Skip to main content

लाल सिंग चढ्ढा

लेखक सोत्रि यांनी रविवार, 14/08/2022 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो. काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला. सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो. सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात. जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात. सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 68015
प्रतिक्रिया 207

प्रतिक्रिया

In reply to by मदनबाण

,परंतु सेंसर बॉर्डातुन सर्टीफाईड होऊन बाहेर पडण्यासाठी काय दिव्यातुन जावे लागले ते या व्हिडियोतुन कळते.
२०१६ साली चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून त्रास झाला हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. RC मध्ये चित्रपट पास केला त्यावेळी ८ मुस्लिम व्यक्तीही ज्युरी म्हणून आल्या होत्या हे पण निर्माता कागणे याने सांगितले आहे. आणि त्यानंतर निर्मात्याने भोंगा चित्रपट बनवला. असो.
सनी देओल आणि अमिशा पटेल चा गदर चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर हिंदूस्थानात अशांती दुतांनी हैदोस घातला होता.
हे खरंय.आणि सर्वच धर्मातील माथेफिरु धर्मांधाचा निषेध करायला हवाच. गदरच्या वेळी गदारोळ झाला होता हे मलाही आठतंय. तसेच बॉम्बे चित्रपटातही नायिका मुस्लिम व नायक हिंदू असल्याने काही मुस्लिम संघटनांकडून विरोध झाला होता. मुंबई दंगलींचा विषय तसा ताजाच होता, अतिशय संवेदनशील विषय होता. काही निदर्शने हिंसकही असावीत बहुधा. पण या सगळ्यांची व्याप्ती किती होती ते आता आठवत नाही. मी हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहात जावून बघितले होते. बॉम्बे प्रदर्शित झाला तेव्हा मी पंधरा वर्षांचा होतो. तेव्हा माझ्या आई वडिलांनी काळजीपोटी आधी मला चित्रपटगृहात जाण्याची परवानगी दिली नाही. पण नंतर पुण्यात तरी काही गडबड झाल्याच्या विशेष काही बातम्या आल्या नाहीत तशी मला परवानगी मिळाली आणि मी दापोडीच्या अरुण या चित्रपटगृहात एकट्याने जावून बॉम्बे चित्रपट पाहिला.

अनेक प्रतिसाद सिनेमा न बघताच आल्याचे (नेहमीप्रमाणे) दिसते. हे रोचक आहे. कोणाची तरी मते, अर्धवट सीन, ट्रेलर असे पाहून फायनल आग्रही आणि तपशीलवार मत देणे. स्टाम्प मारणे हे अनाकलनीय आहे. पुलंचे अंतूशेट जसे झापे बाजूला करुन घटकाभर एकच प्याला नाटक झलक रुपात बघतात आणि "सिंधूचा पार्टी कन्डम, यापेक्षा दशावतारी बरे" अशी निर्णायक मते देतो तसे काहीसे सर्वत्रच घडताना दिसते. मग मत अति समर्थक असो किंवा अति विरोधी.. चित्रपट प्रत्यक्ष बघितला की बहुतांश वेळा जी हवा केली गेली होती तसे तितके त्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते असे सिद्ध झाल्याचीच उदाहरणे आहेत. अर्थात अद्याप चित्रपट बघितला नसल्याने चित्रपटाबद्दल निवाडा देणे शक्य नाही. केवळ निरीक्षण नोंदवले.

चित्रपटाची ओळख आवडली. पाहणे आहेच. पण, चित्रपट न पाहता लोक वाद उभा करीत आहेत, असे जे वाटायचे त्याची परिक्षण वाचून खात्री पटली. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर चित्रपट न पाहता लोक वाद उभा करीत आहेत, सॅटॅनिक व्हर्सेस साठी सलमान रश्दी याना "सर तन से जुदा" म्हणणाऱ्या किती टक्के लोकांनी वाचले असणार? एक टक्का सुद्धा नाही याची मला १०० % खात्री आहे. पुरोगामी दुटप्पीपणा हा असा असतो.

In reply to by सुबोध खरे

सॅटॅनिक व्हर्सेस साठी सलमान रश्दी याना "सर तन से जुदा" म्हणणाऱ्या किती टक्के लोकांनी वाचले असणार?
असे वाचन वगैरे न करणारे अजून काही उपरे आता दिल्लीत राहणार आहेत रेफ्युजी म्हणून. रोहींग्या म्हणतात बुआ त्यांना.

In reply to by आनन्दा

>>> आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट campaign मुळे पडला? नै नै...लोकांनी बायकॉट केला म्हणून सिनेमा अजिबात पडणार नाही. पडत तर अजिबात नसतो. सिनेमा प्रेक्षकांना किती अपिल होतो त्यावर आपल्याकडे सिनेमा चालतो-पडतो, असे वाटते. उलट या बायकॉटमुळे सिनेमा उरलेल्या दिवसात सिनेमा अधिक चर्चेत राहील. आज सिनेमा पाचव्या दिवशी पन्नास कोटीच्या जवळ जवळ पोचला आहे. माध्यमांमधून सिनेमाला 'मिला जुला रिस्पॉन्स मिल रहा है' अशा बातम्या आहेत त्यामुळे सिनेमा नफ्यात राहणार आहे. सिनेमा शौकीन पब्लिक तर, सिनेमा पाहिल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकांनी बायकॉट केला म्हणून सिनेमा अजिबात पडणार नाही. पडत तर अजिबात नसतो. सिनेमा प्रेक्षकांना किती अपिल होतो त्यावर आपल्याकडे सिनेमा चालतो-पडतो, असे वाटते.
हा सिनेमा कारणांमुळे पडला ( म्हणजे अपेक्षित यश नाही )- १. खान मंडळींविरुद्ध / प्रस्थापित बॉलिवूड कलाकरांबद्दलचा रोष २. काश्मीर फाईल्स नंतर प्रस्थापित हिरो हिरविनी 'खर्‍या' म्हणजे आधुनिक हिंदू अस्मितेच्या प्रश्नांना भिडत नाही हा पसरलेला समज ३. नेत्रदीपक दाक्षिणात्य चित्रपटांपुढे बॉलीवूड फिके आहे असा पसरत चाललेला समज ४. आमीर खान/ किरण राव यांची तथाकथित देशद्रोही वक्तव्ये ( जी इथून पुढे आयुष्यभर त्यांना छळत राहणार ) ५. बॉयकॉट मोहीम शिवाय या बॉयकॉट मोहीमेने "एनी पब्लीसिटी इज गुड पब्लिसिटी" अशी जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजिदेखील चालतेच हा गैरसमज खोडून काढला. अर्थात हे चित्रपट निर्मात्यांनाच लागू आहे. स्वतः आमिर खानचे इन्स्टा/ट्विटर अनुयायी वाढलेच असतील. नवराष्ट्रवादी अदलित लोकांनी झुंड देखील असाच मुद्दामहून नाकारला. त्यात राष्ट्रद्रोही, देशद्रोही, धर्मद्रोही, जातद्रोही, पंथद्रोही, भाजपद्रोही, मोदीद्रोही, रास्वसद्रोही काहीही नव्हते. त्यामुळे इथून पुढे "रंग दे बसंती", "लगान", "दिल चाहता है" सारखे एखादी पिढी झपाटणारे चित्रपटसुद्धा तयार होतील का नाही याची मला खात्री वाटेनाशी झाली आहे. तुलनेने दक्षिणी प्रेक्षकांत एखाद्या हिरोप्रती निष्ठा जास्त ठळक असल्याने आणि त्याचवेळी प्रयोगशीलतेचे चाहते असणारे लोकही अनेक असल्याने तेच अशी रिस्क घेऊ शकतात. त्यामुळे उत्तरेकडचे किंवा बॉलीवूडचे चित्रपट आता गायपट्ट्यातील अदलित नवराष्ट्रवादी भारतीयांना शरण जाणार हे नक्की.

लाल सिंग चढ्ढा मुळे बरेच सेलिब्रीटी आता लाईनीवर आलेत. काही दिवसांपुर्वी ला.सिं.च. च्या बॉयकॉटची खिल्ली उडवत एका कार्यक्रमात कॅमेरा समोर "आम्हाला सूद्धा बॉयकॉट कराना प्लिज" म्हणणार्या अनुराग कश्यप व तापसी पन्नु ला आता ऊपरती झालेली आहे. तापसी पन्नु सारख्या अत्यंत अहंकारी हिँंदु हेटर अभिनेत्रीचे आता तेवर बदलले दिसत आहे. बॉयकॉटची भिती र्‍हितीक रोशनला सूद्धा भेडसावत आहे.

