एक संघ मैदानातला - भाग १५

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
1 Jul 2016 - 6:10 pm

काही अपरिहार्य कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व..

--------------x--------------x----------

बाकीचे संघ हळूहळू येऊन बसत होते. स्पर्धेचा दुसरा दिवस असल्यामुळे सगळ्या टीम्स हजार होत्या. आमचा टाइमपास चालूच होता पण आम्हाला सगळ्यांना खर तर कोल्हापूर वि. वसई ह्या मॅचची उत्सुकता होती. सामने सुरू होत होते संपत होते. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागत होते. एकूणच माहोल संथ ही नव्हता आणि फार धसमुसळाही नव्हता. जे जे जिथे जिथे हवं तसं तसं ते ते होतं... पण काही तरी मिसिंग होतं.

आता शेवटची मॅच सुरू झाली होती. आम्ही वाट पाहत होतो ती ह्याच मॅचची... जसं आम्हाला वाटलं तसंच झालं... वसईच्या टीमच्या मेन रेडर मैदानात उतरल्या होत्या आणि व्यवस्थित खेळत होत्या म्हणजे आम्हाला बकरा बनवून स्वतःला साईड मिळण्यासाठी तो रडीचा डाव होता.. जागूने दादांना जाऊन आधी सांगितल्याचा फायदा झाला. अपेक्षेप्रमाणे वसई २ पॉईंटने जिंकली पण त्यासाठी त्यांना कोल्हापूरने जाम झुंजवल.

मॅच संपली तसे आम्ही निघालो मेसमध्ये जेवण घेतलं आणि एस टी डी बूथ पकडलं. प्रत्येकाला घरी कॉल करायचा होता आपली खबरबात द्यायची होती आणि घरची खबरबात ऐकायची होती. ह्या प्रोग्रॅमला साधारण अर्धा तास तरी लागायचाच. मीही घरी फोन लावला, पण फोन एंगेज्ड लागत होता. सगळ्यांचं आटपल्यावर परत ट्राय केला तरी एंगेज्ड... मग नाद सोडला आणि रूम वर निघालो. दादांनी उद्या सकाळी जरा लवकर आवरायच्या सूचना दिल्या कारण उद्या आम्ही सांगलीच्या गणपतीच्या दर्शनाला जाणार होतो. आम्ही माना डोलावल्या आणि अखंड तोंडाची टकळी चालवत चलते झालो. मुंबईत जो गजबजाट असतो तो मात्र इथे नव्हता रस्त्याने जाताना ही शांतता आम्ही अनुभवत होतो. रात्रीच्या १० वाजताची रात्र एवढी शांत असू शकते.. बरेच टूर केले असले तरी ह्या सगळ्या गोष्टी परत नव्याने अनुभवत होतो.
मैदानात संघ जरी एक असला तरी त्यातही हेवेदावे, तुझं-माझं होतंच.. टूर म्हंटल की वेगवेगळी गावं आली... तिथलं निसर्ग सौदंर्य, खाण्याचे पदार्थ, संस्कृती असं सगळंच आल.. पण ह्या गोष्टी आल्या की आमच्याकडे मात्र "आमच्या कोकणात असं नसतंच..." , " ह्या सगळी पद्धती घाटावर असतील... आमच्याकडे अमुक अमुक असतं" सतत तुमचा घाट आणि आमचं कोंकण असंच चालू होतं. " तुमचा घाट आणि आमचं कोंकण" ची टेप ऐकत रूमवर आलो.

