एक संघ मैदानातला - भाग १४

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
16 Jun 2016 - 3:35 pm

रात्री पत्ते खेळत चकाट्या पिटल्यामुळे सकाळी काही वेळेत जाग आली नाही. शेवटी दादांनी येउन उठवल्यावर आमचा सूर्योदय झाला. सकाळचा वाॅर्मअप करण्यासाठी आम्ही तयार होऊ लागलो पण संडास आणि बाथरूम इतर संघांनी अडवल्यामुळे आमची पंचाईत झाली होती. १५ मिनिट कानोसा घेत आत बाहेर केल्यावर आपली इथे डाळ शिजण कठीण आहे हे दिसलं. तोंड धुवून प्रत्येकीने पिशवीमध्ये आपापले अंघोळीनंतरचे कपडे कोंबले आणि आम्हाला दिलेली बादली आणि मग घेऊन आम्ही तशाच हाफ पॅन्ट आणि शूजमध्ये ग्राउंडच्या दिशेने सुटलो. सकाळी सकाळी वाॅर्मअप करायचं सोडून हि सगळी फौज बादली आणि पिशव्या घेऊन कुठे चालली हे बघायला दादा आमच्या मागे पळत आले.
" अरे… कुठे चाललात ह्या अशा अवतारात ?"
" दादा… आम्ही फक्त तोंड धुतलं बाकीच आवरायला आम्ही ग्राउंडवर जात आहोत" रूपाने दादांना माहिती दिली.
" …. ग्राउंडवर??? हीहीही "
" ओ दादा.. पीजे नका हो मारू... आधीच हालत बेकार आहे.. " रेश्माने तिच्या वैतागचं प्रदर्शन केलं.
" अरे हो... पण बाकी कपडे वैगरे नाही का तुमच्याकडे अश्या निघलात ते??"
" जाऊ द्या हो दादा... आम्हला काही नाही त्याचं"
" तुम्हाला नाही पण लोकांना आहे ना... आजूबाजूला बघा जरा... सर्कसमधल्या प्राण्यांना बघावं तसं बघतायत तुम्हाला.. अरे मेन रोड काय हाफ पॅन्ट घालून फिरायची जागा आहे का ? "
खर तर लोक आमच्याकडे विचित्र नजरेने बघत होते पण आमच्या अर्जन्सीपुढे आम्हाला काही दिसत नव्हतं. " आम्ही कुठे फिरतोय आम्ही तर ग्राउंडवर जात आहोत... " दीप्तीने तोंड उघडलं.
" आणि तुम्हाला ग्राउंडवर काय करायचं आहे... ? आणि कसं?"
" तिथलं बाथरूम तसं मोठ आहे आणि आता तिथे गर्दीही नसेल. सो... तिथे आम्ही आधी पोट मोकळी करू मग वाॅर्मअप आणि मग आंघोळ करूनच रूमवर येऊ...आहे कि नाही मस्त आयडीया.." मी दादांना पटवण्याचा प्रयत्न करून पाहिला.
" हा... हे ठीक आहे पण त्याकरता हे असं यायची काय गरज ?" तरी दादा त्यांच्या मुद्द्यावर ठाम होते.
" अहो किती कपडे नाचवायचे? दादा नका तुम्ही टेन्शन घेऊ...तुम्ही येताय का ग्राउंडवर? " रूपाने विषय बदलण्याचा प्रयत्न केला.
" म्हणजे काय ? मग मी इथे बसून काय करू ? "
" बर मग तुम्ही स्टेडीयममध्ये बसा आम्ही तुमच्याजवळ पिशव्या ठेऊन जाऊन येतो "
" ठीक आहे तसं तर तसं…"
भराभर चालत आम्ही ग्राउंडवर पोचलो. सुदैवाने सगळ मोकळ होत. म्हणजे आमच्यासारखं अजून कुणाचं डोक चाललं नव्हत. पटापट पिशव्या दादांजवळ ठेऊन आम्ही बाथरूमच्या दिशेने धावलो. ठरल्याप्रमाणे वाॅर्मअप आणि आंघोळ असं आवरायला ३ तास गेले. नाश्ता हा प्रकार तोपर्यंत बंद झाला होता. भूक तर जबरदस्त लागली होती आणि जेवणाची वेळ व्हायला अजून तास ते दीड तास सहज होता. रूमवर जाता- जाता दादांकडून पैसे घेऊन आम्ही काकड्या, बोरं, कैऱ्या, चिंचा आणि भरपूरसं मीठ आणलं … आणि मग मस्त लोळत गप्पा ठोकत आमचा चरण्याचा प्रोग्रॅम सुरु झाला…
