चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ४)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
18 May 2021 - 3:02 pm
गाभा: 

मोदींच्या प्रतिमाभंजनासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचा उल्लेख "मोदी विषाणू" असा करण्याची कॉंग्रेसची आपल्या कार्यकर्त्यांना सूचना. चीनचा उल्लेखही नाही. कसा करणार? कॉंग्रेसचा चिनी राज्यकर्त्यांबरोबर करार आहे ना.

https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/call-it-modi-strain...

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 2:25 pm | श्रीगुरुजी

दुर्लक्ष केले की असे प्रकार कमी होऊन कालांतराने बंद होतात.

गॉडजिला's picture

25 May 2021 - 2:28 pm | गॉडजिला

आज ३५ कोटी का झाले असते ?

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 2:31 pm | श्रीगुरुजी

३५ कोटी काय आहे?

गॉडजिला's picture

25 May 2021 - 2:35 pm | गॉडजिला

वाढत जाणारा... मागील साठ वर्षे वेळीच लक्ष न दिल्याचा तो परिणाम आहे असे देखील २०१४ नंतर उघड बोलले जाउ लागले.

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 3:16 pm | श्रीगुरुजी

कसला आकडा ते समजले नाही.

गॉडजिला's picture

25 May 2021 - 3:34 pm | गॉडजिला

मलाही सर्व गोश्टी समजतात असा माझा आजिबात समज नाही. म्हणूनच एकमेकांना समजावण्यापेक्षा समजुन घेण्यावर माझा जास्त विश्वास आहे.

गणेशा's picture

25 May 2021 - 11:57 am | गणेशा

नाहीत,
परंतु रामदेव बाबा बरोबर स्टेज वर जाऊन त्याचे औषध आपले केंद्रीय आरोग्य मंत्री जाहिरात करतात..

मग ते मंत्री नाहीत, सरकार मध्ये नाहीत.. तेंव्हा आता असल्या काळात हर्षवर्धन यांनी ते करणे अपेक्षित नव्हतेच..

बाकी या मूर्ख लोकांच्या बातम्या वाचल्या नाहीत किंवा ते ऐकले हि नाही मी..

त्यामुळे जाहिरात सोडून आणखिन काही करण्यास किंवा इतर अपरिहार्य कारणाने केंद्रीय मंत्री रामदेव बाबा बरोबर स्टेज वर असतील तर माझा प्रतिसाद सोडून द्यावा..

पण रामदेव कुठे मंत्री आहेत वगैरे प्रश्न विचारणे मला चुकीचे वाटतेय..
रामदेव हे मंत्री नाहीत पण ते मंत्र्याच्या मार्फत pramot केले जात आहे ना..त्याचे काय?

कॉमी's picture

25 May 2021 - 12:12 pm | कॉमी

मूळ आक्षेप तोच आहे. अपुऱ्या चाचण्यांवर आधारित असलेले, कोव्हिड क्युअर असे प्रमाण नसून सुद्धा कोव्हिड इलाज म्हणून प्रमोट केलेले, WHO ची मान्यता आहे अशी शुद्ध थाप मारणारे प्रॉडकट प्रमोट करायला मिनिस्टर जातातच का ? मुळात, असे कुठलेसुद्धा प्रॉडक्ट त्यांनी प्रमोट करणेच चुकीचे आहे, त्यात कोरोनील सारखे थापडे प्रॉडक्ट तर फार लांब.

त्यात, पुन्हा हेल्थ मिनिस्टर जातात हे आणखीन गंभीर. IMA ने हर्ष वर्धन ला "मी कोरोनील प्रमोट करत नाही" असे स्टेटमेंट द्यायला सांगितले ते माझ्या माहितीप्रमाणे अजून दिले नाही.

आग्या१९९०'s picture

25 May 2021 - 12:22 pm | आग्या१९९०

आपल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा निषेध करायला काही मिपाकर अजूनही पुढे येत नाही, कवळ्या चिकटल्या आहेत त्यांच्या.

सुबोध खरे's picture

25 May 2021 - 8:00 pm | सुबोध खरे

कवळ्या चिकटल्या आहेत त्यांच्या.

आपल्याला खुश करायला कोणी डॉक्टरांनी येथे येऊन निषेध केला नाही तर लगेच कवळ्या चिकटल्या?

औषध कंपन्या इतक्या तर्हेचे खोटे दावे करतात त्या पैकी प्रत्येक दाव्याचे खंडन आपल्यासारख्या विद्वान लोकांच्या समाधानासाठी करायला डॉक्टरांना आपला व्यवसाय सोडून मिपावरच टंकत बसावे लागेल. यात खाद्य तेलात झिरो कोलेस्टिरॉल पासून फेअर & लवली ने मुलगी गोरी होते पासून कॉम्प्लान पिऊन मुले उंच होतात पासून नारळाचे तेल लावल्याने केस लांब सडक होतात सारखे असंख्य दावे आहेत.

इंडियन मेडिकल असोसीएशन ने सार्वजनिक रित्या आरोग्यमंत्र्यांचा निषेध केलेला सर्वच्या सर्व वृत्तपत्रांनी मोठ्या टायपात टंकले होते ते असताना येथे उगाच तोंडची वाफ दवडायचे काहीच कारण नाही.

https://indianexpress.com/article/cities/pune/indian-medical-association...

