आबा (क्रमश)

शेवटचा डाव's picture
शेवटचा डाव in जनातलं, मनातलं
22 Aug 2017 - 8:01 pm

आतापर्यंत 'आबाा' यांंचावर बरच लिहल गेलय पण हे जरा वेगळ आहे चार भाग लिहतोय
त्यातील भाग एक
तिन्ही बंगल्यांच्या म्होर वावरात आबा बशेल व्हता
मन भरुन बंगले पाता पाता आबाला हुंदका आला आन आबान माग वळुन पाह्यल तसा आबा भूतकाळाच्या गर्द झाडीत शिरला
      "दादा य दादा"
दिगु न त्याच्या मोठ्या भावाला हाक मारलि
" काय झालर दिग्या "
विहरी जवळ गेलेल्या पुरुषोत्तम दादा ने वो देत प्रश्न केला
"आर पंकु बेसुध झालीय अन आबा अन भागु तिला दामुनानाच्या  बैलगाडी त घेऊन वैद कड नेताल "
 दादान सायकला टांग मारली अन तडक वैद्या कड गेला
पंकुला घेउन आबा आला च होता
दादान पंकुला ऊचलल अन वैद्या समोर नेल
तस वैद्य बोलला
"काय खालेल दिसत नाही हिने त्यामुळे अशक्त पणा आलाय "
तोच दादा बोलला "कायर आबा ईन काय खाल का नाय "

आबा   "घरात दानापण नाय , आय गेली व्हती सकाळच्याला (.....)च्या घरला थोड जोंधळ आणयास्णी पण त्यो (.....)  राव काहबाय बोलाया लागला अन आयला त्यान हाकलली"

वैद्यानी भुंगी हुंगवली अन पंकी जर सुधावली
दोन पैशे दादान वैद्यास्णी दिल .
"ईला जरा चांगले खायला दे आणी पिण्यासाठी रस दे"

"व्हय मालक "
तसा दादा सगळी प्रजा घेऊन झोपडीवर गेला

"आये आये "
"कायर पोरानो पंकी सुधावली का नाय "

"व्हय सुधली हाय तु त्यो देवघरातला चांदीचा रुपा दे "

"नग नग त्यो देवाच हाय यळाला ऊपाशी मरु पर तुला त्यो ईकु द्यायची नाय "

पर आयकल त्यो दादा कसला सोता मधी गेला अन रुपा काढुन गावच्या दिशेन चालु लागला
अन सराफाकड रुपा सरकवत
"किती देसाल याच "

"आठ आणे देईल या रुप्याचे तुला "

"जराक वाढवाकी मालक लय नड हाय "

"अरे पुरुषोत्तमा धंदा खुप मंदीत चालु आहे रे पण तुला म्हणून साठ पैसे देतो"

"मालक दिड रुपयाचा हाय तो "

एक मिश्किल हसी देत सराफ "अरे वा तुला तर सगळेच भाव माहीती हाय मग तुच का नाही दुकान खोलत "

"काय थट्ट करताय मालक"

"बर बर ठिक आहे आता तुला शेवटच सांगतो बाराआणे देईल तुला द्यायचा तर दे नायतर जा बर "

दादा बाराणे घेऊन दुकानात गेला तेथुन बजार घेऊन घरला गेला
आयन खायला बनवल पोर तुटुन पडले दादा पाड्याला पाट लाऊन बसला व्हता कायीतरी ईचार करत व्हता
"दिग्या तु उद्यापसुन साळात जायच नाय आबा तु पंकुला अन भागीला साळात पाय पाय घयुन जायच "दादा बोलला
तस दिगु अन आबा आय कड पाहुन तक्रारी करायला लागले
"आय म्या साळात जाणार हाय" दिगु

"आय म्या पायपायी साळात जाणार नाय मायि सायकल घेऊन जाणार " आबा

"कुणीबी कायी बोलयाच नाय उद्याकड मि आन दिग्या शिंद्र्याला कामाला जाणार हाय , सायकलीन तिकड कांद्याची गाडी भराया चाराणे , तिस पैस असा रोज हाय किश्या  तिकडच हाय शेट कड काम मिळुन देणार हाय इकाडल्या रोजराजीत भागत नाय " दादा बोलला

