हे काय कमी काय?

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
16 Sep 2015 - 9:46 pm

उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून
घरी परततात माणसं, हे काय कमी काय?
सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा
नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय?
सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता
पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय?
भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!
मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

कविता माझीभावकवितामुक्त कवितासांत्वनाकरुणकवितासाहित्यिकजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतर

प्रतिक्रिया

शुचि's picture

16 Sep 2015 - 10:56 pm | शुचि

आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2015 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

फारच छान..

आवडली.

चांदणे संदीप's picture

16 Sep 2015 - 11:26 pm | चांदणे संदीप

"भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!
मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय?"

हे प्रचंड आवडल!

तसे बेवारस कुणीही न मरो हीच प्रार्थना!

मांत्रिक's picture

16 Sep 2015 - 11:31 pm | मांत्रिक

नाव वाचूनच धागा ओपन करतो. आणि प्रत्येक वेळीस एक सुंदर काव्य वाचायला मिळतंच! अप्रतिम लिहिता! तुमची एक स्वतंत्र शैली आहे, जी शब्दांत सांगता येत नाही, पण तुमचा ठसा लगेच ओळखू येतो. असो, अप्रतिम काव्य!

रातराणी's picture

17 Sep 2015 - 5:18 am | रातराणी

वेगळ्याच असतात तुमच्या कविता!

शिव कन्या's picture

23 Sep 2015 - 8:44 pm | शिव कन्या

चला टोपण का असेना, नावा पर्यंत तरी पोहचलो.
वाचनासाठी धन्यवाद.

अहो धन्यवाद आम्हीच देतो! इतकं सुंदर काव्य आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल! लिहित रहा! वाचत राहू!!! आनंद घेत राहू उत्तम काव्याचा!!! प्रचंड आवडते तुमची काव्याची स्टाईल!!!

एक एकटा एकटाच's picture

17 Sep 2015 - 9:17 am | एक एकटा एकटाच

सुरेख
रचना

पुढिल लिखाणास शुभेच्छा

पैसा's picture

17 Sep 2015 - 9:31 pm | पैसा

कविता आवडली!

मदनबाण's picture

18 Sep 2015 - 3:10 pm | मदनबाण

मस्त...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani

प्राची अश्विनी's picture

18 Sep 2015 - 4:32 pm | प्राची अश्विनी

सुंदर!!!!

पद्मावति's picture

23 Sep 2015 - 11:59 pm | पद्मावति

सुरेख! खूप आवडली.

वेल्लाभट's picture

24 Sep 2015 - 12:08 am | वेल्लाभट

कमालीची आवडली! काही ओळी तर अचूक वेध घेणा-या बाणासारख्या...
वाह