बाबा रामदेवांनी आपले औषध WHO Certified असा दावा केला असेल तर ती निखालस खोटा आहे पण त्यांनी आपला कारखाना WHO Certified असा दावा केला असेल तर ते बरोबर आहे. कारण कोणताही औषध निर्मिती कारखाना औषध निर्यात करण्यासाठी हा किमान WHO Certified असणे आवश्यक आहे. यानंतर प्रत्येक देश असे औषध आयात करण्यापूर्वी आपल्या एडिशच्या अन्न औषध प्रशासनाच्या (FDA) च्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून या कारखान्याची कसून तपासणी करून मगच त्याला परवानगी देते.

पतंजली ने आपले औषध तयार करण्याची पद्धत हि

WHO GMP Certified Manufacturing Units for Certificate of Pharmaceutical Products (COPP)

अशी आहे असे स्पष्टीकरण दिलेले आहे. याचा आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या समर्थनाचा काहीही संबंध नाही.

हे म्हणजे तुमचा कारखाना आय एस ओ सर्टिफाईड आहे मग त्यातून तुम्ही शेणाच्या गोवऱ्या बनवत असलात तरी चालते असे आहे. फक्त त्या बनवण्याची प्रक्रियेचा दर्जा एका विशिष्ट पातळीचा राखणे आवश्यक आहे.

सामान्य माणसाला बारीक टायपात वाचायची सवय नसते त्यामुळे ते गैरसमज करून घेतात.

उदा आपण विको टरमेरिक हे आयुर्वेदिक क्रीम हळद आणि चंदन युक्त असे समजून घेतो परंतु विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम डब्ल्यू एस ओ ( विदाउट सॅंडल वूड ऑइल) सहज सर्वत्र उपलब्ध आहे हे किती लोकांना माहिती आहे.

https://www.google.com/search?q=vicco+turmeric+skin+cream+wso&rlz=1C1CHB...

पूर्वी हे WSO अगदी बारीक छापत होते. पण त्याविरुद्ध तक्रार झाल्यावर आताशा ते मोठे झालेले दिसते.

अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक दावे करणाऱ्या जाहिराती दर कोपऱ्याकोपऱ्यावर दिसतात. टकलावर केस उगवण्यापासून वंध्यत्वावर रामबाण उपाय पासून मर्द शक्ती साठी अनेक उपाय असणाऱ्या जाहिराती दिसतात.

प्रत्यक्ष आयुर्वेदात वाजीकरण नावाची एक प्रक्रिया वर्णन केलेली आहे ज्यात आपली संभोग करण्याची शक्ती घोड्यासारखी बुलंद होते असा दावा केलेला आहे. वाजी --घोडा नुसतं वाजीकरण गुगलून पहा.

यात सत्य किती आणि असत्य किती हा मुद्दा वादाचा आहे.

आपल्या मिपावरच "प्यूबिक रिंग" चा धागा मोठा गाजला होता.

बाकी चालू द्या

आग्या१९९०'s picture

25 May 2021 - 8:30 pm | आग्या१९९०

धन्यवाद!
असंबंधीत मुद्दे आणि उदाहरणे.
कुठल्या कंपनीने आपल्या उत्पादनाचे खोटे दावे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थिती केले आहेत? जाहिरातीचे नियम वेगळे असतात,त्यातील पळवाटा शोधून जाहिरात केली जाते. त्याचा आरोग्यमंत्र्यानी खुलासा करणे अपेक्षित नसते.

सुबोध खरे's picture

26 May 2021 - 9:26 am | सुबोध खरे

इंडियन मेडिकल असोसीएशन ने सार्वजनिक रित्या आरोग्यमंत्र्यांचा निषेध केलेला सर्वच्या सर्व वृत्तपत्रांनी मोठ्या टायपात टंकले होते ते असताना येथे उगाच तोंडची वाफ दवडायचे काहीच कारण नाही.

हे वाचलं नाही का?

आग्या१९९०'s picture

26 May 2021 - 9:42 am | आग्या१९९०

आपल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्यावर काय खुलासा केला?

श्रीगुरुजी's picture

26 May 2021 - 9:55 am | श्रीगुरुजी

लोकांचे खुलासे स्वतः शोधा आणि वाचत बसा. आरोग्यमंत्र्यांनी काय खुलासा केला, त्यावर रामदेवबाबांनी काय प्रतिखुलासा केला, त्यावर आरोग्यमंत्र्यांनी काय प्रतिप्रतिखुलासा केला . . . हे सर्व शोधून वाचत रहा. तेवढाच वेळ जाईल.

सुबोध खरे's picture

26 May 2021 - 10:16 am | सुबोध खरे

आपल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा निषेध करायला काही मिपाकर अजूनही पुढे येत नाही, कवळ्या चिकटल्या आहेत त्यांच्या.

अरे वा

या बोटावरची थुंकी त्या बोटावर करता येते कि तुम्हाला

संपादक मंडळाला हा असा अधिकार आहे का?

अगोदर डॉक्टरांना कवळ्या चिकटल्या आहेत त्यांच्या म्हणून विचारले. त्यावर मी उत्तर दिले 25 May 2021 - 8:00 pm

आता प्रश्नच बदलला 25 May 2021 - 12:22 pm | आग्या१९९०

उत्तर दिल्यावर प्रश्नच बदलला

आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी चक्क आपला प्रश्न संपादित करून घेतला?

इतक्या हीन पातळीवर संपादक मंडळ उतरेल असे वाटले नव्हते.

