✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिसळपावचे अधिकृत धोरण

स
सरपंच यांनी
Tue, 07/13/2010 - 19:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
226705 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

वाचक आणि संपादक

रामदास
Tue, 07/13/2010 - 19:57 नवीन
म्हणून या धोरणाचा पाठपुरावा मी करेन.
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/13/2010 - 20:14 नवीन
+१ सदस्यांनीपण संपादक हे आपापली वैयक्तिक आयुष्य सांभाळून हे काम करत आहेत हे ध्यानात ठेवावे अशी विनंती करतो. शिवाय, संपादकांचे एखादे कृत्य पटले नाही तर संपादक मंडळाकडे विचारणा करावी. त्यासाठी जाहिर काथ्याकूट करू नये. सगळ्यांनाच सगळे माहित नसते (किंबहुना सगळ्याच गोष्टी संपादक पुढे आणू शकत नाहीत हे ध्यानात ठेवावे) आणि त्यामुळे संपादकांच्या कृत्यांमागच्या भूमिकेबद्दल गैरसमज होऊ शकतात. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+२

छोटा डॉन
Wed, 07/14/2010 - 06:52 नवीन
सदस्यांनीपण संपादक हे आपापली वैयक्तिक आयुष्य सांभाळून हे काम करत आहेत हे ध्यानात ठेवावे अशी विनंती करतो. शिवाय, संपादकांचे एखादे कृत्य पटले नाही तर संपादक मंडळाकडे विचारणा करावी. त्यासाठी जाहिर काथ्याकूट करू नये. सगळ्यांनाच सगळे माहित नसते (किंबहुना सगळ्याच गोष्टी संपादक पुढे आणू शकत नाहीत हे ध्यानात ठेवावे) आणि त्यामुळे संपादकांच्या कृत्यांमागच्या भूमिकेबद्दल गैरसमज होऊ शकतात.
+१, अत्यंत महत्वाचा मुद्दा. अगदी हेच म्हणायचे आहे. बाकी धोरणे उत्तम आहेतच, त्याचे काटेकोर पालन करण्याचा व सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिल. जाता जाता : प्रभु मास्तर, जियो ! मास्तरांचा प्रतिसाद म्हणजे 'कळस' आहे, १००% सहमत. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वा !!

नितिन थत्ते
Tue, 07/13/2010 - 20:09 नवीन
धोरण जाहीर झाले हे चांगले झाले. नवी घटना उत्तम आहे. बरीचशी पूर्वीच्या नियमावलीसारखीच आहे. या धोरणप्रसिद्धीमुळे वातावरण निवळण्यास आणि शांतता प्रस्थापित होण्यास बहुधा मदत व्हावी. अर्थातच नवी घटना निर्माण झाली तरी सगळे नियम काही पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेले नसतात. लिहिणे शक्यही नसते. घटना राबवताना घेतल्या जाणार्‍या निर्णयांमधून त्या घटनेचे अर्थ कसे लावावे हे स्पष्ट होत जाते. याला केस लॉ म्हणतात. विशेषतः जेव्हा दोन कलमांमध्ये विसंगती निर्माण होते तेव्हा या केस लॉज चा फारच उपयोग होतो. परंतु हे जे धोरण जाहीर झाले आहे त्यात केस लॉजची बहुधा गरजच पडणार नाही किंवा उपयोग होणार नाही इतके हे धोरण स्पष्ट आणि असंदिग्ध आहे. उत्तम. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

नितिन,

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/13/2010 - 20:20 नवीन
नितिन, मूळातच मिपाकडे एखाद्या कोर्ट अथवा तत्सम दृष्टीने का बघावे? हे एक सर्वांनी एकत्र येण्याचे, हसत खेळत एकत्र वेळ घालवायचे, दोन द्यायचे / दोन घ्यायचे, एकमेकांना समृद्ध करायचे स्थळ आहे या भावनेतून का वावरू नये? धोरण असणे आवश्यक झाले हे खरे. पण या धोरणाचा उपयोग होण्याची वेळ कमीत कमी यावी हे आपण सगळ्यांनीच बघणे हितकर. आज पर्यंत टाळी कधी एक हाताने वाजली नाही आणि या जगाच्या अंतापर्यंत तरी वाजणार नाही हे नक्की. अधिक काय सांगावे? आपण सगळेच सूज्ञ आहोत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१ अगदी मान्य!

चतुरंग
Tue, 07/13/2010 - 20:23 नवीन
तांत्रिक क्लिष्टता आणि नियमांचा कीस काढणे यासाठी धोरणे नाहीत. एखाद्या मोठ्या एकत्र कुटुंबात वावरताना सगळ्यांनी खेळीमेळीने रहावे अशा हेतून घराचे म्हणून काही नियम असतात आणि ते सर्वांनी पाळावेत अशी अपेक्षा असते, थोडीफार चेष्टामस्करी, कधी रागलोभ हे चालायचेच पण मर्यादेतच. त्या अनुषंगाने ह्या धोरणांकडे पाहावे! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/13/2010 - 21:24 नवीन
सहमत आहे. (मर्यादांच भान व भीती दोन्ही बाळगुन असणारा) प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वा...

