मिसळपावचे अधिकृत धोरण

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
13 Jul 2010 - 7:39 pm

नमस्कार,
आज दिनांक १३/०७/१० ला मिसळपावच्या धोरणांना प्रसिध्दी देतांना आनंद होत आहे. ही धोरणे मिसळपावची यापुढील मार्गदर्शक असतील. यापुढे मिसळपाववर वावर करतांना आणि लेखन करतांना सदस्यांना ही धोरणे मान्य आहेत असं गृहीत धरल्या जाईल.

१. मिसळपावावरील लेखनात ललित किंवा वैचारिक लेखन, गद्य, पद्य, पाककृती यांना स्थान दिले जाईल. या व्यतिरिक्त खेळीमेळीचे धागे मिसळपावावर ठेवले जातील. लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल. एखाद्या सदस्याने मिसळपावाचे सदस्यत्व सोडले असता त्याचे लेखन प्रकाशित ठेवण्याचा किंवा अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेईल.

२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.

३. आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे झाल्यास मिसळपावाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करता येईल.

४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी.

५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करणारे लिखाण, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल.

६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी.

७. संपादकीय धोरणात परिस्थिनुरुप बदल करण्याचे हक्क संपादकांकडे राखीव आहेत. त्याचा वेळोवेळी वापर करता येईल. गरज भासल्यास सदस्यांना जाहीर निवेदनामार्फत तशी सूचना दिली जाईल.

८ . वारंवार सूचना/ ताकीद देऊनही एखाद्या सदस्याचा खोडसाळपणा दिसून येत असेल तर विशिष्ट कालावधीसाठी व्य.नि. आणि खरडवहीची सुविधा काढून घेण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. या उपायानंतरही सदस्याच्या वागणूकीत सुधारणा नसल्यास सदस्याचे खाते बंद होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी.

९. संकेतस्थळावरील अडचणी, लेखांचे संपादन, संपादनाविषयी तक्रारी यांच्यावर निघणारे धागे संपादन मंडळाला अनावश्यक वाटल्यास त्वरित उडवले जातील आणि त्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही.

१०. येथील सर्व लेखनप्रकारातील आणि सर्व विषयांवरील लेखन तसेच त्यावरील सर्व प्रतिसाद, हे त्या त्या लेखन/प्रतिसाद कर्त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याला मिपा व्यवस्थापनाचे कुठल्याही प्रकारे/अर्थाने अनुमोदन नाही याची सर्व सदस्य, लेखक आणि वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

११. मिपा संकेतस्थळ खासगी आहे. कोणी सदस्य मराठी संकेतस्थळास बाधा येईल असे कृत्य करीत असल्यास, जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करीत असतील किंवा संकेतस्थळावरील वातावरण खराब करीत असल्यास, संस्थळास धोका निर्माण करीत आहे असे वाटत असल्यास सबंधिताचे लेखन काढून टाकण्याबरोबर सदस्यत्व रद्द करणे, कायमचे निष्काषित करणे त्याबाबतचा निर्णय संपूर्णपणे संपादक मंडळाचा, व्यवस्थापनाचा, किंवा ज्यांना व्यवस्थापनाने अधिकार दिले आहेत त्यांचा किंवा संस्थळ मालकांचा राहील.त्याबाबत कोणतेही कारण , स्पष्टीकरण देणे आवश्यक नाही.

मिसळपावाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी वरील सूचनांचे पालन करावी अशी अपेक्षा आहे. सदस्यांना लेखनविषयक धोरणांची जाणीव करून देण्यास आणि वेळोवेळी मदत करण्यास संपादक मंडळ नेमलेले आहे. लेखनविषयक प्रश्न असल्यास जाहीर लेख न टाकता संपादकांना खरडी किंवा व्यक्तिगत निरोपांद्वारे विचारावेत. संपादक मंडळ या आयडीवर निरोप पाठवूनही हे प्रश्न विचारता येतील.

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

रामदास's picture

13 Jul 2010 - 7:57 pm | रामदास

म्हणून या धोरणाचा पाठपुरावा मी करेन.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jul 2010 - 8:14 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

सदस्यांनीपण संपादक हे आपापली वैयक्तिक आयुष्य सांभाळून हे काम करत आहेत हे ध्यानात ठेवावे अशी विनंती करतो. शिवाय, संपादकांचे एखादे कृत्य पटले नाही तर संपादक मंडळाकडे विचारणा करावी. त्यासाठी जाहिर काथ्याकूट करू नये. सगळ्यांनाच सगळे माहित नसते (किंबहुना सगळ्याच गोष्टी संपादक पुढे आणू शकत नाहीत हे ध्यानात ठेवावे) आणि त्यामुळे संपादकांच्या कृत्यांमागच्या भूमिकेबद्दल गैरसमज होऊ शकतात.

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

14 Jul 2010 - 6:52 am | छोटा डॉन

सदस्यांनीपण संपादक हे आपापली वैयक्तिक आयुष्य सांभाळून हे काम करत आहेत हे ध्यानात ठेवावे अशी विनंती करतो. शिवाय, संपादकांचे एखादे कृत्य पटले नाही तर संपादक मंडळाकडे विचारणा करावी. त्यासाठी जाहिर काथ्याकूट करू नये. सगळ्यांनाच सगळे माहित नसते (किंबहुना सगळ्याच गोष्टी संपादक पुढे आणू शकत नाहीत हे ध्यानात ठेवावे) आणि त्यामुळे संपादकांच्या कृत्यांमागच्या भूमिकेबद्दल गैरसमज होऊ शकतात.

+१, अत्यंत महत्वाचा मुद्दा.
अगदी हेच म्हणायचे आहे.

बाकी धोरणे उत्तम आहेतच, त्याचे काटेकोर पालन करण्याचा व सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिल.

जाता जाता : प्रभु मास्तर, जियो ! मास्तरांचा प्रतिसाद म्हणजे 'कळस' आहे, १००% सहमत.

------
छोटा डॉन

नितिन थत्ते's picture

13 Jul 2010 - 8:09 pm | नितिन थत्ते

धोरण जाहीर झाले हे चांगले झाले.
नवी घटना उत्तम आहे. बरीचशी पूर्वीच्या नियमावलीसारखीच आहे. या धोरणप्रसिद्धीमुळे वातावरण निवळण्यास आणि शांतता प्रस्थापित होण्यास बहुधा मदत व्हावी.

अर्थातच नवी घटना निर्माण झाली तरी सगळे नियम काही पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेले नसतात. लिहिणे शक्यही नसते. घटना राबवताना घेतल्या जाणार्‍या निर्णयांमधून त्या घटनेचे अर्थ कसे लावावे हे स्पष्ट होत जाते. याला केस लॉ म्हणतात. विशेषतः जेव्हा दोन कलमांमध्ये विसंगती निर्माण होते तेव्हा या केस लॉज चा फारच उपयोग होतो.

परंतु हे जे धोरण जाहीर झाले आहे त्यात केस लॉजची बहुधा गरजच पडणार नाही किंवा उपयोग होणार नाही इतके हे धोरण स्पष्ट आणि असंदिग्ध आहे.

उत्तम.

नितिन थत्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jul 2010 - 8:20 pm | बिपिन कार्यकर्ते

नितिन, मूळातच मिपाकडे एखाद्या कोर्ट अथवा तत्सम दृष्टीने का बघावे? हे एक सर्वांनी एकत्र येण्याचे, हसत खेळत एकत्र वेळ घालवायचे, दोन द्यायचे / दोन घ्यायचे, एकमेकांना समृद्ध करायचे स्थळ आहे या भावनेतून का वावरू नये? धोरण असणे आवश्यक झाले हे खरे. पण या धोरणाचा उपयोग होण्याची वेळ कमीत कमी यावी हे आपण सगळ्यांनीच बघणे हितकर. आज पर्यंत टाळी कधी एक हाताने वाजली नाही आणि या जगाच्या अंतापर्यंत तरी वाजणार नाही हे नक्की. अधिक काय सांगावे? आपण सगळेच सूज्ञ आहोत.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

13 Jul 2010 - 8:23 pm | चतुरंग

तांत्रिक क्लिष्टता आणि नियमांचा कीस काढणे यासाठी धोरणे नाहीत. एखाद्या मोठ्या एकत्र कुटुंबात वावरताना सगळ्यांनी खेळीमेळीने रहावे अशा हेतून घराचे म्हणून काही नियम असतात आणि ते सर्वांनी पाळावेत अशी अपेक्षा असते, थोडीफार चेष्टामस्करी, कधी रागलोभ हे चालायचेच पण मर्यादेतच. त्या अनुषंगाने ह्या धोरणांकडे पाहावे!

