छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ५: "भूक"

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
8 Dec 2014 - 9:48 am

http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931
http://www.misalpav.com/node/29297

********************************************

नमस्कार मंडळी! प्रकाशाच्या उत्सवानंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त पाचवी स्पर्धा सुरू करूया!
यावेळचा विषय आहे 'भूक'

ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे!

प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम मात्र आधीच्या स्पर्धेप्रमाणेच राहतील!

सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!

कलाजीवनमानतंत्रछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Dec 2014 - 12:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

Bhook

हा फोटो एकदा मिपा वर ख.फ. वर टाकला होता. नियमात बसत असेल तर ठेवावा.

पैजारबुवा,

गवि's picture

8 Dec 2014 - 12:11 pm | गवि

मस्त आहे.आवडले.

स्पा's picture

8 Dec 2014 - 12:13 pm | स्पा

एकदम परफेक्ट
पैजार ब्वा

विषय हटके आहे हे नक्की

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Dec 2014 - 12:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

या तिनही फोटों मधला कोणता निवडावा असा प्रश्र्ण पडला होता.
Bhook 2

Bhook 3

पहिलं वासराचे आवडले आणि दुसरे माकडाचे यातला मिश्किल भाव आवडला -हातात ३ पार्ले-जी असुनही त्याची नजर पुड्याकडे आहे :)

नंदन's picture

13 Dec 2014 - 1:14 am | नंदन

फोटो आवडला.

झारखंड मध्ये प्रवास करताना झुमरी तलय्या नावाचं गाव लागलं. तोवर हे गाव मला रेडिओ स्टेशनने निर्माण केलेलं काल्पनिक गाव वाटत होतं :-) तिथं एका प्रचंड पुलाचं काम चालू होतं आणि त्या सगळ्या गोंगाटात हा युवक मग्न होता स्वतःच्या (आणि घरच्यांच्या) भुकेची तजवीज करण्यात.

fishing

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2014 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकावेळी एका हुकाला मासा लागल्यावर कळेल पण एकाच वेळी तीन तीन ?
मस्तच.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

8 Dec 2014 - 1:27 pm | प्रचेतस

ताम्हिणी घाटात.

a

स्पा's picture

8 Dec 2014 - 1:31 pm | स्पा

खतरा
फाडू ...कातील

चिगो's picture

9 Dec 2014 - 4:42 pm | चिगो

कहर म्हणजे कहरच फोटो, वल्लीशेठ.. काय जबरदस्त पकडलाय, बॉस, भक्ष्य आणि क्षण दोन्हीपण..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2014 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लंबर एक. लाईक.

-दिलीप बिरुटे

अनुप कोहळे's picture

19 Dec 2014 - 10:30 am | अनुप कोहळे

जबरदस्त. हे सरपटणारे जीव फार क्वचितच कॅमेर्‍यामधे टिपता येतात. त्यांच्या आजुबाजुच्या वातावरणात ते एकदम मिसळून जातात.

एस's picture

8 Dec 2014 - 11:59 pm | एस

'भूक' म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येते एक आर्त खोल जाणीव. एक खिन्न प्रश्नचिन्ह. भकास. भावनाशून्य. असं काही टिपणारं छायाचित्र आहे का कोणाकडे? छायाचित्रण ही मुळात एक संवादाचे माध्यम आहे. कुठल्याही इतर कलेप्रमाणेच, पण तुलनेने जास्त वास्तव. संवादाची मूळ प्रेरणा अभिव्यक्ती. त्या दृष्टीने विचार करणारी काही छायाचित्रे येतील अशी मला अपेक्षा आहे.

म्हणजे, इथे ते अपेक्षित असेल किंवा नसेल, मी फक्त मला काय वाटले ते सांगितले.

"एक खिन्न प्रश्नचिन्ह. भकास. भावनाशून्य. असं काही टिपणारं छायाचित्र आहे का कोणाकडे? छायाचित्रण ही मुळात एक संवादाचे माध्यम आहे. कुठल्याही इतर कलेप्रमाणेच, पण तुलनेने जास्त वास्तव. संवादाची मूळ प्रेरणा अभिव्यक्ती."

