मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १०

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
५-४ असा एकागुणाने आनंद मागे. १२ डावांपैकी आज दहावा डाव. दहाव्या आणि बाराव्या डावात आनंदची पांढरी मोहोरी. सस्पेन्स याहून जास्त काय असू शकतो? आज विशीला सुलतानढवा करावा लागणार. कोणते ओअपनिंग? कोणत्या हिकमती? मॅग्नुसचा बचाव आणि घड्याळाशी होणारी स्पर्धा यातून आनंद कसा मार्ग काढणार? आनंदची घोड्यावरची पक्की मांड त्याच्या कामी येईल की उंटाचा कल्पक वापर त्याला तारुन नेईल? चला या प्रश्नांची उत्तरे शोधायला बघूयात डाव १०!! मित्रांनो पट लावा रे कोणीतरी!!!

वाचने 12352 वाचनखूण प्रतिक्रिया 50

चतुरंग 21/11/2014 - 17:31
सुरुवात. ग्रुनफेल्ड डिफेन्स! एक अत्यंत शार्प वेरिएशन्स असलेली लाईन प्रचंड थिअरी असलेली आणि भरपूर गुंतागुंत निर्माण करु शकणारी. जबर युद्धाची नांदीच!

प्रसाद गोडबोले 21/11/2014 - 17:40
पट ?

चतुरंग 21/11/2014 - 18:15
एन ई४ सारखी खेळी झटपट करुन अजून आपण थिअरीतच असल्याचे मॅग्नुस भासवतोय (ब्लफ) करतोय! :) आनंदची स्थिती चांगली आहे आता वजीर सी १ मधे आला तर उंट + वजीर काँबिनेशनने एच ६ प्याद्यावर हल्ला होतोय. दोन उंट आणि एक घोडा याच्या सहाय्याने आनंद राजाच्या बाजूला हल्ला करणार असा एकूण रोख दिसतोय..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 18:54
वजिरावजिरी अटळच का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर 21/11/2014 - 18:56
तो नेहेमी `आता निर्णय घ्यायलाच हवा' अशी स्थिती आणून गेम उकंठावर्धक करतो!

In reply to by संजय क्षीरसागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 18:57
मारामार्‍या करुन आनंद ड्रॉकडेच जातोय असं होतं. मग त्या पांढर्‍या मोहर्‍यांचा काय उपयोग ? -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 19:01
आनंद आपला प्यांदीच्या भरवशावर धमक्या मारतो ना धड त्याचा वजीर होतो ना आनंद म्याच जिंकतो. कर बाबा आज काहीतरी ! :( -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 19:38
मॅग्नुस लेखा इतका काय विचार करतोय. तु काहीही खेळ आम्ही बरोब्ररी करु..तु खेळ फक्त आता. अर्धा तास झाला आता खेळशील तेव्हा खेळशील, माझे धाग्यावर धागे वाचून झाले तु आपला ढिम्मच. :( -दिलीप बिरुटे

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद गोडबोले 21/11/2014 - 19:42
?

In reply to by प्रसाद गोडबोले

संजय क्षीरसागर 21/11/2014 - 19:54
तुम्ही म्हणता तसंच झालंय! एकोणिसावी मूव बी: डी-४ दिसतीये, मला मधेच बी : जी*२ दिसली होती!

प्रसाद गोडबोले 21/11/2014 - 19:39
आनंदला डी मधल्या पासर पॉन चे अ‍ॅडव्हान्टेज आहे , जर ते शेवटपर्यंत टिकवुन ठेवले तर आज आनंद जिंकणारच !

प्रसाद गोडबोले 21/11/2014 - 19:45
१९ वी खेळी नकी काय झाले कळाले नाही :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 20:08
आज माझ्या नेटचा प्रॉब्लेम आहे की चेसडॉमचा काय समजेना. कधी मॅग्नुसची वेळ कमी दिसते तर कधी आनंदची. -दिलीप बिरुटे

In reply to by संजय क्षीरसागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 20:19
आमावशा जवळ आली की असंच होतं वाटतं. उगं माझ्याशी वाद नका घालू अं.श्रद्धाळु कुठले म्हणुन. ;) (ह.घ्या) -दिलीप बिरुटे

In reply to by स्वामी संकेतानंद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 20:17
जिंकेल असे वाटते. म्हणजे डावावर सध्या चित्र असे दिसते की आनंदचं पारडं भारी. पण जिंकेपर्यंत माझा कॉन्फीडन्सच नैये . -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 20:26
आणि दोनही उंट शाबूत ठेवून डी प्यांदीच्या भरवशावर मॅग्नुसचा एक हत्ती आनि एक उंट घ्यावा. मग आनंदचा कॉन्फीडन्स वाढेल नै तर अजूनही आनंदचा देवावरच विश्वास जास्त आहे असं वाटतं. ;) -दिलीप्ल बिरुटे

In reply to by संजय क्षीरसागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 20:36
तुम्हाला आनंद जिंकावा वाटत नै ये का ? डावावर लक्ष केंद्रीत करा. आता मॅग्नुसने डी वरच्या प्यादीला हत्तीनी घेरलं आहे. -दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले 21/11/2014 - 20:30
डी मधल्या प्याद्यासाठी कार्लसन उंट हत्ती असा एक्स्चेन्ज करायचा विचार करतोय की काय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 20:39
सत्तावीसव्या चालींनी आनंद ब्याक आलाय असं वाटतंय मला. डाव निसटतोय आनंदच्या हातातून... :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले 21/11/2014 - 20:45
येस्स सर :( डी चे प्यादे गेले तिथेच ड्रॉ झाला डाव :(

In reply to by संजय क्षीरसागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 20:55
विश्वनाथ आनंद खुप मोठा आहे, मी बोलणं म्हणजे मला माहिती आहे, लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण प्यादीच्या भोवती मॅग्नुसने लक्श केंद्रीत केलंय तर किमान त्या बदल्यात हत्तीसारखे मोठे मोहरे आनंदला सपोर्ट घेऊन टीपता येऊ नये, मग काय उपयोग त्या महाखेळींचा. आनंदचे डावावर वर्चस्व होते आणि जिंकता जिंकता म्याच ड्रॉला गेला. एवढंच मला कळलं. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर 22/11/2014 - 00:17
दोन्ही गेम्स आनंदला जिंकणं भाग आहे आणि कार्लसनला गेम्स फक्त ड्रॉ झाल्या तरी चालण्यासारखं आहे. कार्लसन एक गेम हारला तरी फारतर मॅच टाय-ब्रेकरमधे जाईल (तिथे काय करतात चतुरंग जाणे). पण मुळात, जिंकायलाच हवं असं दडपण त्याला नाही. त्यामुळे आता इतक्या प्रेशरखाली आनंद कसा खेळतो हे बघणं रंजक होईल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/11/2014 - 20:46
झटपट चालीत ना जीवंत झालेला वजीर आनंदला मदत करु शकला. शीट डाव चालला बरोबरीकडे.. बोअर. -दिलीप बिरुटे

रामपुरी 21/11/2014 - 22:47
रंगतदार खेळ झाला. २४ व्या चालीत हत्ती डी २ ऐवजी प्यादे ए ३ खेळला असता तर कितपत फरक पडला असता बघायला हवे. कारण मग काळा हत्ती लगेच ई पट्टीत येऊ शकला नसता आणि पुढची हत्ती डी १ खेळी सुद्धा करायची गरज पडली नसती.