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2010 - 9:24 pm | प्रकाश घाटपांडे

सहमत आहे.
(मर्यादांच भान व भीती दोन्ही बाळगुन असणारा)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

13 Jul 2010 - 8:11 pm | श्रावण मोडक

क्रमांक ७, ८, ९ मधील तरतूद सर्वाधिक महत्त्वाची. मोलाचीही. आवश्यकही होती. क्रमांक ९ तर संपादकांच्या हातचे ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्रासारखाच दुर्मिळतेने त्याचा वापर होईल अशी संपादकांकडून आणि (माझ्यासह) सदस्यांकडूनही अपेक्षा.

संपादक हे आधी सदस्य आहेत त्यामुले तेही ह्यात आलेच.
एकदा असा मान ठेवला गेला की बाकी गोष्टी आपसूकच येत जातात जेणेकरुन अस्त्राचा वापर कमीतकमी अथवा नगण्य होतो!

(समाधानी)चतुरंग

प्रियाली's picture

13 Jul 2010 - 8:23 pm | प्रियाली

नवी धोरणे आवडली. त्यांचे पालन करण्याचा काटेकोर प्रयत्न माझ्याकडून होईल.

(आशावादी) प्रियाली

क्रेमर's picture

13 Jul 2010 - 8:26 pm | क्रेमर

धोरणाचे स्वागत.

मिपावरील संपादक मराठी आंतरजालावर बराच काळ कार्यरत असावे असे दिसते. त्यांच्या आंतरजालावरील प्रदीर्घ वावरामुळे नकळत का होईना काही सदस्यांविषयी त्यांच्या मनात काही एक मत निर्माण झालेले असावे. असे असतांना ते या मतांना बाजूला ठेऊन निर्णय घेत असतील/ घेतील अशी अपेक्षा आहे.

चतुरंग's picture

13 Jul 2010 - 8:30 pm | चतुरंग

मिपावरील संपादक मराठी आंतरजालावर बराच काळ कार्यरत असावे असे दिसते. त्यांच्या आंतरजालावरील प्रदीर्घ वावरामुळे नकळत का होईना काही सदस्यांविषयी त्यांच्या मनात काही एक मत निर्माण झालेले असावे. असे असतांना ते या मतांना बाजूला ठेऊन निर्णय घेत असतील/ घेतील अशी अपेक्षा आहे.

संपादक मंडळात असलेल्या सर्व सदस्यांचा विचार विनिमय असतोच. कोणा एक-दोघांच्या मताने निर्णय होत नाहीत. सदस्यांबाबत काही वैयक्तिक मत असले/नसले तरी ते संपादनाच्या आड येणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली जाते. सर्वांचा मिळून तेवढा अनुभव निश्चितच जमा झालेला आहे. तेव्हा तुम्ही केलेली अपेक्षा गैरवाजवी नाही! धन्यवाद! :)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jul 2010 - 8:37 pm | बिपिन कार्यकर्ते

मिपावरील संपादक मराठी आंतरजालावर बराच काळ कार्यरत असावे असे दिसते. त्यांच्या आंतरजालावरील प्रदीर्घ वावरामुळे नकळत का होईना काही सदस्यांविषयी त्यांच्या मनात काही एक मत निर्माण झालेले असावे. असे असतांना ते या मतांना बाजूला ठेऊन निर्णय घेत असतील/ घेतील अशी अपेक्षा आहे.

आपल्या नेहमीच्या आयुष्यात जेव्हा आपण लोकांना प्रत्यक्षात भेटतो, वावरतो तरी एवढी मतंमतांतरं असतात. पूर्वग्रह असतात. म्हणूनच आपण माणूस आहोत. नाहीतर देव बनलो असतो नाहीतर संत वगैरे. इथे जालावर तर बहुतांसी लोक नक्की कोण हे पण आपल्याला माहित नसते. पूर्वग्रह वाढायला बराच वाव असतो. तरीही संपादक बहुतांशवेळा तटस्थ बुद्धीने वागायचा प्रयत्न करतातच. पण शेवटी 'टू अर इज ह्युमन' या न्यायाने उन्नीसबीस होतच असते. पण कोणत्याही समस्येचे / भांडणाचे निराकरण नीट संवाद साधून होणे शक्य असते. तसेच व्हावे. एवढीच इच्छा.

बिपिन कार्यकर्ते

लंबूटांग's picture

13 Jul 2010 - 8:32 pm | लंबूटांग

त्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही

हे खटकले. मागे जेव्हा नीलकांतने सगळी सूत्रे हातात घेतली तेव्हा अधिक पारदर्शकता आणली जाईल अथवा तत्सम काही तरी म्हटल्याचे आठवते आहे.

असो धोरण जाहीर झाले बरे झाले.

पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न होता आहे आणि राहिल.

प्रभो's picture

13 Jul 2010 - 8:37 pm | प्रभो

सहमत आहे

पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न होता आहे आणि राहिल.

*खेळ विभागाचं काय रे, कांता??

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jul 2010 - 8:42 pm | बिपिन कार्यकर्ते

हे खटकले.

असं लिहिलं असलं तरी, बहुतांश वेळेला स्पष्टीकरण देणं किंवा संवाद साधणं असं काही संपादक करतच असतात. ते समोर येत नाही. ते ही समोर येणं आणि सदस्यांनी ते समजून घेणं आवश्यक आहे.

बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

13 Jul 2010 - 8:45 pm | प्रभो

तुमच्याशीही सहमत आहे. मला स्पष्टीकरण मिळालं होतं. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही.

अशा तक्रारी दुसर्‍यांच्या असू नयेत, एवढीच इच्छा! :)

लंबूटांग's picture

13 Jul 2010 - 8:50 pm | लंबूटांग

मागे काही काळ बरीच उडवा उडवी झाली होती आणि मग त्याचे का उडाले माझेच का नाही असा खाली प्रियाली यांनी म्हटले आहे तसा कीस काढला गेला होता.

संपादकांनी प्रतिसाद न उडवता तिथेच XYZ कारणासाठी हा प्रतिसाद काढण्यात आलेला आहे असे लिहीले तर बरेच प्रश्न सुटतील असे सुचवावेसे वाटते.

ती कारणे ढोबळमानाने धोरणात दिलेली आहेत प्रत्येक संपादित प्रतिसादात हे देणे शहाणपणाचे नाही.

------------------
औषधाच्या रॅपरवर साईडइफेक्ट्स लिहिलेले असतात. कोणाला काहीच साईडइफेक्ट दिसणार नाही काहींना बरेचसे दिसतील ते ज्याच्यात्याच्या प्रकृतीधर्मावर अवलंबून आहे. प्रत्येकाला स्वतंत्र स्पष्टीकरण देणे शक्य नसते तसेच काहीसे. गोळाबेरीज सांगितलेली असते बाकी तारतम्य..

चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jul 2010 - 11:14 am | परिकथेतील राजकुमार

प्रत्येकाला स्वतंत्र स्पष्टीकरण देणे शक्य नसते तसेच काहीसे. गोळाबेरीज सांगितलेली असते बाकी तारतम्य..

+१
सहमत आहे.
फक्त एक विनंती अशी आहे की जर एखाद्या संपादकाने एखादा धागा अथवा प्रतिक्रीया उडवल्यास त्याची जबाबदारी सर्व संपादक मंडळाने घ्यावी.

