इंधन, खरे काय?

भंकस बाबा's picture
भंकस बाबा in काथ्याकूट
3 Sep 2019 - 8:58 pm
गाभा: 

1994 साल, वर्ल्ड धिस वीक म्हणून एक कार्यक्रम यायचा दूरदर्शनवर. जगातील घडामोडीवर एक चांगला माहितीपर कार्यक्रम होता हा .
तर या कार्यक्रमामध्ये तेव्हा जपानने केलेल्या एका संशोधनावर बातमी आली होती. जपानने पाण्यावर चालणारी कार बनवली आहे, यात ईंधन म्हणून पाणी वापरले जाईल व प्रदूषण कमी होईल असे. आजतायगत या कारची वाट पहात आहे.
सन 1986 मधे होंडा मोटरसाइकिलने 100 सीसीची एक मोटरसाइकिल भारतात दाखल केली. काही जनांस म्हणजे काही मोड़ेलनी 100 किमी प्रति लीटर माइलेज दिला होता , कंपनीचा दावा 80 किमीचा होता. होंडा कंपनीने या अशा माइलेज देण्यार्या गाड्या तपासणी करून परत घेतल्या होत्या , त्याबदल्यात त्या ग्राहकाना नवीन गाडी व भरलेले पैसे परत केले होते. त्यानंतर 100 किमीचा माइलेज देणारी गाडी मार्केटमधे बघितली नाही. 100 चा दावा बजाजची प्लाटिना करते , पण 70च्या आसपासच जाते.
गाडीचा शोध लागून आज सव्वाशे वर्षे झाली. गाड्या आलीशान झाल्या पण कमी ईंधन पिणाऱ्या गाड्या तितकयाशा बनल्या नाहीत. मला म्हणायचे आहे की इंजिनमधे पाहिजे तेवढे संशोधन झाले नाही, पण गेल्या एकदोन वर्षात अचानक संशोधनाने जोर पकडला आणि नवनवीन शोध पुढे येऊ लागले आहेत. नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही.
जाणकार , अभ्यासू मिपाकर अजुन प्रकाश टाकतील काय?

प्रतिक्रिया

तमराज किल्विष's picture

3 Sep 2019 - 9:08 pm | तमराज किल्विष

अॅव्हरेज चा दावा कंपन्या सांगताना आदर्श परिस्थिती मध्ये असा अर्थ असतो. गियर कमीत कमी बदलून, क्लच व ब्रेकचा अत्यंत कमी वापर करून दिडशे पर्यंत मायलेज मिळवणारे स्पर्धकांविषयी मागे वाचल्याचं आठवतं. ऐंशी रुपयांत साठ सत्तर किलोमीटर खूप परवडेबल आहे असे म्हणतो.

तमराज किल्विष's picture

3 Sep 2019 - 9:11 pm | तमराज किल्विष

दलिंदर लोकं अॅव्हरेजचा विचार करून अजून दलिंदर पणा करतात. बुलेट सारख्या गाड्यांचे मालक पेट्रोलच्या किंमती विषयी फालतू टेंशन घेत नाहीत. भारतीय मानसिकता म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणं.

भंकस बाबा's picture

3 Sep 2019 - 9:46 pm | भंकस बाबा

माझ्या प्रश्नाचा रोख हा ईंधन बचतीचा नसून संशोधन न होण्यावर आहे.
बुलेट घेणारा माइलेज बघत नसेल, पण एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी बुलेट हा पांढरा हत्ती असतो. वापरून बघा

तमराज किल्विष's picture

3 Sep 2019 - 10:32 pm | तमराज किल्विष

इथंच इंडिया मार खाते. आपल्याकडं स्थावर जंगम मालमत्ता किती आहे, किती पोरं होऊ दिली तर सर्व गरजा भागून टेचीत जगता येईल याचा कोणताही विचार करायचा नाही.‌ लग्नाच्या वयाचे झाले की द्यायचं गळ्यात घोंगडं अडकवून. मग महागाई च्या नावाने बोंबा मारायच्या.
अवांतराबद्दल क्षमस्व. मी बुलेट वापरली आहे. आता वयोमानामुळे स्कुटी चालवतो.

भंकस बाबा's picture

3 Sep 2019 - 11:30 pm | भंकस बाबा

विषय सोडून भलतिकडे भटकत आहात.
मला म्हणायचे आहे की आतापर्यंत जी काही संशोधन झाली ती व्यावसायिक तत्वाने वापरली गेली नाही.
मला आठवते तेव्हा बजाज चेतक फॉर्म मधे होती. त्यावेळी काही लोकल मैकेनिक त्या गाडीला होंडा 100 सीसीचा कार्बुरेटर बसवायचे व माइलेज वाढवायचे. असे संशोधन बजाजने केल्याचे आठवत नाही, उलटे काइनेटिकने जेव्हा बिना गियरची स्कूटर बाजारात आणली तेव्हा हे हमारा बजाजवर अटकुन चेतकमधे कोणतीही सुधारणा करत नव्हते. परिणाम चेतकच क़ाय तर सर्व गियरवाल्या स्कूटर कालबाह्य झाल्या.
नवीन संशोधन म्हणजे चेतकचा एवरेज पस्तीसचाळीसच्या पुढे कधी गेला नाही.

तमराज किल्विष's picture

4 Sep 2019 - 6:01 am | तमराज किल्विष

मला तरी वाटते की आय सी इंजिनाला मर्यादा आहेत. लोकांना जास्त बिएचपी असणाऱ्या, जोरात पळणाऱ्या गाड्यांचं आकर्षण जास्त आहे. गरीब लोक जे चैन करु शकत नाहीत ते प्लॅटिना सारख्या गाड्या घेतात. संशोधन नक्कीच झाले आहे. टू स्ट्रोक इंजिन जे खूप प्रदुषण करायचे ते आता बादच झाले आहेत.
बजाज चेतक ला दुसरा कार्बोरेटर बसवल्यानं लोड खेचण्याची ताकद कमी पडत होती आणि इंजिनवर ताण येऊन घसारा वाढत होता. हाच प्रकार बुलेट बरोबर पण काही लोकांनी केला होता. पुर्वी राजदूत गाड्या ग्रामीण भागात बहुतेक रॉकेल टाकून चालवायचे लोकं.

Rajesh188's picture

3 Sep 2019 - 11:13 pm | Rajesh188

1853 का 54 साली भारतात पहिली रेल्वे धावली त्या गाडी साठी वाफेच्या इंजिन चा वापर केला होता .
बोरीबंदर ते ठाणे हे अंतर तिने एक तास चोवीस मिनिटात पूर्ण केले .14 coach ची गाडी होती आणि तिला sion ला पाणी भरण्यासाठी थांबावे लागले होते आता तेच अंतर विद्युत इंजिन असलेल्या गाड्या 30 मिनिटात पूर्ण करत आहेत आणि इंजिन सुद्धा सुटसुटीत आहे म्हणजे खूप बदल तर झालाच आहे .
इंधन हे आता आर्थिक विषय झाला आहे खूप अर्थकारण त्या वर अवलंबून आहे .
त्या आसपास सहज मिळणाऱ्या घरगुती पदार्थ इंधन म्हणून वापरणे शक्य असले तरी आर्थिक स्वार्थ तसे होवून देणार नाही .
इंधन ची मालकी एकाच बलाढ्य उद्योगपती किंवा सरकार कडेच राहील ह्याची पूर्ण काळजी घेतली जाईल .
विजेवर चालणारी वाहन जरी आली तरी वीजनिर्मिती हे मोठे उद्योगच करतील .
घरात वीज निर्मिती करण्यापासून बरेच अडधाळे निर्माण केले जातील .
ह्याचे उदाहरण म्हणजे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मिती करणे नुकसानीचा व्यवहार ठरेल असेच प्रयत्न होत आहेत.
त्या मध्ये अधिक संशोधन होवून उत्पादन खर्च कमीतकमी करण्याचे प्रयत्न नगण्य आहेत

एक महत्त्वाच्या मुद्द्यावर लिहेल्याबद्दल धन्यवाद.. भारतात देखील सरकार आणि टाटा मोटर्स संयुक्तरीत्या 'हायड्रोजन' ला इंधन म्हणून वापरण्याच्या दिशेने संशोधन करत होते. मी २००७-०८च्या दरम्यान ह्याबद्दल वाचल्याचे आठवते. (त्यावर तेव्हा एका CSE Mains च्या पेपरमध्ये प्रश्न आल्याचेही धुसरपणे स्मरतंय.) त्यात एक मोठी समस्या हायड्रोजनची प्रचंड ज्वलन /विस्फोटक्षमता, व त्याचमुळे त्याच्या स्टोरेज/ वाहतूक इत्यादीमध्ये येणार्‍या अडचणी ही होती. हायड्रोजनचा वापर केल्यास धूर म्हणून केवळ वाफ/पाणी बाहेर पडेल.

ह्यावर गुगलले असता, आता टाटाने एक हायड्रोजन सेल फ्युलवर चालणारी एक स्टारबस आणली आहे, असे कळले. मात्र अजूनही त्याबाबतीत फार काही झाल्याचे दिसत नाही.

भंकस बाबा's picture

4 Sep 2019 - 5:08 pm | भंकस बाबा

धन्यवाद.
ब्राजील व अर्जेंटीनामधे पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत, असे वाचल्याचे स्मरते.
माझे मत असे आहे की सरकारच ह्या गोष्टीकडे लक्ष पुरवत नाही कारण खनिज तेलाच्या माध्यमातून सरकारला बराच वित्तीय पुरवठा होतो. शिवाय खनिज तेलावर प्रक्रिया करून त्याचे फिनिश प्रॉडक्ट सरकार निर्यातदेखील करते , या सर्वावर कोण सुखासुखी पाणी सोडेल?

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2019 - 8:05 am | अत्रुप्त आत्मा

@कारण खनिज तेलाच्या माध्यमातून सरकारला बराच वित्तीय पुरवठा होतो. - ब्राब्बार बोलला बगा . Cng मंजि उसाच चिपाड! पर त्ये बी 11:50 रूपे किलो नि सुरू करून आता 56 रुपयावर निउन ठिवलय! दुष्ट दुष्ट सरकार!

सुबोध खरे's picture

5 Sep 2019 - 12:05 pm | सुबोध खरे

परवा मोटारीत पेट्रोल भरले तेंव्हा पंपावर त्यात १० % पर्यंत इथेनॉल आहे अशी नोटीस वाचली

जालावर खोदून पहिले तर हि सुरुवात झालेली आहे असे समजते

https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/ethanol-ble...

https://www.mycarhelpline.com/index.php?option=com_easyblog&view=entry&i...

संशोधन होत आहे. काही वर्षांत वीजेवर चालणाऱ्या दुचाकी आणि कार्स मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होतील.

छोटेखानी सूर्य नावाचा मोठा प्रकल्प आज सुरू आहे. तोसुद्धा काही वर्षात पूर्ण होईल. श्री. गडकरी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर काही काळात छोट्या प्रमाणावर जागोजागी जैविक इंधन निर्मितीचे प्रयत्न सुरू होतील.

भला मोठा सूर्य आहे ना फुकटचा त्याचा पहिला पूर्ण शमतेने वापर करायचा सोडून छोट्या सूर्याचा विलासी हट्ट कशा साठी .
उसाची मळी आहे ना जैविक इंधन त्याचा वापर करा ना मोठ्या प्रमाणात

अमर विश्वास's picture

5 Sep 2019 - 12:22 pm | अमर विश्वास

ही बघा पाण्यावर (Hydrogen Cell) चालणारी बस

आपल्या टाटा मोटर्स बनवलेली

https://www.financialexpress.com/auto/car-news/tata-motors-indianoil-cor...

भंकस बाबा's picture

5 Sep 2019 - 6:54 pm | भंकस बाबा

मी लेखाच्या सुरूवातीलाच म्हटले आहे की 1994 मधे ही टेक्नोलॉजी जपानने वापरली होती, पण तिला प्रत्यक्षात यायला इतका वेळ? ती सुद्धा आली नाही अजुन!

चांगला धागा आहे .. सकारत्मक चर्चा झाली तर बरेच काळेबेरे बाहेर येऊ शकते .. मला वाटत , मिपासारख्या प्रगल्भ मंचावर मान्यवरांची आणि हुशार अभ्यासू लोकांची वानवा तर मुळीच नाही आहे .. माझे वैयक्तिक मत किंवा अनुभव म्हणा हवं तर मी इथे या धाग्यात नोंदवू इच्छितो ..

साधारण तीनेक वर्षांपूर्वी माझ्या मावशीच्या मिस्टरांनी मला भेटायला बोलावले होते .. बरेच मागे लागल्यावर मी वेळ काढून तिथे गेलो .. त्यांच्यासोबत एक महाशय तिथे आधीच स्थानापन्न होते . त्यांनी मला एका स्कीमबद्दल सांगण्यास सुरुवात केली .. मला या मल्टीलेव्हल मार्केटिंगचा आधीच कंटाळा आहे त्यामुळे मी थोडेफार दुर्लक्ष करूनच ऐकत होतो .. मग त्यांनी मला माझ्याकडे असलेल्या गाड्यांची माहिती विचारली .. माझ्याकडे एक जुनी होंडा सिटी ( टाईप २ मॉडेल ) आणि वॅगन आर होती असे मी त्यांना सांगितले .. ते म्हणाले तुम्ही मला जर कुठलीही एक गाडी माझ्याकडे असलेले इलेक्ट्रोड लावायला दिलीत आणि तर ती तुम्ही पंधरा दिवसांनी मला त्या गाडीच्या मायलेजमधला फरक सांगा .. तुम्ही स्वतःच हा सेट बोलाल त्या किमतीत विकत घ्याल .. मी कुतूहलापोटी मग सविस्तर वाचायला घेतले .. नीट वाचल्यावर कळले कि ती व्यक्ती जे काही बोलत आहे त्यात खोत तर बिलकुल नाही आहे .. साधं लॉजिक वापरलेले होते .. जे पण इंधन गाडीच्या इंजिनात उतरेल त्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देणे जेणेकरून त्याचे कमीतकमी १०० % वापर होईल .. फक्त एक गोष्ट होती ती म्हणजे तो इलेकट्रोडचा सेट लावायला जरा जागा लागणार होती आणि तीही बोनेटमध्येच कुठेतरी .. त्यामुळे ते माझ्या होंडामध्ये जास्त इंटरेस्टेड होते .. मी त्यांना मग त्यांनी कुठे हा सेट लावला आहे का त्याबद्दल विचारणा केली .. त्यांनी तात्काळ मला त्यांच्या स्वतःच्या टाटा सफारीमध्ये लावला आहे म्हणून सांगितले .. मग मी त्यांना पूर्वीचा आणि आताचा मायलेज विचारला , त्यांनी सांगितले पूर्वी ती ११ ते १२ द्यायची आता चक्क ४५ ते ५० देते .. मी चाट पडलो .. मी हिच्याशी सल्लामसलत केली पण हीच स्पष्ट नकार होता आणि तिला थोडी धास्तीही होती त्यामुळे ते प्रकरण बारगळले .. पण सांगायचं मुद्दा हा कि इंजिनातले इंधन जर जास्तीत जास्त वापरले गेले तेही कमी कार्बन उत्सर्जन करून तर मायलेज नक्कीच वाढू शकतो ..

