लाल सिंग चढ्ढा

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
14 Aug 2022 - 2:58 pm

बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.

काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला.

सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो.

सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात.

जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात.

सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!

कलासमीक्षामाध्यमवेध

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

17 Aug 2022 - 11:04 am | सुबोध खरे

आँ

मंदिर वही बनायेंगे

तारीख नाही बतायेंगे

हे उच्च रवाने ओरडल्यानंतर मंदिर निर्मिती दृष्टी टप्प्यात आल्यावर दातखिळी बसलेले लोक

परत सक्रिय झालेले दिसतात

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

18 Aug 2022 - 4:08 am | हणमंतअण्णा शंकर...

एकदा प्रतिगाम्यांनी काय करायचं असतं किंवा काय करत असतात ते तरी उलगडून सांगा. पुरोगामी लोकांचा स्थायीभाव भेकडपणा आहे हे मान्य करू.

मग प्रतिगामी लोक कसे भेकड नाहीत तेही सांगा. मुळात भेकड पुरोगामी सोडून दुसरे कोणते गामी असतात हे तरी तुम्हाला मान्य आहे का सांगा.

म्हणजे तुम्हाला नेमकं हवं तरी काय आहे?

या प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर एखाद्याला प्रतिगामी म्हणायचं की पुरोगामी? या गोष्टींचे माईल्डर वर्जन असेल तर काय म्हणणार?

१. मला स्त्रीशिक्षण, विधवापुनर्विवाह वगैरे अजिबात मान्य नाही. स्त्रियांनी मुळात शिकायचीही गरज नाही. त्यांनी चूल आणि मूल सांभाळलेलंच बरं. बालविवाह तर बेस्टच.
२. जात हा भारतीय समाजव्यवस्थेचा मानबिंदू आहे. माझी जात नि:संशय श्रेष्ठ आहे. माझी विष्ठा साफ करण्याची जबाबदारी इश्वरानेच काही जातींना दिली आहे हे मला पुरेपूर पटले आहे.
२. गड्या आपला आयुर्वेदच बरा. (पण एनिमा वगैरे नको बरंका, तिथे काहीतरी खुपसायचे हे जरा जास्तच होतंय). आधुनिक वैद्यक वगैरे थोतांडाच्या नादी लागलेलं वाईटच. शिवाय आप्ल्या पूर्वजांनी टेस्ट ट्यूब बेबी वगैरे तर ५००० वर्षांपूर्वीच करून ठेवलं आहे.
३. माझी मुलं गे वगैरे झाली तर मी त्यांचा जीवच घेईन. असली पैदासच नको. सरकारने तर अशा लोकांची लिंगे जाहीरपणे कापली पाहिजेत.
४. वैज्ञानिक दृष्टिकोण वगैरे काय आचरटपणा असतो? ग्रह गोलांचा मानवी जीवनावर परिणाम घडतच असेल.
५. इस्लाम हा मानवी अस्तित्त्वाला लागलेला कलंक आहेच. परंतू त्याच्यावर एकच उपाय. विश्वगुरु भारताने आधी एकेक करत अखंड भारत पार जावा-सुमात्रा पर्यंत ते काबूल कंदाहार पर्यंत केला पाहिजे. आणि मग सौदी अरेबिया वगैरे काबीजकरून सगळीकडे हनुमानाची मंदिरे बांधली पाहिजेत. ते एकेश्वरवाद वगैरे सोडून द्यायला पाहिजे. वाटल्यास ते एकेश्वरवाद वगैरे स्वीकारू शकतात पण अट एकच शूद्र म्हणून त्यांनी आमची वर्णव्यवस्था निमूटपणे मान्य केली पाहिजे.
६. ७० वर्षांत केवळ आमच्या जीवावरच आम्ही जगलो. सरकारचा एक पैसाही स्वतःवर खर्च करू दिला नाही. शिक्षण वगैरे सगळं स्वतःच्या खाजगी पैशांनी झालंय. कॉंग्रेससारख्या भिकारचोट पक्षाने चालवलेल्या सरकारकडून पैसे घ्यायचे म्हणजे महापाप. २०१४ नंतरच खरे स्वातंत्र्य मिळाले.

सुबोध खरे's picture

18 Aug 2022 - 10:28 am | सुबोध खरे

तुम्ही एकदम डावे नसलात तर एकदम उजवेच असले पाहिजे हा हट्टाग्रह कशासाठी?

१. मला स्त्रीशिक्षण, विधवापुनर्विवाह वगैरे अजिबात मान्य नाही. स्त्रियांनी मुळात शिकायचीही गरज नाही. त्यांनी चूल आणि मूल सांभाळलेलंच बरं. बालविवाह तर बेस्टच.

असे कोणता माणूस म्हणालाय? माझी आई शाळेची मुख्याध्यापिका होती. तिचे एम ए बी एड हे शिक्षणसुद्धा आमच्या जन्मानंतर केलेले.

२. जात हा भारतीय समाजव्यवस्थेचा मानबिंदू आहे. माझी जात नि:संशय श्रेष्ठ आहे. माझी विष्ठा साफ करण्याची जबाबदारी इश्वरानेच काही जातींना दिली आहे हे मला पुरेपूर पटले आहे.

असे कोणता माणूस म्हणालाय?

२. गड्या आपला आयुर्वेदच बरा. (पण एनिमा वगैरे नको बरंका, तिथे काहीतरी खुपसायचे हे जरा जास्तच होतंय). आधुनिक वैद्यक वगैरे थोतांडाच्या नादी लागलेलं वाईटच. शिवाय आप्ल्या पूर्वजांनी टेस्ट ट्यूब बेबी वगैरे तर ५००० वर्षांपूर्वीच करून ठेवलं आहे.

मी स्वतः आधुनिक वैद्यकाचा एम बी बी एस, एम डी आहे आणि अजून तरी आमच्या घरच्या कोणत्याही आजारपणासाठी आधुनिकच औषधे घेतलेली आहेत.

३. माझी मुलं गे वगैरे झाली तर मी त्यांचा जीवच घेईन. असली पैदासच नको. सरकारने तर अशा लोकांची लिंगे जाहीरपणे कापली पाहिजेत.

असे कोणता माणूस म्हणालाय? गे म्हणजे काय हे तुम्हाला नीट समजलंय का? आधुनिक वैद्यकशास्त्रात त्याबद्दल काय लिहिलंय हे एकदा वाचून पहा आणि मग अशी बेफाट वक्तव्ये करा

४. वैज्ञानिक दृष्टिकोण वगैरे काय आचरटपणा असतो? ग्रह गोलांचा मानवी जीवनावर परिणाम घडतच असेल.

माझा ज्योतिष शास्त्रावर विश्वास नाही. आणि आमची आई ४५ दिवस व्हेंटी लेटर वर होती तेंव्हा मी कोणत्याही देवळात किंवा ज्योतिषाकडे गेलो नव्हतो.

५. इस्लाम हा मानवी अस्तित्त्वाला लागलेला कलंक आहेच. परंतू त्याच्यावर एकच उपाय. विश्वगुरु भारताने आधी एकेक करत अखंड भारत पार जावा-सुमात्रा पर्यंत ते काबूल कंदाहार पर्यंत केला पाहिजे. आणि मग सौदी अरेबिया वगैरे काबीजकरून सगळीकडे हनुमानाची मंदिरे बांधली पाहिजेत. ते एकेश्वरवाद वगैरे सोडून द्यायला पाहिजे. वाटल्यास ते एकेश्वरवाद वगैरे स्वीकारू शकतात पण अट एकच शूद्र म्हणून त्यांनी आमची वर्णव्यवस्था निमूटपणे मान्य केली पाहिजे.

असे कोणता माणूस म्हणालाय?इस्लामच काय कोणताही धर्म हा केवळ घरापुरताच मर्यादित असायला हवा. आणि सगळ्या मदरशात सरकारी शाळेत किंवा कॉन्व्हेंट मध्ये धार्मिक शिक्षण बंद करून केवळ शास्त्रीय शिक्षणच दिले पाहिजे याबद्दल मी आग्रही आहे.

६. ७० वर्षांत केवळ आमच्या जीवावरच आम्ही जगलो. सरकारचा एक पैसाही स्वतःवर खर्च करू दिला नाही. शिक्षण वगैरे सगळं स्वतःच्या खाजगी पैशांनी झालंय. कॉंग्रेससारख्या भिकारचोट पक्षाने चालवलेल्या सरकारकडून पैसे घ्यायचे म्हणजे महापाप. २०१४ नंतरच खरे स्वातंत्र्य मिळाले.

७० वर्षे भारत हि काय काँग्रेसच्या बापाची जहागीर होती का? कि सर्व शिक्षण संस्था काँग्रेसने आपल्या पैशातून निर्माण केल्या.
कॉन्ग्रेस हा हत्ती नसून माहूत होता पण आपणच हत्ती आहोत असा खोटा दंभ निर्माण त्यांनी केला आणि तुमच्यासारखे लोक त्याला बळी पडले.

खा खा पैसे खाल्ल्यावर जनतेने त्यांना माहुतपदावरून हाकलले आहे आणि श्री मोदी याना बसवले आहे. उद्या श्री मोदी हे डोईजड झाले तर जनता त्यांना सुद्धा पायउतार करायला लावून दुसऱ्याला बसवतील.

मुळात सध्या असलेली काँग्रेस हि स्वातंत्र्याच्या वेळची काँग्रेस नाहीच इंदिराजीनि स्थापन केलेल्या काँग्रेसने तिचे तिच्या इतिहासासकट अपहरण केले आहे. हा इतिहास वाचला नसेल तर वाचूनही घ्या

आम्ही शिक्षण घेतले ते भारतीय जनतेच्या पैशातूनच काँग्रेसच्या खैरातीतून नाही. माझ्या बद्दल म्हणाल तर मला ४ थी आणि ७ वि ची शिष्यवृत्तीची मिळाली होती. एम बी बी एस आणि एम डी लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातून झाले ज्यासाठी मी कायम लष्करात नोकरी करण्याचा (permanent commission) बॉण्ड लिहून दिला होता तेंव्हा माझ्या वर कुणाचे हि उपकार नाहीत.

बाकी आपला प्रतिसाद टिपिकल अज्ञानजन्य आणि द्वेषमूलक असून उजवा माणूस म्हणजे पुराणमतवादी, आधुनिक विज्ञानाचा द्वेष्टा, जुन्या जमान्यत रमणारा अशी एक मनात प्रतिमा निर्माण केल्यामुळे झापडबंद असा आलेला आहे.

कम्युनिस्ट माणसांना जसे आपण सोडून सगळे क्रांतीचे विरोधक आणि बुर्ज्वा वाटतात तसे स्वयंघोषित पुरोगामी हे निधर्मांधतेचा अतिरेक करणारेच दिसतात.

माझा प्रतिसाद हा अशा निधर्मांध स्वयंघोषित पुरोगामी माणसांबद्दल होता परंतु तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणून एवढे स्पष्टीकरण दिले

अन्यथा तुमचे पूर्वग्रह आणि तुमचे चष्मे तसेच राहू द्या.

अगम्य's picture

17 Aug 2022 - 1:39 pm | अगम्य

काही जण म्हणत आहेत की चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही. बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला आहे की लाल सिंग चड्डा वर बहिष्काराचे आवाहन त्या चित्रपटातील काही आक्षेपार्ह content मुळे करण्यात आले आहे. परंतु बहिष्काराचे आवाहन करणाऱ्या बहुतेकांच्या मते, ह्या चित्रपटाचा कन्टेन्ट कसा आहे हा मुद्दा नाहीच (किंवा असलाच तर तो आणखी एक वेगळा मुद्दा आहे). आमिर खान च्या चित्रपटावर बहिष्काराचे आवाहन त्याने पूर्वी केलेल्या राजकीय वक्तव्यांमुळे करण्यात आले आहे.
त्याची वक्तव्ये:
१) मोदींना २००२ च्या नरसंहारासाठी जबाबदार धरणे: https://www.freepressjournal.in/india/when-aamir-khan-slammed-modi-over-...
२) भारतात असुरक्षितता वाढत असल्याचे सांगणे : https://www.youtube.com/watch?v=eQiabMknhTU
३) भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या तुर्कस्तानच्या पंतप्रधानांच्या पत्नीला जाऊन भेटणे: https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/politics-aamir-khan-emi...
४) PK ह्या सिनेमात फक्त हिंदू धर्माची टवाळी करणे, पर्यायाने इतर धर्मांच्या तुलनेत हिंदू धर्म वाईट दाखवणे.
तसेच करिनावर सुद्धा करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे!

