शाळेमध्ये मुले परीक्षेत नापास का होतात

Primary tabs

शैलेश हिंदळेकर's picture
शैलेश हिंदळेकर in काथ्याकूट
12 Mar 2010 - 3:35 pm
गाभा: 

ढकलपत्रातून आलेला मजकूर जसाच्या तसा डकवल्यामुळे धागा संपादित करत आहे.
रेवती

प्रतिक्रिया

शुचि's picture

12 Mar 2010 - 5:23 pm | शुचि

Lol
मस्त
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

विसोबा खेचर's picture

12 Mar 2010 - 10:42 pm | विसोबा खेचर

सह्ही हिशेब! Smile

(एक नंबरचा ढ) तात्या.

अश्विनीका's picture

12 Mar 2010 - 10:51 pm | अश्विनीका

मस्त हिशोब मांडलाय.
- अश्विनी

Nile's picture

13 Mar 2010 - 2:37 am | Nile

च्यायला मी रोज किमान ३ तास खेळायचो, दर शुक्र, शनि आणि रवी अनुक्रमे नवा हिंदी जुना हिंदी आणि मराठी सिनेमे पहायचो, रोज रात्री १० तास झोपायचो त्याशिवाय. ट्रिपा काढायचो, पतंग उडवायचो आणि अर्थात वर्गात झोपा काढायचो (हे विसरले वाटतं वरच्या गणितात?). आता हिशेब करुन सांगा माझ्या वर्षात नक्की कीती दिवस होते ते? Wink

अर्थात हे गणित आम्ही लै पुर्वीच ऐकलं होतं.

हा असा हिशेब करतात म्हणूनच नापास होतात Smile

प्रत्येक दिवसातले तास मोजताना ३६५ ने गुणले आहे. आणि ते वजा मात्र already सगळ्या सुट्ट्या वजा करून उरलेल्या दिवसांमधून केले आहे. त्या सुट्ट्यांच्या दिवसांमधे काय हे जेवत/ झोपत नव्हते काय Wink

असो. बरोबर हिशेब असा होईल.

एका वर्षामध्ये ३६५ दिवस असतात.
एका वर्षामध्ये ५२ रविवार असतात.
मग ३६५ मधून ५२ वजा केले की राहिलेत ३१३ दिवस.
उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी अशा ५० सुट्ट्या वजा केल्यास राहिलेत २६३ दिवस.

३५ दिवस शाळेमध्ये परीक्षा म्हणजे २२८ दिवस
वर्षातील ४० दिवस निरनिराळे सण, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, इतर लहान-मोठे सण यांच्यामध्ये जातात. १८८ दिवस

वर्षातील ३ दिवस तरी निदान आजारपण, ताप, सर्दी तांच्यामध्ये जातात. आता राहिलेत १८५ दिवस.
वर्षातील २ दिवस ( फक्त ) चित्रपट, टिव्हीवरील कार्यक्रम बघण्यात जातात.
आत राहिलेत १८३ दिवस.

आता उरला १ दिवस आणि त्या दिवशी त्या मुलाचा वाढदिवस असतो म्हणजे १८२ दिवस Smile

आता सगळ्या गोष्टींना १८२ ने गुणायला पाहिजे ३६५ ने नाही. कारण आपण रविवार आणि सुट्ट्यांच्या काळातील पूर्ण २४ तास अगोदरच काढून टाकले आहेत. तशी गुणाकाराची पण गरज नाही म्हणा. भागाकारानेच काम भागेल Wink

दररोज आपण ८ तास झोपतो. मुले रोज १ तास खेळतात.दररोज २ तास दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि न्याहरी करण्यात जातात. दररोज १ तास बोलण्यात आणि इथे तिथे जाण्यात जातो. म्हणजे ८+१+२+१=१२ तास म्हणजे अर्धा दिवस Smile

आता १८२/२=९१ दिवस = २१८४ तास उरले की हो फक्त अभ्यास करायला Wink

चू.भू.द्या.घ्या. अंमळ गडबडीत हिशेब केला आहे मी पण.

बाकी एके काळी हिशेब लिहीण्याचेच काम करणारे मालक पण गंडलेले पाहून अंमळ आश्चर्य वाटले.

इथे वाचल्याप्रमाणे मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे. आणि हे लेखन बाकीच्याही कोणत्याच नियमांत बसते असे माझ्या अल्पमतीला वाटत नाही आहे. असो.

महेशकुळकर्णी's picture

13 Mar 2010 - 11:19 am | महेशकुळकर्णी

हॅहॅहॅ फार पुर्वीच ढकलपत्रात वाचले होते...

असेच म्हणतो...

- ढगोळा

अनामिक's picture

13 Mar 2010 - 7:36 pm | अनामिक

सही रे चैतन्य! असली ढकलपत्र पाहिली की वैताग यायचा...

-अनामिक

अविनाशकुलकर्णी's picture

13 Mar 2010 - 7:00 pm | अविनाशकुलकर्णी

पुर्वि पण असेच होते मग आम्हि कसे पास होवुन एंजीनीर झालो तेच कळत नाहि