मिपाचे अध:पतन चालू झालेले आहे

थोडक्यात चांगल्या माणसांनी मिपावरून संन्यास घ्यायची वेळ झाली आहे असे स्पष्ट होते आहे.

आग्या१९९०'s picture

26 May 2021 - 10:50 am | आग्या१९९०

आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी चक्क आपला प्रश्न संपादित करून घेतला?
असं काहीही संपादीत केलेले नाही. आपला गैरसमज झालेला दिसतोय.

कॉमी's picture

26 May 2021 - 11:19 am | कॉमी

मी सुद्धा 'मिपाकर' असाच उललेख वाचला होता, जसा आता आहे तसाच. कुठलाही बदल झाल्याचे दिसत नाही.

प्रतिसादात डॉक्टरांचा उल्लेख केल्याचे वाचल्याचे मलाही आठवते.

प्रतिसादात संपादित केला नाहि.
इथे कुणावरही वैयक्तिक आरोप करू नयेत

आग्या१९९०'s picture

27 May 2021 - 11:07 am | आग्या१९९०

माझ्यावर तुम्ही (खरे ) मिपावर तीन ठिकाणी खोटे आरोप करून एक प्रकारे माझी बदनामीच केली. तत्परतेने मी त्यावर खुलासा केला. सरपंच ह्यांनीही असे काही झाले नाही असे सांगितले. आपण एखाद्याची विनाकारण बदनामी केली अशी खंत वाटत नाही का? वाटत असेल तर अशी खंत व्यक्त करण्याचे सौजन्य आपण तिन्ही ठिकाणी दाखवाल का? तेवढेच मला बरे वाटेल.

प्रतिसाद जरी वैयक्तीक स्वरूपाचा असला तरी तो मिपावर चुकीचा पायंडा पडू नये म्हणून लिहीत आहे. मला वाद वाढविण्यात अजिबात रस नाही.

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 2:13 pm | श्रीगुरुजी

परंतु रामदेव बाबा बरोबर स्टेज वर जाऊन त्याचे औषध आपले केंद्रीय आरोग्य मंत्री जाहिरात करतात..

हर्षवर्धन व्यासपीठावर उपस्थित होते, परंतु त्यांनी रामदेवबाबांंच्या औषधाची जाहिरात केली नव्हती, तसेच आपल्या भाषणातही या औषधाचा उल्लेख सुद्धा केला नव्हता.

जरा खालील वाक्ये वाचा. वाक्ये पुरेशी बोलकी आहेत.

What transpired was that India’s apex drug regulator had certified Coronil as a pharmaceutical product in “supporting COVID treatment and an immunity booster” and cleared it for export. It hasn’t recommended it as treatment for COVID-19.

The report reveals that the medicine was only tested on 95 of those asymptomatic and “mildly symptomatic” but confirmed as RT-PCR positive. The 45 patients who got the actual treatment (and not a dummy pill) tested COVID-19 negative significantly quicker. However, these numbers are small. A large proportion of those with mild or no symptoms are expected to clear out the infection without any external intervention. There was no information in the study on the number of days that elapsed before the patients tested positive, making the role of the drug in clearing out the virus unclear. True, allopathic medicine too has cut corners: an ICMR-led trial ultimately couldn’t justify the administration of hydroxychloroquine; the Drugs Controller General of India approved itolizumab by Biocon that was tested only in a sample of 30 but was advertised as a “breakthrough drug”; and Covaxin was approved before its efficacy was known.

https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/opinion/editorial/scientif...

आग्या१९९०'s picture

25 May 2021 - 4:51 pm | आग्या१९९०

रामदेवबाबा कोरोनीलला who ने मान्यता दिली असे सरळ आपल्या आरोग्यमंत्र्यांच्या समोर खोटे सांगतोय आणि डॉ. हर्षवर्धन निमुटपणे ऐकून दुर्लक्ष करत आहेत हे खटकण्यासरखे आहे. तिथेच आरोग्यमंत्र्यांनी खुलासा करायला हवा होता.

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 6:19 pm | श्रीगुरुजी

डॉ. हर्षवर्धन WHO चे प्रतिनिधी नाहीत. या दाव्यावर WHO नेच उत्तर देणे अपेक्षित होते व तसे उत्तर दोनतीन दिवसांनी WHO ने दिले आहे.

आग्या१९९०'s picture

25 May 2021 - 6:30 pm | आग्या१९९०

अरे वा! WHO चे मेंबर नसले तरी केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत, त्यांना आपण नक्की कुठल्या कार्यक्रमाला जातोय हे तर माहीत होते ना? त्यांना आपल्याच देशातील औषधाला WHO ने मान्यता दिली हे माहीत नाही? काय करतात नेमके हे आरोग्यमंत्री?

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 7:40 pm | श्रीगुरुजी

ज्या कार्यक्रमात रामदेवबाबांनी हा दावा केला त्याच कार्यक्रमात एका मिनिटात, त्याची सत्यासत्यता पडताळून घेतल्याशिवाय आरोग्यमंत्री कसे बोलणार? अपेक्षेप्रमाणे WHO ने दोनतीन दिवसांनी उत्तर दिले आहे.