श्रावण मोडक
Tue, 07/13/2010 - 20:11 नवीन
क्रमांक ७, ८, ९ मधील तरतूद सर्वाधिक महत्त्वाची. मोलाचीही. आवश्यकही होती. क्रमांक ९ तर संपादकांच्या हातचे ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्रासारखाच दुर्मिळतेने त्याचा वापर होईल अशी संपादकांकडून आणि (माझ्यासह) सदस्यांकडूनही अपेक्षा.
  • Log in or register to post comments

धोरणाचा मान हा सर्व सदस्यांनी राखायचा आहे!

चतुरंग
Tue, 07/13/2010 - 20:20 नवीन
संपादक हे आधी सदस्य आहेत त्यामुले तेही ह्यात आलेच. एकदा असा मान ठेवला गेला की बाकी गोष्टी आपसूकच येत जातात जेणेकरुन अस्त्राचा वापर कमीतकमी अथवा नगण्य होतो! (समाधानी)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

काटेकोर प्रयत्न

प्रियाली
Tue, 07/13/2010 - 20:23 नवीन
नवी धोरणे आवडली. त्यांचे पालन करण्याचा काटेकोर प्रयत्न माझ्याकडून होईल. (आशावादी) प्रियाली
  • Log in or register to post comments

योग्य धोरण

क्रेमर
Tue, 07/13/2010 - 20:26 नवीन
धोरणाचे स्वागत. मिपावरील संपादक मराठी आंतरजालावर बराच काळ कार्यरत असावे असे दिसते. त्यांच्या आंतरजालावरील प्रदीर्घ वावरामुळे नकळत का होईना काही सदस्यांविषयी त्यांच्या मनात काही एक मत निर्माण झालेले असावे. असे असतांना ते या मतांना बाजूला ठेऊन निर्णय घेत असतील/ घेतील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

अत्यंत योग्य विधान.

चतुरंग
Tue, 07/13/2010 - 20:30 नवीन
मिपावरील संपादक मराठी आंतरजालावर बराच काळ कार्यरत असावे असे दिसते. त्यांच्या आंतरजालावरील प्रदीर्घ वावरामुळे नकळत का होईना काही सदस्यांविषयी त्यांच्या मनात काही एक मत निर्माण झालेले असावे. असे असतांना ते या मतांना बाजूला ठेऊन निर्णय घेत असतील/ घेतील अशी अपेक्षा आहे. संपादक मंडळात असलेल्या सर्व सदस्यांचा विचार विनिमय असतोच. कोणा एक-दोघांच्या मताने निर्णय होत नाहीत. सदस्यांबाबत काही वैयक्तिक मत असले/नसले तरी ते संपादनाच्या आड येणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली जाते. सर्वांचा मिळून तेवढा अनुभव निश्चितच जमा झालेला आहे. तेव्हा तुम्ही केलेली अपेक्षा गैरवाजवी नाही! धन्यवाद! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर

श्री. क्रेमर

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/13/2010 - 20:37 नवीन
मिपावरील संपादक मराठी आंतरजालावर बराच काळ कार्यरत असावे असे दिसते. त्यांच्या आंतरजालावरील प्रदीर्घ वावरामुळे नकळत का होईना काही सदस्यांविषयी त्यांच्या मनात काही एक मत निर्माण झालेले असावे. असे असतांना ते या मतांना बाजूला ठेऊन निर्णय घेत असतील/ घेतील अशी अपेक्षा आहे. आपल्या नेहमीच्या आयुष्यात जेव्हा आपण लोकांना प्रत्यक्षात भेटतो, वावरतो तरी एवढी मतंमतांतरं असतात. पूर्वग्रह असतात. म्हणूनच आपण माणूस आहोत. नाहीतर देव बनलो असतो नाहीतर संत वगैरे. इथे जालावर तर बहुतांसी लोक नक्की कोण हे पण आपल्याला माहित नसते. पूर्वग्रह वाढायला बराच वाव असतो. तरीही संपादक बहुतांशवेळा तटस्थ बुद्धीने वागायचा प्रयत्न करतातच. पण शेवटी 'टू अर इज ह्युमन' या न्यायाने उन्नीसबीस होतच असते. पण कोणत्याही समस्येचे / भांडणाचे निराकरण नीट संवाद साधून होणे शक्य असते. तसेच व्हावे. एवढीच इच्छा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर

त्याविषयी

लंबूटांग
Tue, 07/13/2010 - 20:32 नवीन
त्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही
हे खटकले. मागे जेव्हा नीलकांतने सगळी सूत्रे हातात घेतली तेव्हा अधिक पारदर्शकता आणली जाईल अथवा तत्सम काही तरी म्हटल्याचे आठवते आहे. असो धोरण जाहीर झाले बरे झाले. पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न होता आहे आणि राहिल.
  • Log in or register to post comments

