तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-११

खुशि's picture
खुशि in भटकंती
25 Jun 2012 - 3:30 pm

राजपिपला हे जिल्हामुख्यालयाचे ठिकाण आहे.शहरात किल्ल्यासारख्या अ‍ॅतिहासिक वास्तु आहेत. हरसिद्धमाता मन्दिर हे पार्वतीचे आहे. सन्गमरवरी वास्तु आहे.आवारात चारीबाजुनी भक्तनिवासाच्या दुमजली इमारती आहेत. शेजारी गायत्रीमातेचेही भव्य मन्दिर आहे. मन्दिरासमोर तलाव आहे.
या मन्दिरात देवीला सोडलेल्या खुप कोम्बडे-कोम्बड्या आहेत्.पुर्वी देवीला बळी देण्याची पद्धत होती आता सोडुन देतात. कोम्बड्या मन्दिराच्या आवारातच नव्हे तर देवीच्या गाभार्यातही फिरतात,आवारातील झाडावर,शिखरावरही त्यान्चा मुक्त सन्चार असतो.
देवीच्या आवारातील झाडाना पाणी देण्यासाठी ठिबकसिन्चनाची व्यवस्था आहे. त्याची पाइपलाइन प्रान्गणाच्या फरशीखालुन नेलेली आहे आणि प्रत्येक झाडाच्या बुन्ध्यापाशी ठीबकसिन्चनाची तोटी उघडलेली आहे.उत्तम व्यवस्था.
भक्तनिवासात स्नानासाठी सोलरच्या गरम पाण्याची सुविधा आहे. स्नानादी उरकुन मैय्याची पुजारति केली,हरसिद्धीमातेचे दर्शन घेतले पुजा नैवेद्दयासाठी पावती केली आणि निघालो. सन्तोषचॉकडीला आलो,टपरीवर चहा घेतला.शुलपाणिश्वरमन्दिर गोराग्रामला २५कि.मि. दुर आहे.परिक्रमेचा मार्ग राजपिपलावरुनच पुढे आहे म्हणून दर्शन घेऊन परत यावे या विचाराने १०रु.सिटने रिक्षाने गोराग्रामला आलो.
पान्डवकालीन प्राचीन शुलपाणेश्वराचे मन्दिर सरदार सरोवराच्या पाण्यात बुडाले म्हणून येथे टेकडीवर गुजराथ सरकारने नवीन मन्दिर बान्धले आहे.मन्दिराच्या सभोवती सुन्दर बगिचा फुलवलेला आहे.सुन्दर परिसर आहे. पायथ्यापासुन ३०/४० पायर्या चढुन आपण मन्दिर प्रान्गणात येतो. मन्दिर सन्गमरवरी आहे. भव्य गाभार्यात शिवपिन्डीचे प्रसन्न दर्शन होते. मानसपुजा करुन शिवस्तोत्र म्हटले. नर्मदामैय्याचे पिता शिवशम्भो आपल्या क्रुपेने ही परिक्रमा पुर्ण होवो अशी प्रार्थना केली.
मन्दिर परिसरात भक्तनिवासाचे बान्धकाम चालु आहे.तेथिल महन्ताना प्रणाम करुन निघालो. मन्दिरापासुन काही अन्तरावर नर्मदामैय्यावर केवडियाला जाणारा पुल आहे. पुला खालुन मैय्याच्या पात्राजवळ जाण्यासाठी सिमेन्टचा रस्ता आहे,यावर्षी पावसाळ्यात प्रचन्ड पुर आला असताना सन्तापलेल्या मैय्याने हा रस्ता उखडुन टाकला होता.तरीहि थोडा फार भाग जाण्यासाठी होता,मैय्याजवळ गेलो.सुन्दर मैय्या दर्शन. खलबुजुर्ग,राजघाट सोडल्या पासुन मैय्याच्या जलाने स्नान झाले नव्हते.स्वच्छ नितळ पाणी,स्नानासाठी चान्गली जागाही होती म्हणुन स्नान केले.छान वाटले.
पोटपुजेची वेळ झाली होती,हरिहरकुटीबद्दल कळले,२कि.मि. चालुन तिथे पोहोचलो. निसर्गरम्य ठिकाणि हा आश्रम आहे. येथिल व्यवस्थापक एक माताजी आहेत. भोजनप्रसादाला अवकाश होता,चहा घेउन परिसर बघायला निघालो. गोशाळा आहे.आदिवासी मुलीन्ची शाळा आहे. परिक्रमावासीन्साठीच्या दालनात आसन लावले.तिथे एक तरूण सन्यासी भेटला,बी.कॉम. शिकलेला होता.
भोजनप्रसाद घेतला,माताजीना प्रणाम करुन निघालो. आनन्दाआश्रयधाम बद्दल अ‍ॅकले होते तिकडे जाणार होतो पण नन्तर विचार केला आज इथे राहिलो तर उद्या इथुन राजपिपला आणि नन्तर पुढे जाण्यास उशीर होईल तेव्हा आज जर राजपिपलाला राहिलो तर उद्या पुढचा प्रवास लवकर सुरु करता येइल,म्हणून रिक्षाने राजपिपलाला आलो, हरसिद्धीमाता मन्दिरात जागा मिळणार नाही हे माहीत होते म्हणून गावात एखादे हॉटेल पहावे म्हणून गेलो.एवढे जिल्हयाचे ठिकाण पण फक्त ३/४ हॉटेल होती पण तिही मोदीन्च्या लोकान्साठी राखीव ठेवलेली होती. ह्या सगळ्या खटाटोपात खुप उशीर झाला ४ वाजुन गेले,उन्हाचा त्रासही होताच.शेवटी पुन्हा गोराग्रामला जायचा निर्णय घेतला.रिक्षाने पुन्हा गोराग्रामला आलो.
स्टॉप पासुन २कि.मि. दुर आनन्दाआश्रयधाम होते,गेलो. इतका निसर्गसुन्दर आश्रम आहे.बघुनच खुप छान वाटले.परिक्रमावासीन्साठी स्वतन्त्र इमारत आहे,पण तेथिल व्यवस्थापकानी आम्हाला मुलान्च्या वसतिग्रुहातील एक स्वतन्त्र खोली दिली सर्व सुखसोयीनी युक्त खोली. आसन लावले,हातपाय धुवुन मन्दिरात दर्शनाला गेलो.श्रीम्रुत्युन्जयेश्वराचे मन्दिर भव्य आहे. शिवपिन्डी व्यतिरिक्त राम क्रुष्ण देवी गणपती यान्चीही मन्दिरे आहेत.मन्दिर सन्गमरवरी आहे.समोरच नर्मदामैय्याचे शान्तशीतल दर्शन सतत होते. रमणीय मन्दिर परिसर.सुन्दर भव्य गोशाला.खुपच आवडले.
दिवेलागणीच्या वेळी सर्व मन्दिरपरिसरात ,घाटाच्या मार्गावर पणत्या लावतात. इतके सुन्दर शान्त द्रुश्य.सन्थ वाहणारी मैय्या जणू आम्हाला म्हणत होती असे सगळे सुन्दर पवित्र ठिकाण न बघता तुम्ही पुढे जाऊ नये म्हणुनच तुमची राजपिपलाला व्यवस्था केली नाही.
रात्री भोजनप्रसादाच्यावेळी महन्त म्हणाले,आता दोन दिवस रहा,इथला नित्यक्रम पहा नन्तर पुढे जा. आम्हालाही हे सर्व खुप आवडले होते,आम्ही त्याना होकार दिला. भोजना नन्तर प्रत्येकाला एक मोठा पेला भरुन गायीचे दुध देतात. क्रमशः

प्रतिक्रिया

लेख उत्तम होत अहेत, पन काहि छायाचित्रे जमलि तर टाकत चला. आम्हालहि दर्शन मिलु दे

नमस्कार सुजित पवारजी.
खरे सान्गु का मला फोटो टाकता येत नाहित.कसे टाकतात समजले तर टाकेन कारण माझ्या काम्पुटरमध्ये ,वेब अल्बम मध्ये फोटो आहेत पण ते मिसळपाववर कसे आणायचे ते मला येत नाही आपण मार्गदर्शन कराल का?

हंस's picture

26 Jun 2012 - 11:12 am | हंस

खुशितै! हे घ्या मदत पान जेथे धाग्यावर फोटो कसा चढवावा याविषयी माहिती मिळेल.
http://www.misalpav.com/node/13573

सुजित पवार's picture

26 Jun 2012 - 2:14 pm | सुजित पवार

मि सुध्दा इथे नविन आहे, त्यामुले मला पन महिति नाहि. तुम्हि सन्गनक शिकत आहात, आमच्या साठि लिहित आहत, या बद्दल मनापासुन आभार व्यक्त करतो. इथे तुम्हाला मदत म्हनुन खलि "हंस" यानि दुवा दिला आहे.

उदय के'सागर's picture

25 Jun 2012 - 6:17 pm | उदय के'सागर

सगळे भाग आजच-एका बैठकित वाचले... व्वा! सुंदर परीक्रमा-वर्णन, अगदी तुमच्या बरोबरच परीक्रमा करतोय अस वाटत राहतं किंवा तुम्हि अगदी समोर बसुन सगळे अनुभव सांगताय ईतकं सहज लिहिलंय.

आणि विशेषतः मला तर तुम्हि हे छोटे छोटे भाग लिहीताय तेच जास्त आवडतय (उगिच ते मोठ्ठे भाग रटाळ होण्यापेक्षा) अर्थात तुम्हि दोन भागांमधे जास्त अंतर ठेवत नाहि अहात त्यामुळे हे छोटे भाग चांगले वाटताहेत. असेच लिहीत रहा, ह्याच गतीने.

तुमचे अनुभव मिपाकरांबरोबर शेअर केल्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद :)

नमस्कार उदयजी.
लेख आवडले हे वाचुन खुप आनन्द झाला. कॉम्प्युटर वापरणे,लेखन करणे हे सर्व प्रकार मी नवीनच शिकते आहे.जमेल तसे लिहित आहे.चुकभुल द्यावी घ्यावी.