आरोग्यमंत्र्याच्या उपस्थितीत रामदेवबाबा धडधडीत खोटे दावे करतो, बराच धीट आहे रामदेवबाबा. खोटे बोलणे ऐकून गप्प बसून घ्यायची सवय झाली असेल डॉ.हर्षवर्धन साहेबांना. कोरोनावरील कोरोनील औषधाला WHO ने मान्यता दिली हे रामदेवबाबांनी कार्यक्रमापूर्वी आरोग्यमंत्र्यांना सांगितले नाही,धक्का तंत्र आणि खोटे दावे चांगलेच आत्मसात केले आहेत. बिच्चारे डॉ.हर्षवर्धन.

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 9:23 pm | श्रीगुरुजी

एखाद्याने दुसऱ्याच्या वतीने काही दावा केल्यानंतर व्यासपीठावरील व्यक्ती काही क्षणात सर्व माहिती मिळवून पुढच्या मिनिटाला त्याला विरोध कसा करणार?

ज्या औषध वाल्याना "तुमच्या औषधावर कोव्हिड क्युअर अस छापू नका" सांगायला लागतं, ज्या औषधाचा सुरुवातीचा मीडियावर प्रचार केला गेला तो सगळा कोव्हिड क्युअर म्हणून केला गेला, अश्या शंकास्पद ठिकाणी हेल्थ मिनिस्टरने जायचंच का ? हेल्थ मिनिस्टरच्या तिथे असण्याने औषधाला व्हॅलीडेशन मिळतं.

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 10:03 pm | श्रीगुरुजी

या औषधाचा चिनी विषाणू बरे करणारे औषध असा प्रचार करू नका असे केंद्राने ११ महिन्यांपूर्वी सांगितले होते व तेव्हापासून रामदेवबाबांनी तसे सांगणे थांबविले होते. म्हणून काय त्यांच्यावर आयुष्यभर बहिष्कार टाकायचा होता का?

सरकारी माणसाने ब्रॅण्डिंगला जाऊ नये यात बहिष्कार काही दिसत नाही. ज्या औषधाचा सुरुवातीचा प्रचार सगळ्या न्यूज चॅनेल्स वर कोव्हिड वर इलाज म्हणून करण्यात आला, त्यापासून आरोग्य मंत्र्यांनी लांब राहावे असेच मला वाटते. बाकी बाबांना त्यांची बुटी विकण्याचे स्वातंत्र आहेच, लोकांना विकत घेण्याची सुद्धा आहे. बहिष्कार आहे असे काही वाटत नाही.

सुबोध खरे's picture

27 May 2021 - 11:52 am | सुबोध खरे

आय एम ए आणि सरकार यांची मत भिन्नता असणे साहजिक आहे.

(कृपया यात राजकीय/पक्षीय दृष्टिकोन आणू नये)

दोघे जण कुठे तरी बरोबर आणि कुठेतरी चूक आहेत.

आय एम ए चे म्हणणे असे आहे कि सरकार ने एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून आयुषच्या( आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) डॉक्टरांना आधुनिक औषधे देण्याची परवानगी देणे हे चूक आहे.

यात बरेचसें तथ्य आहे कारण जेवढ्या खोलवर आधुनिक वैद्यकाचा अभ्यासक्रम आहे तेवढा काळ इतर पॅथी त्याचा अभ्यास करत नाहीत.
( उद्या मी चार बुके वाचून/एक वर्षाचा ब्रिज कोर्स आयुर्वेदिक/ होमिओपॅथिक औषधे देणे जितके चुकीचे आहे तितकेच हे चूक आहे)

सरकारचे असे म्हणणे आहे कि खेडोपाडी( आणि शहरातील झोपड्यात) सेवा देण्यासाठी आपल्याकडे पुरेसे एम बी बी एस नाहीतच मग तिथे सेवेत असणाऱ्या आयुष व्यावसायिकांना आधुनिक औषध शास्त्राचे ज्ञान देऊन ते देत असलेली सेवा सुधारणे आवश्यक आहे.

कारण लसीकरण, सरकारी आकडे संकलन, शालेय आहार सेवा, कुटुंब कल्याण अशा अनेक ठिकाणी त्यांचा उपयोग होतो आहे.

(याशिवाय देशभर पसरलेली आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक कॉलेजेस बहुसंख्य राजकारण्यांनी चालवलेल्या संस्थांची आहेत. त्यामुळे त्यांना विद्यार्थी मिळणे हे राजकारण्यांच्या आर्थिक आरोग्यासाठी आवश्यक आहे)

दोन्ही संस्था आपल्या जागी कदाचित बरोबर आहेत.

बाबा रामदेव काय किंवा होमिओपॅथी काय यांचा भर आधुनिक औषधांचा साईड इफेक्ट यावर आहे. कारण त्यावरच ते आपले दुकान चालवतात.

खरं तर बाबा रामदेव आणि आयुर्वेदिक औषधे यांचा तसा काही संबंध नाही.

परंतु परंपरागत घरगुती औषधे व्यावसायिक पातळीवर नेऊन त्यांचे विपणन आणि विक्री करून आपला व्यवसाय वाढवण्यासाठी रामदेव बाबाना आयुर्वेदाचा आधार फायद्याचा ठरतो.

त्यासाठी त्यांना आधुनिक औषधांना शिव्या घालणे हे धंद्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. येथेच समानशीले व्यसनेषु सख्यम या न्यायाने आयुषचे काही लोक हिरीरीने पुढे येताना दिसतात.