सहमत आहे

प्रभो
Tue, 07/13/2010 - 20:37 नवीन
सहमत आहे पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न होता आहे आणि राहिल. *खेळ विभागाचं काय रे, कांता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

असं बघा...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/13/2010 - 20:42 नवीन
हे खटकले. असं लिहिलं असलं तरी, बहुतांश वेळेला स्पष्टीकरण देणं किंवा संवाद साधणं असं काही संपादक करतच असतात. ते समोर येत नाही. ते ही समोर येणं आणि सदस्यांनी ते समजून घेणं आवश्यक आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

तुमच्याशी

प्रभो
Tue, 07/13/2010 - 20:45 नवीन
तुमच्याशीही सहमत आहे. मला स्पष्टीकरण मिळालं होतं. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. अशा तक्रारी दुसर्‍यांच्या असू नयेत, एवढीच इच्छा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे

लंबूटांग
Tue, 07/13/2010 - 20:50 नवीन
मागे काही काळ बरीच उडवा उडवी झाली होती आणि मग त्याचे का उडाले माझेच का नाही असा खाली प्रियाली यांनी म्हटले आहे तसा कीस काढला गेला होता. संपादकांनी प्रतिसाद न उडवता तिथेच XYZ कारणासाठी हा प्रतिसाद काढण्यात आलेला आहे असे लिहीले तर बरेच प्रश्न सुटतील असे सुचवावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

XYZ कारणासाठी हा प्रतिसाद काढण्यात आलेला आहे

चतुरंग
Tue, 07/13/2010 - 20:55 नवीन
ती कारणे ढोबळमानाने धोरणात दिलेली आहेत प्रत्येक संपादित प्रतिसादात हे देणे शहाणपणाचे नाही. ------------------ औषधाच्या रॅपरवर साईडइफेक्ट्स लिहिलेले असतात. कोणाला काहीच साईडइफेक्ट दिसणार नाही काहींना बरेचसे दिसतील ते ज्याच्यात्याच्या प्रकृतीधर्मावर अवलंबून आहे. प्रत्येकाला स्वतंत्र स्पष्टीकरण देणे शक्य नसते तसेच काहीसे. गोळाबेरीज सांगितलेली असते बाकी तारतम्य.. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

प्रत्येका

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/14/2010 - 11:14 नवीन
प्रत्येकाला स्वतंत्र स्पष्टीकरण देणे शक्य नसते तसेच काहीसे. गोळाबेरीज सांगितलेली असते बाकी तारतम्य..
+१ सहमत आहे. फक्त एक विनंती अशी आहे की जर एखाद्या संपादकाने एखादा धागा अथवा प्रतिक्रीया उडवल्यास त्याची जबाबदारी सर्व संपादक मंडळाने घ्यावी. बर्‍याचदा असे दिसते की एखाद्या उडालेल्या धाग्याविषयी / प्रतिसादाविषयी सदस्याकडून जाहिररीत्या (जे ह्यापुढे शक्य नाही) अथवा खरडवहीत विचारणा झाली तर बरेचसे संपादक 'छे मी तेंव्हा न्हवतोच' , 'धागा अजुन उघडलाच नाहिये, बघुन सांगतो' 'काय सांगता ? तुमचा प्रतिसाद उडाला ? कधी ?' अशी विधाने करुन मोकळी होतात. 'तो मी न्हवेच' असे दाखवायची धडपड बर्‍याचदा स्पष्ट दिसते. ह्यामुळे विनाकरण संबंधीत मजकुर संपादीत करणारा संपादक हा चुकीचा ठरतो. त्यानी जे काय केले त्याला इतर संपादकांचा पाठींबा न्हवता अथवा इतरांना ते माहितीच नाही अथवा संपादकांच्यात एकमेकात ताळमेळ नाही असा काहीसा चुकीच संदेश सदस्यांपर्यंत जातो. हे टाळता आल्यास बरे होईल असे वाटते. उडालेल्या धाग्याविषयी / प्रतिसादा विषयी 'योग्यरीत्या' विचारणा झाल्यास, फक्त 'संपादक मंडळ' ह्या आयडीच द्वारे खुलासा व्हावा असे सुचवावेसे वाटते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

असे होत असते

चित्रा
Tue, 07/13/2010 - 20:56 नवीन
प्रतिसाद काढण्यापेक्षा अप्रकाशित जेव्हा केला जातो तेव्हा असे लिहीणे कठीण असते. नाहीतर कल्पना करा की प्रत्येक अप्रकाशित प्रतिसादाबरोबर एक संपादकांचा प्रतिसाद की "हा वरचा प्रतिसाद का अप्रकाशित केला". मी पूर्वी जेव्हा लेख किंवा प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत तेव्हा सदस्याच्या ख. व. मध्ये लिहीले आहे. पण काही सदस्य या चांगुलपणाचा फायदा घेतात. तेव्हा आमचा वेळ घालवून प्रत्येक सदस्याच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देणे अवघड आहे. समजून घेऊ शकाल, असे वाटते. संपादक प्रतिसादातील काही वाक्ये ठेऊन आक्षेपार्ह वाक्ये शक्यतो अशासाठी काढत अशासाठी नाहीत, की त्यामुळे नक्की गदारोळ कशामुळे झाला याचे संदर्भच नाहीसे होतात! अप्रकाशित प्रतिसादांमुळे संपादक मंडळाकडे संदर्भ राहतात.. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

