एक संघ मैदानातला - भाग ७

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
10 May 2016 - 2:14 pm

आमचं हरणं सेलिब्रेट करावं म्हणून आपापल्या पैशाने वडापाव खात खात घरी गेलो. घरी गेल्यावर हात पाय धुवून बेडरूम मध्ये डोकावले तर माझे दूरचे काका आले होते. ते शिक्षक असल्यामुळे त्यांना उठता-बसता कोणाला तरी लेक्चर द्यायला आवडत असावं. सध्या माझ्या धाकट्या भावाची म्हणजे पप्याची शाळा सुरु होती. मी घाईघाईने किचन गाठलं, " ऎ आई हे बडबडं कासव कधी आणि का आलं गं ???"
आजीने पाठीत धपाटा घालत, " मोठ्यांना अस बोलू नये केव्हा कळणार तुला... हे काही तुझं ग्राउंड नाही... " डोस पाजायला सुरुवात केली. आजीनेच सुरुवात केली मग काय आईसाहेब खुश झाल्या, तिनेही सुरुवात केली. आता हि खबर काढायची म्हंटल्यावर आधी ह्याचं ऐकून घ्यायला पाहिजे. मी आजीच्या पदराचं टोक धरून तिच्या मागेमागे घरभर फिरायला लागले. किचन, हाँल, किचन,बेडरूम, मग परत हाँल, बाल्कनी.... २-३ मिनिटं तिने हे सहन केलं मग वैतागली आणि हातावर चापट देत काय हवंय ते विचारलं मी लगेच त्याचं येण्याचं कारण आणि कधी जाणार हे विचारून घेतलं.. ते लग्नाला आले होते आणि उद्या लग्नच्या हाँलमधूनच परस्पर परत कारखेलला जाणार होते.. म्हणजे उद्या सकाळी १० वाजेपर्यंतच त्यांना सहन करायचे होते. त्यांची एवढी चौकशी करण्याचे कारण कि त्यांना मुलींनी असं खेळलेलं अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे ते डायरेक्ट सांगू शकत नसले तरी जमेल तसं आई बाबांसमोर मला लेक्चर द्यायचे जेणे करून आई-बाबा मनावर घेऊन माझं खेळणं बंद पडतील. तेवढ्यात मी आले असं कळल्यावर त्यांनी पप्याला सोडलं आणि मला पकवायला हाँलमध्ये आले. कधी नव्हे ते माझी प्रेमाने चौकशी केली, माझ्याशी चक्क ते सरळ आणि हसत बोलत होते. मला ते थोडं विचित्र वाटलं पण म्हंटलं चला समोरच्याशी नीट बोलायची म्हातारपणी तरी अक्कल आली म्हणायची ! मी त्यांच्या प्रेमाच्या चौकशीला तसंच प्रेमाने उत्तर देत तिथून कल्टी मारली आणि बेडरूम मध्ये घुसले.
पप्या स्टोरीबुक वाचत लोळत होता. " ताई तुझ ऐज काय गं?" अचानक त्याचा सेन्सलेस प्रश्न आला.
" तुला काय करायचं... तुज्यापेक्षा मोठीच आहे मी... नसत्या चौकश्या नको करू.. "
" ऐ... हँलो... तुझ्याच कामाचं होत म्हणून विचारलं.. मोठी आहेस म्हणून भाव नको खाऊस... "
"माझ्या कामाचं तुझ्याकडे...?? खर सांगतोयस ना... जर कामाचं काही नसलं तर धुवून वाळत टाकेन तुला... आधीच सांगतेय... आणि अजून १ जर तसं काही नसलं तर तुझा टायगरचा टी-शर्ट मी घेणार..."
" हं.... हा चालेल... आणि जर ते कामाचं असलं तर तुझी ब्लँक ट्रँकपँट माझी… चालेल?"
" हं चालेल... पण हे ठरवणार कोण ? आजी.?? चालेल ? "
" चालेल... डन "
" माझ ऐज आता १९ आहे... बोल"
" पूर्ण कि चालू… ?"
" हं... आता पूर्ण होइल ना पुढच्या महिन्यात.. का ते सांग ना??"
" म्हणजे १८ कम्प्लीट तर.. "
"हो पण का ?"
"जा आजीला बोलाव….! तुझ्याशी खूप सिरियस टॉपिकवर बोलायचं आहे मला..."
" ऐ देढफूट आधी हाफपँट मधून फुलपँट मध्ये ये आणि मग सिरियस टॉपिकवर बोल.. सांग आता गपचूप"
" बघ आजी नसताना सांगू.. चालेल ?"
" हा चालेल ... बोल तू "
" कारखेलचे काका नुसते लग्नाला आलेले नाहीत... "
"मग त्याला मी काय करू.. त्यांना काय हवा तो गोंधळ घालू देना.... उद्या सकाळी १० वाजता ते निघणार आहेत तोपर्यंत मला त्यांच्यापासून माझे कान वाचवायचे आहेत बस्स... चान्स मिळाला की जाम कान खातात ते..."
