मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी

साहित्य संपादक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - कृषी. येथे शेतांची किंवा फळबागांची छायाचित्रे अपेक्षित आहेत. मिपाकरांनी सुचवल्यानुसार यंदा स्पर्धकांचे नाव प्रवेशिकेबरोबर न लिहिता मतदानाचा धागा प्रकाशित करायचे आम्ही ठरवले आहे. यासाठी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे ३० डिसेंबर. प्रवेशिकेबरोबर छायाचित्रणाच्या ठिकाणाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा. दर वेळी प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित केली जातात. यंदाही तुम्ही अवांतर छायाचित्रे या धाग्यावर प्रतिसादांद्वारे प्रकाशित करू शकता. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहे. यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.

वाचन 15084 प्रतिक्रिया 25

कपिलमुनी Wed, 12/16/2015 - 11:50
कृषी म्हणजे शेती विषयक म्हणजे शेतीची मशागत करतानाची ईई छायाचित्रे चालतील का ? की केवळ पिकांचीच हवी आहेत याचा खुलासा / विवेचन / डिटेल्स अपेक्षित

साहित्य संपादक गुरुवार, 12/31/2015 - 10:35
श्रावणात कोकणात भटकंती करत असताना.. EXIF: Camera - NIKON D90; Lens - 10.0-20.0 mm; f/4.0-5.6; ISO - 400 Exposure - 1/100 sec; Aperture - 10.0; Focal Length - 10mm महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती Camera NIKON D3300; ISO 400; Exposure 1/400 sec; Aperture 11.0; Focal Length 55mm; Focal Length (in 35mm film) 82; Lens 54-201mm f/4-5.7 Flash not used डहाणू येथील एक आंब्याची बाग या बागेत संकरित जातीच्या आंब्यांची झाडे असल्याने ह्या कैर्या इतक्या खाली लगडलेल्या आहेत. तसेच हे आंबे चवीलाही गोडच होतात. पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती भात-लावणी/ पेरणी डिटेल्स: कॅमेरा -७००डी; लेन्स- कॅनन ७०-३०० एम्‌.एम्‌ लेन्स टॅमेरॉन; आय्‌.एस्‌. ओ. - १०० एफ्‌ स्टॉप- एफ्‌ ४.०; एक्स्पोजर टाईम- १/५०० सेकंद; मोड- अपॅर्चर प्रायोरिटी पोस्ट प्रोसेसिंग- लाईटरूम - कलर करेक्शन आणि फ्रेम क्रॉपिंग स्थळ- सिंहगड पायथा विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र राजुरी येथील द्राक्षबाग कॅमेरा - सॅमसंग e७ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे (फेब्रुवारी २००४) EXIF: Canon Powershot A60, f5.6, 1/1000 sec, 16.2mm इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु रत्नागिरी मधील पारंपारीक शेती तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी. EXIF: Shot on DJI PHANTOM 3 Quadcopter Shutter Speed 1/509; f/2.8; ISO 100; Lens 20 mm Fix पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य. कोवळ्या उनामुळे शेतीला नवीनच चमक आली आहे. टीपः चित्रे मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी त्यांवर क्लिक करावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रांना क्रमांक मतदानाच्या धाग्यात देण्याची योजना आहे. त्या धाग्यातला अनुक्रम वेगळा असू शकतो.