ढोबळ स्पष्टीकरण

प्रियाली
Tue, 07/13/2010 - 20:45 नवीन
काय राहील आणि काय काढले जाईल त्याचे ढोबळ स्पष्टीकरण येथे दिलेले आहेच. बर्‍याचदा सदस्यांना संपादित लेखनावर काथ्याकूट करून हवा असतो तो करत, कीस काढत राहणे मला अनावश्यक वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

+१

नितिन थत्ते
Tue, 07/13/2010 - 20:56 नवीन
तेच माझ्या प्रतिसादात लिहिले आहे. धोरण अतिशय स्पष्ट आहे. संपादकांचा/संपादक मंडळाचा निर्णय फायनल. म्हणूनच नियम ४ ते ९ ऐवजी तेवढा एकच नियम लिहून पुरला असता. (वेलणकर जिंकले असा धागा मनोगतावर टाकावा म्हणतो). वातावरण कलुषित केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून आता एक ऑगस्टपर्यंत लेखन रजा. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

नाही

चित्रा
Tue, 07/13/2010 - 21:26 नवीन
मिपावर कुठच्याच प्रश्नाला उत्तरे न देणे, प्रश्नाला कधीच प्रतिसाद न येणे, अपेक्षित नव्हते आणि बहुतांशी केले नाही. जेव्हा कधी केले आहे त्या १०% वेळा आधी उत्तरे देऊन, समजुतीने सांगून समझोत्याचे प्रयत्न केले आहेत. तेव्हा हा निर्णय एकेरी नाही. इथे तुम्हाला माहिती असलेल्या चालकांनी आणि संपादकांनी एकत्रितरित्या घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

टेक इट इजी

प्रियाली
Tue, 07/13/2010 - 23:08 नवीन
वातावरण कलुषित केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून आता एक ऑगस्टपर्यंत लेखन रजा.
अवश्य घ्या! आणि मोकळ्या मनाने परत या. :) (प्रतीक्षेत) प्रियाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पारदर्शकता निश्चित आहे

चित्रा
Tue, 07/13/2010 - 20:50 नवीन
मिपाच्या धोरणांच्या अंमलबजावणीत बर्‍याच अंशी पारदर्शकता राहिली आहे. परंतु प्रत्येक वेळी एका सदस्याने उठून एक नवीन धागा सुरू करायचा, त्या त्या वेळी असलेल्या आपल्या प्रश्नांची ताबडतोब उत्तरे देण्यास वेठीला धरायचे, इतकेच नाही तर संपादकांना कुत्रे, आणि अशाच असभ्य किंवा इतर बोचर्‍या विशेषणांनी संबोधायचे आणि पारदर्शकतेची अपेक्षा करायची हे कठीण आहे हे तुम्ही समजू शकाल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

सहमत

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/13/2010 - 21:03 नवीन
सहमत आहे. या निमित्ताने संपादकही आपली बाजू मांडत आहेत हे बरे आहे. या निमित्ताने सगळेच काही एकतर्फी आहे असे नाही हे सदस्यांना समजेल. दुसरी बाजूही समोर येत आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

दुसर्‍या

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/13/2010 - 21:13 नवीन
दुसर्‍या बाजूला याहीपेक्षा जास्त मुद्दे आहेत यासाठी मुद्दामच उपप्रतिसाद. पण नो मोअर कमेंट्स! धोरण आलं हे उत्तमच. मिपा उत्तरोत्तर प्रगती करत राहो. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

नवीन धोरणे

रेवती
Tue, 07/13/2010 - 20:32 नवीन
नवीन धोरणे जाहीर झाल्याचा आनंद होत आहे. संपादकांवर होणारे शाब्दीक हल्ले आता थांबायला हवेत. वाट्टेल त्या भाषेत व्य. नि. करण्याचे प्रमाण आता जवळ जवळ थांबेल अशी आशा वाटते. संपादक हे कोणाचेही 'नोकर' नाहीत तर मिपावरील प्रेमापोटी काम करत आहेत हे गेल्या काही दिवसांत जाणवून द्यावेसे वाटत होते. सदस्यांनी स्वत: टारगट प्रतिसाद देवून ते उडवल्यावर निषेध व्यक्त करणे हे निव्वळ स्वार्थीपणाचे वाटते. रेवती
  • Log in or register to post comments

नवीन

यशोधरा
Tue, 07/13/2010 - 20:50 नवीन
नवीन धोरणांचे पालन करण्याचा काटेकोर प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments

+१

नावातकायआहे
Tue, 07/13/2010 - 20:54 नवीन
>> संपादक हे कोणाचेही 'नोकर' नाहीत तर मिपावरील प्रेमापोटी काम करत आहेत +१
  • Log in or register to post comments

संपादकांना खरड किंवा व्यनि कसा पाठवावा

आण्णा चिंबोरी
Tue, 07/13/2010 - 21:09 नवीन
संपादकांना खरड किंवा व्यनि कसा पाठवावा. मला पावर नाय.
  • Log in or register to post comments

धोरणाचे

Nile
Tue, 07/13/2010 - 21:11 नवीन
धोरणाचे स्वागत. लंबुटांग यांच्या सुचनांना (आणि त्यावरील प्रतिसाद) जोडणी म्हणुन. सहसा मॉडरेटर लॉग्स हे इतर मॉड्स ना बघता येतात. कुठल्या संपाद्काने संपादन केले आहे हे सर्वांना समजले तर तक्रारनिवारण संपादकांना सोपे होइल असे वाटते. लॉग्स ची सोय झाली तर उत्तम. (किंवा/शिवाय) अप्रकाशीत केलेल्या प्रतिसादात जर संपादक एखादी 'नोट' लावु शकत असेल तरीही तक्रारनिवारण सोईचे होईल. संपादन कीतीही निरपेक्ष असले तरी प्रतिसादकांच्या तक्रारी येणारच त्यामुळे (स्पष्टीकरण दिले जाणार नाही ही) भुमिका थोडी ढिली असावी असे वाटते. -Nile
  • Log in or register to post comments

लेख किंवा

रेवती
Tue, 07/13/2010 - 21:25 नवीन
लेख किंवा प्रतिसाद अप्रकाशित केल्यावर त्याचे स्पष्टिकरण मिळावे असे वाटणे साहजिक आहे. वस्तूस्थिती पाहता प्रत्येक संपादक अठवड्याला एखाद्दुसरा लेख व दहावीस प्रतिसाद अप्रकाशित करत असला तर फक्त लेखाच्या अप्रकाशित करण्याबाबत स्पष्टेकरण देणे शक्य होते. तसेही संपादक प्रतिक्रिया अप्रकाशित करण्याबाबत वेळ काळ पाहून निर्णय घेतात. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मला असेच

लंबूटांग
Tue, 07/13/2010 - 21:38 नवीन
मला असेच काहीसे म्हणायचे आहे. मला संपादकांबद्दल कोणतीही तक्रार नाही आहे पण कारणे माहित नसल्यास उगाच गैरसमज वाढतात आणि मग संपादकांवरच पक्षपातीपणाचा आरोप होतो. जो टाळण्यासाठी वरचा प्रतिसाद होता. माझी स्वतःची terminology समजण्यात अडचण होते आहे बहुतेक. अप्रकाशित केल्यास तो normal user ना वाचता येत नसावा पण database मधे राहत असावा जो नंतर प्रकाशित करता येऊ शकतो. प्रतिसाद अप्रकाशित करून मग उत्तर देण्यासाठी प्रतिसाद देणे ही एक जास्त step आहे मान्य पण तसे केल्यास नंतरची प्रश्नोत्तरी वाचेल असे वाटते. प्रतिसाद Delete केल्यास मग संपादकांना खरडी केल्या जातात मग संपादक वेळ मिळेल तेव्हा उत्तर देतात. ह्या सगळ्या घोळात संपादकाने आपले नावच लिहीले नसेल तर मग अजूनच गोंधळात भर मधल्या काळात संपादकांबद्दलचा संताप gtalk व इतर ठिकाणी मित्रांशी बोलताना shareकेला जातो आणि मग एकंदरच वातावरणाबाबत इतरांच्या मनातही एक प्रकारचा prejudice तयार होतो. म्हणून प्रतिसाद / धागा संपादित केल्यास तिथेच नाव व कारण लिहिण्याची सुचवणी वर केली होती. हे एक उत्तम उदाहरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

लंबूटांग,

चतुरंग
Tue, 07/13/2010 - 21:46 नवीन
आता प्रसिद्ध झालेली धोरणे आहेत ती आत्तापासून पुढे लागू होतील. याआधी काय झाले त्या धाग्यांचे दुवे देऊन चर्चा करण्यात हशील नाही कारण हे रेट्रोस्पेक्टिव इफेक्टने होत नाहीये! पुढे जाताना कशाप्रकारे सदयांची वर्तणूक हवी हे महत्त्वाचे आहे! तुझा मुद्दा समजला आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

दुवा

Nile
Tue, 07/13/2010 - 21:58 नवीन
दुवा दिलेले 'संपादनाचे एक चांगले उदाहरण' म्हणुन असावे असे मला वाटते. @लंबुटांग, इथे मॉड लॉग्स नसावेत असे वाटते. वरती चित्रा, चतुरंग (आणि इतर) यांनी दिलेले मुद्दे मान्य आहेत (कीती वेळ प्रतिसाद/स्पष्टीकरण देत रहाणार वगैरे), संपादकांचा त्रास मान्य आहे म्हणुनच सदर सुचना केली आहे.पुर्विच्या वारंवार-दिर्घ 'माझा प्रतिसाद का उडाला' प्रकारच्या प्रकरणांमध्ये गैरसमजाने मोठा वाटा उचलला आहे असे वाटते. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१

