मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 11:42 pm

दिलखेचक! रापचिक! धमाल!
हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा!
सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला.
Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली.
मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला.
मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला.
फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती!
शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो -
जे कट्ट्याला आले त्यांना सलाम!
जे नाही आले त्यांनाही सलाम!
जे वेळ काढून आले त्यांना सलाम!
जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम!
लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम!
या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम!
आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!

हे ठिकाणवावरसमाजराहणीमौजमजाप्रकटनविचारबातमीअनुभव

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

3 Jul 2016 - 11:47 pm | पद्मावति

वाह! क्या बात है! मस्तं वृत्तांत.

जव्हेरगंज's picture

3 Jul 2016 - 11:53 pm | जव्हेरगंज

+१

भारी लिहीलाय वृत्तांत!!!

खटपट्या's picture

4 Jul 2016 - 12:37 am | खटपट्या

फोटो टाका लवकर. नायतर कट्टा आभासी समजणेत येइल...

नूतन सावंत's picture

4 Jul 2016 - 8:28 am | नूतन सावंत

विरुभौ,कट्टा म्हणजे आभासी जगातल्या व्यक्तिरेखा खऱ्याखुर्या असल्याचा अनुभव घेणे.

महामाया's picture

4 Jul 2016 - 12:41 am | महामाया

मस्त...

पिलीयन रायडर's picture

4 Jul 2016 - 4:09 am | पिलीयन रायडर

मस्त!!!

फोटो पाहिलेतच, आता ओळख परेड होउ दे!

असंका's picture

4 Jul 2016 - 8:06 am | असंका

सलाम साहेब..सलाम!!

खरोखरच महाकट्टा झालेला दिसतोय !

फोटोसाठी धीर धरलेला आहे...

नूतन सावंत's picture

4 Jul 2016 - 8:24 am | नूतन सावंत

ओ बोक्याभौ आमचं मीरारोड विसरले बघा तुम्ही.नि आपलं शिवाजीपार्कपण विसरले.ते आधी समाविष्ट करा.बाकी फुरसदीत.

चिंचवडहून मी, गणामास्तर आणि गावडे सर निघालो ते ८ वाजता. धुव्वांधार पाऊस चालू होता. घाटात वातावरण अगदी तुफ्फान होतं. चोहोंबाजूंनी ढगांनी वेढून घेतलं होतं. धबधबे अक्षरश: कोसळत होते, ओहोळ फ़ुफ़ाटलेले होते. लोणावळ्यात एके ठिकाणी मिसळ खायला थांबलो तो एक वेगळाच किस्सा. :)

साडेआकाराच्या आसपास वाशीत पोहोचलो. NMSAच्या आवारात येताच कंजूसकाका येताना दिसले. रिसेप्शनपाशीच श्री व सौ पाटील व सुरंगीताईंची भेट झाली. पाटलांबरोबर NMSA हिंडून पाहिलं. खूप छान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते.

एकेक कट्टेकरी हळूहळू येत गेले मग काय गप्पांना बहार नुसता. प्रासदादाला जवळपास ३ वर्षांनी भेटून खूप आनंद झाला. पुण्यातली चांगली नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय करू लागलेल्या पिंगूची भेट झाली. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
कंजूस काकांसोबत लवकरच विसापूर भटकंतीचा बेत ठरला.

अजया, बोकेश, टका आणि श्री. विकास पाटील ह्यांचे नेटक्या आयोजनाबद्दल ख़ास कौतुक आणि आभार्स.

बऱ्याच सदस्यांशी पहिल्यांदाच भेट झाली.

एकूणातच मिपाकर्स - यु मेड माय डे. :)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2016 - 9:10 am | अत्रुप्त आत्मा

आगोबा आला , पऩ पांडू नै आला.
तरी कट्टा छान झाला! =))

पांडू नै आला म्हणून तुम्हीही नै आले तरीही कट्टा छान झाला.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2016 - 2:32 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/playful/baby-pulling-out-long-tongue-flap-smiley-emoticon.gif

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 2:54 pm | टवाळ कार्टा

नेहमीच्या स्मायल्या जौन बाळाच्या स्मायल्या आल्यात असे एक निरिक्षण

बोका-ए-आझम's picture

4 Jul 2016 - 9:10 pm | बोका-ए-आझम

स्वानंदी स्वानंदी म्हणतात ती हीच काय? ;)

