दै. लोकमत आणि 'मिसळपाव'

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
2 Sep 2012 - 12:05 pm

आज सकाळी घरातले काम करताना पेपर वाचला नव्हता. पण सुहास.. ने फोन केला आणि सांगितलं. आजचा दै. लोकमत वाच. त्यातल्या मंथन पुरवणी मध्ये 'मायबोली, मिसळपाव ते साहित्यसंस्कृती' हा लेख आला आहे.

मंथन पुरवणीच्या दुसर्‍या पानावरचा लेख वाचला. लेखकाने मराठी संस्थळांचा चांगला परामर्ष घेतला आहे. त्यात आपल्या 'मिसळ्पाव' चा छान उल्लेख आहे (लोगो सकट). शिवाय संस्थळाची लिंकही दिलेली आहे.

दै. लोकमत' चे आभार, मिसळपाव चे आणि सर्व सदस्य, लेखक वाचकांचे आणि मालक, संपादक, सल्लागारांचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा!

लेखाची लिंकः http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=6
(सौजन्य: बिपिन कार्यकर्ते)

हे ठिकाणवावरप्रकटनसद्भावनाशुभेच्छालेखअभिनंदनबातमीमाध्यमवेधमाहिती

प्रतिक्रिया

मन१'s picture

2 Sep 2012 - 12:09 pm | मन१

लोकमत चे अभिनंदन!

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2012 - 12:35 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2012 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्रे व्वा..लोकमतचे अभिनंदन. मिसळपाव सर्वांपर्यंत तसंही पोहचलंच आहे. मराठी माणसांना अभिव्यक्त होण्यासाठी एकाच धाग्यात ओवण्याचं काम मिपानं जवाबदारीनं केलं आहे. मिपा परिवार वाढतोच आहे. अजूनही कितीतरी सदस्य सदस्यत्त्व मिळण्याची वाट पाहात असतात. माणसागणिक संकेतस्थळे पुढे जन्माला येतीलही. पण, मिपा या सर्वात मैलाचा दगड असेल यात काही वाद नाही.

-दिलीप बिरुटे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Sep 2012 - 1:54 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अजूनही कितीतरी सदस्य सदस्यत्त्व मिळण्याची वाट पाहात असतात.

वाट का पहावी लागते याचे उत्तर कुणी देऊ शकेल काय ?

बाकी अभिनंदन अध्याहृत आहे :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2012 - 2:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> वाट का पहावी लागते याचे उत्तर कुणी देऊ शकेल काय ?

सदस्य कोणाचे तरी ओळखीचे असले पाहिजे. काही तरी संगणकीय गडबडीमुळे काही सदस्यांची नोंद होते तर कधी कधी राडा करण्यासाठी डु आयडींची भरती होते. कधी एकाच सदस्याने, सदस्यत्त्वाच्या अनेकदा नोंदणी केलेली असू शकते. किंवा अशाच काही शक्यतेमुळे वरीजनल सदस्यांलाही सदस्यत्त्व मिळत नाही, त्यामुळे त्यांची खातरजमा केल्याशिवाय मिपावर आता सदस्यत्त्व मिळत नाही. असा माझा आपला अंदाज आहे. कदाचित तसे नसेलही. अधिकृत माहिती नीलकांतच देऊ शकेल. :)

आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला कसं माहिती की सदस्यत्त्वाची वाट पाहावी लागते ? मला फेसबुकर ब-याचदा संदेशाद्वारे विचारलं गेलं आहे की मिपावरील माझं सदस्यत्त्व कधी अप्रुव्ह होईल. कधी कधी मिपावर व्य.नि.ने काही मित्रमंडळी विचारतात की अमुक अमुक माझ्या ओळखीचा आहे, त्याला अजुन सदस्यत्त्व मिळालेले नाही. काही मदत कराल का. असं जर कोणी म्हटलं तर मग आम्ही चावडीत नीलकांत किंवा प्रशांतला शिफारस करणार्‍या सदस्यांचे संदर्भ देऊन नवीन ताटकळत पडलेल्या सदस्याला मिपाची दारं उघडी करुन द्यायला काही हरकत नाही, असे म्हणतो. अर्थात असे फार कमी वेळा होते. सदस्यत्त्व द्यायचे किंवा कसे याचा निर्णय नीलकांत आणि प्रशांत घेत असतात.