बर्‍याचदा असे दिसते की एखाद्या उडालेल्या धाग्याविषयी / प्रतिसादाविषयी सदस्याकडून जाहिररीत्या (जे ह्यापुढे शक्य नाही) अथवा खरडवहीत विचारणा झाली तर बरेचसे संपादक 'छे मी तेंव्हा न्हवतोच' , 'धागा अजुन उघडलाच नाहिये, बघुन सांगतो' 'काय सांगता ? तुमचा प्रतिसाद उडाला ? कधी ?' अशी विधाने करुन मोकळी होतात. 'तो मी न्हवेच' असे दाखवायची धडपड बर्‍याचदा स्पष्ट दिसते. ह्यामुळे विनाकरण संबंधीत मजकुर संपादीत करणारा संपादक हा चुकीचा ठरतो. त्यानी जे काय केले त्याला इतर संपादकांचा पाठींबा न्हवता अथवा इतरांना ते माहितीच नाही अथवा संपादकांच्यात एकमेकात ताळमेळ नाही असा काहीसा चुकीच संदेश सदस्यांपर्यंत जातो.

हे टाळता आल्यास बरे होईल असे वाटते. उडालेल्या धाग्याविषयी / प्रतिसादा विषयी 'योग्यरीत्या' विचारणा झाल्यास, फक्त 'संपादक मंडळ' ह्या आयडीच द्वारे खुलासा व्हावा असे सुचवावेसे वाटते.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

चित्रा's picture

13 Jul 2010 - 8:56 pm | चित्रा

प्रतिसाद काढण्यापेक्षा अप्रकाशित जेव्हा केला जातो तेव्हा असे लिहीणे कठीण असते. नाहीतर कल्पना करा की प्रत्येक अप्रकाशित प्रतिसादाबरोबर एक संपादकांचा प्रतिसाद की "हा वरचा प्रतिसाद का अप्रकाशित केला". मी पूर्वी जेव्हा लेख किंवा प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत तेव्हा सदस्याच्या ख. व. मध्ये लिहीले आहे. पण काही सदस्य या चांगुलपणाचा फायदा घेतात. तेव्हा आमचा वेळ घालवून प्रत्येक सदस्याच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देणे अवघड आहे. समजून घेऊ शकाल, असे वाटते.

संपादक प्रतिसादातील काही वाक्ये ठेऊन आक्षेपार्ह वाक्ये शक्यतो अशासाठी काढत अशासाठी नाहीत, की त्यामुळे नक्की गदारोळ कशामुळे झाला याचे संदर्भच नाहीसे होतात! अप्रकाशित प्रतिसादांमुळे संपादक मंडळाकडे संदर्भ राहतात.. असो.

प्रियाली's picture

13 Jul 2010 - 8:45 pm | प्रियाली

काय राहील आणि काय काढले जाईल त्याचे ढोबळ स्पष्टीकरण येथे दिलेले आहेच. बर्‍याचदा सदस्यांना संपादित लेखनावर काथ्याकूट करून हवा असतो तो करत, कीस काढत राहणे मला अनावश्यक वाटते.

नितिन थत्ते's picture

13 Jul 2010 - 8:56 pm | नितिन थत्ते

तेच माझ्या प्रतिसादात लिहिले आहे. धोरण अतिशय स्पष्ट आहे.

संपादकांचा/संपादक मंडळाचा निर्णय फायनल.

म्हणूनच नियम ४ ते ९ ऐवजी तेवढा एकच नियम लिहून पुरला असता.
(वेलणकर जिंकले असा धागा मनोगतावर टाकावा म्हणतो).

वातावरण कलुषित केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून आता एक ऑगस्टपर्यंत लेखन रजा.

नितिन थत्ते

चित्रा's picture

13 Jul 2010 - 9:26 pm | चित्रा

मिपावर कुठच्याच प्रश्नाला उत्तरे न देणे, प्रश्नाला कधीच प्रतिसाद न येणे, अपेक्षित नव्हते आणि बहुतांशी केले नाही. जेव्हा कधी केले आहे त्या १०% वेळा आधी उत्तरे देऊन, समजुतीने सांगून समझोत्याचे प्रयत्न केले आहेत.
तेव्हा हा निर्णय एकेरी नाही. इथे तुम्हाला माहिती असलेल्या चालकांनी आणि संपादकांनी एकत्रितरित्या घेतला आहे.

प्रियाली's picture

13 Jul 2010 - 11:08 pm | प्रियाली

वातावरण कलुषित केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून आता एक ऑगस्टपर्यंत लेखन रजा.

अवश्य घ्या! आणि मोकळ्या मनाने परत या. :)

(प्रतीक्षेत) प्रियाली

चित्रा's picture

13 Jul 2010 - 8:50 pm | चित्रा

मिपाच्या धोरणांच्या अंमलबजावणीत बर्‍याच अंशी पारदर्शकता राहिली आहे.

परंतु प्रत्येक वेळी एका सदस्याने उठून एक नवीन धागा सुरू करायचा, त्या त्या वेळी असलेल्या आपल्या प्रश्नांची ताबडतोब उत्तरे देण्यास वेठीला धरायचे, इतकेच नाही तर संपादकांना कुत्रे, आणि अशाच असभ्य किंवा इतर बोचर्‍या विशेषणांनी संबोधायचे आणि पारदर्शकतेची अपेक्षा करायची हे कठीण आहे हे तुम्ही समजू शकाल..

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jul 2010 - 9:03 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे.

या निमित्ताने संपादकही आपली बाजू मांडत आहेत हे बरे आहे. या निमित्ताने सगळेच काही एकतर्फी आहे असे नाही हे सदस्यांना समजेल. दुसरी बाजूही समोर येत आहे.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jul 2010 - 9:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसर्‍या बाजूला याहीपेक्षा जास्त मुद्दे आहेत यासाठी मुद्दामच उपप्रतिसाद. पण नो मोअर कमेंट्स!
धोरण आलं हे उत्तमच. मिपा उत्तरोत्तर प्रगती करत राहो.

अदिती

रेवती's picture

13 Jul 2010 - 8:32 pm | रेवती

नवीन धोरणे जाहीर झाल्याचा आनंद होत आहे.
संपादकांवर होणारे शाब्दीक हल्ले आता थांबायला हवेत.
वाट्टेल त्या भाषेत व्य. नि. करण्याचे प्रमाण आता जवळ जवळ थांबेल अशी आशा वाटते. संपादक हे कोणाचेही 'नोकर' नाहीत तर मिपावरील प्रेमापोटी काम करत आहेत हे गेल्या काही दिवसांत जाणवून द्यावेसे वाटत होते. सदस्यांनी स्वत: टारगट प्रतिसाद देवून ते उडवल्यावर निषेध व्यक्त करणे हे निव्वळ स्वार्थीपणाचे वाटते.

रेवती

यशोधरा's picture

13 Jul 2010 - 8:50 pm | यशोधरा

नवीन धोरणांचे पालन करण्याचा काटेकोर प्रयत्न करीन.

नावातकायआहे's picture

13 Jul 2010 - 8:54 pm | नावातकायआहे

>> संपादक हे कोणाचेही 'नोकर' नाहीत तर मिपावरील प्रेमापोटी काम करत आहेत

+१

संपादकांना खरड किंवा व्यनि कसा पाठवावा. मला पावर नाय.

Nile's picture

13 Jul 2010 - 9:11 pm | Nile

धोरणाचे स्वागत.

लंबुटांग यांच्या सुचनांना (आणि त्यावरील प्रतिसाद) जोडणी म्हणुन.

सहसा मॉडरेटर लॉग्स हे इतर मॉड्स ना बघता येतात. कुठल्या संपाद्काने संपादन केले आहे हे सर्वांना समजले तर तक्रारनिवारण संपादकांना सोपे होइल असे वाटते. लॉग्स ची सोय झाली तर उत्तम.
(किंवा/शिवाय) अप्रकाशीत केलेल्या प्रतिसादात जर संपादक एखादी 'नोट' लावु शकत असेल तरीही तक्रारनिवारण सोईचे होईल.