"पर दिग्याला जमल का त्य काम" त्यांची आई सरुबाई बोलली

"आये जमाव लागल नायतर साळा बंद वहीन या पोरांची अन ऊपासमार यगळी " दादा बोलला

शेव घेऊन सुका आला
"पोरानो शेव खाकी "

"काय घमासा वास येतुय आजच्याला परत ढोसुन आलायका तुम्ही ईथ पोराबाळास्नी खायाला नाय तुम्ही  ढोसुन आलाय "सरुबाई चवताळून बोलली

"म्या माया पैशाची पितु कोणाच्या बाच काय जातय"
तावातवान सुखा बोलला

आता यांच भांडण काय मिटत नाय हे जाणून पोर जागीच कलांडली अन दादा आंगणात येऊन पडला वर निरभ्र आकाशात बघु लागला
दादा ऐन सतरा वर्षाचा तरुण पण आयुष्यात अठरा विश्व दारिद्र्य, त्याच्या पाठोपाठ  ,दिगंबर (दिगु), भागीरथी(भागु)  .पंकजा(पंकु) आबा हे बहिन भावंडे , आई बाबा सगळ्यांची जबाबदारी पुरुषोत्तम दादावर .घरची बिघाबर जमीन तिही निट पीकायची नाही .थोडीफार दुसर्याची जमीन सरकतीने घेयेल व्हती तिही  कधी पैसै व्हायचे कधी नव्हते होत .मग दादा मिळेल ते काम करून घरचा ऊदर निर्वाह करायचा .
      दुसर्या दिवशी सकाळी दिगु अन दादा कामावर गेले .
सायंकाळी कामावरुन घरी येताना रामदास भेटला
"अय पुरुषोत्तम जराक तुझाकड काम हुत "

"बोल नाना काय काम हुत "

"आर म्हंटल मि आहे कामाला मुलही जिल्याला शाळेत असतात तर आपली जमिन करतो का सरकती "

"सांगतो आयला ईचारुन "

"बर ठिक आहे सकाळी वाड्यावर ये "
रामदासने दादाच्या नजरेतील चमक हेरली व आपले काम होणार या निश्चयाने निघाला
दादा जरा खुश होता कारण रामदास ची जमीन म्हणजे दोन  विहरी त्या पाणी मुबलक असलेल्या . दोन पाण्याचे ईंजीन मग मोट हाकायचा प्रश्न येणार नाही. अन सात एकरचा एकच गट .
     आनंदाने घरी दादा गेला
"आय चा टाख मला अन दिगुला "
"हो टाखते पोरानो दमुन आले हाय "
"आये रामानाना भेटला व्हता जमीन करतुका ईचारीत व्हता " मग काय सांगितल त्यास्नी "आय चहा देत बोलली
"तुला ईचारु मग सांगतो म्हटल "
"घे करुन रामदास नाना माणुस लय चांगला हाय "