बॉयकॉट गँग मुळे पिक्चर चालात किंवा पडत असते तर भाजप क्वीन कंगनाचे पिक्चर सुपरहिट झाले असते.. खुद्द शेठ चा पिक्चर सुपर फ्लॉप आहे तर बाकीच्यांची काय कथा... भूल भू २ हिट झालाच की... लोकांना वेगळा विषय , फ्रेश चेहरे हवे आहेत... आणि सध्या इकॉनॉमी चे ल लावले असल्याने लोक थिएटर मध्ये जाऊन पैसे खर्च करत नाहीत

ला. सि. चढ्ढा सिनेमाच्या शुटींग करता तुर्कस्तानात जाऊन लेडी एर्दोगनला तिच्या महालात जाऊन भेटलेला आमिर खान स्वःताला देश प्रेमी म्हणवतो. कौन बनेगा करोडपती मध्ये झेंड्याला सलाम न करणारा आमिर खान आपल्या घरावर तिरंगा फडकवतो, ह्यांना वाटत जनतेला (हिंदु) सहज मुर्ख बनवता येते.

In reply to by डँबिस००७

ह्यांना वाटतं हिंदु जनतेला सहज मुर्ख बनवता येते.- पण समाज जागा झाला आहे आणि हेच त्यांना पचत नाहीये. हे समाजद्रोही ठेचलेच पाहिजेत. मी पैसे देऊन खान लोकांचा पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे अंदाज अपना अपना. त्यानंतर यांना पैसे कधीही दिलेले नाहीत, मरेस्तोवर कधी देणारही नाही! सिनेमा पडेल आहे अभिनेता उघडा पडलेला आहे. तेच ते व्हिएफएक्स चे तारुण्य आणि तोच तो माकडछाप अभिनय लोक तरी कितीकाळ पाहणार?

सदर चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांनी "मज़हब से मलेरिया फैलता है" हे कसे हे समजावून सांगावे.

सदर चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांनी "मज़हब से मलेरिया फैलता है" हे कसे हे समजावून सांगावे.

आमीर खान ने आपला दुटप्पीपणा अनेक वेळेस सिद्ध केलेला आहे. इरोडगन यांच्या बायकोला भेटल्यापासून तर तो लोकांच्या मनातून साफच उतरला आहे कुठेही कधीही समाजसुधारक लोकाना केवळ हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धा कशा काय दिसतात? हे एक कोडे आहे. भेकड पणा हा पुरोगामी लोकांचा स्थायीभाव असल्याने इस्लाम मधील सरळ सरळ दिसणाऱ्या अन्धश्रद्धा आणि अमानुषपणा बद्दल त्यांची तोंडे कायमच बंद असतात. भारतात प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक अधिकारांबद्दल उच्चरवाने बोम्ब मारणाऱ्या पुरोगाम्यांनी तलाकपीडित महिला भारतात किती आहेत याची साधी आकडेवारी सुद्धा उपलब्ध नाही या बद्दल कधी तोंड उघडलेले मी पाहिलेले नाही. भारतीय राज्यघटनेबद्दल दुहाई देणारे सर्वच पुरोगामी समान नागरी कायदा सारख्या घटनेच्या मूलभूत कलम ४४ बद्दल गेली ७५ वर्षे कधीही आग्रहाने बोलताना दिसत नाहीत. Article 44 in The Constitution Of India 1949 44. Uniform civil code for the citizens The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India शेवटी एकच म्हणावेसे वाटते. उद्या दाऊद इब्राहिम ने जर चित्रपट काढला आणि त्यात दिग्गज कलाकार असतील तरी कलेसाठी कला म्हणून मी तो कधीही पाहणार नाही. हि एकच वृत्ती आहे कि जे म्हणतात पाकिस्तानी क्रिकेटर्सची काय चूक आहे? त्यांना पण भारतात बोलवा आणि आय पी एल मधून कोट्यवधी रुपयांची खैरात करा. बॉलिवूड कडे एकंदर पैसा कुठून आणि कसा येतो याची माहिती मिळाल्यानंतर गेली कित्येक वर्षे एकंदर सिनेमे पाहणेच मी बंद केले आहे. त्यामुळे लालसिंग चड्ढा कसाही असला तरी मला शष्प फरक पडत नाही.

In reply to by सुबोध खरे

" होईना काही, जीवाची लाही ". सध्या पुरोगाम्यांचे सरकार नाही ना? करा ना अहिंदू धर्मातील अंधश्रद्धा दूर. किती दिवस पुरोगाम्यांचे तुणतुणे वाजवणार?

In reply to by सुबोध खरे

डोळे बंद करून पातळी कशी समजते? काही सिद्धी प्राप्त झाली का? उपाय योजना करा प्रत्येक समस्येवर. सतत दुसऱ्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या.

In reply to by आग्या१९९०

आँ मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बतायेंगे हे उच्च रवाने ओरडल्यानंतर मंदिर निर्मिती दृष्टी टप्प्यात आल्यावर दातखिळी बसलेले लोक परत सक्रिय झालेले दिसतात

In reply to by सुबोध खरे

एकदा प्रतिगाम्यांनी काय करायचं असतं किंवा काय करत असतात ते तरी उलगडून सांगा. पुरोगामी लोकांचा स्थायीभाव भेकडपणा आहे हे मान्य करू. मग प्रतिगामी लोक कसे भेकड नाहीत तेही सांगा. मुळात भेकड पुरोगामी सोडून दुसरे कोणते गामी असतात हे तरी तुम्हाला मान्य आहे का सांगा. म्हणजे तुम्हाला नेमकं हवं तरी काय आहे? या प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर एखाद्याला प्रतिगामी म्हणायचं की पुरोगामी? या गोष्टींचे माईल्डर वर्जन असेल तर काय म्हणणार? १. मला स्त्रीशिक्षण, विधवापुनर्विवाह वगैरे अजिबात मान्य नाही. स्त्रियांनी मुळात शिकायचीही गरज नाही. त्यांनी चूल आणि मूल सांभाळलेलंच बरं. बालविवाह तर बेस्टच. २. जात हा भारतीय समाजव्यवस्थेचा मानबिंदू आहे. माझी जात नि:संशय श्रेष्ठ आहे. माझी विष्ठा साफ करण्याची जबाबदारी इश्वरानेच काही जातींना दिली आहे हे मला पुरेपूर पटले आहे. २. गड्या आपला आयुर्वेदच बरा. (पण एनिमा वगैरे नको बरंका, तिथे काहीतरी खुपसायचे हे जरा जास्तच होतंय). आधुनिक वैद्यक वगैरे थोतांडाच्या नादी लागलेलं वाईटच. शिवाय आप्ल्या पूर्वजांनी टेस्ट ट्यूब बेबी वगैरे तर ५००० वर्षांपूर्वीच करून ठेवलं आहे. ३. माझी मुलं गे वगैरे झाली तर मी त्यांचा जीवच घेईन. असली पैदासच नको. सरकारने तर अशा लोकांची लिंगे जाहीरपणे कापली पाहिजेत. ४. वैज्ञानिक दृष्टिकोण वगैरे काय आचरटपणा असतो? ग्रह गोलांचा मानवी जीवनावर परिणाम घडतच असेल. ५. इस्लाम हा मानवी अस्तित्त्वाला लागलेला कलंक आहेच. परंतू त्याच्यावर एकच उपाय. विश्वगुरु भारताने आधी एकेक करत अखंड भारत पार जावा-सुमात्रा पर्यंत ते काबूल कंदाहार पर्यंत केला पाहिजे. आणि मग सौदी अरेबिया वगैरे काबीजकरून सगळीकडे हनुमानाची मंदिरे बांधली पाहिजेत. ते एकेश्वरवाद वगैरे सोडून द्यायला पाहिजे. वाटल्यास ते एकेश्वरवाद वगैरे स्वीकारू शकतात पण अट एकच शूद्र म्हणून त्यांनी आमची वर्णव्यवस्था निमूटपणे मान्य केली पाहिजे. ६. ७० वर्षांत केवळ आमच्या जीवावरच आम्ही जगलो. सरकारचा एक पैसाही स्वतःवर खर्च करू दिला नाही. शिक्षण वगैरे सगळं स्वतःच्या खाजगी पैशांनी झालंय. कॉंग्रेससारख्या भिकारचोट पक्षाने चालवलेल्या सरकारकडून पैसे घ्यायचे म्हणजे महापाप. २०१४ नंतरच खरे स्वातंत्र्य मिळाले.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