+१...

बाकी व्यनि मध्ये बोलूच.

मलाही तसेच वाटले म्हणून धागा उघडला नव्हता. त्यातून लहान मुले, अगदी हाडाचे सापळे झालेली वगैरे बघवत नाहीत. नकोच तसे फोटू. त्यांना प्रथम क्रमांक देववणार नाही.

सखी's picture

9 Dec 2014 - 7:30 pm | सखी

मलाही अगदी असेच वाटले होते म्हणुन भीतभीतच धागा उघडला, पण पहिल्या दोन फोटोंनी ती दुर केली. तसेच वल्लींनी खाली दिलेला फोटोही लगेच आठवला, केविन कार्टरला याच फोटोसाठी Pulitzer अ‍ॅवार्ड मिळाले होते आणि नंतर त्याने आत्महत्या केली....:(

ह्यावरुन केविन कार्टर चा हा गाजलेला फोटो आठवला.

चित्र आंतरजालावरुन.
a

आतिवास's picture

10 Dec 2014 - 6:15 pm | आतिवास

हे घ्या एक प्रकाशचित्र!
असे क्षण आठवले की त्रास होतो, म्हणून आधी नव्हता दिला हा फोटो.
old man

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Dec 2014 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:(

श्रीरंग_जोशी's picture

9 Dec 2014 - 2:28 am | श्रीरंग_जोशी

खारूताई

तीन वर्षांपूर्वी टू हार्बर्स मिनेसोटा येथील सहलीच्यावेळी तेथील लाईटहाऊसजवळ Mini Pretzel खाताना हि खारूताई दिसली. खरं तर हे तिच्यासाठी Junk food आहे.

EXIF: Canon SX30 IS; Exposure: 1/320; F Stop: f/5.8; ISO: 400

अवांतर - "भूक लागल्यावर खाणे ही प्रकॄती, भूक नसताना खाणे ही विकॄती, भूक असतानाही आपल्या वाटच्या भाकरीतली अर्धी दुसर्‍या भुकेल्याला देणे ही सत्कृती". हे वचन यानिमित्ताने आठवले. बहुधा विनोबा भावे किंवा व पु काळे यांचे ते वचन आहे.

विलासराव's picture

9 Dec 2014 - 1:01 pm | विलासराव

असेच.
1

2

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 7:18 pm | टवाळ कार्टा

माणसाला प्राण्यांहून वेगळेपण देणारी भूक....सहजीवनाची...प्रेमाची...आनंदाची भूक

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 8:09 pm | टवाळ कार्टा

हा फोटो विषयाला धरुन नसेल तर कळवावे...दुसरा शोधेन :)

हुकुमीएक्का's picture

9 Dec 2014 - 11:44 pm | हुकुमीएक्का

माझी प्रवेशिका . . .

White Thoratted KingFisher Or खंड्या

किसन शिंदे's picture

10 Dec 2014 - 10:29 am | किसन शिंदे

फोटो नाहीये पण एक ताजी आठवण आहे.

आत्ता काही महिन्यांपूर्वी पुण्यात शिरूरला लग्नाला गेलो होतो. लग्न संध्याकाळचं होतं, त्यामुळे साहजिकच जेवणावळी दुपारी ठेवलेल्या होत्या. आम्ही कार्यालयात पोचेपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते तेव्हा जेवणाची शेवटची पंगत सुरू होती. आमचे दुपारचे जेवण बाहेरच झाले होते, त्यामुळे लग्नात जेवणार नव्हतो. तिथे कार्यालयात सहज फिरता फिरता काही वेळाने जेवणाच्या हॉलबाहेर येऊन पोचलो. तिथे कचर्‍याच्या ठिकाणी ताटात उरलेल्या अन्नाचा प्रचंड मोठा ढिग जमा झाला होता. साहजिकच एवढा मोठा ढिग पाहून धक्का बसला आणि त्याहूनही मोठा धक्का बसला जेव्हा नजर त्या ढिगापलीकडच्या नेहमी बंद असणार्या गेटवर गेली. तिथे गेटच्या पलीकडे त्या फेकून दिलेल्या अन्नाच्या ढिगार्‍याकडे आशाळभूतपणे पाहणारी फासेपारध्यांची म्हणा वा भटक्या जमातीतली पाच ते दहा वर्षांची काही मुले उभी होती. प्रचंड मोठा विरोधाभास!