भंकस बाबा's picture

5 Sep 2019 - 7:49 pm | भंकस बाबा

पुष्कळ धन्यवाद
अशाच प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित होता.
अजूनही सुहास म्हात्रे सर व खरे सराचे प्रतिसाद आले नाहीत,
ते जेव्हा येतील तेव्हा चर्चा खरी रंगेल.
टाटा मोटर्सने फक्त हवेवर चालणारी गाडीचा देखील शोध लावला होता. ही गाडी हवा ईंधन म्हणून नाही तर पिस्टनला धक्का मारून चालवण्यासाठी वापरली जाईल. हवा प्रेशरने पिस्टनवर जाईल व जे काम स्पार्कप्लगवर पेट्रोल जाऊन करते तीच सिस्टम वापरली जाईल, पण इथे हे प्रेशरने होईल ना कि इंधनाच्या ज्वलनाने!
नेमके कुठेतरी पाणी मुरत आहे, त्यामुळे ही संशोधने बाहेर येत नाहीत.

तमराज किल्विष's picture

5 Sep 2019 - 9:32 pm | तमराज किल्विष

मला तरी ही रमर पिल्ले टाइप गोष्ट वाटते. दोन पाच किलोमीटर जरी मायलेज वाढत असतं तर कंपन्यांनी पाहिजे तेवढे पैसे देऊन तंत्रज्ञान विकत घेतले असते. फेकाफेक वाटतं.
ऑक्सिजन जास्त मिळावा म्हणून टर्बो जोडतात आता.

भंकस बाबा's picture

5 Sep 2019 - 10:07 pm | भंकस बाबा

टर्बो हा प्रकार काय आहे ते आधी जाणून घ्या, जे ईंधन जळत नाही ते सायलेंसरमार्फत बाहेर टाकले जाते, तेच पुन्हा इंजिनकडे वळवून इंधनाची बचत करतात.
जट्रोफा, मोगली एरंड या झाडापासुन बायोडिझेल तयार करतात. त्यामुळे रामन पिल्ले तोतया संशोधक असेल पण त्याची थियरी खोटी असू शकत नाही

भंकस बाबा's picture

5 Sep 2019 - 10:18 pm | भंकस बाबा

टाटाच्या नावाने सर्च मारा गुगलवर, त्यांच्या हवेवर चालणाऱ्या गाडीविषयी माहिती मिळेल.
थोडा अभ्यास करून प्रतिसाद टाका, नाही टाकले प्रतिसाद तर कोणी काही बोलणार नाही तुम्हाला.

तमराज किल्विष's picture

5 Sep 2019 - 10:54 pm | तमराज किल्विष

माझा प्रतिसाद त्या इलेक्ट्रोड ला होता. त्या माणसांचा नाव पत्ता द्या म्हणावं.

बबन ताम्बे's picture

5 Sep 2019 - 11:30 pm | बबन ताम्बे

माझ्या माहितीप्रमाणे इंजिनच्या इनटेक पाईपमधील हवा atmospheric प्रेशरला आणण्यासाठी अधिकचा कॉम्प्रेसर वापरतात. हा पाईप इंजिन कम्पार्टमेंटमध्ये वाकडातीकडा बसवला असल्याने हवेचे प्रेशर कमी होते त्यामुळे सिलिंडर मध्ये इंधन पूर्ण एफीसीएनसिने जळत नाही. हा अधिकचा कॉम्प्रेसर बाहेर पडणाऱ्या एक्झॉस्ट ग्यासच्या प्रेशरने चालवतात.

तमराज किल्विष's picture

5 Sep 2019 - 11:53 pm | तमराज किल्विष

Barobar

तुम्हाला जो प्रकार दाखवला गेला त्याला एचएचओ किट असे म्हणतात. त्यात पाण्याचे इलेक्ट्रोलायसिस करुन हायड्रोजन आणी ऑक्सिजन वेगळे केले जाते. ते इंजिनात वापरून इंजिनचे मायलेज वाढते असा या लोकांचा दावा असतो.

३०० रुपड्याच्या स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या एका प्लास्टिक बॉक्समध्ये पॅक करुन १२००० हजारला हे मलम वाले विकतात. तेव्हा सावधान.

एचएचओ किट स्वतः वापरले नसल्याने त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती देणे मला शक्य नाही.

अर्धवटराव's picture

12 Sep 2019 - 9:38 am | अर्धवटराव

जे पण इंधन गाडीच्या इंजिनात उतरेल त्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देणे जेणेकरून त्याचे कमीतकमी १०० % वापर होईल

एरवीही सगळंच इंधन जळतं ना? अगदी १०० % ? कि काहि इंधन धुरांड्यातुन बाहेर पडतं ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2019 - 9:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

इंटर्नल कंबश्शन इंजिनाची इंधन वापराची कार्यक्षमता (thermal efficiency):

पेट्रोल इंजिन : सर्वसाधारणपणे २० ते जास्तीत जास्त ३८%

डिझेल इंजिन : जवळ जवळ ४०%

इंधनाची बाकीची टक्केवारी मुख्यतः, न जळलेले इंधन व उष्णतेत फुकट गेलेली उर्जा, यांच्या स्वरूपात वाया जाते.

https://www.greencarreports.com/news/1091436_toyota-gasoline-engine-achi...

इंटर्नल कंबश्शन इंजिन, हे मानवाने शोधलेल्या अतीव अकार्यक्षम प्रणाल्यांपैकी एक आहे.

खनिज तेल अत्यंत स्वस्त असण्याच्या काळात त्याचा विकास झाला व मानवी/पशूशक्तीपेक्षा खूप जास्त कार्यक्षम असल्याने त्याचा इतका जम बसला की नंतर त्याला पर्याय शोधणे व त्या पर्यायाला व्यावहारीकरित्या यशस्वी (मेनस्ट्रिम) करणे अशक्य झाले. जे काही पर्याय होऊ शकले असते त्यांना तेलाशी हितसंबंध असलेल्या कंपन्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरून 'अयशस्वी' केले/ठरवले गेले.

सद्या, (अ) तेलाच्या सतत वर असलेली किंमती आणि (आ) जागतिक स्तरावर पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वाढलेला दबाव, या दोन गोष्टींमुळे खनिज तेलाचा उपयोग करणार्‍या इंटर्नल कंबशन इंजिनाला पर्याय शोधण्याचे प्रयत्न जोमाने चालू झाले आहेत.

हे प्रयत्न यशस्वी झाले तरी ते व्यवहारात आणून, अनेक दशके खोलवर पाय रोवून बसलेली व अनेक ट्रिलियन डॉलर्सचे असेट्स असलेली, तेलावर आधारलेल्या वाहन व अर्थव्यवस्थेला टक्कर देण्यासाठी सबळ, स्वस्त, सहज उपलब्ध असलेला पर्याय होण्यासाठी, नवीन पर्यायांना एक-दोन दशके तरी जातील.

भंकस बाबा's picture

23 Sep 2019 - 9:56 pm | भंकस बाबा

तुमच्याकडूंन अजुन थोडे खोदकाम झाले तर हा धागा काढण्याचा उद्देश्य सफल होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2019 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

या विषयाला जागतिक अर्थकारण, राजकारण व इतिहासाचे इतके पदर आहेत की त्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांचा गोषवारा सांगायचा तरी लेखमाला होईल. सद्या व्यस्त असल्याने इतका वेळ व श्रम शक्य नाहीत, त्यामुळे क्षमस्व.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2019 - 10:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

वीजेवर चालणार्‍या गाड्यांचा आणि प्रदुषण यांचा विचार करताना एक गोष्ट नेहमी विसरली जाते... ती म्हणजे गाडी चालवण्यासाठी वापरण्याची वीज तयार करताना निर्माण होणारे प्रदुषण.

कारण, सद्या उपलब्ध असलेले अपारंपारिक उर्जास्त्रोत (तेलावर किवा कोळशावर अवलंबून नसलेले वीजनिर्मिती प्रकल्प) एकतर महागडे आहेत आणि/किंवा (तेलाला पर्यायी होतील इतक्या) पुरेशा प्रमाणात वीजनिर्मिती करत नाहीत. हे महत्वाचे मुद्दे विसरून व्यावहारिक पर्याय निर्माण करता येणार नाही.

अर्धवटराव's picture

2 Oct 2019 - 8:33 am | अर्धवटराव

दिव्याखाली इतका अंधार आहे होय :(

भंकस बाबा's picture

5 Sep 2019 - 7:51 pm | भंकस बाबा

त्या इलेक्ट्रोड्सची किंमत काय सांगितली होती?

खिलजि's picture

5 Sep 2019 - 8:08 pm | खिलजि

१२००० फक्त

आर ओ आय म्हणण्यापेक्षा आपण याला मल्टीलेव्हल मार्केटिंग म्हणू .. मी स्वतः ते उत्पादन विकत घ्यायचं आणि दुसरं गिर्हाईक आणलं कि त्या गिर्हाईकाच्या पैश्यातले २००० रुपये मला मिळणार .. जेव्हढी गिर्हाईक आणाल तेव्हढा नफा मिळत जाईल ..

तमराज किल्विष's picture

5 Sep 2019 - 10:48 pm | तमराज किल्विष

आपण फक्त तर्क मांडू शकतो तांत्रिक बाजू मला तरी माहीत नाहीत.
इंजिन साठी इंधन आणि हवा ह्यांचे ठराविक प्रमाणात मिश्रण आवशक्य असते त्याचा बंदिस्त जागेत नियंत्रित स्फोट केला जातो आणि इंजिन चालू होते .
ह्या मध्ये हवेचा रोल हा ऑक्सीजन पुरवणे हाच असावा कारण ज्वलन ला ऑक्सीजण
ची गरज असतेच.होणारा स्फोट हा इंधनाचाच होतो ..स्फोट ची तीव्रता जेवढी जास्त तेवढी इंजिन ची ताकत जास्त .
म्हणजे जिथे चढ आहे किंवा गाडीला वेग द्यायचा आहे हवेचा विरोध झुगारून तिथे इंधन जास्त लागणार .
ते वाचवण्यासाठी त्याची मात्रा कमी केली तर इंजिन ची ताकत सुधा कमी होणार ..
एकतर इंधन वाचू शकत किंवा इंजिनची ताकत कमी करू शकतो आपण दोन्ही एकावेळेस साध्य होणार नाही .

तमराज किल्विष's picture

6 Sep 2019 - 2:36 pm | तमराज किल्विष

स्विफ्ट या गाडीचं डिझेल इंजिन फारच उत्कृष्ट आहे. आवाज,कंपन एकदम स्मूथ पेट्रोल इंजिन प्रमाणे आहे. आता या इंजिनाची सर्व बाबतीत सारखी पण अर्ध्या आकाराची इंजिनं बनवली तर नॅनो, अल्टो, रिक्षा सारखी वाहनं आरामात चालतील व इंधन बचत होऊन प्रदुषण देखील कमी होईल.

अमर विश्वास's picture

6 Sep 2019 - 3:19 pm | अमर विश्वास

प्रतिसाद इंग्रजीतून देत आहे कारण अनेक शास्त्रीय व्याख्या मराठीतून लिहिणे अवघड आहे

there are many Pneumatic tools running on Compressed air. But this compressed air is not prime mover.
It is used as means of energy transmission.
In other words, compressed air needs to be generated first using some prime mover (again a IC engine)

also to travel say 100 KM, how much compressed air will be needed? where to store that? . So this is commercially nonviable

Please read the article on following link which will tell more about compressed air vehicles.

https://www.livemint.com/Industry/DqLFO06I5l39RDqhiWBzSN/Tata-Motors-wor...

भंकस बाबा's picture

6 Sep 2019 - 4:53 pm | भंकस बाबा

तुमचे मत वाचले.
ज्या गाड्या कॉम्प्रेस एयरवर चालणार त्यांना नक्कीच हवा स्टोर करावी लागणार, पण ही हवा त्यांना अतिशय स्वस्तात कुठेही म्हणजे, पंक्चर काढण्यार्याकडे उपलब्ध होईल. किंवा आजकाल हवा भरण्यासाठी छोटे इलेक्ट्रिक पंप मिळतात ते पण उपयोगात येऊ शकतात.
इथे गोम अशी आहे की अशा गाड्या याव्यात अशी इच्छाच कोणी व्यक्त करीत नाही आहे. नितिन गडकरी इलेक्ट्रिक गाड्याची वार्ता करतात. पूर्ति नावाची त्यांची एक कंपनी अशा रिक्शा बनवते.

अमर विश्वास's picture

6 Sep 2019 - 7:25 pm | अमर विश्वास

पूर्ती इलेक्ट्रिक रिक्षा बनवते असे मला तरी माहित नाही .. कृपया लिंक द्यावी ..

बाकी इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल बोलायाचे तर तेच भविष्य आहे. शासनाची इलेक्ट्रिक वेहिकल पॉलिसी खरंच उत्तम आहे.
मागील वर्षी भारतात फक्त ८००० इलेक्टिक कार्स विकल्या गेल्या आणि त्या सर्व महिंद्रा ने बनवल्या होत्या

बाकी युरोप मध्ये इलेक्टिक गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम धोरण आहे जसे : टॅक्सेस कमी आहेत , वेगळे पार्किंग स्लॉट्स चार्जेर सह , बस च्या लेन मधून जाण्याची परवानगी वगैरे

तेंव्हा इलेक्टिक वेहिकल आणि पूर्ती चा संबंध जोडू नका ही विनंती

भंकस बाबा's picture

6 Sep 2019 - 7:47 pm | भंकस बाबा

पूर्तिच्या नावाने चांगभल!
गुगलवर सर्च मारले तर ही कंपनी बायोफ्यूएलच्या धन्द्यात आहे. कोलपासून ईंधन बनवण्यावर संशोधन चालू आहे. बघा लिंक लागते आहे का? गड़करिनि काही महिन्यापूर्वी केलेली भाषणे आठवा. त्यांनी असे म्हटले होते की देशभरात मिथेनॉलला पाठिंबा देऊन त्यावर आधारित गाड्या आल्या पाहिजेत. मिथेनॉल हे कोळशापासून तयार होणारे ईंधन आहे, व ते पेट्रोलमध्ये 15 टक्के टाकायचे घाटत आहे.
पूर्ति या कंपनीचा पहिला उल्लेख मी जेव्हा दिल्लीमधे एका ईरिक्शावाल्याने एका अपघातात एका लहान मुलाला तेलाच्या कढ़ईत उडवले होते तेव्हा वाचला होता, तेव्हा या कंपनीचे नाव घेतले गेले होते, पण क्षमस्व मला आता तरी आन्तरजालावर काही माहिती मिळत नाही आहे. यापुढे नक्की माहिती उपलब्ध असली तरच पोस्ट टाकीन

अमर विश्वास's picture

6 Sep 2019 - 7:53 pm | अमर विश्वास

एकदा नक्की ठरवा ... इलेक्ट्रिक वेहिकल का बायो फ्युएल ....