संपादन कीतीही निरपेक्ष असले तरी प्रतिसादकांच्या तक्रारी येणारच त्यामुळे (स्पष्टीकरण दिले जाणार नाही ही) भुमिका थोडी ढिली असावी असे वाटते.

-Nile

रेवती's picture

13 Jul 2010 - 9:25 pm | रेवती

लेख किंवा प्रतिसाद अप्रकाशित केल्यावर त्याचे स्पष्टिकरण मिळावे असे वाटणे साहजिक आहे. वस्तूस्थिती पाहता प्रत्येक संपादक अठवड्याला एखाद्दुसरा लेख व दहावीस प्रतिसाद अप्रकाशित करत असला तर फक्त लेखाच्या अप्रकाशित करण्याबाबत स्पष्टेकरण देणे शक्य होते. तसेही संपादक प्रतिक्रिया अप्रकाशित करण्याबाबत वेळ काळ पाहून निर्णय घेतात.

रेवती

लंबूटांग's picture

13 Jul 2010 - 9:38 pm | लंबूटांग

मला असेच काहीसे म्हणायचे आहे. मला संपादकांबद्दल कोणतीही तक्रार नाही आहे पण कारणे माहित नसल्यास उगाच गैरसमज वाढतात आणि मग संपादकांवरच पक्षपातीपणाचा आरोप होतो. जो टाळण्यासाठी वरचा प्रतिसाद होता.

माझी स्वतःची terminology समजण्यात अडचण होते आहे बहुतेक. अप्रकाशित केल्यास तो normal user ना वाचता येत नसावा पण database मधे राहत असावा जो नंतर प्रकाशित करता येऊ शकतो. प्रतिसाद अप्रकाशित करून मग उत्तर देण्यासाठी प्रतिसाद देणे ही एक जास्त step आहे मान्य पण तसे केल्यास नंतरची प्रश्नोत्तरी वाचेल असे वाटते.

प्रतिसाद Delete केल्यास मग संपादकांना खरडी केल्या जातात मग संपादक वेळ मिळेल तेव्हा उत्तर देतात. ह्या सगळ्या घोळात संपादकाने आपले नावच लिहीले नसेल तर मग अजूनच गोंधळात भर मधल्या काळात संपादकांबद्दलचा संताप gtalk व इतर ठिकाणी मित्रांशी बोलताना shareकेला जातो आणि मग एकंदरच वातावरणाबाबत इतरांच्या मनातही एक प्रकारचा prejudice तयार होतो. म्हणून प्रतिसाद / धागा संपादित केल्यास तिथेच नाव व कारण लिहिण्याची सुचवणी वर केली होती.

हे एक उत्तम उदाहरण.

चतुरंग's picture

13 Jul 2010 - 9:46 pm | चतुरंग

आता प्रसिद्ध झालेली धोरणे आहेत ती आत्तापासून पुढे लागू होतील. याआधी काय झाले त्या धाग्यांचे दुवे देऊन चर्चा करण्यात हशील नाही कारण हे रेट्रोस्पेक्टिव इफेक्टने होत नाहीये!
पुढे जाताना कशाप्रकारे सदयांची वर्तणूक हवी हे महत्त्वाचे आहे!
तुझा मुद्दा समजला आहे.

चतुरंग

Nile's picture

13 Jul 2010 - 9:58 pm | Nile

दुवा दिलेले 'संपादनाचे एक चांगले उदाहरण' म्हणुन असावे असे मला वाटते.

@लंबुटांग,
इथे मॉड लॉग्स नसावेत असे वाटते.

वरती चित्रा, चतुरंग (आणि इतर) यांनी दिलेले मुद्दे मान्य आहेत (कीती वेळ प्रतिसाद/स्पष्टीकरण देत रहाणार वगैरे), संपादकांचा त्रास मान्य आहे म्हणुनच सदर सुचना केली आहे.पुर्विच्या वारंवार-दिर्घ 'माझा प्रतिसाद का उडाला' प्रकारच्या प्रकरणांमध्ये गैरसमजाने मोठा वाटा उचलला आहे असे वाटते.

-Nile

लंबूटांग's picture

13 Jul 2010 - 11:00 pm | लंबूटांग

दुवा दिलेले 'संपादनाचे एक चांगले उदाहरण' म्हणुन असावे असे मला वाटते.

दुवा देण्याचा तोच उद्देश होता.

जसे वरील दुव्यामधे केलेले आहे त्याप्रमाणे प्रतिसाद का आणि कोणी उडवला हे लिहावे ज्याने पुढील गैरसमज टळतील.

चित्रा's picture

14 Jul 2010 - 12:12 am | चित्रा

डिलीट केल्यास प्रतिसाद कोणालाच दिसत नाही.
याउलट प्रतिसाद अप्रकाशित केल्यास तो वाटल्यास पुन्हा प्रकाशित करता येतो. आधी सांगितल्याप्रमाणे त्याचा संदर्भ राहतो.

प्रतिसादातले एखादे वाक्य काढले तर असे वाक्य का काढले ते लिहीत बसणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे हे काम वेळखाऊ आहे. एखाद्या दुसर्‍या प्रतिसादाबाबतीत हे ठीक आहे, पण जेव्हा एकामागोमाग एक असे धडाधड प्रतिसाद येत असतात, तेव्हा हे करणे शक्य असले तरी ते करता येईल याची खात्री देता येत नाही.

ह्या सगळ्या घोळात संपादकाने आपले नावच लिहीले नसेल तर मग अजूनच गोंधळात भर
हे का? संपादक आपली जबाबदारी जाणतात - संपादकांचे नाव माहिती होऊन काय होणार आहे? prejudice एका कोणा संपादकाविरूद्ध तयार होणार.

मी स्वतः यापूर्वी जेव्हा संपादन केले आहे तेव्हा त्याची जबाबदारी सर्वांसमोर उचलून केले आहे, पण माझ्याप्रमाणेच संपादनाचा निर्णय हा संपादकमंडळाची सदस्य म्हणून माझ्या सहसंपादकांनी योग्य विचार करून घेतला आहे हे मी निदान सुरवातीला धरते. अर्थात व्यक्ती आहेत म्हटले की मतभेदही असतात.. तेव्हा एखाद्या निर्णयासंबंधी मला प्रश्न असले तर मी ते सहसंपादकांना सरळ विचारेन. त्याची धुणी शक्यतो ते तेवढे महत्त्वाचे असल्याशिवाय उघड्यावर धुणार नाही. (तरी क्वचित कधी एखाद्या प्रसंगी इथे उघड्यावर त्या प्रश्नांची धुणी धुण्याइतके ते महत्त्वाचे असतील तर तसेही करेन!).

महत्त्वाचा मुद्दा असा की संपादकांचे अधिकार अमर्यादित नाहीत तर त्यांच्यावर अधिक तारतम्य बाळगण्याची जबाबदारी आहे हे मिसळपावचे सर्व संपादक जाणतात.

लंबूटांग's picture

14 Jul 2010 - 12:39 am | लंबूटांग

मगाशी शेवटचा प्रतिसाद म्हटले होते पण काही खुलासे.

हे का? संपादक आपली जबाबदारी जाणतात - संपादकांचे नाव माहिती होऊन काय होणार आहे? prejudice एका कोणा संपादकाविरूद्ध तयार होणार.

संपादक आपली जबाबदारी जाणत नाहीत असे मी तरी कुठेच म्हटले नाही. संपादकाचे नाव माहित असल्यास सर्व संपादकांना खरडी व्यनि तरी केले जाणार नाहीत. मागे खरडवह्या चाळताना २-३ संपादकांनी एका सदस्याला सांगितलेले पाहिले की मी तरी नाही केला संपादित दुसर्‍या कोणी केला असेल. हा सर्व त्रास तरी वाचेल.

त्याची धुणी शक्यतो ते तेवढे महत्त्वाचे असल्याशिवाय उघड्यावर धुणार नाही. (तरी क्वचित कधी एखाद्या प्रसंगी इथे उघड्यावर त्या प्रश्नांची धुणी धुण्याइतके ते महत्त्वाचे असतील तर तसेही करेन!).