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

2 Sep 2012 - 2:56 pm | प्रभाकर पेठकर

मिपा या सर्वात मैलाचा दगड असेल यात काही वाद नाही.

ब्बास्स्स काSSय..! एवढे करून शेवटी 'दगड'च का?........... ह. घे. हे सां. न ल.

मिपा ह्या सर्वांत कायम अग्रणी राहील यात वाद नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2012 - 3:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या मना बन दगड [कॉपी पेष्ट. लोकसत्ता ]

हा रस्ता अटळ आहे!
अन्नाशिवाय, कपडय़ाशिवाय,
ज्ञानाशिवाय; मानाशिवाय.
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शीव!
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्वास.
विसर यांना, दाब कढ;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे!
ऐकू नको हा आक्रोश,
तुझ्या गळय़ाला पडेल शोष.
कानांवरती हात धर,
त्यातूनही येतील स्वर.
म्हणून म्हणतो ओत शिसे;
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या, रडशील किती?
झुरणाऱ्या, झुरशील किती?
पिचणाऱ्या, पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो;
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे!
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर.
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात;
आणि म्हणतात, ‘‘कर िहमत,
आत्मा वीक, उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य;
स्मरा त्याला, स्मरा नित्य.’’
भिशील ऐकून असले वेद;
बन दगड, नको खेद!

बन दगड आजपासून;
काय अडेल तुझ्यावाचून;
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे नि:श्वास
मरणाऱ्यांना देतील श्वास?
आणिक दु:ख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे दु:ख तेच फार;
माझ्या मना कर विचार!
कर विचार : हस रगड;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे!
अटळ आहे घाण सारी;
अटळ आहे ही शिसारी.
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल!

अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा; होतील भुते.
या सोन्याचे बनतील सूळ!
सुळी जाईल सारे कूळ.
ऐक टापा! ऐक आवाज!
लाल धूळ उडते आज;
याच्यामागून येईल स्वार;
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड;
माझ्या मना बन दगड!

प्रभाकर पेठकर's picture

2 Sep 2012 - 3:59 pm | प्रभाकर पेठकर

विंदांची कविता आहे म्हंटल्यावर त्यावर मी काय भाष्य करणार? गळी उतरायला कठीण असली तरी चांगली आहे. संवेदनशीलतेतून होणार्‍या यातना टाळण्यासाठी असंवेदनशील बनण्याचा उपरोधिक सल्ला मनाला भिडणारा आहे. असो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Sep 2012 - 10:42 pm | निनाद मुक्काम प...

प्राध्यापकांच्या लौकिकाला साजेशी प्रतिक्रिया

सुहास..'s picture

10 Sep 2012 - 10:37 pm | सुहास..

माझ्या मना बन दगड >>>

लिहीते होत नाही म्हणुन ह्या मास्तराला धरून एकदा झोडुन काढावे का ? असा एक कौल घ्या म्हणतो :)

अन्या दातार's picture

2 Sep 2012 - 1:23 pm | अन्या दातार

लोकमतचे तसेच मिपाचेही अभिनंदन. :)

सोत्रि's picture

2 Sep 2012 - 1:41 pm | सोत्रि

मिपा तसेच सर्व मिपाकरांचे अभिनंदन!

- ( आनंदी मिपाकर ) सोकाजी

मिपाची किर्ती ख्याती अशीच वाढत राहो.
यासाठी हातभार लावणार्‍या सर्वच मिपाकरांचे आभार आणि अभिनंदनही. :)

बॅटमॅन's picture

2 Sep 2012 - 2:30 pm | बॅटमॅन

हाबिणंदण मिपाचे अन लोकमतचेही!!!

(अभिमानी मिपाकर) बॅटमॅण.

प्रभाकर पेठकर's picture

2 Sep 2012 - 3:46 pm | प्रभाकर पेठकर

मिपाचे अभिनंदन. पण eलोकमतमधील तो लेख वाचता येत नाहिए. काय करू?

भरत कुलकर्णी's picture

2 Sep 2012 - 3:54 pm | भरत कुलकर्णी

अभिनंदन

सानिकास्वप्निल's picture

2 Sep 2012 - 4:10 pm | सानिकास्वप्निल

सर्व मिपाकरांचे अभिनंदन :)

पेप्रात नाव छापून आल्यामुळे बरे वाटले.
सगळ्यांचे अभिनंदन.

aamache banner

बहुतेक चित्र अपलोड करणं गंडलय.
दिसतय का हो आमचं / आपलं ब्यानर?