तर आमिर खानला राजकीय वक्तव्ये करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे . त्याचप्रमाणे त्याचे कुठलेही वक्तव्य किंवा कृती आवडली नसल्यास, ते न आवडणाऱ्या लोकांना त्याच्या सिनेमाला न जाण्याचा, तसेच इतरांनाही न जाण्याचे शांततापूर्ण आवाहन करण्याचा अधिकार आहे (अर्थात सिनेमाला जाणाऱ्या लोकांना मारणे, धमकावणे वगैरे मार्ग ना चोखाळता).
हे काहीसे नाना पाटेकरवर मी टू चा आरोप झालेला आहे म्हणून मी त्याचा चिपत्रपट पाहणार नाही. किंवा सलमान खानने लोकांना गाडीखाली उडविले असावे (जरी कोर्टात तो निर्दोष सिद्ध झाला) म्हणून मी त्याचा चिपत्रपट पाहणार नाही. अशासारखे आहे.
तर मला समजल्याप्रमाणे भूमिका काय आहे हे मी फक्त इतरांना कळावे म्हणून जनहितार्थ मांडले आहे. ते खरे/खोटे चूक/बरोबर ह्याबद्दल मी मत मांडलेले नाही.

कानडाऊ योगेशु's picture

17 Aug 2022 - 4:25 pm | कानडाऊ योगेशु

>>तसेच करिनावर सुद्धा करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे!
एरवी चढ्ढा मी चित्रपट गृहात पाहुन तसाही पाहिला नसता. (चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहण्यासाठी उतावीळ होण्याचे वय केव्हाच मागे पडले.). पण जर संधी आली असतीच तर केवळ करिना कपूर-खान ह्या तोंडाळ अभिनेत्रीमुळे तो नक्कीच पाहिला नसता. भले तिने कितीही मदर इंडिया टाईप अभिनय केला असो. प्रेक्षकांना गृहीत धरणारा कोणताही कलाकार जाम डोक्यात जातो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Aug 2022 - 2:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bycot

चित्रसौजन्य : मिपाकर किसन शिंदे

-दिलीप बिरुटे

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 3:18 pm | जेम्स वांड

तुम्ही बसा सगळे इथे इस्लाम मधील अंधश्रद्धा, ७० वर्षे, बॉयकॉट अन् सिनेमा सारख्या इतर सगळ्याला विषयांना शिव्या घालत

तिकडे केंद्र सरकारने रोहिंग्याया मुसलमान शरणार्थी लोकांना आसरा द्यायचा निर्णय केला फायनल, दिल्लीत रोहिंग्या निर्वासितांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत कोट्यातील फ्लॅट, मूलभूत सुविधा आणि २४/७ दिल्ली पोलिस प्रोटेक्शन देणार आहे सरकार.

समर्थक अन् विरोधक दोघांचे अभिनंदन

सोत्रीने काही पाप केले नाही सिनेमा पाहून म्हणजे

&#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

18 Aug 2022 - 3:38 am | हणमंतअण्णा शंकर...

आता खरे साहेब मोदींना पुरोगामी (भेकड) वगैरे म्हणणार की काय मग? चक्क रोहिंग्या? निदान ते अहमदिया तरी घ्यायचे.. मोदींनाच बायकॉट करण्याची वेळ आली म्हणजे. पुरोगामी कुठले!

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 6:03 am | जेम्स वांड

भाजपच्या हैदराबाद मध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आदरणीय मोदींनी "पासमंदा मुसलमान" उर्फ मुस्लिम जातीय उतरंडीत असणाऱ्या खालच्या जातीतील किंवा ओबीसी मुसलमानांना आपलेसे करा असा गुरुमंत्र दिला आहे.

त्या बरहुकुम ही रणनीती बनली आहे म्हणतात बुआ
.

आता ऑप इंडियाला कळते ते मोदींना कळत नाही का मोदींना लिब्रांडू वगैरे म्हणायचे तितके उत्तर मिळाले का जरा स्पष्ट होईल चित्र.

हे सगळे सुरू असताना भाजप दिल्ली ने मात्र आपल्या कार्यक्षमतेचा पूर्ण परिचय देत एक पासमंदा रीच आऊट प्रोग्राम केला म्हणतात ५ ऑगस्टला

यश राज's picture

17 Aug 2022 - 3:31 pm | यश राज

येन केन प्रकारेण लाल सिंह चढ्ढा डब्ब्यात गेल्यामुळे बॉयकॉट गँग खुश आहेच. त्यांना आता जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही.
पण सगळ्यात जास्त गोची लाल सिंह चढ्ढा ला सपोर्ट करणार्यांची झाली आहे. कारणे.
१. चित्रपट कसा चांगला आहे त्याबद्दल भरभरुन सांगावं लागतयं
२. त्याबरोबर चित्रपट आपटलाय पण त्याचं क्रेडीट बॉयकॉट गँग ला न देता सुमार चित्रपट असल्यामुळे चित्रपट कोसळु शकतो हे सांगावं लागतयं. त्यामुळे मुळात वरचा मुद्दा १ बाद होतो.
३. अगोदर हवेत असलेल्या अमिर/करीना सारख्यंना आता प्रेक्षकांसाठी भवनिक आवाहन करावे लागतेय.
४. आजुन काही जणांचे मत ऐकले की. जर हा चित्रपट पडला तर नुकसान मोदींच्या मित्राचे म्हणजे अंबानींच्या वायकॉम१८ कंपनीचे होइल पण मग अमिरचा चित्रपट पाहण्याचे आवाहन करताना मग मोदींच्या मित्राचा फायदा होईल याने हे लोकच जास्त दुखी झाले पाहीजेत.
५. वरील एका प्रतिसादात आल्याप्रमाणे सध्या इकॉनॉमी चे ल लावले असल्याने लोक थिएटर मध्ये जाऊन पैसे खर्च करत नाहीत,तर मग सध्या जे इतर चित्रपट सुपरहीट झालेत ते कशामूळे? आणि बाकीच्या चैनीच्या गोष्टी कशा परवडतात?
६. स्वलालधन्य परफेकट्निष्ट आमिर ला जसे लोकांनी डोक्यावर चढवले होते तसेच ते त्याला त्याच्या मग्रुरी मुळे खाली पाडु शकतात हे सिध्द झाले आहे आणि हा सगळ्या बोलघेवड्या सेलिब्रिटिजना मोठा धडा आहेच. समाजात वावरताना भान ठेवुन व्यक्त व्हावे लागते हे त्यांना समजावुन घ्यावे लागेल. पण हे ते करतील अशी अपे़क्षा करणे पण चुकीचे आहेच.

लाल सिंह चढ्ढा आपट्ल्याने त्यातल्यात्यात अगोदर हवेत असणारे इतर कलाकार आता तंतरल्याने भावनिक आवाहन करु लागलेत

डँबिस००७'s picture

17 Aug 2022 - 5:59 pm | डँबिस००७

यश राज

१००००००००००००% सहमत !!

डँबिस००७'s picture

17 Aug 2022 - 6:10 pm | डँबिस००७

केंद्र सरकारने रोहिंग्याया मुसलमान शरणार्थी लोकांना आसरा द्यायचा निर्णय केला
समर्थक अन् विरोधक दोघांचे अभिनंदन !!

माझ्या मते केंद्र सरकारने हे चुकीच पाऊल ऊचलल आहे. सापाला दुध पाजल तरीही तो डसायच सोडत नाही ! ह्याचा अनुभव म्यानमार ( बर्मा ) सारख्या बुद्ध धर्मीय देशाने घेतल्याने त्यांनी ह्या रोहींग्यांना देशाबाहेर हकलल आहे. रोहीग्यांचा मुळ देश बांग्लादेशच सुद्धा त्यांना परत घेत नाहीय. भारताने त्यांना परत घेऊन आपल्या पायावर धोंडा पाडुन घेतलेला आहे. पश्चातापाची वेळ लवकरच येईल.

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 6:30 pm | जेम्स वांड

ह्या बाबतीत पण कृषी कायद्यांच्या प्रमाणेच कन्फ्युज दिसते आहे, एक मंत्री ट्विट करून म्हणतो की त्यांना फ्लॅट आणि निर्वासित दर्जा देणार, दुसरे मंत्रालय म्हणते की बुआ नाही असे काहीच नाही, ते बेकायदेशीर असतीलच अन् deport पण होतीलच, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही असली गत म्हणायची एकंदरीत.

मला वाटते चित्रपटाचा दर्जा आणि त्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन यात काही संबंध नाही.

चित्रपट निर्मितीत महत्वाची भूमिका असलेल्या काही प्रथितयश कलावंतांनी प्रेक्षकांना गृहीत धरून समाजातल्या एका मोठ्या वर्गाला आपण कितीही दुखावले, अवमानित केले किंवा सातत्याने खिल्ली उडवली तरी आपले काही वाकडे होत नाही असा गोड गैरसमज करून घेतल्याने त्यांना योग्य ती समज यावी या दृष्टीने बहिष्काराचे आवाहन करण्यात आले होते/ आहे. बाकी चू.भू.दे.घे.

चौकस२१२'s picture

18 Aug 2022 - 5:08 am | चौकस२१२

प्रेक्षकांना गृहीत धरून समाजातल्या एका मोठ्या वर्गाला आपण कितीही दुखावले, अवमानित केले किंवा सातत्याने खिल्ली उडवली तरी आपले काही वाकडे होत नाही असा गोड गैरसमज करून घेतल्याने त्यांना योग्य ती समज यावी या दृष्टीने बहिष्काराचे आवाहन करण्यात आले होते/ आहे.

अगदी हेच हेच .... हे आवाहन प्रतीकात्मक आहे
सतत चित्रपट/ जाहिराती यातून "वाईट प्रवृत्ती ती फक्त हिंदूत आहे" असे दाखवयाचे किंवा अतिशय सुक्ष्म पणे हा मुद्दा रेटायचा
किंवा सतत हिंदूत कसा वर्णभेद आहे हे रेटत राहायचे हा "अजेंडा" आहे आणि तो लोकांनां कळून चुकला आहे म्हणून लोक ( कधी कधी मानवतेला धरून नसेल तरी) असे आवाहन चालवतात ...
फारच थोडे कला निर्माते समाजातील हिंदू नसलेले समाज कसे देशात धर्मबदलाला प्रौढसं देत आहेत ते दाखवतात
पण आपलेच हिंदू डोळे झाकून बसतात

हे उदाहरण बघा... https://www.youtube.com/watch?v=MSprAZJWf18

दिग्दर्शकाने हिंमत दाखवली आहे यात, कि जेवहा ख्रिस्ती मिशनरी शाळा एका हिंदू बहुजन गरीब पालकाला त्याच्या मुल सध्या जात असलेल्या शाळेत उच्च जात त्याला डावलते आहे वैगरे न्यानामृत पाजत असते
त्यावर तो बहुजण बाप आणि त्याची बायको त्या मिशनरी ल शालजोड्यातील ठेवून देतात बघा नक्की

आमिर खानने "कौन बनेगा करोडपती" कार्यक्रमात तो "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान आहे हे दाखवुन दिलेच.