मी संपादकांनी त्यांची धुणी कशी आणि कुठे आणि कितीजणांनी मिळून धुवावीत ह्याबद्दल काहीच म्हटलेले नाही. संपादक कोणत्या प्रश्नाची धुणी कशी धुतात इतकी पारदर्शकताही अपेक्षित नाही. केवळ कोणत्या नियमाचे उल्लंघन केले म्हणून प्रतिसाद/ लेख उडाला आणि आपली बाजू मांडायची झाल्यास कोणासमोर मांडावी हे माहित असल्यास बाकीचे त्रास वाचतील.

जाईलच असे नाही (बर्‍याचदा फक्त धागा भरकटवणे ह्यासारखे फालतू उद्देश असतात त्यामुळे) लेखन उडाले तर मात्र निश्चितच व्यनि मधून कारणासह सांगितले जाईल तसेच हा व्यनि कोणा एका संपादकामार्फत न येता 'संपादक मंडळ' ह्या आयडी कडून येईल.

चतुरंग

चित्रा's picture

14 Jul 2010 - 12:52 am | चित्रा

तुम्ही असे काही म्हटलेत असे सुचवायचे नाही. तुम्ही म्हणता त्या प्रश्नांचा त्रास मला स्वतःला झालेला आहे. मी स्वतः दरवेळी संपादन जबाबदारी घेऊन केले आहे त्यावेळी काही सदस्यांचे मत संपादनच नको/किंवा केल्यास उत्तरे देणेच नको असे होते. तेव्हा मतांतरे राहणारच. यापेक्षा सदस्यांना एकच छापील उत्तर मिळेल ते परवडेल.

मसंवर धुणी धुणे हा अगदी नेहमी वापरला जाणारा शब्द झाला आहे, त्यामुळे तो तसाच वापरला आहे - तुम्हाला लागावे म्हणून नाही.. तेव्हा व्यक्तिगत मतभेदांमुळे धुणी धुणे हे होणारच असले तर ते उघड्यावर करावे का पडद्याआड व्हावे यासंबंधीचे माझे मत ती शक्यतो पडद्याआड धुवावीत असे आहे. (माझ्या मागील काही आठवणींवरून).

आपली बाजू मांडायची झाल्यास कोणासमोर मांडावी हे माहित असल्यास बाकीचे त्रास वाचतील.
बाजू "संपादक मंडळ" यांच्याकडे मांडावी.

लंबूटांग's picture

17 Jul 2010 - 12:01 am | लंबूटांग

सर्व संपादक आता संपादक मंडळ हा एकच आयडी वापरणार असतील तर खूपच छान. प्रत्येक संपादकाला खरडी करायला नकोत :). माझ्या वरील request/ suggestion चा एकमेव उद्देश गैरसमज आणि सदस्य आणि संपादकांमधील अनावश्यक खरडी टाळणे हाच होता जो संपादक मंडळ ह्या आय डी मुळे बर्‍याचशा प्रमाणात साध्य होईल

*
नाही मला धुणी धुणार वरून काही वैयक्तिक काहीच वाटले नाही. माझेही मत पडद्याआड धुवावीत असेच आहे.end result सभासदाला कळावा असे म्हणणे होते. असो. पण मला हे ही माहित नव्हते की मसंवर धुणी धुणे हा अगदी नेहमी वापरला जाणारा शब्द झाला आहे.

आण्णा चिंबोरी's picture

13 Jul 2010 - 9:49 pm | आण्णा चिंबोरी

शुद्धलेखनाला पूर्वीसारखेच फाट्यावर मारले जाणार काय? की केलेल्या सूचनांवर विचारही केला जाईल?

विसोबा खेचर's picture

13 Jul 2010 - 10:11 pm | विसोबा खेचर

मिपाची धोरणे पुन्हा एकवार नव्याने प्रसिद्ध केल्याबद्दल नीलकांता तुझे मनापासून आभार..

सर्व धोरणे परखड, स्पष्ट आणि उत्तम असून स्पृहणीय आहेत..

नीलकांता, तुला व तुझ्या सा-या संपादक मंडळाला आणि पर्यायाने मिपाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा..

-- तात्या अभ्यंकर,
संस्थापक, मिसळपाव डॉट कॉम.

राजेश घासकडवी's picture

13 Jul 2010 - 10:42 pm | राजेश घासकडवी

धोरण जाहिर केल्याबद्दल व्यवस्थापनाचं अभिनंदन व नव्या धोरणाचं स्वागत.

वर टोपणनाव यांनी म्हटल्याप्रमाणे संस्थळ खाजगी आहे, तेव्हा मी स्वतः ते कोणा सज्जनाने मला खेळायला दिलेलं मुक्तांगण आहे असं मानतो (निदान जोपर्यंत या संस्थळातून आर्थिक उत्पन्न शून्य आहे तोपर्यंत तरी). संपादक हे रेफरी आहेत, व धोरण हे खेळाचे नियम आहेत असं समजतो. शक्यतो नियमांमध्ये राहाण्याचा कसोशीने प्रयत्न करावा, व रेफरीने फाऊल म्हटलं तर कमीत कमी निषेध करून निर्णय मान्य करावा. हे मी तरी पाळण्याचा प्रयत्न करतो, करेन.

त्याचबरोबर चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे हे सदस्यांनी चालवलेलं संस्थळही आहे. व्यवस्थापनाची भूमिका अनिर्बंध नसावी, लेव्हल प्लेयिंग फील्ड असावं, नियम वापरण्याच्या पद्धतीत सातत्य असावं, व चढत्या श्रेणीने कठोरता दिसावी अशी व्यवस्थापनाकडून सदस्यांची अपेक्षाही रास्त आहे.

व्यवस्थापन व सदस्य, किंवा काही सदस्य व इतर काही सदस्य यांत 'अस व्हर्सस देम' अशी फूट होऊ नये यासाठी हे धोरण उपयोगी ठरेल अशी आशा व्यक्त करतो.

श्रावण मोडक यांनी खाजगीत एकदा म्हटलं होतं की 'मिपा ही साधीसुधी वेबसाईट नसून ते मराठीसाठीचं एक माध्यम आहे'. या धोरणांतून आणि सदस्यांच्या व व्यवस्थापनाच्या वागणुकीतून ते साकार होईल ही आशा.

ऋषिकेश's picture

13 Jul 2010 - 10:58 pm | ऋषिकेश

नीलकांत,
सुस्पष्ट धोरणाबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.
माझ्याकडून "नो फर्स्ट ओवररूलींग" चे आश्वासन देतो :) ;)

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

विकास's picture

13 Jul 2010 - 11:29 pm | विकास

या धाग्यावरील हा प्रतिसाद मला सगळ्यात जास्त आवडला.

"नो फर्स्ट ओवररूलींग" हे दोन्ही बाजूने महत्वाचे आहे. एका हाताने टाळी वाजत नसते. मात्र या धाग्यातील एकंदरीत प्रतिसादांत सर्व काही संपादकांमुळेच होत आहे असा तक्रारीचा सूर आहे. जर कोणी कागाळ्या करणारे, वातावरण गढूळ करणारे अथवा इतर जे काही ध्येयधोरणांमधे सांगितलेल्याशी विसंगत लिहीत असेल तर आम्ही त्या लेखात/चर्चेत/प्रतिसादांत वगैरेत भाग घेणार नाही असे देखील सदस्यांनी ठरवले तर उद्या संपादक मंडळाची गरजच भासणार नाही! कारण हक्क आणि जबाबदारी यांचे विभाजन न होता ते सगळेच एकत्रितपणे वापरत असतील.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Nile's picture

14 Jul 2010 - 12:50 am | Nile

-Nile

जर कोणी कागाळ्या करणारे, वातावरण गढूळ करणारे अथवा इतर जे काही ध्येयधोरणांमधे सांगितलेल्याशी विसंगत लिहीत असेल तर आम्ही त्या लेखात/चर्चेत/प्रतिसादांत वगैरेत भाग घेणार नाही असे देखील सदस्यांनी ठरवले तर उद्या संपादक मंडळाची गरजच भासणार नाही!

