छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
4 Sep 2014 - 2:37 pm

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला नुकतीच १७५ वर्षे झाली.

या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला.

मालिकेतील या दुसर्‍या स्पर्धेचा विषय "आनंद" हा आहे. या विषायानुरूप तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे ११ सप्टेंबरपर्यंत प्रत्येकी एक छायाचित्र इथे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे १८ सप्टेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल.

स्पर्धेचे अन्य नियमः

१)प्रत्येकजण फक्त एकच चित्र अपलोड करू शकतो.
२)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
३)यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात.
४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा.
५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, आदि माहिती चित्रासोबत शक्यतो द्यावी.
६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी.
७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल.
८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील. आणि ही छायाचित्रे मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये वापरण्यात येतील.
९) एकदा सादर केलेले छायाचित्र कोणत्याही कारणासाठी बदलता येणार नाही.
१०) मते देताना कृपया 'सेल्फी' देऊ नयेत ही विनंती. स्पर्धक हे मतदार असल्याने टेक्निकली असे करणे चूक नाही. पण इतरांचाही विचार व्हावा.

स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

पहिल्या स्पर्धेच्या नियमात बदल म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला फक्त एक छायाचित्र सादर करता येईल. गुण देण्याची पद्धत पहिल्या स्पर्धेप्रमाणेच राहील.

पहिल्या स्पर्धेत ज्यांची चित्रे विजेती ठरली नाहीत त्यांनी निराश न होता या स्पर्धेत पुन्हा चांगली छ्याचित्रे सादर करावीत ही विनंती. प्रत्येकाचा आवडता विषय वेगवेगळा असतोच! पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि या तसेच पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा!

छायाचित्रणआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

घारापुरी येथील कल्याणसुंदर शिव अर्थात शिवपार्वती विवाह प्रतिमा.

शिवाच्या चेहर्‍यावर समाधान, पार्वतीच्या चेहर्‍यावर शंकरासारखा पती मिळाला म्हणून सलज्ज आनंद तर हिमालयाच्या चेहर्‍यावर कृतार्थतेचा आनंद.

Date taken 3/1/14, 2:15 PM
Camera Canon EOS 550D
Lens Canon EF-S18-55mm f/3.5-5.6 IS II
Focal Length 18mm
Exposure 1/25
F Number f/3.5
ISO 3200
Flash Not used

कुठलेही पोस्ट प्रोसेसिंग केले नसून छायाचित्रातला अनावश्यक भाग गाळला जावा म्हणून चित्र कातरले आहे.
a

वेल्लाभट's picture

4 Sep 2014 - 10:06 pm | वेल्लाभट

कोथळीगडाच्या पायथ्याच्या पेठ गावातली ही दोन लहान मुलं. टायर चा गाडा खेळत होती, आम्हीही गेलो, गप्पा मारल्या. आमच्या प्रश्नांची इतक्या आनंदाने उत्तरं देत होते हे पठ्ठे, की... ते फोटोत टिपण्यावाचून राहू शकलो नाही मी. शहरातले छक्के पंजे अजून तिथे पोचले नाहीयेत, हे बघून आम्हालाही मनोमन 'आनंद' झाला.

aanand

फोटो विषयी :
अ‍ॅपर्चर : एफ ४.५
शटर स्पीड : १/८००
फोकल लेन्ग्थ : १६ एम एम
आयएसओ : २००
एक्स्पोजर : -०.३ स्टेप
आणि पोस्ट प्रोसेसिंग : लेव्हल अ‍ॅड्जस्ट्मेंट

वल्ली आणि वेल्लाभट दोन्ही चित्रे खूप आवडली! दोन्ही चित्रात दैवी आनंद आहे, एक दगडात गोठवलेला, आणि एक जिवंत!

वेल्लाभटा, त्या मुलांकडे टायरच्या गाडीशिवाय काही खेळणी नसतीलच, पण हा आनंद! मस्तच! नशीब तुझं एका अनोळखी माणसाला असा फोटो घेऊ दिला त्यांनी!

वेल्लाभट's picture

5 Sep 2014 - 9:35 am | वेल्लाभट

गप्पा रंगलेल्या असताना हळूच्चकन मांडीवर ठेवलेल्या कॅमे-यातून शिताफीने हा फोटो मी टिपला, तेवढंच काय ते माझं श्रेय या फोटोमागचं.