नक्की काय झाले हे बघण्याकरिता मी हा भाग पाहिला.
दुवा sonyliv.com वर लॉगिन करुन ही छोटीशी चित्रफीत मोफत बघता येईल
यात ०३:२० नंतर असे दिसते की स्पर्धक म्हणून आलेल्या कर्नल मिताली ह्यांच्या सन्मानार्थ अमिताभ त्यांना सलाम करण्याचे सर्वांनाआवाहन करतात. अमिताभ स्वतः उभे राहून कर्नल मितालींना सलाम करतात व तसेच प्रेक्षकही सलाम करतात तर हा सलाम स्वीकारुन मितालीजी ही सलाम करत आहेत. तर स्पर्धक म्हणून आलेला आमिर खान मितालीजींच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवत आहे. आमिर खानने सलाम न करता टाळ्या वाजवल्यात हे काहीसे चुकीचे वाटू शकते - खासकरुन इतर सर्वजण त्यांना सलाम करत असताना .. तरी हा सलाम झेंड्याला नसून कर्नल मितालीजींसाठी आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे. त्यानंतर प्रेक्षकांतून भारत माता की अशी साद आल्यावर आमिर खान सुद्धा "जय" म्हणताना दिसत आहे. तर त्यानंतरचा "वंदे मातरम" चा जयघोष फक्त प्रेक्षकांतून आलेला आहे. अमिताभ, मितालीजी वा आमिर खान त्यावेळी पुन्हा स्थानापन्न होत आहेत व तिघेही "वंदे मातरम" म्हणताना दिसत नाहीत.

यात आमिर खान "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान असल्याचे त्याने दाखवून दिले असे कुठे जाणवते ?

डँबिस००७'s picture

17 Aug 2022 - 10:11 pm | डँबिस००७

तर्कवादी,
तुमच म्हणण पटल. आमिर खान हा खुप चांगला अभिनेता तर आहेच पण खुप चांगला माणुस सुद्धा आहे. वंदे मातरम , झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक असल्याने त्याबद्दल आमिर खानला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
भारताचे उप राष्ट्रपती आपल्या पदावर असताना १५ अँगस्टला झेंडावंदनाच्या वेळी झेंड्याला सलाम करत नाहीत हे भारतीय जनतेने पचवले आहे मग आमिर खान का नाही. झेंड्याला सलाम करण्याच्या आड ईस्लाम येतो म्हणे, दुसर कारण असेल तर मला माहिती नाही, पण पाकिस्तानातल्या मुसलमान लोकांना झेंड्याला सलाम करताना ईस्लाम कसा आड येत नाही ?

आमिर खानचा बहीष्कार करणारे आमच्या सारखे लोक मुर्ख आहेत. आमिर खानने कधीही हिंदु देवी देवतांचा अपमान केलेला नाही. आमिर खान ज्या सिनेमात काम करतो त्यामुळे हिंदू देवी देवतांचा अपमान होत असेल तर त्याला जवाबदार सिनेमाचे निर्माते, निर्देशक लेखक असावेत. अभिनेता जवाबदार नसतो. सिनेमे निर्माण करणारे हिंदुच्या भावना दुखावणारे असतात जे नेहमी पडद्या आड असतात. त्यामुळे आमिर खान सारख्या निष्पाप माणसाला दुखण्याच पाप हिंदुंनी करु नये !!
माझ्या मते ला सिं च चा बहीष्कार हा सिनेमाचा बहीष्कार होता, पर्यायाने बहिष्कारामूळे सिनेमा निर्माते, निर्देशक वैगेरे प्रभावीत झालेले असणार मग आमिर खान ह्या बहिष्काराने दुःख्खी का झाला ?

जर कोणत्याही सिनेमामुळे वा ईतर कारणामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तरी त्यांनी त्याची सवय घालुन घेतली पाहीजे.
मकबूल फिदा हुसेनने नाही का देवी सरस्वतीची निवस्र प्रतिमा रेखली होती ? तुमच्या नाकावर टिच्चुन तो कतार मध्ये जाउन राहीला.
जर कोणी आवाज उठवला किंवा समर्थन केले तर गळे कापले जातील. आता पर्यंत नूपुर शर्माच्या समर्थनात १८-२० वर गेलेले आहेत.

तर्कवादी's picture

17 Aug 2022 - 11:14 pm | तर्कवादी

डँबिसजी,

वंदे मातरम , झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक असल्याने त्याबद्दल आमिर खानला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.

तुम्ही माझे वाक्य बहुधा नीट वाचले नसावे.
तरी हा सलाम झेंड्याला नसून कर्नल मितालीजींसाठी आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे
आमिर खानने झेंड्याला सलाम केला नाही असे अजून तरी निरीक्षणात आलेले नाही. त्यामुळे तुमचा मुद्दाच गैरलागू होतो.

आमिर खान ज्या सिनेमात काम करतो त्यामुळे हिंदू देवी देवतांचा अपमान होत असेल तर त्याला जवाबदार सिनेमाचे निर्माते, निर्देशक लेखक असावेत

अर्थातच !!
बाकी उपराष्ट्रपती, मकबूल फिदा हुसेन ई लोक हे धागाविषयाशी संबंधित नाहीत. त्यांच्याबद्दल काही धागा असल्यास तिथे चर्चा करुयात.

तर्कवादी's picture

17 Aug 2022 - 11:23 pm | तर्कवादी

माझ्या मते ला सिं च चा बहीष्कार हा सिनेमाचा बहीष्कार होता, पर्यायाने बहिष्कारामूळे सिनेमा निर्माते, निर्देशक वैगेरे प्रभावीत झालेले असणार मग आमिर खान ह्या बहिष्काराने दुःख्खी का झाला ?

आमिर खान दु:खी झाला की नाही झाला याबद्दल मला माहित नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काही सांगता येणार नाही. आणि तसेही आमिर खानच्या वैयक्तिक सुख दु:खाशी मला काही देणे घेणे नाही. आमिर खानचा मी खास चाहता आहे असंही नाही. पण एक विशिष्ट प्रोपागंडाद्वारे समाजात द्वेषाचे राजकारण केले जात असेल तर माझा त्याला विरोध आहे.
बघा पटतंय का...

डँबिस००७'s picture

18 Aug 2022 - 1:25 am | डँबिस००७

पण एक विशिष्ट प्रोपागंडाद्वारे समाजात द्वेषाचे राजकारण केले जात असेल तर माझा त्याला विरोध आहे.

१०० % पटल बुवा !

हिंदु समाज द्वेषाचे राजकारण करत असुन त्याला विरोध करायलाच पाहीजे हे तुमचे म्हणणे अगदी बरोबरच आहे.

तर्कवादी's picture

18 Aug 2022 - 12:36 pm | तर्कवादी

हिंदु समाज द्वेषाचे राजकारण करत असुन त्याला विरोध करायलाच पाहीजे हे तुमचे म्हणणे अगदी बरोबरच आहे.

कोणताही समाज वाईट नाही. पण मूठभर समाजकंटक कोणत्याही समाजात असू शकतात. त्यांचा विरोध करायला हवा. आणि अशा लोकांच्या द्वेषपुर्ण प्रोपागंडामुळे इतर लोकांचा थोड्याफार प्रमाणात बुद्धीभेद होण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रोपागंडाचा विरोध करावा.
असो. नवीन काही मुद्दा पुढे आला तर आणखी चर्चा होईलच. तोपर्यंत माझ्याकडून विराम.
धन्यवाद.

चौकस२१२'s picture

18 Aug 2022 - 4:56 am | चौकस२१२

झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक
आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाचाय झेंड्याला निदान महत्वाच्या दिवशी ( उठसुठ नव्हे) मानवंदना न देणे हे वयक्तिक ?
अश्या दिवशी सार्वजनिक समारंभाला जायलाच पाहिजे असे मी नाही म्हणत पण जर गेला असाल तर मान हा राखायला नको ?
धर्माचा काही संबंध नाही आणि असेल असे जो म्हणत असेल तर मग त्या व्यक्तीला ( उप राष्ट्रपती ) देशापेक्षा धर्म मोठा वाटतो .. हे स्पष्ट आहे
गडबड आहे मग
जनता पक्षात जनसंघ विलीन झाला तेवहा सांजवाद्यांनी जनसंघाच्या लोकांनां विचारले कि तुमची देहरी निष्ठा आहे मग त्याचाच समाजवाद्यांना हि दुहेरी निष्ठा पटते?
धन्य

उपराष्ट्रपती जेव्हा principal dignitary नसतो तेव्हा त्याने सैल्युट न करता अटेँशन पोझिशन मधे उभे राहणे असा प्रोटोकॉल आहे. जेव्हा राष्ट्रपती उपस्थित असतात तेव्हा राष्ट्रपती सैल्युट करतात. जेव्हा फक्त उपराष्ट्रपती हा principal dignitary असतो तेव्हाच तो सैल्युट करतो.

अन्सारी आडनाव नसते तर हे निरीक्षण नोंदवले जात नाही. असले की व्हायरल होते.

बाकी इतर काही असो, धिस इज ओन्ली टू बी फेअर विथ द देन व्हाईस प्रेसिंडेंट.

चौकस२१२'s picture

18 Aug 2022 - 6:28 am | चौकस२१२

.... असा प्रोटोकॉल आहे

ठीक आहे तांत्रिक दृष्ट्या तुम्ही म्हणता ते असेल १००% बरोबर
पण " ते केवळ अन्सारी" आहेत म्हणून टीका करतो असे नाही ,, अन्सारी साहेबांची इतर वक्त्यवे आणि त्यामागील वृत्ती हे पण बघावी

म्हणूनच बाकी इतर काही असो, असे म्हटले. मला जेवढे माहीत तेवढे म्हणालो.

हे तुम्हाला उद्देशून नाही. इन जनरल, माझे म्हणणे असे की समजा, समजा, समजा, कोणाच्या मताप्रमाणे एक आख्खा धर्म खतरनाक असेल असे केवळ वादापुरते गृहीत धरले तरी जेव्हा आधीच गच्च गर्दी, अस्थिरता, रेटारेटी असते, तापलेली डोकी असतात तेव्हा "जनहितार्थ" सहज (व्हाट)साप साप म्हणून ओरडण्यापूर्वी किमान आत्ता दिसतेय ते नक्की सापच आहे, दोरी नाही इतके तरी पहावे इतकेच.

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 6:31 am | जेम्स वांड

काय राव उत्तम नरेटिव सेट करण्याचा मूलभूत राजकीय अडाणीपणाचा हक्क तुम्ही असे कसे नाकारू शकता आम्हाला !?

आता आमिर खान ने नाही केला त्या कर्नलला सल्युट, त्यावर एक निवृत्त कर्नल खालील विधान करतात

.

पण तुम्ही बघितले नसेल, आमिर तिथे पगडी घालून उभा होता नई का ? अन् तरीही सल्युट न करता अंगविक्षेप करत नाचत होता, तुम्ही बघितले नाहीत कारण तुम्हीच मूलतः लीब्रांडू आहात गवि.

बाकी, काय असलं काही पोस्ट केलं का आमिरने कर्नलला सल्युट केला नाही ह्यात कर्नल ऐवजी झेंडा भरू रिकाम्या जागी, मग झेंड्याचा प्रोटोकॉल शोधत बसा तुम्ही, तोवर आम्ही थोडा कार्यभाग साधून घेऊ.

गवि's picture

18 Aug 2022 - 6:46 am | गवि

ह्य ह्य ह्य.. :=))

आमिर तिथे पगडी घालून उभा होता नई का ? अन् तरीही सल्युट न करता अंगविक्षेप करत नाचत होता, तुम्ही बघितले नाहीत
शो मध्ये अमिताभ बच्चन सॅल्युट करण्याचे "आवाहन" करतो, या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन अमिताभ सकट सगळे सॅल्युट करतात. आता तुम्ही म्हणता तसे आमिर पगडी घालून उभा असावा आणि ती त्याच्या कानावर घट्ट बसलेली असावी ! त्यामुळे सॅल्युटच्या जागी तालिया हा शब्द देखील त्याने चुकुन ऐकला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही ! :)

जाता जाता :- कोणालाही हा प्रश्न आता पडणारच नाही की सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जागी सॅल्युट का केला ? :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Cover

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 11:44 am | जेम्स वांड

लाख लोकांनी चूक केली म्हणून चूक बरोबर करून घ्यायची का ?

मुळात बोडक्या डोक्याने, अंगात सिव्हिल कपडे असताना युनिफॉर्म परिधान केलेल्या अधिकाऱ्याला सल्युट करू नये असा प्रोटोकॉल असताना, तो करण्याचे सामूहिक आवाहन करणे चूक नाही का ?

बॉलिवूड मध्ये लष्करी गणवेशांचे विकृतीकरण करून उगाच काहीतरी गणवेश दाखवल्या बद्दल तर कैक मिपाकरांनी इथेच मिपावर आपला सात्विक संताप सर्थपणे आधीही व्यक्त केलाय न ? मग आता फक्त आमिर आहे म्हणून इतरांच्या सामूहिक चुकीचे समर्थन तरी नको.

