तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा

खुशि's picture
खुशि in भटकंती
17 Jun 2012 - 6:23 pm

परिक्रमेचा तिसरा दिवस.पहाटे चन्द्राच्या प्रकाशात मैय्याचे पात्र चमचमत होते जणू मैय्याने चन्देरी साडी परिधान केली आहे.पाणी उबदार होते,स्नानादी आटपुन राऊन्चे दर्शन घेतले.मैय्याची पुजारती केली.सरपन्चवहिनीने चहा दिला.त्या सर्वान्चा भावपुर्ण निरोप घेउन निघालो.धरणातुन रात्री पाणी सोडल्याने खडकनदी पार करणे जमणार नाही असे सरपन्च म्हणाले,त्यानी खेडी गावाहुन जाण्याचा सल्ला दिला.तीन कि.मि.वर खेडीगावातल्या सान्डव्यावरुन खडक नदी पार केली.
सान्गी गावात गावकर्यानी केलेले स्वागत स्वीकारुन पाच कि.मि.वरील बकावा या गावी आलो,या गावात शिवलिन्ग बनविण्याचे कारखाने आहेत,नर्मदेत मिळणार्या शाळिग्राम शिळेपासुन ही बनवली जातात सर्व भारतवर्षात येथुनच शिवलिन्गे पाठवली जातात.
सितारामबाबान्च्या आश्रमात गेलो,दर्शन घेउन निघणार तर महाराज म्हणाले,चहा घेतल्याशिवाय जायचे नाही. तिथे पुण्याच्या सॉ.काळेबाई भेटल्या पुण्याचे एकोणीसजण परिक्रमेत आहेत असे कळले,काळेबाईन्चे पाय सुजले होते म्हणुन त्या मागे थाम्बल्या होत्या.महाराज त्याना गाडीने सोडणार होते ह्या तीन दिवसात माणुसकीचे जे दर्शन घडले त्याने आम्ही भारावुन गेलो होतो.
बकावाहुन मर्दानाला हरिहरकुटीत पोहोचलो. मर्दाना गाव मोरध्वज राजाची राजधानी् हरिहरकुटी मैय्याच्या किनार्यावरील निसर्गरम्य आश्रम आहे.घनदाट झाडी रन्गिबिरन्गी फुलानी बहरलेला बगिचा मैय्याच्या पात्राजवळ जाण्यासाठी बान्धलेला सुरेख घाट्.आणि आतिथ्यशील सेवेकरी.खुपच छान.
क्रमश:

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Jun 2012 - 6:28 pm | बिपिन कार्यकर्ते

एवढंच!?

मदनबाण's picture

17 Jun 2012 - 7:01 pm | मदनबाण

महोदय आपण इतके इंटुकले पिंटुकले भाग टाकलेत तर वाचन परिक्रम पूर्ण करण्यास ३ वर्ष १३ महिने लागतील की !
तेव्हा जरा वेळ घ्या पण मोठा भाग लिहा...

jaypal's picture

17 Jun 2012 - 9:27 pm | jaypal

त्या महोद्या आहेत रे

अवांतर = परीक्रमेस पराला त्याच्या र.१००/- आणि नानाला रु.१/- सकटच घेउन जाईन असा मी पण एक पण केला आहे.

५० फक्त's picture

17 Jun 2012 - 10:22 pm | ५० फक्त

आहाहा काय तो पण अन काय ती प्रतिज्ञा, मान गये.