किसन शिंदे's picture

4 Sep 2014 - 10:55 pm | किसन शिंदे

आपल्या आई-वडीलांना त्याच्या वयाचं होत पाण्यात खेळताना पाहून या छोट्याला झालेला कौतूक-मिश्रित आनंद.

1

किल्लेदार's picture

4 Sep 2014 - 11:41 pm | किल्लेदार

या बंड्या चे नाव डेनिस का तसलेच काहीतरी होते . पार्कमध्ये माय-बापाबरोबर महाशय बसले होते. नाव घेतले की खाता खाता असा मस्त हसायचा की फोटो काढायचा मोह आवरला नाही.

हिम्मत करून फोटो काढू का विचारले आणि सुदैवाने परवानगी मिळाली. मायबापाला जास्त इरिटेट न करता पटापट काही फोटोज टिपले.

"आनंद" हा विषय आणि एकच फोटो असा नियम असल्यामुळे या विषयातला कदाचित माझ्याकडील एकमेव फोटो निवडताना त्रास झाला नाही.

(लेन्स ५० मिमि . कॅनन ४५०D )

IMG_171511

किसन शिंदे's picture

5 Sep 2014 - 12:14 am | किसन शिंदे

अप्रतिम फोटो. किल्लेदार तुम्ही लैच झाक फोटो काढता बघा.

किल्लेदार's picture

5 Sep 2014 - 11:04 am | किल्लेदार

:)

स्पर्धेसाठी नाही
कॅमेरा जुना फिल्मवाला. बहुतेक कॅननचा होता. (तेव्हा माझ्याकडे डिजीटल कॅमेरा नव्हता.)
स्कॅन करुन टाकल्यामुळे सुस्पष्टता तेवढी नाहीये.
घरात पहिल्यांदाच इतकी सगळी माणसं एकत्र पाहुन बाईसाहेबांच्या आनंदाला इतकं उधाण आलेलं की एका जाग्यावर स्थिर उभी रहायला तयर नव्हती. कसं बसं भिंतीवरच्या तिच्या नावासकट तिला फ्रेममधे टिपायचा प्रयत्न केला.
******************************************************************************
पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद..

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2014 - 12:20 am | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट आहे फोटो !

स्पंदना's picture

5 Sep 2014 - 6:00 am | स्पंदना

काय हसू आहे!!

प्रशांत's picture

5 Sep 2014 - 9:02 am | प्रशांत

अप्रतिम...

प्रचेतस's picture

5 Sep 2014 - 9:05 am | प्रचेतस

हेच बोलतो.
अगदी निरागस हसू.

किसन शिंदे's picture

5 Sep 2014 - 9:11 am | किसन शिंदे

अनोखीचा 'अनोखा' फोटो. मस्तच आहे.

चौपाटीवर (बीचवर) जायचं म्हणून रूसून बसलेल्या छोट्याला जेव्हा इथल्या एका तलावाजवळ बनवलेल्या 'बीच' वर नेलं तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
Finally at beach

at beach

दशानन's picture

5 Sep 2014 - 12:42 am | दशानन

वाटचाल

पैसा's picture

5 Sep 2014 - 6:47 pm | पैसा

वेगळाच! आवडला फटु!

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Sep 2014 - 3:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

दोन तीन वेळा नीट निरखुन पाहिल्या नंतर लक्षात आलं
बेहद्द आवडला फोटो.

पैजारबुवा,

चित्रगुप्त's picture

5 Sep 2014 - 1:52 am | चित्रगुप्त

"पहा आजोबा, मी पण तुमच्यासारखं चित्र काढू शकतो ..."
पहिल्यांदाच चित्र काढायला जमल्याचा आनंद.
.

Gotcha!

HTC-1 मोबाईल फोनच्या कॅमेर्‍यावर काढलेला फोटो, EXIF data कसा काढायचा माहीत नाही
चिमुरडीचे वय ११ महिने, स्थळ घरातील सोफा, बाबांची नजर चुकवून लॅपटॉपवर झडप!

स्पंदना's picture

5 Sep 2014 - 6:08 am | स्पंदना

हा असा खट्याळ आनंद फक्त या वयातच होउ शकतो.