मुळात बोडक्या डोक्याने, अंगात सिव्हिल कपडे असताना युनिफॉर्म परिधान केलेल्या अधिकाऱ्याला सल्युट करू नये असा प्रोटोकॉल असताना, तो करण्याचे सामूहिक आवाहन करणे चूक नाही का ?
प्रोटोकॉलचा मुद्दा मी अमान्य करत नाही, सगळेच प्रोटोकॉल सगळ्या लोकांना ठावूक असतात असे अजिबात नसते. अनेक वेळा प्रोटोकॉल मोडुन पंतप्रधान / तत्सम वरिष्ठ पदावरील व्यक्ती देखील येणार्‍या परदेशी व्यक्तींना भेटतात. इथे त्या व्यक्ती बद्धल विशेष आदर, जिव्हाळा उघडपणे दाखवणे ही भावना अभिप्रेत असते.
एक उदा देतो :- प्रोटोकॉल तोड़कर राष्ट्रपति जायद खुद रिसीव करने पहुंचे; मुलाकात के बाद मोदी भारत रवाना

मग आता फक्त आमिर आहे म्हणून इतरांच्या सामूहिक चुकीचे समर्थन तरी नको.
मी तर त्यांचा मोठा चाहता होतो. मी त्याचे चित्रपट आवार्जुन पाहिले आहे. त्याचा गझनी किमान ५-६ वेळा पाहिला आहे. परंतु आता तो मला त्याच्या तोच तोच चेहरापट्टी करुन अभिनय करतो ते आवडेनासे झाले आहे तसेच डॉक ने जे प्रतिसादात सांगितले आहे ते देखील मला अगदी तसेच वाटते.
वरती प्रोटोकॉल मोडण्याचे एक उदा. दिलेच आहे ते तुम्हाला समजेल अशी अपेक्षा करतो. जालावर शोधलेत तर अशी अनेक उदाहरणे सहज सापडतील.

असो... या धाग्यावर आता बराच कथ्या कुटुन झाला आहे, तेव्हा मी आता या धाग्यावर अधिकचे प्रतिसाद देणे बंद करतो, कंटाळा आला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Cover

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 1:16 pm | जेम्स वांड

अनेक वेळा प्रोटोकॉल मोडुन पंतप्रधान / तत्सम वरिष्ठ पदावरील व्यक्ती देखील येणार्‍या परदेशी व्यक्तींना भेटतात. इथे त्या व्यक्ती बद्धल विशेष आदर, जिव्हाळा उघडपणे दाखवणे ही भावना अभिप्रेत असते.

मी अतिमहत्वाच्या व्यक्तींनी प्रोटोकॉल तोडण्याबद्दल बोलतच नाहीये सर, तो भाग कैक वेळा डिप्लोमसीला पूरक असतो. मी सामान्य माणसांबद्दल बोलतोय. मला पण आशा आहे की आपण समजून घ्याल.

बाकी, तुम्ही आमिरचे फॅन होते, नव्हते, असाल, नसाल हे मला तरी मॅटर करत नाही, कारण मी मुळातच तुमच्याविषयी कुठलाही ग्रह करून घेत नाहीये, तर फक्त एक मुद्दा आहे तो मांडतोय अन् चर्चा करतोय, पण ठीक आहे, आपली ईच्छा असल्यास मी पण इथेच थांबतो.

सुबोध खरे's picture

18 Aug 2022 - 12:57 pm | सुबोध खरे

@जेम्स वांड
मुळात बोडक्या डोक्याने, अंगात सिव्हिल कपडे असताना युनिफॉर्म परिधान केलेल्या अधिकाऱ्याला सल्युट करू नये असा प्रोटोकॉल असताना
असा प्रोटोकॉल कुठे आहे हे मला दाखवता येईल का?

नौदलात १८ वर्षे मी डोक्यावर टोपी न घालता वरिष्ठांना सलाम करत असे किंवा कनिष्ठांचा सलाम स्वीकारत असे.

समर्थन करण्यासाठी किती टोकाला जावे याला सीमा असते का हो?

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 2:15 pm | जेम्स वांड

माफ करा, मी आत्ताच ओळखीतल्या एका नौदल अधिकारी असणाऱ्या माणसांकडून तुम्ही म्हणता ते कन्फर्म करून घेतलं, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, कोणीही सल्युट करू शकतो.

त्यामुळे मी इथे माझे प्रोटोकॉल संबंधी सगळे प्रतिसाद मागे घेऊन बिनशर्त माफी मागतो

स्पष्टीकरण:-

१९९९-२००० साली सीनिअर डिविजन राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट असताना एका उस्तादने असा सल्युट करता येत नसतो असे सांगितले होते, मी तेच बेसिस धरून चाललो होतो पण ते चूक होते हे आता स्पष्ट झाल्यामुळे मी पुन्हा एकदा माफी मागतो आपली.

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 2:25 pm | जेम्स वांड

समर्थन करण्यासाठी किती टोकाला जावे याला सीमा असते का हो?

तर, नाही असे नाही काहीच कारण कोणाचं समर्थन म्हणजे आमिर खानचे समर्थन करून मला काही खास प्राप्त होणार नाही, अगदी लाल सिंग चढ्ढा चे एखाद फुकट तिकीट पण नाही. ह्याची मी आपणांस निःसंदिग्ध ग्वाही देतो इथे.

उपलब्ध नॉलेज नुसार मला जो वाटला तो मुद्दा मी धरला, तो चूक होता हे आपण दाखवलं, मी ते मान्य केलं, सिंपल, मणभर इगो नाही कॅरी करत बुआ आपण. बाकी कोण्या अज्ञात लोकांच्या हेतुंवर शंका घेणे, वैयक्तिक शेरेबाजी, अजेंडा शोधण्याचे आव आणणे इत्यादी माझ्या संस्कारांच्या चौकटीत बसत नाही इतकी मात्र मी आपणांस हमी देऊ शकतो.

सुबोध खरे's picture

18 Aug 2022 - 12:47 pm | सुबोध खरे

काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच तुम्ही लिहायचं ठरवलंय असा दिसतं.

डोक्यावर टोपी असताना सलाम करणे हे केवळ थलसेनेला( आर्मी) आणि लागू असणारा नियम आहे. सामान्य नागरिकांनाच नव्हे तर नौदलात सुद्धा डोक्यावर टोपी नसताना सलाम करता येतो / करायचा असतो.

बाकी चालू द्या

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 2:28 pm | जेम्स वांड

काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच तुम्ही लिहायचं ठरवलंय असा दिसतं.

उपलब्ध नॉलेज नुसार मला जो वाटला तो मुद्दा मी
धरला, तो चूक होता हे आपण दाखवलं, मी ते मान्य केलं, सिंपल, मणभर इगो नाही कॅरी करत बुआ आपण. बाकी कोण्या अज्ञात लोकांच्या हेतुंवर शंका घेणे, वैयक्तिक शेरेबाजी, अजेंडा शोधण्याचे आव आणणे इत्यादी माझ्या संस्कारांच्या चौकटीत बसत नाही इतकी मात्र मी आपणांस हमी देऊ शकतो. :)

तर्कवादी's picture

18 Aug 2022 - 3:12 pm | तर्कवादी

तो चूक होता हे आपण दाखवलं, मी ते मान्य केलं, सिंपल, मणभर इगो नाही कॅरी करत बुआ आपण. बाकी कोण्या अज्ञात लोकांच्या हेतुंवर शंका घेणे, वैयक्तिक शेरेबाजी, अजेंडा शोधण्याचे आव आणणे इत्यादी माझ्या संस्कारांच्या चौकटीत बसत नाही इतकी मात्र मी आपणांस हमी देऊ शकतो. :)

जेम्स वांडजी

वा.. क्या बात.. मनापासून आवडले. सर्वच मिपाकरांनी अशाच वृत्तीने चर्चा केल्यात तर किती बरे होईल.

सुबोध खरे's picture

18 Aug 2022 - 1:11 pm | सुबोध खरे

@ गवि

प्रोटोकॉलचा प्रश्न सध्या बाजूला ठेवा

परंतु केव्हा एकदा नव्हे तर दोन वेळेस उपराष्ट्र्पती असली व्यक्ती जेंव्हा "मुसलमान या देशात सुरक्षित नाहीत" असे मुलाखतीत स्पष्टपणे म्हणतात

आणि त्याच्यासाठी कोणताही पुरावा किंवा स्पष्टीकरण देण्यास नकार देतात तेंव्हा अशा माणसाबद्दल संशय अधिकच बळावतो.

याचा "अन्सारी" आडनावाशी सम्बन्ध नाही. "कलाम" आडनावाच्या माणसाबद्दल असे कोणतेही प्रवाद ऐकल्याचे ठेवत नाही

हीच व्यक्ती इराण मध्ये राजदूत म्हणून असताना आपल्याच गुप्तहेर संघटनेच्या विरोधात कारवाई करतात तेंव्हा त्यांच्या राजनिष्ठेबद्दलही शंका निर्माण होते.
https://twitter.com/rawnksood/status/1144581538954145792?lang=en

https://www.sundayguardianlive.com/news/ex-raw-officers-want-pm-act-hami...

या माणसावर देशद्रोहाची कारवाई करावी असे तुमची गुप्तहेर संघटना मागणी करते असे असताना हे प्रकरण गंभीर नाही आणि त्यांच्या विरुद्ध अन्सारी आडनावामुळे असे होते हे आपल्याला म्हणायचे असेल तर मला काहीच म्हणायचे नाही

चालू द्या तुमचे

सर्व मान्य. मुद्दा जोपर्यंत फक्त सैल्युटचा होता आणि तितकाच हायलाईट करुन निष्कर्ष काढला होता तितक्यापुरते ते स्पष्टीकरण होते

अन्य सर्व आक्षेपार्ह कृत्ये निंद्य आहेत. ती पुढे आल्यास त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही.

डँबिस००७'s picture

18 Aug 2022 - 4:37 pm | डँबिस००७

गवि साहेब,
अन्सारी आडनाव नसते तर हे निरीक्षण नोंदवले जात नाही. असले की व्हायरल होते.
बाकी इतर काही असो, धिस इज ओन्ली टू बी फेअर विथ द देन व्हाईस प्रेसिंडेंट.

ह्या उप राष्ट्रपती हामिद अंसारी ने किती कांड केलेले आहेत हे बघितले तर तुम्हाला तुमचे वाक्य परत घ्यावे लागेल.