लंबूटांग
Tue, 07/13/2010 - 23:00 नवीन
दुवा दिलेले 'संपादनाचे एक चांगले उदाहरण' म्हणुन असावे असे मला वाटते.
दुवा देण्याचा तोच उद्देश होता. जसे वरील दुव्यामधे केलेले आहे त्याप्रमाणे प्रतिसाद का आणि कोणी उडवला हे लिहावे ज्याने पुढील गैरसमज टळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अप्रकाशित आणि डिलीट

चित्रा
Wed, 07/14/2010 - 00:12 नवीन
डिलीट केल्यास प्रतिसाद कोणालाच दिसत नाही. याउलट प्रतिसाद अप्रकाशित केल्यास तो वाटल्यास पुन्हा प्रकाशित करता येतो. आधी सांगितल्याप्रमाणे त्याचा संदर्भ राहतो. प्रतिसादातले एखादे वाक्य काढले तर असे वाक्य का काढले ते लिहीत बसणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे हे काम वेळखाऊ आहे. एखाद्या दुसर्‍या प्रतिसादाबाबतीत हे ठीक आहे, पण जेव्हा एकामागोमाग एक असे धडाधड प्रतिसाद येत असतात, तेव्हा हे करणे शक्य असले तरी ते करता येईल याची खात्री देता येत नाही. ह्या सगळ्या घोळात संपादकाने आपले नावच लिहीले नसेल तर मग अजूनच गोंधळात भर हे का? संपादक आपली जबाबदारी जाणतात - संपादकांचे नाव माहिती होऊन काय होणार आहे? prejudice एका कोणा संपादकाविरूद्ध तयार होणार. मी स्वतः यापूर्वी जेव्हा संपादन केले आहे तेव्हा त्याची जबाबदारी सर्वांसमोर उचलून केले आहे, पण माझ्याप्रमाणेच संपादनाचा निर्णय हा संपादकमंडळाची सदस्य म्हणून माझ्या सहसंपादकांनी योग्य विचार करून घेतला आहे हे मी निदान सुरवातीला धरते. अर्थात व्यक्ती आहेत म्हटले की मतभेदही असतात.. तेव्हा एखाद्या निर्णयासंबंधी मला प्रश्न असले तर मी ते सहसंपादकांना सरळ विचारेन. त्याची धुणी शक्यतो ते तेवढे महत्त्वाचे असल्याशिवाय उघड्यावर धुणार नाही. (तरी क्वचित कधी एखाद्या प्रसंगी इथे उघड्यावर त्या प्रश्नांची धुणी धुण्याइतके ते महत्त्वाचे असतील तर तसेही करेन!). महत्त्वाचा मुद्दा असा की संपादकांचे अधिकार अमर्यादित नाहीत तर त्यांच्यावर अधिक तारतम्य बाळगण्याची जबाबदारी आहे हे मिसळपावचे सर्व संपादक जाणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

मगाशी

लंबूटांग
Wed, 07/14/2010 - 00:39 नवीन
मगाशी शेवटचा प्रतिसाद म्हटले होते पण काही खुलासे.
हे का? संपादक आपली जबाबदारी जाणतात - संपादकांचे नाव माहिती होऊन काय होणार आहे? prejudice एका कोणा संपादकाविरूद्ध तयार होणार.
संपादक आपली जबाबदारी जाणत नाहीत असे मी तरी कुठेच म्हटले नाही. संपादकाचे नाव माहित असल्यास सर्व संपादकांना खरडी व्यनि तरी केले जाणार नाहीत. मागे खरडवह्या चाळताना २-३ संपादकांनी एका सदस्याला सांगितलेले पाहिले की मी तरी नाही केला संपादित दुसर्‍या कोणी केला असेल. हा सर्व त्रास तरी वाचेल.
त्याची धुणी शक्यतो ते तेवढे महत्त्वाचे असल्याशिवाय उघड्यावर धुणार नाही. (तरी क्वचित कधी एखाद्या प्रसंगी इथे उघड्यावर त्या प्रश्नांची धुणी धुण्याइतके ते महत्त्वाचे असतील तर तसेही करेन!).
मी संपादकांनी त्यांची धुणी कशी आणि कुठे आणि कितीजणांनी मिळून धुवावीत ह्याबद्दल काहीच म्हटलेले नाही. संपादक कोणत्या प्रश्नाची धुणी कशी धुतात इतकी पारदर्शकताही अपेक्षित नाही. केवळ कोणत्या नियमाचे उल्लंघन केले म्हणून प्रतिसाद/ लेख उडाला आणि आपली बाजू मांडायची झाल्यास कोणासमोर मांडावी हे माहित असल्यास बाकीचे त्रास वाचतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