बॅटमॅन's picture

12 Jul 2016 - 1:13 am | बॅटमॅन

अच्रत बव्लत कुथ्ल

लोणावला सोडल्यावर गनामास्तरने अचानक गाडी उजवीकडे एका छोट्या रस्त्यात टाकली. आम्ही इकडे कुठे चाललो आहोत असे विचारले तर म्हणाला, चला तर. पाचेक मिनिटांचा एक चढ चढल्यावर आम्हाला दिसली

asdf

आम्ही तिथे मागवली

asdf

मिसळ इतकी अफलातून होती की आम्ही त्यांना म्हटले की तो आधीचा छोटा फलक तुमच्या मिसळीला न्याय देत नाही. मग त्यांनी आम्हाला मोठा बोर्ड दाखवला

असदफ

चौकटराजा's picture

4 Jul 2016 - 10:13 am | चौकटराजा

कालच टी व्ही वर पुण्यातला पाउस दाखवला त्यात सिंहगड रोडला " पांडूची मिसळ " असा बोर्ड पाहिला !

किसन शिंदे's picture

4 Jul 2016 - 10:32 am | किसन शिंदे

=)) =)) =)) =)) =))

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 10:53 am | टवाळ कार्टा

ठ्ठो आणि ठ्ठो =))

पांडूची मिसळच की अजून काही?

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2016 - 11:10 am | अत्रुप्त आत्मा

माझी मिसळ केलीत क्काय मेल्यांन्नो! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif
थांबा अता बघतो एकेकाकडे! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/angry-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

शान्तिप्रिय's picture

4 Jul 2016 - 8:33 am | शान्तिप्रिय

जबरदस्त कट्टा.
फोटो ची वाट पाहातोय

बोका-ए-आझम's picture

4 Jul 2016 - 9:19 am | बोका-ए-आझम

सर्व हौशी फटूग्राफरांनी क्लिकवलेले फटू इथे लवकर पेष्टवावेत ज
ही णम्र विणंती!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2016 - 9:27 am | डॉ सुहास म्हात्रे

चाsssळीस मिपाकर ?! फारच जंगी कट्टा झालेला दिसतोय असावा...

"दिसतोय" असे फोटो पाहिल्यावर म्हणण्यात येईल ! ;) :)

अजया's picture

6 Jul 2016 - 2:00 pm | अजया

.

डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री
.
.

डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे
.
डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे

.
.
.
.
.
.
गॅरीभौ आले एकदाचे!(दरवाजापाशी)
.
.

अनाहिता आणि लाडोबा!

.

फोटो क्र.१
डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री
फोटो क्र ३
डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे
फोटो क्र,४
डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे

नाखु's picture

4 Jul 2016 - 1:04 pm | नाखु

आवडलाच पण हा शेवटातला फोटो खास..

लाडोबा पळण्याच्या तयारीत असल्याचा अविर्भाव का ब्रे घेतला असावा?

नेमकी त्या दिवशी मुलाची आंतरशालेय स्पर्धा असल्याने (आणण्याची सोडण्याची जबाबदारी असलेने येता आले नाही) तरीही अत्यंत मोकळ्या मनाने रा रा वल्ली,सगा आणि गणामास्तराम्नी येताना धावती भेट घेतली व कट्टा जोरर्दार झाल्याचे कालच कळविले.

यशस्वी कट्ट्याबद्दल दोडोबासहीत सर्व स्वय्म्सेवकांचे अभिनंदन.

अवघा हल्कल्लोळ करावा
मिसळपाव धर्म जागवावा हेच खरे !

वाचकांची पत्रे मधून नाखु

फोटोंतील व्यक्तींची नावे त्या-त्या फोटोखालीच दिल्यास बरे पडेल. मोबाईलवर सारखं वर जा - खाली ये असं स्क्रोल करावं लागतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2016 - 12:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाच फोटो टाकून व्यवस्थित लिहावं लागतं बहुतेक.

खाली कंजूसकाकांनी दिलेल्या फोटोंतील क्रम व तुमचा क्रम यात थोडी सांगड लागत नाहीये. उदा. मीता की शीबीआय?

अजया's picture

6 Jul 2016 - 5:28 pm | अजया

मीताच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2016 - 6:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> कंजूसकाकांनी दिलेल्या फोटोंतील क्रम व तुमचा क्रम यात थोडी सांगड लागत नाहीये.
नका लागू देऊ सांगड आणि क्रम, सोडून द्या. कट्टा झाला, छान झाला किस्सा खतम :)

-दिलीप बिरुटे

खटपट्या's picture

6 Jul 2016 - 10:02 pm | खटपट्या

मस्त कलंदर या स्त्री आयडी आहेत हे माहीत नव्हते...

