तीर्थजननी नर्मदापरिभ्रमण परिक्रमा

खुशि's picture
खुशि in भटकंती
18 Jun 2012 - 3:47 pm

हरिहर कुटीचा निरोप घेउन निघालो,एका मुलाने जवळचा रस्ता दाखवला त्यामुळे एक कि.मि. चा फेरा वाचला.रस्ता धुळभरला कच्चा होता.धुळीत पावले बुडत होती पायात बुट असुनही पायाला चटके बसत होते. डोक्यावर उन रणरणत होते रस्त्याच्या बाजुला कापसाची शेते होती त्यामुळे मोठी झाडे नव्हती .तहानेने जीव व्याकुळ होत होता,जवळचे पाणी सम्पले ५/७ कि.मि. चालुन झाले असावे,मनेगाव फाटा आला,चॉक होता कुठल्या रस्त्याने जायचे?कुणी चिटपाखरुही दिसत नव्हते कोणाला विचारणार?किम्कर्तव्यमुढ होऊन रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसलो.अडचणीच्यावेळी नर्मदामैय्या मदत करते असे म्हणतात .मग हाक मारली;नर्मदे हर! क्षणात प्रतिसाद आला हर नर्मदे! एक मुलगी शेतातुन रस्त्यावर आली,गोड हसली थक गयी माई? बाबाजी थक गये? लो पानी पिओ.तिने गार पाणी दिले अन्तरात्मा थन्ड झाला.सुखी रहो आमच्या मुखातुन आशीर्वाद बाहेर पडला.ती म्हणाली,सिधे चले जाना अब झाडी ही झाडी है.आम्ही धन्यवाद दिले आणि पुढे निघालो.
२/३कि.मि. गेलो तेलिभट्यान गाव आले.मैय्याच्या किनारी सितारामाआश्रमात आलो,मोठ्यापिम्पळाच्या पारावर पाठपिशवी काढुन विसावतोनविसावतो तोच हसतमुख सिताराम बाबा पाणी घेउन आले.वयवर्षे१००च्यापुढे,कमरेला फक्त लन्गोटी.लगबगीने बाबा चहा घेउन आले,खुप बरे वाटले.चहा घेतला,थोडी विश्रान्ती घेउन २५/३० पायर्या उतरुन मैय्याच्याजवळ गेलो,छान थन्डगार नर्मदाजल.तोन्डावर मारल्यावर सारा शिणवटा क्षणात पळाला.
वर आलो तोच बाबा सदाव्रत घेऊन आले,सदाव्रतात डाळ-तान्दुळ,साजुक तूप,साखर,बिस्किटचापुडा,उदबत्या,माचिस एवढे होते.आम्हाला दोघाना स्वतन्त्र सदाव्रत दिले,मी एकच पुरे असे म्हटले तर हसुन खुणेनेच असुदे असुदे म्हणाले.त्यान्चे मॉनव्रत असते.
सितारामबाबान्बद्दल गावकर्यानी असे सान्गितले की,बाबान्चा हा आश्रम धरणाच्या डुबक्षेत्रात येतो,सरकार त्याना दुसरीकडे जागा देत आहे पैसेही देत आहे पण बाबा म्हणतात मला काय करायचे पैसे?मैय्या सर्वकाही देते.मी इथुन कुठेही जाणार नाही. गेल्यावर्षी पावसाळ्यात खुप मोठा पुर आला होता पाणी सारखे चढतच होते,बाबा पारावर रामायण वाचत होते लोकानी त्याना गावात चलण्याचा आग्रह केला पण बाबा नाही म्हणाले मैय्या जो चाहेगी वही होगा असे म्हणून तिथेच बसले नाईलाजाने लोक निघुन गेले.रात्रभर पाऊस पडतच होता,सकाळी लोक आले त्याना वाटले होते बाबान्चे काय झाले असेल कोण जाणे.बघतात तर काय, बाबा बसल्याजागीच होते रामायणाची पोथी किन्चितही भिजली नव्हती.बाबान्चे फक्त पाय भिजले होते.लोकानी विचारले कसे काय झाले? बाबा म्हणाले,मैय्या आयी;श्रीरामजीके दर्शन किये ऑर चली गयी.लोकानी हर्षभराने श्रीरामाचा आणि मैय्याचा जयजयकार केला. बाबान्च्या पायावर लोटान्गण घातले
दुपारचे ४च वाजले होते त्यामुळे सर्वानुमते पुढे जावे असे ठरले,वाटचाल सुरु झाली. ३/४कि.मि. गेलो सन्ध्याकाळ झाली होती,छोट्याशा टेकडीवर गॉदाही आश्रम होता तिकडे गेलो,नन्दनभारती महाराजाना विचारून तिथे आसन लावले.घनदाट अरण्यात निसर्गरम्य आश्रम आहे. महाराज,त्यान्च्या शिष्या नर्मदामाताजी वयोव्रुद्ध आहेत.छोटेसे शेत,गायीगुरे,काही फळाची-फुलाची बाग असे सगळे सुन्दर आहे.
आज तुलाच चुलीवर स्वयम्पाक करावा लागेल सगळे मला चिडवत होते,मैय्या आहे;देखेन्गे मी म्हटले.स्नानादि आवरुन पुजारती करुन मी स्वयम्पाक घरात गेले.माताजी म्हणाल्या,बैठो! तुम्हे आदत नही चुल्हेपर खाना बनानेकी मै बनाती हु. मी मदत करते म्हटले,कणिक मळून दिली. मला ओम्कारेश्वरला भेटलेल्या महाराजान्ची आठवण झाली,चुलीवर स्वयम्पाक करण्याची गोष्ट निघाल्यावर ते मला म्हणाले होते,बेटा! मैय्याने तुम्हारेलिये अलग काम दिया है रुग्णसेवाका चुल्हेपर खाना बनाना तुम्हारा काम नही,परिक्रमामे तुम्हे हमेशा बनाबनाया खानाही मिलेगा.आज त्याची प्रचिती आली.