प्रतिसाद का उडाला हे सांगितले

चतुरंग
Wed, 07/14/2010 - 00:45 नवीन
जाईलच असे नाही (बर्‍याचदा फक्त धागा भरकटवणे ह्यासारखे फालतू उद्देश असतात त्यामुळे) लेखन उडाले तर मात्र निश्चितच व्यनि मधून कारणासह सांगितले जाईल तसेच हा व्यनि कोणा एका संपादकामार्फत न येता 'संपादक मंडळ' ह्या आयडी कडून येईल. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

गैरसमज नको

चित्रा
Wed, 07/14/2010 - 00:52 नवीन
तुम्ही असे काही म्हटलेत असे सुचवायचे नाही. तुम्ही म्हणता त्या प्रश्नांचा त्रास मला स्वतःला झालेला आहे. मी स्वतः दरवेळी संपादन जबाबदारी घेऊन केले आहे त्यावेळी काही सदस्यांचे मत संपादनच नको/किंवा केल्यास उत्तरे देणेच नको असे होते. तेव्हा मतांतरे राहणारच. यापेक्षा सदस्यांना एकच छापील उत्तर मिळेल ते परवडेल. मसंवर धुणी धुणे हा अगदी नेहमी वापरला जाणारा शब्द झाला आहे, त्यामुळे तो तसाच वापरला आहे - तुम्हाला लागावे म्हणून नाही.. तेव्हा व्यक्तिगत मतभेदांमुळे धुणी धुणे हे होणारच असले तर ते उघड्यावर करावे का पडद्याआड व्हावे यासंबंधीचे माझे मत ती शक्यतो पडद्याआड धुवावीत असे आहे. (माझ्या मागील काही आठवणींवरून). आपली बाजू मांडायची झाल्यास कोणासमोर मांडावी हे माहित असल्यास बाकीचे त्रास वाचतील. बाजू "संपादक मंडळ" यांच्याकडे मांडावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

खुलाश्याबद्दल धन्यवाद

लंबूटांग
Sat, 07/17/2010 - 00:01 नवीन
सर्व संपादक आता संपादक मंडळ हा एकच आयडी वापरणार असतील तर खूपच छान. प्रत्येक संपादकाला खरडी करायला नकोत :). माझ्या वरील request/ suggestion चा एकमेव उद्देश गैरसमज आणि सदस्य आणि संपादकांमधील अनावश्यक खरडी टाळणे हाच होता जो संपादक मंडळ ह्या आय डी मुळे बर्‍याचशा प्रमाणात साध्य होईल * नाही मला धुणी धुणार वरून काही वैयक्तिक काहीच वाटले नाही. माझेही मत पडद्याआड धुवावीत असेच आहे.end result सभासदाला कळावा असे म्हणणे होते. असो. पण मला हे ही माहित नव्हते की मसंवर धुणी धुणे हा अगदी नेहमी वापरला जाणारा शब्द झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

शुद्धलेखनाबाबत काय धोरण

आण्णा चिंबोरी
Tue, 07/13/2010 - 21:49 नवीन
शुद्धलेखनाला पूर्वीसारखेच फाट्यावर मारले जाणार काय? की केलेल्या सूचनांवर विचारही केला जाईल?
  • Log in or register to post comments

मिपाची

विसोबा खेचर
Tue, 07/13/2010 - 22:11 नवीन
मिपाची धोरणे पुन्हा एकवार नव्याने प्रसिद्ध केल्याबद्दल नीलकांता तुझे मनापासून आभार.. सर्व धोरणे परखड, स्पष्ट आणि उत्तम असून स्पृहणीय आहेत.. नीलकांता, तुला व तुझ्या सा-या संपादक मंडळाला आणि पर्यायाने मिपाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.. -- तात्या अभ्यंकर, संस्थापक, मिसळपाव डॉट कॉम. Image removed.
  • Log in or register to post comments