श्रीरंग_जोशी's picture

5 Sep 2014 - 9:24 am | श्रीरंग_जोशी

मिपावर या प्रकारच्या स्पर्धा व्हाव्या अशी सूचना देणारे सर्वसाक्षी अन त्यासाठी कष्ट घेणाऱ्या संपादकांचे आभार.

'आनंद' हा विषय रोचक वाटत असला तरी नक्कीच आव्हानात्मक आहे. सर्वच प्रवेशिका आवडल्या. किल्लेदार यांनी काढलेला फोटो तर बेबी प्रॉडक्टस बनवणाऱ्या कंपनीसाठी व्यावसायिक छायाचित्रकाराने काढलेला फोटो वाटतो.

परंतु जवळजवळ सर्वच प्रवेशिका बाळांच्या किंवा लहान मुलांच्या फोटोंच्या येत आहेत ही बाब मात्र खटकली. लहान मुलं निरागस असतात त्यांचे आनंदी भाव टिपणे तुलनेने सोपे आहे. पण तरुण, मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्तिंच्या आनंदी फोटोची एकही प्रवेशिका येऊ नये हे जरा निराशाजनक वाटते.

वेल्लाभट's picture

5 Sep 2014 - 9:30 am | वेल्लाभट

एकच दिवस झालाय जोशी साहेब

जसे मानाचे गणपती मागून येतात, तसे सॉलिड सॉलिड मिपाकर अजून उतरवायचेत आपापल्या प्रवेशिका... धीर धरा :)

श्रीरंग_जोशी's picture

5 Sep 2014 - 9:33 am | श्रीरंग_जोशी

:-).

निदान काही प्रवेशिका प्रवाहापेक्षा वेगळ्या असतील अशी आशा आहेच.

मृत्युन्जय's picture

5 Sep 2014 - 4:32 pm | मृत्युन्जय

अगदी हेच. नेमके हेच लिहिणार होतो. मी स्वतः देखील माझ्या मुलाचाच फोटो टाकणार होतो. एवढे सगळे मुलांचे फोटो बघुन आयडिया रद्द केली. खुपच एकसारखेपणा आला आहे धाग्यावर.

पैसा's picture

5 Sep 2014 - 5:26 pm | पैसा

मुलांचे फोटो घरात असतातच आणि दुसरे म्हणजे आपल्याकडे सहसा आपल्या मुलांचे फोटोच जास्त असतात. विषय एक आहे म्हटल्यावर सारखेपणा जाणवेलच, पण तरी प्रत्येक फोटो वेगळा आणि स्वतःची एक कहाणी या फोटोंच्या मागे असतेच असते. येऊ दे तुझ्याकडे असलेला हॅप्पी फोटो!

मी तरी यापासून इन्स्पिरेशन घेणार नक्की!

अनुप कोहळे's picture

5 Sep 2014 - 10:32 am | अनुप कोहळे

हे portrait आहे खान साब ह्यांचे. हे एक हसरे व्यक्तिमत्व, ४० वर्षापासुन मध्यप्रदेश वन खात्यात रेंजर म्हणुन कार्यरत आहेत. सदासर्वदा आनंदी राहण्याचा त्यांचा स्वभाव मनाला सुखावून जातो.

Camera: Canon EOS 6D
Lens: EF 24-105 f/4 L IS USM
Location: रुखड जंगल
Shutter Speed: १/४०
Aperture: f/4
Spot metering to allow background wash out and details on face preserve.

Basic post processing and BW conversion in Lightroom.

IMG_8931

सुहास झेले's picture

5 Sep 2014 - 10:47 am | सुहास झेले

सहीच... आता पर्यंत आलेले फोटो झकासच... माझ्याकडून एक पाकळी.

सदर फोटो घारापुरी लेणी बघून परत येत असताना काढला आहे. तीन लहान पिल्ले आमच्या मागे-मागे येत होती, मग आम्ही थांबून बिस्किटं घेतली त्यांसाठी आणि त्यांना भरवत असताना काढलेला का क्लिक. फोटो पिकासा एडिटरने कम्प्रेस केलेला आहे.... (Camera: SONY DSC-W370, ISO: 80, Exposure: 1/125 sec, Focal Length: 6mm)
.
.
.

पैसा's picture

5 Sep 2014 - 11:58 am | पैसा

**** स्पर्धेसाठी नाही ****

मला खरे तर यावेळचे फोटो जास्त आवडलेत आतापर्यंत.