अहो इथेच तर वांदा आहे ना. ह्यावर एकमत झाले तर मतभेद होणारच नाही. प्रश्न उठणारच नाहीत.
फक्त उदाहरणादाखल (माझे प्रतिसाद उडवायचे असतील तर उडवा भले, पण माझ्या प्रतिसादांत काय चुक आहे हे मला कळले तर तसले प्रतिसाद मी पुन्हा देणार तरी नाही म्हणुन प्रश्न)
आता माझे 'काय इनोदी लिहुन राह्यले' किंवा 'राजे पुणेरी नाही' ह्य प्रतिसादांत धोरणांचे उल्लंघन कुठे होत आहे हे मला काही कळत नाहीए. आता मी काय करु? हे असे माझ्या बाबतीत वारंवार होत असेल तर मी प्रश्न विचारु नये का? वगैरे मतभेदाचे मुद्दे आहेत. म्हणुन तक्रारनिवारणाची सोय हवी असे वाटते. मी मागे केलेल्या तक्रारींचे निवारण झालेले नाही. (किंवा मी मुद्दाम त्रास देतो असा माझ्यावर आरोपही झालेला नाही)

वर एका ठिकाणी चतुरंगने म्हणल्याप्रमाणे going forward ही ध्येयधोरणे वापरावीत. त्याचा संदर्भ हा आधीच्या गोष्टींसाठी वापरू नये असे वाटते. त्याच संदर्भात, जर कधी काही खटकले तर संपादक मंडळाला अवश्य व्य.नि. करावा.

बाकी माझा मूळ मुद्दा जरा वेगळा होता. एखाद्या सदस्याने चालू केलेल्या कागळ्यांकडे इतर सदस्यांनी लक्षात आल्यावर देखील, अशा लेखनास प्रोत्साहन द्यावे का नाही या संदर्भात माझे विधान होते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्राजु's picture

13 Jul 2010 - 11:08 pm | प्राजु

उत्तम!!
एकदम परखड आणि उत्तम धोरणे!
- (संपादक)प्राजक्ता
http://www.praaju.net/

विकि's picture

13 Jul 2010 - 11:58 pm | विकि

संपादक म्हणतील ते अंतिम असते.त्यामुळे संपादकांच्या धोरणाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही.शुध्दलेखना बाबत मिपाने कडक धोरण करावे असे मनापासून वाटते.

टिउ's picture

14 Jul 2010 - 12:20 am | टिउ

चर्चा वाचुन मला 'डास एक्स्परिमेंट' हा चित्रपट आठवला...

खरंतर संपादक हे पण सदस्यच आहेत...पण ( संपादकांना) अधिकार मिळाल्याबरोबर इतर सदस्यांना ते शत्रुपक्षातले, आपल्यावर कायम अन्याय करायला टपलेले वाटायला लागतात. आणी संपादकांना वाटायला लागतं की कितीही चांगलं काम केलं तरी सदस्यांना त्याची जाणीव/किंमत नाही! धोरणांची अंमलबजावणी करायला कधीतरी कठोर पावलं उचलली जातात. निषेध म्हणुन मग सदस्य बंड करतात. असं हे सगळं दुष्ट्चक्र आहे...कुठेही जा, हे होणे अटळ आहे...

पक्या's picture

14 Jul 2010 - 2:44 am | पक्या

आधिकारीक शब्द मलाही खटकला. वर कोणी म्हटल्या प्रमाणे तो 'अधिकॄत' असा असायला हवा.
धोरणे उत्तम आहेत. फक्त धोरण क्र. ६ तेवढे पटले नाही. मिपावर अनेक वेळा २-३ ओळींचे धागे निघाले आहेत आणि त्यावर सविस्तर आणि बरीच नविन माहिती मिळेल अशा चर्चा घडलेल्या आहेत. उदा. कोणा प्रसिध्द व्यक्तीचे निधन / त्यांना श्रध्दांजली , एखाद्या ठिकाणाबद्द्ल / बाबीबद्द्ल माहिती विचारणे वगैरे.
एखादा प्रश्न एका ओळीचा असू शकतो पण त्यावरचे उत्तर सविस्तर असू शकते तसेच काहिसे.

शिवाय बर्‍याच लोकांना लेखनकला अवगत नसते त्यामुळे ते खूप लिहू शकत नाहीत. मुख्य विषयाच्या २-३ ओळी लिहिल्या तरी त्यांना खूप लिहीले असे वाटू शकते. पण प्रतिसादात ते खुलू शकतात. कारण इतरांच्या प्रतिसादावरून बरेच मुद्दे त्यांच्या लक्षात येऊ शकतात. अर्थात हा दुय्यम मुद्दा मुख्य मुद्दा वर लिहीलाच आहे.

त्यामुळे धोरण क्र. ६ जरा शिथिल असावे.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

प्रियाली's picture

14 Jul 2010 - 2:56 am | प्रियाली

क्र. ६ बद्दल तुमचे म्हणणे खरे आहे. हे धोरण शिथिलच आहे याची खात्री बाळगावी. धोरणांत प्रत्येक मुद्दा विस्ताराने लिहिता येत नाही परंतु अशा धाग्यांची शहानिशा करून लेखकास मजकूर वाढवण्याची विनंती करता येईल.

चौकशीप्रधान धागे वगैरे आवश्यकतेनुसार तसेच ठेवले जातील असे वाटते.

पाषाणभेद's picture

14 Jul 2010 - 4:43 am | पाषाणभेद

संपादक कोण कोण आहेत पण? अन त्यांचा आयडी वेगळा असावा जेणेकरून ते ओळखू यावेत.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

Dhananjay Borgaonkar's picture

14 Jul 2010 - 12:40 pm | Dhananjay Borgaonkar

परत एकदा नियम सर्वांसमोर ठेवल्याबद्दल धन्यवाद.
(मिपाचे नियम आधिपासुनच पाळत आलेला) धनंजय

अरुंधती's picture

14 Jul 2010 - 3:17 pm | अरुंधती

धोरण जाहीर केल्याबद्दल धन्यवाद व त्याचे स्वागत! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

निखिलेश's picture

2 Aug 2010 - 3:18 pm | निखिलेश

वाचले. सहमत!!

मधुकर's picture

24 Nov 2010 - 12:32 pm | मधुकर

मला 'कौल' मधिल लेख दिसत नाहियेत.
काय करावे लागेल ?

नारयन लेले's picture

18 May 2011 - 4:23 am | नारयन लेले

धोरणे पटली, सहमत आहे.
प्रत्येक गोश्टीला नियम व आटी आसव्यात व त्याचे पालन व्हावे आसेच वाटते.

धन्यवाद !

विनित

Dear Sir,

I am member of misalpav since last 3 to 4 years. I like to read misalpav activities in various subjects.Now some last days i have problem to connect misalpav from my office internet connection.Error- Remote host\Computer refused Cpnnection. Various time normally i download html pages then when i have free time then i read. Normally not logged as member just visit the as visitor. I request you Please solve the issue.

Regards

san_ni

एस's picture

14 Oct 2014 - 11:09 am | एस

डिअर आयडी,

आय थिंक धिस इज धी प्रॉब्लेम ऑफ युवर हापिस इंटरनेट्ट अ‍ॅड्मिन्न टीम. काइंडली कॉन्टॅक्ट देम बट दे माइट ह्याव ब्लॉक्ड मिपा थ्रू फायरवाल का काय तरी, मी डोन्ट नो. ;-)

धन्स,
स्वॅप्स

रवीराज's picture

14 Oct 2014 - 1:42 pm | रवीराज

व्हेरी फनी,
मजा आली वाचुन

चौथा कोनाडा's picture

16 May 2020 - 5:59 pm | चौथा कोनाडा

मिसळपावच्या अधिकृत धोरणाची नेहमी आठवण करून कधीही चांगले.
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, प्रदीप सी.परूळेकर जी !

बरं ते स्वातन्त्रवीर सावरकाराचा अन्दमानातील आविश्कार चं काय ते टाका ना सविस्तर !