तुम्ही एकदम डावे नसलात तर एकदम उजवेच असले पाहिजे हा हट्टाग्रह कशासाठी? १. मला स्त्रीशिक्षण, विधवापुनर्विवाह वगैरे अजिबात मान्य नाही. स्त्रियांनी मुळात शिकायचीही गरज नाही. त्यांनी चूल आणि मूल सांभाळलेलंच बरं. बालविवाह तर बेस्टच. असे कोणता माणूस म्हणालाय? माझी आई शाळेची मुख्याध्यापिका होती. तिचे एम ए बी एड हे शिक्षणसुद्धा आमच्या जन्मानंतर केलेले. २. जात हा भारतीय समाजव्यवस्थेचा मानबिंदू आहे. माझी जात नि:संशय श्रेष्ठ आहे. माझी विष्ठा साफ करण्याची जबाबदारी इश्वरानेच काही जातींना दिली आहे हे मला पुरेपूर पटले आहे. असे कोणता माणूस म्हणालाय? २. गड्या आपला आयुर्वेदच बरा. (पण एनिमा वगैरे नको बरंका, तिथे काहीतरी खुपसायचे हे जरा जास्तच होतंय). आधुनिक वैद्यक वगैरे थोतांडाच्या नादी लागलेलं वाईटच. शिवाय आप्ल्या पूर्वजांनी टेस्ट ट्यूब बेबी वगैरे तर ५००० वर्षांपूर्वीच करून ठेवलं आहे. मी स्वतः आधुनिक वैद्यकाचा एम बी बी एस, एम डी आहे आणि अजून तरी आमच्या घरच्या कोणत्याही आजारपणासाठी आधुनिकच औषधे घेतलेली आहेत. ३. माझी मुलं गे वगैरे झाली तर मी त्यांचा जीवच घेईन. असली पैदासच नको. सरकारने तर अशा लोकांची लिंगे जाहीरपणे कापली पाहिजेत. असे कोणता माणूस म्हणालाय? गे म्हणजे काय हे तुम्हाला नीट समजलंय का? आधुनिक वैद्यकशास्त्रात त्याबद्दल काय लिहिलंय हे एकदा वाचून पहा आणि मग अशी बेफाट वक्तव्ये करा ४. वैज्ञानिक दृष्टिकोण वगैरे काय आचरटपणा असतो? ग्रह गोलांचा मानवी जीवनावर परिणाम घडतच असेल. माझा ज्योतिष शास्त्रावर विश्वास नाही. आणि आमची आई ४५ दिवस व्हेंटी लेटर वर होती तेंव्हा मी कोणत्याही देवळात किंवा ज्योतिषाकडे गेलो नव्हतो. ५. इस्लाम हा मानवी अस्तित्त्वाला लागलेला कलंक आहेच. परंतू त्याच्यावर एकच उपाय. विश्वगुरु भारताने आधी एकेक करत अखंड भारत पार जावा-सुमात्रा पर्यंत ते काबूल कंदाहार पर्यंत केला पाहिजे. आणि मग सौदी अरेबिया वगैरे काबीजकरून सगळीकडे हनुमानाची मंदिरे बांधली पाहिजेत. ते एकेश्वरवाद वगैरे सोडून द्यायला पाहिजे. वाटल्यास ते एकेश्वरवाद वगैरे स्वीकारू शकतात पण अट एकच शूद्र म्हणून त्यांनी आमची वर्णव्यवस्था निमूटपणे मान्य केली पाहिजे. असे कोणता माणूस म्हणालाय?इस्लामच काय कोणताही धर्म हा केवळ घरापुरताच मर्यादित असायला हवा. आणि सगळ्या मदरशात सरकारी शाळेत किंवा कॉन्व्हेंट मध्ये धार्मिक शिक्षण बंद करून केवळ शास्त्रीय शिक्षणच दिले पाहिजे याबद्दल मी आग्रही आहे. ६. ७० वर्षांत केवळ आमच्या जीवावरच आम्ही जगलो. सरकारचा एक पैसाही स्वतःवर खर्च करू दिला नाही. शिक्षण वगैरे सगळं स्वतःच्या खाजगी पैशांनी झालंय. कॉंग्रेससारख्या भिकारचोट पक्षाने चालवलेल्या सरकारकडून पैसे घ्यायचे म्हणजे महापाप. २०१४ नंतरच खरे स्वातंत्र्य मिळाले. ७० वर्षे भारत हि काय काँग्रेसच्या बापाची जहागीर होती का? कि सर्व शिक्षण संस्था काँग्रेसने आपल्या पैशातून निर्माण केल्या. कॉन्ग्रेस हा हत्ती नसून माहूत होता पण आपणच हत्ती आहोत असा खोटा दंभ निर्माण त्यांनी केला आणि तुमच्यासारखे लोक त्याला बळी पडले. खा खा पैसे खाल्ल्यावर जनतेने त्यांना माहुतपदावरून हाकलले आहे आणि श्री मोदी याना बसवले आहे. उद्या श्री मोदी हे डोईजड झाले तर जनता त्यांना सुद्धा पायउतार करायला लावून दुसऱ्याला बसवतील. मुळात सध्या असलेली काँग्रेस हि स्वातंत्र्याच्या वेळची काँग्रेस नाहीच इंदिराजीनि स्थापन केलेल्या काँग्रेसने तिचे तिच्या इतिहासासकट अपहरण केले आहे. हा इतिहास वाचला नसेल तर वाचूनही घ्या आम्ही शिक्षण घेतले ते भारतीय जनतेच्या पैशातूनच काँग्रेसच्या खैरातीतून नाही. माझ्या बद्दल म्हणाल तर मला ४ थी आणि ७ वि ची शिष्यवृत्तीची मिळाली होती. एम बी बी एस आणि एम डी लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातून झाले ज्यासाठी मी कायम लष्करात नोकरी करण्याचा (permanent commission) बॉण्ड लिहून दिला होता तेंव्हा माझ्या वर कुणाचे हि उपकार नाहीत. बाकी आपला प्रतिसाद टिपिकल अज्ञानजन्य आणि द्वेषमूलक असून उजवा माणूस म्हणजे पुराणमतवादी, आधुनिक विज्ञानाचा द्वेष्टा, जुन्या जमान्यत रमणारा अशी एक मनात प्रतिमा निर्माण केल्यामुळे झापडबंद असा आलेला आहे. कम्युनिस्ट माणसांना जसे आपण सोडून सगळे क्रांतीचे विरोधक आणि बुर्ज्वा वाटतात तसे स्वयंघोषित पुरोगामी हे निधर्मांधतेचा अतिरेक करणारेच दिसतात. माझा प्रतिसाद हा अशा निधर्मांध स्वयंघोषित पुरोगामी माणसांबद्दल होता परंतु तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणून एवढे स्पष्टीकरण दिले अन्यथा तुमचे पूर्वग्रह आणि तुमचे चष्मे तसेच राहू द्या.