जेवणाची वेळ टळून गेली होती तरीही, 'लग्नाला आलोय ना? मग आहेराच्या पाकिटाचे पैसे वसूल करायचे या मानसिकतेतून काही लोकं बळेच जेवत होती. पाच वर्षाचे मुल, ज्याला स्वत:च्या हाताने नीट खाताही येत नाही त्यासाठी वाढप्यांना बायका वेगळं ताट वाढायला सांगत होत्या. दोन पदार्थ खाल्ले की, बाकीचे सगळे वायाच! एकीकडे मिळतंय म्हणून सारासार विचार न करता वाया घालवण्याची प्रवृत्ती, तर दुसरीकडे एकावेळचं जेवणही पोटभर मिळत नाही म्हणून मातीतल्या अन्नालाही उचलून खाण्याची लाचारी. :(

ते सगळं चित्र आता या स्पर्धेच्या निमित्ताने डोळ्यासमोर उभं राह्यलंय.

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 11:10 am | टवाळ कार्टा

:(

मागच्याच आठवड्यात एक लग्न अटेंड केलं. बुफे होता म्हणून लोक अक्षरशः ताटात ढीग भरुन घेत होते. खरंच हवंय का, आपल्या नेहमीच्या जेवणात तरी आपण इतकं जेवतो का हा विचार अजिबात दिसला नाही.

अशी लग्नं पाह्यली की 'मिष्टान्नं इतरे जना:' हे पटकन आठवतं. लग्न आपल्यासाठी नाही 'लोकांसाठी' करतात की काय असा प्रश्न पडतो.

असो, धागा हायजॅक व्हायचा.

नाखु's picture

16 Dec 2014 - 9:51 am | नाखु

बुफेचा वेगळाच अर्थ आपल्याकडे घेतला आहे "होऊदे खर्च (जाउ दे वाया अन्न) थोडीच आहे आप्ल्या घरचं"
लहान लहान पोरांना "द्रोणागिरि" पर्वतासारखा "थाळीभार" उचलताना पाहून आणि फक्त उष्टावताना पाहून खरच नक्की भूक कसली हा प्रश्न सतावत आहेच!!

असंका's picture

12 Dec 2014 - 7:23 pm | असंका

.

मला पण भूक लागलीये गं! का एकटीच खाणारेस सगळं?

घराच्या गॅलरीतून काढलेला फोटो असल्याने गज वगैरे मधे येत होते. तेवढा भाग क्रॉप केला आहे. बाकी exif data म्हणजे गेल्या वेळप्रमाणे property मधून देत आहे-

Camera Make and Model- Fujifilm FinePix HS25EXR

F-stop - f/4.5

Exposure Time- 1/350 sec.

ISO Speed- ISO 640

एवढे बास का? कारण अजून बरंच काय काय दिसतंय Properties मध्ये....

..एकदम सही... डोळ्यातले भाव खासच..

अत्रुप्त आत्मा's picture

17 Dec 2014 - 12:28 am | अत्रुप्त आत्मा

@डोळ्यातले भाव खासच..>>> +१

स्पंदना's picture

16 Dec 2014 - 5:20 pm | स्पंदना

सुरेख नजर आहे.

नंदन's picture

17 Dec 2014 - 12:42 am | नंदन

नेमकं छायाचित्र!