हि नवी आयटी नियमावली (mib.gov.in पिडीएफ दुवा) हि बहुधा उद्यापासून अधिकृतपणे लागू होणार आहे असे माध्यमातील वृत्तांवरून दिसते. फेसबुक ट्विटर व्हाट्सॅप सारखे मोठे प्लॅटफॉर्म पहिले लक्ष असले तरी कालौघात छोटे प्लॅटफॉर्मसुद्धा याच्या कक्षेत येतील याचा अंदाजा नियमावली वाचताना येतो.

मिसळपाव सध्या अंशतः काळजी घेते पण या नियमावलीनुसार जबाबदार्‍या अंशतः वाढताना दिसतात. खरे म्हणजे या नियमावलीचा अनुवाद करून वेगळ्या चर्चा धाग्याची आवश्यकता असावी. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2021 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संकेतस्थळ म्हणून आणि सदस्य म्हणून घ्यावयाची काळजी यावर सविस्तर लिहा.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

26 May 2021 - 1:13 pm | माहितगार

* PART II 3. (1) (a) यातील मिपा privacy policy माझ्या पहाण्यात नाही; user agreement for access or usage अधिक स्पष्टतेस वाव असावा.
* PART II 3. (1) (b) मिपाच्या सद्य ध्येय धोरणातून PART II 3. (1) (b) मध्ये नमुद ज्या गोष्टी सुटल्या असतील त्या नमुद करणे अभिप्रेत असावे. आणि हा भाग सदस्य उपयोगकर्त्यांच्या वापराच्या मर्यादांच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्याच्या अनुवादाची गरज आणि त्या दिशेने सदस्यांना सजग करण्याची गरज असावी. (h)
* (d) कोर्टाच्या ऑर्डर्चे तसेही पालन करणे बंधनकारक असते या कलमात न्यायालयीन आदेशांचे पालन ३६ तासात केले जावे असे आहे. क्लॉज (g) कोर्टाची ऑर्डर असल्यास तसा मजकुर वगळतानाच किमान १८० दिवस किंवा कायदा यंत्रणासांगतील तेवढे दिवस पुरावा जतनाची जबाबदारी इंटरमिडीअरीवर टाकताना दिसते. (h) सदस्य नोंदणी रद्द केली तरी इंटरमिडीअरीने (प्रायव्हसीची काळजी घेत) नोंदणी माहिती किमान १८० दिवस सांभाळायची आहे. आणि कायदा सुरक्षा यंत्रणांच्या सायबर सेलने मागणी केल्यास अशी मागवलेली माहिती अधिकतम ७२ तासाच्या आत सुपुर्त करणे अभिप्रेत आहे.
** नंतरच्या सेक्शन्स (2) मधून सेल्फ रेगुलेशन्स बद्दलच्या इतर Grievance redressal mechanism नियमावली आहेत हे ही ध्यानात घेतले पाहीजे.
* (f) सदस्यांना ध्येयधोरणांची वर्षातून किमान एकदा आठवण दिली जाण्याची व्यवस्था असावी
* (2) (a) Grievance Officer नेमुन काँटॅक्ट डिटेल्स प्रकाशित करायचे जो तक्रारीची पोच २४ तासात देईल आणि १५ दिवसात निकाल देईल (आता हे पुढे संबंधीत माध्यमाची सेल्फरेग्युलेशन बॉडीकडून रेग्युलेट होईल आणि सेल्फरेग्युलेशन बॉडींचे रेग्युलेशन पुन्हा राष्ट्रीय स्तरावरून होईल अशी व्यवस्था दिसते आहे. खासकरून व्यक्तींची प्रायव्हसी भंग पावणार्‍या तक्रारींची दखल अधिक तातडीने घेण्यावर नियमावलीचा भर दिसतो आहे.
* कलम ६ (१) छोट्या इंटरमिडिअरीसाठी आणखी नियमावली येण्याची शक्यता असल्याचे सुतोवाच करताना दिसते. त्यातील भर sovereignty and integrity of India, security of the State, friendly relations with foreign States or public order बद्दल असेल असा अंदाज नियमावलीवरून येतो.

* CHAPTER I GRIEVANCE REDRESSAL MECHANISM समाधान न झालेल्या अथवा पंधरा दिवसात निपटारा न केलेल्या केसेसची दखल सेल्फरेगुलेटींग बॉडी घेईल तिथे निपटारा न झाल्यास Oversight Mechanism असेल तिथे पोहोचेल

* बाकी नियमावली एकुण त्रिस्तरीय पद्धतीची माहिती देते. गा.पैंचा लसिकरणास थोतांड म्हणणार्‍यासारख्या धाग्यासोबत warning card किंवा a disclaimer ची गरज असू शकावी असा अंदाज आहे.

चुभूदेघे

कुणि गुगल डॉक मध्ये अनुवादास साथ देत असतील तर मी सुद्धा अनुवादात सहभागी होईन.

उत्तरदायीत्वास नकार लागू.

याची मी आतुरतेने वाट पाहत आहे कारण मला भारतीय संविधान व त्यातील कायदे पाळायला मनापासून आवडते.

एकदा मिपा त्याच्या कक्षेत आले की बघाच इथून कोण कोण काढता पाय घेते ते... मिपाचा एक सदस्य तर अपेक्षितरित्या तरीही धक्कादायकपणे वाचनमात्र आणी त्यापेक्षा जास्त कृती हतबल नक्कीच होईल... खरे तर तो आत्ताच तसा हवा होता. पण असो...

गॉडजिला's picture

26 May 2021 - 1:36 pm | गॉडजिला

कृती हतबल म्हणजे फक्त मिपा संस्थळावर कृती हतबल असे समजावे.

माहितगार's picture

26 May 2021 - 2:08 pm | माहितगार

* लागू २६ मे पासूनच होत असल्याचे दिसते आहे (शासकीय पुर्वसूचना म्हणजे नियमावली गॅझेटेड ३ महिन्यांपुर्वीच देऊन झालेली आहे) (संदर्भ)
* टेक्निकली कंप्लेटची पोच २४ तासात आणि निपटारा १५ दिवसात, प्रायव्हसी भंग मजकुर तत्काळ वगळणे इत्यादी लगेच लागू व्हावे, १५ दिवसात समाधान अथवा निपटारा न झाल्यास सेल्फ रेग्युलेटींग बॉडीं़ कडे जायचे आहे जसे कि मिपासारख्या संस्थळाला कोणती सेल्फरेग्युलेटींग बॉडी लागू होईल हे क्लिअर नाही . त्यामुळे मिपा व्यवस्थापनाने निपटारा न केलेल्या केसेस पुढच्या स्तराची व्यवस्था होईपर्यंत रेंगाळतील. (पण बहुधा केंद्रसरकारच्या केंद्रीय समितीकडे जाण्याचा मार्ग तो पर्यंत मोकळा रहावायास हवा असा अंदाज आहे पण नक्की माहित नाही चुभू देघे)
** सरकारचे सुरवातीचे लक्ष मोठ्या सोशल मेडीया साईट कडे असणे आणि कोर्ट कज्जात छोट्या मोठ्या तात्पुरत्या स्टे मिळणे यात काही आठवडे ते काही महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ज्या ज्या राज्यात राज्यस्तरीय निवडणूका येतील तेथे वातावरण तापून छोट्या केसेसही धसास लावण्याचे आग्रह वाढू लागतील.
* चर्चात्मक मराठी संस्थळांनी आपापसात चर्चा करून सेल्फरेग्य्लेटींग बॉडी जाहीर करणे श्रेयस्कर असावे अन्यथा मोठ्या संस्थळांच्या सेल्फरेग्य्लेटींग मध्ये सरकारने बसवले तर नियमांची संख्या वाढेल मिपासारख्या छोट्या संस्थळांचे कंबरडे मोडू शकेल त्यामुळे मायबोली, मिपा, ऐसी अक्षरे यांनी वेळीच पावले उचलणे श्रेयस्कर असावे. आता

माहितगार's picture

26 May 2021 - 2:13 pm | माहितगार

उत्तरदायीत्वास नकार लागू

गॉडजिला's picture

26 May 2021 - 2:46 pm | गॉडजिला

सुंदर विवेचन.