पहाटे स्नान पुजारती करुन निघालो,महाराजानी सर्वाना गायीचे धारोष्ण दुध दिले ते पिउन महराज माताजीना प्रणाम करुन आमची विनोबा एक्स्प्रेस प्रस्थान करती झाली.
३/४कि.मि. चाललो असू. पायवाट जन्गलात वळली आणि व्हायचे तेच झाले,वाट चुकलो.दोनएक तास भरकटलो अभिमान;आम्ही मार्ग शोधुच हा गर्व गळून पडला,नर्मदेहर! हाक मारली,प्रतिसादही त्वरीत मिळाला हरनर्मदे! आम्ही टेकडीवर होतो,खालच्या बाजुला काही गुराखीमुले होती.त्यानी खाणाखुणानी आम्हाला खाली या म्हटले,हळूहळू टेकडी उतरून खाली गेलो.त्यानी रस्ता दाखवला त्यान्चे आभार मानुन पुढे निघालो तेलियागाव गेले अमलथा आले.फुलकुमारी पवार यानी आग्रहाने चहा दिला. त्यान्च्याकडे भारती ठाकूर यान्ची चॉकशी केली,त्या अमलथा येथेच शाळेत शिकवतात.मग भारतीताईना फोन केला त्यानी शाळेत बोलावले पण आम्ही रस्ता चुकलो आणि पुढे गेलो.भारतीताईन्चा फोन आला त्याना झालेले सान्गितले मग त्यानी लेपाघाटला थाम्बा मी येते असे म्हटले.२कि.मि. वर लेपाघाट गावात शाळेजवळ पारावर थाम्बलो.थोड्याच वेळात भारतीताई आल्या.सरकारी नोकरीत व्हालेन्टरी रिटायरमेन्ट घेउन नाशिकचे सुखवस्तु जीवन सोडुन भारतीताई येथे आदिवासी मुला-मुलीला शिकवण्याचे सेवाकार्य विनामोबदला करीत आहेत. भारतीताई,निवेदिता खान्डेकरताई,उषःप्रभा पागेताई या तिघीनी २००५मध्ये पायी नर्मदापरिक्रमा केली होती.भारतीताईन्चे नर्मदापरिक्रमा एक अन्तर्यात्रा हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
भारतीताईन्चा निरोप घेउन मरकटी-नर्मदा सन्गमाजवळ मरकटिवरील पुलावरुन महेशश्वरधरणाजवळुन शान्तिनगर मार्गे माकडखेडा येथे डोन्गरेमहाराज सदाव्रतीस्थळी आलो. पडवीत आसन लावले सदाव्रत घेउन बरोबरच्या मन्डळीनी तिक्कड[कणकेच्या जाड जाड पोळ्या] आणि डाळ केली,मिरच्या भाजुन ठेचा केला.मला चतुर्थीचा उपास होता मी शेन्ग्दाणे खाल्ले.सर्वान्चे भोजन झाल्यावर थोडी विश्रान्ती घेउन २५/३० पायर्यान्चा घाट उतरुन मैय्याच्या किनार्याने पुढे वाटचाल सुरु केली.शेतीसाठी लावलेले पाण्याचे पाइप,वायरी यान्च्या जन्जाळातुन चिखल तुडवत चालत होतो,मैय्याच्या समोरील किनार्यावर महेश्वर देवी अहिल्याबाई होळ्करयान्चा राजवाडा मन्दिरे घाट दिसत होते.मैय्याच्या सानिध्यामुळे गार वारा होता त्यामुळे ऊन जाणवत नव्हते.
थोड्यावेळाने एक छोटी पण बिकट वाट असलेली टेकडी चढुन गेलो रस्ता दिसतच नव्हता काय करावे? एक शेतकरी महिला दिसली तिने मार्गदर्शन केले त्याप्रमाणे टेकडीच्या उतारावरील मोहरीच्या शेतातुन वाट काढत उतरलो,एक छोटा नाला होता एक्मेकाना आधार देत चिखलात फसत तो नाला पार केला,बरबटलेले पाय धुवुन पलिकडली टेकडी चढलो,सन्ध्याकाळ झाली होती टेकडी उतरलो पुन्हा एक चढ होता पण वर गाव दिसत होते.ते पाहुन थकवा पळाला.ते होते बडगाव.
गावात शिरताक्षणी गावकर्यानी हर्षौल्ल्साने आमचे स्वागत केले.२/३ ग्रुप मिळूण २५/३० जण झालो होतो.मग ४/५ घरात पाहुण्यान्ची विभागणी झाली.आम्ही श्री.राधेश्याम पाटिदार यान्च्याकडे राहिलो.योगायोगाने त्यान्च्या मुलीचे सासर नाशिकला आहे.मुलीच्या सासरची मन्डळी म्हणून आमचे आदरातिथ्य खास होते.स्नानाला गरम पाणी,भोजनाला खिरपुरी अगदी थाट होता आमचा.
काही ओळखपाळख नाही केवळ मुलीच्या सासरगावचे म्हणून एवढा पाहुणचार आम्ही अगदी भारावुन गेलो.गावातील बरेचजण मुलीच्या सासरकडच्याना आवर्जुन भेटायला आले.खुप गप्पा झाल्या.
बडगावलाच पुण्याच्या भागवत पती-पत्नी,माढेकरकाका,अम्बरनाथचे श्री. गोसावी भेटले.
क्रमशः