श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या 'डोह' ह्या पुस्तकातल्या एका लेखात चिंब भिजून पिलासकट घराच्या आश्रयाला आलेल्या वानरीचं वर्णन करणारं एक वाक्य आहे, ते अचानक आठवून गेलं -

तिच्या डोळ्यांच्या टिंबांत एक केविलवाणी इच्छा तेवे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Dec 2014 - 12:46 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !!!

अनुप कोहळे's picture

19 Dec 2014 - 10:27 am | अनुप कोहळे

हे खुपच छान चित्र आहे. पिल्लाच्या डोळ्यातले भाव सुंदर टिपले आहे.

मधुरा देशपांडे's picture

16 Dec 2014 - 11:06 pm | मधुरा देशपांडे

https://lh3.googleusercontent.com/-hQr-sEcS_X4/UsFOJVw6yeI/AAAAAAAACfk/gjA9MSQQVM8/w1298-h865-no/DSC_0397.JPG

मस्तानी's picture

17 Dec 2014 - 9:48 pm | मस्तानी

थंडीच्या दिवसांमध्ये एकदा संध्याकाळी उरलेला ब्रेडचा तुकडा गॅलरिच्या कठड्यावर ठेवला होता. रात्रीतून मस्त बर्फ पडला तरीही सकाळी खारुताई नाश्ता करायला हजर ! बर्फात लडबडलेला ब्रेड खाणारी खारुताई मी मात्र घरात बसून गरमागरम चहा घेत काचेच्या आडून टिपली :)

स्थळ : मिशिगन

Fluffy

( information as per the file data from Google Photo album, no processing at all)
Dimensions 2048 x 1536
File name DSC03897.JPG
File size 256.25K
Camera DSC-H10
Lens -
Focal Length 63mm
Exposure 1/60
F Number f/4.4
ISO 400
Camera make SONY
Flash Not used

नाही नाही!! आम्ही नाही बघितलं...चालू ते तुमचं मंमं!! हे बघ आम्ही गेलो!!

__/\__

कहर केला आहे!

टवाळ कार्टा's picture

17 Dec 2014 - 10:53 pm | टवाळ कार्टा

भारीये :)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2014 - 8:49 pm | अत्रुप्त आत्मा

ब्रेडी खारुतै मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gif

मोक्षदा's picture

18 Dec 2014 - 7:57 pm | मोक्षदा

सगळेच फोटो मस्त आहेत

मोक्षदा's picture

18 Dec 2014 - 8:34 pm | मोक्षदा

खिडकीतल्या गांडूळखताच्या पेटीवरील फणसाच्या आठळीचा आस्वाद घेताना खारूताई
DSC02326

अनुप कोहळे's picture

19 Dec 2014 - 7:18 am | अनुप कोहळे

मध्यप्रदेशातल्या जंगलात झाडांच्या खोडांवर सिंगडा नावाचा किडा सापडतो. पक्ष्यांचे तो आवडते खाद्य आहे. एक सिंगाडा तोंडात उडवताना.

IMG_8699

वेल्लाभट's picture

19 Dec 2014 - 8:19 am | वेल्लाभट

'द वॉक ऑफ लाईफ'
the walk of life

Sony Cybershot DSC-W50
Aperture - F 4.5
Shutter Speed 1/400
ISO 80
Focal Length 14mm
Exposure Comp 0

पैसा's picture

19 Dec 2014 - 9:48 am | पैसा

मस्त चित्र येताहेत! ४ दिवस आहेत. अजून काही कल्पक चित्रे येऊ द्या!

Kharutai

ह्या बाईसाहेब नायगारा धबधब्या जवळ फलाहार करत होत्या.
EXIF details
Nikon Coolpix 800 C
f/5.6
1/30
34mm
200 ISO

गौरी लेले's picture

19 Dec 2014 - 1:53 pm | गौरी लेले

सगळीच छायाचित्रे सुंदर , मला कन्फ्युजड अकाउंट चे चित्र विशेश आवडले :)

एक से एक बढिया फोटुज आहेत ! :)
सवड मिळताच जुने काढलेले फोटो शोधतो... पाहतो काही सापडतय का या विषयाला... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Make In India

मदनबाण's picture

20 Dec 2014 - 12:52 pm | मदनबाण

Monkey
ओकांरेश्वरच्या मंदीरात जाण्याआधी भोलेनाथांसाठी हार,बेल,फळ इं घेतले आणि ती पिशवी बायडीच्या हवाली केली... अचानक वरचे मर्कट महाशय कुठुन तरी प्रगट झाले ! आणि बायडीच्या हातची पिशवी ओढुन घेतली,त्यातुन हार बाहेर काढला आणि फस्त करुन टाकला. हार फस्त करण्याच्या आधी पटकन या मर्कट महोदयांचा फोटु टिपला. बाकी बायडी ने या घटनेचा बर्‍यापैकी धसका घेतला होता ! :P { माझ्या निरिक्षणा प्रमाणे असा कुठलाना कुठला जीव असतोच ज्यांचा स्त्रीयांना धसका / भिती / दहशद वाटत असते... ;) }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }

sanju's picture

20 Dec 2014 - 1:48 pm | sanju

image

sanju's picture

20 Dec 2014 - 1:52 pm | sanju

image

sanju's picture

20 Dec 2014 - 1:58 pm | sanju

image

sanju's picture

20 Dec 2014 - 2:18 pm | sanju

Rajura Dist.Chandrapur (MS) yethe aka lagnat gelo asatana mangalkaryalaya baher kopryat ha mulaga atishay dayaniy avasthet khali padlele anna uchalun khat hota.ya mulacha photo maza bhau avinash yane kadhala.Mala to mipa var takata yet navhta.mitrachya madatine akher jamala.ajunahi devnagari lihita yet nahi,maf kara sarvjan.

तुम्ही काढलेला हा फोटो मला खालच्या लिंकांवर पण पहायला मिळाला.

http://www.sodahead.com/living/how-would-you-stop-world-hunger/question-...

https://thinkloud65.wordpress.com/2011/07/19/o-god-to-those-who-have-hun...

http://posizyr.prv.pl/ngos-on-world-hunger.php

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

20 Dec 2014 - 2:48 pm | प्रचेतस

नवसदस्यांचा असा हिरमोड करु नये पैजारबुवा.
किती कुंथून कुंथून त्यांनी शोधला असेल बरे हा फोटो. :-\

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Dec 2014 - 3:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

भूक या विषयासाठी कदाचित हे छायाचित्र पात्र नसेल पण हा फोटो इथे टाकण्यामागची भावना (हेतु / प्रेरणा) मात्र स्पर्धेच्या विषयाशी चपखल आहे.

त्या भावनेचेच कौतुक वाटून प्रतिसाद दिला.

कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याची जाहिर माफी मागायला आम्ही तयार आहोत.

पैजारबुवा (कुंथलगीरीकर)

सूड's picture

21 Dec 2014 - 1:31 am | सूड

माका दिसत नाय फोटो!!

anandphadke's picture

21 Dec 2014 - 4:36 pm | anandphadke

मध टिपणारे फुलपाखरू

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2014 - 8:15 pm | अत्रुप्त आत्मा

आ हहाssssssss *HAPPY*
http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy002.gif

आदूबाळ's picture

21 Dec 2014 - 11:49 pm | आदूबाळ

फोटो नाही, पण "भूक" साठी एक ऐड्या.

टीव्हीसमोर सोफ्यावर एक दांपत्य बसलेलं आहे. हातात ताटं. नावरयाचं ताट जेवण संपून रिकामं झालं आहे. बायकोच्या ताटात काही पदार्थ उरलेत, पण तिचं त्याकडे लक्ष नाही, ताट तिरकं झालंय.

नवरा बायको टीवी बघण्यात देहभान हरपून बसले आहेत. खोलीत अंधार - टीवीच्या पाठीमागून काढलेला फोटो - टीवीचा प्रकाश चेहेर्यावर परावर्तित झाला आहे.