" अरे गोदाक्का... ऐक ना माझं.... किती बोलतेस... "
" हं.. सॉरी.. बोल... "
"तुला त्यांचा भाचा सतीश माहित आहे का ?"
" सतीश... नाही.. का त्याचं काय आता ?"
" त्याच्यासाठी ते तुला विचारात होते... "
" हं... म्हणजे.... ??"
" मंद... तुझ आणि सतीशच लग्न... "
" . . . . . . काय?"
"मग काय मी कानडीत सांगतोय... "
" चाल रे फेकू नको.... खरं सांग ना.. "
" हे बघ मी खरच बोलत आहे, हवं तर तू आजीला विचार... "
" हे कधी झालं सगळ आणि मला आई बाबा काही बोलले नाही ते... "
" संध्याकाळी झालं हे सगळ... त्यांनी आई आणि आजीकडे विषय काढला... मग बाबा आल्यावर बाबांच्या पण कानावर घातलं "
" शीss... काय फालतूगिरी आहे.... आणि ते बोलत असताना तू तिथे काय करत होतास तुझ्यासमोर बोलले ते हे सगळं???"
" अरे मी बाल्कनीत होतो माझ्या बँटच्या हँडलला क्रेप गुंडाळत होतो तेव्हा बाहेर हाँलमध्ये हा विषय चालू होता. सगळ्यांना वाटलं मी बाहेर आहे म्हणून ते मोकळेपणाने बोलत होते..."
मी कपाळाला हात मारला, " पप्या आई आजी काय म्हणाल्या…?"
" आई तर एकदम शांत होती आणि ती अजून लहान आहे आत्ता कुठे १८ पूर्ण झालीय तिला अस आजी सारख म्हणत होती... तो सतिश लास्ट इयरला केमिकल इंजिनियर झालाय आणि बारामतीला कुठे तरी जॉब करत आहे. २ वर्षाच्या बॉन्ड नंतर पुण्यात किंवा मुंबईत जॉब बघणार आहे... काका जाम कौतुक करत होते त्याचं "
" गप रे... ते काहीही म्हणतील... मी तयार हवी ना.. मला काही तो अजिबात आवडत नाही "
" अग पण त्याला तू आवडतेस ना... "
" काय? डोक फिरलं कि काय तुझं? तुला हे कोणी सांगितलं ?"
" असं काका आई आणि आजीला सांगत होते... "
" काय?"
" की तू त्याला आवडते हे सतीशने त्याच्या मोठ्या बहिणीला सांगितलं मग तिने त्याच्या आईला मग त्याच्या आईने काकांना... आता हे अजून कोणाकोणाला सांगितलंय काय माहित? "
" पप्या यार हे काय चालू झालंय नवीन... ??"
" तू खर खर एक गोष्ट सांग... तुला करायचं आहे का लग्न त्याच्याशी? तुझं वय, शिक्षण, आई, बाबा, आजी आणि मी आमचा विचार न करता सांग"
" वेडा आहे का रे तू ?? मला त्याच्याशी अजिबात लग्न करायचं नाहीये.. आणि जर हे लोक जबरदस्ती करायला आले तर मी पळून जाईन.. "
" ऒ पी. टी. उषा थंड घ्या... तुला कोणीही जबरदस्ती करणार नाहीये.. मुळात आईलाच हे मान्य नाहीये अस मला वाटत.. त्यामुळे ते तुझ्यापर्यंत येणार नाही आणि ते विषय काढत नाही तोपर्यंत तू काही बोलू नको आणि त्यांनी विचारले तर तुझा नकार ठामपणे सांग त्यांना… बास.. विषय संपला"
" हं... चालेल... हे ठीक राहील... "
" चल आता... तुझी ब्लँक ट्रँकपँट माझी"
" काय खडूस वासूलीभाई आहेस रे केवढा सिरियस टॉपिक आहे हा… तुला ट्रँकपँट सुचतेच कशी?"
" त्यात काय.. टॉपिक सांगितला... सोल्युशन सांगितलं... अब तो हक बनता है।"
मी मुकाट त्याला ब्लँक ट्रँकपँट कप्प्यातून काढून दिली.. डोक बधीर झालं होत. बघू जो पर्यंत विषय निघत नाही ती पर्यंत शांत राहायचं अस ठरवलं.
संध्याकाळी जेवायालासुद्धा त्यांच्याबरोबर बसायचं नाही म्हणून तेव्हा भूक नाही म्हणून सांगितलं आणि नंतर ते शतपावली करायला गेले तेव्हा जेवून घेतले. मला ह्या विचारांपासूनसुद्धा लांब पाळायचं होत. एवढ्यात लग्न वैगरे तर अजिबातच नाही. नेमकी आणि उद्या सकाळी प्रँक्टीस नव्हती त्यामुळे जास्तीत जास्त वेळ झोपून काढणं हा एकच मार्ग होता. उद्याचा १० वाजेपर्यंतचा वेळ लवकर निघून जावा अशी प्रार्थना करत ते परत घरात यायच्या मी आधी झोपून गेले.