काही जण म्हणत आहेत की चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही. बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला आहे की लाल सिंग चड्डा वर बहिष्काराचे आवाहन त्या चित्रपटातील काही आक्षेपार्ह content मुळे करण्यात आले आहे. परंतु बहिष्काराचे आवाहन करणाऱ्या बहुतेकांच्या मते, ह्या चित्रपटाचा कन्टेन्ट कसा आहे हा मुद्दा नाहीच (किंवा असलाच तर तो आणखी एक वेगळा मुद्दा आहे). आमिर खान च्या चित्रपटावर बहिष्काराचे आवाहन त्याने पूर्वी केलेल्या राजकीय वक्तव्यांमुळे करण्यात आले आहे. त्याची वक्तव्ये: १) मोदींना २००२ च्या नरसंहारासाठी जबाबदार धरणे: https://www.freepressjournal.in/india/when-aamir-khan-slammed-modi-over… २) भारतात असुरक्षितता वाढत असल्याचे सांगणे : https://www.youtube.com/watch?v=eQiabMknhTU ३) भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या तुर्कस्तानच्या पंतप्रधानांच्या पत्नीला जाऊन भेटणे: https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/politics-aamir-khan-em… ४) PK ह्या सिनेमात फक्त हिंदू धर्माची टवाळी करणे, पर्यायाने इतर धर्मांच्या तुलनेत हिंदू धर्म वाईट दाखवणे. तसेच करिनावर सुद्धा करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर आमिर खानला राजकीय वक्तव्ये करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे . त्याचप्रमाणे त्याचे कुठलेही वक्तव्य किंवा कृती आवडली नसल्यास, ते न आवडणाऱ्या लोकांना त्याच्या सिनेमाला न जाण्याचा, तसेच इतरांनाही न जाण्याचे शांततापूर्ण आवाहन करण्याचा अधिकार आहे (अर्थात सिनेमाला जाणाऱ्या लोकांना मारणे, धमकावणे वगैरे मार्ग ना चोखाळता). हे काहीसे नाना पाटेकरवर मी टू चा आरोप झालेला आहे म्हणून मी त्याचा चिपत्रपट पाहणार नाही. किंवा सलमान खानने लोकांना गाडीखाली उडविले असावे (जरी कोर्टात तो निर्दोष सिद्ध झाला) म्हणून मी त्याचा चिपत्रपट पाहणार नाही. अशासारखे आहे. तर मला समजल्याप्रमाणे भूमिका काय आहे हे मी फक्त इतरांना कळावे म्हणून जनहितार्थ मांडले आहे. ते खरे/खोटे चूक/बरोबर ह्याबद्दल मी मत मांडलेले नाही.

In reply to by अगम्य

>>तसेच करिनावर सुद्धा करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! एरवी चढ्ढा मी चित्रपट गृहात पाहुन तसाही पाहिला नसता. (चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहण्यासाठी उतावीळ होण्याचे वय केव्हाच मागे पडले.). पण जर संधी आली असतीच तर केवळ करिना कपूर-खान ह्या तोंडाळ अभिनेत्रीमुळे तो नक्कीच पाहिला नसता. भले तिने कितीही मदर इंडिया टाईप अभिनय केला असो. प्रेक्षकांना गृहीत धरणारा कोणताही कलाकार जाम डोक्यात जातो.

तुम्ही बसा सगळे इथे इस्लाम मधील अंधश्रद्धा, ७० वर्षे, बॉयकॉट अन् सिनेमा सारख्या इतर सगळ्याला विषयांना शिव्या घालत तिकडे केंद्र सरकारने रोहिंग्याया मुसलमान शरणार्थी लोकांना आसरा द्यायचा निर्णय केला फायनल, दिल्लीत रोहिंग्या निर्वासितांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत कोट्यातील फ्लॅट, मूलभूत सुविधा आणि २४/७ दिल्ली पोलिस प्रोटेक्शन देणार आहे सरकार. समर्थक अन् विरोधक दोघांचे अभिनंदन सोत्रीने काही पाप केले नाही सिनेमा पाहून म्हणजे &#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315

In reply to by जेम्स वांड

आता खरे साहेब मोदींना पुरोगामी (भेकड) वगैरे म्हणणार की काय मग? चक्क रोहिंग्या? निदान ते अहमदिया तरी घ्यायचे.. मोदींनाच बायकॉट करण्याची वेळ आली म्हणजे. पुरोगामी कुठले!

In reply to by हणमंतअण्णा शंक…

भाजपच्या हैदराबाद मध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आदरणीय मोदींनी "पासमंदा मुसलमान" उर्फ मुस्लिम जातीय उतरंडीत असणाऱ्या खालच्या जातीतील किंवा ओबीसी मुसलमानांना आपलेसे करा असा गुरुमंत्र दिला आहे. त्या बरहुकुम ही रणनीती बनली आहे म्हणतात बुआ . आता ऑप इंडियाला कळते ते मोदींना कळत नाही का मोदींना लिब्रांडू वगैरे म्हणायचे तितके उत्तर मिळाले का जरा स्पष्ट होईल चित्र. हे सगळे सुरू असताना भाजप दिल्ली ने मात्र आपल्या कार्यक्षमतेचा पूर्ण परिचय देत एक पासमंदा रीच आऊट प्रोग्राम केला म्हणतात ५ ऑगस्टला

येन केन प्रकारेण लाल सिंह चढ्ढा डब्ब्यात गेल्यामुळे बॉयकॉट गँग खुश आहेच. त्यांना आता जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही. पण सगळ्यात जास्त गोची लाल सिंह चढ्ढा ला सपोर्ट करणार्यांची झाली आहे. कारणे. १. चित्रपट कसा चांगला आहे त्याबद्दल भरभरुन सांगावं लागतयं २. त्याबरोबर चित्रपट आपटलाय पण त्याचं क्रेडीट बॉयकॉट गँग ला न देता सुमार चित्रपट असल्यामुळे चित्रपट कोसळु शकतो हे सांगावं लागतयं. त्यामुळे मुळात वरचा मुद्दा १ बाद होतो. ३. अगोदर हवेत असलेल्या अमिर/करीना सारख्यंना आता प्रेक्षकांसाठी भवनिक आवाहन करावे लागतेय. ४. आजुन काही जणांचे मत ऐकले की. जर हा चित्रपट पडला तर नुकसान मोदींच्या मित्राचे म्हणजे अंबानींच्या वायकॉम१८ कंपनीचे होइल पण मग अमिरचा चित्रपट पाहण्याचे आवाहन करताना मग मोदींच्या मित्राचा फायदा होईल याने हे लोकच जास्त दुखी झाले पाहीजेत. ५. वरील एका प्रतिसादात आल्याप्रमाणे सध्या इकॉनॉमी चे ल लावले असल्याने लोक थिएटर मध्ये जाऊन पैसे खर्च करत नाहीत,तर मग सध्या जे इतर चित्रपट सुपरहीट झालेत ते कशामूळे? आणि बाकीच्या चैनीच्या गोष्टी कशा परवडतात? ६. स्वलालधन्य परफेकट्निष्ट आमिर ला जसे लोकांनी डोक्यावर चढवले होते तसेच ते त्याला त्याच्या मग्रुरी मुळे खाली पाडु शकतात हे सिध्द झाले आहे आणि हा सगळ्या बोलघेवड्या सेलिब्रिटिजना मोठा धडा आहेच. समाजात वावरताना भान ठेवुन व्यक्त व्हावे लागते हे त्यांना समजावुन घ्यावे लागेल. पण हे ते करतील अशी अपे़क्षा करणे पण चुकीचे आहेच. लाल सिंह चढ्ढा आपट्ल्याने त्यातल्यात्यात अगोदर हवेत असणारे इतर कलाकार आता तंतरल्याने भावनिक आवाहन करु लागलेत

यश राज १००००००००००००% सहमत !!

केंद्र सरकारने रोहिंग्याया मुसलमान शरणार्थी लोकांना आसरा द्यायचा निर्णय केला समर्थक अन् विरोधक दोघांचे अभिनंदन !! माझ्या मते केंद्र सरकारने हे चुकीच पाऊल ऊचलल आहे. सापाला दुध पाजल तरीही तो डसायच सोडत नाही ! ह्याचा अनुभव म्यानमार ( बर्मा ) सारख्या बुद्ध धर्मीय देशाने घेतल्याने त्यांनी ह्या रोहींग्यांना देशाबाहेर हकलल आहे. रोहीग्यांचा मुळ देश बांग्लादेशच सुद्धा त्यांना परत घेत नाहीय. भारताने त्यांना परत घेऊन आपल्या पायावर धोंडा पाडुन घेतलेला आहे. पश्चातापाची वेळ लवकरच येईल.

In reply to by डँबिस००७

ह्या बाबतीत पण कृषी कायद्यांच्या प्रमाणेच कन्फ्युज दिसते आहे, एक मंत्री ट्विट करून म्हणतो की त्यांना फ्लॅट आणि निर्वासित दर्जा देणार, दुसरे मंत्रालय म्हणते की बुआ नाही असे काहीच नाही, ते बेकायदेशीर असतीलच अन् deport पण होतीलच, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही असली गत म्हणायची एकंदरीत.

