आधार (शतशब्दकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
24 Jul 2015 - 10:42 am

(डिसक्लेमर: सदर कथा ही सत्यघटनेवरून जरी प्रेरित असली, तरी, भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही.)

डोकी भडकतील, अशी अतिरंजित भाषणे करून, दिशाभूल घडवणे, नंतर तरुणांच्या हातून दंगली, नरसंहार सारख्या घटना, घडवून आणणे, ही प्रविण बुगाडियाची स्पेश्यालीटी. धर्मरक्षणाचा गदर करून, विश्वधर्म-परिषदेवर, स्वतःची पकड मजबूत केलेली. आज अनुयायांसमोर अश्याच एका ज्वलंत मोर्च्याच्या संचालनात भाषण देवून, नंतर निघालेल्या रँलीमधे तो निघाला होता……
-----------------------------------------------------------------------------------
मोर्च्याच्या दिवशी तो पोलिस अधिकारी शहरात बंदोबस्त ठेवत होता, त्याच्या कारकिर्दीत अनेक रंगांच्या मोर्च्याचा बंदोबस्त इमाने राखला होता. मोर्च्यात सामील झालेली ती वृद्ध व्यक्ती आपल्या डाव्या छातीवर हात ठेवून कोसळणार, एवढ्यात अधिकार्याने त्याला आधार देवून बाकड्यावर बसवले, पोलिसव्हँनमधल्या कीटमधून नायट्रोग्लिसरीनची गोळी त्याच्या जीभेखाली दिली. बरं वाटायला लागल्यावर बुगाडीयाने, अधिकार्याच्या नेमप्लेटकडे पाहिलं…. नाव होतं 'मोहोम्मद मुश्रीफ'.

kkk

वावरसंस्कृतीधर्मइतिहासकथाशब्दक्रीडासमाजजीवनमानमाध्यमवेध

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2015 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्तच.

-दिलीप बिरुटे

अदि's picture

24 Jul 2015 - 10:55 am | अदि

म्हणजे इथे पण हिंदूच वाईट का?? मुसलमान तेव्हढे चांगले????

सदर कथा ही सत्यघटनेवरून जरी प्रेरित असली, तरी, भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2015 - 1:16 pm | प्रसाद गोडबोले

हेच म्हणणार होतो

चुकलामाकला's picture

24 Jul 2015 - 11:32 am | चुकलामाकला

प्रविण बुगाडिया, विश्वधर्म-परिषद अशी नाव घेउन पुन्हा हिन्दू वाईट, मुसलमान चांगला दाखवायचे . आणि वर सत्यघटनेशी आधरीत नाही म्हणायचे. पटले नाही .

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 11:42 am | पगला गजोधर

आणि वर सत्यघटनेशी आधरीत नाही म्हणायचे. पटले नाही .

हे कुठे वाचले तुम्ही ?

माझ्या भावा "भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही" असं लिहिलंय रे.

चुकलामाकला's picture

24 Jul 2015 - 11:46 am | चुकलामाकला

माफ करा , लिहिण्यातील चूक. "भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही" हेच म्हणायचे होते . प्रविण बुगाडिया विश्वधर्म-परिषद अशी नाव संबंध दखवतातच ना?

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 11:55 am | पगला गजोधर

शेवटी गोष्टीतील "नावं" लक्षात ठेवायची, की गोष्टीमागची "आयडिया" लक्षात घ्यायची, हा ज्याचा त्याच्या चाँइस…

पैसा's picture

24 Jul 2015 - 11:58 am | पैसा

कधी कधी चांगलं लिहिता, पण ही कथा अगदीच "ऑब्व्हियस" वाटते आहे. या फॉर्मॅटमधे इतकं उघड दिसेलसं तात्पर्य, शेवट असू नये असे वाटते.

हे माझे वैयक्तिक मत.

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 12:13 pm | पगला गजोधर

कथेत मी कुठल्याही धर्माला कमी लेखलेले नाही, पुढे जाउन मी तर असे म्हणेन, कि ह्या कथेत धर्म हा मुद्दाच नाहीये.

उदा. कोलंबिया अमेरिका इथे केकेके या गौरवर्ण वर्चस्ववादी संघटनेच्या मोर्च्यात ४ दिवसापूर्वी घडलेला प्रसंगाचा फोटोवरून ही कथा प्रेरित असली. तरि इथे फोटोग्राफरला श्वेतवर्ण लोक वि. अश्वेतवर्ण लोक, असा फरक दाखवायचा नसून, वर्चस्ववादी मनोवृत्ती वि कर्तव्यदक्ष वृत्ती दाखवायची असावी. अर्थातच, 'हे' माझे वैयक्तिक मत आहे. )

अत्रन्गि पाउस's picture

24 Jul 2015 - 1:10 pm | अत्रन्गि पाउस

बुगाडिया ऐवेजी ....पीटर तोकोनामा टाकून बघा बर

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 1:53 pm | पगला गजोधर

आणि 'मोहोम्मद मुश्रीफ' च्या जागी 'ज्युलिअस रिबेरो' वाचा हंव तर !

म्हणजे इथे पण हिंदूच वाईट का?? मुसलमान तेव्हढे चांगले????>>+111111111
प . गजोधर कथेतून नक्की काय सांगायचय ???? ह्या गोर्या माणसाचं नाव प्रविण बुगाडिया?
तुम्ही पेपर वाचत , बातम्या ऐकत असाल , इतिहास वर्तमाना ची जर तरी जाणीव असेल अशी अशा आहे . आणि तुम्ही कदाचित अतिरेकी समाजाचे असाल अशी शंका येतेय

कथेत मी कुठल्याही धर्माला कमी लेखलेले नाही, पुढे जाउन मी तर असे म्हणेन, कि ह्या कथेत धर्म हा मुद्दाच नाहीये.>>>
कथेच्या किती विरोधात आहे हा प्रतिसाद . तुम्ही धडधडीत हिंदू धर्माला कमी लेखून इस्लाम्यांना मोठं ठरवलंय . कृपया कथा संपादित करावी

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 12:52 pm | पगला गजोधर

प . गजोधर कथेतून नक्की काय सांगायचय ????

वर्चस्ववादी मनोवृत्ती वि कर्तव्यदक्ष वृत्ती दाखवायची (आधीच्याच एका प्रतिसादात लिहिलंय, तरीपण पुन्हा इथे देतोय , कारण कसंय नं, कदाचित शांतपणे कथा वाचून, त्यावरचे प्रतिसाद वाचून, विचार करून प्रतिक्रिया लिहायची म्हणजे, प्रचंड उशीर होतोय, असं वाटतं कधी कधी काही जणांना.)

तुम्ही कदाचित अतिरेकी समाजाचे असाल अशी शंका येतेय

होकां ? बर बर ! अतिरेकी समाज पण असतो का ?

तुम्ही धडधडीत हिंदू धर्माला कमी लेखून इस्लाम्यांना मोठं ठरवलंय.

काल्पनिक कथेतील, काल्पनिक 'प्रवीण बुगाडिया', हा प्रत्यक्षातील एका धर्माचा एकमेव प्रतिनिधी,
आणि काल्पनिक कथेतील काल्पनिक पोलिस-अधिकारी हा प्रत्यक्षातील दुसऱ्या-एका धर्माचा एकमेव प्रतिनिधी.
या निष्कर्षप्रत तुम्ही केवळ १०० शब्दामध्ये पोहोचला ?? चान चान ! _/\_

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2015 - 1:19 pm | प्रसाद गोडबोले

प.ग. आपल्या श.श.क. आम्हास आवडतात मात्र ही कथा लिहिताना आपण

#धर्मसुधारक

सारखे लिहित आहात असे वाटले =))

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 1:55 pm | पगला गजोधर

काडी नको ;) गुर्जी रागावतील बरे.

खटपट्या's picture

24 Jul 2015 - 2:26 pm | खटपट्या

आवडली !! पण....

शब्दबम्बाळ's picture

24 Jul 2015 - 3:07 pm | शब्दबम्बाळ

कथा कोणत्याही धर्माशी संबंधित ठेवायची नव्हती तर नावे न वापरता कल्पनाशक्तीला ताण देऊन काहीतरी रूपक वापरायला हवे होते!
थोडा त्रास पडला असता पण मग हि कथा संतुलित म्हणता आली असती!

इथे ठराविक धर्माला अनुसरून नावे आली आहेत. दोन लोकांच्या वागण्यावरून पूर्ण धर्माबद्दल मत बनवता येणार नाही हे जरी सत्य असले तरी तुमच्या पहिल्याच परिच्छेदात एका समाजाच्या "तरुणांचा" दंगली मध्ये आणि नरसंहारमध्ये सहभाग दाखवला आहे! ते तरुण म्हणजे "एक व्यक्ती" नव्हे!

असो! तुम्ही बर्याच शतशब्दकथा लिहिल्या आहेत त्यामुळे १०० शब्दांची ताकद तुम्हाला माहित आहेच.
लिखाणास शुभेच्छा!

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 3:20 pm | पगला गजोधर

ते तरुण म्हणजे "एक व्यक्ती" नव्हे!

बरोबर आहे तुमचं, परन्तु 'त्या तरुणांचा' स्कोप, एखाद्या विशिष्ठ 'देशातले', 'राज्यातले', 'गावातले ', का एखाद्या 'गल्लीतले', हा स्कोप वाचकाने ठरवावा.

उगा काहितरीच's picture

24 Jul 2015 - 6:34 pm | उगा काहितरीच

बिलकुल आवडली नाही.

तुडतुडी's picture

27 Jul 2015 - 1:34 pm | तुडतुडी

काल्पनिक 'प्रवीण बुगाडिया', हा प्रत्यक्षातील एका धर्माचा एकमेव प्रतिनिधी,
आणि काल्पनिक कथेतील काल्पनिक पोलिस-अधिकारी हा प्रत्यक्षातील दुसऱ्या-एका धर्माचा एकमेव प्रतिनिधी.
या निष्कर्षप्रत तुम्ही केवळ १०० शब्दामध्ये पोहोचला ?>>>
तसं नसेल तर असली नावं वापरण्याची पण गरज नवती . निष्कर्षा पर्यंत पोचण्याचा प्रश्न येतोच कुठे ? प्रवीण बुगाडिया हा हिंदू आणि मोहम्मद हा मुस्लिम . हे शेंबड पोर सुधा सांगेल हो . तुम्हाला मात्र ते समजत नसेल तर धन्य आहात

पगला गजोधर's picture

27 Jul 2015 - 1:39 pm | पगला गजोधर

_/\_

द-बाहुबली's picture

28 Jul 2015 - 3:22 pm | द-बाहुबली

डिसक्लेमर: सदर कथा ही सत्यघटनेवरून जरी प्रेरित असली, तरी, भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही.)

फटोवरुन तर काळे-पांढरे वादाचे म्याटर दिसते आहे...

पगला गजोधर's picture

28 Jul 2015 - 4:50 pm | पगला गजोधर