कंजूस's picture

4 Jul 2016 - 9:39 am | कंजूस

इथे पुन्हा देतोय फोटो-
फोटो-

१ ) ओळखपरेड

फोटो पहिला ओळखपरेड उजवीकडून आइडीनावे
बोका-ए-आझम, वि पा विलास पाटील, निशदे, किसन शिंदे, विमे, प्रास, प्रणव जोशी, कोमल (विपाकन्या), सौ० (मामलेदारचा पंखा), (१), (२), (३), (४) आणि चि०

२ ) ओळखपरेड

फोटो दुसरा ओळखपरेड
() चिरंजीवसह पासून डावीकडे सौ पाटील, त्रिवेणी, शिबिआइ, (४), स्वीट टॅाकरीण, स्वीट टॅाकर, मस्त कलंदर आणि हातात मोबाइल असलेल्या अजया.
३ ) ओळखपरेड

फोटो तिसरा ओळखपरेड
मोबाइलने फोटो काढणाय्रा अजया पासून डावीकडे
सुरंगी, फोटो काढणारे 'माझीही शॅम्पेन, हेमन्त वाघे, टवाळ कार्टा, डॅा सुबोध खरे(कोकाकोला घेतलेले), संदीप डांगे, प्रचेतस(=वल्ली निळा टी शर्टमध्ये), सतीश गावडे, मुक्तविहारि(मुवि), मामलेदारचा पंखा.
४ ) निघण्याअगोदर

५ ) निघण्याअगोदर

६ ) छत्री धरलेली चि० निलापी

७ ) शेवट गोड तर सर्वच गोड- चहा घेतल्यावर.
खरे( डॅाक्टरेट) क्लिंटन ( मागे उभे लाल टीशर्टात ) सांगितल्याप्रमाणे आले आणि खरे डॅाक्टर कुठेत विचारलं तेव्हा हास्यकल्लोळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2016 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाकरांची लक्षणीय उपस्थिती. खऱ्या अर्थाने महाकट्टा. बोका ए आझम आणि अजयाचे अभिनंदन. काय काय गप्पा झाल्या, माझ्याशी मैत्री करशील का, असे व्य नि कोणा कोणाला आले, वगैरे चर्चा झाल्या की नाही ? एक आयडी मेला की पुन्हा दुस-या आयडीने वर तोंड करून प्रतिसाद देणा-याबद्दल काही चर्चा झाली की नाही. बाकी, फोटोत धन्या, वल्ली, अजया, माऊ, डॉ. सुबोध,प्रास, निखिल, मस्त कलंदर, इतकेच ओळखता आलेत. बाकीच्यांचाही परिचय व्हावा.हरकत नसेल तर !

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2016 - 9:49 am | डॉ सुहास म्हात्रे

आता पूर्ण विश्वास बसला. फारच जंगी भन्नाट कट्टा !! :)

अजया's picture

4 Jul 2016 - 9:50 am | अजया

फोटो क्र.१
डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री
फोटो क्र ३
डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे
फोटो क्र,४
डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 9:53 am | मुक्त विहारि

निदान पुढील ३-४ वर्षे मी डोंबोलीत नसेन. त्यामुळे ह्या कट्ट्याला उपस्थित राहणार होतोच.

सकाळी सौ.मुविंकडे काही विद्यार्थी जर्मन शिकायला येणार असल्याने, सौ. मुविंना येता आले नाही.

अनिरुद्ध प्रभू's picture

4 Jul 2016 - 9:56 am | अनिरुद्ध प्रभू

कसलो कट्टो झालो आसा, वाह!!!! क्या बात....
एकदम झकास........

(जावक व्हया होता.......)

जिन्गल बेल's picture

4 Jul 2016 - 10:03 am | जिन्गल बेल

+1
झक्कास कट्टा...मस्त वृत्तांत...
फोटोस पण छान!!! टाका + अनाहिता... फोटो बघून वाईट हसतेय!!! :) ;) ;)
अजून detail येऊदेत!!!

नंदन's picture

4 Jul 2016 - 10:08 am | नंदन

कट्टा दणक्यात झालेला दिसतोय. नवे-जुने-आजी-माजी-भावी मिपाकर एकत्र पाहून मस्त वाटलं.

स्पा's picture

4 Jul 2016 - 11:24 am | स्पा

असेच म्ह्नणतो

जे बात

विमे ला पाहून ब्रे वाटले

बोका-ए-आझम's picture

4 Jul 2016 - 11:43 am | बोका-ए-आझम

बुवेश आले नाहीत तुम्ही नव्हतात म्हणून!

चौकटराजा's picture

4 Jul 2016 - 10:09 am | चौकटराजा

डॉ सुबोध खरे व अजया रॉक ! काहीनी खरे यांच्याकडे "मेंटेन" साठी शिकवणी लावावी.