प्रास's picture

2 Sep 2012 - 5:49 pm | प्रास

अजून तरी 'aamache banner' असंच दिसून र्‍हायलंय....

(वाचायला आवडत नसूनही) दै. लोकमतचं नि मिसळपावचं अभिनंदन!

किसन शिंदे's picture

2 Sep 2012 - 5:51 pm | किसन शिंदे

मिपाचे आणि सर्व सदस्यांचे अभिनंदन!!

शुचि's picture

2 Sep 2012 - 6:01 pm | शुचि

मिपा रॉक्स!!!

अभ्या..'s picture

2 Sep 2012 - 6:08 pm | अभ्या..

बहुतेक महानगरपालिकेचा चेक रविवार मुळे ऊशीरा गेला. सायबांना फोन केला तेव्हा ब्यानर लावला. ;-)

सुहास झेले's picture

2 Sep 2012 - 7:37 pm | सुहास झेले

जबरी...!!

सर्व मिपाकारांचे आणि लोकमतचे अभिनंदन... :) :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2012 - 10:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

मिपाचं पब्लिक काय करेल कै नेम नै.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

2 Sep 2012 - 10:20 pm | पैसा

मस्त केलंय!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Sep 2012 - 6:27 pm | अत्रुप्त आत्मा

उगा काहितरीच's picture

2 Sep 2012 - 6:49 pm | उगा काहितरीच

लोकमतचे अभिनंदन !!!

अनिवासि's picture

2 Sep 2012 - 7:01 pm | अनिवासि

श्री प्रभाकर पेठकर

मलाही दिलेल्या link वर वाचता आल नाही परन्तु लोकमत सम्पुर्ण अन्क on line वर मिळाला. त्यातील मन्थन सदरात हा लेख वाचला. एक आपली माहिती म्हणुन.

प्रा. बिरुटे
नेहमीप्रमाणे सुन्दर प्रतिसाद. विन्दान्ची कवीता चटका लावुन गेलि.
धन्यवाद.

अभिजीत----

सुन्दर ब्यानर!

सुमीत भातखंडे's picture

2 Sep 2012 - 10:48 pm | सुमीत भातखंडे

दै. लोकमत' चे आभार, मिसळपाव चे आणि सर्व सदस्य, लेखक वाचकांचे आणि मालक, संपादक, सल्लागारांचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा!

असेच म्हणतो...

लीलाधर's picture

3 Sep 2012 - 9:31 am | लीलाधर

सर्व मिपाकारांचे आणि लोकमतचे त्रिवार अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन :)

ऋषिकेश's picture

4 Sep 2012 - 1:30 pm | ऋषिकेश

अरे वा! सगळ्यांचे अभिनंदन!

तर्री's picture

4 Sep 2012 - 1:45 pm | तर्री

दर्डा पण आहेत की काय मिपा वर ?

तिमा's picture

8 Sep 2012 - 11:25 am | तिमा

भ्रष्ट माणसांकडून मिपाचे कौतुक झाले तर कसला आनंद मानायचा ? मिपाचे नाणे खणखणीत आहे. त्याला असल्या लोकांच्या कौतुकाची जरुर नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2012 - 3:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फेसबुकवर काल कोणीतरी एक चित्र डकवलेलं दिसलं आणि त्यात म्हटलं सार्वजनिक शौचालयाचं उद्घाटन केलं तरी फोटो टाकणा-या अमुक अमुक यांचं कोळशात तोंड काळं झालं तर चकार शब्द काही आला नाही, असं काही तरी होतं.

-दिलीप बिरुटे

फेसबुकवर काल कोणीतरी एक चित्र डकवलेलं दिसलं आणि त्यात म्हटलं सार्वजनिक शौचालयाचं उद्घाटन केलं तरी फोटो टाकणा-या अमुक अमुक यांचं कोळशात तोंड काळं झालं तर चकार शब्द काही आला नाही, असं काही तरी होतं.
अच्छा असं होय ! तरीच आयबीएन लोकमत वॄत्त वाहिनीवर या संबंधी बातम्या कमी येत आहेत तर ! ;)

अमोल केळकर's picture

11 Sep 2012 - 11:07 am | अमोल केळकर

वा वा ! सर्व संबंधीतांचे अभिनंदन ! :)

अमोल केळकर