बाकी माझी कमेंट इलेक्ट्रिक कार्स बद्दल होती ... बायो फ्युएल बद्दल सविस्तर लिहितो वेळ मिळाला कि

भंकस बाबा's picture

6 Sep 2019 - 8:15 pm | भंकस बाबा

ज्या अनुषंगाने धागा काढला आहे त्यात हि सर्व संशोधन कोणाला तरी नुकसान होते वा फायदा होतो हे उलगडून काढण्यासाठी आहे. इलेक्ट्रिक वेहिकल हा विषय नाही तर ईंधन हा आहे. संशोधन का पुढे येत नाही हा मूळ विषय आहे.
कृपया अजुन काही माहिती जी तुम्हाला माहित आहे अशी येउद्या.
जसे काही वर्षापूर्वी एक रसायन बाजारात आले होते. ते पेट्रोलमध्ये टाकल्यावर एवरेज वाढतो अशी अफवा होती. मी पण वापरून बघितले, काहीही फरक पडला नाही. पण भारतीयाची मानसिकता एवरेज कितना देती है ही असते. असो.
त्या रसायनाऐवजी तितक्या किमतीचे पेट्रोल टाकले असते तर जास्त फायदा झाला असता.

आसाम मध्ये एकाने कॉम्प्रेस्ड एयरवर चालणारी जीप बनवली होती. पण त्याची लिंक सापडत नाहीये.

आज मी जाट्रोपाबद्दलच लिहिणार होतो पण तुमचा प्रतिसाद वाचला आणि हायसे वाटले .. मला वाटत आता कुठे या महत्वपूर्ण धाग्याला धार चढायला लागलीय .. हा विषय इथेच सोडू नये .. कारण ह्या पेट्रोल कंपन्या आपला स्वार्थ शेवटपर्यंत सोडणार नाहीत .. सर्वप्रथम रामा पिल्ले बद्दल बोलूया .. तो माणूस नक्कीच वेडा नव्हता .. पण दुर्दैवाने आज त्याला खरोखरच वेडा करून टाकलं आहे .. माझा दुसरा अनुभव मी इथे पुन्हा टंकत आहे ..
मागे जवळजवळ दहाएक वर्षांपूर्वी एम एस सी आणि पी एच डी साठी रुईया महाविद्यालयात प्रवेश केला .. तेथे बरेच प्रकल्प राबवले जायचे .. नाविन्यपूर्ण आणि आव्हानात्मक .. आजही राबवले जातात .. मी नोकरी सोडून तिथे प्रवेश घेतलेला त्यामुळे सर्वजण माझ्यापासून चार हात लांबच राहायचे .. कोण कुणास ठाऊक सर्वजण मला जणू वाळीत टाकल्याप्रमाणे ठेवलं होते .. त्यामुळे माझ्याकडे फारसं काही काम नसायचं . अश्यातच एक संधी चालून आली आणि ती आयतीच मला मिळाली .. सौराष्ट्र विद्यापीठातून कुणीतरी बडी हस्ती आपल्या रुईयात येणार आहे असे मला सरानी सांगितले .. ती हस्ती म्हणजे दुसरी कुणी नसून डॉक्टर नागर होते . त्यांनी सौराष्ठ्र विद्यापीठात जेट्रोपा या वनस्पतीवर काम केलेलं होत .. रुईया महाविद्यालयाने या प्रकल्पासाठी त्यावेळेस परशुराम घाटात डोंगराळ जागा घेतली होती .. फक्त या वनस्पतीच्या लागवडीसाठी .. मला नागर यांच्यासोबत बर्याच विषयांवर चर्चा करायला मिळाल्या .. मी , माझा मित्र अभिजित आणि नागर आम्ही सर्व जण त्या घाटात गेलो .. साधारण सकाळी १०.३० च्या सुमारास पोहोचलो .. डॉ नागर एकदम बिनधास्त माणूस .. आम्हाला जमिनीचा सामू घेण्यासाठी पंधरा फूट अंतर सोडून चारी दिशेला कमीत कमी ८ असे खड्डे मारायला सांगितले आणि माती गोळा करायला सांगितली .. हे साहेब ११ च्या सुमारास जे त्या निर्बीड जंगलात गायब झाले ते थेट संध्याकाळी मावळायच्या आधी उगवले .. आम्हाला वाटलं कि त्यांना कुणी खाल्लं कि काय .. असो .. तर त्या माणसाने जेट्रोपाबद्दल बरीच माहिती दिली .. स्वतः सरकार जेट्रोपा बिया खरेदी करते . जेट्रोपा वनस्पतीची लागवड कुठेही करता येते .. तिच्या बिया येण्यास साधारण दीडेक वर्ष लागते पण एकदा का बिया धरायला सुरुवात झाली कि मग उत्पन्न सुरु होते .. पूर्वी मशाली पेटवायला जास्त करून याच बियांचा वापर व्हायचा .. तर एकूण असे प्रकरण आहे सर्व .. हे सर्व मोठे गौडबंगाल आहे , असे वाटतंय .. मला वाटत सकस चर्चा झाली आणि तीही अनुभवांची जोड देऊन तर एक साचेबध्ध अनुभवसंपन्न मत तयार होऊ शकते ..

तमराज किल्विष's picture

6 Sep 2019 - 4:04 pm | तमराज किल्विष

रमर पिल्लेने थियरी पण चोरलेली असेल. बेमालूम पणे तो लोकांना उल्लू बनवत होता.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घरगुती प्रमाणात जैविक डिझेल बनवण्याचे यंत्र बनवलं आहे.

भंकस बाबा's picture

6 Sep 2019 - 5:06 pm | भंकस बाबा

होय , अशाच चर्चेने काही माहिती मिळाली तर उत्तमच आहे.
जट्रोफा लागवडीसाठी सरकार काही अनुदान पण देते. पण हे पिक कमी पावसाच्या प्रदेशातील आहे. मला स्मरते की राजस्थानमध्ये याची व्यावसायिक लागवड झाली आहे. मधे एकदा या जट्रोफापासुन तयार झालेले डीझेल वापरुन रेल्वेचे इंजिन चालवले होते हे वाचल्याचे आठवते. दिल्लीच्या आसपास इंडियन ऑयल कंपनीने हे केले होते.
मध्यंतरी स्पाइसजेट या विमान कंपनीने बायोफ्यूलवर विमान उडवल्याचे वाचले होते, पण या गोष्टीला म्हणावी तशी प्रसिद्धि मिळाली नव्हती. फक्त बायोफ्यूएल असे मोघम उल्लेख होता पण ते कशापासुन बनले आहे वा त्याचे प्रमाण काय याचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही.

तेलावर जागतिक राजकारण आणि युद्धे चालतात... तेल कंपन्यांचा बाजार उठेल असे संशोधन इतक्या वर्षात पुढे येउ न देण्यास तेल कंपन्यांनीच हातभार लावला असावा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माझा बाप्पा नाचु लागला... :- (Sanket wadekar)

हेच खरे आहे. जर का गाड्या पेट्रोल डिझेलएवजी शाश्वत इंधनावर धावू लागल्या तर यांचे दिवाळेच निघतील.

कंजूस's picture

6 Sep 2019 - 9:03 pm | कंजूस

काही संशोधन होत नाही हे अनुमान का काढले? तर प्रोटोटाईप मॉडेल दाखवले जाते पण ते व्यापारी उत्पादनात दोन पाच वर्षांत येत नाही म्हणून.
१) हिस्ट्री चानेलवरच्या शिपमेंट वॉरमध्ये ट्रकवाले स्पेंट ओईल वापरताना दाखवतात.
२) लिपु अँड पिटबुलमध्ये कारची एचपी वाढवण्यासाठी टर्बो लावताना दाखवतात. मग हखच टर्बो कार बनवणारे कगोदरच का लखवत नाहीत?
आता यामध्ये काही तांत्रिक/आर्थिक अडचणी असणार. त्या ओळखून कार बनवणारा वापरत नसणार.

*कारची एचपी वाढवण्यासाठी टर्बो लावताना दाखवतात. मग हाच टर्बो कार बनवणारे अगोदरच का लावत नाहीत?*

भंकस बाबा's picture

6 Sep 2019 - 9:20 pm | भंकस बाबा

लिपू आणि पिटबुलमधे मॉडिफाई करण्यात येणाऱ्या गाड्या जुन्या असतात. टर्बो इंजिन ही संकल्पना तशी नवीन आहे. या शोमधे गाड्या लुक व पॉवर ह्या संकल्पनेवर मॉडिफाई केल्या जातात. मी काही भाग बघितले आहेत या शोचे. कुठेही एनर्जी एफिशियन्ट गाडी बनवताना पाहिले नाही

तमराज किल्विष's picture

7 Sep 2019 - 5:34 am | तमराज किल्विष

लिपु आणि पिटबूल न गाडी बनवल्यानंतर ती कितीही डबडा दिसत असली तरी गाडी मालक भारावून म्हणतात " व्वा, मला जशी हवी होती त्याहून भारी बनवली आहे."

मला हेच सांगायचं आहे. फक्त वरून रुपडं बदलत नाहीत तर प्रत्येक जचन्या गाडीत नवीन एंजिन किंवा टर्बो एडिशन करताना दाखवतात. खर्च बारा हजार डॉलर्सपर्यंत खरणारे गिऱ्हाईक. त्यांची कुवत इंधन खाणारी गाडी संभाळणारी आहे. इफिशंट एंजिनवाली गाडी हे त्यांचे ध्येय नाही.

१) गाडीचं एंजिन कार्यक्षम करणे/
२) अधिक माइलेज देणे/
३)वेगाने पळणारी गाडी
हे सर्व एकाच गाडीत कसं शक्य आहे?

मला वाटत , शंभर टक्के इंधन जळतच नाही कुठल्याही गाडीत .. चला आपण असे मानूया कि १० मिली मागे फक्त ६ मिलीच वापरले जातेय . हाच विनियोग वाढवून कदाचित ९ मिली पर्यंत आला तर मायलेज नक्कीच चांगले असेल आणि प्रदूषणही कमी होईल .. सर्व माहित असते , चर्चाही घडतात पण जेव्हा कुणी संशोधन करत असेल तर त्याला वेडे ठरवले जाते .. रमण पिल्लईने थियरी चोरली असेल तरी ती थियरी खोटी नक्कीच नव्हती ..

स्वलिखित's picture

7 Sep 2019 - 6:11 pm | स्वलिखित

ये सूट तुम्हे मुझसे हि खरीदाना पडेगा और इस सूट को चालना है तो युनिक पार्टीकल मुझसे हि खरीदने पडेंगे।

खिलजि's picture

7 Sep 2019 - 6:15 pm | खिलजि

माफ करा, असेच्या असे इंग्लिशमधून पेस्टवतोय .. गरज आहे म्हणून अनुवाद करायला येळ लागला असता ..

What happened to Ramar Pillai, the Tamil Nadu boy who in 1996 claimed to have discovered Herbal fuel?

IIT and LMES(so called teaching real engineering) claimed that Ramar has used wax in that water to create this fuel…I was first angry about Ramar but after some analysis, i had a question, how come wax dissolve in water and create a fuel..wax is non-polar and water is polar..if Ramar was able to dissolve wax in water it is a great invention.which needs to be appreciated….

I have a small doubt, a person from 1996 is trying to bring the fuel to the people, I am not a scientist to check Ramar’s claim but i feel some truth is there behind him….if a person is making mistake, why will he do the same mistake again and again…..I remember Stanley Meyer, who claimed that he can use water to run vehicle’s, he introduced the term “fuel cells”, The people who supported him after some misunderstandings called him fraud, he was said to be killed after that, Now we hear the news that water powered cars are going to be released..same things must not happen again to Ramar..people don’t believe blindly at the same time don’t underestimate….centuries back Galileo… years back Stanley..In Future no Idea who is going to be ignored and made false for there efforts

इंधनाच्या पूर्ण क्षमतेने वापर न करण्या मागे गाड्या उत्पादित करणाऱ्या कंपन्या नक्की नसणार ते कशाला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतील .
मग दुसरा अर्थ तेल कंपन्या ह्यांचे टक्के वारीवर संगनमत किंवा दुसरे कारण सरकारी दबाव .
सरकारी दबाव ह्या साठी की तेलाचे खूप मोठे अर्थकारण आहे गाड्या निर्मिती chya उत्पादन
पेक्षा खूप मोठे .
100%, इंधन क्षमता वापरणे शक्य नाही अशक्य आहे ती गोष्ट

अहो त्या रामन पिल्लेचा डेमो टिवीवर पाहिला आहे. लोक फक्त हसले आणि चालू पडले.
---
आपल्या विषयाकडे वळुया. दहा एमेल पैकी सहा किंवा नऊ एमेल इंधन यांत्रिक शक्तीमध्ये बदलतं हे कुठं वाचलत?

पण हे सर्व त्याला दुनियेसमोर करून काय फायदा मिळणार होता ? मुळात कुणी असे करेलच का ? जर समजा मला काही गोष्ट सिद्ध करायची असेल तर मी ती स्वतः आधी नीट पुन्हा पुन्हा तपासून घेईन , तिथले जे वरिष्ठ आहेत त्यांची परवानगी घेईन आणि मगच सामोरे जाईन .. मला आठवतंय त्याच्या सिनियर्सनी हा सर्व मोठा डाव असल्याचं त्याकाळी सांगितलं होतं पण त्या गोष्टी आत सध्या मला कुठे मिळत नाही आहेत .. माझी स्मरणशक्ती अजून तरी शाबूत आहे आणि मी ते सर्व त्याकाळी पेपरमध्ये सतत वाचत होतो .. अर्थात त्याच्या विरुद्धच बातम्या जास्त येत होत्या पण काही जण जे त्याला नीट ओळखत होते ते मात्र त्याच्या वर विश्वास ठेवून होते .. असो .. मूळ विषय भलतीकडेच चालला आहे म्हणून मी या रामर पिल्लईच्या चर्चेला इथेच पूर्णविराम देतो आहे .. मूळ धागा , इंधन म्हणजे काय आहे ? हा आहे आणि त्यावरच चर्चा झडावी असे मला वाटते.. मी अजूनही या मतावर ठाम आहे कि पेट्रोल कंपन्या आणि गाडी उत्पादक कंपन्या या सर्वांची मिलीभगत आहे .. तसे नाही तर मग का अजून आपल्या देशात , विजेवर चालणार्या गाड्या सर्रास दिसत नाहीत .. खरंच जर हे सर्व थांबावं असं वाटत असेल तर त्यादृष्टीकोनातून प्रयत्न होताना दिसले पाहिजेत .. दुर्दैवाने तेच तर होत नाही आहेत ..

तमराज किल्विष's picture

9 Sep 2019 - 8:10 pm | तमराज किल्विष

भाषाच समजली नाही ,,डोक्यावरून गेलं .. माझ्यामते तो वॅक्स वापरतोय असं दाखवलं गेलंय .. बरोबर ना ..

तमराज किल्विष's picture

9 Sep 2019 - 10:34 pm | तमराज किल्विष

तूम पिल्ले के अंधे भगत क्यू बने हो?

मी आधी वर प्रतिसाद दिला आहे .. एका व्यक्तीने एक मशीन आणलं होत विकायला , तो वाचा हि नम्र विनंती ..

तो डेमो कश्यावरुन खरा होता .. रामर पिल्लेने जे धाडस दाखवलं त्याला सलाम .. संपूर्ण देशासमोर किंबहुना जगासमोर तो असा वेडेपणा कश्याला करून घेईल .. बरं ते जाऊ देत , त्याला वेडे का ठरवलं गेलं ? तो तसाही हुशार होता .. त्याला मोकळं ठेवायचं होतं ना ? इस्पितळात भरती करण्याचं काय प्रयोजन ? तिथे नक्की काय झालं असेल ते देव जाणे .. अहो देशाच्या राष्ट्रपतींवर जर प्राणघातक हल्ला होऊ शकतो तर रामर पिल्ले हा अंतर सामान्य माणूस .. त्याला प्रयोग करण्याआधीच काहीतरी काळेबेरे झाले असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही ..

तमराज किल्विष's picture

7 Sep 2019 - 7:21 pm | तमराज किल्विष

रमर पिल्लेला प्रयोग करताना प्रत्येक वस्तूचे वजन करून दिले होते. तयार प्रॉडक्ट चे वजन जास्त भरत होतं म्हणून त्याच्या प्रत्येक वस्तूचे बारिक निरिक्षण केल्यावर जी रवी होती ती पोकळ असून त्यात त्यानं ज्वलनशील पदार्थ भरून आणलेला होता. त्याचं छिद्र गरम पाण्यात उघडलं आणि तो पदार्थ पाण्यात मिसळला. चोरी पकडली व नाचक्की झाली असेल तेव्हा तो अज्ञातवासात गेला असेल.

भंकस बाबा's picture

7 Sep 2019 - 7:52 pm | भंकस बाबा

परत एकदा सांगतो, रामन पिल्लई जी थियरी वापरत होता म्हणजे वनस्पतिजन्य पदार्थापासुन ज्वलनशील रसायन मिळवणे, ती सत्य होती. प्रयोगामधे त्याने चालबाजी केली असेल. जैट्रोफापासून ईंधन ही त्याच्या थियरिची पुढची पायरी आहे.
उसाच्या चिपाडापासून वा त्याच्या पातेर्यापासून कोळसा बनवण्याची विधी तुनळीवर उपलब्ध आहे, पण जो प्रकार मी बघितला तो अगदीच मागास आहे. जऱ हेच व्यवस्थित शास्रीयरित्या केले तर प्रचंड ईंधन बचत होईल

परत एकदा सांगतो, रामन पिल्लई जी थियरी वापरत होता म्हणजे वनस्पतिजन्य पदार्थापासुन ज्वलनशील रसायन मिळवणे,

हो बाबा हो. पटलय. यात पिल्लेने कोणता शोध लावला? किती आणि कोणत्या वनस्पतीजन्य भागातून किती आणि कोणत्या दर्जाचे इंधन मिळू शकते यात काही गोपनीय नाही. फक्त आर्थिक गणित जमवायचे आहे.
प्रत्येक प्रकारच्या इंधनात खोट आहेच. कालानुरुप ती खोट क्षम्य किंवा कमी त्रासदायक/नुकसाकारक ठरते.

नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही.
जाणकार ,

यामध्ये अभ्यास वगैरे काही नाही, अमेरिकेकडे खनिज तेल आहे पण तेल उत्पादक सर्व देश चाल खेळतात. आपल्या देशातले भूमीतले तेल कधी व किती काढून बाजारात आणायचे याबद्दल.

गाडी 1 ltr इंधना मध्ये किती किलो मीटर जाईल हे अनेक घटकांवर अवलंबून असते ..
पाहिले ते इंधन शुद्ध असायला हवे पेट्रोल आणि डिझेल चे जे रासायनिक सूत्र आहे त्याच प्रमाणात सर्व घटक त्या मध्ये असतात का ?
तर ह्या प्रश्नच उत्तर निगेटिव्ह आहे त्या मध्ये भेसळ असते .
पाणी हायड्रोजन चे २, अनु आणि ऑक्सिजन चा एक आणि हे पाण्याचे सूत्र आहे पण असे पण असे पाणी पृथ्वी तलावावर अस्तित्वात आहे का ?
पेट्रोल आणि डिझेल हे जीवाश्म इंधन आहे दबावाखाली ह्यांचा स्फोट होतो आणि हेच सूत्र वापरून इंजिन तयार केलेलं असते .
पाहिले तर ते शुद्ध नाही .

इंजिन नी निर्माण केलेली ऊर्जा आणि प्रतक्षात चाकाला मिळालेली ऊर्जा ह्या मध्ये फरक असतो .
फरक हवेचा विरोध ,गाडीचा आकार,रस्त्याचा प्रकार ,गाडीवर असलेलं वजन किती तरी प्रकार गाडी १ ltr इंधनावर किती अंतर कापेल हे अवलंबून असते .
ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होताना ऊर्जेचा रहास होतो हे सर्वसामान्य नियम आहे .
मग इंधनाचा पूर्ण वापर होत नाही त्याचा पूर्ण वापर झाला तर गाडी जास्त average देईल ह्या मताचा पाया काय आहे हे समजलं नाही .
दुसरे स्वस्त इंधन शोधणे हा पर्याय योग्य आहे पण इंधनाचा पूर्ण वापर इंजिन मध्ये केला जात नाही ह्याला कोणता आधार आहेत

भंकस बाबा's picture

7 Sep 2019 - 10:07 pm | भंकस बाबा

सायलेंसर मधून बाहेर पडणारा धुर म्हणजेच ईंधन पूर्ण जळत नाही आहे याच दयौतक आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Sep 2019 - 10:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

ईंधन दरवेळी नवीन आणुन खर्च खरेच कमी होतो का?

म्हणजे पेट्रोल पेक्षा डिझेल स्वस्त पण गाडी एक दोन लाखाने महाग. सी.एन.जी त्याहुन स्वस्त पण ईन्शुरन्स आणि ईंजिन महाग. आता ईलेक्ट्रिक गाड्या येणार पण त्यांच्या बॅटरी एफिशियन्सी, बॅटरी गेल्यानंतरचा कचरा (जशी ई-वेस्ट) या सगळ्याचे काय? दुरच्या प्रवासात सर्वत्र चार्जिंग मिळणार का?

ईथेनॉलवरच्या गाड्या कधी येणार? ईथेनॉल पुरेसे तयार होणार का आणि कोण तयार करणार? वितरणाची व्यवस्था काय?

त्याऐवजी ईंधन कोणतेही असो , शक्य असेल तेव्हा कार पुलिंग करणे, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरणे, जवळच्या कामासाठी पायी चालत जाणे हे सोपे उपाय वाटत नाहित का?

इंधन दरवेळी नविन आणल्याने खर्चात कुठेही बचत होत नाही.

इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बॅटरीचा कचरा रिसायकल करण्याची योग्य सोय असेल अशी अपेक्षा करता येईल. पण त्याची शाश्वती नाही.

इथेनॉलवर चालणार्‍या नविन गाड्या आणण्यापेक्षा आहेत त्या गाड्यांमध्ये काही बदल करुन इथेनॉल / बायोफ्युएल वापरता येईल का याची चाचपणी करता येऊ शकेल.

चांगली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था फक्त शहरांपुरतीच मर्यादित आहे.

भंकस बाबा's picture

11 Sep 2019 - 11:09 pm | भंकस बाबा

हल्लीच एक बातमी वाचली होती कि टीवीएस मोटर्सने फक्त इथेनॉलवर चालणारी दुचाकी बाजारात उतरवली आहे. आता इथे गरज क़ाय आहे? तर इथेनॉलवर चालणारी रिक्शा जऱ या कंपन्यानी उतरवली तर पेट्रोल , डिझेलपेक्षा भरपूर स्वस्त असलेले इथेनॉल रिक्शाचालकाची नफ्याची पातळी उंचावेल. तुलनेने कमी प्रदूषण होत असल्यामुळे पर्यावरण पूरक असेल.
पण असा प्रयत्न होताना दिसत नाही. या रिक्शा जर इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कारखान्याना सब्सिडी बेसिसवर पुरवल्यास यांच्या वापराला चालना मिळेल. ज्या स्क्रैप पॉलिसिचा बोलबाला सरकार करत आहे ती जुन्या रिक्शाच्या बदल्यात नवीन इथेनॉलवर चालणारी रिक्शा असे समीकरण आणल्यास पुढे भविष्यात खनिज तेलावरिल अवलंबित्व कमी होईल

खूप मोठी भांडवली गुंतवणूक पेट्रोल आणि cng मध्ये झालेली आहे .
रिलायन्स सारखे उद्योग समूह त्यात सहभागी आहे .
आणि सरकारनी नी त्यांना नफ्याची हमी दिली असणार .
त्या मुळे इथिनोल वर गाडी चालणे स्वस्त आणि सहज शक्य झाले तरी पेट्रोल आणि cng हद्ध पार होणार नाही नजीकच्या काळात .
नंतर होवू शकते

एकदा एक विडिओ डॉक्यु दाखवलेली टिवी चानेलवर - कोणत्यातरी गावाचे धरणामुळे पुनर्वसन करून घरं बांधून दिलेली. संडासाच्या सेप्टीक ट्यान्कास ग्यासप्लान्ट लावलेला. मिथेन तयार होतो तो टाकीत साठवून सर्वांना किचनमध्ये दिलेला. पण पुढे काही अशाप्रकारे कुठे बांधलेलं दिसलं नाही.
हा मिथेन जळल्यावर एक अणू कार्बन, चार अणू हाईड्रोजनचे जळून कार्बनडाईआक्साईड आणि वाफ तयार होते. याच मिथेनवर एंजिन चालवायला हवे.
लोकसंख्या वाढलीच आहे, मिथेनही भरपूर मिळेल ना?

शाम भागवत's picture

12 Sep 2019 - 5:15 pm | शाम भागवत

कंकाका,
त्याला पू बसेस म्हणतात. ब्रिस्टाॅलला अशी बस २०१५ पासून चालू आहे. डिझेलपेक्षा ३०% कमी कर्बवायू तयार होतो.
https://carbiketech.com/oh-sht-pee-poo-bus-karo

ही गार्डिअनची बातमी
https://www.theguardian.com/uk-news/2015/mar/15/uk-first-poo-bio-bus-bri...

ही बातमी मी त्यावेळेसच वाचली होती. ३२००० घरांतून त्यासाठी गॅस गोळा करण्याची व्यवस्था उभारण्यात आली होती.
घरटी कमी माणसे व दोन घरांतील अंतर लक्षात घेता (भारताशी तुलना करता) ही वस्ती फारच विरळ म्हणली पाहिजे असे नमूद करून, भारतासारख्या दाट लोकवस्तीतून हे प्लॅंट उभारणे आणखी सोपे व कमी खर्चिक असेल असेही त्यात म्हटले होते. विशेषत: झोपटपट्टीत असे प्लॅंट बसवणे हे अनेक दृष्टिने फायदेशीर व स्वच्छतेच्या दृष्टिने अत्युतम ठरेल व ही सर्व व्यवस्था पैसेही मिळवून देईल. त्यामुळे याकडे धंदा म्हणूनही पाहता येऊन ही व्यवस्था कार्यक्षम राहू शकेल.

मिथेन गॅसवर टाटा कंपनीने बस तयार केली आहे व अनेक संशोधने केलेली आहेत.
https://www.tatamotors.com/press/tata-motors-develops-countrys-first-bio...

ही आणखी एक बातमी. पण या कंपनीबाबत उलट सुलट बातम्यापण आल्या होत्या.
https://www.hindustantimes.com/kolkata/at-re-1-for-17km-cheapest-bus-in-...

प्लॅस्टिकपासून परत तेल बनवण्याचे संशोधनही असेच होते. कचरा गोळा करणाऱ्या लाखो लोकांना काम मिळाले असते. ती सर्व माणसे दारिद्र्यरेषेवर कायमची आली असती. उद्योगांना फर्नेस आॅईल व शुध्द कोक मिळाले असते. मुख्य म्हणजे भारतातले यच्चयावत प्लॅस्टिक लोकांनी गोळा केले असते कारण यांत भंगार प्लॅस्टिकचा परताव खूप होता. सर्वात महत्वाचे म्हणजे भंगार प्लॅस्टिकची वर्गवारी करणे किंवा ते स्वच्छ करणे याची आवश्यकता नसल्याने या गरीब लोकांच्या आरोग्याला धोका नव्हता. जिवाङूंपासून ही प्रक्रिया होत असल्याने अत्यंत सुरक्षीत व कोणत्याही प्रकारची जाळपोळ न करता हे सर्व होणार होते.

भारतात अनोखी कामे करणारी खूप आहेत. फक्त त्यांना काम करू दिले पाहिजे.
असो.
_/\_

सुबोध खरे's picture

12 Sep 2019 - 11:19 am | सुबोध खरे

येथे चर्चा करणाऱ्या बहुसंख्य लोकांची पार्श्वभूमी "शास्त्र" नसावी असे वाटते. कारण बहुसंख्य लोकांनी आपली मते अर्धवट ज्ञानातून व्यक्त केली आहेत.
कोणालाही दूषणे न देता काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छितो

१) जास्तीत जास्त ८५ % इथेनॉल इंजिन मध्ये वापरता येईल कारण १००% इथेनॉल वर इंजिन "चालू" होणार नाही. परंतु भारताची सद्य स्थिती अशी आहे कि भारताकडे पेट्रोल मध्ये १० % मिश्रण करण्याएवढेही इथेनॉल उपलब्ध नाही.त्या शिवाय तेवढे इथेनॉल उपलब्ध करण्यासाठी ऊसाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर वाढवणे आवश्यक आहे यासाठी प्रचंड प्रमाणावर पाण्याची नासाडी होईल. हे आपल्या देशाला परवडणारे नाही. शिवाय जत्रौफा मधून बायोडिझेल निर्मिती हा व्यवहार आतबट्ट्याचा आहे असे सिद्ध झालेले आहे. जिज्ञासूंनी खालील दुवा पहावा https://www.livemint.com/Industry/RfNU5ZFXDRTrfUkl9lNMaL/Why-ethanol-ble...

२) इथेनॉल ची ऊर्जा पेट्रोलच्या पेक्षा ३०% ने कमी आहे. इथेनॉल आणि शुद्ध पेट्रोल याने होणारे प्रदूषण तेवढेच असते. पेट्रोलच्या इंजिनातून येणार धूर हा एकतर पेट्रोल पूर्ण न जळल्याने येतो किंवा पेट्रोल मध्ये भेसळ असेल किंवा इंजिनच्या पिस्टन रिंग नीट काम करत नसतील तर वंगण इंजिनमध्ये जाळून धूर होतो.

३) टर्बो चार्जिंग या प्रक्रियेत इंजिनच्या हवा आत घेण्याच्या नळकांड्याच्या पुढे एक वेगाने फिरणारा पंखा( हा इंजिन बरोबरच फिरतो) लावला जातो ज्यामुळे आत येणारी हवा दाबून जास्त घनतेची केली जाते. या दबावामुळे हवा गरम होते आणि त्याची घनता कमी होते म्हणून टर्बो चार्जरच्या पंख्यानंतर हवा थंड करण्यासाठी एक इंटर कुलर वापरला जातो. हवा थंड केली कि तिची घनता वाढते. यामुळे इंजिनातील इंधन जवळ जवळ पूर्णपणे जळते. ( डिझेल इंजिनातील धूर हा त्यातील अशुद्ध तत्वे जळल्यामुळे होते
याची पुढची पायरी म्हणजे CRDI (COMMON RAIL DIRECTI NJECTION) इंजिन यात इंधन आणि हवा १६०० बार इतक्या प्रचंड दाबाखाली इंजिनात सोडले जातात. अर्थात त्यात टर्बो चार्जिंग आणि इंटर कुलिंग असतेच ज्यामुळे इंधनाचे संपूर्ण ज्वलन होते.
या दोन तंत्रज्ञानामुळे डिझेल इंजिने बरीच जास्त कार्यक्षम झाली असून त्यातुन मिळ्णारे सरासरी किमी बरेच जास्त मिळतात शिवाय त्यातून होणारे प्रदूषण खूप कमी झालेले आहे. हे तंत्रज्ञान १९२३ पासून उपलब्ध आहे. अर्थात तेंव्हा हि इंजिने बोजड असल्याने ती विमान किंवा जहाजात वापरली जात होती. जसा जसा आकार कमी होत गेला तसे हे तंत्रज्ञान मोटारीत पण आले.
असेच तंत्रज्ञान पेट्रोल इंजिन मध्ये सुपरचार्जींग द्वारे केले जाते.

४) इंधनांची ऊर्जा क्षमता- एक लिटर इथेनॉल ची २३.५ मेगॅज्यूल आहे तर दबावाखालील नैसर्गिक वायू (CNG) २१.८, पेट्रोलची ३३. ५ आणि डिझेल ची ४५ मेगॅज्यूल आहे. ज्या इंधनाची घनता जास्त तितकी त्यातून मिळणारी ऊर्जा जास्त असते म्हणूनच रॉकेट किंवा क्षेपणास्त्रात घन इंधन वापरले जाते.

भंकस बाबा's picture

12 Sep 2019 - 2:56 pm | भंकस बाबा

धन्यवाद , प्रतिसाद टाकल्याबद्दल
थोडेसे इथेनॉलबद्दल, काही दिवसापूर्वीच टीवीएस कंपनीने फक्त इथेनॉलवर चालणारी दुचाकी बाजारात आणली. वाजतगाजत तिचे उदघाटन केले. ही बातमी तुमच्या कानावर आली नाही बहुतेक? दूसरी गोष्ट म्हणजे इथेनॉल फक्त उसापासून तयार होते, हे तर घोर अज्ञान. इथेनॉल ज्वारी, बाजरीपासून देखील होते. अगदी शुद्ध अल्कोहोल देखील एक इंधनच असते फक्त ते महाग असते. ब्राजील व अर्जेटीना या देशात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत, मी पन्नास टक्केचा दावा बघितला आहे. आपल्याकडे उस हा राजकारण्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एक वेळ अशी होती कि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शुगर लॉबी ठरवायची. आता आपल्याकडे साखरेमध्ये राजकारण आहे म्हणून आयात साखरेला परवानगी मिळत नाही, नेमके हेच काऱण इथेनॉल निर्मितीला मारक आहे. ब्राजील व अर्जेटीनामधे उसाचे पिक वारेमाप येते याचे कारण हे देश विषुववृत्तावर आहेत, जिथे वर्षभर पाऊस पडतो. आपल्याकडे मात्र साखर कारखानेदार जगावा म्हणून पाण्याचा वारेमाप उपसा करून उस वाढवला जातो. तेल लॉबी तर याहुन मोठी आहे.

आनन्दा's picture

12 Sep 2019 - 5:50 pm | आनन्दा

ठीक आहे, ज्वरी पासुन तयार होते, पण विशेषतः शेतीपासुनच ना?
उसापासुन तयार होते हे फेमस आहे कारण उसासाठी इथेनोल हे बाय-प्रॉदक्ट आहे.
इथेनॉल हवे म्हणून आपण ज्वारी लावू काय?

भंकस बाबा's picture

12 Sep 2019 - 5:59 pm | भंकस बाबा

नक्कीच , आपण इथेनॉलसाठी ज्वारी लावू शकतो, उसाला लागणारा कालावधी, पाण्याचा उपसा बघता तीन महिन्यात येणारे ज्वारीचे पिक फ़ायदेशीर असू शकते. पण गाभ्यात म्हटल्याप्रमाणे इथे एक मोठी लॉबी कार्यरत असू शकते हे सर्व प्रत्यक्षात येण्यास अडवण्यासाठी!

तसा विषय नाही तो. उसापासुन साखर तयार झाल्यावर जे शिल्लक राहते त्यापासून इथेनॉल तयार होते.. नुसत्या इथेनॉल साठी जर ऊस करायचा झाला तर ते तितके किफायतशीर राहणार नाही.
त्याचप्रकारे ज्वारी वगैरे देखील केवळ इथेनॉलसाठी जावणे परवडणार नाही... तरीही तुम्हाला रस असेल तर जरा त्यामागचे अर्थकारण कागदावर मांडुन बघा. किफायतशीर आहे असे वाटले तर आम्हाला पण सांगा.
उदा - एका हेक्टरमध्ये ५ टन ज्वारी, त्यापासुन १टन इथेनॉल, त्याचा दर ५०रु लिटर, म्हणजे ५००००रु वगैरे.

बघुया फायद्याचे आहे का ते.

भंकस बाबा's picture

12 Sep 2019 - 7:09 pm | भंकस बाबा

कृषिजागरण डॉट कॉम नावाच्या साइटवर ज्वारीपासून इथेनॉल बनवण्याचे फायदे दाखवले आहेत, त्यात त्यांनी इथेनॉलसाठी धाटे पिळल्यावर उरणारा चोथा पशुखाद्य म्हणुन वापरता येईल असे म्हटले आहे

तसे असेल तर विचार करायला हरकत नाही.

सडक्या ज्वारीपासून (जी फेकूनच द्यायची होती) दारूनिर्मितीचे दोन कारखाने घाट्यात येऊन बंद पडल्याचे आठवतंय. शेवटी सरकारने ७२ कोटी नुकसीन भरपाई दिली.
मला तपशीलात रस नाही.;)
मला तरी वाटते, शेतीतून बायप्राॅडक्ट म्हणूनच हा उद्योग किफायतशीर ठरेल.

दिली तर सगळ्या टाकावु माला पासुन ते अल्कोहोल बनवुन देतील. ते ही स्वस्तात.

सुबोध खरे's picture

12 Sep 2019 - 7:33 pm | सुबोध खरे

ज्वारी पासून इथेनॉल तयार करतात त्यात ज्वारीच्या दाण्यांचा वापर होत नाही तर ज्वारीच्या ताटातील( खोड) रसाचा उपयोग केला जातो आणि या पिकासाठी पाणी उसापेक्षा बरेच कमी लागते.
ज्वारीच्या ताटातून रस हा शेताच्या जवळच काढावा लागतो अन्यथा ते वाळून जाण्याचा धोका असतो. हा रस काढण्यासाठीची यंत्रे अजून सहज पणे उपलब्ध झालेली नाहीत.

शिवाय या तंत्रज्ञानाला अजून सर्व मान्यता मिळालेली नाही. याची ़कारणे राजकीय आहेत कि आर्थिक आहेत हे मला माहित नाही. परंतु हा एक समर्थ पर्याय उपलब्ध होऊ शकतो असे सकृतदर्शनी वाटते.

https://www.business-standard.com/article/markets/ethanol-fuels-sorghum-...

भंकस बाबा's picture

12 Sep 2019 - 8:12 pm | भंकस बाबा

या पिकापासुन ज्वारी मिळवायची असेल तर पिक कालावधी वाढेल. परिणामी धाटे सुकून मूळ उद्देश्य बाजूला राहिल. मी काही काळ शेती केली होती , चाऱ्यासाठी लावणारी ज्वारी व अन्नासाठी होणारी ज्वारित फरक असतो. उसाच्या एका पिक कालावधीत ज्वारीची तीन पीके मिळतात , शिवाय पाणी कमी लागते.
तुमचे मुद्दे खोडत आहे म्हणून राग मानू नका, तुमच्यासारख्या व दुसऱ्या अनेक जाणकार मिपाकराचा प्रतिसाद या धाग्यासाठी आवश्यक आहे.

सुबोध खरे's picture

13 Sep 2019 - 9:38 am | सुबोध खरे

मी कुठे पिकापासून ज्वारी मिळेल म्हणतोय.
उलट तुम्ही मी मांडलेल्या मुद्द्याला दुजोराच देत आहात किंवा मी तुमचा मूळ मुद्दाच समर्थन केलाय आणि त्यासाठी लागणार संदर्भ सुद्धा दिलाय.

(नक्कीच , आपण इथेनॉलसाठी ज्वारी लावू शकतो, उसाला लागणारा कालावधी, पाण्याचा उपसा बघता तीन महिन्यात येणारे ज्वारीचे पिक फ़ायदेशीर असू शकते. पण गाभ्यात म्हटल्याप्रमाणे इथे एक मोठी लॉबी कार्यरत असू शकते हे सर्व प्रत्यक्षात येण्यास अडवण्यासाठी) हा आपला श्री आनंदा याना दिलेला प्रतिसाद

सुबोध खरे's picture

13 Sep 2019 - 10:13 am | सुबोध खरे

अहो डॉ. खिरे, तुम्ही डॉक्टर आहात कि इंजिनिअर?
एकदम टेक्निकल प्रतिसाद दिला कि.
फारच छान !

चामुंडराय's picture

16 Sep 2019 - 2:06 am | चामुंडराय

* डॉ. खरे

पाण्याचे रासायनिक सूत्र h2o हे आहे म्हणजे हायद्रोजन चे 2 अनु आणि ऑक्सीजंन चा एक अणू मिळून शुद्ध पाणी तयार होते .
पण असे शुद्ध पाणी असतं का त्या मध्ये बऱ्याच घटकांचे मिश्रण झालेलं असतं .
पेट्रोल चे एक ठराविक रासायनिक सूत्र नाही मग
शुद्ध पेट्रोल कशाला म्हणतात ?
इंजिन मध्ये कधीच १००% इंधनाचे ज्वलन होवू शकणार नाही आणि धूर विरहित ऊर्जा मिळणार नाही असे मला वाटत .
शास्त्रीय ज्ञान मला बिलकुल नाही पण ही शंका आहे तुम्ही मत मांडावे .

शाम भागवत's picture

12 Sep 2019 - 5:18 pm | शाम भागवत

कोणतीही शक्ति रूपांतरित होताना १००% रूपांतरीत होऊ शकत नाही. त्या उर्जेचा काही भाग रूपांतर प्रक्रियेला वापरला जातो असं कुठेतरी वाचलं होतं. त्यामुळे तेलाचे रूपांतर १००% गतीज उर्जेत होणे शक्य नसावे.

आनन्दा's picture

12 Sep 2019 - 5:55 pm | आनन्दा

भाऊ १००टक्के वपरले जाणे म्हणजे १००% ज्वलन.
म्हणजे, जेव्हा कार्बन जळतो, तेव्हा डाय ऑक्साईड तयार होतो. आणि उष्णता सोडली जाते. मोनॉक्साईड तयार होताना उष्णता सोडली जात नसणार.

ज्वलन म्हणजे १००% कार्बन चे डायओक्साईड मध्ये रुपांतर. त्याचे पुढे काय होते ते वेगळ्या घटकांवर अवलंबून असते. बाकी impurities चे सोडुन द्या.

शाम भागवत's picture

12 Sep 2019 - 6:04 pm | शाम भागवत

ओहो. असं होय. मग बरोबर आहे तुमचे.
:)

कंजूस's picture

12 Sep 2019 - 7:22 pm | कंजूस

उस,ज्वारी,जेट्रोपा यांच्यापेक्षा पूमेथड आणणे ही गरज आहे. त्याची (मिथेनची)क्षमता कमी असली तरीही उपयुक्तता महत्त्वाची.
फक्त एक धोका म्हणजे आपल्याकडे संयत्रांची छेडछाड होते ती टाळली पाहिजे. फटाके वगैरेनी स्फोट होऊ शकतो टाकीचा.
शिवाय एक मोठा नकारात्मक मुद्दा आहे. - संडासात डिसेन्फेक्टंटस वापरले तर मैला कुजवणारे चांगले उपयुक्त ब्याक्टेरिआ मरतात, कुजणे थांबते, मिथेन होत नाही. संयत्र बंद पडते.
असिड, फिनोल,हार्पिकवगैरेचा धंदा बंद होईल.

भंकस बाबा's picture

15 Sep 2019 - 10:50 pm | भंकस बाबा

जो सौदीमधील एक मोठी कंपनी सौदी अरमाको हिच्या तेलसाठयावर झाला हा पण एक मोठा बनाव वाटत आहे.
सीरियातील इराण समर्थक बंडखोरानी हा हल्ला केला असे मीडिया कोकलून सांगत आहे. अगदी त्या बंडखोरानी त्याची जबाबदारी पण घेतली. काहीतरी मुरते आहे खास! ड्रोन टेक्नोलॉजी ही अमेरिका ,इजरायल या देशांची मक्तेदारी मानली जाते. हे देश या भागात नजर ठेवून आहेत. अशा वेळेला एक ड्रोन चारशे किलोमीटरचे अंतर तोडून विनासायास येतो व अचुकपणे वार करतो हे पटत नाही , कारण अशा हल्ल्यासाठी सैटेलाइटची मदत लागेल.
इंधनयुद्ध , लालच व धर्मवेड याची कुठे सांगड लागत आहेसे वाटते.

भंकस बाबा's picture

15 Sep 2019 - 10:51 pm | भंकस बाबा

जो सौदीमधील एक मोठी कंपनी सौदी अरमाको हिच्या तेलसाठयावर झाला हा पण एक मोठा बनाव वाटत आहे.
सीरियातील इराण समर्थक बंडखोरानी हा हल्ला केला असे मीडिया कोकलून सांगत आहे. अगदी त्या बंडखोरानी त्याची जबाबदारी पण घेतली. काहीतरी मुरते आहे खास! ड्रोन टेक्नोलॉजी ही अमेरिका ,इजरायल या देशांची मक्तेदारी मानली जाते. हे देश या भागात नजर ठेवून आहेत. अशा वेळेला एक ड्रोन चारशे किलोमीटरचे अंतर तोडून विनासायास येतो व अचुकपणे वार करतो हे पटत नाही , कारण अशा हल्ल्यासाठी सैटेलाइटची मदत लागेल.
इंधनयुद्ध , लालच व धर्मवेड याची कुठे सांगड लागत आहेसे वाटते.

गतीशील's picture

17 Sep 2019 - 5:59 pm | गतीशील

डॉ. खरे सोडले तर बऱ्याच जणांनी अर्धवट आणि ऐकीव माहिती दिली आहे असे दिसते. इंधन कमी पिणे हे त्या इंधनावर अवलंबून नसून त्या इंधनातून आपण जास्तीत जास्त ज्वलन शक्तीला यांत्रिकी शक्ती मध्ये कसे रूपांतर करू शकतो यावर अवलंबून आहे.तंत्रज्ञान हे हळूहळू उत्क्रांत होत जाते,आणि एक वेळ अशी येते कि त्याहून पुढे जाणे हे खर्चिक आणि उपलब्ध जागेचा विचार करता अशक्य असते. डिझेल आणि पेट्रोल ची हि वेळ आली आहे. उदा. CRDI इंजिन हे पारंपरिक डिझेल इंजिनपेक्षा खूपच कार्यक्षम (Efficient) आहे. याचे कारण तंत्रज्ञानमध्ये झालेली उत्क्रांती
Turbocharger विषयी हास्यास्पद म्हणावी अशी माहिती बऱ्याच जणांनी दिली आहे. Turbocharger हा इंधनाची बचत करण्यासाठी नसून इंजिनची ताकद वाढवण्यासाठी वापरतात. उदा. १००० CC चे इंजिन हे १३०० CC इंजिन एवढी अश्वशक्ती चे काम करू शकेल. उलट turbocharger मुळे इंधन थोडे जास्तच जळते.
आता खरे काय या प्रश्नाकडे वळूया.
खरे हेच आहे कि आता पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये संशोधन करून त्याची कार्यक्षमता वाढवण्यासारखे काही उरलेले नाहीये. शिवाय वातावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम आहेत ते वेगळेच. (र.च्या.क.ने. गेल्या काही वर्षात वनक्षेत्र हे ७% ने वाढले आहे तरी प्रदूषण हे वाढता वाढता वाढे असेच चालू आहे याचे कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेल चा अमर्याद वापर.)
इलेकट्रीक गाड्यांविषयी पण थोडे बोलू. जरी इलेक्ट्रिक गाड्या या प्रदूषण करत नसल्या तरी त्या ज्या विजेवर चालणार आहेत ती वीज कशी बनवली हे महत्वाचे आहे. वीज जर कोळसा जाळून चंद्रपूरला बनवली तर पुण्यात होणारे प्रदूषण कमी होईल, पण चंद्रपूरला प्रदूषण दुप्पट-तिप्पट वाढेल कारण विजेची मागणी वाढली असेल. थोडक्यात पवनचक्की आणि सौरऊर्जा वापरून बनवलेली वीज आणि त्या विजेवर चालणाऱ्या गाड्या या खऱ्या अर्थाने पृथ्वीसाठी उपकारक असतील.
बाकी मोटारसायकलने १०० कि.मी. प्रति लिटर मायलेज देणे हे अशक्य कोटी मध्ये मोडते. मी कुठेसुद्धा कोणाला सुद्धा भेटायला तयार आहे जो मला हे सिद्ध करून दाखवेल माझ्या डोळ्यासमोर. उतारावरती clutch दाबून ४-५ कि.मी. गाडी चालवून त्याला १०० कि.मी. च्या त्रैराशिक समीकरणामध्ये बसवून दाखवणे याला थोतांड असे म्हणतात
शेवटी खरे हेच आहे कि येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि त्यावर चालणाऱ्या गाड्या याच फक्त आपल्या वसुंधरेला वाचवू शकतात

भंकस बाबा's picture

17 Sep 2019 - 6:44 pm | भंकस बाबा

इंटरनेटवर असंख्य लेख उपलब्ध आहेत टर्बोचार्जरवर.
जे ईंधन न जळता बाहेर पडते त्याला परत ज्वलनासाठी वळवून पॉवर व इंधनाची बचत असे कार्य लिहिले आहे तिथे .
बरे विषय ज्या मुद्द्यावर होता तो सोडून तुम्ही बाकी सर्व लिहिले आहे जे येथील बहुतेक लोंकानी मांडले आहे .
परत एकदा लिहितो की जे नवीन संशोधन येत आहे ते पुरेसे नाही आहे. यामधे अनेक देशांचे हितसंबध गुंतलेले आहेत. आणि आपल्याकडे राजकारणाचे देखील

गतीशील's picture

18 Sep 2019 - 9:17 am | गतीशील

भंकसजी बाबाजी, इंटरनेटवर असंख्य लेख जरी उपलब्ध असले तरी त्यात काय लिहिलं आहे हे कळणे महत्वाचे आहे. खालील मी २ इमेज टाकल्या आहेत, वाचून काय लिहिलंय हे समजतंय का बघा.

Turbo 1
माझं ज्ञान हे इंटरनेटवर बसून आले नसून मी स्वतः एका वाहन उद्योग कंपनी मध्ये काम करतो आणि turbocharger वगैरे गोष्टी रोज बघतो, वापरतो. काही turbocharger आहेत जे ताकद आणि मायलेज असे वाढवणारे आहेत, पण ते खूपच महाग आणि सध्या गाड्या, ट्रक याना न परवडणारे आहेत. तुम्ही BMW, Mercedes असल्या कंपन्या काही संशोधन करत असलेले लेख वाचून सरसकट सगळे turbo तसेच असतात असा समज करून घेऊ नका.

बरे विषय ज्या मुद्द्यावर होता तो सोडून तुम्ही बाकी सर्व लिहिले आहे जे येथील बहुतेक लोंकानी मांडले आहे: माझा कोणता मुद्दा आहे जो विषयाला सोडून होता हे सांगितले तर बरे होईल. आपण मूळ धाग्यात लिहिलेल्या सर्व मुद्द्यांना मी स्पर्श केला आहे शिवाय अजून काही नवीन माहिती पण टाकली आहे असं मला वाटलं. जर माझी माहिती भरकटलेली असेल तर माफ करा.

सुबोध खरे's picture

18 Sep 2019 - 9:54 am | सुबोध खरे

माझ्या अल्पमतीप्रमाणे
टर्बो चार्जर मध्ये आत येणारी हवा निमुळत्या होत जाणाऱ्या नळकांड्यात(VENTURI) हवा पंख्याने दाबाने ढकलली जाते. यामुळे इंजिनच्या ज्वलन कक्षात इंधनाचे अधिक चांगल्या तर्हेने ज्वलन होते आणि न जळलेल्या इंधनाचे प्रमाण बरेच कमी होते. यामुळे उपलब्ध इंधनाचा संपूर्णपणे वापर होतो.

एकाच आकाराच्या इंजिनात ( उदा २ लिटर) टर्बो चार्ज असलेले इंजिन साध्या इंजिनापेक्षा जास्त कार्यक्षमतेने काम करते( जास्त सरासरी मिळेल)
परंतु हे तत्व इतके साधे नाही. कारण सुरुवातीच्या त्वरणात( ACCELRATION) दोन्हीत तितकेच इंधन जळेल. परंतु एकाच वेगाने (उदा. ताशी ४० किमी) सपाट रस्त्यावर ब्रेक न मारता गाडी चालवली तर टर्बो चार्ज्ड इंजिनात इंधन कमी जळेल.

टर्बो चार्जिंग चा जास्त फायदा हा लहान आकाराच्या इंजिनातुन जास्त शक्ती मिळवता येते हा आहे. इंधन कार्यक्षमता थोडीशी वाढते हि वस्तुस्थिती.

पूर्वी डायरेक्ट इंजेक्शन (डिझेलचे) ची इंजिने असत ज्यात डिझेल थेट ज्वलन कक्षात पाठवले जात असे ज्याने इंधन कार्यक्षमता चांगली मिळत असे पण त्या इंजिनांचा आवाज आणि थरथरणे(VIBRATIONS) खूप जास्त असते. उदा टाटा स्पेशिओ (टाटा सुमो ची धाकटी बहीण). महिंद्राच्या जीप MM ५४० इ. यामुळे
यात सुधारणा म्हणून IDI इन्डायरेक्ट इंजिने आली. ज्यात हा आवाज आणि थरथरणे(VIBRATIONS) बरंच कमी झालं.

याचा पुढचा अवतार म्हणजे CRDI ज्यात डायरेक्ट इंजेक्शन असले तरी डिझेल अतिशय सूक्ष्म अशा कणात (ATOMIZE) विभागून १६०० बार प्रेशरला इंजेक्ट केले जाते यामुळे इंजिनाचा आवाज कमी झाला तसेच त्यांची कार्यक्षमता बरीच वाढली.

उदा टाटा स्पेशिओ चे इंजिन २६०० मिली चे असूनही त्याची शक्ती फक्त ६० बी एच पी आहे MM ५४० या महिंद्राच्या जिपचे इंजिन २१०० सीसी असून त्यात ६२ बी एच पी शक्ती निर्माण होते. या दोन्ही गाड्या १६-१७ ची सरासरी (आदर्श स्थिती मध्ये) देत असत जी त्या काळात खूप चांगली समजली जात असे

याउलट स्विफ्ट किंवा इंडिका व्हिस्टा चे CRDI इंजिन फक्त १२४८ मिली चे इंजिन ७४ बी एच पी शक्ती निर्माण करते आणि एवढे असून २४-२५ किमि एक लिटर डिझेल मध्ये (आदर्श स्थिती मध्ये) जाते. हेच १२४८ सीसी इंजिन मांझा किंवा फियाट लिनिया वेगळ्या ट्युनिंगमुळे मध्ये ९० बी एच पी शक्ती निर्माण करते.

भंकस बाबा's picture

18 Sep 2019 - 10:02 am | भंकस बाबा

मला अपेक्षित होते , ह्या क्षेत्रात तितकेसे संशोधन झाले नाही. किंवा जे झाले ते लोंकासमोर येत नाही. या सर्वाच्या पाठीमागे क़ाय आहे हे खोदने, पण चर्चा ईंधन बचत या मुद्द्यावर अडून राहिली. अगदी उदाहरण द्यायचे म्हटले तर कंप्यूटरचा शोध 50च्या दशकातला, मात्र त्याने अल्पावधित पुष्कळ मोठी मजल मारली. गाड्या तर अस्तित्वात येऊन शंभर वर्षाचा काळ लोटला. त्यासुधा आधी इंजिन अस्तित्वात होते. मी होंडा दुचाकीचे 88च्या मॉडलचे उदाहरण दिले. ज्याच्याकडे ह्या मोडलची ओरिजनल दुचाकी , जिच्या इंजिनवर होंडा अशी नोंद आहे( हिरो होंडा नव्हे) अजुन कार्यरत आहे त्याला तुम्ही विचारु शकता. आता हा योगायोग म्हणावा की कारस्थान , किहोंडा कंपनी व पाण्यावर चालणारी गाड़ी यांचे उगमस्थान जपान असावे, आणि त्या गोष्टीला उणीपुरी 30 वर्षे निघुन गेली तरी काहीच दृष्टिपथात नसणे!
तुम्हाला जरा डिवचून प्रतिसाद दिला याबद्दल माफी! पण यामुळे तुम्ही थोड़ी खोदाखोद केली हे पण सत्य!
टर्बोबाबत , याचा उद्देश्य जे ईंधन ज्वलन होत नाही त्याला परत ज्वलनासाठी ढकलून जास्त पॉवर व माइलेज मिळवने हाच होता. मला नक्की आठवत नाही पण 80च्या एका मर्सिडीज गाडीत मी ही सिस्टीम बघितली होती

गतीशील's picture

20 Sep 2019 - 11:05 am | गतीशील

Turbocharger विषयी खुलासा करणे महत्वाचे आहे. बहुतेक लोकांची अशी समजूत आहे कि न जळालेले इंधन turbo द्वारे पुन्हा जाळण्यासाठी वापरता येते. ते तसे नाहीये. जेव्हा इंजिन मध्ये ज्वलन होऊन धूर (exhaust ) बाहेर ढकलला जातो तो धूर turbo च्या पात्यांना (turbines ) फिरवतो. turbo च्या एका दांडक्यावरती दोन वेगवेगळी पाती असतात. जेंव्हा एका बाजूच्या पात्याला बाहेर जाणारा धूर फिरवतो तेव्हा दुसऱ्या बाजूचे पाते आत येणाऱ्या हवेला (fresh air sucking through breather) कॉम्प्रेस करते. जेणेकरून ज्वलनासाठी जास्तीत जास्त हवा आणि त्याचबरोबर जास्ती oxygen, जो ज्वलनाला मदत करतो, असे दोन्ही मिळून आत जावे. म्हणजे turbo नसताना समजा २ युनिट हवा आत खेचली जात असेल तर turbo असताना २.५ किंवा ३ युनिट हवा आत जाते. त्याच्यामुळे आत जे ज्वलन म्हणजेच एक छोटा स्फोट होत असतो तो थोडा मोठा स्फोट होतो आणि गाडीला जास्ती ताकद मिळते.
Turbocharger हा गाडी सुरु केली कि लगेच सुरु होत नाही. काही ठराविक RPM (परिवलन वेग) नंतर चालू होतो. (उदा. १२०० ते १४०० RPM ). डॉ. खरे यांनी वर सांगितल्याप्रमाणे काही ठराविक स्पीड ला ठराविक तऱ्हेने गाडी चालवली तर अतिशय नगण्य अशी इंधन बचत होते. पण मूळ उद्देश turbo चा हाच आहे कि छोट्या इंजिन मधून मोठ्या इंजिन एवढी ताकद बाहेर काढणे.
तुम्ही जे १९८० साली Mercedes च्या गाडी मध्ये बघितलं आहे ते आता जवळपास सगळ्या डिझेल गाड्या आणि काही पेट्रोल गाड्यांमध्ये गेले ५-७ वर्षे झाली सर्रास वापरले जातात, आता त्यात नावीन्य काहीही राहिलेले नाहीये.
होंडा असे लिहिलेल्या इंजिन बद्दल तुम्ही जे सांगितले आहे त्याच्यावर माझे उत्तर असे आहि कि आता होंडा हि स्वतः एक वेगळी कंपनी आहे. जर तेव्हा होंडाला हे जमलं होत तर आता सुद्धा जमायला काहीच अडचण नसावी. मी पुन्हा एकदा सांगतो, १०० कि.मी.प्रति लिटर सरासरी हि अशक्य गोष्ट आहे.
पाण्यावर चालणाऱ्या गाड्या बनवणे अवघड काहीच नाहीये. फक्त किंमत आणि त्या गाडयांना लागणारी जागा हा खूप मोठा प्रश्न आहे. टाटा ने हायड्रोजन वर चालणारी बस बनवली सुद्धा आहे ज्याची किंमत जवळपास ३ करोड रुपये आहे. मला सांगा कोण घेईल हि बस?
प्रत्येक गोष्टी मध्ये काहीतरी मोठा आंतरराष्ट्रीय कट आहे असे conspiracy theory च्या मानसकितेमधून आता लोकांनी बाहेर पडले पाहिजे. मी आधी लिहिल्या प्रमाणे e -vehicles ला भविष्यात पर्याय नाही. आणि सुदैवाने सर्व कंपन्या त्या दृष्टीने पावले उचलत आहेत. कालचीच बातमी आहे, Mercedes benz बनवणारा Daimler ग्रुप आता डिझेल इंजिनच्या संशोधनामध्ये कोणतीसुद्धा गुंतवणूक करणार नाहीये. टाटा मोटर्स ने Ziptron हा त्यांचा e-vehicle चा प्लॅटफॉर्म कालच सादर केला. त्यामुळे आता डिझेल, पेट्रोल, पाणी, इथेनॉल याविषयी सर्वानी आवरता हात घेतलेला आहे.अल्कोहोल, व्हिस्की, रम हे सगळं फक्त बसल्यावर उपयोगी येणार आहे, गाडी चालवायला नाही.

भंकस बाबा's picture

22 Sep 2019 - 11:20 pm | भंकस बाबा

रेवा या भारतातल्या सर्वप्रथम इलेक्ट्रिक कार बनवण्यार्या कंपनीने 1995 साली आपली कार बाजारात आणली. त्यानन्तर त्यांना ना आपल्या कारमधे काही बदल करावेसे वाटले वा नवीन मॉडल आणावे असे वाटले.
महिंद्राने मला नक्की आठवत नाही पण 2003 साली बिजली या नावाने दहा आसानी इलेक्ट्रिक रिक्शा दाखवली , मी दाखवली हा शब्द वापरला कारण ही रिक्शा भारतीय रस्त्यावर फक्त प्रायोगिकरित्याच धावली. 2003 साली चर्चगेट रेल्वे स्टेशन ते विधानभवन अशी फुकट राइड या कंपनीने दिली होती. जवळजवळ महिन्याभरासाठी ही सेवा जनतेला उपलब्ध करून दिली होती. आता कुठे आहे ती बिजली?
ड्रोन तंत्रज्ञान हे अगदी अलिकडील! आता फिल्म इंडस्ट्रीत, स्पोर्ट इवेंट, इवेंट मैनेजमेंट, वन्यप्राणी चित्रीकरण, डिलीवरी या कामासाठी ड्रोन वापरले जातात. इतक्या जलदगतिने हे तंत्रज्ञान विकसित झाले कि ते वापरणे हा पोरखेळ झाले आहे. आता तर त्याला सरकारी लायसेंस मिळवून कोणीही वापरु शकते पण जेव्हा परवानगी नव्हती तेव्हा पण लोक वापरत होते.
या सगळ्या गोष्टी क़ाय सूचवतात? तरीही तुम्ही बोलत आहात की अशी कोणतीही चाल बड्या तेलउत्पादक देशानी खेळली नसेल!
गाडीमधील जे ईंधन न जळता बाहेर पडते तेच जर कोणी शंभर टक्के वापरायचे तंत्रज्ञान विकसित केले तर आज लोक यूरेकायूरेका करून वाहवाह करतील, पण इतक्या वर्षात हे विज्ञानाला जमू नये?

रेवा हि कंपनी चेतन मैनी यांनी सुरु केली होती आणि नंतर तिला महिंद्राने विकत घेतली. महिंद्राने रेवा नवीन स्वरूपात सादर केली e2O या नावाने. बिजली नावाने जी रिक्षा दाखवली ती आता सुप्रो (e -Supro ) या नावाने चालू आहे.
ड्रोन तंत्रज्ञान हे खूप विकसित झाले आहे असे तुमचे म्हणणे असेल तर आपले वाचन वाढवा असाच सल्ला देईन. आज उपलब्ध असलेले सहज घेता येण्याजोगे ड्रोन हे जास्तीत जास्त २० मिनिटे काम करू शकते. जास्ती कालावधी साठी लागणारी ड्रोन हि लाखो रुपये किमतीची आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांचं मूळ प्रश्न हा आहे कि त्यांनी एका चार्जिंग मध्ये जास्तीत जास्त अंतर कसे कापता येईल. आत्ता महिंद्राची e -Verito & टाटांची e -Tigor या दोन्ही गाड्या व्यावसायिकदृष्ट्या (for commercial use only) वापरासाठी उपलब्ध आहेत. दोघांची एका चार्जिंग मधली range १२०-१३० किमी आहे. आणि चार्जिंगला लागणार वेळ ६ ते ८ तास आहे. दोन्ही गाड्यांची किंमत १२ ते १३ लाख आहे. मी तरी घेणार नाही अजून या गाड्या कारण त्या व्यावहारिक नाहीयेत. टेस्ला (Tesla) ४०० ते ५०० कमी चालू शकते एकदा चार्जिंग केल्यावर, पण तिची भारतातील किंमत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ती मला घ्यायची कितीही इच्छा असेल तरी घेऊ शकणार नाही.
तुमचा शेवटचा मुद्दा हा तुम्ही तंत्र जगतापासून खूप दूर आहेत हे दर्शवत आहे. आज पर्यंत माणसाला १००% कार्यक्षमता असलेले कोणतेही यंत्र बनवता आलेले नाहीये. आपल्या माहितीत किंवा आपण बनवले असले तर कृपया त्यावर प्रकाश टाकावा, अखिल मानवजात आपली आभारी असेल. एका इंधनावर चालणाऱ्या गाडीमध्ये साधारण ५००० ते ७००० हलणारे भाग असतात (moving parts). यात घर्षण, ज्वलन, हवेचा प्रतिरोध, दर्जा अश्या असंख्य गोष्टींवर त्या गाडीची कार्यक्षमता अवलंबून असते. आणि या सर्वाना नियंत्रित करणारा एका महत्वाचा घटक म्हणजे किंमत!! गाडी बनवताना किंमत आणि कार्यक्षमता याचा ताळमेळ साधूनच बनवावी लागते. अति कार्यक्षम गाडी बनवत बसलो तर त्याची किंमत अव्वाच्या सव्वा होऊन बसेल जिला कोणीच घेणार नाही.
इलेक्ट्रिक गाड्यांचे, विशेषतः बॅटरीवर आता खूप संशोधन होत आहे, आणि यातूनच आपल्या conspiracy theory ला उत्तर मिळेल.

भंकस बाबा's picture

23 Sep 2019 - 8:09 pm | भंकस बाबा

रेवा ही गाडी तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेली दिसत नाही , शिवाय महिन्द्राची ई वेरिटो देखील!
रेवा अंत्यत छोटी कार होती , रिक्षाच्या जवळपास जाणारी तर वेरिटो मारूतिसारखी दिसनारी!
आता येऊया टेस्ला या अमेरिकन कंपनिकडे !
एका बातमीपत्रात वाचलेले स्मरते की मर्सिडीज बेंज ही कार जर्मनित बनवताना जेवढा लेबर द्यावा लागतो त्यापेक्षा थोड्या अधिक किमतीत भारतात ती बनून तयार होते. तेव्हा भारतात मर्सिडीज टाटाबरोबर गाड़ी बनवत होती. मग टेस्ला सारखे उत्तम टेक्नोलॉजी असणारे भारतात का येत नाही ? त्यांना पण गाडी स्वस्तात बनवून मिळेल ना? उत्तर असे आहे की ते येणार! पण अमेरिकेचे व इतर देशांचे हित बघुनच. सध्या तरी पेट्रोलचा व खनिज तेलाचा खप कमी होणे यांना परवडनारे नाही , जेव्हा अमेरिकेने नवीन टेक्नोलॉजी शोधून काढली आहे तेल शोधण्याची!
गमतीची गोष्ट म्हणजे आपण इलेट्रिक कारकडे जात असताना सरकार दुसरीकडे जुन्या गाड्यासाठी स्क्रैप पॉलिसी आणत आहे, जऱ तीनचार वर्षात आपण इलेक्ट्रिक कारकडे वळणार असलो तर पुढच्या वर्षी ही पॉलिसी आणायची गरज काय? तीन वर्षात तर गाड्या इलेक्ट्रिक होणारच आहेत ना? इतकी वर्षे थांबलो मग अजुन दोनतीन वर्षे!

भंकस दादा, माझी विनंती आहे कि मी काय लिहिलंय ते नीट वाचा आणि मग त्याला काहीतरी प्रतिसाद द्या . रेवा या गाडीला महिंद्राने e2O या नावाने पुन्हा आणली होती असं लिहिलं आहे मी. e -verito आणि रेवा चा काहीही संबंध नाहीये. आणि तुमच्या म्हणण्यानुसार e-verito हि मारुती सारखी म्हणजे कशी? मारुती हि एक कंपनी आहे कारचे मॉडेल नाही. e -verito हि compact sedan या प्रकारात मोडते (<४ मी) आणि रेवा हि hatchback या प्रकारात मोडते. थोडे नीट वाचायचा प्रयत्न करा आणि मग तुमचे मत मांडा
आणि तुमचा मुद्दा काय आहे ते पण एकदा नीट सांगा. कधी म्हणता १००% इंधन वापरू का शकत नाही, कधी म्हणता टेस्ला भारतात का येत नाही. एखाद्या गाडीचा कारखाना टाकायचा म्हणजे प्रचंड मोठी गुंतवणूक असते. आणि त्याची business case तेवढी मजबूत असावी लागते. भारतात अजून e -vehicle ला लागणाऱ्या चार्जिंगच्या पायाभूत सुविधा नाहीयेत. आणि ती गाडी ही अत्यंत महागड्या प्रकारात आहे, जी अजून अमेरिकन लोकांना सुद्धा महाग वाटते ती भारतात मोठ्या प्रमाणावर विकणे शक्य नाही, म्हणून टेस्ला भारतात येत नाही.
तुम्हाला माहिती नसेल,Mercedes जेवढ्या गाड्या एका वर्षात विकते, तेवढी मारुती सुझुकी हि कंपनी ३ दिवसात विकते. त्यामुळे व्यवसायासाठी लागणारे आकडे नवीन कारखाना टाकायला पुरेसे नाहीयेत.
स्क्रॅप ची जी policy येणार आहे तिचे एकमेव कारण म्हणजे पर्यावरण हे आहे. १५ वर्षांपूर्वी भारतात BS -I मानक होते, आता BS -VI येणार आहेत एप्रिल २०२० पासून. मग जुन्या गाड्या ज्या प्रचंड प्रदूषण करतील त्याच्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढेल म्हणू त्या स्क्रॅप करायच्या आहेत.
जगात सगळीकडे हे चालू आहे.
असो. एकदा डोक्यात conspiracy theory पक्की झाली कि कितीही समजावलं तरी समजून घेणार नाहीत. चंद्रावर माणसाने पाऊल ठेवलंच नाही असं मानणारे या जगात कमी नाहीयेत. त्यामुळे हा माझा या विषयावर शेवटचा प्रतिसाद.
काही मनाला लागेल असे बोललो असेल तर माफी असावी.

सुबोध खरे's picture

24 Sep 2019 - 10:23 am | सुबोध खरे

टेस्ला भारतात का येत नाही?
भारतात १ कोटी रुपयाच्या गाडीची उत्पादन १५ लाख होईल का? शक्य नाही. अगदी ओढून ताणून कमीत कमी ३५ लाख. ३५ लाख रुपयाची गाडी घेणारे लोक एका शहरात किती असतील? या सर्व लोकांना तेथे शोरूम पासून सर्व सुविधा देणे आणि सर्वात महत्त्वाचे कार चार्ज करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मूलभूत सुविधा जोवर उपलब्ध होत नाहीत तोवर कोणताही उद्योजक असा आत्मघाती प्रयोग करणार नाही.

बाकी आजमितीस बॅटरीची क्षमता हा एक फार मोठा मुद्दा इलेक्ट्रिक कार बद्दल आहे. शिशाच्या बॅटरीचे वजन अफाट असते. त्यामुळे लहानशा गाडीतील शिशाची बॅटरी ३५० किलो इतकी जड आहे. ती केवळ पुढे किंवा मागे ठेवता येत नाही तर त्याचे वजन सर्व विभागात विखरून ठेवावे लागते

त्याशिवाय लेड ऍसिड बॅटरीत सल्फ्युरिक आम्लाच्या वाफा निघतात त्यापासून माणसे बसतात ती केबिन वेगळी काढण्यासाठी अतिरिक्त कष्ट आणि साधने वापरावी लागतात.

बाकी लिथियम आयन किंवा लिथियम पॉलीमर साठी लागणाऱ्या लिथियम पैकी ५० % च्या वर लिथियम सध्या तरी चीन कडे आहे.त्या शिवाय त्यात लागणाऱ्या कोबाल्टवर सुद्धा चीनने आपली पोलादी पकड मजबूत केलेली आहे. आपण तंत्रज्ञान तयार करायचे आणि चीनने त्याची चोरी करायची या भीतीने बऱ्याच कंपन्यांनी आपले संशीधन पुढे नेले नाही किंवा गुप्त ठेवले असावे.

लिथियमचे उत्खनन /उत्पादन आता इतर देशात चालू झाल्यामुळे या बॅटरीच्या तंत्रज्ञानामध्ये संशोधनास चालना मिळाली आहे.
https://thediplomat.com/2019/02/china-rushes-to-dominate-global-supply-o...

गेल्या २ दशकात बॅटरीच्या तंत्रज्ञानात जितकी प्रगती झाली आहे तितकी अगोदर कधीही झालेली नव्हती.

अगोदर च्या बॅटरी मध्ये निकेल मेटल हायड्राईड बॅटऱ्या किंवा निकेल कॅडमियम बॅटऱ्या होत्या ( आपण ज्या छोट्या रिचार्जेबल बॅटऱ्या वापरात असू त्या) पण वजन आणि आकारमान विरुद्ध त्यात साठवली जाणारी ऊर्जा यांचे प्रमाण व्यस्त होते. याशिवाय या बॅटऱ्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक होत्या
https://en.wikipedia.org/wiki/Nickel%E2%80%93metal_hydride_battery
https://en.wikipedia.org/wiki/Nickel%E2%80%93cadmium_battery

त्या मानाने लिथीयमच्या बॅटऱ्या स्वस्त, जास्त ऊर्जा घनता असणाऱ्या आणि पर्यावरणासाठी तेवढ्या घातक नाहीत. हे बॅटरी तंत्रज्ञान जेवढे लवकर प्रगत होईल तेवढ्या इलेक्ट्रिक कार लवकर रस्त्यावर येतील.