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

क्रेझी's picture

10 May 2016 - 2:21 pm | क्रेझी

अर्रे कहानी में ट्विस्ट :), भारी आहे :)

अरे भारीच. भाउ बहीणीचं नातं मस्तच एकदम.

टोटलच लिहिंणं एकदम पटणेबल हाय राव. फ्लुयेन्ट आन रियल रियल.

टवाळ कार्टा's picture

10 May 2016 - 2:35 pm | टवाळ कार्टा

:)

एकनाथ जाधव's picture

10 May 2016 - 3:20 pm | एकनाथ जाधव

सुन्दर वळण आलय कथेत.

अरेच्चा! ही मॅच तर आता मैदानाच्या बाहेर आली! पुभाप्र.

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 10:51 pm | तर्राट जोकर

अहं, भलत्याच मैदानात आली... =)) खत्रा ट्वीस्ट.... पुभाप्र.

बोका-ए-आझम's picture

11 May 2016 - 1:46 am | बोका-ए-आझम

हे दूरचे काका - मामा दूरच बरे! नुसता त्रास! पुभाप्र!

नाखु's picture

11 May 2016 - 9:04 am | नाखु

मदत नको असे सांगावे वाटते अशी प्रकरणं आहेत ही !!!!

लेखमाला मस्त चालली आहे

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 2:18 am | वैभव जाधव

मॅच आधी लग्न ???? नो वे. आधी कबड्डी कबड्डी... मग समोरच्या भिडूचा श्वास काढायचा...

हे लग्न प्रकर्ण लौकर संपू दे

अनुप ढेरे's picture

11 May 2016 - 10:38 am | अनुप ढेरे

छानच. संवादपण भारी लिहिलेत!

असंका's picture

11 May 2016 - 7:58 pm | असंका

जबरदस्त सांगताय गोष्ट..
धन्यवाद

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 10:52 pm | तर्राट जोकर

ह्या रेड ला कसं कवर करतील ताई ते बघूया प्फुडच्या भागात...

प्रमोद देर्देकर's picture

12 May 2016 - 11:03 am | प्रमोद देर्देकर

सगळे ६ भाग आत्ताच वाचुन काढले. मस्तच. लई भारी .