शांतरस

कविता पिंपळपान

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
1 Jul 2019 - 3:24 pm

कविता सुचत नाही
मन ही रितेच काही
लिहू काय? म्हणता म्हणता
सापडले ओले पान.
ही कविता पिंपळपान!

थेंब थेंबा जाग आली
रेष रेषा बोलू लागली
ना लिहिता आले कैसे
मज लेखणिस भान?
ही कविता पिंपळपान!

हे असेच असते सारे
ना सुचता हलते वारे
पाचोळा नसता कोठे
गर्द जागे होते रान
ही कविता पिंपळपान!

घरट्याच्या अवती भवती
पाऊस थेंबांची गर्दी
मी मिटून घेता दारे
पाऊस करी मूकगान
ही कविता पिंपळपान!

शांतरसकविता

असा पाऊस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
30 Jun 2019 - 11:37 pm

नभातून पडावा पाऊस
मनात उतरावा पाऊस

धरतीमध्ये थेंब थेंब
रुजवावा पाऊस

झाडांवरल्या थेंबातूनी
झरावा पाऊस

कौलांच्या पागोळ्यांतूनी
ओघळावा पाऊस

हातातल्या ओंजळीत
पकडूनी प्यावा पाऊस

अधिर ओठांचा स्पर्शाने
हलकेच चुंबावा पाऊस

ललनेच्या केसांतूनी
झटकावा पाऊस

गावा पाऊस घ्यावा पाऊस
पाऊस घेवून आपणही व्हावे पाऊस

- पाभे
३०/०६/२०१९

शांतरसकवितामुक्तक

आभाळ पक्षी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
25 May 2019 - 12:04 pm

आभाळानं द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी
धरतीनं जागा द्यावी
झाडांची आई व्हावी
झाडांनी सावली द्यावी
पक्षांची घरटी ल्यावी
पक्षांनी पंख पसरावे
आभाळात विहरावे
आभाळाने द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम)
२५/०५/२०१९

Nisargशांतरसकवितामुक्तक

माझे मन पाही

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
10 May 2019 - 8:06 am

माझे मन पाही विठ्ठल मुर्ती
सावळां विठ्ठल उभा पंढरीसी ||१||

नाही मज वेळ जाण्या राऊळा
नच पूजा केली कधी काळां ||२||

रमलो संसारी विना विचार
भाव भक्तीचा केवळ उपचार ||३||

नमस्कार केला दोन्ही कर जोडूनी
पाषाण भेटला उराउरी दुरूनी ||४||

०९/०५/२०१९

अभंगविठोबाविठ्ठलशांतरसकविता

(दाराआडचा यजमान)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
26 Apr 2019 - 7:59 pm

एक यजमान दाराआडून (नेत्रछिद्रातून)बाहेर बघतो
किती बाहेर?
दाराच्या बाहेर, जिन्याच्या पार
जिथे एक अनाहुत आला असेल बहुदा ....
असेल का तो अनोळखी, का बघून ओळख न दाखवणारा ?
येत असेल का तो ही
आप्तांच्या घरी , बिनकामाचा कुणाकडे?
यजमान दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
(पेपरातील बातम्या आणि माणसूकीची फसवणूक मानेवर जख्ख बसलेली असते)
मग तो कल्पनेचे पंख पसरतो,
त्या पंखावरुन अलगद फिरुन लेकरांना, मित्रांना भेटून येतो डोळे मिटून घेऊन
यजमान शांतपणे खुष राहतो....
दूरदेशी लेकरे आपल्याच जगात

मुक्त कवितारतीबाच्या कविताशांतरसनाट्यमुक्तक

पाणी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
19 Apr 2019 - 6:27 am

इतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना
विचार करायचा देवा,

पाण्याला इतके झोके देताना
उसंत घ्यायची देवा....

उसळून पुन्हा आदळते पाणी
खडक द्यायचा देवा...

दोन डोळे पुरत नाहीत
पाण्याचा संसार पेलताना...

देवा, आता पाण्याचे तीर्थ करा
अन् पाण्यातून मुक्ती द्या....

शिवकन्या

कविता माझीकालगंगाभावकवितामाझी कवितासांत्वनाकरुणशांतरसकवितासाहित्यिकजीवनमान

खिंड बोगदा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
6 Apr 2019 - 12:58 pm

खिंड बोगदा

या डोंगररांगा निघती
माझ्या घराच्या पुढती
किती बघावे उंचावूनी
नच कोणत्या वाटा दिसती
अनामिक भिती मनात असे
वर जावे की खाली यावे प्रश्न मनी वसे
केवळ एकच खिंड बोगदा
लांबून दिसे कुणी खोदला
एकदा जावे वाटते त्यातूनी
वाट परतीची येई का तिथूनी?

पाषणभेद
०६/०४/२०१९

अद्भुतरसशांतरसकविता

कोळीगीत: शिडाशिडात भरारे वारा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
3 Apr 2019 - 7:10 am

आता देशावरून आपण कोकणात जावूया अन एक कोळीगीत ऐकूया.

शिडाशिडात भरारे वारा
होड्या निघाल्या किनारा || धृ ||

फिरवा सुकाणू सारी जाली भरली
मांदेली नगली करली तारली गावली
गोळा करुन घोळ चिंबोरी अन पाला
होड्या निघाल्या किनारा ||१||

घेवून दर्याची दौलत हाती
विकून होईल कमाई मोठी
पडो शिल्लक पैसा थोरा बरा
होड्या निघाल्या किनारा ||२||

उभी आसलं माझी बाय पाहत वाट
"कवा येईल धनी माझा परतून आज"
तिच्या कालजीचा आज होईल उतारा
होड्या निघाल्या किनारा ||३||

शिडाशिडात भरारे वारा
होड्या निघाल्या किनारा || धृ ||

शांतरसनृत्यकविताकोळीगीत

बसणं हे निमित्तमात्र

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
30 Mar 2019 - 10:47 am

लई दिसानं आस्ला कच्चा माल घावला: छटाक, आतपाव, पावशेर, अर्धाशेर.

वरल्या मापात घेतला आन फायनल प्राडक्ट पाझीटीव केल्यं. घ्या.

शांतरसविडंबन

(तनुने नानास मी टू म्हणणे )

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
3 Jan 2019 - 12:41 pm

पेरणा अर्थात

तनुने नानास मी टू म्हणणे
रसिकांच्या मनी अदम्य लवथव
पडद्यावरचे विश्व विभ्रमी
कल्पिताहुनीही अद्भुत वास्तव

नटसम्राटासही क्षुद्र ठरविते
असीम व्याप्ती मिडीयाची
लाईक डीस्लाईक मोजुनी थकती
व्हॉटसाप ट्विटरच्या थिट्या मिती

हलकट स्पर्शी फोडा मुस्काट
जागेवराती लंपटाचे
मौन रहाणे अनेक वर्षे
विणती जाळे संशयाचे

पैजारबुवा,

Biryaniकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडशांतरसबालगीतविडंबनशुद्धलेखनऔषधोपचारकृष्णमुर्ती