माझ्याकडून एक जुना फोटो. ७/८ वर्षापूर्वीचा. कॅमेरा खास नाही, जुना पोलोराईड. पण मुलाची आणि त्याच्या लाडक्या बोक्याची दिवाळी सुटीनंतरची गळाभेट. आणि दोघांचाही आनंद!

happy

मेव्ह्ण्याच्या लग्नातला फोटो.

p1

Camera NIKON D7000
Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6
Focal Length 65 mm
Exposure 1/500 secs
F Number f/6
ISO 400
Camera make NIKON CORPORATION
Photo processed in Lightroom 4.4

फुगे आवडत नाही असे म्हणणारे लहान मुल अजूनतरी मला दिसलेले नाही
प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण

fgf

फोटो विषयी :
अ‍ॅपर्चर : एफ १.८
शटर स्पीड : १/३५०
फोकल लेन्ग्थ : ३५ एम एम
आयएसओ : १००
एक्स्पोजर : ० स्टेप
पोस्ट प्रोसेसिंग साठी फोटो शॉप वापरलंय. लेयर अ‍ॅड्जस्ट्मेन्ट

सगळ्याप्रकारचे फोटू पहायला आवडतील. लहानांपासून थोरांपर्यंत! मला सगळेच आवडले, भयंकर गोड आहेत.

प्रचेतस's picture

5 Sep 2014 - 5:41 pm | प्रचेतस

स्पर्धेसाठी नाही

आमच्या एका खवचट मित्राचा निरागस आनंदाने ओतप्रोत भरलेला फोटू. =))

a

श्रीरंग_जोशी's picture

5 Sep 2014 - 5:48 pm | श्रीरंग_जोशी

हा तर आमच्या एका प्रेमळ मित्राचा प्रेमळ फोटो आहे.

त्यांनी खादीची वस्त्रे परिधान केलेली दिसत आहेत. कपाळावर टिळा, केसांमध्ये जेल (gel), चेहर्‍यावर निरागस हास्य अन खेळकर देहबोली. मोरसुद्धा जवळ आलाय.

स्पर्धेसाठी असता तर पहिल्या तीनात नक्की आला असता याबद्दल खात्री आहे.

हेच म्हणतो. वल्लीशेठ एक लंबर आलाय फोटो.
खवचट मित्र फोटोत एकदम निरागस दिसतोय ;)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2014 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा

@मोरसुद्धा जवळ आलाय. >>> =)) मोर जवळा आला नाही, =)) मी त्याच्या जवळ गेलोवतो! =))
पाठिवरनं पण हात फिरवलेला.. :) आयुष्यात हा पाळीव मोर अनुभवयाला मिळतोय म्हटल्यावर कोन सोडेल चानस! पण पुढे तिथे(पवनानगर डॅम परिसर) तिथल्या काहि पोरांनी 'ए..फोटो..फोटो.." असा आरडाओरडा करून त्या मोराला चिडवलं. त्यातल्या एका नागमुद्रेनी वेडाऊन दाखवणार्‍या पोरावर तो मोर..असा काहि पंख फडफडवून गेला,की ते अचरट कार्ट त्याच्या क्यॅमेर्‍यासह कडेच्या झाडीत कोसळून ओरबाडलं. झाडी मुळे ओरबाडण्यावर निभावला.नायतर मोरानी त्याला नो मोअर करणाराच हल्ला केलावता.

आनन्दिता's picture

5 Sep 2014 - 8:18 pm | आनन्दिता

मोराचा तुरा आणि तुमच्या केसांचा फुगा यात एक चिवित्र साम्य आहे :)

आनन्दिता's picture

5 Sep 2014 - 8:15 pm | आनन्दिता

क ह र!!!

=))

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2014 - 8:18 pm | अत्रुप्त आत्मा

आंSsssssss =))
दुत्त.... दुत्त!!! =))

पैसा's picture

5 Sep 2014 - 5:51 pm | पैसा

स्पर्धेसाठी नाही

अगदी! गणपती आणि त्याबरोबर घरी आलेल्या मुलानातवंडांच्या मेळ्यात रहायचा आनंद! असाच ७/८ वर्षांपूर्वीचा आहे.

bhau

विकास's picture

5 Sep 2014 - 7:32 pm | विकास

खूप छान / प्रसन्न भाव आहेत.. हा फोटो पाहून मला "सुखी माणसाचा सदरा" दिसला!