मला वाटते चित्रपटाचा दर्जा आणि त्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन यात काही संबंध नाही. चित्रपट निर्मितीत महत्वाची भूमिका असलेल्या काही प्रथितयश कलावंतांनी प्रेक्षकांना गृहीत धरून समाजातल्या एका मोठ्या वर्गाला आपण कितीही दुखावले, अवमानित केले किंवा सातत्याने खिल्ली उडवली तरी आपले काही वाकडे होत नाही असा गोड गैरसमज करून घेतल्याने त्यांना योग्य ती समज यावी या दृष्टीने बहिष्काराचे आवाहन करण्यात आले होते/ आहे. बाकी चू.भू.दे.घे.

In reply to by मूकवाचक

प्रेक्षकांना गृहीत धरून समाजातल्या एका मोठ्या वर्गाला आपण कितीही दुखावले, अवमानित केले किंवा सातत्याने खिल्ली उडवली तरी आपले काही वाकडे होत नाही असा गोड गैरसमज करून घेतल्याने त्यांना योग्य ती समज यावी या दृष्टीने बहिष्काराचे आवाहन करण्यात आले होते/ आहे. अगदी हेच हेच .... हे आवाहन प्रतीकात्मक आहे सतत चित्रपट/ जाहिराती यातून "वाईट प्रवृत्ती ती फक्त हिंदूत आहे" असे दाखवयाचे किंवा अतिशय सुक्ष्म पणे हा मुद्दा रेटायचा किंवा सतत हिंदूत कसा वर्णभेद आहे हे रेटत राहायचे हा "अजेंडा" आहे आणि तो लोकांनां कळून चुकला आहे म्हणून लोक ( कधी कधी मानवतेला धरून नसेल तरी) असे आवाहन चालवतात ... फारच थोडे कला निर्माते समाजातील हिंदू नसलेले समाज कसे देशात धर्मबदलाला प्रौढसं देत आहेत ते दाखवतात पण आपलेच हिंदू डोळे झाकून बसतात हे उदाहरण बघा... https://www.youtube.com/watch?v=MSprAZJWf18 दिग्दर्शकाने हिंमत दाखवली आहे यात, कि जेवहा ख्रिस्ती मिशनरी शाळा एका हिंदू बहुजन गरीब पालकाला त्याच्या मुल सध्या जात असलेल्या शाळेत उच्च जात त्याला डावलते आहे वैगरे न्यानामृत पाजत असते त्यावर तो बहुजण बाप आणि त्याची बायको त्या मिशनरी ल शालजोड्यातील ठेवून देतात बघा नक्की

आमिर खानने "कौन बनेगा करोडपती" कार्यक्रमात तो "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान आहे हे दाखवुन दिलेच.
नक्की काय झाले हे बघण्याकरिता मी हा भाग पाहिला. दुवा sonyliv.com वर लॉगिन करुन ही छोटीशी चित्रफीत मोफत बघता येईल यात ०३:२० नंतर असे दिसते की स्पर्धक म्हणून आलेल्या कर्नल मिताली ह्यांच्या सन्मानार्थ अमिताभ त्यांना सलाम करण्याचे सर्वांनाआवाहन करतात. अमिताभ स्वतः उभे राहून कर्नल मितालींना सलाम करतात व तसेच प्रेक्षकही सलाम करतात तर हा सलाम स्वीकारुन मितालीजी ही सलाम करत आहेत. तर स्पर्धक म्हणून आलेला आमिर खान मितालीजींच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवत आहे. आमिर खानने सलाम न करता टाळ्या वाजवल्यात हे काहीसे चुकीचे वाटू शकते - खासकरुन इतर सर्वजण त्यांना सलाम करत असताना .. तरी हा सलाम झेंड्याला नसून कर्नल मितालीजींसाठी आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे. त्यानंतर प्रेक्षकांतून भारत माता की अशी साद आल्यावर आमिर खान सुद्धा "जय" म्हणताना दिसत आहे. तर त्यानंतरचा "वंदे मातरम" चा जयघोष फक्त प्रेक्षकांतून आलेला आहे. अमिताभ, मितालीजी वा आमिर खान त्यावेळी पुन्हा स्थानापन्न होत आहेत व तिघेही "वंदे मातरम" म्हणताना दिसत नाहीत. यात आमिर खान "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान असल्याचे त्याने दाखवून दिले असे कुठे जाणवते ?

In reply to by तर्कवादी

तर्कवादी, तुमच म्हणण पटल. आमिर खान हा खुप चांगला अभिनेता तर आहेच पण खुप चांगला माणुस सुद्धा आहे. वंदे मातरम , झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक असल्याने त्याबद्दल आमिर खानला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. भारताचे उप राष्ट्रपती आपल्या पदावर असताना १५ अँगस्टला झेंडावंदनाच्या वेळी झेंड्याला सलाम करत नाहीत हे भारतीय जनतेने पचवले आहे मग आमिर खान का नाही. झेंड्याला सलाम करण्याच्या आड ईस्लाम येतो म्हणे, दुसर कारण असेल तर मला माहिती नाही, पण पाकिस्तानातल्या मुसलमान लोकांना झेंड्याला सलाम करताना ईस्लाम कसा आड येत नाही ? आमिर खानचा बहीष्कार करणारे आमच्या सारखे लोक मुर्ख आहेत. आमिर खानने कधीही हिंदु देवी देवतांचा अपमान केलेला नाही. आमिर खान ज्या सिनेमात काम करतो त्यामुळे हिंदू देवी देवतांचा अपमान होत असेल तर त्याला जवाबदार सिनेमाचे निर्माते, निर्देशक लेखक असावेत. अभिनेता जवाबदार नसतो. सिनेमे निर्माण करणारे हिंदुच्या भावना दुखावणारे असतात जे नेहमी पडद्या आड असतात. त्यामुळे आमिर खान सारख्या निष्पाप माणसाला दुखण्याच पाप हिंदुंनी करु नये !! माझ्या मते ला सिं च चा बहीष्कार हा सिनेमाचा बहीष्कार होता, पर्यायाने बहिष्कारामूळे सिनेमा निर्माते, निर्देशक वैगेरे प्रभावीत झालेले असणार मग आमिर खान ह्या बहिष्काराने दुःख्खी का झाला ? जर कोणत्याही सिनेमामुळे वा ईतर कारणामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तरी त्यांनी त्याची सवय घालुन घेतली पाहीजे. मकबूल फिदा हुसेनने नाही का देवी सरस्वतीची निवस्र प्रतिमा रेखली होती ? तुमच्या नाकावर टिच्चुन तो कतार मध्ये जाउन राहीला. जर कोणी आवाज उठवला किंवा समर्थन केले तर गळे कापले जातील. आता पर्यंत नूपुर शर्माच्या समर्थनात १८-२० वर गेलेले आहेत.

In reply to by डँबिस००७

डँबिसजी,
वंदे मातरम , झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक असल्याने त्याबद्दल आमिर खानला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
तुम्ही माझे वाक्य बहुधा नीट वाचले नसावे. तरी हा सलाम झेंड्याला नसून कर्नल मितालीजींसाठी आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे आमिर खानने झेंड्याला सलाम केला नाही असे अजून तरी निरीक्षणात आलेले नाही. त्यामुळे तुमचा मुद्दाच गैरलागू होतो.
आमिर खान ज्या सिनेमात काम करतो त्यामुळे हिंदू देवी देवतांचा अपमान होत असेल तर त्याला जवाबदार सिनेमाचे निर्माते, निर्देशक लेखक असावेत
अर्थातच !! बाकी उपराष्ट्रपती, मकबूल फिदा हुसेन ई लोक हे धागाविषयाशी संबंधित नाहीत. त्यांच्याबद्दल काही धागा असल्यास तिथे चर्चा करुयात.

In reply to by तर्कवादी

माझ्या मते ला सिं च चा बहीष्कार हा सिनेमाचा बहीष्कार होता, पर्यायाने बहिष्कारामूळे सिनेमा निर्माते, निर्देशक वैगेरे प्रभावीत झालेले असणार मग आमिर खान ह्या बहिष्काराने दुःख्खी का झाला ?
आमिर खान दु:खी झाला की नाही झाला याबद्दल मला माहित नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काही सांगता येणार नाही. आणि तसेही आमिर खानच्या वैयक्तिक सुख दु:खाशी मला काही देणे घेणे नाही. आमिर खानचा मी खास चाहता आहे असंही नाही. पण एक विशिष्ट प्रोपागंडाद्वारे समाजात द्वेषाचे राजकारण केले जात असेल तर माझा त्याला विरोध आहे. बघा पटतंय का...