१. ईराण मध्ये राजदुत असताना भारताच्या रॉ अधिकार्यांना ह्यांने एक्स्पोज केले होते.
२. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर दोनच वर्षांत २०१० ला दिल्लीमध्ये भरवल्या जाणार्या "अ‍ॅंटि टेरेरीस्ट काँन्फेरेंस " साठी अ‍ॅंटि टेरेरीस्ट
स्ट्राटेजीवरचा एकस्पर्ट म्हणून पाकिस्तानच्या पत्रकार नुसरत मिर्झाला आमंत्रण पाठवायला ह्या
कॉनफेरेंसच्या आयोजकावर जबरदस्ती केलेली होती. त्या आयोजकांनी आपल्या सद्सत विवेक बुद्धीवर असे आ मंत्रण पाठवले
नाही. ह्या भारतीय मुळाच्या ब्रिटीश नागरीकाने मिडिया समोर येऊन ह्याची ग्वाही दिलेली आहे.
https://www.youtube.com/watch?v=thT_2OMKyxI
३. उप राष्ट्रपती पदावर असताना पाकिस्तानच्या पत्रकार नुसरत मिर्झाला ५-६ वेळा स्पेशल व्हीजा दिला गेलेला होता. सर्वसाधारण पणे
पाकिस्तानी लोकांना जो व्हिजा दिला जातो तो फक्त ३ शहरा पुरता मर्यादित असतो. जसे की दिल्ली, अजमेर शरिफ व अजुन
एकादे शहर ( प्रवाशाला हवे ते ) . पण नुसरत मिर्झाला मात्र प्रत्येक भेटीत ७ शहरांना भेट द्यायची मुभा होती. नुसरत मिर्झा ने ज्या
ज्या शहरांच्या भेटी घेतल्या त्या त्या ठिकाणी लगेच बाँब स्फोट झाले. नुसरत मिर्झा ने स्वःता एका मुलाखती दरम्यान ही माहीती
कोणत्याही दबावा शिवाय दिलेली आहे. त्या मु लाखतीत तो पुढे म्हणतो की जेंव्हा जेंव्हा तो भारतात भेटीला यायचा त्यानंतर तो
पाकिस्तानच्या गुत्पहेर विभागाच्या अधिकार्याला भेटुन पुर्ण माहीती देत असे. ते अधिकारी अश्या माहिती मुळे खुष असत. पुढे त्या त्या
शहरात बाँबस्फोट झाले असल्याने त्या माहितीचा पुरेपुर उपयोग केल्याचे दिसते. https://www.youtube.com/watch?
v=EjqLTmUno5Q
४. हामिद अंसारी ने नुसरत मिर्झाला ओळखतच नसल्याचे सांगीतल्यावर त्या दोघांचे एकाच कार्य क्रमातले स्टे ज शेअ र करतानाचे फोटो
वायरल झाले.
वर खरे साहेबांनी हामिद अंसारी बद्दल माहीती दिलेली आहेच. तरी सुद्दा ज्या दिवशी ते उप राष्ट्रपती म्हणुन निवृत्त झाले त्या
दिवशीच्या मा मोदीजींच्या भाषणात २ मिनीटात हामिद अंसारी ची जी तासलेली आहे ते बघीतल तर कळत की निन्म दर्ज्याच्या
माणसाला देशाचे उप राष्ट्रपती पदावर बघणे किती कष्ट दायक होते. https://www.youtube.com/watch?
v=oYSqzPb2yUA

कान्डे बेसिसवर नावे ठेवण्यास विरोध नाही.

माझे डॉ खरे यांना दिलेले उत्तर पहा. मुद्दा फक्त जे ध्वज सैल्युट केस होती त्यावर होता.

http://misalpav.com/comment/1150531#comment-1150531

चौकस२१२'s picture

19 Aug 2022 - 4:42 am | चौकस२१२

याचा "अन्सारी" आडनावाशी सम्बन्ध नाही. "कलाम" आडनावाच्या माणसाबद्दल असे कोणतेही प्रवाद ऐकल्याचे ठेवत नाही
१००%
काय उपयोग हा तर्क सांगून डॉक साहेब... ज्यांनी ठरवलेच आहे कि "अल्पसंख्यानकांच्या " कोणत्याही कृती बद्दल काहीही बोलायचे नाही
आणि जो बलेलं तो संघी संकुचितवादि / धर्माद्ध / भाग आतंकवादी + इसलॅम्पफोबिया वाढवणारा ( च) असणार

तर्कवादी's picture

18 Aug 2022 - 12:52 pm | तर्कवादी

झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक
आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाचाय झेंड्याला निदान महत्वाच्या दिवशी ( उठसुठ नव्हे) मानवंदना न देणे हे वयक्तिक ?

चौकसजी
झेंड्याला सलाम न करण्याचे मी समर्थन केलेले नाही. पण "केबीसी मध्ये आमिर खानने झेंड्याला सलाम केला नव्हता" असे केवीसीचा तो भाग पाहिल्यावर मला कुठेही आढळून आले नाही. त्याने "न केलेला सलाम" हा कर्नल मितालीजींसाठी होता, झेंड्यासाठी नाही.

गामा पैलवान's picture

18 Aug 2022 - 12:11 am | गामा पैलवान

लोकहो,

चित्रपट टॉरेंटमार्गे उतरवला व बघितला. खास वाटला नाही. मूळ चित्रपटाचं भारतीय 'रूपां'तर तुटक व अर्थहीन भासलं. ख्रिश्चन पंथ उगीच मध्ये आणलेला वाटला. त्याचं प्रयोजन कळलं नाही. भारतीय पार्श्वभूमीवर विवाहपूर्व संतती दाखवायची खरंच गरज होती का? बहुधा ती स्वीकृत दाखवण्यासाठी ख्रिश्चन पंथाची सोय केली असावी.

हा चित्रपट फुकट बघायला मिळाला तरंच बघा म्हणून सुचवेन. आणि सोबत स्वत:चं मानसिक वय वर्षे १५ च्या वर जाऊ देऊ नका. अन्यथा निराशा पदरी पडेल.

तूर्तास फॉरेष्टाचा गंपू ( मूळ चित्रपट ) बघायची उत्सुकता मावळली आहे.

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

18 Aug 2022 - 8:04 am | कपिलमुनी

पार्श्वभूमीवर विवाहपूर्व संतती दाखवायची खरंच गरज होती का?

अहो गा पै , विवाहपूर्व संतती हा भारतीय संस्कृतीचा यू एस पी आहे..

Uda- कुंतीचा कर्ण .

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 8:17 am | जेम्स वांड

गामा पैलवानांना संस्कृती भारतीय प्रिय आहे, पण morals त्यांना Victorian आवडतात असे दिसते.

गामा पैलवान's picture

18 Aug 2022 - 4:45 pm | गामा पैलवान

मुनिवर,

मग रूपाने तिच्या पोराला टोपलीत भरून कालव्यात सोडलेला दाखवायला हवा होता. मस्तपैकी हिंदू संकृतीच्या यूएसपीची जाहिरात झाली असती. काय गौडबंगाल आहे बरं?

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 10:22 am | जेम्स वांड

एर्डोगान पत्नीला भेटण्यात प्रॉब्लेम काय ?

आमिरचे मुसलमान असणे ? का अजून काही ?

१९९५ साली भारत तुर्की व्यापार $२४२ मिलियन होता

२०२० साली तो $ ४ बिलियन वगैरे झाला आहे.

०५/०८/२०१९ नंतर कलम ३७० रद्द झाले, त्यानंतर टर्की कायम पाकिस्तान सोबत उभा आहे, काश्मीर विषयावरून पाकिस्तानची साथ देणे, पाकिस्तानला पडत्या लिरा मधूनच मदत देणे, त्यांना पार युद्धनौका विकणे वगैरे पण करतोय की टर्की, मिलजेम प्रोजेक्ट अंतर्गत लेटेस्ट warship हल्लीच कमिशन केली पाकिस्तान ने

इतके असूनही जर टर्की सोबत व्यापार थांबत नाही,पर्यटन थांबत नाही, दळणवळण थांबत नाही, सरकारी पातळीवरील द्विपक्षीय संबंध वगैरे अबाधित आहेत

पण आमिर खान टर्किश फर्स्ट लेडीला भेटला त्यावर गहजब मात्र उडलाच पाहिजे असा आग्रह दिसला की तो उडवणाऱ्यांच्या हेतूवर शंका येते.

अहो खुद्द शेठ लाहोरला गुपचुप विमान उतरवून गरीबनवाझांची भेट घेतात तेव्हा तो राजकीय मास्टरस्ट्रोक असतो आता बोला.

सुबोध खरे's picture

18 Aug 2022 - 12:53 pm | सुबोध खरे

अहो खुद्द शेठ लाहोरला गुपचुप विमान उतरवून गरीबनवाझांची भेट घेतात तेव्हा तो राजकीय मास्टरस्ट्रोक असतो

याबद्दल श्री मोदी यांनी प्रत्यक्ष मुलाखतीत स्पष्टीकरण दिलेले आहे.

त्याबद्दल पूर्वग्रहदूषितच नजरेने पाहायचे ठरवले तर त्याला काही इलाज नाही.

तेंव्हा तुमचं चालू द्या

सुबोध खरे's picture

18 Aug 2022 - 12:51 pm | सुबोध खरे

इतके असूनही जर टर्की सोबत व्यापार थांबत नाही,पर्यटन थांबत नाही, दळणवळण थांबत नाही, सरकारी पातळीवरील द्विपक्षीय संबंध वगैरे अबाधित आहेत.

पाकिस्तानशी चार युद्धे झाली तरी त्यांच्याबरोबर व्यापार आणि राजनैतिक संबंध अजूनही टिकून आहेत.

मग केवळ तुर्कस्तान बरोबर संबंध तुम्हाला का खटकतात?

बाकी भारताबरोबर काश्मीर वरून संबंध ताणलेले असताना आमिर खान तुर्कीच्या अध्यक्षांच्या पत्नीला भेटला यात काही तुम्हाला चूक दिसत नाही

तसेच राहुल गांधी सुद्धा डोकलाम आणि गालवान मध्ये कुरबुरी चालू असताना चीनला जाऊन तेथील राजकारण्यांना भेटले यातही काही चूक दिसत नसावी.

चालू द्या

जेम्स वांड's picture

19 Aug 2022 - 7:45 am | जेम्स वांड

तुम्ही हे काय चालवलं आहेत ?

अहो राहुल गांधी आणि आमिर खान काय तुलना होऊ शकेल का ? इतका तरी विचार करा. का चिडीला येऊन प्रत्येकाला तुम्ही काय असेच बोलणार तुम्ही काय त्याच्यावर दुर्लक्षच करणार वगैरे बोलून आपण कुठल्या लॉजिकल एंडला पोचणार आहोत का ? जरा तुमच्या विरोधात वैयक्तिक पण नाही मुद्दे आधारित गेलं का असलं ब्रॅण्डिंग करणं तुम्हाला संयुक्तिक वाटत असेल तर बोलणंच खुंटलं. तुम्ही troll ID नाही डॉक्टर, people respect you by virtue of your experience of life and service. It's a request for you to always keep that in mind sir. Just a humble suggestion.

एखाद विचारवाद बरा वाटणे अन् त्यापायी लोकांशी संबंध खराब करणे इतका बालिश मी तरी नाही इतकं इथं बोलून खाली बसतो.

विरोधात वैयक्तिक पण नाही मुद्दे आधारित गेलं का असलं ब्रॅण्डिंग करणं तुम्हाला संयुक्तिक वाटत असेल तर बोलणंच खुंटलं.

अत्यंत नाईलाजाने आणि खेदाने सहमत व्हावे लागतेय.

वान्डोबा, हे या प्रतिसादमालिकेशी संबंधित नाही किंवा डॉक्टरसाहेबांशीही संबंधित नाही. हे एक वेगळेच व्यापक काहीतरी वाटू लागलेय. कोणत्याही चर्चेत एका आयसोलेटेड मुद्द्यापुरते काही मत मांडले तरी आपण, "ऑप्शन १": खुद्द देशाचे थेट शत्रू किंवा मग "ऑप्शन २". लपलेला धोका ओळखू न शकणारे, खोट्या बेहोशीत असलेले , कळत नकळत गनीमाचे समर्थन करत असलेले आहोत (आणि हे सर्व असणे म्हणजे पुरोगामीच, लिबरलच) अशी काहीतरी इमेज जाणवून विचित्र वाटते. यापायी आताशा काही शक्यतो मतप्रदर्शन नकोच वाटते.

पुरोगामी, लिबरल या प्रकारात काही दम आहे का ते ठाऊक नाही. त्याची व्याख्याही ठाऊक नाही, पण हे सकारात्मक भासणारे शब्द शिव्या बनून गेलेत असे वाटते आहे.

गम्मत म्हणजे मी स्वत:ला मोदी समर्थक मानतो. त्यांच्या पक्षाला पाठिंबा देतो. किमान आतापर्यंत देत आलो. पण याचा अर्थ मी एका साच्यात फिट बसलेच पाहिजे असे चित्र दिसते.

माझे कोणत्याच धर्माशी होलसेल शत्रुत्व नाही. मला केवळ घाबरलेल्या गर्दीत साप साप असे कोणी ओरडल्यास भीती वाटते. सापाची नव्हे. तो असला तरी दोघांना चावेल. भीती असते तुडवा तुडवीची. त्यात दोनशे मरतात. आणि कारण ठरते बहुधा एक दोरी.