हा फोटो स्पर्धेसाठी नाही म्हटल्यावर किती स्पर्धकांनी सुटकेचे नि:श्वास सोडले असतील!

विकास's picture

5 Sep 2014 - 7:20 pm | विकास

असाच एक फोटू...(स्पर्धेसाठी नाही)

स्थळः बेलफास्ट, न्यूयॉर्क राज्य. ४-५ वर्षांपूर्वीचा फोटो आहे.

Shelee

पैसा's picture

7 Sep 2014 - 2:20 pm | पैसा

आई आणि बछडी दोघीही खूश!

जातवेद's picture

5 Sep 2014 - 9:47 pm | जातवेद

टोक्यो मधे तुफान बर्फ पडल्यानंतर बघायला बाहेर पडलेली चिमुरडी,
कॅमेरा: Canon 550D | लेन्स: Canon 50mm | f/2.8 | ISO100

image

sagarparadkar's picture

5 Sep 2014 - 10:22 pm | sagarparadkar

डिस्नेलॅण्डला गेल्यावर अशी आनंदली !!

1

सर्वसाक्षी's picture

5 Sep 2014 - 11:14 pm | सर्वसाक्षी

ananand

बहिणीच्या सासु-सार्‍यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या घरगुती सोहळ्यात उत्सवमूर्तींना सुवासिनी औक्षण करतानाचा टिपलेला क्षण.

Camera NIKON D60
Lens - Nikkor 18-55
Focal Length 24mm
Exposure 1/60
F Number f/4.2
ISO 400

समर्पक's picture

6 Sep 2014 - 6:13 pm | समर्पक

आणि आता तुमचा...

Canon EOS REBEL T3i
f/4.5 1/125s ISO-100 70mm

"मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायला पाहिजे असे एका मराठी कथाकाराने लिहिले होते, ते आठवले. मोर हे आनंदाचे रूप. जगण्याला आनंदाचा स्पर्श न झालेली माणसे मोर होऊ शकत नाहीत. कुणाला असा मोर दिसला तर तो दुस-याला दाखवावा म्हणजे तो आनंदून जातो. म्हणजे आनंद वाटायचा असतो. ही वृत्ती अंगी बाळगली पाहिजे..." - डॉ.नरेंद्र गंगाखेडकर (पु. शि. रेग्यांच्या 'आनंदभाविनी' लच्छीच्या व्यक्तीचित्रणा वर आधारित. कादंबरी-'सावित्री')

राघवेंद्र's picture

8 Sep 2014 - 8:25 pm | राघवेंद्र

खुप आवडला

वेल्लाभट's picture

7 Sep 2014 - 1:26 pm | वेल्लाभट

उत्तमोत्तम फोटोज !

असंका's picture

9 Sep 2014 - 9:00 am | असंका

.
हातात मिळालेला हा पहिला आंबा! आनंद चेहेर्‍यावर मावतोय का पहा...!

(बाकी exif म्हणजे काय ते काय मला माहित नाही. हा पॉइंट आणि शूट कॅमेर्‍यावर काढलेला फोटो आहे.
इतर लोकांनी जसं टाकलंय, तशी माहिती properties मध्ये दिसतीये-
कॅमेरा- सॅमसंग L730, फोकल लेन्ग्थ-12mm, एक्स्पोजर-1/60, f number- f/4.2, ISO - ISO100)

पैसा's picture

9 Sep 2014 - 9:05 am | पैसा

असा आनंद आपल्याला पण व्यक्त करता आला असता तर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2014 - 9:10 am | डॉ सुहास म्हात्रे

मsssस्त ! भन्नाट आहेत छ्कुली, तिचा आनंद आणि फोटो !

कंजूस's picture

9 Sep 2014 - 1:14 pm | कंजूस

आनंदी आनंद चहूकडे.