In reply to by तर्कवादी

पण एक विशिष्ट प्रोपागंडाद्वारे समाजात द्वेषाचे राजकारण केले जात असेल तर माझा त्याला विरोध आहे. १०० % पटल बुवा ! हिंदु समाज द्वेषाचे राजकारण करत असुन त्याला विरोध करायलाच पाहीजे हे तुमचे म्हणणे अगदी बरोबरच आहे.

In reply to by डँबिस००७

हिंदु समाज द्वेषाचे राजकारण करत असुन त्याला विरोध करायलाच पाहीजे हे तुमचे म्हणणे अगदी बरोबरच आहे.
कोणताही समाज वाईट नाही. पण मूठभर समाजकंटक कोणत्याही समाजात असू शकतात. त्यांचा विरोध करायला हवा. आणि अशा लोकांच्या द्वेषपुर्ण प्रोपागंडामुळे इतर लोकांचा थोड्याफार प्रमाणात बुद्धीभेद होण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रोपागंडाचा विरोध करावा. असो. नवीन काही मुद्दा पुढे आला तर आणखी चर्चा होईलच. तोपर्यंत माझ्याकडून विराम. धन्यवाद.

In reply to by डँबिस००७

झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाचाय झेंड्याला निदान महत्वाच्या दिवशी ( उठसुठ नव्हे) मानवंदना न देणे हे वयक्तिक ? अश्या दिवशी सार्वजनिक समारंभाला जायलाच पाहिजे असे मी नाही म्हणत पण जर गेला असाल तर मान हा राखायला नको ? धर्माचा काही संबंध नाही आणि असेल असे जो म्हणत असेल तर मग त्या व्यक्तीला ( उप राष्ट्रपती ) देशापेक्षा धर्म मोठा वाटतो .. हे स्पष्ट आहे गडबड आहे मग जनता पक्षात जनसंघ विलीन झाला तेवहा सांजवाद्यांनी जनसंघाच्या लोकांनां विचारले कि तुमची देहरी निष्ठा आहे मग त्याचाच समाजवाद्यांना हि दुहेरी निष्ठा पटते? धन्य

In reply to by चौकस२१२

उपराष्ट्रपती जेव्हा principal dignitary नसतो तेव्हा त्याने सैल्युट न करता अटेँशन पोझिशन मधे उभे राहणे असा प्रोटोकॉल आहे. जेव्हा राष्ट्रपती उपस्थित असतात तेव्हा राष्ट्रपती सैल्युट करतात. जेव्हा फक्त उपराष्ट्रपती हा principal dignitary असतो तेव्हाच तो सैल्युट करतो. अन्सारी आडनाव नसते तर हे निरीक्षण नोंदवले जात नाही. असले की व्हायरल होते. बाकी इतर काही असो, धिस इज ओन्ली टू बी फेअर विथ द देन व्हाईस प्रेसिंडेंट.

In reply to by गवि

.... असा प्रोटोकॉल आहे ठीक आहे तांत्रिक दृष्ट्या तुम्ही म्हणता ते असेल १००% बरोबर पण " ते केवळ अन्सारी" आहेत म्हणून टीका करतो असे नाही ,, अन्सारी साहेबांची इतर वक्त्यवे आणि त्यामागील वृत्ती हे पण बघावी

In reply to by चौकस२१२

म्हणूनच बाकी इतर काही असो, असे म्हटले. मला जेवढे माहीत तेवढे म्हणालो. हे तुम्हाला उद्देशून नाही. इन जनरल, माझे म्हणणे असे की समजा, समजा, समजा, कोणाच्या मताप्रमाणे एक आख्खा धर्म खतरनाक असेल असे केवळ वादापुरते गृहीत धरले तरी जेव्हा आधीच गच्च गर्दी, अस्थिरता, रेटारेटी असते, तापलेली डोकी असतात तेव्हा "जनहितार्थ" सहज (व्हाट)साप साप म्हणून ओरडण्यापूर्वी किमान आत्ता दिसतेय ते नक्की सापच आहे, दोरी नाही इतके तरी पहावे इतकेच.

In reply to by गवि

काय राव उत्तम नरेटिव सेट करण्याचा मूलभूत राजकीय अडाणीपणाचा हक्क तुम्ही असे कसे नाकारू शकता आम्हाला !? आता आमिर खान ने नाही केला त्या कर्नलला सल्युट, त्यावर एक निवृत्त कर्नल खालील विधान करतात . पण तुम्ही बघितले नसेल, आमिर तिथे पगडी घालून उभा होता नई का ? अन् तरीही सल्युट न करता अंगविक्षेप करत नाचत होता, तुम्ही बघितले नाहीत कारण तुम्हीच मूलतः लीब्रांडू आहात गवि. बाकी, काय असलं काही पोस्ट केलं का आमिरने कर्नलला सल्युट केला नाही ह्यात कर्नल ऐवजी झेंडा भरू रिकाम्या जागी, मग झेंड्याचा प्रोटोकॉल शोधत बसा तुम्ही, तोवर आम्ही थोडा कार्यभाग साधून घेऊ.

In reply to by जेम्स वांड

आमिर तिथे पगडी घालून उभा होता नई का ? अन् तरीही सल्युट न करता अंगविक्षेप करत नाचत होता, तुम्ही बघितले नाहीत शो मध्ये अमिताभ बच्चन सॅल्युट करण्याचे "आवाहन" करतो, या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन अमिताभ सकट सगळे सॅल्युट करतात. आता तुम्ही म्हणता तसे आमिर पगडी घालून उभा असावा आणि ती त्याच्या कानावर घट्ट बसलेली असावी ! त्यामुळे सॅल्युटच्या जागी तालिया हा शब्द देखील त्याने चुकुन ऐकला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही ! :) जाता जाता :- कोणालाही हा प्रश्न आता पडणारच नाही की सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जागी सॅल्युट का केला ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Cover

In reply to by मदनबाण

लाख लोकांनी चूक केली म्हणून चूक बरोबर करून घ्यायची का ? मुळात बोडक्या डोक्याने, अंगात सिव्हिल कपडे असताना युनिफॉर्म परिधान केलेल्या अधिकाऱ्याला सल्युट करू नये असा प्रोटोकॉल असताना, तो करण्याचे सामूहिक आवाहन करणे चूक नाही का ? बॉलिवूड मध्ये लष्करी गणवेशांचे विकृतीकरण करून उगाच काहीतरी गणवेश दाखवल्या बद्दल तर कैक मिपाकरांनी इथेच मिपावर आपला सात्विक संताप सर्थपणे आधीही व्यक्त केलाय न ? मग आता फक्त आमिर आहे म्हणून इतरांच्या सामूहिक चुकीचे समर्थन तरी नको.

In reply to by जेम्स वांड

मुळात बोडक्या डोक्याने, अंगात सिव्हिल कपडे असताना युनिफॉर्म परिधान केलेल्या अधिकाऱ्याला सल्युट करू नये असा प्रोटोकॉल असताना, तो करण्याचे सामूहिक आवाहन करणे चूक नाही का ? प्रोटोकॉलचा मुद्दा मी अमान्य करत नाही, सगळेच प्रोटोकॉल सगळ्या लोकांना ठावूक असतात असे अजिबात नसते. अनेक वेळा प्रोटोकॉल मोडुन पंतप्रधान / तत्सम वरिष्ठ पदावरील व्यक्ती देखील येणार्‍या परदेशी व्यक्तींना भेटतात. इथे त्या व्यक्ती बद्धल विशेष आदर, जिव्हाळा उघडपणे दाखवणे ही भावना अभिप्रेत असते. एक उदा देतो :- प्रोटोकॉल तोड़कर राष्ट्रपति जायद खुद रिसीव करने पहुंचे; मुलाकात के बाद मोदी भारत रवाना मग आता फक्त आमिर आहे म्हणून इतरांच्या सामूहिक चुकीचे समर्थन तरी नको. मी तर त्यांचा मोठा चाहता होतो. मी त्याचे चित्रपट आवार्जुन पाहिले आहे. त्याचा गझनी किमान ५-६ वेळा पाहिला आहे. परंतु आता तो मला त्याच्या तोच तोच चेहरापट्टी करुन अभिनय करतो ते आवडेनासे झाले आहे तसेच डॉक ने जे प्रतिसादात सांगितले आहे ते देखील मला अगदी तसेच वाटते. वरती प्रोटोकॉल मोडण्याचे एक उदा. दिलेच आहे ते तुम्हाला समजेल अशी अपेक्षा करतो. जालावर शोधलेत तर अशी अनेक उदाहरणे सहज सापडतील. असो... या धाग्यावर आता बराच कथ्या कुटुन झाला आहे, तेव्हा मी आता या धाग्यावर अधिकचे प्रतिसाद देणे बंद करतो, कंटाळा आला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Cover