सर टोबी's picture

19 Aug 2022 - 9:10 am | सर टोबी

हे शिवी सदृश शब्द का झाले मला कळत नाही. कोणी माझ्या अंगावर थुंकलं तरी मी माझं पुरोगामीत्व आणि उदारपणा सोडणार नाही. एक आक्षेप असा घेतला जातो कि ज्या हिरीरीने लिबरल हिंदू धर्माची चिकित्सा करतात त्या पध्धतीने इतर धर्माची करीत नाही. पण हि अट कशासाठी? मी हिंदू असेल तर मला माझाच धर्म चांगला होण्यामध्ये रस असेल. आणि आज ज्या मजबूत पायावर उभे राहून आपण देशाच्या स्थिरतेलाच आव्हान देत आहोत तो पाया कितीही नाही म्हटलं तरीही पुरोगामी लोकांनीच तयार केला आहे.

कोणी माझ्या अंगावर थुंकलं तरी मी माझं पुरोगामीत्व आणि उदारपणा सोडणार नाही.

वा! वा! श्री मोहनदास करमचंद यांच्या नंतर तुम्हीच.

महात्मा सर टोबी

आपण देशाच्या स्थिरतेलाच आव्हान देत आहोत तो पाया कितीही नाही म्हटलं तरीही पुरोगामी लोकांनीच तयार केला आहे.

मूळ पुरोगामी आणि जमात - ए - पुरोगामी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तेवढा जाणून घेतलात तर पुरेसे आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लाम धर्मामध्ये देशनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठेला जास्त महत्त्व दिले जाते, आणि माझ्या ५० % लोकसंख्या असलेल्या भगिनींना मी सहाव्या शतकात ढकलणारा धर्म स्वीकारा असे म्हणू शकत नाही यास्तव माझ्या अनुयायांना मी इस्लाम मध्ये धर्मांतर करा असे सांगणार नाही असे स्पष्टपणे लिहिलेले आहे.

याशिवाय केवळ फाळणी नाही तर लोकसंख्येची अदलाबदल सुद्धा झालीच पाहिजे असे अत्यंत आग्रहाने सांगत असत त्याची कारणे सुद्धा त्यांनी विस्तृतपणे लिहिलेली आहेत.

त्यांना कुणी ते पुरोगामी नाहीत म्हणून म्हणणार नाही.

येथे जमात - ए - पुरोगामी लोक डॉ बाबासाहेबांच्या पेक्षा जास्त पुरोगामी आहेत.

चालू द्या

जेम्स वांड's picture

19 Aug 2022 - 11:37 am | जेम्स वांड

मी तर सांगतो की मोदींना तुम्ही समर्थन द्या किंवा देऊ नका, मुद्दे आधारित द्या किंवा अजिबातच देऊ नका, थेट देशद्रोह अन् लिब्रांडू म्हणजे वाढीवपणाचा कळस वाटतो मला, ह्याने एनालिसिस ही कला नामशेष झाली नाही म्हणजे मिळवली.

ह्या बाबतीत कित्ता गिरवायला हवा क्लिंटन साहेबांचा, क्लिंटन अर्थशास्त्र ते राज्यशास्त्र माफक मध्याच्या उजवे आहेत हे ते स्वतः निरलास कबूल करतात, मी माफक मध्याचा डावा, इथं क्लिंटन उजवे म्हणूनही नाक मुरडतात लोक अन् आमचा तर विषयच संपला.

त्यामुळे तुमच्याशी काचकून सहमत अन् शिव्या खायला तयार मी पण.

सुबोध खरे's picture

19 Aug 2022 - 10:03 am | सुबोध खरे

अहो राहुल गांधी आणि आमिर खान काय तुलना होऊ शकेल का

तुम्हाला चर्चा भरकटवायची असेल तर त्याला माझा इलाज नाही

तुलना साधी सरळ आहे

श्री राहुल गांधी चीनबरोबर आपल्या चकमकी चालू असताना चीन मध्ये जाऊन तेथील कम्युनिस्ट पक्षाबरोबर गुप्तपणे चर्चा करतात सुरुवातीला नकार देतात मग उघडकीस आल्यावर मान्य करतात.

हीच स्थिती आमिर खानबद्दल आहे. जेंव्हा भारताचे तुर्कस्थान बरोबर काश्मीर प्रश्नात त्यांनी पाकिस्तानचा साथ दिल्याबद्दल वाजले होते आणि भारताने तुर्कस्तान शी चालू असलेला व्यापार बंद केला होता नेमके त्याच वेळेस हे महाशय तेथील अध्यक्षांच्या पत्नीची भेट घेतात?
ते सुद्धा यांच्या पत्नीने त्यांना भारतात सुरक्षित वाटत नाही असे जाहीर विधान केले असताना?

यानंतर तुम्हाला सिनेमा पाहायचा नसेल तर पाहू नका कोणी जबरदस्ती केलेली नाही असे यांची त्याच सिनेमातील साथीदार करीना खान सार्वजनिक ठिकाणी बोलताना म्हणते?

इतका माज? कसला? पैशाचा?

लोकांची स्मरणशक्ती वाईट असते पण इतकीसुद्धा वाईट नसते.

५२ पैकी दुसऱ्या कोणत्याही इस्लामी देशात गेले असते तर असे वादंग झाले असते का?.

बाकी जपु ( जमात - ए - पुरोगामी) लोक सर्रास भाजप किंवा संघवाल्याना मुस्लिम विरोधी ठरवतात.

तेंव्हा ते एक गोष्ट सोयिस्कर रित्या विसरतात कि भारताचे इतर मुस्लिम देशांशी वैर नाही आणि पाकिस्तान बद्दल जितका राग सामान्य भारतीयांना आहे तितका बांगला देश किंवा इंडोनेशिया किंवा कतार बद्दल नाही.

भारताचे जितके सैनिक गेल्या ७५ वर्षात मृत्युमुखी पडले भारतात जितके दहशतवादी हल्ले झाले जितक्या दंगली झाल्या जितके बॉम्बस्फोट झाले त्यांचे उगम स्थान पाकिस्तानच आहे/ होते.

दुर्दैवाने याच जपु लोकाना पाकिस्तानी खेळाडूंनी/ कलाकारांनी भारतात येऊन पैसा कमावण्यात काही गैर वाटत नाही. कलेसाठी कला किंवा खेळासाठी खेळ हि भूमिका घेऊन त्यांना दाऊद इब्राहीमने सुद्धा निर्मिती केलेला सिनेमा पाहण्यास अनमान वाटत नाही.

बॉलिवूड मधील समस्त मंडळी याच लायकीची आहेत.
दहशतवाद्यांकडून शस्त्रे मिळवल्याबद्दल आणि घातक शस्त्रे बाळगल्याबद्दल संजय दत्त ला अटक झाली तरी त्याच्या बरोबर सॉलिडॅरिटी दाखवतात. कोणालाही ड्रग्स बद्दल अटक झाली तरी त्याच्यावर अन्याय कसा झाला याबद्दल मोठ्या गळ्याने रडारड करतात याचा संताप होतो. त्यातून तो जर मुसलमान असला तर केवढं गहजब होतो. मी यावर उद्धृत केलेल्या ड्रग्स वरील धाडीत असलेले हिंदू नट नट्या यांच्या बद्दल एवढा गदारोळ का झाला नाही याबद्दल आपले काही मत आहे का?

२००० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करी संबंधात ममता कुलकर्णी यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वारंट निघाले होते याबद्दल कधी कुणी ऐकले, वाचले नाही. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/non-bailable-warrants-is... Rs 2,000 crore drug case

http://timesofindia.indiatimes.com/articleshow/57862513.cms?utm_source=c...

पण बोटी वर रेव्ह पार्टीला गेलेला असताना आर्यन खान पकडला गेला त्याबद्दल केवढा गहजब झाला? तो काय तिथे नमाज पढायला गेला होता? इथे आपले मिपा वरील पुरोगामी लोक त्याच्याकडे ड्रग्स सापडली नाहीत म्हणून सरकारवर टीका करायला सज्ज

साधी गोष्ट एखाद्या कुंटणखान्या वर धाड पडते तेंव्हा तेथे असलेल्या ग्राहकांना सुद्धा सुरुवातीला आत टाकले जाते कशासाठी तर ते कोणत्या दलालामार्फत तेथे आलेले आहेत हि माहिती काढण्यासाठी. ते ग्राहक काय तेथे हनुमान चालिसा वाचायला गेलेले नसतात.

आर्यन खान च्या बाजूने केवढे सगळे लोक उभे राहिले आणि तेथे कार्यवाही करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर केवढे बालंट आणि किटाळ आणला गेला

यातलं काहीच तुम्हाला खटकत नाही? आश्चर्य आहे?

सोनाली बेंद्रे ने सुद्धा ताज वर हल्ला झाल्यानंतर आपले कमांडो किंवा सामान्य लोक हुतात्मा झाल्याची खंत व्यक्त करण्याऐवजी तेथील माझे फेव्हरेट वासाबी रेस्टोरंट बंद झाल्याची खंत व्यक्त केली होती.

वरती प्रोटोकॉल बद्दल एवढे मोठे चुकीचे प्रतिसाद टाकले होतेत ते अज्ञानातून होते. त्याबद्दल तुम्ही क्षमा मागितली म्हणजे आपण अजून सभ्य आणि सज्जन आहात याचा पुरावा आहे म्हणून मी अजून आपल्याशी चर्चा करतो आहे.

पण

मीच बरोबर असेच आपले मत असले तर मी चर्चा येथे थांबवतो

धन्यवाद

जेम्स वांड's picture

19 Aug 2022 - 11:13 am | जेम्स वांड

कदाचित स्पष्ट करणे झाले नसेल नीट म्हणून करतो.

राहुल गांधी - खासदार, विरोधी पक्षाचे नेते

आमिर खान - ब्लडी सिविलियन

तुलना होऊ शकते का ? हक्क, हक्कभंग, विशेषाधिकार, इत्यादींच्या हवाल्याने ? तरीही दोघांना एकच तागड्यात तोलण्याचा तुमचाही हट्टच असल्यास माझा पण नाईलाज असेल.

त्याशिवाय तुम्ही चर्चा थांबवली हे बरेच केलेत कारण दुराग्रहासमोर तर्क चालत नसतो हेच खरे. आता तुम्ही आम्हाला समजा किंवा आम्ही तुम्हाला दुराग्रही समजू किंवा समजूतदार मिपाकर समजून घेतीलच स्वतःहून, त्यामुळे माझाही पास तुम्हाला.

सुबोध खरे's picture

19 Aug 2022 - 11:33 am | सुबोध खरे

दोन्ही ची तुलना केवळ साधर्म्यासाठी आहे.

राहुल गांधी यांचा अपराध तर फारच गंभीर आहे. कारण विरोधी पक्षाच्या अनभिषिक्त नेत्याने प्रत्यक्ष युद्धसमान स्थिती असताना सरकारला अंधारात ठेवून शत्रूशी गुप्त चर्चा करणे हा माझ्या दृष्टीने देशद्रोह आहे.( अर्थात हे माझे मत केवळ वाचनात आलेल्या गोष्टींवर आधारित आहे वस्तुस्थिती कदाचित वेगळी असू शकते)

परंतु ज्या माणसाला( आमिर खान) मी देशभक्त आहे आणि माझा सिनेमा पहा हे मीडियाला सांगावे लागते त्याने संशयास्पद रित्या वागू नये एवढी तरी सामान्य माणसाची अपेक्षा असते.

एक ज्ञानेश्वरीतील दाखला देतो.

सज्जन लोक हिवराच्या झाडाखाली बसत नाहीत असे लिहिलेले आहे.

याचे संशीधन करताना श्री रा भि जोशी याना विदर्भात याचा संदर्भ लागला

तेथील एक खेडूत माणूस त्यांना म्हणाला हिवराच्या सालीचा उपयोग दारू गाळण्यासाठी होतो.

( त्यावर श्री जोशी यांनी १६ वर्षाचा युवक कधीही विदर्भात गेलेला नसताना त्याला हे ज्ञान कसे मिळाले याबद्दल अचंबित होताना आढळतात)

आग्या१९९०'s picture

19 Aug 2022 - 12:19 pm | आग्या१९९०

दुर्दैवाने याच जपु लोकाना पाकिस्तानी खेळाडूंनी/ कलाकारांनी भारतात येऊन पैसा कमावण्यात काही गैर वाटत नाही. कलेसाठी कला किंवा खेळासाठी खेळ हि भूमिका घेऊन त्यांना दाऊद इब्राहीमने सुद्धा निर्मिती केलेला सिनेमा पाहण्यास अनमान वाटत नाही.

पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारताचे नागरिकत्व आणि पद्मश्री कोणी व का दिले? त्यांना कोणत्या कॅटॉगरीत बसवणार?

सुबोध खरे's picture

19 Aug 2022 - 12:39 pm | सुबोध खरे

पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारताचे नागरिकत्व आणि पद्मश्री कोणी व का दिले? त्यांना कोणत्या कॅटॉगरीत बसवणार?

भारतीय नागरिकत्व दिल्यावर त्याने येथे कमावलेला पैसा आणि येथे भरलेला कर आपल्याच देशासाठी खर्च होतो.

पाकिस्तानी खेळाडूंना आय पी एल मध्ये कोट्यवधी रुपये द्यायचे, त्यांनी ते पैसे पाकिस्तानात घेऊन जायचे, तेथे कर भरायचा आणि त्यातील काही अंश दहशतवाद्यांद्वारे आपल्या देशाविरुद्ध खर्च होणार. हे कशासाठी?

आपली तुलना मुळातच चूक आहे.

आग्या१९९०'s picture

19 Aug 2022 - 1:12 pm | आग्या१९९०

कर तर येथील कलाकारही भरतात. पद्मश्री देण्यासारखे अदनानचे काय योगदान आहे? कर मिळवण्यासाठी इतकी लाचारी?

सुबोध खरे's picture

19 Aug 2022 - 6:29 pm | सुबोध खरे

@ आग्या१९९०

या बोटावरची थुंकी त्या बोटावर करू नका.

पाकिस्तानी कलाकार आणि अधिकृत रित्या नागरिकत्व घेऊन येथे राहणारा आणि येथेच कर भरणारा भारताचा नागरिक यांची तुलना मुळातच चुकीची आहे

कर मिळवण्यासाठी इतकी लाचारी?

अदनान सामी कितीसा कर भरणार?

यात लाचारी तुम्हाला कुठून दिसली?

उगाच काहींच्या काही?

बाकी पदमश्री मिळवणारे इतर बॉलिवूडच्या लोकांची काय लायकी आहे हे मला समजत नाही तसेच अदनान सामी ला का दिले हेहि मला सांगता येणार नाही.

ते ज्याचे त्याने पाहावे

आग्या१९९०'s picture

19 Aug 2022 - 7:33 pm | आग्या१९९०

आमिर खान देशाचा सामान्य नागरीक. परदेशात रितसर गेला. ज्याला भेटायचं त्याला भेटला. त्याने कोणाला कधी भेटावे हे ठरवणारे आपण कोण?

सुबोध खरे's picture

19 Aug 2022 - 7:40 pm | सुबोध खरे

याचा या प्रतिसादाशी काय संबंध

हो, पण त्याचा चित्रपट पाहायचा नाही आणि त्याच्या वर बहिष्कार टाकायचा हे ठरवणारे आपले आपण मुखत्यार आहोत कि

आग्या१९९०'s picture

19 Aug 2022 - 7:54 pm | आग्या१९९०

हो, पण त्याचा चित्रपट पाहायचा नाही आणि त्याच्या वर बहिष्कार टाकायचा हे ठरवणारे आपले आपण मुखत्यार आहोत कि
ह्याचा माझ्या प्रतिसादाशी काय संबंध?

सुबोध खरे's picture

20 Aug 2022 - 10:20 am | सुबोध खरे

त्याने कोणाला कधी भेटावे हे ठरवणारे आपण कोण?

याचं उत्तर आहे ते

तुम्हाला समजत नाही म्हणूनच मी लिहिलं होतं कि तुम्ही ताण घेऊ नका.

अदनान सामीने भारतिय नागरीकत्व स्वीकारल्याच्या व त्याला पद्मश्री मिळाल्याच्या बातम्या इतर भारतियांप्रमाणे मीही काहीश्या अचंब्याने पाहिल्या होत्या. कालांतराने अकलीम अख्तर उर्फ जनरल रानी, अर्शद सामी खान व १९७० च्या दशकातील त्यांची कारकीर्द, आरूसा आलम इ. विषयी थोडी फार माहिती मिळाली व काहीशी संगती लागली. जिज्ञासूंनी गुगलचा लाभ घ्यावा.

अदनान सामीने भारतिय नागरीकत्व स्वीकारल्याच्या व त्याला पद्मश्री मिळाल्याच्या बातम्या इतर भारतियांप्रमाणे मीही काहीश्या अचंब्याने पाहिल्या होत्या.
कालांतराने अकलीम अख्तर उर्फ जनरल रानी, अर्शद सामी खान व १९७० च्या दशकातील त्यांची कारकीर्द, आरूसा आलम इ. विषयी थोडी फार माहिती मिळाली व काहीशी संगती लागली. जिज्ञासूंनी गुगलचा लाभ घ्यावा.

आमिरचे मुसलमान असणे ? का अजून काही ?
शेजार्यांशी भाडंण चालू असले किंवा एखादा तुम्हाला बाहेरील जगात विरोध करीत असेल तर निंदान ते भांडण संपेपर्यंत किंवा निवळे पर्यंत त्याच्या गळ्यात गळे घालू नये .. एवढा शिष्टाचार असतो / पद्धत
टर्की आणि मलेशिया सतत भारताचाय विरुद्ध बाजू घेतात ( वरणाने ( रेस या अर्थी) काह्ही संबंध नसलेली रोहिंग्या मुसलमानां ची बाजू घेताना भारताला विरोध करतात - कारण केवळ भारत हिंदू बहुसंख्यांक आह तेम्हणून ) हे उघड दिसत असतांना या दोघनपासून ४ हात लांब राहावे ... येवडः साधं तत्व आहे
पण काय आहे भाजप सरकार करणार म्हणजे चूकच असे ठरवलेच आहे तर बोलणे खुंटते

त्या दृष्टिने आमिर सारखया प्रसिद्ध भारतीयाने अशी भेट घेतली ती समजा खटकली तर लगेच "आमिर मुस्लिम म्हणून तुम्ही विरोध " करता हा आमच्यावर शिक्का का मारता ?

जेम्स वांड's picture

19 Aug 2022 - 7:54 am | जेम्स वांड

तुमचा नेमका प्रॉब्लेम मला कळला नाही,

अहो तुम्हीच माझा प्रश्न ठळक केला आहे ना ?

प्रश्न आहे तो साहेब, with a question mark , नक्की कारण काय ? आमिर चे मुसलमान असणे ? का अजून काही ? असा प्रश्न आहे , इतर काही असल्यास मांडा,

मला तुमच्यावर शिक्के मारून काही ४० पैसे मिळणार नाहीत इतकं खरं, त्यामुळे मला तो नाद पण नाही, मिसळपावचे नाद हमरीतुमरी वर लढवणे तर त्याहून नाही. त्यामुळे मांडण्यालायक काही असल्यास कृपया माझेही perspective lend करण्यास मदत करावी अन्यथा, शिक्का मारू असा शिक्का माझ्यावर न मारल्यास आभारी असेन.

सुबोध खरे's picture

18 Aug 2022 - 1:25 pm | सुबोध खरे

मी फारसे सिनेमे पाहत नाही याचे कारण अगोदरच दिलेले आहे

परंतु जपु ( जमात - ए - पुरोगामी ) ज्या टोकाला जाऊन आमिर खानचे समर्थन करत आहेत ते पाहून शिसारी आली आहे.

आमिर खानने सलाम केला कि नाही हे मला माहिती नाही परंतु सामान्य नागरिक सलाम करूच शकत नाहीत असा प्रॉटोकॉल आहे हे बेधडकपणे येथे लिहिले जाते तेथे त्याच कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि इत्तर सर्व सामान्य उपस्थित नागरिक सलाम करत आहेत हे त्यांना दिसत नाही का?

प्रोटोकॉल प्रश्न त्यांनी इतर लोकांनी आणि अमिताभ बच्चनने सलाम करायला नको होता असे म्हणून काढला असतात तरी एक वेळ मान्य करता आले असते.

असो

मुळात हा सिनेमा चालला कि पडला याबद्दल मला अजिबात घेणे देणे नाही. परंतु या निमित्ताने सामान्य जनतेला पैशाच्या माजाने गृहीत धरणारे बॉलिवूडचे लोक थोडेसे जमिनीवर आले तर त्याबद्दल मला जास्त आनंद होईल.

हीच गोष्ट मी शाहरुखखानच्या मुलाला रेव्ह पार्टीला गेल्याबद्दल अटक झाली तेंव्हाही लिहिलेले होते. शाहरूख खान च्या मुलाला जामीन मिळाला (तेंव्हा पण जपु लोकांनी भूभुक्कार केला होता) त्यात काही विशेष नव्हते. तो अमली पदार्थांचा व्यापार करत नव्हता हे सरकारला किंवा NCB ला माहिती होतेच परंतु असे लक्ष्मीपुत्र भित्रे आणि निर्ढावलेले नसतात त्यामुळे एक थप्पड मारली तरी हे पदार्थ कुठून मिळवले त्या सर्व दलालांची माहिती पोपटासारखी बोलू लागतात.

हे दलाल पकडले गेल्यावर गेल्या वर्षभरात किती कोटींचे अमली पदार्थ पकडले गेले ते पाहून घ्या

याशिवाय पैशाने आपण काहीही करू शकतो हा दंभ जरी कमी झाला तरी हेही नसे थोडके.

सर टोबी's picture

18 Aug 2022 - 6:29 pm | सर टोबी

अटक झालेल्या कुणाकडेही खटला भरावा एव्हडा मुद्देमाल सापडला नाही. उलट त्यांच्यामुळे जर इतका कोटींचा माल सापडला असेल तर खबरी लोकांना जसे ईनाम दिले जाते तसे द्यायला हवे. आणि ज्यांच्या गोदामात एव्हडा माल सापडला त्यांच्यावर काय कार्यवाही होत आहे म्हणे?

सुबोध खरे's picture

18 Aug 2022 - 7:55 pm | सुबोध खरे

अटक झालेल्या कुणाकडेही खटला भरावा एव्हडा मुद्देमाल सापडला नाही

ज्याच्याकडे ३ ए के ५६ सापडल्या ज्या दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून आलेल्या होत्या त्या संजय दत्त यांच्यावर लावलेला टाडा काढल्यामुळे त्यांना जामीनही मिळाला आणि शिक्षा ६ वर्षे असताना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आणि अनेक वेळेस पॅरोल वर सुटका झाली होती.

आपलेच सरकार असल्यावर आर्यन खान कडे असलेल्या चरसचा तंबाखू होणे किती कठीण आहे. मुळात त्याला "हर्बल तंबाखू"च म्हणत होते मग त्याच्याकडे काय पुरावा आणि कसा मिळणार?

आणि इनाम देण्यासाठी खबर त्यांनी दिलेली नाही तर त्यांच्याकडून एन सी बी च्या लोकांनी काढली

एप्रिल २०२१ पासून एक वर्षात थोडे थोडके नव्हे २६ हजार कोटी रुपयांचे हेरॉईन अमली पदार्थ नियंत्रण बोर्डाने छापे घालून जप्त केले आहे. Since April 2021, DRI has seized more than 3,800 kg of heroin valued at approximately Rs. 26,000 crores in the international illicit market
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1827064

यामुळे जगभरात किती तरुण नशाबाज होण्यापासून वाचले आणि किती दहशतवाद्यांचे आर्थिक नाकेबंदी झाली याचा हिशेब करा.

भाजपचा सवंग द्वेष करताना सरकारी अधिकारी यांनी केलेल्या कामावर निदान बोळा फिरवू नका एवढीच कळकळीची विनंती आहे.

जमल्यास एकदा व्यसनमुक्ती केंद्रात एक दिवस घालवून पहा म्हणजे हे लक्ष्मीपुत्र ज्या गोष्टींना प्रतिष्ठा देतात त्याचे किती भयानक परिणाम समाजावर होतात ते लक्षात येईल.