दुपारी दादांनी ढोसल्यावर उठून जेवून आलो आणि परत ताणून दिली. आज मॅच नसल्यामुळे जर निवांत वाटत होत. ग्राउंडवर देखील उशिरा जाऊन चालणार होत त्यामुळे परवापासूनची पेंडीग झोप पूर्ण करण्याच्या इराद्याने आडवे झालो होतो.
छान गाढ झोप लागली असताना तुप्या पायाने मला ढोसून उठवले.
" ऐ.. घोडे... काय आहे?? कशाला उठवलस??" अत्यंत त्रासिक सुरात मी कुरूकुर केली.
" ते बघ जरा.. " तुप्या.
" काय आहे??" मी
" अग.. संजू गायब आहे"
" काय?? कुठे ? बघू... "
" ऐ.. ओरडू नको ना.. मंद "
" आईशपथ... हि गेली कुठे ?"
" चल आपण बघूया... " मी आणि तुप्या हळूच दाराबाहेर सटकलो.
शाळेच्या आवारात, बाथरूम शाळेच्या आजूबाजूला सगळीकडे शोधून झाल. संजू कुठे दिसली नव्हती. तिने आम्हाला कोणालाही सांगितलं नाही म्हणजे दादांना पण सांगितलं नसणार.. असा आमचा अंदाज होता. थोडं अजून पुढे, थोडं अजून पुढे करत आम्ही बाजारपेठेजवळ आलो. ह्या पोरींना अशीच फिरायची सवय दिसतेय असं वाटून ह्यावेळी लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्हालाही तेच हव होत. तेवढ्यात एस टी डी बूथ मध्ये लाजत मुरकत बोलताना आम्हाला संज्या दिसली.
" आता मेलीच ही... " तुप्या
" तुप्या थांब ना.. अजून किती वेळ आणि कशी बोलतेय ते बघू ना... "
" तिच्या बोलण्यावरून सांगतेय मी ती त्या झिपर्याबरोबरच बोलत असणार... "
" हो… पण तरी जरा थांब"
" … तू कशाला तिची बाजू घेत आहेस? "
" अरे ह्यात बाजूचा काय संबध ? थांब तुला कळेल सगळ "
तेवढ्यात संजूने फोन खाली ठेवला आणि तरंगत ती बाहेर आली दुकानदाराला पैसे दिले आणि परत यायला निघाली. रस्त्याच्या कोपर्यावरच आम्ही दोघी उभ्या होतो. एकटीच हसत येत असताना एकदम आम्हाला समोर बघितल्यावर तिची हवा टाईट झाली.
" कोणाशी बोलत होतीस ?" तुप्या खाऊ कि गिळू ह्या नजरेने तिला बघत होती.
" अ.. आईशी बोलत होते.. "
" अच्छा ?? आपल्याला पालकांना फोन करण्यासाठी एक वेळ नेमून दिली आहे ना? तेव्हा का नाही केलास? " मी
" आणि तसही काल रात्री तू सगळ्यांबरोबर तुझ्या आईला फोन केला होतास ना?" तुप्या आता चांगलीच तापायला लागली होती.
" संजू खर काय ते सांग.. आम्ही नाही कोणाला सांगणार.. "
अस म्हणाल्याबरोबर रस्त्यात संजूने रडारडीला सुरुवात केली. " हो मी चिरागला फोन केला होता.. "
" आधी ते रड बंद कर... आणि बोल.. हं.. पुढे ?" तुप्या गुरगुरत म्हणाली
" पुढे काय ? त्यालाच फोन केला होता...खरच.. शप्पथ "
" का? तुला दीदीने मागे समजावलं आहे ना गं? का अस करतेस परत परत ?" मी.
" मला चिराग आवडतो ग... "
" ठीक आहे आवडतो वैगरे...पण त्याला सेटल तर होऊ दे..तुमच्या ह्या नाटकापाई तो मुलगा त्याचं नीट कॉलेज पण अटेण्ड नाहीये हे काय तुला माहित नाही का ? अरे हॉटेल मॅनेजमेंण्टला अॅडमिशन घेतलंय ना त्याने ? वर्ष वय गेलं तर किती नुकसान होईल त्याचं... त्याचा तरी विचार कर ना.. " मी संजूला म्हणाले.
" संजा.. तुझी ही फालतूगिरी बंद कर.. परीक्षेआधी ग्राउंडवर ह्या गोष्टीमुळेच राडा झाला ना?? तरी तुझ परत तेच सुरु आहे ! बास कर नाही तर अप्पांना सांगावं लागेल आम्हाला " तुप्याने सरळ सरळ धमकी दिली.