In reply to by मदनबाण

अनेक वेळा प्रोटोकॉल मोडुन पंतप्रधान / तत्सम वरिष्ठ पदावरील व्यक्ती देखील येणार्‍या परदेशी व्यक्तींना भेटतात. इथे त्या व्यक्ती बद्धल विशेष आदर, जिव्हाळा उघडपणे दाखवणे ही भावना अभिप्रेत असते. मी अतिमहत्वाच्या व्यक्तींनी प्रोटोकॉल तोडण्याबद्दल बोलतच नाहीये सर, तो भाग कैक वेळा डिप्लोमसीला पूरक असतो. मी सामान्य माणसांबद्दल बोलतोय. मला पण आशा आहे की आपण समजून घ्याल. बाकी, तुम्ही आमिरचे फॅन होते, नव्हते, असाल, नसाल हे मला तरी मॅटर करत नाही, कारण मी मुळातच तुमच्याविषयी कुठलाही ग्रह करून घेत नाहीये, तर फक्त एक मुद्दा आहे तो मांडतोय अन् चर्चा करतोय, पण ठीक आहे, आपली ईच्छा असल्यास मी पण इथेच थांबतो.

In reply to by जेम्स वांड

@जेम्स वांड मुळात बोडक्या डोक्याने, अंगात सिव्हिल कपडे असताना युनिफॉर्म परिधान केलेल्या अधिकाऱ्याला सल्युट करू नये असा प्रोटोकॉल असताना असा प्रोटोकॉल कुठे आहे हे मला दाखवता येईल का? नौदलात १८ वर्षे मी डोक्यावर टोपी न घालता वरिष्ठांना सलाम करत असे किंवा कनिष्ठांचा सलाम स्वीकारत असे. समर्थन करण्यासाठी किती टोकाला जावे याला सीमा असते का हो?

In reply to by सुबोध खरे

माफ करा, मी आत्ताच ओळखीतल्या एका नौदल अधिकारी असणाऱ्या माणसांकडून तुम्ही म्हणता ते कन्फर्म करून घेतलं, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, कोणीही सल्युट करू शकतो. त्यामुळे मी इथे माझे प्रोटोकॉल संबंधी सगळे प्रतिसाद मागे घेऊन बिनशर्त माफी मागतो स्पष्टीकरण:- १९९९-२००० साली सीनिअर डिविजन राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट असताना एका उस्तादने असा सल्युट करता येत नसतो असे सांगितले होते, मी तेच बेसिस धरून चाललो होतो पण ते चूक होते हे आता स्पष्ट झाल्यामुळे मी पुन्हा एकदा माफी मागतो आपली.

In reply to by सुबोध खरे

समर्थन करण्यासाठी किती टोकाला जावे याला सीमा असते का हो? तर, नाही असे नाही काहीच कारण कोणाचं समर्थन म्हणजे आमिर खानचे समर्थन करून मला काही खास प्राप्त होणार नाही, अगदी लाल सिंग चढ्ढा चे एखाद फुकट तिकीट पण नाही. ह्याची मी आपणांस निःसंदिग्ध ग्वाही देतो इथे. उपलब्ध नॉलेज नुसार मला जो वाटला तो मुद्दा मी धरला, तो चूक होता हे आपण दाखवलं, मी ते मान्य केलं, सिंपल, मणभर इगो नाही कॅरी करत बुआ आपण. बाकी कोण्या अज्ञात लोकांच्या हेतुंवर शंका घेणे, वैयक्तिक शेरेबाजी, अजेंडा शोधण्याचे आव आणणे इत्यादी माझ्या संस्कारांच्या चौकटीत बसत नाही इतकी मात्र मी आपणांस हमी देऊ शकतो.

In reply to by जेम्स वांड

काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच तुम्ही लिहायचं ठरवलंय असा दिसतं. डोक्यावर टोपी असताना सलाम करणे हे केवळ थलसेनेला( आर्मी) आणि लागू असणारा नियम आहे. सामान्य नागरिकांनाच नव्हे तर नौदलात सुद्धा डोक्यावर टोपी नसताना सलाम करता येतो / करायचा असतो. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच तुम्ही लिहायचं ठरवलंय असा दिसतं. उपलब्ध नॉलेज नुसार मला जो वाटला तो मुद्दा मी धरला, तो चूक होता हे आपण दाखवलं, मी ते मान्य केलं, सिंपल, मणभर इगो नाही कॅरी करत बुआ आपण. बाकी कोण्या अज्ञात लोकांच्या हेतुंवर शंका घेणे, वैयक्तिक शेरेबाजी, अजेंडा शोधण्याचे आव आणणे इत्यादी माझ्या संस्कारांच्या चौकटीत बसत नाही इतकी मात्र मी आपणांस हमी देऊ शकतो. :)

In reply to by जेम्स वांड

तो चूक होता हे आपण दाखवलं, मी ते मान्य केलं, सिंपल, मणभर इगो नाही कॅरी करत बुआ आपण. बाकी कोण्या अज्ञात लोकांच्या हेतुंवर शंका घेणे, वैयक्तिक शेरेबाजी, अजेंडा शोधण्याचे आव आणणे इत्यादी माझ्या संस्कारांच्या चौकटीत बसत नाही इतकी मात्र मी आपणांस हमी देऊ शकतो. :)
जेम्स वांडजी वा.. क्या बात.. मनापासून आवडले. सर्वच मिपाकरांनी अशाच वृत्तीने चर्चा केल्यात तर किती बरे होईल.

In reply to by गवि

@ गवि प्रोटोकॉलचा प्रश्न सध्या बाजूला ठेवा परंतु केव्हा एकदा नव्हे तर दोन वेळेस उपराष्ट्र्पती असली व्यक्ती जेंव्हा "मुसलमान या देशात सुरक्षित नाहीत" असे मुलाखतीत स्पष्टपणे म्हणतात आणि त्याच्यासाठी कोणताही पुरावा किंवा स्पष्टीकरण देण्यास नकार देतात तेंव्हा अशा माणसाबद्दल संशय अधिकच बळावतो. याचा "अन्सारी" आडनावाशी सम्बन्ध नाही. "कलाम" आडनावाच्या माणसाबद्दल असे कोणतेही प्रवाद ऐकल्याचे ठेवत नाही हीच व्यक्ती इराण मध्ये राजदूत म्हणून असताना आपल्याच गुप्तहेर संघटनेच्या विरोधात कारवाई करतात तेंव्हा त्यांच्या राजनिष्ठेबद्दलही शंका निर्माण होते. https://twitter.com/rawnksood/status/1144581538954145792?lang=en https://www.sundayguardianlive.com/news/ex-raw-officers-want-pm-act-ham… या माणसावर देशद्रोहाची कारवाई करावी असे तुमची गुप्तहेर संघटना मागणी करते असे असताना हे प्रकरण गंभीर नाही आणि त्यांच्या विरुद्ध अन्सारी आडनावामुळे असे होते हे आपल्याला म्हणायचे असेल तर मला काहीच म्हणायचे नाही चालू द्या तुमचे

In reply to by सुबोध खरे

सर्व मान्य. मुद्दा जोपर्यंत फक्त सैल्युटचा होता आणि तितकाच हायलाईट करुन निष्कर्ष काढला होता तितक्यापुरते ते स्पष्टीकरण होते अन्य सर्व आक्षेपार्ह कृत्ये निंद्य आहेत. ती पुढे आल्यास त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही.