कंजूस's picture

26 May 2021 - 10:53 am | कंजूस

मिसळपाव साइट आणि त्यावरचे लेखन हे इतर फेसबुक ट्विटर वगैरे संस्थळावरील लेखनापेक्षा लहान असते. त्यावर कंट्रोल ठेवणे सोपे असते. पण मोठ्या साइटवर तपासण्या करण्यासाठी काही यांत्रिक/ इलेक्ट्रॉनिक/ सॉफ्टवेर वापरावी लागतात. किंवा कुणी कंप्लेट केल्यावर action घेतात. म्हणजे साइटवरून त्या व्यक्तिचे अकाउंट गोठवतात/ रद्द करतात.

पण यामध्ये आता सरकारने हस्तक्षेप करण्याचे अधिकार वाढवणार असं दिसतंय. म्हणजे आक्षेपकारक मजकूर /लेखन लिहून अमुक तमुक बाधा येते अशा कायद्या अंतर्गत खटलाही चालवला जाईल बहुतेक.

या ज्या साइट्स आहेत त्यावर सभासदांना स्वप्रकाशन सोय असते. तर छापील माध्यमांत लेखकांचे लेखन अगोदर संपादित/संयोजित/दुरुस्ती करून मग छापले जाते. तिथे यास जबाबदार अधिकारी व्यक्तीची नेमणूक असते. त्याचे नाव छापलेले असते. म्हणजे की छापून आल्यावर लेखक नव्हे तर हा अधिकारीही कायद्याच्या कचाट्यात येतो.

आता ही नियमावली अचानक येण्याचे कारण म्हणजे हल्लीच घडलेले ट्विटर प्रकरण . राणावतने केलेली ट्विटस असावीत.

___________________________

बाकी ओटोरिक्षात बसण्याअगोदर भाड्याची निश्चिती झाल्यावरच बसणे योग्य समजत़ो.ओटोचे भाडे अधिक सांगत असेल तर त्यात न बसण्याचा आपला मार्ग मोकळा असतो. तसेच संस्थळाशी आपले जमत नसल्यास तिथून आपणच दूर होणे योग्य नव्हे का?

प्रवासानंतर मागितलेल्या भाड्यावर वाद न घालता देणे उचित समजतो.

माहितगार's picture

26 May 2021 - 12:18 pm | माहितगार

3. (1) Due diligence by an intermediary: An intermediary, including social media intermediary and significant social media intermediary, shall observe the following due diligence while discharging its duties, namely:—

उपरोल्लेखीताचा अर्थ significant social media intermediary, आहेच पण सोबत An intermediary, including social media intermediary हे दोन्ही समाविष्ट होतात.

कायदा आणि नियमावलीत बहुधा social media intermediary याची व्याख्या नमुद नाही आणि जिथे व्याख्या नमुद नसते तिथे व्याख्या बनवण्याचे स्वांत्र्य न्यायालयांना पोहोचत असावे.

इन एनी केस मिपा प्लॅट्फॉर्म किमान intermediary व्याख्येस पात्र होतच असावा

चुभूदेघे

उत्तरदायीत्वास नकार लागू

माहितगार's picture

26 May 2021 - 5:06 pm | माहितगार

* social media intermediary ची व्याख्या नियमावलीत आहे माझ्या नजरेतून सुटली होती( हि व्याख्या मूळ आयटी कायद्यात नसल्यामुळे संसदेची मान्यता हवी असा काही मायनर मुद्दा एका वृत्त माध्यमाच्या संपादकाने काढला आहे पण न्यायालया समोर टिकणारा वाटत नाही intermediaryच्या व्याख्येत एनीवे सगळेच येतात त्यामुळे खुपसा फरक पडत नाही) तर एकुण मिपा intermediary व social media intermediary दोन्ही कक्षेत येताना दिसते.

*'सिग्निफीकंट social media intermediary' या कक्षेत मात्र मिपा पन्नास लाख सदस्य बनवल्या शिवाय येणे अवघड असावे.
* मिपाचा दिवाळी अंक प्रकार क्युरेटेड पब्लिशींगच्या कक्षेत येईल किंवा नाही याचा सल्ला मिपा मालकांना कायदे तज्ञांकडून घ्यावा लागेल अथवा एज रिस्ट्रीक्टेड कंटॅट मिपावर फारसे नसतेच पण एज अ‍ॅक्सेस कंट्रोल शिवाय कुरेटेड भागात ए सेन्सॉर दर्जा कंटेंटचा समावेश करता येणार नाही असा अंदाज नियमावलीवरून येतो.

चुभूदेघे उत्तरदायीत्वास नकार लागू

उत्तर दिल्यावर प्रश्नच बदलला

https://www.misalpav.com/comment/1109009#comment-1109009

असे मिपाच्या संपादक मंडळाला करता येते काय?

हे मिसळपावचे अधिकृत धोरण आहे का?

संपादक मंडळ हे समतोल असावे पूर्वग्रहदूषित असू नये इतकी माफक अपेक्षाहि लोकांची नसावी काय?

ते म्हणजे आपण अथवा कोणीही जे काही मिपावर कुठंही काहीही लिखित स्वरूपाने कोणत्याही धाग्यावर, प्रतिसादावर त्यानुसंगे अथवा सोडून जर काहीही विचारता, लिहिता किंव्हा व्यक्त होता तर त्याला उत्तर द्यायला मिपा वाचक, वाचनमात्र सदस्य , सदस्य, मिपा कट्टेकरी, साहित्य संपादक, मिपा मालक आणि प्रत्यक्ष ब्रम्हदेवही बांधील वा जबाबदार नाही याची कृपया नोंद घ्यावी. बाकी रस्ते खराब आहेत अनवाणी चालून पायाला त्रास होऊ शकतो असेही निरीक्षण केले.

आग्या१९९०'s picture

26 May 2021 - 10:57 am | आग्या१९९०

उगाच संपादक मंडळाला दोष देऊ नका. असे काहीही संपादीत झालेले नाही.

मला वाटते अजूनही जवळ जवळ सर्वच सदस्य मिपाकडून उपकृत झाल्यासारखे वागतात. मला वाटते कि मिपादेखील व्यवस्थित कायदेशीर कक्षात आहे आणि येथील प्रसारित होणारी माहिती चुकीचा प्रसार करणारी आणि द्वेषमूलक नाही हे तपासणारी दक्ष यंत्रणा उभारणे मिपालदेखील बंधनकारक असायला हवे. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना एखाद दोन दिवसाची हलकीशी शिक्षा तर काहींची थेट हकालपट्टी असा भेदभाव मिपावर उघडपणे दिसून येतो. तो दिसत काम नये याचीदेखील दक्षता संपादक मंडळाला टाळता येणार नाही.

प्रतिसाद भराभर आले तर ते लवकर वाचणार कोण?

टवाळ कार्टा's picture

26 May 2021 - 2:48 pm | टवाळ कार्टा

मदत करू शकणारे बरेच लोक आहेत....इच्छाशक्ती नाहीये

गणेशा's picture

27 May 2021 - 7:44 am | गणेशा

नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे

नवा कायदा काय आहे, हे थोडक्यात कोणी सांगेल का?

माहितगार's picture

27 May 2021 - 9:07 am | माहितगार

नवीन कायदा म्हणण्यापेक्षा नवीन विधी नियमावली हा शब्द प्रयोग कदाचित बरोबर असावा. संस्थळाच्या जबाबदारी बद्दल अंशिक चर्चा वरील काही प्रतिसादातून केली आहेच. सदस्यांना लागू होणार्‍या नियमावलीच्या भागाचा अनुवादाची विनंती या नवीन धाग्यातून केली आहे.

* (मी मिपाचा सामान्य सदस्य आहे उत्तरदायीत्वास नकार लागू)

नवीन कायद्यामुळे उत्तरदायित्व घ्यावे लागेल असे वाटते :)

माहितगार's picture

27 May 2021 - 9:23 am | माहितगार

:)) डिसक्लेमर नोटीसचे प्रोव्हीजन आहे ना !