रात्री दादा आनंदात झोप ला सकाळी वाड्यावर जाऊन नानाला होकार देऊन नाना सोबत त्यांच्या शेतावर आला
शेतीवर कर्ता कोणी नसल्यामुळे शेतीची दैना झाली होती
दादान नानाच्या मदतीने बैलाची व्यवस्था करत दिगु कड औतफाटा देउन तो स्वता कामावर जायचा.
      शेतीवर पिक घेतली तसी दादाची दिगुची अन आई  यांची दगदग वाढली कामाचा व्याप वाढला .कांदा चांगला पिकवला होता। .तसेच थोडेफार टोमॅटो लावले होते काही गहु थोडीफार तुर , भुईमूग, कुळीद अशी पिक घेतली
टोमॅटो ने जेमतेम खर्च सोडवला पण कांद्यानी शेट ओळखीचा असल्याने बरे केले ,गहु असल्याने घरात खायचा प्रश्न सुटला होता.
   आयन दादाच लगीन करायच ठरवल .पण दादा पहिल भागुच लग्न करायचा म्हणत होता . मग पर्याय म्हणून दोघायचंही लग्न करायच ठरवल तशी शोधाशोध सुरू झाली. जवळच्या नात्यात असलेली ऊमा तशी शरीरान काटक तशी जिभेनेही काटक पटकन मनात आल की बोलुन जाणारी तिच दादाच लग्न झाल . ईकडे भागुच भाग्य गंगाधर कडे घेऊन गेल .
     दादाच लग्न झाल अन शेतीत दिगुला ,प्रंपच्यात दादाला अन आयला घरकामात मजबुत साथी दार भेटला .सगळ्या कामात चुणचुणीत असणारी ऊमा बोलन्यात ही चुणुक , शेतात दिगु आई ऊमा रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करत दिवसोदिवस भरभराटीचे दिवस आणत
तिकडे दादा अन किश्या दोघच अर्धा तासात सोळाचाकी कांध्याचा गोणीने लोड करत .शेट चे विश्वासु मुणीम बनले .
दादा दोन मुलांचा बाप बनला . सगळे च कष्ट करत आनंदाने जगत होते . त्यांचा बाप ही मुलांच कर्तुत्व बघुन सुधारला होता . . बाप ही सात आट जनावर संभाळायचा
आता दादान पंकुच अन दिगुच लग्न करायच ठरवल पंकुला मुंबईच स्थळ आल लगेच ऊरकुन टाखल .
    अन या पोरांची प्रगती बघुन मामा नी त्याची पोरगी " सुवर्णा " च लग्न दिगु बरोबर लावुन दिल . कामात जोम वाढला दिगु जरा रागीट कामत ,व्यवहारात आजिबात खोट त्याला चालत नव्हत . घरातल्या सगळ्या बाईमाणूस त्याला घाबरुनच राही .
   दादान घर बांधायचा विचार केला , आबा मॅट्रिक ला गेला होता त्याला भल्याबुर्याची ,दुनियादारीची बरीच समज आली होती त्यान दादाच्या घरबांधणी प्रस्तावाला थोड थांबुन गावात चार एकर जमीन विकन्यास निघाली आहे ती विकत घेऊ असे सुचवले व पटवुन दिले , दादालाही त्याचा प्रस्ताव पटला .
  सहा हजार रुपयांना चार एकर जमीनीचा व्यवहार झाला .
पन दादा कड फक्त चार हजार रुपयेच होते . मग उरल्या पैश्यांची मदत किश्या अन नाना नी केली  पहिल्यांदाच दादानी अस कोणाकडून कर्ज घेतल होत .कच्च साठेखत करुन दादांनी ति जमिनी कसायला सुरवात केली होती. ज्या व्यक्ती कडुन जमीन घेतलेली होती त्यो गोपाळ .गोपाळच्या  मुलीच लग्न होत , लग्न झाल्यावर पक्के खरेदीखत करुन घेउ अस दोन्ही कडुन ठरल .गोपाळनेही जोमात लग्न करुन दिल नंतर खरेदी करण्याआगोदर गावातील चांडालचौकडीने व गोपाळच्या भावकीतल्या लोकानी त्याचे कान भरवले "गड्या येव्हड्या सस्तात कुठ जमिन देतात का "  गोपाळ ला सांगितले पण गोपाळ "आता झाली जमीन त्यांची त्याना साठेखत करून दिलय "  अस सांगितल ..."आरे साठेखत दिलय पण खरेदी नाय झालीना आम्ही आहोत सोबत ते कशे ताबा घेत्यात ते बघुच आपन "भावकीतले लोक अस म्हणून गोपाळ ला फितवल आन सगळे मिळून दादाला जमीन घुसु द्यायला आडवे आले . दोन्ही बाजूने मारामारी झाली .आता आबान कोर्टात जायच ठरवल पण जमीनीचा ताबा घेऊन .तडक आबा शहरात गेला नाना ना सगळ्या घडित घटना सांगितल्या .नाना स्वता येऊन गोपाळ ला समजून सांगितले पण गोपाळ नानांच काहीच ऐकून घेत नव्हता .आबा शिक्षणरुपी वाघीणििच दुध पिऊन खर्या अर्थाने कुटुंबसाठी काहीतरी करायला निघाला .पण समोरच आव्हान काही छोट नव्हत कोर्ट ,पोलीस ,राजकारणी यांच्याशी पहिल्यांदाच भेट घ्यायला निघालेला आबा स्वभावाने शांत तेव्हढाच हुशार होता स्वताची जमीन मिळविणच या विचाराणे निघालेेले आबा ............
    क्रमश........

कथामुक्तकसमाजजीवनमानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणविचारसमीक्षालेख

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

23 Aug 2017 - 6:01 pm | संजय पाटिल

चांगलं लिहीलय...
पु.भा.प्र.