आज पत्ते खेळायचा मूड नव्हता. पाहिलेल्या मॅचची चर्चा सुरू झाली. उद्या आमची पहिली मॅच असल्यामुळे कुठेही ढिलेपणा करून आम्हाला चालणार नव्हतं. उद्या सिलेक्टर येणार असावे असा अंदाज होता अजून काहीच खबर समजली नव्हती. त्यादृष्टीने आम्ही प्लॅनिंग करायचं असं ठरवलं.. कोल्हापूरच्या रेडरना कशी कव्हर लावायची, आपण रेड मारताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या हे ठरवून झालं.. हे सगळं ठरवत असताना योग्या आणि तुप्याच्या खाणाखुणा चाललेल्या मी पाहिल्या आणि तुप्या मुद्दाम बाहेर बोलवून घेऊन गेले, " तुप्या दुपारचा संजूचा एपिसोड इथे नको लीक करू.. उगाच पोरी फालतूपणा सुरू करतील आणि परत आप्पांपर्यंत पोचलं तर डोक्याला शॉट बसेल... "
" अरे तू काय मला च्युx समजते काय? ती आणि तो झिपऱ्या मरेना का खड्ड्यात .. मला काय करायचं ?
माझं आणि योग्यचं वेगळंच काही तरी चालू होतं... तू उगाच मध्ये मध्ये येऊ नकोस.. तू कॅप्टन ग्रांउड वर आहेस तिथेच कॅप्टन म्हणून राहा इथे नको... चल बाजू.... मला आत जाऊ दे... फालतूची पटर पटर.. "
"ए बाई... जास्त शहाणपणा नको करू... तुला सांगावं वाटलं म्हणून आले.. नसेल ऐकायचं तर गेलीस उडत .. आणि माझी कॅप्टनसी काढायची गरज नाहीये... ती मी मागितलेली नव्हती तर मला आप्पांनी दिलेली आहे.. समजलं ? " असं म्हणत मी बाजूला जाऊन उभी राहिले.
"....... "
" रेवा... चल सोड ना आता.. चल आत जाऊ... माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता... "
" आता तो अर्थ तुझ्याकडेच राहू दे.. सोड... काय ते समजलं मला" असं म्हणत मी सरळ आत आले, माझ्या मागे मागे तुप्या पण आली. तोपर्यंत आतल्या कारभारांना ऊत आला होता, योग्याने अंकुला साडीसारखी चादर गुंडाळून लावणी करायला लावली होती आणि ते पण यडं मस्त नाचत होत.. आम्ही पण सगळं विसरून त्यात सामील झालो. लावणी राहिली बाजूला कोणत्याही व्याख्येत न बसणारा असा आमचा बेफाम नाच सुरू झाला. गाणी, नाच, नकला असा बराचसा धुडगूस घातल्यावर दमून बुड जमिनीला लावलं.
तरीही मला राहून राहून हाच प्रश्न पडत होता की माझ्या कॅप्टन असण्याचा तुप्याला एवढा राग का होता? कारण या आधी असं काहीही आमच्यात नव्हतं किंवा कोणाबरोबर संघातही झालेलं ऐकलं किंवा पाहिलं नव्हतं. काही तरी होते जे मला कळायलाच हवे होते. बहुतेक ते योग्या आणि तुप्याच्या डोक्यात तर शिजत नव्हतं ? आता ह्या घडीला खबर काढणं महत्वाचे होते. कशा चाव्या फिराव्यात हा विचार करताना झोप लागली.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून दिदिने बाथरूम पकडलं तिच्या मागेमागे सगळ्यांनी नंबर लावले. वार्मअप उरकून आंघोळी उरकल्या आणि गणपती दर्शनासाठी निघालो. सकाळपासून तुप्याने माझ्याशी बोलायचा दोनदा प्रयत्न केला पण त्याला मी यश येऊ दिले नव्हते. मात्र जेवढ्यास तेवढे उत्तर नक्की दिले होते.
गणपतीचे देऊळ फार सुरेख होते. तिथे संस्थानाचा बबलू हत्ती होता. त्याची बहुतेक अंघोळ चालू असावी. माहूत त्याला स्वछ करायचा प्रयन्त करत होता आणि तो त्याला जाम दाद लागू देत नव्हता. माहूत लांब गेला की साखळदंड वाजून बबलू त्याला बोलावून घेत... आणि मग तो माहूतसुद्धा फार प्रेमाने त्याला फटका देत आणि त्याच्याशी बोलत उभा राही. असं बरेच वेळा झालं मग मात्र माहुताने त्याला त्याच न ऐकता घासायला सुरुवात केली... थोड्यावेळाने आम्ही परत यायला वळलो.

दुपारी मेस मध्ये जेवून परत रूमवर आलो आणि पडलो. माझ्याबाजूला रूपा होती. झोप लागतच होती तितक्यात रूपा म्हणाली, " रेवा.. आज तुप्याला नको उतरवूस... "
" का ? काय झालं ? काही म्हणाली का ती ?"
" नाही.. ती कशाला म्हणेल काही.. ह्या वेळी संजूला चान्स देऊ.. "
" आं.. हूं... " आता आली का पंचाईत... मी संजूला उतरवले तर तुप्याला वाटणार मी कालचा खुन्नस काढत आहे म्हणून... बघू तिथे गेल्यावर म्हणत मी परत झोपायचा प्रयत्न करू लागले.

