शिवाय पुढे आलेले हत्ती ही मॅग्नुसची बलस्थाने आहेत. तर वजिराच्या बाजूचे दुहेरी प्यादे हे कमकुवत आहे. मॅग्नुसने राजाच्या बाजूला हत्ती आणि उंटाने रेटायला सुरुवात केली की आनंद वजिराच्या बाजूला प्यादी सरकवून मॅग्नुसला कोंडीत पकडणार.
मॅग्नुस काय करतोय त्याप्रमाणे जात राहणे असेच शक्य आहे. प्रत्येक ठिकाणी बचाव शोधून काढणे कठिण आहे. कारण मॅग्नुसच्या थ्रेट्स थेट नाहीयेत अतिशय सटल म्हणतात तशा आहेत. त्यामुळे होते काय की कोणत्याही क्षणी तो रोख बदलून वेगळाच प्लॅन बनवू शकतो.
आणि जी ६ वरचा घोडा अशी दोन मर्मस्थाने आहेत. आनंद डी स्तंभात हत्ती आणून तिथून डि ३ असा घुसू शकतो. मॅग्नुसला ते थोपवणे भाग आहे. त्यामुळे त्याने सी२ मधे उंट आणला. आता आनंद हत्ती परत जी ८ मधे नेणार..
मॅग्नुस जिंकण्यासाठीच खेळतोय. त्याला अॅडवांटेज सुद्धा आहे. अणि त्याला आजचा आणि उद्याचा डाव आघाडी मिळवण्याची उत्तम संधी आहे असे असताना तो सहजासहजी बरोबरीत जाणार नाहीच! आनंदला आज जास्तितजास्त बरोबरी मिळू शकेल..जिंकायची शक्यता नाहीच...
ए प्यादे ढकलत ३ र्या घरापर्यंत आणले आहे. प्लॅन समजत नाहीये. त्याला ए पट्टीतून काही फार करता येईल असे दिसत नाहीये. राजाच्या बाजूने मॅग्नुसने प्यादी ढकलायला सुरुवात केली आहे. आनंदची घुसमट करायला बघणार तो.
स्विडलर आणि क्रामनिक आलेत. चँपिअनशिपच्या स्पर्धेतले दोन खेळाडू, त्यातला एक माजी जगज्जेता, समालोचनासाठी येणे हे या स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करते! :)
क्रामनिकच्या एक्सपर्ट कॉमेंट्स ऐकण्यासारख्या आहेत. त्याच्यामते विशीने चांगला खेळ केला तर त्याला वजिराच्या बाजूला चांगला प्रतिहल्ला निर्माण करता येण्यासारखे आहे..
घोड्याने ई५ वरचे प्यादे मारुन आनंदला जोरदार प्रतिहल्ल्याची संधी होती.ती त्याने गमावली तिथेच डाव गेल्यासारखा होता. ती संधी त्याने घेतली असती तर मात्र हत्तींची मारामारी वेळेवर होऊन धोकादायल ई प्यादे पटावरुन गेले असते आणि डाव बरोबरीत नक्कीच सोडवता आला असता.
असो. आता पुढल्या डावात सोमवारी आनंदला जिंकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण तोही डाव जर मॅग्नुसने जिंकला तर स्पर्धा गमावल्यासारखीच आहे.
स्पर्धेच्या या पातळीत अशा संधी गमावणे परवडणारे नाही! आनंद मानसशास्त्रीय दृष्ट्या मॅग्नुस एवढा कणखर राहिलेला नाही हे सत्य मान्य करुन अनुभव आणि डायनामिक खेळ, टॅक्टिकल पोझीशन्स याच्या जोरावरच त्याला वाट काढायला लागणार आहे.
आजच्यासारखी पोझीशन मॅग्नुसला देणे म्हणजे सिंहाच्या गुहेत स्वत:हून जाऊन बसण्यासारखे आहे!
च्यायला, मलाही उशीर झाला डाव
काल
In reply to काल by सुजित पवार
माझं ढोबळ मत म्याच ड्रॉच करणार.
मॅग्नुसचा डाव चांगला वाटतोय
पटावरचा जास्ती जागेचा ताबा आणि दोन्ही रंगाचे उंट
आनंदचा सगळ्यात मोठा प्रश्न
In reply to आनंदचा सगळ्यात मोठा प्रश्न by चतुरंग
झुग्झ्वांग ??
मॅग्नुसचा प्लॅन
आनंदला आता फक्त
डी स्तंभ
मॅग्नुस व आनन्द
In reply to मॅग्नुस व आनन्द by सुजित पवार
नाही
आनंदने त्याचे
आनंदकडे वेळ कमी आहे का ?
In reply to आनंदकडे वेळ कमी आहे का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हीच शंका आहे!
In reply to हीच शंका आहे! by आतिवास
वेळ
कॉमेंटरी रुममधे
In reply to कॉमेंटरी रुममधे by चतुरंग
वजिर
In reply to वजिर by सुजित पवार
पण त्याची बाजू आहे कि पटावर
कार्लसन दोन पॉन्स प्लस आहे, आणि
च्यायला... हरला
जिंकला कार्लसन
३७ व्या मूव नंतरची ही कमेंट वाचनीय आहे
सत्तविसाव्या खेळीला