मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी

साहित्य संपादक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - कृषी. येथे शेतांची किंवा फळबागांची छायाचित्रे अपेक्षित आहेत. मिपाकरांनी सुचवल्यानुसार यंदा स्पर्धकांचे नाव प्रवेशिकेबरोबर न लिहिता मतदानाचा धागा प्रकाशित करायचे आम्ही ठरवले आहे. यासाठी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे ३० डिसेंबर. प्रवेशिकेबरोबर छायाचित्रणाच्या ठिकाणाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा. दर वेळी प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित केली जातात. यंदाही तुम्ही अवांतर छायाचित्रे या धाग्यावर प्रतिसादांद्वारे प्रकाशित करू शकता. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहे. यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.

वाचन 15084 प्रतिक्रिया 0