" प्लीज आप्पांना नको सांगू.. "
" ठीक आहे पण तू त्याला सतत भेटू नकोस. त्याला जरा अभ्यास करू दे.. उगाच पागलसारखं करू नका दोघ.. आता कधी फोन करणार म्हणाली आहेस त्याला?" मी परत गाडी रुळावर आणायचा प्रयत्न करत म्हणाले.
" अ... अस काही सांगितलं नाहीये.. "
" बर... पण करशील तेव्हा मला घेऊन जा... मला बोलायचं आहे त्याच्याशी"
" तू... तू काय बोलणार?? "
" ऐ… तुझ्या चिरागला घेऊन पळणार नाही आम्ही… " तुप्या संजूला चिडवत म्हणाली
" चाल आता रूमवर..आणि हे सगळ पोटात ठेवण्यासाठी चल आम्हाला आईसक्रिम दे" तुप्यामधलं खादाड कोंबडं जागं झालं.
मलई कॅण्डी खात खात आम्ही रुमच्या दिशेने चालू लागलो. आता परत झोपण्यात अर्थ नव्हता. तयारी करून ग्राउंडवर जायला पाहिजे. आज आपली मॅच नाहीये पण इतरांच्या मॅचेस तर बघू. क्वार्टर फायनलला आणि सेमी फायनल आहेच ना...
आम्ही रूमवर पोचलो तेव्हा सगळी सेना जागी झाली होती. सगळ्यांना आवरायला सांगून आम्हीही आवरायला घेतलं. आज कोल्हापूर आणि वसईची मॅच होती. त्यावर आम्हाला उद्याचं प्लानिंग करायचं होत.
तासाभरात तयारी करून आम्ही चहासाठी मेसमध्ये पोचलो. तिथे वसईची टीम पण होती. त्यातल्या काही जणी आमच्याकडे बघून पण न बघितल्यासारख करत काहीतरी कुजबुजत होत्या. आम्ही दुर्लक्ष केलं पण त्यांची मेन रेडर आम्हाला कुठे दिसत नव्हती. कुठे गेली होती कोणास ठाऊक पण काही तरी नक्की चालू होत. तेवढ्यात बाहेर वसईचे कोच कोल्हापूरच्या टीमच्या सरांशी काहीतरी बोलताना जागूला दिसले. तिने धावत दादांना गाठलं,
" दादा... आपला निरोप कोल्हापूरच्या टीमला नक्की मिळाला ना?"
" हो.. झालं ना आमचं बोलण.. ते उद्यासाठी तयार आहेत.. का ग ?"
" काही नाही सहजच.. आता त्यात काही बदल करू नका .. "
" आता कशाला बदल होईल.. उगाच काही तरी... सारखं सारखं त्या संयोजकांना कोण पटवणार ? "
" झाला का चहा तुमचा ? झाला असेल तर चला ग्राउंडवर जाऊन बसू.. "
" हो झाला.. तुम्ही व्हा पुढे आम्ही आलोच.. "
दादा गेट बाहेर पडले नाही तोच कोल्हापूरचे सर आणि वसईचे कोच दादांशी बोलायला आले. प्लानमध्ये थोडा बदल करून आमची उद्या ठरलेली मॅच आज घेऊ आणि वसई विरुद्ध कोल्हापूर उद्या घेऊ अस त्यांनी सुचवलं. वसईच्या मेन रेडरची तब्येत बरी नसल्यामुळे ती काही आज खेळू शकणार नाही त्यामुळे आज आम्ही खेळाव म्हणून ते सांगत होते.
ह्या वेळी मात्र दादा ठरलेल्या प्लानवर ठाम राहिले आणि नव्या प्लानला सरळ नाही म्हणाले. कारण आमची आणि कोल्हापूरची आधी मॅच झाली असती तर वसईने कोल्हापूरला कितीने मारल्यावर ते गटातून विनर बाहेर पडतील ह्याचा सरळ हिशोब लागणार होता. कदाचित त्यासाठीच हे नाटक असावं असं आम्हाला वाटत होत, पण ह्याचा विचार वसईच्या टीमने आधी करायला हवा होता. कोल्हापूरच्या आधीच्या प्रोपोजलला ते नाही म्हणाले आणि आता फसले होते. आम्ही काही माहीतच नाही अस भासवत स्टेडीयममध्ये जाऊन बसलो. पहिल्या मॅचसाठी सगळ्या संघाना दुसरा पुकार दिला गेला. आज आम्ही फक्त शांतपणे सगळे गेम बघणार होतो.