भंकस बाबा's picture

10 Jan 2021 - 10:26 pm | भंकस बाबा

धागा पुनर्जीवित करण्याचे कारण की हल्लीच बातमी वाचली की टेस्ला भारतात येत आहे. पण त्या बातमीवर धागा जिवंत करण्याची इच्छा झाली नाही. बातमी अशी लागली की बॅटरीसाठी लागणारे लिथियम आता भारत अर्जेंटिनाकडून आणणार आहे जे प्रथम आपण चीनवर अवलंबून होतो. अमेरिकेचे आणि लॅटिन अमेरिकेचे संबंध तितकेसे चांगले नाही. पण भारताचे आहेत ह्याचा फायदा टेस्लाने घेतला नाही तर नवल! शिवाय टेस्लाचा रोख युरोपीय मार्केटकडे असावा असा माझा अंदाज आहे.
तुम्हालाच विनंती करतो की थोडे अजून खोदकाम करून माहिती पुरवा

जॉनविक्क's picture

17 Sep 2019 - 7:26 pm | जॉनविक्क

काल यूट्यूबवर एक व्हिडीओ पहिला, ज्यात पेट्रोल ऐवजी वैद्यकीय अल्कोहल टाकून एकाने दुचाकी दामटली.

हा ऑपशन कसा वाटतो यावर कोणी प्रकाश टाकेल कांय ?

भंकस बाबा's picture

17 Sep 2019 - 7:45 pm | भंकस बाबा

फार पूर्वी मी एक प्रयोग बघितला होता , येझदी बाइकला केरोसीनवर चालवत असलेला बाबाजी मी बघितला होता. गाडी स्टार्ट करताना पेट्रोलवर करून नंतर केरोसिन चालू करायचे. तशी पेट्रोल टैंकला जोडनी करून घेतली होती त्याने! गाडी सातआठ महीने चालली , नंतर बाबाजी ढगात गेल्यावर घरच्यानी ज्याला विकलि त्याने कंटाळून भंगारात काढली. बाकी बावा दर रविवारी खोलून बसायचा गाडी! गाडीचा एकएक स्क्रू माहित होता त्याला! आम्ही गमतीने म्हणायचो त्यात थोडे डास मारायचे ओषधि टाक , म्हणजे महापालिकेला कळवायला नको डास झालेत म्हणून! जाम धुर सोडायची त्याची गाडी

भंकस बाबा's picture

17 Sep 2019 - 8:04 pm | भंकस बाबा

फार पूर्वी मी एक प्रयोग बघितला होता , येझदी बाइकला केरोसीनवर चालवत असलेला बाबाजी मी बघितला होता. गाडी स्टार्ट करताना पेट्रोलवर करून नंतर केरोसिन चालू करायचे. तशी पेट्रोल टैंकला जोडनी करून घेतली होती त्याने! गाडी सातआठ महीने चालली , नंतर बाबाजी ढगात गेल्यावर घरच्यानी ज्याला विकलि त्याने कंटाळून भंगारात काढली. बाकी बावा दर रविवारी खोलून बसायचा गाडी! गाडीचा एकएक स्क्रू माहित होता त्याला! आम्ही गमतीने म्हणायचो त्यात थोडे डास मारायचे ओषधि टाक , म्हणजे महापालिकेला कळवायला नको डास झालेत म्हणून! जाम धुर सोडायची त्याची गाडी

सुबोध खरे's picture

17 Sep 2019 - 8:09 pm | सुबोध खरे

अल्कोहोल मुळे रबर व प्लॅस्टिकच्या भागांची गास्केट इ गोष्टींची वाट लागते आणि इतर इंजिनच्या भागांना गंज लवकर लागतो.

राजे १०७'s picture

18 Sep 2019 - 6:57 pm | राजे १०७

माझ्या पल्सर गाडीत या अल्कोहोल युक्त पेट्रोलचे पाणी आणि पेट्रोल वेगळे होते. पाणी जड असल्याने रिझर्व्ह लागला की गाडी बंद पडते. वारंवार टाकी कोरडी करावी. पाणी टाकीत जावू नये म्हणून कितीही खबरदारी घेतली तरी हे होतंच.

गाडीचा खप कसा वाढेल हे लक्षात ठेवून वाहन उत्पादक कंपन्या एंजीन वापरतात त्यामुळे संशोधनाचा उपयोग पुढे पोहोचत नाही.

राजे १०७'s picture

22 Sep 2019 - 11:09 am | राजे १०७
राजे १०७'s picture

22 Sep 2019 - 11:12 am | राजे १०७

एकानं पल्सर गाडीचं इंजिन लावून पस्तीस किमी मायलेज देणारी कार बनवली तिची लिंक दिली होती पण दिसत नाही. कृपया संपादक मंडळ हा प्रतिसाद उडवा.

Rajesh188's picture

23 Sep 2019 - 7:44 pm | Rajesh188

पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे ती आता सर्वोच्च आहे.
त्यात वाढ करणे आता शक्य होणार नाही .दुसरे इंधन शोधून त्या वर संशोधन करणे गरजेचे आहे

सुबोध खरे's picture

24 Sep 2019 - 10:41 am | सुबोध खरे

पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे ती आता सर्वोच्च आहे

हे गृहीतक चूक आहे.

कारण घर्षणरहित अवस्थेत तुम्ही एखादी गोष्ट ढकलली कि अव्याहतपणे पुढे जात राहील. जसे अवकाशातील यान पुढे जातच राहते.

म्हणजेच आपण जर दुचाकी लोखंडी रुळावर आणि लोखंडी चाकांवर चालवली तर ती २००-२५० किमी सुद्धा सरासरी देऊ शकेल.

सध्या रस्ते, टायर,क्लच, ब्रेक, वंगण ( किंवा त्याची कमतरता) इ मुळे बरीच ऊर्जा घर्षणाद्वारे फुकट जाते. शिवाय जर इंजिनात जळणारे इंधन जितके जास्त कार्यक्षमतेने जाळता येईल तितकि जास्त सरासरी तुम्हाला मिळवता येईल. सध्या पेट्रोल ची इंजिने २० ते २५ % कार्यक्षमतेने काम करतात. बाकी सर्व ऊर्जा हि उष्णतेच्या स्वरूपात फुकट जाते. हे २० टक्क्याचे प्रमाण नुसते ३० % केले तरी ६०-७० सरासरी देणारी बाईक १०० च्या वर जाईल.

आपण केवळ एकाच पिस्टन इंजिनचा विचार करतो आहोत. वँकेल इंजिन हा एक असा वेगळा विचार होता. तो फार यशस्वी झाला नाही तरी आता हैड्रोजन सेल किंवा इलेक्ट्रिक कार मध्ये रेंज एक्सटेंडर म्हणून परत त्याचा विचार होतोय.

https://en.wikipedia.org/wiki/Wankel_engine

जिज्ञासूंनी वाचून पाहावे

पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे ती आता सर्वोच्च आहे. हे मला मान्य आहे.
त्यामुळेच भारतीय लोक कमीत कमी प्रयत्नात जास्तीत जास्त उत्पन्न जमा करण्याचे प्रयत्न करतात. उदा. ७ आसनी गाडीत १४ जण कोंबणे, ३५०४ प्रवासी नेण्याची क्षमता असणार्‍या लोकल ट्रेन मधे त्याच्या दुप्पट प्रवासी वाहून नेणे, मुंबई च्या एकून क्षेत्र फळात जेव्हढी लोकसंख्येची घनता राहू शकते त्यापेक्षा कैकपटीने अधिक नागरीक राहणे ही सगळी क्षमता वाढविण्याचीच उदाहरणे आहेत.

सुबोध खरे's picture

24 Sep 2019 - 10:46 am | सुबोध खरे

एका काळी वातानुकूलन यंत्रात रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर होते ती जागा आता सर्व रोटरी कॉम्प्रेसरने घेतली आहे.

उद्या अशी स्थिती wankel इंजिन करू शकेल?

इंजिनियर लोक उत्तर देऊ शकतील

डॉ. खरे साहेब, वेंकेल इंजिन, जे वेंकेल या त्याच्या शोधकर्त्याच्या नावावर आहे त्यालाच इंजिनीरिंग भाषेत रोटरी इंजिन म्हणतात . वरकरणी जरी हे इंजिन खूप मोठा चमत्कार (breakthrough) वाटत असले, तरी प्रत्यक्षात तसे नाहीये. त्याचे काही ठळक तोटे आहेत
१. सगळ्यात मोठा तोटा म्हणजे ते इंधन खूप खाते. रेसिप्रोकेटिंग इंजिन आणि रोटरी इंजिन सारख्याच आकाराचे असतील तर रोटरी इंजिनची सरासरी रेसिप्रोकेटिंग च्या निम्मी असेल!!
२. दुसरे म्हणजे, त्याच्यात असलेल्या मूळ त्रुटींमुळे (Design flaws), खूप सारे इंधन न जळताच बाहेर पडते. सारख्या आकाराच्या रेसिप्रोकेटिंग इंजिन आणि रोटरी इंजिनमध्ये, रोटरी इंजिन हे जवळपास दुप्पट प्रदूषण करते
३. या इंजिन मधून जास्ती ताकद (torque) मिळत नाही. जर जास्ती ताकद पाहिजे असेल तर इंजिन मोठे बनवावे लागेल, ते जास्ती जागा खाणार मग ते गाडी मध्ये बसवताना त्रास होणार हे सर्व ओघानेच आले
४. वंगण (lubricating oil ) प्रचंड प्रमाणात खर्च होते (रेसिप्रोकेटिंग इंजिनच्या तुलनेत)
५. जेव्हा गाडीचा वेग हा कमी असतो तेव्हा हे इंजिन नियंत्रित करणे कठीण असते. अशक्य असते असं नाहीये, पण कठीण असते

हे इंजिन वापरणारी माझ्या माहितीत एकच गाडी आहे. Mazda RX-7 त्या गाडीच्या exhaust pipe मधून अक्षरशः आग निघत असते. (कारण अर्धवट जळालेले इंधन!!)
गाड्यांचे जे वेडे लोक आहे (ते petrolheads असे म्हणतात स्वतःला- त्यात मी सुद्धा आहे) त्यांना हे इंजिन प्रचंड आवडते. याचे कारण म्हणजे त्या इंजिन चा सुंदर आवाज.
थोडक्यात हे इंजिन व्यावहारिक नाहीये आणि प्रदूषणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.

सुबोध खरे's picture

24 Sep 2019 - 6:32 pm | सुबोध खरे

मी हे इंजिन हायड्रोजन वर चालवण्याच्या दृष्टीनं लिहिलंय. ज्यात प्रदूषण नगण्य आहे.
बाकी आपण लिहिलंय ते तोटे मी दिलेल्या विकीच्या दुव्यात खाली लिहिलेले आहेतच.

सर्व प्रकारचे घर्षण,हवेचा विरोध,टायर आणि रस्त्या मधील घर्षण,खराब रस्ते हे गृहीत धरूनच विचार करावा लागेल .
गाडी आपल्याला रस्त्यावर चालवायची आहे प्रयोग शाळेत नाही

सर्व प्रकारचे घर्षण,हवेचा विरोध,टायर आणि रस्त्या मधील घर्षण,खराब रस्ते हे गृहीत धरूनच विचार करावा लागेल .
गाडी आपल्याला रस्त्यावर चालवायची आहे प्रयोग शाळेत नाही

सुबोध खरे's picture

24 Sep 2019 - 6:30 pm | सुबोध खरे

बरं बुवा
आपण म्हणता तेच खरं

Rajesh188's picture

24 Sep 2019 - 10:01 pm | Rajesh188

मी बोलतो तेच खरे आहे असे मी नाही समजत.

राजेश मोठा शास्त्रज्ञ माणूस आहे हं. सल्ले मनावर घेत चला हं.

भंकस बाबा's picture

3 Oct 2019 - 9:35 pm | भंकस बाबा

स्वयंपाकाचे वापरलेले तेल वापरून ईंधन बनवायचा प्रयोग सरकार करते आहे. ह्या तेलावर गाड्या धावतील असा दावा केला गेला आहे .
वास्तविक परदेशात हा ट्रेंड फार जूना आहे. तिथे हे प्रयोग झाले आहेत पण ते व्यावसायिकदृष्ट्या नाही , हा प्रयोग जनतेला बरोबर घेऊन संपन्न होणार आहे

भंकस बाबा's picture

18 Oct 2019 - 8:39 pm | भंकस बाबा

तुम्हाला उद्देशुन हा प्रतिसाद टाकत आहे.
पुण्याच्या सिम्बोयसिस या संस्थेमधे एका युवकाने जवळजवळ 250 किमी प्रतिलीटर धावणारी स्कूटर बनवली आहे. पण ही स्कूटर पारंपारिक इंजिन वापरून नाही तर त्याबरोबर बैटरी वापरून चालवली जाते. या शोधाच्या पेटंटसाठी पण अर्ज गेला आहे.
टाटा पुढच्या वर्षी एका चार्जमधे 300 किमी धावणारी चारचाकी गाडी बाजारात उतरवत आहे, जिची किंमत 12 ते 15 लाख आहे. ही गाडी 60 मिनिटात 80% चार्ज होईल.
सांगण्याचा मुद्दा असा की आता तेल कंपन्याचे तेल निघणार आहे. जऱ टाटाच्या गाडीच्या संलग्न गाड्या निघाल्यास उद्या ज्या लॉबिने संशोधन दड़पले होते तीच लॉबी असे संशोधन बाजारात उतरवण्यास पुढे येईल कारण 100चा एवरेज देणारी पेट्रोल गाड़ी तुलनेने 300 चा एवरेज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार पेक्षा स्वस्त असेल

भंकस बाबा's picture

18 Oct 2019 - 8:39 pm | भंकस बाबा

तुम्हाला उद्देशुन हा प्रतिसाद टाकत आहे.
पुण्याच्या सिम्बोयसिस या संस्थेमधे एका युवकाने जवळजवळ 250 किमी प्रतिलीटर धावणारी स्कूटर बनवली आहे. पण ही स्कूटर पारंपारिक इंजिन वापरून नाही तर त्याबरोबर बैटरी वापरून चालवली जाते. या शोधाच्या पेटंटसाठी पण अर्ज गेला आहे.
टाटा पुढच्या वर्षी एका चार्जमधे 300 किमी धावणारी चारचाकी गाडी बाजारात उतरवत आहे, जिची किंमत 12 ते 15 लाख आहे. ही गाडी 60 मिनिटात 80% चार्ज होईल.
सांगण्याचा मुद्दा असा की आता तेल कंपन्याचे तेल निघणार आहे. जऱ टाटाच्या गाडीच्या संलग्न गाड्या निघाल्यास उद्या ज्या लॉबिने संशोधन दड़पले होते तीच लॉबी असे संशोधन बाजारात उतरवण्यास पुढे येईल कारण 100चा एवरेज देणारी पेट्रोल गाड़ी तुलनेने 300 चा एवरेज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार पेक्षा स्वस्त असेल

गोंधळी's picture

20 Oct 2019 - 3:03 pm | गोंधळी

पाणि, हवा व धातु (aluminium & graphene) चा उपयोग करुन वाहन चालवण्यावर एक स्टार्टअप कंपनी संशोधन करत आहे.
ह्यामध्ये बॅटरी चार्ज करण्याची आवश्यकता नाही तर पाणि व मेटल प्लेट बदलावी लागणार आहे व बॅकप १००० किमी असणार आहे.
पण बॅटरी साइज खुप मोठी आहे. अर्थात अजुन संशोधन चालु आहे. बघु पुढे काय होत.

https://www.youtube.com/watch?v=1DZY7xXaHxI