In reply to by सुबोध खरे

गवि साहेब, अन्सारी आडनाव नसते तर हे निरीक्षण नोंदवले जात नाही. असले की व्हायरल होते. बाकी इतर काही असो, धिस इज ओन्ली टू बी फेअर विथ द देन व्हाईस प्रेसिंडेंट. ह्या उप राष्ट्रपती हामिद अंसारी ने किती कांड केलेले आहेत हे बघितले तर तुम्हाला तुमचे वाक्य परत घ्यावे लागेल. १. ईराण मध्ये राजदुत असताना भारताच्या रॉ अधिकार्यांना ह्यांने एक्स्पोज केले होते. २. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर दोनच वर्षांत २०१० ला दिल्लीमध्ये भरवल्या जाणार्या "अ‍ॅंटि टेरेरीस्ट काँन्फेरेंस " साठी अ‍ॅंटि टेरेरीस्ट स्ट्राटेजीवरचा एकस्पर्ट म्हणून पाकिस्तानच्या पत्रकार नुसरत मिर्झाला आमंत्रण पाठवायला ह्या कॉनफेरेंसच्या आयोजकावर जबरदस्ती केलेली होती. त्या आयोजकांनी आपल्या सद्सत विवेक बुद्धीवर असे आ मंत्रण पाठवले नाही. ह्या भारतीय मुळाच्या ब्रिटीश नागरीकाने मिडिया समोर येऊन ह्याची ग्वाही दिलेली आहे. https://www.youtube.com/watch?v=thT_2OMKyxI ३. उप राष्ट्रपती पदावर असताना पाकिस्तानच्या पत्रकार नुसरत मिर्झाला ५-६ वेळा स्पेशल व्हीजा दिला गेलेला होता. सर्वसाधारण पणे पाकिस्तानी लोकांना जो व्हिजा दिला जातो तो फक्त ३ शहरा पुरता मर्यादित असतो. जसे की दिल्ली, अजमेर शरिफ व अजुन एकादे शहर ( प्रवाशाला हवे ते ) . पण नुसरत मिर्झाला मात्र प्रत्येक भेटीत ७ शहरांना भेट द्यायची मुभा होती. नुसरत मिर्झा ने ज्या ज्या शहरांच्या भेटी घेतल्या त्या त्या ठिकाणी लगेच बाँब स्फोट झाले. नुसरत मिर्झा ने स्वःता एका मुलाखती दरम्यान ही माहीती कोणत्याही दबावा शिवाय दिलेली आहे. त्या मु लाखतीत तो पुढे म्हणतो की जेंव्हा जेंव्हा तो भारतात भेटीला यायचा त्यानंतर तो पाकिस्तानच्या गुत्पहेर विभागाच्या अधिकार्याला भेटुन पुर्ण माहीती देत असे. ते अधिकारी अश्या माहिती मुळे खुष असत. पुढे त्या त्या शहरात बाँबस्फोट झाले असल्याने त्या माहितीचा पुरेपुर उपयोग केल्याचे दिसते. https://www.youtube.com/watch? v=EjqLTmUno5Q ४. हामिद अंसारी ने नुसरत मिर्झाला ओळखतच नसल्याचे सांगीतल्यावर त्या दोघांचे एकाच कार्य क्रमातले स्टे ज शेअ र करतानाचे फोटो वायरल झाले. वर खरे साहेबांनी हामिद अंसारी बद्दल माहीती दिलेली आहेच. तरी सुद्दा ज्या दिवशी ते उप राष्ट्रपती म्हणुन निवृत्त झाले त्या दिवशीच्या मा मोदीजींच्या भाषणात २ मिनीटात हामिद अंसारी ची जी तासलेली आहे ते बघीतल तर कळत की निन्म दर्ज्याच्या माणसाला देशाचे उप राष्ट्रपती पदावर बघणे किती कष्ट दायक होते. https://www.youtube.com/watch? v=oYSqzPb2yUA

In reply to by डँबिस००७

कान्डे बेसिसवर नावे ठेवण्यास विरोध नाही. माझे डॉ खरे यांना दिलेले उत्तर पहा. मुद्दा फक्त जे ध्वज सैल्युट केस होती त्यावर होता. http://misalpav.com/comment/1150531#comment-1150531

In reply to by सुबोध खरे

याचा "अन्सारी" आडनावाशी सम्बन्ध नाही. "कलाम" आडनावाच्या माणसाबद्दल असे कोणतेही प्रवाद ऐकल्याचे ठेवत नाही १००% काय उपयोग हा तर्क सांगून डॉक साहेब... ज्यांनी ठरवलेच आहे कि "अल्पसंख्यानकांच्या " कोणत्याही कृती बद्दल काहीही बोलायचे नाही आणि जो बलेलं तो संघी संकुचितवादि / धर्माद्ध / भाग आतंकवादी + इसलॅम्पफोबिया वाढवणारा ( च) असणार

In reply to by चौकस२१२

झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाचाय झेंड्याला निदान महत्वाच्या दिवशी ( उठसुठ नव्हे) मानवंदना न देणे हे वयक्तिक ?
चौकसजी झेंड्याला सलाम न करण्याचे मी समर्थन केलेले नाही. पण "केबीसी मध्ये आमिर खानने झेंड्याला सलाम केला नव्हता" असे केवीसीचा तो भाग पाहिल्यावर मला कुठेही आढळून आले नाही. त्याने "न केलेला सलाम" हा कर्नल मितालीजींसाठी होता, झेंड्यासाठी नाही.

लोकहो, चित्रपट टॉरेंटमार्गे उतरवला व बघितला. खास वाटला नाही. मूळ चित्रपटाचं भारतीय 'रूपां'तर तुटक व अर्थहीन भासलं. ख्रिश्चन पंथ उगीच मध्ये आणलेला वाटला. त्याचं प्रयोजन कळलं नाही. भारतीय पार्श्वभूमीवर विवाहपूर्व संतती दाखवायची खरंच गरज होती का? बहुधा ती स्वीकृत दाखवण्यासाठी ख्रिश्चन पंथाची सोय केली असावी. हा चित्रपट फुकट बघायला मिळाला तरंच बघा म्हणून सुचवेन. आणि सोबत स्वत:चं मानसिक वय वर्षे १५ च्या वर जाऊ देऊ नका. अन्यथा निराशा पदरी पडेल. तूर्तास फॉरेष्टाचा गंपू ( मूळ चित्रपट ) बघायची उत्सुकता मावळली आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पार्श्वभूमीवर विवाहपूर्व संतती दाखवायची खरंच गरज होती का? अहो गा पै , विवाहपूर्व संतती हा भारतीय संस्कृतीचा यू एस पी आहे.. Uda- कुंतीचा कर्ण .

In reply to by कपिलमुनी

गामा पैलवानांना संस्कृती भारतीय प्रिय आहे, पण morals त्यांना Victorian आवडतात असे दिसते.

In reply to by कपिलमुनी

मुनिवर, मग रूपाने तिच्या पोराला टोपलीत भरून कालव्यात सोडलेला दाखवायला हवा होता. मस्तपैकी हिंदू संकृतीच्या यूएसपीची जाहिरात झाली असती. काय गौडबंगाल आहे बरं? आ.न., -गा.पै.

एर्डोगान पत्नीला भेटण्यात प्रॉब्लेम काय ? आमिरचे मुसलमान असणे ? का अजून काही ? १९९५ साली भारत तुर्की व्यापार $२४२ मिलियन होता २०२० साली तो $ ४ बिलियन वगैरे झाला आहे. ०५/०८/२०१९ नंतर कलम ३७० रद्द झाले, त्यानंतर टर्की कायम पाकिस्तान सोबत उभा आहे, काश्मीर विषयावरून पाकिस्तानची साथ देणे, पाकिस्तानला पडत्या लिरा मधूनच मदत देणे, त्यांना पार युद्धनौका विकणे वगैरे पण करतोय की टर्की, मिलजेम प्रोजेक्ट अंतर्गत लेटेस्ट warship हल्लीच कमिशन केली पाकिस्तान ने इतके असूनही जर टर्की सोबत व्यापार थांबत नाही,पर्यटन थांबत नाही, दळणवळण थांबत नाही, सरकारी पातळीवरील द्विपक्षीय संबंध वगैरे अबाधित आहेत पण आमिर खान टर्किश फर्स्ट लेडीला भेटला त्यावर गहजब मात्र उडलाच पाहिजे असा आग्रह दिसला की तो उडवणाऱ्यांच्या हेतूवर शंका येते.

In reply to by जेम्स वांड

अहो खुद्द शेठ लाहोरला गुपचुप विमान उतरवून गरीबनवाझांची भेट घेतात तेव्हा तो राजकीय मास्टरस्ट्रोक असतो आता बोला.