संजय दत्त, फरदीन खान अरमान कोहली, प्रतीक बब्बर असे अनेक लक्ष्मी पुत्र नशा करणारे पदार्थ सेवन करताना पकडले गेले आणि त्यावर बॉलिवूडच्या लोकांची त्यांना मिळणारी सहानुभूती पहिली तर संताप होतो. लडका शौकीन है पासून उसे नशा से निकालने में कितनी तकलीफ हुई आपको क्या मालूम सारखी वक्तव्ये वाचली कि अंगाचा तिळपापड होतो. परंतु आपला संताप नपुंसक असतो.

एका हलकट नटीने ताज वर झालेला हल्ला फार वाईट होता. माझी मेकअपची बॅग त्यात अडकली अशी मुक्ताफळे उधळली होती.

चौकस२१२'s picture

19 Aug 2022 - 4:29 am | चौकस२१२

तो अमली पदार्थांचा व्यापार करत नव्हता हे सरकारला किंवा NCB ला माहिती होतेच परंतु असे लक्ष्मीपुत्र भित्रे आणि निर्ढावलेले नसतात त्यामुळे एक थप्पड मारली तरी हे पदार्थ कुठून मिळवले त्या सर्व दलालांची माहिती पोपटासारखी बोलू लागतात.

खरी गेम अशी आहे तर .. तर्क पटला

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Aug 2022 - 5:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

आमिर खान ने केवळ हिंदूंच्या रुढींवर टिका केली असे इतर धर्मियांच्या बाबत करुन दाखव असे म्हणणारे त्याचा "सिक्रेट सुपरस्टार" हा सिनेमा विसरत आहेत का?

पैजारबुवा,

तर्कवादी's picture

18 Aug 2022 - 5:44 pm | तर्कवादी

आमिर खान ने केवळ हिंदूंच्या रुढींवर टिका केली असे इतर धर्मियांच्या बाबत करुन दाखव असे म्हणणारे त्याचा "सिक्रेट सुपरस्टार" हा सिनेमा विसरत आहेत का?

खरंच की.. चांगली आठवण करुन दिलीत. धन्यवाद पैजारबुवा
झालंच तर आमिर खान "सिक्रेट सुपरस्टार" चा सहनिर्माता सुद्धा आहे आणि त्या उलट तो पीकेचा सहनिर्माता नाही.
शिवाय दंगल (इथेही आमिर खान सहनिर्माता होताच) आणि सिक्रेट सुपरस्टार या दोन्ही चित्रपटांनी चीनमधूनही बराच पैसा कमावला. यामुळे चिन्यांचा पैसा भारतात आणून त्यावर झालेल्या नफ्यावर भारतात कर भरला असेल (तपशील मला माहित नाही).. म्हणजे अप्रत्यक्षपणे भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार व तसेच चीनमध्ये भारताची सॉफ्ट पॉवर वाढण्यास किंचित तरी मदत झाली असेल असे मानायला हरकत नसावी. [Secret Superstar was released on 11,000 screens in China - संदर्भ : विकीपिडीया]

सतिश गावडे's picture

18 Aug 2022 - 6:45 pm | सतिश गावडे

Secret Superstar was released on 11,000 screens in China

तिकडे कोण पाहते? तिकडील भारतीय?
इतके भारतीय तिकडे असतील असे वाटत नाही. मग शक्यता उरते ते हे सिनेमे चिनी लोकच सब टायटल सहित किंवा त्यांच्या भाषेत डब करून पाहत असावेत.

तर्कवादी's picture

18 Aug 2022 - 11:49 pm | तर्कवादी

मग शक्यता उरते ते हे सिनेमे चिनी लोकच सब टायटल सहित किंवा त्यांच्या भाषेत डब करून पाहत असावेत.

बरोबर.. सब टायटल्ससह भारतीय सिनेमे विविध ठिकाणी लोकप्रिय होतात. आमिर खानने चीनच्या बाजारपेठेत ठसा उमटवला पण जगभरात अनेक देशांत बॉलीवूडचे चित्रपट आधीपासूनच लोकप्रिय आहेत . अमिताभ , शाहरुख, राज कपूर यांचे चाहते विविध देशांत आहेत. पण आता सगळे तपशील नेमके आठवत नाहीत. राज कपूर - रशिया इतके समीकरण आठवते. आमिर खानची लेडी एदार्गेनशी भेट अशाच फॅन फॉलोइंग मुळे झाली असावी कदाचित पण पुढे त्यावर राजकारण झाले. तर अमेरिकेत ओहयो राज्याच्या गवर्नरनी २६ जून २०१० ह दिवस "श्रेया घोषाल डे" म्हणून घोषित केला होता (संदर्भ - विकी)

कानडाऊ योगेशु's picture

19 Aug 2022 - 9:25 am | कानडाऊ योगेशु

>>आमिर खानची लेडी एदार्गेनशी भेट अशाच फॅन फॉलोइंग मुळे झाली असावी कदाचित पण पुढे त्यावर राजकारण झाले.
तसंच जर असेल तर आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा एदार्गेनाला भारताला अनुकुल भूमिका घेण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ही काही ऐकण्यात नाही आले. ते त्याचे काम नाहीये हे मान्य पण भारतात जिथे तिथे सामाजिक राजकिय घडामोडीत नाक खुपसत असताना भारताबाहेर ही जर असे काही प्रयत्न केले असते तर त्याच्याबद्दल्चा वाटणारा दुटप्पीपणा कमी नक्कीच झाला असता.

तर्कवादी's picture

19 Aug 2022 - 1:28 pm | तर्कवादी

तसंच जर असेल तर आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा एदार्गेनाला भारताला अनुकुल भूमिका घेण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ही काही ऐकण्यात नाही आले.

पण त्यांच्यात काय बोलणे झाले काय चर्चा झाल्यात याबद्दलही काहीच माहित नाही. त्यामुळे त्याच्या भेटीचा प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे काहीच उपयोग होणार नाही असेही नाही.
खरंतर सध्या आपल्याला इतकंच माहित आहे की तो त्या एदार्गेनाला वा त्याच्या बायकोला भेटला... ठीक आहे भेटू दे बुवा , आता गेला तिकडे चित्रीकरणाला तर भेटला. जी काही भेट झाली ती जगजाहिरच आहे...गुपचूपपणे तर नाही ना भेटला , किंवा भेटून देशाबद्दलची कुठली तरी गोपनीय माहिती त्यांना दिली असे तर नाही ना ? मग "भेटला तर भेटू देत बुवा" अशी साधी सरळ भूमिका आपण का नाही घेवू शकत ? इतकं कठीण आहे का ते ? आणि अशा भेटीचा काही ना काही प्रमाणात देशाची सॉफ्ट पॉवर वाढवण्यास मदत होवू शकते हे पटत नाही का ?

सुबोध खरे's picture

19 Aug 2022 - 6:36 pm | सुबोध खरे

मग "भेटला तर भेटू देत बुवा" अशी साधी सरळ भूमिका आपण का नाही घेवू शकत ?

लालसिंग हा सिनेमा आमिर खान यांच्या तुर्कस्तानच्या भेटीमुळे बहिष्कार टाकला गेला नाही हे सत्य आहे तसेच याचे अंशतः: योगदान आहे हेही नाकारता येणार नाही.

आमिर खान यांनी तुर्कीच्या अध्यक्षांच्या पत्नीची भेट घेतली ती वेळ चुकीची होती. जसे श्री सिद्धू यांनी इम्रान खान यांची भेट घेतली हे सामान्य माणसांना पचले नाही तसेच हे आहे. दोघांनी वैयक्तिक पातळीवर भेट घेतली इथपर्यंत ठीक आहे.

त्याला प्रसिद्धी दिली( कि दिली गेली) हे लोकांना पचले नाही.

दोन्ही गोष्टीत बेकायदेशीर किंवा देशद्रोह म्हणण्यासारखे काहीच नाही परंतु अनुचित( inappropriate) आहे.

एखाद्या विद्यर्थ्याने गुरुपत्नीशी संबंध ठेवणे जसे बेकायदेशीर नाही पण अनुचित आहे तसेच हे आहे.

तर्कवादी's picture

19 Aug 2022 - 7:51 pm | तर्कवादी

जसे श्री सिद्धू यांनी इम्रान खान यांची भेट घेतली हे सामान्य माणसांना पचले नाही तसेच हे आहे.

तसे पाहिले तर यातही गैर असे काही नाही. दोघे एके काळचे क्रिकेटर - हा पण समान धागा आहेच,
आणि प्रत्यक्ष भेट घेतली तर जगाला दिसून येते. व्हिडिओ कॉन्फरस वर कोण कोणाशी कधी बोलतो हे इतरांना समजेल तरी का ?

पण तरीही पाकिस्तान आणि टर्की यांची थेट तुलना करता येणार नाही. टर्कीने जरी काही वेळा भारताविरोधी भूमिका घेतली असली तरी टर्कीला सरसकटपणे शत्रूराष्ट्र मानण्यात आलेले नाही. किंवा चीनशी सीमेवर थेट कुरबूरी चालू होत्या तशीही परिस्थिती टर्कीबाबत नाही. त्यामुळे टर्की बाबत भारतीयांच्या टोकाच्या भावना नाहीत.
फार काय .. टर्कीच्या नागरिकांना भारताचा व्हिसा सहज मिळू शकतो तेच भारत व पाकिस्तान एकमेकांच्या नागरिकांना व्हिसा सहजपणे देत नाहीत. केसरीच्या टुर्समध्ये टर्किची टूर आहे, पण कोणतीही कंपनी पाकिस्तानची टूर देईल का ?

Bhakti's picture

18 Aug 2022 - 7:15 pm | Bhakti

इतर धर्मियांच्या बाबत करुन दाखव असे म्हणणारे त्याचा "सिक्रेट सुपरस्टार" हा सिनेमा विसरत आहेत का?

मला हा सिनेमा खूपच आवडतो, दरवेळी ‌पाहते ‌आणि खुप रडते.
माझ्या घरी खानावळीचे सिनेमा पाहायचे म्हणले की थोडा त्रास सहन करावा लागतो हे हे :) असो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Aug 2022 - 9:13 am | ज्ञानोबाचे पैजार

फ्लॉप सिनेमाचा सुपरहिट धागा, अशी या धाग्याची मिपाच्या इतिहासात नोंद घेतली जाईल.

पैजारबुवा,

रंगीला रतन's picture

19 Aug 2022 - 1:35 pm | रंगीला रतन

फ्लॉप सिनेमा? सिनेमा जोरात चालू आहे हे वर एका मान्यवरानी दिलेले सर्टिफिकेट वाचले नाही तुम्ही :=)
दोन्हीबाजूकडल्या टोटल दहाबारा प्रेक्षकांनी भसाभसा तिकिटे काढून धागा सुपरहिट केला याच्याशी आपण सहमत.
च्यामारी एवढा सगळा कुटाणा वाचूनपण सिनेमा बघायचा का नाही बघायचा हे काय समजलं नाही बघा :=)

चांदणे संदीप's picture

19 Aug 2022 - 2:06 pm | चांदणे संदीप

परतिसाद लाईकल्या गेला आहे.

सं - दी - प

गामा पैलवान's picture

19 Aug 2022 - 2:25 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

पण आमिर खान टर्किश फर्स्ट लेडीला भेटला त्यावर गहजब मात्र उडलाच पाहिजे असा आग्रह दिसला की तो उडवणाऱ्यांच्या हेतूवर शंका येते.

सुमारे शतकभरापूर्वी १९१९ साली मुस्तफा कमाल पाशा यास ऑटोमन खलीफाला पदच्युत करून ती खिलाफत संपवायची होती. एका तथाकथित महात्म्याने त्याला पत्र लिहून खिलाफत वाचवा म्हणून विनंती केली. अशा रीतीने भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली. तिच्यातून पुढे केरळात मोपल्यांचं बंड उद्भवलं आणि त्यात असंख्य हिंदू विनाकारण ठार मारले गेले.

आजचा महात्मा अमीर त्याच इस्तंबूलात जाऊन तीच भारतद्रोही कृत्ये करीत नाही हे कशावरून? पश्चात्तापापेक्षा सावधपणा परवडला ( I would like to be safe than sorry. ). बाकी आपापली मर्जी.

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

19 Aug 2022 - 3:26 pm | जेम्स वांड

मधेच कुठं गांधी अन् आमिर तुलना ? आधी राहुल झाली आता थेट मोहनदास, कश्याचा कसाही कुठेही संबंध !

.