कंजूस's picture

4 Jul 2016 - 10:10 am | कंजूस

कट्ट्याला उपस्थित मिपाकरांशिवाय जे तिथे चर्चेत होते ते मिपाकर-
डॅा बिरुटे,
पैसातै,
नीलकांत,
प्रशांत,
आत्मबंध ( गुरुजी/बुवा/अत्रुप्त आत्मा),
नुलकरकाका,
स्पा ( मन्या/स्टीव राजा/स्पान्डुरंग ),
दीपककुवेत,
दमामि,
यशो{धरा},
प्यारे१/धनंजय माने/सर्व नावे,
दादा दरेकर/सर्व नावे,
प्रमोद देर्देकर,
पियुशा,
अभ्या टिंबटिंब,
चौकटराजा,
ब्याटमन,
नादखुळा ( पिंचिंवार्तापत्र ),
आदूबाळ,
विनोद१८,
ग्रेटथिंकर,
शान्तिप्रिय

अभ्या..'s picture

4 Jul 2016 - 2:16 pm | अभ्या..

अरे वा.
आम्ही चर्चेत होतो म्हणा की. दोन चार डूआयडी वगळता सार्‍या भारी माणसात आमची गणना झाली हे काय कमी. भारी भारी.
कट्ट्याचा काउंट वाढलायच मग. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2016 - 2:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणजे आम्हीही कट्टयाला उपस्थित होतोच म्हणावं लागेल. काय काय चर्चा झाली, ते पण सांगा भो....! :)

-दिलीप बिरुटे

डॅाक्टरांना मनापासून यायचे होते पण औरंगाबाद फारच लांब पडले.
अभ्याला भेटायला जायचेच आहे ( बदामि ट्रिपच्या निमित्ताने - वल्ली आणि ग्यांग).

प्रमोद देर्देकर's picture

4 Jul 2016 - 3:54 pm | प्रमोद देर्देकर

जल्ला आमी इकडची काडी तिकडं कर्रीत नै , नी आमची आठवण कस्ली काढतांव.

पन आठैन काढल्याबद्दल सर्वांस्नी राम राम बरंका !

फोटो पाहिले होतेच!वृत्तांत वाचून मजा आली.अनाहिता आणि टकाभाउ फोटो.वा! वा!
सगळेच फोटो छान.

फोटो पाहिले होतेच!वृत्तांत वाचून मजा आली.अनाहिता आणि टकाभाउ फोटो.वा! वा!
सगळेच फोटो छान.

फोटो पाहिले होतेच!वृत्तांत वाचून मजा आली.अनाहिता आणि टकाभाउ फोटो.वा! वा!
सगळेच फोटो छान.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 10:36 am | टवाळ कार्टा

ओ...मला भैणी बर्याच हैत...आणखी नको

इशा१२३'s picture

4 Jul 2016 - 11:20 am | इशा१२३

बर राहिल !टवाळ भाउ नकोच !

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 11:23 am | टवाळ कार्टा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2016 - 10:34 am | अत्रुप्त आत्मा

लै भारी फोटू!
आगोबानी टि शर्ट बदललेला पाहूण आणंद जाहला! ;)
टक्कूमक्कूशोनू चा अनाहितां समवेत फोटू पण भारी!

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 10:37 am | टवाळ कार्टा

कंचा टिशर्ट

गॅरी ट्रुमन's picture

4 Jul 2016 - 10:38 am | गॅरी ट्रुमन

जंगी मिपा कट्ट्याबद्दल सर्वांचेच आभार.फोटू आवडले.

थोडा वेळ का होईना सर्वांना भेटता आले याचा आनंद आहे.

मार्मिक गोडसे's picture

4 Jul 2016 - 10:40 am | मार्मिक गोडसे

जबरदस्त मिपा महाकट्टा!
'अनाहिता आणि लाडोबा' छान फोटो.
डांगेसरांनी कट्टावृत्तांत लिहिल्यास वाचायला आवडेल.

प्रीत-मोहर's picture

4 Jul 2016 - 10:41 am | प्रीत-मोहर

झक्कास एक्दम!!!!

उल्का's picture

4 Jul 2016 - 10:55 am | उल्का

आयोजकांना सलाम!
असे अनेक महाकट्टे करायची सुबुद्धी त्यांना वरचेवर होवो. :)
सर्व फोटो भारी आले आहेत.
कट्टा दणक्यात झाला.
सर्वांचे आभार!