संध्याकाळी चहा-पाणी आटपून ग्राउंडवर पोचलो तरी माझा निर्णय होत नव्हता. दोन्ही संघाना पहिला कॉल दिला. आम्ही वॉर्मअप च्या तयारीला लागलो. आजची मॅच काढणं गरजेचं होत. प्रत्येकजण शिस्तीत आणि सिरियसली वॉर्मअप करत होता. फायनल कॉल दिला. नेहमीच्या शिस्तीने आम्ही मैदानात उतरलो. दुपारी ४.३० च्या मॅचला पण संयोजकांनी कुठून तरी पाहुणे पैदा केले होते त्यांच्या हस्ते टॉस उडवला. आम्हाला रेड मिळाली आणि कोल्हापूरने ग्राउंड घेतले. नेहमीची कव्हर लावली होती. तूप्याला उत्तरावले होते. रुपाला ते विशेष पटले नव्हते पण ती काही बोलली नाही आणि मीही विषय वाढवला नव्हता.

आज पहिली रेड जागूने करायची ठरवली होती ठरल्याप्रमाणे ती रेडला गेली आणि बोनस घेऊन आली.
आता त्यांची रेड सुरू झाली. त्यांच्या रेडरने मला काही कळायच्या आता खूप स्पीडने माझ्या पायाखाली बोनससुद्धा केला आणि मिडलाईन जवळ जाऊन थांबली. पुढच्यावेळी मी अलर्ट राहायचं ठरवलं.
आता दीदी रेडला गेली. पहिल्याच अटॅकमध्ये तिला पॉईन्ट लागला त्यामुळे ती लगेच मागे फिरली. त्यांची दुसरी रेड सुरू झाली ह्यावेळी मी तयार होते... रेडर आत आल्यावर मी बॅक काढली.
पुढची ६ मिनिटं मॅच तशीच २-२ वर होती. हाफ टाईमच्या आधी लीड घ्यायचा असं ठरवून आम्ही मॅच थोडी स्पीड करायची ठरवली आणि जरा टाईट कव्हर लावली. कव्हर टाईट लावण्यासाठी कव्हर वर घ्या... असं दीदीने सुचवलं. त्याबरोबर आम्ही कव्हर वर घेतली. त्यांची एक रेड नील गेली ह्या रेडला प्लेयर सापडली तर अजिबात सोडायच नाही असं ठरवलं.
रेडर आली रेड सुरू झाली. ती दीप्तीच्या टप्प्यात आली आहे असं वाटून दीप्ती डॅशसाठी फिरली पण त्याच बरोबर ती रेडर पण सावध होती ती दीप्ती फिरायची वाट बघतच होती. दिप्तीला बघताच तिने स्वतःला असे काही टर्न केले की दिप्तीचा खांदा तिच्या पोटाला लागण्याऐवजी तिचा खांदा दीप्तीच्या खांद्याला लागला आणि जे टाळत होतो तेच झालं.
परत ती जोरातची काळ... दीप्तीची किंकाळी... विव्हळणं... आणि बहुतेक गळ्यात हात घेऊन दीप्तीच बाहेर बसणं.. मेडिकल टाईम आउट घेऊन दिप्तीला बाहेर बसवायचं ठरवलं. आता लेफ्ट टर्न म्हणून पम्मीला उतरवायचं की संजूला.. परत तोच प्रश्न... मी संजूला उतरवायचं ठरवलं.. संजू आत आली.. दीप्तीची जागा तुप्याने घेतली.. तुप्याची संजूने..
ह्या गदारोळात त्यांच्याकडे १ चा लीड गेला... हाफ टाईमला लास्ट मिनिट होता. त्यांची रेड नील गेली आमच्या रेडला मी जाऊन बोनससाठी प्रयत्न करून आले. शिटी वाजली हाफ टाईमला स्कोर २-३ होता.
आम्ही लूज खेळात आहोत असं दादांना वाटत होते त्यामुळे गेम टाईट आणि स्पीड करण्याची सूचना देऊन दादा दीप्ती बरोबर डॉटरकडे गेले. सुदैवाने ग्राउंडमध्ये मेडिकलची सोय होती. हाफ टाईम संपला. त्यांची रेड सुरू झाली प्लेयर कव्हर नाचवून डीसबॅलन्स करत असताना रेश्माने तिला ब्लॉक केले. मॅच इक्वल झाली.
रूपा रेडला गेली ती स्टेपिंग करत असतानाच त्यांचा राईट टर्न तापला आणि रूपाला ३ ची भट्टी लागली (पॉइंट्स मिळाले). ४ च्या लीड वर जरा खुश होतॊय तेवढ्यात त्यांच्या रेडला संजू तापली आणि चवडा काढायच्या नादात बोनस प्लस पॉईंट दिला. आता लीड दोनचाच राहिला होता.
आज दोन मॅच असल्यामुळे पहिल्या मॅचमध्ये दीदीला जास्त न दमवता आम्ही मॅच काढायची असं ठरवलं होत पण गोंधळ होत होते, टाईमिंग चुकत होत.
शेवटी स्वतःला शांत करण्यासाठी आम्ही टाईम -आउट घेतला. शेवटच्या ५ मिनिटापर्यंत ५ चा तरी लीड घ्या नाही तर शेवटच्या ५ मिनिटात मला रेड कराव्या लागतील असं दीदीने बजावलं.