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071
एक संघ मैदानातला - भाग १० http://www.misalpav.com/node/36205
एक संघ मैदानातला - भाग ११ http://www.misalpav.com/node/36256
एक संघ मैदानातला - भाग १२ http://www.misalpav.com/node/36281
एक संघ मैदानातला - भाग १३ http://www.misalpav.com/node/36300

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

16 Jun 2016 - 3:40 pm | एस

एकच नंबर. पुभालटा.

नाखु's picture

16 Jun 2016 - 3:40 pm | नाखु

चालू आहे मालीका..

बराच उशीर केला या भागाला..

पुलेशु
नितवाचक नाखु

सिरुसेरि's picture

16 Jun 2016 - 3:42 pm | सिरुसेरि

सडेतोड लेखन . +१००

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2016 - 3:55 pm | टवाळ कार्टा

भारीये

मुक्त विहारि's picture

16 Jun 2016 - 4:07 pm | मुक्त विहारि

जबरदस्त

अनुप ढेरे's picture

16 Jun 2016 - 4:13 pm | अनुप ढेरे

छान चालू आहे!

नीलमोहर's picture

16 Jun 2016 - 4:22 pm | नीलमोहर

मस्त !

क्रेझी's picture

16 Jun 2016 - 4:45 pm | क्रेझी

मस्त चालू आहे कथा :) :)

अभ्या..'s picture

16 Jun 2016 - 5:05 pm | अभ्या..

मस्त. जरासा स्पीड मंदावल्यासारखा वाटतोय पण ओके.

सुधीर कांदळकर's picture

18 Jun 2016 - 7:43 am | सुधीर कांदळकर

आयोजकांपुढे ठळकपणे मांडायला पाहिजे. तुमच्या दादा आणि आप्पांनी ते केले की नाही कळायला मार्ग नाही.

शि बि आय's picture

18 Jun 2016 - 1:04 pm | शि बि आय

ह्या गोष्टी बर्याच टूरला होतात. बरेचदा संयोजक मार्ग काढतात पण तो पर्यंत असा काहीतरी जुगाड करावा लागतो

अगोचर's picture

27 Jun 2016 - 1:32 am | अगोचर

बरेच दिवस वाट बघत आहे. पुढ्चा भाग लवकर येऊद्या !

असंका's picture

27 Jun 2016 - 9:53 am | असंका

+१

सनि's picture

29 Jun 2016 - 4:25 pm | सनि

मस्त चालू आहे

देश's picture

30 Jun 2016 - 3:10 pm | देश

पुढचा भाग कधी येणार ?

देश

अभ्या..'s picture

30 Jun 2016 - 8:15 pm | अभ्या..

ओ शीबीआय,
प्रो कबड्डी लीग ला उतरवलीय का काय टीम? ;)
टाका ना पटकन पुढचा भाग.