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 Jun 2012 - 7:19 pm | मदनबाण

आहा... आता हा जरा मोठा भाग वाचुन बरे वाटले. :)
असेच लिहीत रहा...

(नर्मदे हर) :)

नमस्कार,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण वाचत आहात म्हणुन लिहायला उत्साह वाटतो आहे.

मुक्त विहारि's picture

18 Jun 2012 - 7:30 pm | मुक्त विहारि

मस्त लिहिले आहे...

मुक्त विहारिजी नमस्कार,
माझा लेख वाचुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. प्रतिसाद मिळाला की लिहायला हुरुप येतो.

विजय_आंग्रे's picture

18 Jun 2012 - 7:55 pm | विजय_आंग्रे

छान लिहलय.
पु.भा.प्र.
ए. सु. - प्रत्येक धाग्याला क्रमांक दिलेत, तर शोधायला सोपे पडेल. आणि आधीच्या धाग्यांची लिंक नविन भागात दिलीत तर नविन वाचकांना आधीचे भाग पण वाचता येतील.

विजय आन्ग्रेजी नमस्कार.
माझे लेख वाचुन सुचना,छान प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.आजपासुन क्रमान्क टाकते. सन्गणकावर काही लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,मला सन्गणक वापरणेही फारसे जमत नाही स्वतःचे स्वतःच शिकते आहे. आपल्या सारख्या उत्साह वाढवणार्या भावन्डान मुळे ते जमेल असे वाटते.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Jun 2012 - 8:36 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय.

सदाव्रत की सदावर्त?

खुशि's picture

19 Jun 2012 - 11:01 am | खुशि

नमस्कार,
शब्द सदावर्त असाच आहे पण मध्यप्रदेश,गुजराथ मध्ये तेथील जनतेने परिक्रमावासीन्च्या सेवेचे सदा{कायमचे} घेतलेले व्रत असते म्हणून ते सदाव्रत म्हणतात.
आपण माझे लेख वाचुन प्रतिसाद देता या बद्दल धन्यवाद.