समस्त आयुर्वेदाचार्य सांप्रतची जीवनशैली आणि आधुनिक आहारशैली कशी चूक आहे आणि पूर्वी ऋषी मुनी कसे स्वस्थ जीवन जगत होते हे मोठ्या उत्साहाने सांगत असतात परंतु हि जीवनशैली स्वीकारणे किती लोकांना शक्य आहे याबद्दल मूक असतात ?

तसेच ऑरगॅनिक फूड वाले आणि हर्बल उत्पादने विकणारे आधुनिक अन्न आणि औषधांमुळे आपले शरीर कसे विषभारित झाले आहे हे कानी कपाळी ओरडत असतात.

यातून सामान्य माणसांना एक न्यूनगंड निर्माण होतो आणि ते डिटॉक्सिफीकेशन पासून पंचकर्म सारख्या अनेक शुद्धीकरणाच्या कर्मकांडात शिरताना दिसतात आणि हाच धंद्याचा सर्वात मोठा भाग आहे.

हा काहीही मुद्दा असला तरी आरोग्य मंत्र्यांनी कोणत्याही खाजगी कंपनीच्या औषधाच्या प्रसिद्धीसाठी तेथे उपस्थित राहणे हे चूकच आहे मग ते आयुर्वेदिक असो किंवा आधुनिक वैद्यकाचे असो.

लसीकरण किंवा तत्सम सरकारी कार्यक्रमास त्यांनी उपस्थित राहणे समजू शकतो.

हा विषय फार मोठा आहे.

चौकस२१२'s picture

27 May 2021 - 1:49 pm | चौकस२१२

आय एम ए चे म्हणणे असे आहे कि सरकार ने एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून आयुषच्या( आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) डॉक्टरांना आधुनिक औषधे देण्याची परवानगी देणे हे चूक आहे.
यात बरेचसें तथ्य आहे कारण जेवढ्या खोलवर आधुनिक वैद्यकाचा अभ्यासक्रम आहे तेवढा काळ इतर पॅथी त्याचा अभ्यास करत नाहीत.
( उद्या मी चार बुके वाचून/एक वर्षाचा ब्रिज कोर्स आयुर्वेदिक/ होमिओपॅथिक औषधे देणे जितके चुकीचे आहे तितकेच हे चूक आहे)
सहमत

वामन देशमुख's picture

27 May 2021 - 2:36 pm | वामन देशमुख

आय एम ए चे म्हणणे असे आहे कि सरकार ने एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून आयुषच्या( आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) डॉक्टरांना आधुनिक औषधे देण्याची परवानगी देणे हे चूक आहे.

आइएमएला या बाबीत काही म्हणणे मांडण्याचा अधिकार (locus standi) आहे का?

सुबोध खरे's picture

27 May 2021 - 2:43 pm | सुबोध खरे

Indian Medical Association is the only representative, national voluntary organisation of Doctors of Modern Scientific System of Medicine, which looks after the interest of doctors as well as the well being of the community at large.

It was established in 1928[2] as the All India Medical Association, renamed "Indian Medical Association" in 1930. It is a society registered under The Societies Act of India.
https://en.wikipedia.org/wiki/Indian_Medical_Association

एक दुरुस्ती: डाॅ. हर्षवर्धन WHO चे एक्जिकेटिव बोर्ड चेअरमन आहेत.
कालच्याच बातमीत WHO च्या 147 , 148 व्या सेशन चं त्यांनी ७४व्या world health assembly समोर सादरीकरण केलं.
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1721383

आग्या१९९०'s picture

25 May 2021 - 9:11 pm | आग्या१९९०

एक दुरुस्ती: डाॅ. हर्षवर्धन WHO चे एक्जिकेटिव बोर्ड चेअरमन आहेत.
मग मग कठीण आहे.

कॉमी's picture

25 May 2021 - 9:34 pm | कॉमी

व्वा.

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 10:09 pm | श्रीगुरुजी

हे एक शोभेचे पद आहे. या पदावर प्रत्येक वर्षी एका वेगळ्या देशाचा प्रतिनिधी असतो. या पदावरील व्यक्तीला निर्णय घेण्याचे किंवा धोरण ठरविण्याचे तसे काही अधिकार नसतात.

This is not a full-time assignment and the Minister will just be required to chair the Executive Board’s meetings.

त्यांच्याकडून धोरणाची अपेक्षा कोण करतंय? निदान बोर्ड मीटिंगमध्ये काय घडतंय ते तरी कळत असेलच ना त्यांना.
असंही त्यांनी आरोग्य खाते शोभेचे पद आहे हे सिद्ध केलेच आहे.

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 10:44 pm | श्रीगुरुजी

ते बोर्ड म्हणजे कंपनीच्या पुढील धोरणांची चर्चा करणारे, लाभांश जाहीर करणारे, बोनस वगैरे जाहीर करणारे एखाद्या पब्लिक लिमिटेड कंपनीचे बोर्ड नव्हे.

आग्या१९९०'s picture

25 May 2021 - 11:09 pm | आग्या१९९०

आपले आरोग्यमंत्री हे कार्डबोर्डचे जाहिरात पोस्टर आहे का ह्याचा रामदेवबाबांने वापर केला?
काहीही म्हणा पण डॉ. हर्षवर्धन "तुम्हारा चुक्याच"

आग्या१९९०'s picture

25 May 2021 - 9:32 pm | आग्या१९९०

https://www.misalpav.com/comment/1108959#comment-1108959
हे खोटं आहे काय?

सुबोध खरे's picture

25 May 2021 - 10:55 am | सुबोध खरे

"डॉक्टरांंना काय कळतं, मी तर नेहमी कंपाऊंडरकडूनच औषध घेतो

यात अपमान नाही काय?

डॉक्टर चोर आहेत लुटारू आहेत खुनी आहेत असे अनेक सुरात आणि तालात ऐकून झाले आहे.

रस्त्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारण्यात वेळ घालवला तर आपले लक्ष्य गाठता येणार नाही.

असे अनेक अपमान पचवून डॉक्टर पुढे जात असतात.

डॉक्टर म्हणजे लुटारू आहेत, त्यांना काय कळते, असले जे कोणी बोलत आहेत ते मूर्ख आहेत..

मग तसे बोलणारे संजय राऊत असोत, राजकीय लोक असूदेत, रामदेव असूद्यात किंवा कोणी सामान्य माणुस..

हे सर्व मूर्ख लोक आहेत...

डॉक्टर हे सेवा देत असले तरी त्या सेवेत कित्येक अभ्यास आहे, त्यात समाजा प्रती ची एक कर्तव्य भावना आहे..
त्यामुळे हे डॉक्टर असले ते तसले असे म्हणणे म्हणजे अकलेचे दिवाळे आहे..

---
त्यामुळे हे असे म्हणाले तर ह्या वेळी अपमान नव्हता का?
अश्या प्रश्नापेक्षा,
हे असे समजणारे सर्व मूर्ख आहेत, आणि हो तो डॉ. चा अपमान आहे..

"डॉक्टरांंना काय कळतं, मी तर नेहमी कंपाऊंडरकडूनच औषध घेतो

यात अपमान नाही काय?

डॉक्टर चोर आहेत लुटारू आहेत खुनी आहेत असे अनेक सुरात आणि तालात ऐकून झाले आहे.

रस्त्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारण्यात वेळ घालवला तर आपले लक्ष्य गाठता येणार नाही.

असे अनेक अपमान पचवून डॉक्टर पुढे जात असतात.

अगदी मान्य आहे..........

या कोरोना काळात डॉक्टरांंवर , नर्सिंग स्टाफ वर हल्ले झालेत, अनेक शहाणे आणि अतिशहाण्या नेत्यांनी डॉक्टरांंना लक्ष केले. डॉक्टरांंनी नर्सिंग स्टाफने निषेध केला, संप केला, आंदोलन केले. पण पण पण या वाईट घटनांनंतरसुध्दा डॉक्टरांंनी व नर्सिंग स्टाफने कोरोना काळातील कर्तव्य काही कायमचे थांबवले नाही.

मुद्दा क्र. १
या विद्वान रामदेवबाबाने असे काय विधान केले आहे कि देशस्तरावरील संस्था I.M.A. (I.M.A. चे राष्ट्रीय सचिव स्तरावरील पदाधिकारी ) या रामदेवबाबावर खवळले आहेत. I.M.A. चे राष्ट्रीय सचिव स्तरावरील पदाधिकारी आहेत त्यांना काय मुर्ख म्हणायचे काय ?? (I.M.A. चे राष्ट्रीय सचिव स्तरावरील पदाधिकारी सुध्दा डॉक्टर आहेत ).

मुद्दा क्र. २

https://www.livemint.com/news/india/ramdev-s-aide-balkrishna-admitted-to...

वरील लिंक नीट वाचा

रामदेव बाबांचे खासम खास समजले जाणारे आचार्य बालकृष्णा हे छातीतील वेदनेच्या तक्रारीनंतर ह्रषिकेश येथील AIIMS मध्ये उपचारासाठी 23 Aug 2019 रो़जी भरती झाले होते.
ह्रषिकेश येथील AIIMS मध्ये अ‍ॅलोपैथिक उपचार पध्दतीनेच उपचार होतात ना

मुद्दा क्र. १ आणि मुद्दा क्र २ वर जरा बोला....

सुखीमाणूस's picture

25 May 2021 - 11:31 am | सुखीमाणूस

औषध कम्पनी लस देत नाहीत?

https://www.tribuneindia.com/news/punjab/after-moderna-pfizer-says-no-to...

पिनाक's picture

25 May 2021 - 3:14 pm | पिनाक

Kejriwal, punjab चे मुख्यमंत्री आदी सत्पुरुषांनी मागणी केल्यावर द्यायला काहीच हरकत नाही. हात जोडून विनंती करतो की केंद्र सरकारने राज्यांना लस मार्केट मधून विकत घ्यायला परवानगी द्यावी असं केजरीवाल, महाराष्ट्र सरकार च तर म्हणाले होते!

पिनाक's picture

25 May 2021 - 4:08 pm | पिनाक

With 1500 squatters kicked out from Lutyens bungalows, it might explain why its always Modi vs All

https://www.opindia.com/2018/02/with-1500-squatters-kicked-out-from-luty...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2021 - 2:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजधानी दिल्लीला वेढा घालणा-या शेतकरी आंदोलनाला बुधवारी दि. २६/५/२१ ला सहा महिने पूर्ण झाले. ' केंद्राने संसदेत मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यासह शेतमालाला ह अमी भाव देण्यासाठी कायदा केला तरच आम्दोलम शेतकरी दिल्लीच्या सीमांवरुन घरी परततील असे जाहीर करुन हे आंदोलन दीर्घकाळ चालेल असा इशारा भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टीकैत यांनी बुधवारी दिला. ( संदर्भ छापील आवृत्ती मटा)

'' मोदी सरकार शेतक-याचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या आंदोलनात शेतक-यांच्या मागण्यांमधे कोणतेही बदल झालेले नाहीत . मोदी सरकारने तिन्ही कायदे माग घ्यावे आणि हमी भावाचा कायदा करावा. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहील- रॉकेश टिकैत भारतीय किसान संघटनेचे नेते. (बातमी संदर्भ मटा)

शेतक-यांच्या आंदोलनाविषयी अधुन मधून बातम्या येतांना दिसतात. पंजाब आणि हरियाणात शेतक-यांनी काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध केल्याच्या बातम्या दिसतात. २६ मे हा दिवस काळा दिन पाळावा म्हणून असे आवाहान शेतक-यांनी नेत्यांनी केलेले दिसते. शेतकरी शेतात जाऊन काम करुन अदलून बदलून आंदोलनात सहभागी होतात आणि आंदोलन सुरु असल्याच्या बातम्या येत असतात. माध्यमांनी जसे आंदोलनाकडे दुर्लक्ष केले तसे सरकारनेही आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते, पूर्वीप्रमाणे फारशा चर्चा दोघांकडूनही होतांना दिसत नाही. सरकारचा संयम पाहता सरकार काही तरी वेगळे धोरण त्यांच्या प्लॅटफॉर्मवर तयार करीत असावेत असे वाटते, जेनेकरुन भारतीय जनतेला सर्वच प्रश्रांचा विसर पडावा. बाकी, शेतक-यांचे प्रश्न सुटावेत आणि आंदोलन थांबावे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

शेतकऱ्यांचं आंदोलन पूर्णतः फसलंय असे म्हणावे वाटते. शेतकरी नेत्यांनी स्वतःच्या अहंकारापायी ही परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतली असे म्हणावे वाटते.

श्रीगुरुजी's picture

27 May 2021 - 2:59 pm | श्रीगुरुजी

आंदोलनाचा पोपट पिंजऱ्यात डोळे मिटून आडवा पडला आहे, तो अजिबात हालचाल करीत नाही, त्याचा श्वास बंद आहे, तो काही खातपित नाही . . . परंतु तो मेलेला नाही.

मोदी सरकार शेतक-याचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.

२६ जानेवारीस आंदोलनाच्या नावाखाली दलालांनी संपूर्ण दिल्लीत यथेच्छ धुडगूस घातला. त्यानंतर ते आंदोलन संपले. सरकार आता तो विषय मागे सारून पुढे गेले आहे. ज्या आंदोलनाचा ४ महिन्यांपूर्वीच नैसर्गिक मृत्यु झाला ते कशाला सरकार चिरडून टाकणार? आता फक्त तेथे मूठभर निरूद्योगी दलाल शिल्लक आहेत. जनतेचा त्यांना कणभरही पाठिंबा नाही.

श्रीगुरुजी's picture

27 May 2021 - 3:09 pm | श्रीगुरुजी

आंदोलनाचा पोपट पिंजऱ्यात डोळे मिटून आडवा पडला आहे, तो अजिबात हालचाल करीत नाही, त्याचा श्वास बंद आहे, तो काही खातपित नाही . . . परंतु तो मेलेला नाही.

मोदी सरकार शेतक-याचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.

२६ जानेवारीस आंदोलनाच्या नावाखाली दलालांनी संपूर्ण दिल्लीत यथेच्छ धुडगूस घातला. त्यानंतर ते आंदोलन संपले. सरकार आता तो विषय मागे सारून पुढे गेले आहे. ज्या आंदोलनाचा ४ महिन्यांपूर्वीच नैसर्गिक मृत्यु झाला ते कशाला सरकार चिरडून टाकणार? आता फक्त तेथे मूठभर निरूद्योगी दलाल शिल्लक आहेत. जनतेचा त्यांना कणभरही पाठिंबा नाही.

Ujjwal's picture

27 May 2021 - 4:37 pm | Ujjwal

+१००

सुक्या's picture

27 May 2021 - 9:40 pm | सुक्या

सहमत.
हे शेतकर्‍यांंचे आंदोलन नाही ... हे दलाल लोकांचे आंदोलन आहे. आपली दलाली वाचावी म्हणुन हा सगळा आटापीटा चालु आहे ...
पंजाब / हरियाना सोडले तर बाकी देशात यांना कुणी हिंग लावुन विचारत नाही ...

बाकी, या (तथाकथीत) शेतकरी आंदोलनाचे रिपोर्टींग करणार्‍या मिडियावाल्यांना "सोशल डिस्टंसिंगचा फज्जा" उडताना कधीच कसा दिसत नाही, त्या बद्दल एक चकार शब्द त्यांच्या वार्तांकनातून निघत नाही, ना त्यांच्या नेत्यांना यावर प्रश्न विचारले जात....हे काय गौडबंगाल आहे काही कळत नाही.

इतर वेळेस ४ लोकं काय दिसली, की वार्तांकन करताना "सोशल डिस्टंसिंगचा फज्जा" बरोबर दिसतो... बहुदा कोरोनाने (तथाकथीत) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे असा समज असावा.

आग्या१९९०'s picture

27 May 2021 - 8:30 pm | आग्या१९९०

शेतकऱ्यांचं सोडा, परंतू बहुमतातील सरकारला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करायची हिम्मत होत नाही,निघाले २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करायला. सहा महिने फक्त बाकी आहेत.नुसत्या मोठ्या घोषणा करायच्या.

श्रीगुरुजी's picture

27 May 2021 - 9:43 pm | श्रीगुरुजी

बरं मग काय करायचं?

नावातकायआहे's picture

27 May 2021 - 10:06 pm | नावातकायआहे

अवघड प्रश्न विचारु नका......

सॅगी's picture

27 May 2021 - 10:06 pm | सॅगी

मख्ख चेहरा करून जे काही होईल ते पाहत बसायचं, चेहर्‍यावरची माशीही न हलवता, आणि हायकमांडने दिलेल्या आज्ञा एखाद्या रोबोटप्रमाणे निमूटपणे पाळायच्या....

सुबोध खरे's picture

28 May 2021 - 11:38 am | सुबोध खरे

काही बाळबोध प्रश्न.

४५ % जनता प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहे. जर हे सरकार शेतकरी विरोधी आहे तर ते दोन वेळेस कसं काय निवडून आलं?

आणि ज्या सरकारने( यु पी ए १) स्वामिनाथन आयोग नेमला त्यांनी त्याच्या शिफारशींची अमलबजावणी का केली नाही?

एका अतिशय हुशार आणि उच्च शिक्षित अर्थतज्ञाशी बोलताना मला जेवढे समजले ते असे.

सरकारला शेतकरी आणि ग्राहक अशा दोन्ही गटांना नाराज करता येत नाही आणि स्वामिनाथन आयोगाच्या संपूर्ण शिफारशी स्वीकारल्या तर त्या शेतकऱ्यांसाठी उत्तम आहेत परंतु ग्राहकांसाठी फार महाग आहेत. आणि शेतकरी सुद्धा स्वतः ग्राहक आहेतच( ऊस पिकवणारा शेतकरी हा कापडाचा ग्राहक आहेच).

शेतजमिनीबद्दलची शिफारस स्वीकारली तर भारताच्या औद्योगिकरणाच्या मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. हे डॉ मनमोहन सिंह यांनाही माहिती होतं.

कसणाऱ्याचे शेत असा कुळकायदा जो महाराष्ट्रात १९४९ साली आला तो सर्व राज्यात आणणे अशक्य आहे.

त्याच्या म्हणण्याप्रमाणे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी या तशा एकांगी आहेत आणि आजच्या वेगाने होणाऱ्या जागतिकीकरणाच्या रेट्यात त्या बऱ्यापैकी कालबाह्य झाल्या आहेत.

त्यामुळे त्या जशाच्या तशा अमलात आणणे कोणत्याही लोकशाही सरकारला अशक्य आहे.

खखोदेजा.

आग्या१९९०'s picture

28 May 2021 - 12:13 pm | आग्या१९९०

ज्यांना खरे कधी बोलायचं माहीत नाही, त्यांना असेच प्रश्न पडणार?

सुबोध खरे's picture

29 May 2021 - 11:45 am | सुबोध खरे

काय सांगताय?

तुम्ही सांगा बरं, आता पर्यंत कोणत्याही सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे का लागू केल्या नाहीत.

तरी बरं मोदी सरकारने त्यातील बऱ्यापैकी शिफारशी लागू केल्या आहेत.

कोणत्या आहेत ते जालावर खोदून पहा.

आग्या१९९०'s picture

29 May 2021 - 12:04 pm | आग्या१९९०

ब्बॉर.

सुबोध खरे's picture

29 May 2021 - 6:47 pm | सुबोध खरे

हॅ हॅ हॅ हॅ

Rajesh188's picture

27 May 2021 - 10:06 pm | Rajesh188

अजुन जबरदस्त फेकाफेक करून शेतकऱ्यांचे उत्पादन तिप्पट झाले असे रेटून सांगायचे.आहे काय आणि नाही काय.

नावातकायआहे's picture

27 May 2021 - 10:07 pm | नावातकायआहे

स्वागत!

सुबोध खरे's picture

29 May 2021 - 11:49 am | सुबोध खरे

फेकाफेक करून शेतकऱ्यांचे उत्पादन तिप्पट झाले

श्री मोदींना काही कळतंच नाही.

फेकाफेक करून शेतकऱ्यांचे उत्पादन तिप्पट झालं कशाला सांगायचं निदान दसपट झालं असं सांगायचं आणि वर पुराव्यासाठी शेतकरी आंदोलनातील पायाच्या मसाज पार्लर, वातानुकूलित कंटेनरचे, पंचतारांकित भोजनाचे फोटो टाकायचे.

हा का ना का

त्यांना आपल्या दिल्लीच्या महापुरुषांकडून अजून बरंच शिकायचंय.

तरी करवत्याना त्यामुळे शष्प फरक पडत नाही म्हणून खरा बदल अपेक्षित असेल कारवत्याना भिडा इथे, व कर्त्यांना खेळीमेळीत घ्या

सुबोध खरे's picture

29 May 2021 - 6:46 pm | सुबोध खरे

हॅ हॅ

इथे कोण लेकाचा सिरियसली घेतोय? कर्त्यांना आणि करवित्याना सुद्धा

टिनपाट राजकारण्यांबद्दल आणि त्यांच्या गुलाम आणि चमच्याबद्दल असलेला राग इथे व्यक्त करून मोकळं व्हायचं

आणि आपण शांत रहायचं

हा का ना का