प्रसाद गोडबोले's picture

10 Sep 2014 - 10:47 am | प्रसाद गोडबोले

विक्रमार्क

v

Date Apr 16, 2014, 5:28:28 AM
Width 2560
Height 1920
File Size 430993
Camera Lenovo
Model Lenovo A3000-H
ISO 60
Exposure 1/30 sec
Aperture 2.8
Focal Length 35mm
Flash Used false
Orientation 1
White Balance 0
Metering Mode 2
Exposure Program 0
Exposure Bias 0.0
Date and Time (Original) 2014:04:16 12:28:28
Color Space 1
X-Resolution 72.0
Y-Resolution 72.0
Resolution Unit 2
Software Lenovo
Date and Time 2014:04:16 12:28:28
YCbCr Positioning 2
Date and Time (Digitized) 2014:04:16 12:28:28
Light Source 255
Exposure Mode 0
Digital Zoom Ratio 1.0
Scene Capture Type 0
Interoperability Index R98

प्रसाद गोडबोले's picture

10 Sep 2014 - 11:04 am | प्रसाद गोडबोले

आनंद ... तुकाराम समजुन घेतानाचा

वृक्षवल्ली आम्हा सोयरी | वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती |
येणे सुखे होय एकांताचा वास | नाही गुण दोष अंगा येत |
आकाश मंडप पृथिवी आसन | रमे जेथे मन क्रिडा करी |
कथा कमंडलु देह उपचारा | जाणवितो वारा अवसरु |
तुका म्हणे होय मनाशी संवाद | आपुलाचि वाद आपणासी || पांडुरंग || पांडुरंग || पांडुरंग ||

p

आनन्दिता's picture

11 Sep 2014 - 4:09 am | आनन्दिता

आमचा सातारा !!!! लै भारी!!
हा " आनंद" अगदी समजु शकते! :)

प्रशांत's picture

10 Sep 2014 - 11:34 am | प्रशांत

अर्णव...
अर्णव

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Sep 2014 - 1:50 pm | ज्ञानोबाचे पैजार

Photu

सह्यमित्र's picture

10 Sep 2014 - 3:26 pm | सह्यमित्र

इमेज कशी टाकतात हो?

सविता००१'s picture

10 Sep 2014 - 3:40 pm | सविता००१

सगळेच फोटो भारी. अत्यंत सुरेख. पण आपली पसंती छ्कुली च. तिचा आनंद केवळ कहर आलाय आंबा मिळाल्यावर.
मी खलास..

सगळ्या लहान मुलांचे फोटू अत्यंत गोड आलेत. तीट लावून फोटू चढवा आता!

सह्यमित्र's picture

10 Sep 2014 - 5:18 pm | सह्यमित्र

http://1.bp.blogspot.com/-ynOZtbV1fKM/VBA4XXPy90I/AAAAAAAAAIU/y5aTHEczUk0/s1600/joy.jpg

वाई जवळील मेणवली येथे ही मुले शूटिंग बघायला आली होती. शूटिंग संपल्या नंतर त्यांनी केलेला हा जल्लोष.

EXIF:
Nikon D3100
Nikkor f/1.8 G 50mm, at f/2.8
Shutter Interval: 1/200
ISO: 100
WB: Auto
Metering : Matrix
Adjusted WB & levels in post processing.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Sep 2014 - 11:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माळा

कॅनन टी३, १८-५५ मिमी, f/4.0, 1/30 sec, ISO 800

जिंपमध्ये किंचित रंग आणि कॉंट्रास्ट बराच वाढवला आहे.

सानिकास्वप्निल's picture

11 Sep 2014 - 12:55 am | सानिकास्वप्निल

ट्युलिपच्या बागेत हसतमुख, आनंदी युवती

.

Camera - Canon EOS 550D
F-stop - f/5.6
Exposure Time - 1/320sec
ISO speed - ISO-320
Focal length - 250mm

ह्या फोटोवर कुठलेही पोस्ट प्रोसेसींग केलेले नाही.

इशा१२३'s picture

11 Sep 2014 - 8:43 am | इशा१२३

a

छोट्यांचा कानगोष्टी करतानाचा आनंद...(कुणी ऐकत तर नाहि ना?)

चिगो's picture

11 Sep 2014 - 11:51 am | चिगो

हा फोटो ह्यापुर्वीपण मिपावर कलादालनात टाकला होता.. चालत असल्यास बघा..
a

साभार : बायको ;-)

पैसा's picture

11 Sep 2014 - 11:53 am | पैसा

किती सुंदर! खरे तर आतापर्यंतचे सगळेच फोटो बघून मस्त वाटतंय अगदी!

संजय क्षीरसागर's picture

11 Sep 2014 - 12:15 pm | संजय क्षीरसागर

काय एकसोएक फोटो टाकतंय पब्लिक. सर्वांच अभिचंदन!!