प्रचेतस's picture

18 Jun 2012 - 8:44 pm | प्रचेतस

छान लिहिलं आहे.

नमस्कार वल्लीजी,
छान लिहिले असे सान्गितलेत खुप बरे वाटले. तो श्लोक लिहिला आहात त्याचा अर्थ कळला नाही, पाली भाषेतिल आहे का? गोदावरी पुर्वेला समुद्राला मिळते असा काहिसा अर्थ आहे का?

हो.
महाराष्ट्री प्राकृतातला श्लोक आहे तो.

खरडवहीत अर्थ सांगतो.

प्यारे१'s picture

20 Jun 2012 - 12:00 pm | प्यारे१

चला आता खुशितैची ख व शोधणं (कोण म्हणतंय रे ते उपा करणं? ) आलं.

गणपा's picture

18 Jun 2012 - 8:57 pm | गणपा

मोठा भाग पाहुन बरे वाटले.
पुभाप्र.
निराश न होता लेखन चालु ठेवल्या बद्दल धन्यवाद. :)

नमस्कार गणपाजी,
लेख वाचलात धन्यवाद. मला माझ्या कामाने आशा न सोडता सर्वतोपरी प्रयत्न करीत रहावे असे शिकवले आहे.त्यामुळे मी निराश होत नाही,टीकेला योग्य उत्तर देत मी माझे काम करीत राहणार.पुन्हा एकदा धन्यवाद.या सन्गणकाच्या क्षेत्रात मी नविन आहे,मित्र-बान्धवानी केलेल्या सुचनान्चा मी नेहेमीच आदर करेन.

पैसा's picture

18 Jun 2012 - 11:11 pm | पैसा

अगदी तपशीलवार वर्णन करताय! छान वाटलं!

नमस्कार ज्योती.
आपण माझे लेख वाचत आहात,खुप छान वाटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jun 2012 - 11:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर्णन अगदी तपशिलवार आणि व्यवस्थित चालू आहे. बाकी, सिताराम बाबांबद्दलच्या चमत्काराबद्दल माझा एक वाचक म्हणून काही विश्वास नाही. पण लेखन वाचतोय.

-दिलीप बिरुटे\

श्रीवेद's picture

19 Jun 2012 - 9:31 am | श्रीवेद

खुप सुन्दर वर्नन. कधितरि हा अनुभव घ्यायचा आहे.

श्री.वेदजी नमस्कार.
हा अनुभव खरच घेण्यासारखा आहे. आम्ही यन्दा दसर्यानन्तर पुन्हा जाणार आहोत.

सुप्रिया's picture

19 Jun 2012 - 10:57 am | सुप्रिया

छान वर्णन. पुढच्या भागांची वाट बघतेय.

नमस्कार सुप्रिया.
खरेच सान्गितलेत रामनामाचा परिक्रमेत खुप उपयोग झाला,कसा ते वाचालच पुढील लेखात. तुम्हाला लेखन आवडते हे वाचुन माझा लिहिण्याचा उत्साह वाढला आहे. खुप खुप धन्यवाद.

स्वराजित's picture

19 Jun 2012 - 12:40 pm | स्वराजित

नर्मदे हर !!!
खुप छान लिहित आहात.

खुशि जी, लेख चांगला लिहिला आहेत.
फोटो असते तर अजुन लेख वाचताना चांगल वाटल असत.
पण तरीही लेख चांगला आहे. पुढच्या लेखांची वाट पाहतो आहे.

नर्मदे हर .

कलंत्री's picture

19 Jun 2012 - 1:55 pm | कलंत्री

लेख खुपच चांगला आणि मनाला प्रेरणा देणारा वाटला. असे काहीसे लेखन वाचले की मन अंतर्मुख होते आणि आपण काय करीत आहोत आणि त्याचा नेमका काय उपयोग आहे असे काहिसे जाणवते.

पुढिल लेखनाबद्दल शुभेच्छा.

दीपा माने's picture

20 Jun 2012 - 3:57 am | दीपा माने

खुशीजी ,तुमच्या 'नर्मदे हर'ह्या हाकेला मानवी रुपात प्रत्यक्ष देवी नर्मदेनेच मदत केली आहे. हे भाग्य तुमच्या नशिबी आहे म्हणुनच ही वारी करत आहात. तुमच्या लिखाणामुळे मलाच ती वारी केल्याचे समाधान मिळत आहे. तुमच्या पुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत आहे. तुमची वारी सफल होवो अशी प्रार्थना करते.