रच्याकने मी ह्या कट्ट्याला गेले होते का? असा प्रश्न माझा मलाच पडला आहे.
त्याचे उत्तर म्हणून इथेच एक खुसखुशीत अतिरंजित धमाल मिनिवृत्तांत लिहायचा मानस आहे.
आयोजकांची हरकत नाही ना?

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 11:07 am | टवाळ कार्टा

खि खि खि...ल्हिआ तुम्ही...नंतरचे नंतर बघू

कार्टा, आपली काल भेट होऊनही 'नंतरचे नंतर बघू' अशी धमकी? (आश्चर्यकारक घाबरल्याची स्मायली)
आता मी कसे लिहू? :प :द

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 11:19 am | टवाळ कार्टा

आर्र...असा कसा उल्टा अर्थ घेता...नंतरचे नंतर म्हन्जे....आधी लिहा...कोणी आक्षेप घेतलाच तर त्याला फाट्यावर मारायचे =))

उल्का's picture

4 Jul 2016 - 11:26 am | उल्का

मग ठीक आहे.
टका यांनी जाहीर पाठींबा दिल्यामुळे आता हिम्मत होईल असं वाटतंय. :)

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 11:27 am | टवाळ कार्टा

यांनी वगैरे नको...मला अरे/तुरे जास्त बरे पडेल...मी बराच लहान आहे तुम्च्यापेक्षा =))

उल्का's picture

4 Jul 2016 - 11:31 am | उल्का

उगीच गेले कट्ट्याला. आत्ता माझे वय आभासी लपवता पण नाही येणार. =))

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 11:32 am | टवाळ कार्टा

=))

त्रिवेणी's picture

4 Jul 2016 - 2:49 pm | त्रिवेणी

हे हे हे. लोक आधीच फाटयावर मारतात काही जणाना.

Maharani's picture

4 Jul 2016 - 10:56 am | Maharani

Zakkas .....photo pan mast

खेडूत's picture

4 Jul 2016 - 11:34 am | खेडूत

जंक्शन कट्टा आणि चविष्ट व्रुत्तांत.
धन्यवाद.
स्वगतः पुढच्या वेळी हजेरी लावावी लागणार..

पियुशा's picture

4 Jul 2016 - 11:38 am | पियुशा

वा !!! जबरी झकास महा- महाकट्टा ,फोटो सगळे जबराट ! माझी काय चर्च्चा केलीत म्हणे ;)
बाकी ट क्या चा आय डी बदलुन द्यावा इतका निरागस वाटतोय फोटोट :प का अनाहिताची भीती वाटत होती म्ह्णुन चेहरा असा आलाय ;)
( मर्तेय मी , पळते मी ).......

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 11:46 am | धनंजय माने

कंकाका,
आम्हाला एका च आयडी ची हौस आहे. तेवढा सुद्धा ठेवत नाहीत म्हणून दुसरा उसना पासना मागावा लागतो. बरेच लोक थोरथोर असल्याने आम्हाला उदार मनाने देतात.

बाकी कट्टा उत्तम झालेला आहे यात संशय नाही. काही ठिकाणी सोनेरी धान्यपेयं दिसली होती ब्वा!

माझीही शॅम्पेन's picture

4 Jul 2016 - 12:01 pm | माझीही शॅम्पेन

मी (माझीही शॅम्पेन ) , किसन , मामलेदार पंखा , शीबीआय , आणि डॉक्टर आम्ही ठाण्याहून निघालो , माझ्या बरोबर एक माजी संपादक , एक WWF कुस्तीपटू , नेव्हीतील डॉक्टर आणि शीबीआय ऑफिसर असल्याने निर्धास्त होतो , मुलुंड - ऐरोली फाट्यया पर्यन्त व्यवस्थित आलो ,
मी गाडी चालवणारा अर्जुन आणि मार्ग दाखवणारा किसन अशी उलटी जोडी जमली होती , मध्येच एक खतरनाक रस्त्याने येण्याचा निर्णय झाला आणि आम्ही व्यवस्थित नवी मुंबई दर्शन करून दर मजल करत कसा बसा गंतव्य स्थानापर्यन्त पोहोचलो
मध्येच गाडी बरेच वेळा स्पीड ब्रेअकर वर आपटली पण चाकातील हवा कमी असेल अशी स्वतः:ची भाबडी समजूत करून घेतली :)

महा कट्टा कसला मस्त पैकी स्नेहसंमेलन चालू होत , अशी यशस्वी स्नेहसंमेलन फक्त ग्रेटर मुंबईकरच भरवू शकतो ह्याची खात्री झालि , वल्ली (प्रचतेस ) , सगा , गणामास्तर त्रिवेणी आणि अजून कोणी कोणी पुण्ययाहून आले होते , बरेच दिवसांनी फुल गॅंग भेटली मिपाची

