
ह्हा ह्हा ह्हा!
  • Log in or register to post comments

याचं. धाग्यावर ट्रॉलांची एक

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/03/2015 - 17:28 नवीन
याचं. धाग्यावर ट्रॉलांची एक जाहिर यादी करावी. त्यांचे धागे आणि प्रतिसादांना फाट्यावर नेउन. मारायचे आवाहन करायचं.
  • Log in or register to post comments

एकच म्हणेन

वेल्लाभट
गुरुवार, 09/03/2015 - 17:36 नवीन
एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते. तसं न होवो.
  • Log in or register to post comments

काय नाय एकादा खमक्या संपादक

जेपी
गुरुवार, 09/03/2015 - 17:51 नवीन
काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. . . . . . जय ट्रोलभैरव.
  • Log in or register to post comments

तुझ्या ओळखीमधे ह्या पदाला

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/03/2015 - 19:20 नवीन
तुझ्या ओळखीमधे ह्या पदाला शोभेल असा कोणी आहे का रे? ;) करुन टाकु रेकमेंड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हाय जेप्या. काय म्हणतोस भावा?

अभ्या..
गुरुवार, 09/03/2015 - 19:50 नवीन
हाय जेप्या. काय म्हणतोस भावा? कर कॉल संध्याकाळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

गल्ली चुकली मालक :P

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/03/2015 - 21:32 नवीन
गल्ली चुकली मालक :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लै भोळा हैस कॅप्टन.

प्यारे१
गुरुवार, 09/03/2015 - 21:39 नवीन
लै भोळा हैस कॅप्टन. ते अभ्या सोलापुरचंय.... परत वाच. समजलं तर समजलं नाहीतर सांगूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नै झेपलं. रादर एवढं जास्तं

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/03/2015 - 21:59 नवीन
नै झेपलं. रादर एवढं जास्तं लक्ष देउन वाचलेलं बी नै. अता सांगा उलगडुन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे

प्यारे१
गुरुवार, 09/03/2015 - 22:19 नवीन
अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे! कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून. अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कशाला नाव जॅक् घेतलएस रे,

अभ्या..
गुरुवार, 09/03/2015 - 22:33 नवीन
कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना. पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्रेकिंग न्यूज़....

प्यारे१
गुरुवार, 09/03/2015 - 22:38 नवीन
ब्रेकिंग न्यूज़.... अभ्या ने बताया खुदको कई लोगोंसे बड़ा! - ट्रोलर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/03/2015 - 22:46 नवीन
अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

स्वच्छतेला तर शुन्य मिनिट लागत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/04/2015 - 07:12 नवीन
काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे. लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे. नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सहमत

मम्बाजी सर्वज्ञ
गुरुवार, 09/03/2015 - 20:08 नवीन
सहमत! इतके दिवस काठावर बसून गम्मत बघत होतो पण राहवले नाही म्हणून हि (पहिली) कॉमेंट!
  • Log in or register to post comments

ट्रोल म्हणजे काय असते?

आस्तिक शिरोमणि
Fri, 09/04/2015 - 00:52 नवीन
ट्रोल म्हणजे काय असते?
  • Log in or register to post comments

ट्रोल म्हणजे ट्रोल म्हणजे काय

अजया
Fri, 09/04/2015 - 07:20 नवीन
ट्रोल म्हणजे ट्रोल म्हणजे काय असतं ट्रोल फुकटचं दुखणं असतं वैतागवाडीचं बेणं असतं कुठल्याही धाग्यावर कचरा करणं असतं!
  • Log in or register to post comments

ट्रोल म्हणजे ट्रोल म्हणजे काय असतं

पगला गजोधर
Fri, 09/04/2015 - 08:41 नवीन
ट्रोल फुकटचं दुखणं असतं
आणि तुमचं अन आमचं, सेमच असत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

वाहवा !

सस्नेह
Fri, 09/04/2015 - 10:20 नवीन
क्या बात है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ट्रोल = चर्पटपंजरी?

कंजूस
Fri, 09/04/2015 - 13:28 नवीन
ट्रोल = चर्पटपंजरी?
  • Log in or register to post comments

अरे बापरे

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 09/07/2015 - 07:50 नवीन
अरे बापरे ... इथ तर सिरिअस चर्चा होतेय ... मला वाटलं की भारतात वृद्धाश्रमाच्या धर्तीवर हा निघाला की काय ;)
  • Log in or register to post comments

या ट्रोलांचा बदोबस्त कसा

हेमंत लाटकर
Mon, 09/07/2015 - 10:47 नवीन
या ट्रोलांचा बदोबस्त कसा करायचा.
  • Log in or register to post comments

अरेच्च्या !! धागालेखक इस्पिकचा "राजा" आहेत.

बबन ताम्बे
Mon, 09/07/2015 - 12:00 नवीन
मला वाटले डॉक्टरसाहेबांनी परत जूना आयडी घेतला की काय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा