मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
13 Jul 2010 - 1:43 am

लहानपणी मी एक कोडं ऐकलं होतं, 'पोळी का जळली? घोडा का अडला? विड्याचं पान का सडलं? या तीनही प्रश्नांचं एकच उत्तर सांगा.' तसाच अनेक प्रश्नांचं एकच उत्तर देणारा अनुभव आज मला आला. 'मराठी माणूस धंद्यात मागे का पडतो? पुस्तकांचा खप कमी का होतो? पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट का आहे?' हे ते प्रश्न.

अनुभव अगदी ताजा आहे. काही तासांपूर्वीचा. अमेरिकेला परत जायचे वेध लागले की पुस्तकांच्या खरेदीसाठी काही फेऱ्या होतातच. आज वैजूमावशीबरोबर पुण्यात अप्पा बळवंत चौकात गेलो. पुस्तकांची भरपूर दुकानं, पण बहुतेक सगळी टेक्स्टबुकं, अमुक कसे करावे वगैरेची, ज्योतिष, पाककृतींसारखी गृहोपयोगी दुकानं. ललित पुस्तकं विकणारी थोडीच. 'आजकाल लोक पुस्तकं फार विकत घेत नाहीत. पैसा व शिक्षण वाढूनही इंटरनेट, टीव्ही अशा माध्यमांचं वर्चस्व वाढलेलं आहे' वगैरे आम्ही बोलत होतो. पूर्वी जिथे पुस्तकं विकत घेतलेली आहेत अशा, चांगला संग्रह असलेल्या दुकानात गेलो. आधीचे अनुभव अतिशय चांगले होते. पण आज जो काही इरसाल नमुना भेटला तो पाहून हातच टेकले.

एका बोळात ते दुकान आहे. बोळात शिरताना कोपऱ्यावरच मुत्रीच्या वासामुळे नाक दाबावं लागलं. दुकान तसं बाहेरून दिसायला नीटनेटकं, अगदी लहान नाही, पण फार मोठंही नाही. काही पुस्तकं दर्शनी मांडलेली. काउंटरच्या अलिकडे आपण उभं राहायचं, पलिकडून विक्रेता आपण सांगू ती पुस्तकं त्यांच्याकडे असतील तर देणार अशी एकंदरीत योजना. मी व वैजूमावशी गेलो तेव्हा एक वयस्क, गोरेसे गृहस्थ मागच्या टेबलामागे बसले होते. तो मालक किंवा निदान मॅनेजर असावा अशी आमची कल्पना झाली.

"मी एक आठदहा दिवसांपूर्वी आलो होतो आणि काही पुस्तकं मागवली होती. ते म्हणाले.." मी म्हणालो.
"नाही, मी नव्हतो तेव्हा" माझं वाक्यसुद्धा पुरं न होऊ देता तो माणूस म्हणाला
"हो, माहिती आहे. पण जे होते त्यांनी सांगितलं..."
"नाही मला काही माहीत नाही त्याविषयी" एकंदरीत महाशयांना वाक्य तोडून बोलण्याची सवय होती. किंवा त्यांना मला काय म्हणायचंय याविषयी आंतर्ज्ञान असावं.
"त्यांनी सांगितलं की पुस्तकं आली असतील तर फोन करेन. त्यांनी फोन केला नाही म्हणून..."
"मग आली नसतील पुस्तकं." कुठची पुस्तकं, ती नसतील तर इतर हवी आहेत का, वगैरे काही नाही. पण मलाच पुस्तकं घ्यायची होती.
"अहो ऐकून तर घ्या. मला ती पुस्तकं आली असतील तर सांगा. आणि माझ्याकडे दुसरी यादी पण आहे"
"कुठची होती पुस्तकं?"
"कोलटकरांची. अरुण कोलटकरांची जेजुरी, भिजकी.."
"कोलटकरांची काही नाहीत आमच्याकडे."
"बरं मग श्याम मनोहरांचं एक पुस्तक होतं."
"श्याम मनोहर?"
"हो. कथासंग्रह आहे किंवा लेखांचा संग्रह..."
"कथा की लेख माहीत नाही?"
"नाही."
"मग प्रकाशक कोण आहे"
"नाही हो, प्रकाशक माहीत नाही."
"प्रकाशक नाही माहीत? आमचा संबंध प्रकाशकांशी येतो. प्रकाशक सांगा मी ताबडतोब सांगतो."
"अहो पण आम्ही वाचक. आमचा संबंध लेखकांशी येतो. कोणीतरी सांगतं या लेखकाचं पुस्तक चांगलं आहे..."
"नाही बहुतेक. श्याम मनोहर नाहीत."
माझ्या आधीच्या मागणीतली काहीच पुस्तकं नाहीत हे म्हटल्यावर माझी छोटीशी यादी काढली.
"आनंद यादव. त्यांचं झोंबीच्या नंतरचं पुस्तक आहे का?"
"कुठलं?"
"नाव माहीत नाही. मला त्या सीरीजमधली पुढची पुस्तकं हवी आहेत."
"अशी नाही शोधता येणार. तुम्हाला प्रकाशक माहीत आहे का?"
"त्यांचं नटरंग आहे का?" त्यांनी प्रकाशक म्हटल्यावर मी यादीतल्या पुढच्या ओळीवर गेलो.
"नटरंग?"
"हो, तो सिनेमा आहे ना नटरंग, त्याची मूळ कादंबरी."
शेवटी तो माणूस उठला. मागच्या शोकेसमधनं एक पुस्तक काढलं.
"हे. घ्या. आनंद यादवांचंच आहे. पण हीच त्या सिनेमाची मूळ कादंबरी की काय माहीत नाही."
चला, यादीपैकी एक पुस्तक तर मिळालं. म्हणून मी खुष झालो.
"झोंबीच्या सीरीजमधली काही पुस्तकं नाहीतच का?" मी पुन्हा एकदा खडा टाकून बघितला.
"अहो असं सांगून कसं सापडणार?"
"तुमच्याकडे काही कॅटेलॉग वगैरे नाही का?"
"आमच्याकडे पस्तीस हजार पुस्तकं आहेत. इतकी व्हरायटी तुम्हाला कुठे मिळणार नाही. पण पस्तीस हजार पुस्तकांचा कॅटेलॉग करायचा झाला तर तो केवढा होईल माहिती आहे का? इतका जाडा होईल." दोन हातांमध्ये सहा इंचांचं बाड असल्यासारखं दाखवत म्हणाले.
"कॉंप्युटर वगैरे वापरता येत नाही का तुम्हाला?" त्या माणसाने एक विचित्र चेहेरा करून मान हलवत खांदे उडवले. काय ही पीडा आली आहे, घ्या आता तुम्ही मला माझा धंदा शिकवा, ही नवीन थेरं माझ्या पोरांकडून चालवून घेत नाही तर तुमचं कुठून ऐकू... असे बरेच विचार त्या चेहेऱ्यावरच्या भावांतून मानेवरनं ओघळून खांद्याबरोबर उडाले.
तितक्यात एक सेल्समन आला. मी त्याला शेवटचा उपाय म्हणून म्हटलं.
"आनंद यादवांची काही इतर पुस्तकं दाखवता का?"
त्याने शांतपणे त्याच शोकेसमधून आनंद यादवांचा एक कथासंग्रह व 'नांगरणी' काढून दिलं. पहिल्याच माणसाने ती काढून द्यायला काहीच हरकत नव्हती. 'नांगरणी' च्या अर्पणपत्रिकेच्या मागच्या बाजूला
'नांगरणी' च्या आधीचे 'झोंबी' व नंतरचे 'घरभिंती' व 'काचवेल' हे खंड प्रसिद्ध झाले आहेत.
असं लिहिलं होतं. मी आनंदाने त्यांना दाखवलं आणि म्हटलं
"बघा इथे लिहिलं आहे, नांगरणीच्या आधीचे झोंबी आणि नंतरचे..."
"अहो पण झोंबी तुमच्याकडे आहे ना..." इति मालक-मॅनेजर. त्यांनी 'टाक म्हटलं की पाणी टाकायचं...' वगैरे म्हणी ऐकल्या नसाव्यात.
"ते आहे, पण मी म्हणत होतो की इथे झोंबीच्या सीरीजमधल्या पुस्तकांची यादी दिली आहे."
"पण तुम्हाला झोंबी नको होतं." आता मात्र माझा स्वतःवरचा ताबा सुटला. वैतागून मी म्हटलं
"मी तुम्हाला इथे यादी आहे हे दाखवत होतो. आणि समजा माझ्याकडे झोंबी असूनही तुम्ही दाखवलं आणि मोह पडून मी अजून एक कॉपी घेतली तर तुम्हाला वाईट वाटलं असतं का? निदान पुढच्या पुस्तकांची यादी तरी दिसली असती ना?"
पुन्हा एक निश्वास आणि टेबलावरच्या कामात लक्ष. या धंद्यातच आहे म्हणून, नाहीतर या उद्धट माणसाला एकही पुस्तक विकलं नसतं, असे यावेळी विचार असावेत.
"चला ते काचपाणी आणि घरभिंती सुद्धा द्या." सेल्समनने मुकाट्याने ती पुस्तकं आणि यादवांचंच कलेचे कातडे ही आणून दिलं.
यादीतली पुस्तकं घेऊन झाल्यावर म्हटलं तुमच्याकडे काही चांगल्या कादंबऱ्या काव्यसंग्रह वगैरे असतील तर दाखवा. पुढचा अर्धा तास सेल्समन पुस्तकांचा गठ्ठा आणून देणार मी थोडंसं चाळून पुस्तक निवडायचं असं चाललं होतं. शेवटी पाच कादंबऱ्या, दहा काव्यसंग्रह घेतले. वैजूमावशीसाठी दोन आहारविषयक पुस्तकं घेतली. सेल्समन खूपच चांगला होता. इतकी पुस्तकं घेतो आहे म्हटल्यावर त्याने "तुम्हाला आत येऊन निवडायची असतील तर बघा" असंही म्हटलं. मी म्हटलं "नको, आता बास. आणखी मोह नको." तरी त्याने एक काव्यसंग्रह आणखी पुढे आणलाच.
असे सहासात इंची दोन गठ्ठे झाले. सेल्समनने सर्व पुस्तकांची नावं व त्यांच्या किमती वाचून दाखवल्या. मालक-मॅनेजर साहेबांनी ते लिहून काढले. बेरीज केली. २१५० ची टोटल झाली.
"काय, काही डिस्काउंट वगैरे.."
"हो, ते देऊनच टोटल केली आहे." मी बघितलं १०% डिस्काउंट दिलं होतं.
पैसे द्यायची वेळ आली तेव्हा मालक-मॅनेजर सेल्समनला म्हणाले,
"किती, २१९० झाले ना?"
"नाही, २१५० झाले." सेल्समनने माझ्याकडून रिसीट घेऊन, ती तपासून म्हटलं. मा-मॅ साहेबांनी गंडवण्याचा प्रयत्न अर्थातच केला नसावा, पण त्या आकड्याच्या बाबतीतही एक छोटासा घोळ करून घेतला.
"मग पिशवी देणार का?"
"नाही, आजकाल कॅरीबॅग देता येत नाही ना..." इति मालक-मॅनेजर
"मी तुम्हाला बांधून देतो." सेल्समन
"बरं, दोन गठ्ठे ठेवा. एक मोठा करू नका." मी म्हटलं. सेल्समन आतून कागद, दोऱ्या वगैरे आणायला गेला.
"पिशव्या देत नाही का आजकाल?"
"हो आजकाल हलक्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणली आहेत ना. किमान पन्नास ग्रॅमची असायला लागते पिशवी."
"पण साडीवाले देतात ना."
"अहो त्यांचं वेगळं असतं. साडीच्या धंद्यात तीन-तीनशे टक्के फायदा असतो. आम्हाला कुठे पाच दहा टक्के मिळतात." साडीच्या धंद्यात इतकी कॉंपिटिशन असताना तीनशे टक्के फायदा मिळतो हे मला पचायला जड गेलं.
"काय सांगता - मी दादरच्या अमुक तमुक फेमस दुकानातून पुस्तकं घेतली तर त्यांनी मला पंधरा टक्के डिस्काउंट दिलं. तुम्ही दहाच टक्के दिलं. मग फायदा पाचच टक्के कसा असेल?"
"हॅहॅहॅ... अमुक तमुक वाल्यांची गोष्ट वेगळी आहे. "
"म्हणजे"
"आणि त्यांच्याकडे आमच्याइतकी व्हरायटी नसते." गोष्ट नक्की कशी वेगळी ही धंद्यातली इतकी अंदरकी बात आहे की ती तुम्हाला सांगण्यात रस नाही, किंवा इतका खर्च करायला वेळ नाही, असं त्याला म्हणायचं असावं. काही का असेना त्याने उत्तर टाळलं हे खरं. "आम्हीच त्यांना काही पुस्तकं पुरवतो. आमच्याकडे पस्तीस हजार टायटल्स आहेत." तसं असेल तर तुमच्याकडे फक्त दहा टक्के तर त्यांच्याकडे पंधरा टक्के डिस्काउंट हे उलटं गणित कसं, असा प्रश्न पडूनही मी विचारला नाही.
"अहो काहीतरी काय सांगता - तुमच्याकडे कोलटकरांची काही पुस्तकं नाहीत. मला अमुक तमुक कडे निदान चिरीमिरी आणि द्रोण तरी सापडलं."
"ते वेगळं. ती मुंबईची प्रॉडक्ट्स आहेत."
मला हा तर्क कळला नाही, पण काहीतरी गहन असेल म्हणून मी सोडून दिलं. एव्हाना सेल्समनचं पुस्तकं बांधणं चालू झालं होतं.
"काय हो, त्या साडीवाल्यांच्या पिशव्यांची किंमत काय असते."
"पाच, सहा, सात काही आठ रुपयेही असते." पन्नास, साठ, सत्तर, ऐशी रुपये म्हटल्यासारखं त्याने म्हटलं. दोन - अडीच हजाराचा माल खरेदी करणाऱ्यालाही सहा रुपयांच्या पिशव्या देणं परवडत नसेल तर काय करणार.

बाहेर पडताना मला खरोखरच एखाद्या दुकानात, जिथे मी पैसे खर्च करायला आलो आहे अशा ठिकाणी असा अनुभव आला हे खरंच वाटत नव्हतं. हसावं की रडावं कळत नव्हतं म्हणून मी हसायचं ठरवलं. पण त्यामागे एक ठार अविश्वास होता. या माणसाने माझं बोलणं नीट ऐकून घेतलं नाही. 'लेखक माहीत असून काय उपयोग, आम्हाला प्रकाशक माहीत, तेव्हा ते सांगा' असं म्हटलं. आपल्याकडे असलेल्या संग्रहाचा अभिमान दाखवला. पण माझी सोय होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान सोडाच, जुनंही वापरलं नाही. पुस्तकांचा मला लोभ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली नाही. माझ्या चुका काढल्या. मी वैतागलेलो दिसल्यावर माफी मागितली नाही. स्वतः चुकीची, निदान मला चुकीची वाटतील अशी विधानं केली. आधीच पुस्तकांना ग्राहक कमी, त्यात अशी वागणूक मिळाल्यावर आणखीन काय होणार? हा अर्थातच सामान्य अनुभव नाही, नसावा. इतर दुकानांतले व इथेही आधीचे अनुभव चांगले आहेत. पण त्यामुळे माझं आजचं डोकं फिरणं कसं थांबणार?

गेल्याच वर्षी माझा मेव्हणा, अप्पा बळवंत चौकात गेला होता. लहानपणी वाचलेला फास्टर फेणेचा संपूर्ण संच आणि नंदू नवाथेचे संच व इतर बरीच पुस्तकं त्याला घ्यायची होती. पाऊण तास गाडीतून फिरून त्याला पार्किंग सापडलं नाही. एरवी पुण्याविषयी अतिशय प्रेम असलेला तोसुद्धा वैतागून म्हणाला, "मी चार हजाराची पुस्तकं घेणार होतो आज. पन्नास रुपये देऊन गाडी पार्क करायची देखील तयारी होती माझी. पण हॅट, असला अनुभव आल्यावर मी इथे पाऊलसुद्धा ठेवणार नाही."

तर त्या तीन प्रश्नांचं माझ्यासाठी, आजच्यापुरतं उत्तर आहे 'ग्राहकाविषयीची अनास्था'.

समाजजीवनमानप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

अनिता's picture

13 Jul 2010 - 1:55 am | अनिता

तुम्ही नशिबवान आहात्...त्या मालकाने तुम्ही निवडलेली पुस्तके " ह्या..हे काय वाचताय? " म्हणोन परत शेल्फात ठेवली नाहीत...

" ह्या..हे काय वाचताय? " म्हणोन परत शेल्फात ठेवली नाहीत...
>>>>>
=)) =)) =)) =)) घ्या ...खपलो....

ऐकायला कटु वाटतेय पण वास्तव आहे.
.
.
.
भावश्या

वाचक's picture

13 Jul 2010 - 1:56 am | वाचक

म्हणजे आपल्याकडे अक्षरशः 'मर रे कष्ट्मरा' अशी अवस्था आहे.
पण अशा 'मागा/सांगा आणि मग दाखवा' प्रकारात असलेच (बहुतांशी) अनुभव येतात. मग ते दुकान पुस्तकांचे असो किंवा कपड्यांचे.
जिथे 'सेल्फ सर्विस' असते (मॅजेस्टिक, पाथफाईंडर वगैरे) तिथेच जायला हवे.

ठाण्याचे मॅजेस्टिक मस्त आहे, तिथे मी अर्धी पुस्तके (अर्धी किंवा क्वचित पूर्ण) वाचून मग इतरच खरेदी करतो. विविध कारणांनी भरणारी पुस्तक प्रदर्शने हीच पुस्तक खरेदीसाठी सर्वात योग्य जागा असे माझे अनुभवांती मत झाले आहे.

शिल्पा ब's picture

13 Jul 2010 - 2:16 am | शिल्पा ब

मीसुद्धा माझी सगळी पुस्तक ग्रंथ प्रदर्शनातूनच घेते...दादरला शिवाजी मंदिरात बर्याचदा प्रदर्शन असते आणि खूप व्हरायटी पण असते...
बाकी पुणेरी दुकानदारांबद्दल काय बोलणार ?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

गणपा's picture

14 Jul 2010 - 3:57 pm | गणपा

मी सुद्धा ग्रंथ प्रदर्शनातूनच पुस्तक घेतो. शक्यतो पार्ल्याच्या जवाहर बुक डेपो मधुन.
हल्ली हल्लीच घराजवळच्या एका दुकानाचा शोध लागला. मालक्/सेल्समन फारच नम्रतेने बोलत होता.
आणि स्वतःहुन काही चांगली पुस्तक पण दाखवत होता. माझ्या यादित नसलेली पुस्तक त्याने २ दिवसात घरपोच आणुन दिली.
पुण्याच्या खरेदिचा काही अनुभव नाही पण इतरांचे अनुभव वाचुन मला माझा दुकानदार परग्रहवासी असावा असा संशय येउलागलाय ;)

पिवळा डांबिस's picture

13 Jul 2010 - 2:29 am | पिवळा डांबिस

राजेशराव,
जरा त्या दुकानाचं नांव व्यनि करा...
म्हणजे टाळायला बरं!!!
:)

त्या मालकाने तुम्ही निवडलेली पुस्तके " ह्या..हे काय वाचताय? " म्हणोन परत शेल्फात ठेवली ...
हा, हा, हा!! लई भारी!!!
अहो अनिताताई, तुमच्यावर वाईट संस्कार होऊ नयेत म्हणून त्याना काळजी वाटली असेल हो!!!
=))

पुष्करिणी's picture

13 Jul 2010 - 2:13 am | पुष्करिणी

माझा अगदी उलटा अनुभव आहे, ६ महिन्यांपूर्वीच मी अप्पा बळवंत चौक, डेक्क्न, बालगंधर्व ( समकालीन प्रकाशनाचा स्टॉल होता तिथे ) इथून बरीच पुस्तकं खरेदी केली. पहिल्या भेटीत एकही पुस्तक नाही मिळालं, पण सगळ्या विक्रत्यांनी फोनवर २-३ दिवसांत माहिती देउ असं सांगून प्रत्यक्षात फोन केलेही, पुस्तकं मिळाली...२ दुकानदारांनी मुंबईहून ही मागावून दिली.

सुखद धक्का होता.
पुष्करिणी

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Jul 2010 - 11:35 am | llपुण्याचे पेशवेll

अरे वा. म्हणजे पुण्यातले दुकानदारदेखील कष्टमरशी जशास तसे वागतात. ;)

पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

संदीप चित्रे's picture

13 Jul 2010 - 7:12 pm | संदीप चित्रे

पुण्याच्या 'अत्रे' सभागृहात पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो.
नेहमीसारखा हातात वेळ कमी होता. पुस्तकं बघताना सहज 'आम्ही भगीरथाचे पुत्र' आहे का म्हणून चौकशी केली. तिथे नव्हतं पण त्यांनी एका माणसाला पाठवून गोडाऊनमधून ते पुस्तक मागवून घेतलं. आदल्याच दिवशी त्या पुस्तकाच्या नवीन प्रती आल्या होत्या आणि त्या अजून गोडाऊनमधून बाहेरही पडल्या नव्हत्या !
अक्षरशः कोरं करकरीत पुस्तक मिळालं :)
--------------
राजेश,
तुमचा अनुभव मात्र जबरदस्त !
>> "ते वेगळं. ती मुंबईची प्रॉडक्ट्स आहेत."
ह्या वाक्याला तर एल ओ एल !
पिडांनी लिहिल्याप्रमाणे दुकानाचे नाव व्यनि करा म्हणजे टाळायला बरं :)

पंगा's picture

13 Jul 2010 - 2:22 am | पंगा

ललित पुस्तकांसाठी अप्पा बळवंत चौक? टेक्स्टबुकांव्यतिरिक्त इतर काहीही घ्यायला मी तरी तिथे फिरकलो नसतो बुवा!

डेक्कनवरची 'पॉप्युलर' वगैरे मंडळी बंद पडली काय?

- पंडित गागाभट्ट.

विंजिनेर's picture

13 Jul 2010 - 4:52 am | विंजिनेर

पॉप्युलर चे मालक - गाडगीळ अतिशय तत्पर आहेत, दुकानाची मांडणी सुद्धा तुम्हाला फिरून पाहिजे ते चाळता येईल अशी आहे.
पुढे कोपर्‍यावरचं इंटरनॅशनल सुद्धा छान आहे.

पंगा's picture

13 Jul 2010 - 5:28 am | पंगा

नेमके हेच म्हणायचे होते.

(बाकी आधी नको तिथे जायचे, आणि मग वाईट अनुभव आला की समस्त पुणेकरांच्या नावाने खडे फोडायचे, हा प्रकार काही नवीन नाही. चालायचेच!)

- पंडित गागाभट्ट.

आमोद शिंदे's picture

21 Jul 2010 - 7:25 am | आमोद शिंदे

पुण्यात आप्पा बळवंत चौकात ललित पुस्तकेही मिळतात. मी स्वतः २-३ दुकानातून खरेदी केलेली आहेत. अनुभव ठीक होता.

नंदन's picture

13 Jul 2010 - 2:28 am | नंदन

मुंबईच्या एका 'आदर्श' दुकानाचाही फारसा चांगला अनुभव नाही. बहुतेक हव्या असणार्‍या पुस्तकांना 'माहीत नाही, पुढच्या आठवड्यात चेक करा' असं उत्तर मिळाल्यावर मुश्किलीने काऊंटरच्या आत येऊन पुस्तकं पाहण्याची अनुमती मिळाली. जेमतेम पाच-दहा मिनिटं झाली नसतील, तितक्यात दुसरा एक सेल्समन 'तुम्हांला पुस्तकं विकत घ्यायचीत का?' हा प्रश्न शक्य तितक्या उर्मटपणे विचारून गेला :). त्यापेक्षा मॅजेस्टिकचा अनुभव फारच चांगला. पुण्यातल्या 'रसिक साहित्य' कडून काही पुस्तकं ऑनलाईन मागवली, तिथेही अतिशय चांगला अनुभव आला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile's picture

13 Jul 2010 - 2:33 am | Nile

एकंदर अनुभव असेच. रसिक साहित्यचे अनुभव मात्र चांगले आहेत (पण ते असलेल्या ओळखीमुळे असावेत.)

-Nile

रेवती's picture

13 Jul 2010 - 2:44 am | रेवती

माझ्या बाबांनाही वाईट अनुभव आला. दुकानाचे नाव महित नाही. 'हे पुस्तक नाही', 'ते पुस्तक नाही' असे सांगितले. नंतर दुकानाच्या बाहेर तो सेल्स्मन आला व अमूक एक ठिकाणी १५% डिस्काऊंट व ही सगळी पुस्तके देतो म्हणाला. नोकर ग्राहकांना आणि मालकालाही शेंडी लावत होता. नंतर डेक्कन वर इंटरनॅशनल बुक स्टॉलमध्ये ही सगळी पुस्तके मिळाली. सर्व्हीसही चांगली होती. आम्ही एवढ्यात प्रदर्शनातून पुस्तके घेतली. चांगली मिळाली.
आजकाल ग्राहक भरपूर आणि हवा तेवढा दाम मोजणारे आहेत. सगळ्या गोष्टी महाग झाल्याचे जाणवते.
ता. क. इंटरनॅशनल चे मालक श्री. दिक्षित आहेत. दुकान ८० वर्षे (नक्की माहीत नाही पण बरेच जुने)जुने आहे. पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्यावर इंटरनॅशन दिक्षित असा लेख लिहिला होत. असे रंगा म्हणतोय.

रेवती

धनंजय's picture

13 Jul 2010 - 3:01 am | धनंजय

गेल्या फेब्रुवारीत अ.ब. चौकातले "रसिक" आणि डेक्कन मधले "इंटरनॅशनल" या पुस्तकविक्रेत्यांचा चांगला अनुभव आला.

"इंटरनॅशनल"मध्ये मा-मॅने नव्हती ती पुस्तके घरपोच आणली, उशीर झाला ती पुस्तके पोस्टाने पाठवली.

वाटले होते, ग्राहकसेवा-संस्कृतीच सुधारली. तुमचा वाईट अनुभव वाचून "वाईट ग्राहकसेवा" रकान्यात आणखी एक फुली टाकावी लागणार.

छोटा डॉन's picture

13 Jul 2010 - 8:12 am | छोटा डॉन

>>गेल्या फेब्रुवारीत अ.ब. चौकातले "रसिक" आणि डेक्कन मधले "इंटरनॅशनल" या पुस्तकविक्रेत्यांचा चांगला अनुभव आला.

+१, असेच म्हणतो.
माझाही 'रसिक' अणि फर्ग्युसन रोडवरचे 'पॉप्युलर' ह्या दुकानाबाबत अनुभव चांगला आहे.
कुठली नवी पुस्तके आहेत, उपलब्द नसतील तर केव्ह मिळतील वगैरेंची माहिती समाधानकारक मिळते.
डिस्काउंट कमी मिळतो हे जरी मान्य असले तरी ती बाब मझ्यासाठी जास्त महत्वाची नाही म्हणुन मी ती ग्राहकसेवेसाठी 'कसोटी' मानत नाही.

इनफॅक्ट रसिक आणि पॉप्युलरची 'फोन सेवा'ही उत्तम आहे.
तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक दिलात तर ते आठवणीने फोन करुन माहिती देतात हा अनुभव आहे.
रसिकची 'ऑनलाईन खरेदी' ही सेवाही उत्तम आहे, फोनवरुन घासाघीस केल्यास बराच डिस्काउंट आणि कमी खर्चात डिलिव्हरी मिळते हे वैयक्तिक अनुभवावरुन सांगतो.

त्यामाने पुण्यात भरणारी 'पुस्तकविक्री प्रदर्शने' हा अतिशय भंपक आनि मिरवण्याचा प्रकार आहे असे वाटते. 'अक्षरधारा' हे तर पुस्तकांचे नव्हे तर 'मिरवण्याचे' प्रदर्शन आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.

बाके गुर्जींचा अनुभव मजेशीर वाटला !
नोंद घ्यायला हरकत नाही. :)

------
छोटा डॉन

रेवती's picture

13 Jul 2010 - 5:45 am | रेवती

पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट का आहे?'
आता आपण नवीन धागा काढून पुण्याव्यतिरिक्त सगळीकडे असलेली दुकाने जेथे चांगली सेवा मिळते त्याबद्दल लिहा. आणि पुण्याचं नाव दुकानदारांनी फार वर्षे वाईट करू ठेवले असेल तर तुम्ही तिथे जायची चूक कश्याला केलीत? पुणेकरांना नावे ठेवणे यात काही नवीन राहिले नाही.
पुण्याचा दुकानदार फिका पडेल अश्या भारतीय दुकानदाराला मी दर अठवड्याला ग्रोसरी आणायला गेले कि पाहते. सारख्या सारख्या तक्रारी नाही करू माणसाने!

रेवती

एक's picture

13 Jul 2010 - 6:34 am | एक

माझ्या मनातले विचार तुम्ही फारच चांगल्या रितीने मांडले..

पुण्यातल्या वाईट अनुभवावर अतिशय तत्त्परतेने लेख आला. पण असे कित्येक अनुभव कॅलिफोर्निया मधे बे-एरिया मधे सुद्धा येतात त्यावर कधी लेख नाही आले?

प्लॅस्टीकची पिशवी न देण्याचा किंवा त्यासाठी ५० सेंट चार्ज करण्याचा पराक्रम इथल्या वॉलमार्टने पण केला होता.

इथले ग्रोसरीवाले सुद्धा सडका माल विकतात आणि वर परत बदलून पण देत नाहीत. (आमच्या पुण्यातल्या वाण्याने सडका नारळ बदलून दिला होता.)

इथे लहान मुलांचे केस कापायचे दुकान आहे.. तो मालक तर खास पुण्यावरूनच ट्रेनिंग घेऊन आला असावा.. दुकान उघडतं १० वाजता, बंद होतं ५ वाजता आणि १२ ते २ लंच टाईम. हे दुकानदार एका अमेरिकनाचं आहे (हं. घाला काथ्याकूट. अमेरिकन शब्दाची व्याख्या काय म्हणून..)

अजून किती उदाहरण देऊ..?

"पुणेकर दुकानदारांना झोडपणं" (नाहीतर लेखाचं शिर्षक एवढं जेनेरिक नसतं ठेवलं) या खेरीज हा लेख लिहिण्यामागे बरेच उद्देश असावेत..असं मनापासून वाटतं. (जसं आपली उच्च अभिरूची, आपले प्रगत दृष्टिकोन दाखवणं इ..)

किंवा आपण एवढे पैसे देणार असून सुद्धा दुकानदाराने आपल्याला एका सामान्य माणसा सारखा वागवलं याचा सल सुद्धा या लेखामागे असेल?

-सदाशिवपेठी पुणेकर.

शिल्पा ब's picture

13 Jul 2010 - 7:06 am | शिल्पा ब

कोणतं दुकान सडका माल विकताय बे एरियात? वालमार्ट च म्हणाल तर काही दिवस त्यांनी प्लास्टिक पिशव्या देण बंद केलं होतं
पण आता देतात...(तुम्ही तक्रार केली होती का? )..बर्याच दुकानांनी प्लास्टिक पिशव्या न देणे किंवा कागदी पिशव्या देणे सुरु केले होते...Ikea ने तर बंदच केलंय...कारण...प्लास्टिकचा कचरा वाढतोय म्हणून...असो.

तर, मागच्या वर्षी पुण्यात खरेदीला गेले होते...अनुभव वाईट नाही...बहुतेक सगळ्यांनी हसून "या या " केलं आणि विचारलेल्या वस्तून कुरकुरता दाखवल्या....एका १९४५ का त्याही आधीपासून सुरु असलेल्या पेनाच्या दुकानदाराने तर "आम्हाला आमचे पेन आणि शाई मोठ्या मार्केटमध्ये का न्यायची नाही अथवा जाहिरात का करायची नाही" यावर पेनात शाई घालत एक लेक्चर दिले...पेन आणि शाई दोन्ही छान बर का..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Jul 2010 - 11:41 am | llपुण्याचे पेशवेll

काळे का हो ते?
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

शिल्पा ब's picture

13 Jul 2010 - 11:44 am | शिल्पा ब

हो काळेच... :-)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

Nile's picture

13 Jul 2010 - 5:30 pm | Nile

हा काळे गृहस्थ जगाच्या पन्नास वर्षे मागे आहे. ३ फुट बाय १५ फुटांत गेली अनेक वर्षे दुकान चालवतो आहे. पेनांची किंमत सर्वात जास्त २१ रु (की २३ रु?) दुकानदाराने प्रगती करावी. नफा कमवावा वगैरे यांच्या गावीही नसावे.

मजा घ्यायची असेल तर यांच्या दुकानात जाउन त्यांच्या निबाबद्दल चार शब्द बोलुन पहा. ;) बाकी निबची पाच वर्षांची(??) ग्यारंटी देणारा जगातील एकमेव मनुष्य हाच असावा.

हे आमचे काळे, ह्यांच्या पेनांवर आमचा लै जीव म्हणुन आम्ही अजुनही जातो. आमचे संवाद रंगतात. आम्ही पेन आणि३.५० रुपड्यांची शाई घरी घेउन येतो. (लगेच पेनाला कॅमलिनचं निब लावतो हे कशाला सांगा?) (बाकी कॅमलिनवाले पण मराठीच नाही का मंडळी? पण पुण्याचे नसावेत! ;) )

-Nile

शिल्पा ब's picture

13 Jul 2010 - 10:54 pm | शिल्पा ब

असू द्या हो...माणूस एकदम मोकळ्या मनाचा वाटला...आणि उगाच महागडी पेनं घेऊन काय करायचं ? लिहायचच ना? त्यांनी आपला सर्वसाधारण लोकांना आणि विद्यार्थ्यांना परवडेल अश्या किमती ठेवल्यात. त्याचं पेन मी अजूनही वापरते...दर्जा चांगला आहे...फक्त त्यांनी थोडे box वगैरे ठेवावं म्हणजे शाई घेऊन प्रवास करायला सोपे..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मैत्र's picture

14 Jul 2010 - 2:28 pm | मैत्र

पेन्स चांगली आहेत पण त्यांची शाई त्याहून उत्तम आहे.
ते अजून छोट्या प्लॅस्टिक पिशवीतून शाई विकतात का?
काही केल्या कुठल्याही प्रकारची बाटली देत नाहीत...

हीरो किंवा तत्सम पेन घेऊन त्याला काळेंकडून निब लावायचं आणि त्यांची अशी ब्राईट निळ्या रंगाची शाई.. मस्त एकदम.
कॅमल, चेलपार्क पेक्षा खूप चांगली असते.

कॅमलिन वाले दांडेकर - मुंबई.

वाचक's picture

13 Jul 2010 - 9:44 am | वाचक

पटतात का पहा

इथे लहान मुलांचे केस कापायचे दुकान आहे.. तो मालक तर खास पुण्यावरूनच ट्रेनिंग घेऊन आला असावा.. दुकान उघडतं १० वाजता, बंद होतं ५ वाजता आणि १२ ते २ लंच टाईम. हे दुकानदार एका अमेरिकनाचं आहे (हं. घाला काथ्याकूट. अमेरिकन शब्दाची व्याख्या काय म्हणून..)

लहान मुले सकाळी फार लवकर उठत नाहीत आणि उठलीच तरी ब्रेकफास्ट वगैरे असतो. १२-२ बर्‍याच ठिकाणी, बर्‍याच मुलांच्या नॅपची (वामकुक्षीची) वेळ असते. नंतर (अमेरिकन घरात तरी) साधारण ६:०० - ६:३० पर्यंत डिनर ची वेळ होते, अशा सर्व कारणांमुळे त्या दुकानाची वेळ तशी असू शकेल.

'स्निप इट्स' नावाचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे लहान मुलांचे केस कापण्याचे, त्याच्या ३ प्रातिनिधिक गावातल्या वेळा अशा आहेत:
http://www.snipits.com/locations/StoreLocations.cfm

ईस्ट कोस्टः
Monday-Friday: 10:00 AM to 6:00 PM
Saturday: 9:00 AM to 6:00 PM
Sunday: 10:00 AM to 5:00 PM

मिड वेस्ट
Monday-Friday: 10am to 6:30pm
Saturday: 9am to 5pm
Sunday: 11am to 4pm

वेस्ट कोस्ट
Mon-Fri: 10:00am to 6:00pm
Sat: 9:00am to 6:00pm
Sun: 10:00am to 5:00pm

एक's picture

13 Jul 2010 - 10:03 pm | एक

दोघांनाही एकदमच उत्तर देतो...

केस कापण्याच्या दुकानाच्या वेळांबद्द्ल किंवा वॉलमार्टमधे प्लॅस्टीकच्या पिशव्या न मिळण्याबद्दल मी कुठेच तक्रार केलेली नाही आणि करतही नाही आहे.
प्रत्येक दुकानदार त्याच्या पॉलिसीज ठरवत असतो.

आक्षेप आहे तो हा की हेच मुद्दे पुन्हा पुन्हा उकरून असे लेख लिहिले जातात.
ग्राहकसेवा नीट न देणं, दुपारी दुकान बंद न ठेवणं ही काही मराठी पुणेकर दुकानदारांची मक्तेदारी नाही आहे. हे दाखवण्यासाठी मी वरील उदाहरणे दिली.
लेखकाने "एक अनुभव" असं काहीतरी टायटल देऊन लेख लिहिला असता तर वाचून सोडून दिला असता (किंवा वाचलापन नसता) पण एक वाईट अनुभवा आलातर लगेच टाहो फोडून जेनेरीक स्टेटमेंट करत लेख लिहिण्याला आक्षेप आहे.

परवाच मी फ्राईज मधे मी टेलिस्कोप परत केला (फ्राईजमधे मी टेलिस्कोप घेतला ही पहिली चूक.. पण भयंकर स्वस्त होता.. :)) टेलिस्स्कोप चक्क मोडला होता. त्या बाईने माझ्या समोर त्या पॅकिंगवर कमी किमतीचं लेबल लाऊन परत शेल्फ वर नेला. मला तो स्वस्त का मिळाला याचं कारण तिथेच कळालं.

शिल्पा, सडकी ग्रोसरी (खासकरून कांदे किंवा आउटडेटेद दूध) हवी असेल तर "ईंडिया कॅश कॅरी" भारत बाजार, सनीवेल..ला जरूर भेट द्या..मी कालच जाऊन आलो आहे.

शिल्पा ब's picture

13 Jul 2010 - 10:59 pm | शिल्पा ब

मी तिथेच खरेदी करते...कांदे कधी कधी चांगले नसतात पण बहुतेक माल चांगला असतो...दुध मी ट्रेडर जो मधून घेते...पण माल इतर अमेरिकन दुकानापेक्षा स्वस्त असतो ...इतर सुपर मार्केटात त्याच वस्तूंच्या किमती तिप्पट तरी असतात...ट्रेडर जो हा एक अपवाद...भाज्या आणि कांदे बटाटे तिथेही खूपच महाग (overpriced ) असतात.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2010 - 8:59 am | प्रकाश घाटपांडे

सारख्या सारख्या तक्रारी नाही करू माणसाने!

चांगल्या ग्राहक सेवेची अपेक्षा करणे याला तक्रारी म्हणणे मला तरी संयुक्तिक वाटत नाही. जागरुक व संवेदनशील नागरिकाला 'कटकट्या' व 'तक्रारखोर' अशी विशेषणे नेहमीच लावली जातात. पण हेच लोक समाजात दबाव गट तयार करुन समाजपरिवर्तनास कारणीभुत ठरत असतात. पुणेरी अशा नावाखाली असलेली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न आपल्याला अनुकुल असला कि त्याला ' पुणेरी बाणा' "पुणेरी जाज्वल्य अभिमान' वगैरे म्हणुन पुणे तिथे काय उणे? वगैरे शब्दांची दर्पोक्ति करायची. जेव्हा अशी प्रतिमा प्रतिकुल असेल त्यावेळी एका पुणेरी नागरिकाचे वर्तन म्हणजे समस्त पुणेकारांचे प्रातिनिधिक नव्हे असे म्हणायचे.तरी देखील माणसाचे वैशिष्ट्य हे जेव्हा एखाद्या समुहात अधिकाधिक दिसायला लागते त्यावेळी ते त्या समुहाचे वैशिष्ट्य म्हणुन ओळखले जाउ लागते.
गांधी हत्या करणार नथुराम गोडसे पुणेकर होता म्हणुन आख्खे पुणे गांधी विरुद्ध होते काय? नथुराम ब्राह्मण होता म्हणुन समस्त ब्राह्मण समाज हा गांधी विरोधी होता काय? पण गांधी हत्ये नंतर काही ब्राह्मणांची घरे जाळली गेली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काही शीखांची हानी झाली.
वरील लेखातील अनुभव हा पुण्यात आल्याने त्याला पुणेरी म्हटले आहे इतकच. या लेखानिमित्त समस्त पुस्तकप्रेमी ग्राहकांना उत्तम ग्राहक सेवा कशी देता येईल अशा दृष्टीने चर्चा झाल्यास ती उपयुक्त ठरेल.

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सहज's picture

13 Jul 2010 - 7:11 am | सहज

पत्रीकेतले ग्रह किंवा सरासरीचा खेळ (काहींना चांगला तर काहींना उलट अनुभव) इ. इ. इ. कारणे पटत नसतील तर...

वरच्या उदाहरणात जेव्हा तो सेल्समन आला तेव्हा चांगला/बरा अनुभव यायला सुरवात झाली. इतके तर स्पष्ट व्हावे.

आता त्याने १० % डिस्काउंट दिले अमुकने १५% व न पटणारी कारणे ..
पण अमुकने १५% म्हणेज याने जास्त किंवा तेवढेच द्यायलाच हवे हे न पटण्यासारखे. त्याची कारणे तुम्हाला पटण्यासारखीच पाहीजे हेही न पटण्यासारखे. तुमच्याकडे पुस्तके न घेण्याचा पर्याय होता. हा भ्रष्ट व भ्रमिष्ट उमेदवार आहे पण मी शेवटी त्यालाच मत देउन आलो. असेच काहीसे वाटले.

त्या वयस्क माणसाने तुम्हाला पटेल अशी सेवा दिली नाही. पण त्यामागे इतरही काही कारण असु शकेल. पण हा "पुणेरी, मराठी" उल्लेख स्टिरीओटाइप आहे असेच वाटते. जगभर सेवा दर्जा वाईट आहे असे अनुभव वाचनात, ऐकण्यात येत असतात. अनुभव अत्यंत चांगला पण एखादी गोष्ट महाग पडली असेही लोकांचे अनुभव ऐकून कधी कधी लक्षात येते. असो जर तो सेल्समन दुकानात तुम्ही गेल्या गेल्या समोर असता तर हा लेख आला असता का याबद्दल साशंक आहे.

एक सांगतो अस्सल पुणेकराला कोणत्या दुकानात कोणाकडे, काय व किती प्रश्न विचारायचे हे बरोबर कळते, बाहेरगावच्यांना ते कळत नसल्याने काहीवेळा प्रश्नातुन प्रश्न उभे रहातात.

तुमच्यावर बेतलेल्या ह्या कठीण प्रसंगातुन तुम्ही सुखरुप बाहेर पडाल असा विश्वास आहे. ही कडवट आठवण लवकर विस्मरणात जावो.

(कधी कधी जाज्वल्य अभिमानी )
सहज

छोटा डॉन's picture

13 Jul 2010 - 8:14 am | छोटा डॉन

>>एक सांगतो अस्सल पुणेकराला कोणत्या दुकानात कोणाकडे, काय व किती प्रश्न विचारायचे हे बरोबर कळते, बाहेरगावच्यांना ते कळत नसल्याने काहीवेळा प्रश्नातुन प्रश्न उभे रहातात.

=))
हा हा हा, खरोखर ह्या मुद्द्याची नोंद घेण्यासारखी आहे.
ह्यावरही बर्‍याच बाबी अवलंबुन असतात ;)

------
छोटा डॉन

राघव's picture

13 Jul 2010 - 2:04 pm | राघव

सहजकाका, लय भारी बोललात.
पुस्तक घेण्याचा माझा अनुभव तरी चांगलाय रसिक मधला.

राजेशशेठ,
वर उल्लेख आलेली काही खास दुकाने चांगली आहेत. बर्‍यापैकी पुस्तके मिळतात. इतर ठिकाणी जास्त अपेक्षा ठेवून आपण गेलो नाही तर त्रास नक्की वाचेल! :)
बाकी तुमचा पुस्तकं घेण्याचा अनुभव बराच दिसतो. तुम्ही देखील अगदी खास चिवटपणे प्रश्न विचारलेत!! :D

राघव

सन्जोप राव's picture

13 Jul 2010 - 7:10 am | सन्जोप राव

गेल्या वर्षी 'सकाळ' मध्ये उत्कर्ष पुस्तकालयावरुन असाच वाद झाला होता. हा प्रश्न फक्त पुणेरी पुस्तकविक्रेत्यांचा आहे, असे वाटत नाही. योग्य दाम घेऊन व्यावसायिक (प्रोफेशनल या अर्थी) सेवा द्यावी हा विचारच मनात न येणे हे यामागचे मूळ असावे. माझ्या विद्यार्थ्यांना मी घसा फुटेपर्यंत 'कस्टमर फोकस' यावर पोटतिडिकेने सांगत असतो. त्यांचे मख्ख चेहरे हे उद्याचे पालथे घडे आहेत असे वाटू लागले आहे.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने
शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

विजुभाऊ's picture

13 Jul 2010 - 10:59 am | विजुभाऊ

माझ्या विद्यार्थ्यांना मी घसा फुटेपर्यंत 'कस्टमर फोकस' यावर पोटतिडिकेने सांगत असतो. त्यांचे मख्ख चेहरे हे उद्याचे पालथे घडे आहेत असे वाटू लागले आहे.

असु शकते.....
रजनीशांच्या व्याख्यानाला ( कॉलेजमधील लेक्चर्स ना) विद्यार्थ्यांची अलोट गर्दी असे.
प्रा शिवाजीराव भोसल्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांची गर्दी असायची.
उत्तम बोलणार्‍यांच्या उत्तम ज्ञान देणार्‍या वक्त्यांच्या व्याख्यानाला
( लेक्चर्स ला ) विद्यार्थी नेहमीच उत्तम प्रतिसाद देतातच.
कस्टमर फोकस ही पोटतिडीकीने सांगण्याची गोष्ट नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे.
गेली पन्नास वर्षे अव्याहत चालणारे " सदाशिव पेठेतील" बादशाही बोर्डिंग" हे कस्टमर फोकस चे उत्तम उदाहरण. तेथील पदार्थाची क्वालिटी ही आजही त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वाची आहे.
त्यांचा जो कस्टमर आहे त्याच्या गरजांवर त्यानी उत्तम फोकस ठेवून व्यवसाय टिकवला आहे. ( एकाची दोन हाटेले का केली नाहीत? पंजाबी , चायनीज पदार्थ का ठेवले नाहीत हे प्रश्न गौण ठरतात कारण त्याना त्यांचे कस्टमर कोण आहेत ते नीट माहीत आहे. त्यांच्या गरजा माहीत आहेत आणि त्या गरजाना ते रोज उत्तम पद्धतीने सामोरे जातात( पूर्ण करतात). कस्टमर फोकस मध्ये महत्वाची कॉन्सेप्ट आहे knowing the customer त्या बाबतीत बादशाही बोर्डिंगवाल्याना मानलेच पाहिजे

विंजिनेर's picture

13 Jul 2010 - 11:04 am | विंजिनेर

कस्टमर फोकस मध्ये महत्वाची कॉन्सेप्ट आहे knowing the customer त्या बाबतीत बादशाही बोर्डिंगवाल्याना मानलेच पाहिजे

आमेन. मग ते भले "पानातली भाजी संपवा, कुठली भाजी आहे ते विचारू नका, ताक एक्स्ट्रा मिळणार नाही..." अशा पाट्या बाहेर लावत असले तरी..

विजुभाऊ's picture

13 Jul 2010 - 3:11 pm | विजुभाऊ

"पानातली भाजी संपवा, कुठली भाजी आहे ते विचारू नका, ताक एक्स्ट्रा मिळणार नाही..." अशा पाट्या बाहेर लावत असले तरी..

विंजीनेर साहेब तेथले बोर्ड जर नीट वाचले तर कुठेही "ताक एक्स्ट्रा मिळणार नाही" असे लिहिलेले नाही उलट ताक कितिही मागितले तरी न कुरकुरता दिले जाते हा अनुभव आहे
पानातली भाजी संपवा, ती पाटी "पानात भाजी टाकू नका" अशी आहे. अन्न वाया घालवू नका असे सांगितले तर त्यात वाईट काय आहे? आपल्याला घरी आई असे म्हणत नाही का?

कुठली भाजी आहे ते विचारू नका,
ही पाटी " जेवणात कोणती भाजी आहे ते अगोदर विचारूनच मग ऑर्डर द्या" अशी आहे. न आवडणारी भाजी असेल तर उगाच वाद नकोत म्हणून ही सोय कस्टमरला दिलेली आहे.
( कधीतरी ५ स्टार हॉटेल मध्ये न आवडलेली भाजी केवळ आवडली नाही या कारणास्तव परत करून पाहिलीय का?)
एखादी खानावळ शुद्ध खानावळ या स्वरुपातच इतर अनेक ऑप्शन्स उपलब्ध असतानाही गळेकापू काँपिटीशनच्या युगातही पन्नास वर्षे उत्तम चालत असेल तर त्या मागे क्वालिटी आणि कस्टमर फोकस शिवाय इतर दैवी हात आहे असे का तुम्हाला म्हणायचे आहे?
चांगल्याला चांगले म्हणायचेच नाही तर का ?

विंजिनेर's picture

13 Jul 2010 - 6:20 pm | विंजिनेर

चांगल्याला चांगले म्हणायचेच नाही तर का ?

तेच हो. तेच म्हणाय्चेय आम्हाला. अंमळ सदाशिवपेठी ष्टाईलने कौतूक करून पाहिले.

:)

Nile's picture

14 Jul 2010 - 5:49 am | Nile

=)) =)) =))

काय इनोदी लिवुन राह्यले!

-Nile

आनंदयात्री's picture

16 Jul 2010 - 10:33 am | आनंदयात्री

विंजिनेर साहेब ताक अनलिमिटेड असते आणि भाजी कोणती आहे ते अजुनही पाटीवर लिहुन टेबलावर समोरच ठेवलेले असते. तुम्ही पैसे काढायच्या आधीच एकदा ते पाटीकडे बोट करतात.

शुचि's picture

14 Jul 2010 - 12:34 am | शुचि

सन्जोप राव प्रत्येक व्यवसायाचे काही चॅलेंजेस असतात, ते चॅलेंजेस पार पाडायच्या युक्त्या असतात. कदाचित "मातीच्या आकारहीन गोळ्यांना आकार देणे" हे आपल्या व्यवसायातील चॅलेंज असावे. पण वरवर दिसत नसलं तरी आपल्या कष्टाचं नक्की चीज होत असणार. विद्यार्थी व्यक्त करू शकत नसतील पण त्यांच्या मनावर कुठेतरी आपल्या शिकवण्याचे संस्कार नक्की होत असतील. मला खात्री आहे. माझे प्राध्यापक मला अजूनही कृतज्ञतेनी आठवतात. ज्ञानदानासारखा पवित्र व्यवसाय नाही.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2010 - 7:57 am | प्रकाश घाटपांडे

पुस्तक खरेदीचा दै. सकाळ मुक्तपीठ मधील एक अनुभव वाचा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

यशोधरा's picture

13 Jul 2010 - 8:51 am | यशोधरा

पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकातल्या रसिक आणि उज्वल प्रकाशनाचे अनुभव खूपच चांगले आहेत. रसिक आणि उज्वलमध्ये बरीच ललितंवाली, कथा, कादंबर्‍या व इतर पुस्तके मिळतात. पुस्तक नसलं तर तुमचा नंबर घेऊन ही मंडळी तुम्हाला फोन करुन पुस्तक आल्यावर सांगतात. मला तरी ह्या दुकानांत कधीच वाईट अनुभव आले नाहीत.

रसिकची मेंबरशिप घेतलीत तर पुस्तक खरेदीवर २०% सूट असते. उज्वलवाले सूट देत नाहीत.

अप्पा बळवंत चौकातील पुस्तकांच्या इतर दुकानांमधूनही मी फिरले आहे, पण असा अनुभव मला कधीच आलेला नाही.

धमाल मुलगा's picture

14 Jul 2010 - 8:43 pm | धमाल मुलगा

यशोधराच्या सल्ल्याने एकदा दगडुशेठ गणपतीसमोरच्या नेर्लेकरांकडे काही पुस्तकं घ्यायला गेलो. श्री. व सौ.नेर्लेकर दोघेही मोठे भले. माझ्याकडे लेखकाचे नाव आणि पुस्तकाचे नाव हे 'अमुक तमुक असेच कायसे' अशा छापातले होते, पण दोघांनी विवेकानंदांवरची असलेली सगळी पुस्तकं समोर मांडली...मी पुस्तकं चाळेपर्यंत इतर ग्राहकांकडे लक्ष देता देता आमच्या मातोश्रींशी थोड्याबहुत गप्पाही मारत होते. नंतर आमच्याही जवळपास पंधरावीस मिनिटं गप्पा झाल्या. (पेठेतला पुणेकर दुकानदारही आणि इतका अगत्यशील, गप्पिष्ट असतो!)
शेवटी दुकानातुन निघताना दिडेकशे रुपयांचं पुस्तक घ्यायला गेलेला मी, काहीतरी साडेआठ-नऊशे रुपयांची खरेदी करुन बाहेर पडलो.
अगदी बाहेरपडतानाही "पुढच्या महिन्यात या हो देशमुख, कठोपनिषद आणि शांकरभाष्य आणुन ठेवतो."
आता बोला.

प्रभो's picture

14 Jul 2010 - 8:47 pm | प्रभो

हाहाहा....नेर्लेकर आमच्या मावसबहिणीचे सासर... :)

मनिष's picture

14 Jul 2010 - 9:10 pm | मनिष

च्यायला, धम्याचा स्वभावच असा आहे की त्याच्याशी खडूसपणे वागणारा अजून जन्मायचा आहे! :)

- (जगन्मित्र धम्याचा एक (दुरचा ;)) मित्र) मनिष

प्रकाश घाटपांडे's picture

15 Jul 2010 - 10:48 am | प्रकाश घाटपांडे

अगदी सहमत आहे. धम्या लेका तु आता परेशकडे जाउन पुस्तके घे एकदा.
साला या धम्यावर चिडताच येत नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

धमाल मुलगा's picture

15 Jul 2010 - 3:54 pm | धमाल मुलगा

कसचं कसचं! एव्हढं कौतुक ऐकायची सवय नाही बॉ आपल्याला. :)

>>धम्या लेका तु आता परेशकडे जाउन पुस्तके घे एकदा.
:? च्यालेंज स्विकारावं काय? (पण ते काका वास्सकन अंगावर आले तर काय राहिल अब्रु? :D )

>>(जगन्मित्र धम्याचा एक (दुरचा Wink) मित्र) मनिष
का बे? दुरचा वगैरे काय हे? :)

यशोधरा's picture

15 Jul 2010 - 4:02 pm | यशोधरा

पुण्यातले दुकानदार पुण्यातल्याच गिर्‍हाईकाशी व्यवस्थित वागतात बहुतेक. ;)
सहसा पुण्याबाहेरचेच लोक पुण्यातले लोक व इतर व्यवस्थेला नावं ठेवतात ह्यावरुनच बघ की! त्यामुळे तुला नको काळजी ;)

मनिष's picture

15 Jul 2010 - 4:04 pm | मनिष

कारण बर्‍याच दिवसात भेटला नाही ना बे...!! आणि तुम्ही लोकं भेट्ला तर फोन टाकत नाही मला! ;)
(असो फार अवांतर नको इथे)

Nile's picture

16 Jul 2010 - 12:40 am | Nile

धम्या दिसतोच कीती लहान अन वेंधळा, त्याच्यावर कोण चिडणार? उगाच नाय त्याला पुण्यात डिंगोलाला म्हणत. काय पन बोलतात राव. हो की नाही रे धम्या डींगो?? =))

-Nile

राजेश घासकडवी's picture

16 Jul 2010 - 12:48 am | राजेश घासकडवी

च्यालेंज स्विकारावं काय? (पण ते काका वास्सकन अंगावर आले तर काय राहिल अब्रु? )

धम्या, अरे तू पुणेकर ना? मग तुला कसली भीती?

मन सुद्द तुझं गोस्ट हाये प्रिथिवीमोलाची
तू चल रं फुडं तुला रं गड्या भीती कशाची?
'परा' बी कुनाची?

विनायक पाचलग's picture

13 Jul 2010 - 8:57 am | विनायक पाचलग

हम्म ..
पुणेकरच ते ..
काय बोलणार ..
कोल्हापुरात एक अक्षर म्हणुन दुकान आहे ..
प्रचंड मोठे .. हवे तेवढा वेळ फिरा ,पुस्तके चाळा ,वाचा ..
कोणी बोलत नाही .
उलट तुम्हालाच मदत करतात ..
एखादे पुस्तक नसेल तर तिथल्या तिथे फोन लाऊन ऑर्डर देतात.. आणि पुस्तक आल्यावर तुम्हाला फोन करतात ..
शिवाय काही ग्राहकाभिमुक योजना व कार्यक्रम आहेतच ...
त्यामुळे मी तरी तेहुनच पुस्तके खरेदी करतो ...

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

जृंभणश्वान's picture

13 Jul 2010 - 9:12 am | जृंभणश्वान

पॉप्युलर, इंटरनॅशनलमधेही आरामात पुस्तके चाळू/वाचू शकता. पॉप्युलरमधली विक्रेतेमंडळी तुमच्याशी साहित्यिक चर्चाही करतात.
(मला विशेष जाण नसल्याने मी करत नाही पण इतरांशी ते जी चर्चा करतात ती विनामोबदला ऐकता येते, मधेच मत दिले तरी चालते.)

अ.ब. चौक हे पुस्तके चाळण्याचे ठिकाण नव्हे. तिथे पुस्तके चाळत/वाचत बसल्यास काही दुकानदार कानाडोळा करतात परंतु अशा वागण्यामुळे इंजिनीअरींग, मेडीकल, सेवापरीक्षेची पुस्तके विकत घेण्यास आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आणि पर्यायाने समाजाचे नुकसान होते.
खेरीज गाड्या जास्तवेळ पार्किंगमधे राहिल्याने इतर लोकांना जागा शोधत वणवण फिरावे लागते.

Nile's picture

13 Jul 2010 - 9:30 am | Nile

=)) =))

यॉडाँचे स्वागत आहे.

बाकी पुणेरी लोकांचा उफाळलेला जाज्वल्ल्य अभिमान पाहुन माझे साहित्यावरचे प्रेम दुणावले! ;)

-Nile

यशोधरा's picture

13 Jul 2010 - 10:45 am | यशोधरा

>>इतरांशी ते जी चर्चा करतात ती विनामोबदला ऐकता येते, मधेच मत दिले तरी चालते >> सर्वचर्चासमभाव :D

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jul 2010 - 11:46 am | परिकथेतील राजकुमार

हम्म ..
पुणेकरच ते ..
काय बोलणार ..

किती वेळा आपण निदान पुण्यात पाय तरी ठेवला आहात ? पुस्तक खरेदी दुरच राहिली :) उगा काहीही बडबड करायची का ?

कोल्हापुरात एक अक्षर म्हणुन दुकान आहे ..

हो तेवढे एकच दुकान आहे, मग ? बाकी कोल्हापुरात एका दुकानदाराने मला रेनॉल्डसच्या रिफिली पार्कर कंपनी बनवते म्हणुन सांगीतले होते. असो..

लेखकाने ह्या लेखात 'पुणेरी' हा शब्द काहीसा आकसाने वापरला आहे का ? खुद्द लेखक हे भारतभ्रमण केलेल असुन त्यांनी भारताच्या कानकोपर्‍यातुन पुस्तके खरेदी केली असुन, वाईट अनुभव मात्र फक्त त्यांना पुण्यातच आला अशा थाटातला हा लेख वाटतो.

पार्किंग आणि पुस्तक खरेदी ह्याचा बादरायण संबंध देखील जोडता न आल्याने त्याबद्दल अधिक माहिती जाणुन घ्यायला आवडेल. एकतर आपल्याकडे कायमच पार्किंगची बोंब असते हे महिती असताना कुठेही जायच्या आहे तिथे व्यवस्थीत पार्किंगची सोय कुठे आहे ? नसल्यास जवळच्या एखादे ठिकाणी वाहनतळ आहे का ? ह्याची चौकशी करुन जाणे ह्यास सुज्ञपणा म्हणतात. (आधिक माहितीसाठी :- अप्पा बळवंत चौकाच्या जवळ गेल्या २ वर्षापासून मिनर्व्हा व मंडई अशी दुमजली व तीनमजली पार्किंगची सोय चालु आहे. अगदीच गरज पडल्यास शनिवार वाड्यपाशी देखील पार्किंग होऊ शकते)

आपण दुकानात येउन दुकानदारावर उपकार केल्याचा आव आणली की पुणेरी दुकानदार तुम्हाला सेकंदात आकाशातुन जमिनीवर आणतोच आणतो.

पुणेरी दुकानदार
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Jul 2010 - 11:51 am | llपुण्याचे पेशवेll

आपण दुकानात येउन दुकानदारावर उपकार केल्याचा आव आणली की पुणेरी दुकानदार तुम्हाला सेकंदात आकाशातुन जमिनीवर आणतोच आणतो.

+१ . म्हणूनच जशास तसे वगैरेचा प्रतिसाद दिला आहे वर.
म्हणूनच पुष्करीणीताईंना चांगला अनुभव आला असावा.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

जृंभणश्वान's picture

13 Jul 2010 - 9:02 am | जृंभणश्वान

पाऊण तास गाडीतून फिरून त्याला पार्किंग सापडलं नाही.

कायदेशीर -
नारायण पेठेत भानुविलासच्या मागच्या छोट्या मैदानात चारचाकी पार्किंग आहे, तिथून अ.ब.चौ. चालत दहा मिनीटात.
*दोन वर्षापूर्वी तिथे पार्किंग होतं. ते पार्किंग बंद होउन नवीन इमारत झाली असल्यास आमची जबाबदारी नाही.

बेकायदेशीर-
मुंजाबाचा बोळ ओस पडला असतो, तिथेपण पार्क करता येईल, पोलिसांनी जॅमर लावला तरी शंभरएक रुपयात ऐकतात.

महेश हतोळकर's picture

13 Jul 2010 - 10:27 am | महेश हतोळकर

आजून एक जागा. महात्मा फुले मंडईच्या जवळ दोन multi level parking lots आहेत. गाडी लावा तासाचे ५ रु. गाडी लावा आणि निवांत अप्पा बळवंत चौकात जा. अर्धांगाला पुस्तक खरेदीत रस नसेल तरी काळजी नाही. वाटेत तुळशी बाग आहे.

गाडी लावताना, उंबर्‍या गणपती चौकातून नारायण पेठेकडे येऊन, पहिल्या उजव्या बोळात (मुंजाबाच्या बोळाच्या बरोबर समोर - म्हणजे बेडेकर मिसळीकडे डावीकडे न वळता, उजवीकडे)
हमाल वाडा म्हणायचे त्याला पूर्वी.

इथे मनपाचे पार्किंग आहे. गाडी मोठी असेल तर वळवायला जरा त्रास होतो. पण तरी ठीक आहे. पुणे मराठी ग्रंथालया शेजारून चालत बाहेर पडले तर अ. ब. चौक जास्त दूर नाही.

पांथस्थ's picture

14 Jul 2010 - 8:26 pm | पांथस्थ

आणि या ठिकाणी गाडी लावायला आलाच तर लगे हाथ बेडेकर मधे मिसळ खाउन यावी. पोट भरलेले असेल तर चिडचिड कमी होते :)

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2010 - 9:21 am | प्रकाश घाटपांडे

पुण्यात शनिवार पेठ पोलिस चौकी समोर साधना ट्रस्ट चे साधना मिडिया सेंटर, फोन नं २४४५९६३५ येथे उत्तम ग्रंथ दालन आहे. वर्गवारी केलेले ग्रंथांच रॅक्स आहेत. उभे राहुन पाय दुखायला लागल्यावर बसायला स्टुल्स आहेत,स्टुलवर बसुन पुस्तके चाळता येतात. प्यायला पाण्याची सोय आहे, टॉयलेट आहे. चारचाकी पार्किंग साठी जवळच नदी किनारी कायदेशीर सोय आहे. तशी पाटी पण मिडिया सेंटरच्या दाराशी आहे. दुचाकी पार्किंग तिथेच कंपाउंड मधे सोय आहे. पुस्तक सुची आहे. संगणक आहे. त्यावर आपण पाहु शकतो पुस्तके. नसलेली पुस्तक आपणासाठी आणून ठेवली जातात व फोन केला जातो. साप्ताहिक सुटी बुधवारी असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सुखदा राव's picture

13 Jul 2010 - 12:17 pm | सुखदा राव

फक्त तिथुन आणलेल्या सीडी तुटक्या किन्वा खराब असतात. आणि ३०० ची पुस्तक घेतली तरी २ रुपयाचा गिफ्ट पेपर देण आम्हाला परवडत नाही अस ते पुणेरी स्पश्टवक्तेपणाने सान्गतात. बाकी पॉप्युलर, इन्टरनॅशल, क्रॉसवर्ड आणि पाथफाइन्डर हे चान्गलेच.

पांथस्थ's picture

13 Jul 2010 - 9:32 am | पांथस्थ

मी शक्यतो रसिक, पाथफाईंडर आणि पाटिल एंटरप्राईझ इथेच खरेदि करतो.

रसिक कडुन दर वर्षी पुस्तके घेतो त्यांमुळे २०% सुट देतो. पाटिल वाले २०-३०% सुट देतात. पाथफाईंडर वाला कधीकधी १०% सुट देतो (हे सगळे कॅश मधे - कार्ड असेल तर थोडि कमी सुट मिळते)

पुढच्या वेळी पाटिल कडे जाउन बघा - व्हिनस आणि हिंद लॉ च्या मधल्या बोळातुन आत जायचे. दुसर्‍या का तिसर्‍या मजल्यावर आहे. दुकान वातानुकुलीत आहे. निवांत पुस्तके बघता येतात.

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

सागर's picture

13 Jul 2010 - 11:32 am | सागर

रसिक कडुन दर वर्षी पुस्तके घेतो त्यांमुळे २०% सुट देतो.

असेच म्हणतो. रसिक साहित्यवाले नियमित पुस्तके घेणार्‍या किंवा तसा आव आणला तरीही कस्टमरला १५-२० टक्के डिस्काऊंट देतात. मी रसिकमधे नाहितर टिळक रस्त्यावर (सारसबागेच्या जवळ) अत्रे सभागृहात जेव्हा जेव्हा पुस्तकप्रदर्शन असते ( ते बर्‍याच वेळा असते) तेथून खरेदी करतो.
अर्थात हे मी पुण्यात असतो तेव्हाची गोष्ट...
इतर वेळी ऑनलाईन खरेदी :) ई-रसिक.कॉम, मेहतापब्लिशिंगहाऊस.कॉम या संकेतस्थळांवर.
अलिकडेच मीमराठी संकेतस्थळावर ई-खरेदी विभाग सुरु झाला आहे. त्यात ५० रु. डिल मधे मोठी महागडी पुस्तके थोडीशी वापरलेली पण सगळी पाने असलेली स्वस्तात मिळतात. आणि खरेदीचा अनुभव पण सुंदर आहे आणि संकेतस्थळाचे व्यवस्थापक योग्य तो डिस्काऊंटही देतात. त्यामुळे यापुढची ऑनलाईन खरेदी मीमराठीवरच :)

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Jul 2010 - 11:54 am | llपुण्याचे पेशवेll

मी मराठीवरची ५०रु वाली योजना खासच. आवडेश. ऑनलाईन खरेदीसाठी चांगला पर्याय आहे मीमराठीचा.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

अवलिया's picture

13 Jul 2010 - 1:41 pm | अवलिया

मी हल्ली मीमराठीवरुनच खरेदी करतो. योग्य सवलत, पुस्तकाची सर्व पाने नीट आहेत याची आधीच खात्री करुन मगच राजे पुस्तक पाठवतो. मस्त सेवा आहे.

--अवलिया

पांथस्थ's picture

13 Jul 2010 - 1:43 pm | पांथस्थ

च्यामारि इतके चांगले अनुभव, मीमराठी ची सेवा वापरुन बघायला हवी!

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

अवलिया's picture

13 Jul 2010 - 2:57 pm | अवलिया

आणि हो, राजे पुण्यातुनच पुस्तकं विकतो आणि तो मराठीच आहे.

--अवलिया

Nile's picture

14 Jul 2010 - 12:43 am | Nile

राजे पुणेरी नाही, तस्मात चुकिचे टाचण देत आहे.

हा प्रतिसाद तरी धोरणात का बसत नाही कुणास ठावुक?

-Nile

यशोधरा's picture

14 Jul 2010 - 8:46 pm | यशोधरा

पाटील एंटरप्राईझ कुठे आलं?

पांथस्थ's picture

15 Jul 2010 - 8:50 am | पांथस्थ

रसिक च्या समोरच्या बाजुला जी इमारत आहे तिथे २र्‍या का ३ र्‍या मजल्यावर आहे. हिंद लॉ आणि व्हिनस च्या मधे जो बोळ आहे तिथुन आत जायचे उजव्या हाताला अतिशय अरुंद असा जिना आहे, तिथुन वर जायचे.

पाटिल एंटरप्राईझ माझ्या मते दुकाने, वाचनालय ह्यांना पुरवठा करतात त्यामुळे ग्राहकांना हे दुकान विशेष ठाउक नाही. दुकान छोटे आहे पण गर्दी नसते आणि दुकानाची रचना अशी आहे की सगळ्या कप्प्यांमधली पुस्तके चाळता येतात.

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

राजेशजी,
तुमच्या दुकानाच्या वर्णानुसार तुमचा अनुभव "परेश एजन्सी" या दुकानातील असावा. थोडाफार असाच अनुभव मला ४/५ दिवसांपुर्वीच ह्याच दुकानात आला. मी शाळा, इफ टुमारो कम्स(अनुवादीत), महाराष्ट्र देशा, मुखवटा, अश्या एकूण ९६० रू. किमतीच्या पुस्तकांची खरेदी केली. तेच वयस्क, गोरेसे गृहस्थ तिथे होते. सेल्समन काही दिसला नाही. शेवटि बिलाच्या वेळी त्यांना सवलत विचारली ते म्हणाले १००० वर २०% व १०० वर १०% मी म्हणालो की ९६० तर बिल झालेच आहे. निदान १५% तरी द्या. तर मला अगदी मासलेवाईक उत्तर मिळाले की दुकानात तुम्ही साखरेची दाणा मागितलात की दुकानदार तुम्हाला आख्खाच दाणा देणार ना, तो अर्धा कसा काय करणार तसेच हे.
मी मात्र गरगरलो व त्यांना म्हणालो की तुमची पुस्तके तुम्हालाच लखलाभ व तिथून निघालो. हीच पुस्तके चौकातल्याच एका दुकानात मात्र २०% ने मिळाली व त्यातले 'इफ टुमारो कम्स' हे पुस्तक मात्र त्या दुकानात उपलब्ध नसल्याने दुकानदाराने ते परेश एजन्सीतूनच आणून दिले हे मात्र विशेष.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2010 - 9:45 am | प्रकाश घाटपांडे

याच परेश एजन्सी मधील एका मित्राचा अनुभव असाच आहे. अमुक अमुक पुस्तक आहे का ? त्यांनी नाही म्हणुन सांगितले "कुठे मिळेल ?" कुठेच नाही. आमच्याकडे नाही म्हण्ल्यावर कुठेच मिळणार नाही तुम्ही दुसरीकडे उकिरडे फुंकायला जाउच नका?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

घाटावरचे भट's picture

13 Jul 2010 - 2:41 pm | घाटावरचे भट

च्यामायला, परेशवाल्याबद्दलच ल्याहायचं होतं तर सरळ नाव घेऊन ल्याहायचं. उगाच सगळ्या पुणेरी दुकानदारांची बदनामी कशाला? परेशवाला म्हातारा अंमळ वे***च आहे, सगळ्या पुण्याला ठाऊक आहे. आणि परेशचं नाव घेऊन लिहिलं असतंत तरी, जो माणूस दुकानात कांप्युटर वापरत नाही, तो काय इथे वाचून तुमच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकेल असं वाटलं की काय?

बा.द.वे - परेशचा अजून एक अणुभव
मी यत्ता आठवीत होतो. मी आणि माझा मित्र दिलिप प्रभावळकरांची एक एकांकिका घ्यायला अप्पा बळवंतमधे गेलो. मी दुसर्‍या एका दुकानात आणि मित्र परेशकडे गेला. माझा मित्र विंग्रजी शाळेत शिकणारा, तो विचारायला आत गेला म्हणाला 'एक अंकी नाटक हवंय दिलिप प्रभावळकरांचं'
'असं काही नसतं. दुसरीकडे बघा' इति परेशचा म्हातारा
मित्र बाहेर येऊन म्हणाला अरे ते इकडे नाहीये म्हणतात.
मग मी आत गेलो म्हटलं 'काका तुमच्या दुकानाचं नाव ऐकून आम्ही आलो, दिलिप प्रभावळकरांची ती एकांकिका नाहीये का?'
'तुझा मित्र एक अंकी नाटक द्या म्हणाला. अशा अर्धवट माहिती असलेल्या लोकांना पुस्तकं विकायला आम्हाला वेळ नाही....'
आम्ही गार पडलो हे.वे.सां.न.ल.

मेघना भुस्कुटे's picture

14 Jul 2010 - 1:02 pm | मेघना भुस्कुटे

'तुझा मित्र एक अंकी नाटक द्या म्हणाला. अशा अर्धवट माहिती असलेल्या लोकांना पुस्तकं विकायला आम्हाला वेळ नाही....'
=))
=))
=))
=))
=))
=))
ज-ह-ब-ह-रा-हा-ट-ह.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jul 2010 - 10:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्याच्या गर्दीत स्कूटर चालवण्याची भीती वाटते आणि ही सगळी दुकानं चालत जाण्याच्या अंतराच्या बाहेर असल्यामुळे मी पुण्यात पुस्तकं विकत घेणं टाळते. ठाण्याच्या मॅजेस्टीकचा अनुभव चांगला आहे, पण गेल्याच वेळेस श्रावण मोडकांचं 'तिढा' मिळालं नाही आणि त्या लोकांनी तोंडाला अगदी पानं पुसली नाही तरी आस्थाही दाखवली नाही. त्यांनीही मला प्रकाशक कोण विचारलं पण येवढा माजोरीपणा नाही दाखवला.
तिथे सभासदत्व घेतल्याने १५-२०% डिस्काऊंट मिळतं, पण सध्या माझं कार्ड हरवलं आहे आणि पावतीही गायब आहे.

असाच काहीसा अनुभव मला बरेचदा (पुण्यात आणि ठाण्यातही) चपलांच्या दुकानातही आला आहे. अतिशय साधी, सॉफ्ट आणि बिनाहील्सची चप्पल शोधायला पूर्वी मला फार कष्ट झाले आहेत. डिझायनर, उंच टाचांची आणि कसलंही कुशनिंग नसणारी चप्पलच कशी चांगली (म्हणजे पॉप्युलर) हे मला अनेक सेल्समननी पटवण्याचा प्रयत्न केला. शेवटी माझ्या पायाच्या आकाराचे फ्लोटर्स बाजारात दिसायला लागले आणि माझ्या पायांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अदिती

स्वाती दिनेश's picture

13 Jul 2010 - 12:38 pm | स्वाती दिनेश

ठाण्यात पुस्तक खरेदी करताना मॅजेस्टिक, श्रीराम बुक डेपो आणि अक्षरधारा,ग्रंथाली किवा तत्सम पुस्तक प्रदर्शने यातून खरेदी करते(जी बरेचदा मे महिन्याच्या सुटीत किवा दिवाळीच्या सुटीत असतात पण आपल्याला पुस्तके हवीत तेव्हा प्रदर्शन असेलच ह्याची खात्री नसते. ) , आपल्याला हवी ती पुस्तके ह्या दोन्ही दुकानात बरेचदा मिळतात आणि तेथे नसली तर मागवून देण्याची तयारीही असते.
डिस्काऊंटही १०% तर मिळतोच, क्वचित १५% सुध्दा मिळतो.
स्वाती

महेश हतोळकर's picture

13 Jul 2010 - 10:34 am | महेश हतोळकर

रसीकचा अनुभव मलाही चांगला आला आहे. कोथरुडमध्येही पौड रोडला एक दुकान सापडले आहे. घरापासून जवळच असल्यामुळे चालतही जातो. आता वैयक्तीक ओळखही झाली आहे. पण आधीचा अनुभव चांगलाच आहे. फोन सुवीधा न मागता मिळाली.

केशवराव's picture

13 Jul 2010 - 11:49 am | केशवराव

पुणेकरांना झोडपणे ही फॅशनच झाली आहे. लेखात उल्लेखिलेले अनुभव थोद्या फार फ्ररकाने सगळीकडेच येतात. पण पुणेकरांना झोडपणे सोपे किंवा सेलेबल असते. ठोका लेको !

राजेश घासकडवी's picture

13 Jul 2010 - 11:53 am | राजेश घासकडवी

एकंदरीत या लेखाने पुणेकरांच्या भावना दुखावलेल्या दिसतात. तसं का व्हावं हे कळलं नाही. लेखात अनेक ठिकाणी हा अनुभव या विशिष्ट दुकानाचा, त्यातील विशिष्ट व्यक्तीचा व त्या विशिष्ट वेळेचा आहे हे नमूद केलं आहे. आधी चांगला अनुभव आला हेही म्हटलं आहे. 'असे अनुभव, असे दुकानदार प्रतिमा बिघडवतात' असं म्हटलेलं आहे. हे माझं आजचं उत्तर असंही लिहिलं आहे.

@ पंगा : "बाकी आधी नको तिथे जायचे, आणि मग वाईट अनुभव आला की समस्त पुणेकरांच्या नावाने खडे फोडायचे"

कृपया लेख पुन्हा वाचावा. समस्त पुणेकरांविषयी मी काही बोललो नाही. प्रतिमा तशी का व्हावी याबद्दलचा माझा एक अनुभव आहे. इतरांनी इतर चांगले/वाईट अनुभव लिहिले आहेत.

@ रेवती : "सारख्या सारख्या तक्रारी नाही करू माणसाने!"

पटलं. पण शुद्ध तक्रार स्वरूपाचं लेखन मी "सारखं सारखं" करतो असं वाटत नाही.

@ एक : "पण असे कित्येक अनुभव कॅलिफोर्निया मधे बे-एरिया मधे सुद्धा येतात त्यावर कधी लेख नाही आले?"

लेखनाला सुरुवात केल्यापासून नाही आलेले...

@ सहज : "एक सांगतो अस्सल पुणेकराला कोणत्या दुकानात कोणाकडे, काय व किती प्रश्न विचारायचे हे बरोबर कळते.."

हे रिव्हर्स स्टेरिओटायपिंग नाही का?

असो. भावना दुखावणं हे फार धोक्याचं असल्यामुळे जर मी जाहीर क्षमा मागून फायदा होण्यासारखा असेल तर जरूर विचार करेन. मी अमेरिकेत जाईन पण मला माहिती पुरवणारे इथेच असतील ना... उगाच त्यांच्या घराची मोडतोड नको. (ह. घे. हे. दु. वे. सां. ला.)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jul 2010 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

'असे अनुभव, असे दुकानदार प्रतिमा बिघडवतात' असं म्हटलेलं आहे.

चालायचेच... जोवर दुकानदार लेखणी हातात घेउन त्यांना आलेल्या तर्‍हेवाईक ग्राहकांचे अनुभव लिहित नाहीत तोवर एकच बाजु पुढे येत राहणार :)

बाकी तुमच्या ह्या भेटी विषयी त्या दुकानदाराचे मत वाचायला मिळाले असते तर अजुन मजा आली असती ;)

अवांतर :- वरच्या काही काही प्रतिक्रीया वाचुन मनमुराद हसलो. काही लोकांना सार्वजनीक वाचनालय आणि पुस्तकाचे दुकान ह्यातला फरक निट समजुन घेण्याची गरज आहे असे वाटते.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

राजेश घासकडवी's picture

13 Jul 2010 - 12:48 pm | राजेश घासकडवी

जोवर दुकानदार लेखणी हातात घेउन त्यांना आलेल्या तर्‍हेवाईक ग्राहकांचे अनुभव लिहित नाहीत

अहो, हे दुकानदार कॅटेलॉग देखील लिहित नाहीत!

बाकी तुमच्या ह्या भेटी विषयी त्या दुकानदाराचे मत वाचायला मिळाले असते तर अजुन मजा आली असती

जरूर. तुम्हाला इच्छा असेल तर व्यनिने दुकानाचं नाव कळवतो. त्यांची मुलाखत घेऊन या. मलाही वाचायला आवडेल.

वरच्या काही काही प्रतिक्रीया वाचुन मनमुराद हसलो. काही लोकांना सार्वजनीक वाचनालय आणि पुस्तकाचे दुकान ह्यातला फरक निट समजुन घेण्याची गरज आहे असे वाटते.

फरक समजावून सांगा. आम्हीही हसू म्हणतो.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jul 2010 - 1:51 pm | परिकथेतील राजकुमार

अहो, हे दुकानदार कॅटेलॉग देखील लिहित नाहीत!

लिहायलाच पाहिजे असा नियम आहे का ? ;) आपण कॅटलॉग लिहिणार्‍या दुकानदाराकडे जावे ना.

जरूर. तुम्हाला इच्छा असेल तर व्यनिने दुकानाचं नाव कळवतो. त्यांची मुलाखत घेऊन या. मलाही वाचायला आवडेल.

घरचे झाले थोडे...
अहो त्यांना काम धंदे असतता, त्यातुन त्रागा करणारी गिर्‍हाईक सांभाळायची. कधी वेळ काढणार ते मुलाखतीसाठी? आणि तसेही पुण्याचे दुकानदार ग्राहकांविषयी तक्रार करताना मला तरी अजुन कधी दिसले नहित. एकतर ते सरळ ग्राहकाला घरगुती वागणुक देतात नहितर फाट्यावर मारुन मोकळे होतात. सगळे जागच्याजागी आणि समोरासमोर. मागाहुन तक्रार / लेख वगैरे भानगड नाही ;)

फरक समजावून सांगा. आम्हीही हसू म्हणतो.

वेळ मिळाला कि लिहितो ह्यावर एक लेख :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

Dhananjay Borgaonkar's picture

13 Jul 2010 - 2:15 pm | Dhananjay Borgaonkar

+१०००००
पराच्या प्रत्येक प्रतिक्रियेशी सहमत.

आणि माहितीये की दुकानात गेल्यावर अपमान होणारे तर तोंड वर करुन जावच कशाला?
तो दुकानदार तुमच्याकडे अक्षता घेऊन आलेला का माझ्या दुकानात या म्हणुन. त्याच दुकान.. .तो ठरवणार कोणाशी कस बोलायच ते.
आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाही.

अभिरत भिरभि-या's picture

13 Jul 2010 - 2:34 pm | अभिरत भिरभि-या

आणि माहितीये की दुकानात गेल्यावर अपमान होणारे तर तोंड वर करुन जावच कशाला?
तो दुकानदार तुमच्याकडे अक्षता घेऊन आलेला का माझ्या दुकानात या म्हणुन. त्याच दुकान.. .तो ठरवणार कोणाशी कस बोलायच ते.
आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाही.

आणि मग हेच विक्रेते पुस्तके खपत नाहीत म्हणून गळे काढताना आपण बघतो .. त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे ??

आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाही या वाक्याला खोट्या अहंकाराखेरिज काहीही अर्थ नाही. दुकान आहे ते अन्नछत्र नाही माज करायला !

(जन्मापासून) पुणेकर

Dhananjay Borgaonkar's picture

13 Jul 2010 - 2:51 pm | Dhananjay Borgaonkar

आणि मग हेच विक्रेते पुस्तके खपत नाहीत म्हणून गळे काढताना आपण बघतो .. त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे ??

मी तरी कोणत्याच पुस्तकवाल्याला गळ काढताना बघितलेल नाही.
अप्पा बळ्वंत चौकात प्रत्येक पुस्तकवाल्याच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा नसते.कायम गर्दीने भरलेली.
फक्त अप्पा बळवंत चौकच नाही तर इतर ठिकाणीसुद्धा कायम गर्दी असते. ग्रंथ प्रदर्शन तर नेहमीच चालु असतात. तिकडेही तीच परीस्थीती.
तुमच्या पहण्यात अगदी एक दोन आले असतील्..म्हणजे सगळेच गळ काढतात अस नव्हे.

आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाही या वाक्याला खोट्या अहंकाराखेरिज काहीही अर्थ नाही

अहंकार म्हणा वा माज म्हणा..मला काहीच फरक पडत नाही.
पण उगाच कोणीही सोम्यागोम्या यावा आणि पुणेरी लोकांवर टिप्प्णी करावी??

अभिरत भिरभि-या's picture

13 Jul 2010 - 3:18 pm | अभिरत भिरभि-या

अप्पा बळ्वंत चौकात प्रत्येक पुस्तकवाल्याच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा नसते.कायम गर्दीने भरलेली.

अहो .. आधीच दुकान होते इतकेसे .. त्यात निम्मे आदल्या रस्ता रूंदीकरणात गेले मग आता दोन चार जण गेले तरी पुस्तकवाल्याच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा उरत नाय .. त्यात काय कौतुक :D :D :)

खरे सांगायचे तर आम्ही मुळे मुठेतले बेडूक .. आमचच तळे मोठे म्हणून गळे काढणारे :)

अहंकार म्हणा वा माज म्हणा..मला काहीच फरक पडत नाही.
पण उगाच कोणीही सोम्यागोम्या यावा आणि पुणेरी लोकांवर टिप्प्णी करावी?

वेल ..
युक्तीयुक्तम् वचः ग्राह्यम् बालाद् अपि शुकाद् अपि |
युक्तीहीनम् वचः त्याज्यम् वृद्धाद् अपि शुक्राद् अपि ||

थोडक्यात कोण बोलतय यापेक्षा काय बोलतेय याकडे लक्ष द्यावे नाही माणसाने?
पुण्यातल्या (काही) दुकानदार हरामी असतात आपल्या बुवा आहे मान्य. उगा खोटॅ कशाला बोला ?

Dhananjay Borgaonkar's picture

13 Jul 2010 - 4:22 pm | Dhananjay Borgaonkar

अहो .. आधीच दुकान होते इतकेसे .. त्यात निम्मे आदल्या रस्ता रूंदीकरणात गेले मग आता दोन चार जण गेले तरी पुस्तकवाल्याच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा उरत नाय
आहो अश्या प्रतिकुल परीस्थीतीत सुद्धा आमचा पुणेरी दुकानदार मोठ्या थाटात धंदा करत असतो आणि नफा सुद्धा कमवतो.तरी सुद्धा काही लोक गळ काढतात की पुण्यात दुकानदार धंदा नीट नाही करत.

खरे सांगायचे तर आम्ही मुळे मुठेतले बेडूक .. आमचच तळे मोठे म्हणून गळे काढणारे
तुम्ही बेडुक असा वा बेडुकमासे मला काही कर्तव्य नाही.

थोडक्यात कोण बोलतय यापेक्षा काय बोलतेय याकडे लक्ष द्यावे नाही माणसाने?
अगदी बरोबर बोललात.

पुण्यातल्या (काही) दुकानदार हरामी असतात आपल्या बुवा आहे मान्य
आहो दुकानदारच काय..काही माणसं जन्मानेच हरामी असतात्..उगाच खोट कशाला बोला.