काही नाव बदलाविशी वाटली जस की टका >> शामळू कार्टा >>शाका , कंजूस काका >> चपळ काका , सुरंगी >> सूर-सुरी (फटाक्यातील) , बोका-इ-आझम >> प्रेमळबोका , प्रचतेसला त्याच्या नावावरून बरेच जणांनी पिडला असेल , प्रत्येक वेळेला तो ते वारुणाच नाव आहे असं सांगून सुटका करून घेत होता

मक , निदे , विमे , प्रास , कंजूस , त्रिवेणी , पिंगू (पोपटी आठवते आहे ना रे ) , कोमल , वाघे अश्या काही जणांशी थोडक्यात चर्चा झाली ,

निदेनि बोभाटा.कॉम विषयी बरीच माहिती दिली , प्रत्येक मिपाकरांनी बोभाटा.कॉम ला अवश्य भेट दिली पाहिजे अफलातून उपक्रम आहे

एकंदरीत अजय , विपा , बोका आणि इतर आयोजकांनी अफलातून आयोजन केलं होत , आता एखादी पिकनिक किंवा मुंबई आणि पुण्य मधोमध रेसोर्टवर भेटून मस्त गप्पा मारल्या पाहिजेत

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Jul 2016 - 2:55 pm | माम्लेदारचा पन्खा

लै वाजायलीय...!

माझीही शॅम्पेन's picture

4 Jul 2016 - 3:28 pm | माझीही शॅम्पेन

हा हा हा साष्टांग दंडवत मालक ___/।\___

सूड's picture

4 Jul 2016 - 3:32 pm | सूड

एक काना विसरलात का?

स्मिता_१३'s picture

4 Jul 2016 - 12:01 pm | स्मिता_१३

अरे वा !! जोरदार झालाय कट्टा!!!

अजया's picture

4 Jul 2016 - 12:04 pm | अजया

तर त्याचं असं झालं की हाम्रिकेत कट्टा,त्यात पण एकजण सात तास ड्राइव्ह करुन आलेले,युकेत कट्टा आणि मिपाच्या मातृभूमीत मात्र कट्टयाचा दुष्काळ :( याने आमची झाली जळजळ.मग बालके टकाशी खरडीखरडीत विषय निघाला आमची मुंबई कट्टा करायचा.पण जागा काही निश्चित करता येईना.मिपाकट्टा म्हणजे कसं ऐसपैस गप्पा मारता आल्या पाहिजेत.सोबत छानशी खादाडी हवी.त्यात ते टकं सारखं कोंबडीवालं हाॅटेलच पाहिजे करत नाचत होतं.आणि मी पूर्णपणे शाकाहारी.टकाने पहिलं नाव सुचवलं हाॅटेलचं ते 'झिंगा'!
मला नाव ऐकुन चक्करच यायची बाकी :)मग दुसरे नाव मालवणी रस्सा.ते फिश स्पेशल. परत नाक मुरडले.मग इनाॅर्बिटला कट्टा करु. जे हवे ते खाऊ ठरवुन बोक्याला तसं कळवलं.पण जशी येणाऱ्या मिपाकरांची संख्या धाग्यात वाढायला लागली मला टेन्शन यायला लागलं.माॅलच्या गर्दीत कसं मॅनेज होणार.आणि त्याच वेळी वाशीकर मिपाकर विपा देवासारखे धावुन आले आणि त्यांच्यामुळे NMSA सारखी मस्त निवांत जागा कट्ट्यासाठी मिळाली.त्यांनी सगळे आयोजन करुन ठेवलेच होते. तिथल्या रेस्टाॅरंटचा मोठा भाग कट्टयासाठी आरक्षित होता.त्यामुळे कोणताही व्यत्यय न येता फार छान सोय झाली.विशेषतः बाहेर पाऊस असताना.
कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते पिंची अाणि पुणेकर.भर पावसात लवकर निघून दिल्या वेळेला ते हजर होते.
नंतर एकेक करत ठाणे,मुंबई, पनवेल,सानपाडा,बोयसर सगळे मिपाकर जमले.
शिबिआयने मस्त गरम अप्पे करुन आणले होते.पुणेकरांनी आठवणीने बाकरवडी आणि ठाणे मुलुंड आघाडीने सुरळीच्या वड्या. सर्व तुटून पडतच होते तर आधीच वैतागलेले मॅनेजर साहेब प्लीज बाहेरचे फुड नाॅट अलौड म्हणत आले.खट्टु होऊन सगळे डबे बंद झाले :(
मग विपा भाऊंनी मस्त गरम गरम मन्चाव सुपची ट्रिट देऊन आत्मे शांत केले!
मग ओळखपरेड सुरु झाली.सगळे गोल करून उभे राहिले.आणि एकेकानं आपापली ओळख दिली.त्यामुळे एक बरे झाले.कोण कोण आलंय नीट कळाले.अगदी शेवटी अदि आणि तिची मैत्रीण आल्या.त्याही दंग्यात मनापासून सामील झाल्या!
तोवर नुसता कल्ला आणि नो आॅर्डर वर वाढती लोकसंख्या बघून मॅणेजर साहेब हैराण झालेले.मग देवदूत नं दोन बनून स्वीट टाॅकर काका धावुन आले.त्यांच्या मदतीने मग सर्व मेनू मॅनेजरला सांगितल्या गेला.तो जसजश्या डिश आणत होता, एकेक मिपाकर अॅड होत होते! मग त्याला और पाचका खाना करत आॅर्डर वाढवत नेत होते!
जेवण मात्र अगदी छान होते.नंतरची कुल्फी तर मस्तच. कोणा दुष्टाने तीन तुकडे पळवल्याने माझ्या वाटेला एकच तुकडा आला :-/
नंतर मिपाकरांची पांगापांग होण्याआधी ग्रुप फोटो झाला.तोपर्यंत सोनुली पण आली.
यानंतर पिंचिकर आणि अर्धे ठाणे रवाना झाले.बाकीचे गॅरी भाऊंची वाट बघत गप्पा मारत बसले.बालके टवाळ कार्टा याच्या बालसुलभ बोबड्या बोलांना ऐकुन मिपाकरणींनी मनोरंजन करुन घेतले.वर त्यांच्या लाडोबासोबत फोटोही काढलाच;)
चार वाजता चहाची अनावर तल्लफ आल्याने सर्वजण परत रेस्टॉरंटमध्ये आले.चहा होईस्तोवर गॅरी भाऊ आलेच.एक छोटीशी ओळखपरेड परत होऊन सगळे मार्गस्थ झाले.
या कट्टयाचा सर्वात भावलेला भाग म्हणजे जुने नवे मिपाकर आवर्जुन आले.कट्ट्यात कोणत्याही छुप्या चर्चा,कटु विषय आदिला स्थान नव्हते.टकाची गंमत करणे सोडता आलेल्या सगळ्या मैत्रिणी या मिपाकरणी म्हणून आल्या होत्या.अनाहिता कट्टा असे नाही.सगळ्यात मिळुन मिसळुन मस्त गप्पाटप्पा झाल्या.
धन्यवाद मिपाकरांनो,धन्यवाद विपा. तुमच्यामुळेच इतका जबरदस्त कट्टा झाला.

नूतन सावंत's picture

4 Jul 2016 - 5:41 pm | नूतन सावंत

कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते पिंची अाणि पुणेकर

नाय नाय,मी पायली होते.त्यानंतर यजमान पतीपत्नी नि त्यानंतर कंजूसकाका.पिंचिकार त्यानंतर.

बारवी डॅम( बदलापूर ), जांभे धरण ( आसनगाव स्टेशन )याठिकाणी जाण्याला बय्राचजणांनी उत्सुकता दाखवली आहे तिकडे जाण्याचे लवकरच ठरवण्यात येईल.
भुशी डॅम,कोंडेश्वरवगैरे ठिकाणे बाद केली आहेत.

त्रिवेणी's picture

4 Jul 2016 - 3:14 pm | त्रिवेणी

काका ठरवा लवकर. आम्ही आलोच.

पैसाताईनं फोनवरून कट्ट्याला हजेरी लावली हे नमूद करणे राहिले.

कविता१९७८'s picture

4 Jul 2016 - 12:37 pm | कविता१९७८

बोका - ए - आझम नी कट्ट्याची घोषणा केली आणि या कट्ट्याला माझी हजेरी लागणार नाही हे मी ठरवुन टाकलं होत कारण वाशी हा माझ्या साठी अति लांबचा पल्ला कारण बोईसर म्हणजे एकदम एका टोकाला आहे. मुंबई हुन १०० कीमी आणि त्यात वाशी म्हणजे नवी मुंबई ते आणखी दुर. त्यात टका येणार या धडकीनेच मी कट्ट्याला जायचं नाही असं ठरवलं होतं पण एक आठवड्यापपुर्वी ट्रेक च्या दिवशी अजया भेटली आणि तिने सांगितलं की टका हा आयडी व्रात्य असला तरीही प्रत्यक्षात तो तितका व्रात्य नाहीये. मग मी जरा मना वर घेतलं पण इथे ३-४ दिवसा पासुन खुप पाउस असल्याने जाता येईल की नाही याचं टेन्शन आलं कारण अति पावसामुळे मुंबई रेल्वे च्या पश्चिम , मध्य आणि हार्बर अशा तिनी रेल्वे लाईन विस्कळीत झाल्या होत्या. ट्रेन जर मधेच बंद पडली तर पंचाईत व्हायची , त्यातच दर रविवारी मध्या आणि हार्बर रेल्वे लाईन ला मेगा ब्लॉक असतो आणि वेस्टर्नला जम्बो मेगा ब्लॉक . शेवटी कट्ट्याचा दिवस उजाडला. मी रेल्वेच्या पश्चिम लाईनशी कनेक्टेड आहे म्हणुन मी पश्चिम आणि हार्बर लाईन असा पर्याय निवडला. सकाळी ४ वाजता उठुन तयारी करुन ५.१५ ची डहाणुरोड - विरार ट्रेन मधे बसले, विरार ला उतरुन विरार - चर्च्-गेट ट्रेन पकडुन ८ वाजता माहीमला पोहोचले. तिथुन ९.५५ ची हार्बर लाईन हुन अंधेरी पनवेल ट्रेन होती पण ती ४५- मिनीटे उशीरा धावत होती. एकदाची ट्रेन मधे बसले. ११.१५ नंतर अजया आणि स्नेहश्री वाशी स्टेशन बाहेर भेटल्या तोवर पुणेकरणी पोहोचल्याची वर्दी मिळाली होती. गेल्यावर सगळ्यांची भेट घेतली फोटो सेशन झालं तो पर्यंत बाकीचे मिपाकर हळुहळु येउ लागले. बोका भाउ स्वतः आले आणि ओळख परेड सुरु झाली त्यानंतर डॉ. सुबोध खरेही आले त्यांच्याशीही ओळख झाली. जवळपास सगळे एकत्र जमल्यावर सगळ्यांनी आपापली ओळख दिली. गप्पांचा फड जमलेला असतानाही अजया आणि स्वीट टॉकर सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंग होते , दोघांचेही कौतुक कारण इतक्या जणांच्या जेवणाची व्यवस्था करणे म्हणजे खरंच कठीण काम होतं . जेवताना स्वीट टॉकर आणि टॉकरीणबाई, हेमंत वाघे , स्नेहशश्री, अजया यांच्या शी खुप गप्पा मारल्या, खुप माहीती मिळाली. खुप धम्माल केली, सगळ्यांना भेटुन बरे वाटले . मी ही हा पहिलाच कट्टा पाहीलाय जो इतका व्यवस्थित सुनियोजित होता. येताना दुसर्‍या दिवशी येण्याचा विचार होता पण अजयाने ६ वाजता पनवेल ला सोडले मग ६.३० ची पनवेल - डहाणु रोड ट्रेन पकडुन रात्री १० ला घरी पोहोचले आणि अजयाचे आभार कारण दुसर्‍या दिवशी म्हणजे आजच वेस्टर्न रेल्वे च्या ट्रेन्स लेट आहेत आणि आज आले असते तर ऑफीस गाठायला उशीर झाला असता कारण ऑफीस मधे मुंबईहुन येणारे सहकारी आज उशीरा आलेत.

कट्टाक्विन म्हणून तुम्हाला निवडण्यात यावे असा ठराव मांडतो.सत्कार पुढच्या कट्ट्याला करावा.
मी त्या बाजूला प्रवास केला आहे आणि किती अडचणी आहेत ते माहित आहे.
टक्याबद्दलचे गैरसमज दूर झाले हे एक कट्ट्याचे यशस्वी फलित म्हणता येईल.

कविता१९७८'s picture

4 Jul 2016 - 3:17 pm | कविता१९७८

हो आज सकाळीच डहाणुला मालगाडीचे डबे घसरल्याने ट्रेन्स उशीरा धावतायत

बोका-ए-आझम's picture

4 Jul 2016 - 9:22 pm | बोका-ए-आझम

तुमच्या उत्साहाला आणि spirit ला _/\_

कविता१९७८'s picture

6 Jul 2016 - 9:37 pm | कविता१९७८

धन्यवाद

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 3:04 pm | टवाळ कार्टा

लोकं दुसर्याना न भेटता कसे काय मत बनवतात बुआ...

कविता१९७८'s picture

4 Jul 2016 - 3:07 pm | कविता१९७८

त्यान्च्या आयडी वरुन

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 3:22 pm | टवाळ कार्टा

ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