शांतरस

( वरपरीक्षा )

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
31 Mar 2017 - 11:54 pm
mango curryअदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीइशाराकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडछावाजिलबीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीसांत्वनाहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसधोरणमांडणीवावरसंस्कृतीइतिहासवाङ्मयमुक्तकविडंबनशब्दक्रीडासमाजजीवनमानऔषधोपचारमौजमजा

शांत समय अन्...

Pradip kale's picture
Pradip kale in जे न देखे रवी...
19 Mar 2017 - 5:22 pm

शांत समय अन् एकांत किनारा, हेच माझे सोबती
न लगे मग दुजे कुणी, न प्रेयसी न कुठली नाती

धीर गंभीर स्वरांमधुनी तो, गुज सांगे मज कानी
अन् प्रत्युत्तरामधे घेऊन जाई,
माझ्या कविता आणिक गाणी

शांततेच्या गुढ उदरी दिसे, निशब्द मनाची वाट
उलगडी ती मज समोरी, गत आठवणींचा पट

ध्यानस्त बैसले मन, ध्यानस्त तो काळ
पण कळले नाही मजला, कशी गेली अत्तरासम वेळ

दिस सरला, वेळ सरली ; सुर्य अस्तासी निघाला
अस्त त्याचा तो इथला, पण जन्म असे तो पलिकडला

असेच सारे विचार छळती, आज का हे मज एकांती
बुडुन जातो सुर्यासह मी, पुन्हा उगवण्या नवीन जगती

शांतरसकविता

अष्टावधानी

भटकीभिंगरी's picture
भटकीभिंगरी in जे न देखे रवी...
8 Mar 2017 - 3:37 pm

लोण्याहुन मुलायम कठोर वज्राहुन !
स्त्री हे खरोखर अजब रसायन ! !

दुर राहिलेल्या आपल्या घरात!
भुकेने रडणार्‍या पिलाची आठवण येउन ,
कड्यावरुन स्वत:ला झोकुन देते !
तीचे मातृप्रेम खरेच अनुपम !!

स्वत:च्या बाळास बांधुन पाठीवर !
खंबीरपणे स्वार होते घोड्यावर !!
पराक्रम करते युध्दभूमीवर !!!
तीची विरश्री करते चकीत ! ! ! !

परदेशातील कडाक्याच्या थंडीत !
ज्ञानसाधनेची उपासना करीत ! !
भारतातील पहीली डॉक्टर होते ! ! !
तीचा निश्चय करतो अचंबित ! ! ! ! !

शांतरससंस्कृती

विमान

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
5 Mar 2017 - 1:15 pm

विमान असते धावत जेव्हां, वाटे जीवनी सर्व मिळावे
उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे जीवनी गुपित कळावे

विमान असते धावत जेव्हां, हद्द होते सरहद्दींची
उंची गाठतो, कळते तेव्हां, हद्द एक गोल पृथ्वीची

विमान असते धावत जेव्हां, वैभव मागे सरकत असते
उंची गाठतो, कळते तेव्हां, वैभव डोंगर द-यात असते

विमान असते धावत जेव्हां, आपुले जग आपुले असते
उंची गाठतो, कळते तेव्हां, आपुले जग आपुले नसते

विमान असते धावत जेव्हां, काळ मागे मागे जातो
उंची गाठतो, कळते तेव्हां, काळ मागे मागे येतो

शांतरसकविताजीवनमान

राउळी या मनाच्या

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
2 Mar 2017 - 2:28 pm

ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html

a

राऊळी या मनाच्या
वृत्तः भुजंगप्रयात

जसा चंद्र हा या महाली नभाच्या
तशी ती वसे राऊळी या मनाच्या

तिला काढिता घोर अंधार दाटे
स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या

मराठी गझलशांतरसकवितागझल

ती एक वेडी

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
22 Jan 2017 - 5:26 pm

ती एक वेडी
जुन्या आठवणींचा कोष
मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी
एक दिवस तिच्याही नकळत
हा कोष जाणिवेत आला
बघता बघता त्यातनं
एक सुंदर फुलपाखरू निघालं
तिच्या तळहातावर अलगद बसलं
अगदी विश्वासानं
ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली
त्याची ओळख पटवू पाहू लागली
हळूच त्याने पंख मिचकावले
तिला वाटलं
ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे
ओळख पटली
ती हसली
तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं
त्याच्या रूपानं हरखून गेली
जुन्या आठवणीत हरवून गेली
एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताशांतरसकलाकविताप्रेमकाव्यमुक्तक

मुळांनी धरू नये अबोला

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Dec 2016 - 2:40 pm

मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये
त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात

आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये
जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात

घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये
मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात

जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये
वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात

इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये
उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे?

- संदीप चांदणे

कविता माझीशांतरसकवितामुक्तक

गोंधळ

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
4 Dec 2016 - 6:02 pm

दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड

नाशिबाचा फेरा कोणा चुकला
कर्माची फळं जीवाच्या पदरा
तुझ्या कृपाळु नजरेचा भुकेला

दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड

पैशाचा भुकेला मनुष्य जाहला
नात्याच्या भुकेला शोष पडला
वेळेअभावि एकटा पडला

दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड

तुझ्या दारी कोणी वेगळा नाही
चरणी तुझ्या जीव धन्यच होई
बये घे पदरी... हे करुणाई

शांतरसमुक्तक

वास्तव

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Dec 2016 - 8:21 am

पोचले कोणी तिथे स्पर्शून ते चंद्रास आले
उंबऱ्याने बांधलेले शेकडोंनी 'चंद्र' येथे ...
झुंजले काळासवे ते मृत्यूसही जिंकून गेले
'मी'पणाने जिंकलेले शेकडोंनी 'इंद्र' येथे ...

जोखडाचे हार आम्ही माळलेले मस्तकावर
कस्पटासम देह तरीही वाटते भीती जराशी
आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा
ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी'

माणसा रे माणसा, जाणून घे नियती स्वतःची
जात-धर्म, प्रांत-भाषा हीच परिमाणे जगाची
माणसाची जात कोणा ओळखू ना ये कधीही
मान टेकावी जिथे ती असे पोळी सुळाची

विशाल...

करुणशांतरसकविता

!! रात्र जिवलग सखी जाहली !!

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
1 Dec 2016 - 3:42 pm

शांत गूढ रात्र उशाशी,
नील व्याप्त गगन छताशी,
नेत्र टिपत असे नक्षत्रे तेव्हा,
झुळूक देत असे त्रास जराशी !!

रातराणीचा स्वैर विहार,
सुगंध दरवळे मज श्वासाशी,
मोहक वारे बिलगून अंगी,
खळी पडत असे मज गालाशी !!

राहिले बरेच तसेच तिथेच,
येऊन थांबले बहू ओठांशी,
माझ्या मनातले अबोल गाणे,
थेट भिडत असे उंच नभाशी !!

रात्र जिवलग सखी जाहली,
दडून बसली माझ्या उराशी,
उजेड मारी सुरुंग प्रभाती, ------(सकाळचा प्रहार)
पण त्यासही मिळे ना ती तळाशी !! ---- ( ती म्हणजे रात्र , मनाच्या तळाशी)

शांतरसकविता