रेश्माने लेफ्ट कॉर्नर संजूला दिला आणि स्वतः लेफ्ट टर्नला आली. ह्या बदलामुळे लेफ्टचे रेडर आत येईनासे झाले आणि राईटने रेड करायला लागले. त्याचा फायदा मला आणि जागूला मिळू लागला. आम्ही बसवलेल्या राईटच्या पॉकेटमध्ये ते सहज अडकत होते. आणि ह्यामुळेच शेवटच्या ५ मिनिटाला आमच्याकडे ८ चा लीड आला. दीदीने परत टाईम -आउट घेऊन पम्मीला उतरवले आणि स्वतः बाहेर बसली.
आत आल्यावर शांत बसेल ती पम्मी कसली तिने हाताखालून पट टाकला आणि तो नेमका फेल गेला. पम्मी बरोबर मी आणि जागू अशा तिघी जणी आऊट झालो. स्कोर १०-१५ असा झाला. मैदानात ४ ची कव्हर राहिली. पुढच्याच रेडला रेश्माने जाऊन बोनस केला. आता पॉईंट मारणे गरजेचे होते नाहीतर अगदी शेवटच्या मिनिटाला लोणची वेळ आली तर मॅच हातातून जाऊ शकते. कारण नसताना लीड घेऊन सुद्धा आमची हवा टाईट झाली. दोन्ही संघाच्या ४ - ४ रेड नील गेल्या.
शेवटच्या २ मिनिटांचा पुकारा झाला. कव्हर तापू नये म्हणून आम्ही बाहेरून त्यांना शांत राहण्याची सारखी सूचना देत होतो पण कोल्हापूरच्या रेडर्स काही हार मानायला तयार नव्हत्या. लेफ्ट राईट अशा दोन्ही बाजूने आळीपाळीने रेड करून कुठूनतरी कव्हर लूज करून भट्टी फोडायचा त्यांचा अखंड प्रयत्न सुरू होता आणि आमची टीम आहे तो लीड वाचवणे आणि कव्हरमध्ये त्यांना दाद मागू न देणे ह्यासाठी प्रयत्न करत होती. शेवटची ५ मिनिटांची मॅच बघायला आमच्या बाजूच्या स्टेडियमच्या स्टॅन्डला बरीच गर्दी झाली होती. सगळं पब्लिक कोल्हापूरला सपोर्ट करत होतं. आता रेडला रूपा गेली होती. कव्हर नाचवून बोनससाठी आत गेली आणि अडकली. अतिशय सुंदर पद्धतीने तिला ब्लॉक केलं. आता ३ ची कव्हर राहिली होती. शेवटच्या ५ रेड राहिल्या होत्या. त्यात आम्हाला २ आणि त्यांना ३ अशा रेड मिळणार होत्या. कसंही करून ५चा लीड तरी टिकायलाच हवा होता. आमचे टाईम आऊट देखील संपले होते त्यामुळे मागून फक्त बोलून शांत करणं एवढंच हातात होत. कारण नसताना सोपी मॅच कठीण करुन ठेवली होती आम्ही...
त्यांची रेड चालू झाली.. समोरून येणाऱ्या प्लेयरला संजूने कोंबडी पकड ( समोर उडी मारून मानेत अडकवले) टाकली. १ पॉईंट मिळाला त्याचबरोबर पंचांची वॉर्निंग पण मिळाली. पम्मी आत गेली. आम्ही नख कुरतडत बाहेर चुळबुळ करत होतो. आमच्याकडून रेडला रेश्मा गेली. जमेल तेवढा टाईमपास करून परत आली. त्यांची रेडर आली. तिनेही जमेल तेवढं कव्हरला नाचवून, चकवून पॉईंटचा प्रयत्न करून पहिला पण तिला नील परत जावे लागले. ह्यावेळी रेडला संजूला पाठवले आणि टच लाईन करून नुसता बाहेर टाईमपास करायला सांगितला. पण कोल्हापूरला अजून आशा होती त्यांची संजूसाठी टच लाईनवर कव्हर काढली. टच लाईन क्रॉस करताना संजूचा चवडा काढायचा प्रयत्न केला पण तो फेल गेला आणि आम्हाला अजून १ पॉईंट मिळाला. आता त्यांची शेवटची रेड होती. रिस्क न घेता सेफ गेम खेळण्यासाठी आम्ही १ पॉईंट मुद्दाम देण्याचे ठरवले जेणेकरून भट्टीला आळा बसेल. १ पॉईंट द्यायचा म्हणून रेश्मा कळेल न कळेल एवढी पुढे उभी राहिली पण कोल्हापूरचा प्लेयरच्या ते लक्षात आले नाही ती स्टेपिंग करत असताना रेश्माने तिची बॅक काढली आणि अगदी मध्य रेषेजवळ यशस्वी केली. सामना संपल्याची शिटी वाजली. स्कोर ११-१९ होता. आम्ही ८ ने जिंकलो. ग्राउंडच्या पाया पडून कोल्हापूच्या टीमला शेक-हॅन्ड करून आपापलं सामान घेऊन बाहेर आलो. ट्रॅक पॅण्ट चढवल्यावर दादा आणि दीप्तीच्या शोधात परत स्टेडियममध्ये गेलो. तिथे गेल्यावर समजलं की तिला हॉस्पिटलमध्ये नेले आहे. समोरचा रस्ता आणि ग्राऊंड असं दोन्ही दिसेल अशी जागा हेरून तिथे जाऊन बसलो. जरा स्थिर झाल्यावर आम्हाला दिसले की उद्या येणारे सिलेक्टर आजच आले होते. ही गोष्ट दिप्तीला अजिबात कळू द्यायची नाही असं दीदिने आम्हाला बजावलं.