स्वागत

राजेश घासकडवी
Tue, 07/13/2010 - 22:42 नवीन
धोरण जाहिर केल्याबद्दल व्यवस्थापनाचं अभिनंदन व नव्या धोरणाचं स्वागत. वर टोपणनाव यांनी म्हटल्याप्रमाणे संस्थळ खाजगी आहे, तेव्हा मी स्वतः ते कोणा सज्जनाने मला खेळायला दिलेलं मुक्तांगण आहे असं मानतो (निदान जोपर्यंत या संस्थळातून आर्थिक उत्पन्न शून्य आहे तोपर्यंत तरी). संपादक हे रेफरी आहेत, व धोरण हे खेळाचे नियम आहेत असं समजतो. शक्यतो नियमांमध्ये राहाण्याचा कसोशीने प्रयत्न करावा, व रेफरीने फाऊल म्हटलं तर कमीत कमी निषेध करून निर्णय मान्य करावा. हे मी तरी पाळण्याचा प्रयत्न करतो, करेन. त्याचबरोबर चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे हे सदस्यांनी चालवलेलं संस्थळही आहे. व्यवस्थापनाची भूमिका अनिर्बंध नसावी, लेव्हल प्लेयिंग फील्ड असावं, नियम वापरण्याच्या पद्धतीत सातत्य असावं, व चढत्या श्रेणीने कठोरता दिसावी अशी व्यवस्थापनाकडून सदस्यांची अपेक्षाही रास्त आहे. व्यवस्थापन व सदस्य, किंवा काही सदस्य व इतर काही सदस्य यांत 'अस व्हर्सस देम' अशी फूट होऊ नये यासाठी हे धोरण उपयोगी ठरेल अशी आशा व्यक्त करतो. श्रावण मोडक यांनी खाजगीत एकदा म्हटलं होतं की 'मिपा ही साधीसुधी वेबसाईट नसून ते मराठीसाठीचं एक माध्यम आहे'. या धोरणांतून आणि सदस्यांच्या व व्यवस्थापनाच्या वागणुकीतून ते साकार होईल ही आशा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि धन्यवाद

ऋषिकेश
Tue, 07/13/2010 - 22:58 नवीन
नीलकांत, सुस्पष्ट धोरणाबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. माझ्याकडून "नो फर्स्ट ओवररूलींग" चे आश्वासन देतो :) ;) ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
  • Log in or register to post comments

उत्तम प्रतिसाद

विकास
Tue, 07/13/2010 - 23:29 नवीन
या धाग्यावरील हा प्रतिसाद मला सगळ्यात जास्त आवडला. "नो फर्स्ट ओवररूलींग" हे दोन्ही बाजूने महत्वाचे आहे. एका हाताने टाळी वाजत नसते. मात्र या धाग्यातील एकंदरीत प्रतिसादांत सर्व काही संपादकांमुळेच होत आहे असा तक्रारीचा सूर आहे. जर कोणी कागाळ्या करणारे, वातावरण गढूळ करणारे अथवा इतर जे काही ध्येयधोरणांमधे सांगितलेल्याशी विसंगत लिहीत असेल तर आम्ही त्या लेखात/चर्चेत/प्रतिसादांत वगैरेत भाग घेणार नाही असे देखील सदस्यांनी ठरवले तर उद्या संपादक मंडळाची गरजच भासणार नाही! कारण हक्क आणि जबाबदारी यांचे विभाजन न होता ते सगळेच एकत्रितपणे वापरत असतील. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

-Nile जर कोणी

Nile
Wed, 07/14/2010 - 00:50 नवीन
-Nile
जर कोणी कागाळ्या करणारे, वातावरण गढूळ करणारे अथवा इतर जे काही ध्येयधोरणांमधे सांगितलेल्याशी विसंगत लिहीत असेल तर आम्ही त्या लेखात/चर्चेत/प्रतिसादांत वगैरेत भाग घेणार नाही असे देखील सदस्यांनी ठरवले तर उद्या संपादक मंडळाची गरजच भासणार नाही!
अहो इथेच तर वांदा आहे ना. ह्यावर एकमत झाले तर मतभेद होणारच नाही. प्रश्न उठणारच नाहीत. फक्त उदाहरणादाखल (माझे प्रतिसाद उडवायचे असतील तर उडवा भले, पण माझ्या प्रतिसादांत काय चुक आहे हे मला कळले तर तसले प्रतिसाद मी पुन्हा देणार तरी नाही म्हणुन प्रश्न) आता माझे 'काय इनोदी लिहुन राह्यले' किंवा 'राजे पुणेरी नाही' ह्य प्रतिसादांत धोरणांचे उल्लंघन कुठे होत आहे हे मला काही कळत नाहीए. आता मी काय करु? हे असे माझ्या बाबतीत वारंवार होत असेल तर मी प्रश्न विचारु नये का? वगैरे मतभेदाचे मुद्दे आहेत. म्हणुन तक्रारनिवारणाची सोय हवी असे वाटते. मी मागे केलेल्या तक्रारींचे निवारण झालेले नाही. (किंवा मी मुद्दाम त्रास देतो असा माझ्यावर आरोपही झालेला नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

पुढच्या वाटचालीसंदर्भात

विकास
Wed, 07/14/2010 - 01:14 नवीन
वर एका ठिकाणी चतुरंगने म्हणल्याप्रमाणे going forward ही ध्येयधोरणे वापरावीत. त्याचा संदर्भ हा आधीच्या गोष्टींसाठी वापरू नये असे वाटते. त्याच संदर्भात, जर कधी काही खटकले तर संपादक मंडळाला अवश्य व्य.नि. करावा. बाकी माझा मूळ मुद्दा जरा वेगळा होता. एखाद्या सदस्याने चालू केलेल्या कागळ्यांकडे इतर सदस्यांनी लक्षात आल्यावर देखील, अशा लेखनास प्रोत्साहन द्यावे का नाही या संदर्भात माझे विधान होते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा