तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा-भाग ४

खुशि's picture
खुशि in भटकंती
19 Jun 2012 - 1:21 pm

स्नानादि,पुजारती,चहापाणी उरकुन पाटिदार मन्डळीन्चा निरोप घेउन निघालो.गावकर्यानी पुरुषमन्डळीना धोतराची पाने दिली स्त्रियाना पान्ढरी साडी दिली म्हणाले ही परिक्रमावासीन्ची सेवा आहे. ह्या सेवेसाठी गावकरी बचतीद्वारे सोय करतात.धन्य ती सेवाभावी व्रुत्ती.
मैय्याकिनार्याने वाटचाल सुरु झाली साधारण तासाभराने नावडाटोलीला पोहोचलो.शालिवाहन आश्रम.शककर्ता राजा शालिवाहन,मातीचे सैन्य तयार करुन त्यात प्राण फुन्कुन त्याने शक-हुण यान्चा पराभव केला असी आख्यायिका आहे. येथेच मार्कन्डेय गुफा आहे,त्यानी येथे तप्स्चर्या केली असे सान्गतात. सध्याचे महन्त खुप आतिथ्यशिल आहेत.त्यानी नास्त्याला पोहे दिले.काही सत्सन्गही झाला.
पुढे निघालो,बुथगाव,ढालखेडा { येथे सुप्रसिद्ध सहस्त्रधारा धबधबा आहे पण आता महेश्वर धरणातुन पाणी सोडले तरच असतो. आज नव्हता.} मार्गे बलगावला मुना आश्रमात आलो. १२ वाजत आले होते.ओले कपडे वाळत घातले,भोजन प्रसादास थोडा अवकाश होता म्हणुन फिरुन आश्रमाचा परिसर पाहिला,मोठमोठी आम्ब्याची,चिन्चेची झाडे,फुलानी बहरलेला बगिचा सेवाभावी महन्त आणि त्यान्चे शिष्य सारेच सुन्दर. येथे पुण्याचे रानडे,शिरगोपीकर,श्रीमती वेलणकर श्री वेलणकर भेटले.
भोजनप्रसादाला मुगाची खिचडी गोड अदमुरे ताक असा बेत होता.दमलेला जीव त्रुप्त झाला. ३वाजत आले होते,पुढे निघालो,रोजचे ३०/३५ कि.मि. चालणे होत होते पायाना फोड आले होते त्यातील एक फुटला.म्हटले डायबेटीस आहे नसते दुखणे व्हायचे एका झाडाखाली बसलो बुटमोजे काढुन पायाचे ड्रेसिन्ग केले.आमच्या बरोबरील मन्डळी पुढे निघुन गेली. रस्ता नव्हताच आम्ही टेकडीवर होतो आमच्या डाव्या बाजुला तुरीची शेते होती,उजव्या बाजुला खाली मैय्या वाहत होती.टेकडीची माती बुलडोझर लावुन काढण्याचे काम चालु होते.रस्ता दिसतच नव्हता,नर्मदे हर! शेतात काम करणार्याने सान्गितले,मिट्टीके ढेरपरसे निचे उतरके किनारे किनारेसेही रस्ता है.ठीक है नर्मदे हर उतरलो ढिगारा ,बुटामध्ये माती भरली,ड्रेसिन्ग करायची बुद्धिच दिली मैय्याने नाहीतर फुटलेल्या फोडाचे काही खरे नसते.रस्ता कसला,नुसते खडक होते ,अस्ताव्यस्त वाढलेल्या बाभळी ,मैय्याला मिळणारे ओढे जागोजाग निसरडे झालेले होते.आणि जे व्हायचे तेच झाले एक ओढा पार करताना अस्मादिकानी लोटान्गण घातले.पाय घरुन अशी आपटले की विचारता सोय नाही.पाठिवर पाठपिशवी होती म्हणुन नाहितर फ्रक्चर स्पाइन नक्की होते.
ह्यान्च्या आधाराने कशीबशी सावरले.मैय्याजवळ जावुन चिखलाने भरलेले कपडे धुतले,हात-पाय धुतले मैय्याची प्रार्थना केली.मैय्या तुझ्या क्रुपेनेच परिक्रमा पुर्ण होईल,आम्हाला हिम्मत दे. पुढे निघालो, एकजण भेटला त्याने खडकावरुन चढुन कसे जायचे ते सान्गितले.
अकबरपुरा गाव लागले,मुस्लिम वस्ती होती पण आदरातिथ्य तेच बडगावात होते तसेच.चहा-पाणी घेउन निघालो.सन्ध्याकाळी ६ वाजता खल्बुजुर्ग येथे श्रीराम मन्दिरात पोहोचलो. महन्तानी स्वागत केले.मन्दिराचे काम सुरु आहे त्यामुळे पिम्पळाच्या पाराखाली आसन लावले.
मैय्याच्या घाटावर जाउन स्नान केले,कपडे धुतले.पुजारती केली.येथे बरेच मराठी परिक्रमावासी भेटले.बहुतेक सर्व सत्तरीच्या पुढचे पण उत्साह तरुणाना लाजवणारा.गरम गरम मुगाची खिचडी भोजनप्रसादात मिळाली. खुप थन्डी पडली होती,ओझे नको म्हणुन स्लिपिन्गबॉगज मागे श्रीराम महाराजान्कडे ठेवल्या होत्या,अन्थरायला बेडशीट आणि पान्घरायला पातळ शाल, जाम कुडकुडलो.
क्रमशः

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Jun 2012 - 1:35 pm | प्रचेतस

वाचतोय.
छान लिहित आहात.

सर्व भाग वाचत आहे...छान लिहीत आहात........

पैसा's picture

19 Jun 2012 - 6:03 pm | पैसा

चांगलं लिहिताय.

असंच लिहा. आवडतेय.
नर्मदे हर!

गोंधळी's picture

19 Jun 2012 - 9:59 pm | गोंधळी

परिक्रमा पुर्ण कर्ण्यास किती वेळ लागला हे जाणुन घेन्यास उत्सुक आहे.

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2012 - 12:48 am | संजय क्षीरसागर

केली असेल तर तुम्हाला एक प्रश्न आहे : आता परत परिक्रमा करावीशी वाटते का?

नमस्कार,
हो आमची परिक्रमा पुर्ण झाली.पण तब्येतीमुळे काही भाग वाहनाने करावा लागला,म्हणून यन्दा पुन्हा परिक्रमेला जाणार आहे.

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2012 - 5:14 pm | संजय क्षीरसागर

अध्यात्मिक साधना की तुम्ही खाली लिहिलय तसं पर्यटनाची आवड म्हणून?

तुम्ही काय करावं ते मला सांगायच नाहीये कारण तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे, फक्त तुमचा हेतू जाणून घ्यायचाय.

शिल्पा ब's picture

20 Jun 2012 - 12:50 am | शिल्पा ब

लोकांना आजकाल काय परीक्रमा करायचं वेड लागलंय देव जाणे!

खुशि's picture

20 Jun 2012 - 4:29 pm | खुशि

नमस्कार.
ज्याची त्याची आवड नाही का? व्यक्ति तितक्या प्रकृती. कुणाला जग बघावे वाटते,कुणाला घरकोम्बडेपणा.

दादा कोंडके's picture

21 Jun 2012 - 12:04 am | दादा कोंडके

हा हा. खरंय! :)

(रुस्टर) दादा

ही पिंक टाकली नसती तरी चालले असते. असो. तुमचं हे जुनं वेड दिसतंय.