सौंदाळा's picture

11 Sep 2014 - 1:39 pm | सौंदाळा

मस्त
वोटींग लाइन्स कल से चालु हो रहा हय, हम हमारे नंबर्स के साथ वोट करनेको तयार हय.

स्पा's picture

11 Sep 2014 - 1:47 pm | स्पा

आनंद : लेकराला खांद्यावर बसून जग दाखवण्याचा

fgf

अरे, हां आधी टाकायांस काय झाले होतें तुस?

स्पा's picture

11 Sep 2014 - 2:50 pm | स्पा

हा नंतर टिपला :D

सौंदाळा's picture

11 Sep 2014 - 2:59 pm | सौंदाळा

मला तर आधीचा (फुगे) जास्त आवडला. तो आहेच माझ्या नंबरात.

सूड's picture

11 Sep 2014 - 3:13 pm | सूड

अशी बातमी फोडू नये.

किल्लेदार's picture

11 Sep 2014 - 4:38 pm | किल्लेदार

:)

मदनबाण's picture

11 Sep 2014 - 4:50 pm | मदनबाण

मला तर आधीचा (फुगे) जास्त आवडला.
सुंदरच आहे तो फोटो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2014 - 9:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फोटो आवडला. पार्श्वभूमीमुळे अधिकच जास्त आवडला.

(एक उगाच सूचना - एक चित्र हजार शब्दांचं काम करतं. तुझे फोटोही कल्पक आणि सुरेख असतात. त्याबद्दल फार शब्द खर्च करून चित्राच्या अर्थनिर्णयनावर मर्यादा आणू नयेत असे वाटतं.)

हम्म हे लक्षात नव्हतं आलं
ठांकु

या दोघांचा ( नवरा आणि मुलगा )आनंद असा असा टिपता आलाय हाच माझा आनंदाचा क्षण ...

n

सुहास..'s picture

11 Sep 2014 - 9:15 pm | सुहास..

x

असं सुचवतो.

पैसा's picture

13 Sep 2014 - 12:48 pm | पैसा

आणखी एक दिवस वाढवून देऊ. उद्या दुपारी १२.३० पर्यंत फोटो अपलोड करता येतील.

संजय क्षीरसागर's picture

13 Sep 2014 - 3:47 pm | संजय क्षीरसागर

आभार्स!

मदनबाण's picture

13 Sep 2014 - 8:19 pm | मदनबाण

Khel
खरं तर हा फोटो देण्याआधी बराच विचार केला... कारण प्रत्येकाची आनंदाची कारण वेगळी असतात... माझ्या लहानपणा पासुन या फोटोतल्या मुलासारखी अनेक मुलं मी अशीच खेळताना आणि या खेळाचा आनंद घेताना पाहिली आहेत. हा एक पहिला प्रकार आहे,ज्यात एक सायकलचे किंवा असेच एक पूर्ण घासुन तुळतुळीत झालेले,किंवा थोडेबहुत तसेच टायर घेउन दुसर्‍या हातात काठी घेउन त्याला मारत मारत मागे मागे धावत रहायचे. दुसर्‍या प्रकारात हातात काढी किंवा सळी असते जिला एक तार बांधलेली असते व जिचे शेवटचे टोक जरासे वाकडे केलेले असते... त्यात वाकड्या टोकात एक धातुची गोल रिंग असते ती अडकवुन रस्त्यावर धावत फिरायचे. अत्यंत गरीब असलेल्या आणि पायाने अनवाणी खेळात धावणार्‍या मुलांचा हाच तो त्यांचा आनंदाचा क्षण टिपला आहे.त्यांच्यासाठी हा खेळ हाच त्यांचा आनंद !

कॅमेरा :- निकॉन डी-५१००
*रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mona Re Bombay Vikings

विलासराव's picture

13 Sep 2014 - 10:14 pm | विलासराव

सहजच फोटो काढु का म्हाणालो तर ही मुलगी भलतीच खुश झाली.

RAJASTHANI GIRL

RAJASTHAN

बोका's picture

14 Sep 2014 - 9:49 am | बोका

मित्र, संगणकावर काही गमतीशीर , आणि जोडीला पेयही छान.

कॅमेरा - फुजी एस ९५००,
१/४५ से., f २.८, आयएसओ २00