रिलॅक्स होत आम्ही चालू असलेल्या मॅच बघत होतो कारण पुढच्या मॅचमधून आम्हाला क्वार्टर फायनलला कोण असणार आहे हे समजणार होतं.

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071
एक संघ मैदानातला - भाग १० http://www.misalpav.com/node/36205
एक संघ मैदानातला - भाग ११ http://www.misalpav.com/node/36256
एक संघ मैदानातला - भाग १२ http://www.misalpav.com/node/36281
एक संघ मैदानातला - भाग १३ http://www.misalpav.com/node/36300
एक संघ मैदानातला - भाग १४ http://www.misalpav.com/node/36406

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2016 - 6:32 pm | टवाळ कार्टा

मी पयला...आणि भारी चालुये सीरीज

मी दुसरा..हो खूपच मस्त चाल्लीय लेखमाला..

सही रे सई's picture

1 Jul 2016 - 7:18 pm | सही रे सई

वाचनखूण साठवली आहे. लेख छान जमले आहेत. सगळे वाचले की अजून लिहीन.

बोका-ए-आझम's picture

1 Jul 2016 - 10:23 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र!

सुधीर कांदळकर's picture

2 Jul 2016 - 7:42 am | सुधीर कांदळकर

सामन्याचे वेगवान वर्णन मस्त जमले आहे.

नाखु's picture

2 Jul 2016 - 8:53 am | नाखु

केला पण भाग वेगवान झाला आहे.
उत्कंठा ,थरार याबाबत ही मालीका बोकेशभाऊंच्या लेखमालेसमान आहे.

पुलेशु,पुभाप्र

नितवाचक नाखु

असंका's picture

2 Jul 2016 - 9:06 am | असंका

वा वा!! सुरेख!!

धन्यवाद...

सिरुसेरि's picture

3 Jul 2016 - 8:45 pm | सिरुसेरि

तुमच्या टिमच्या मेहनतीला बागेतल्या गणपतीच्या आशीर्वादाची जोड मिळाली .

मस्त सुरु आहे सिरिज.वाचतेय.पुभाप्र.

सोनुली's picture

3 Jul 2016 - 9:15 pm | सोनुली

आवडलं. आणखी लिहावे

डश's picture

4 Jul 2016 - 7:14 pm | डश

मस्त लेखमाला

अनुप ढेरे's picture

4 Jul 2016 - 8:06 pm | अनुप ढेरे

छान!

शि बि आय's picture

4 Jul 2016 - 11:18 pm | शि बि आय

धन्यवाद

शि बि आय's picture

4 Jul 2016 - 11:18 pm | शि बि आय

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

5 Jul 2016 - 12:19 pm | मुक्त विहारि

पुभालटा.

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 2:10 pm | धनंजय माने

पु भा ल टा!

अर्धवटराव's picture

7 Jul 2016 - 6:56 am | अर्धवटराव

.