तीर्थजननी नर्मदामैय्याची परिभ्रमण-परिक्रमा

खुशि's picture
खुशि in भटकंती
15 Jun 2012 - 2:21 pm

खुप वर्षापुर्वी सटाण्याच्या अहिरेगुरुजीनी [वियोगी नारायण] लिहिलेले नर्मदेहर नर्मदापरिक्रमा हे पुस्तक वाचले होते.तेव्हापासुन नर्मदापरिक्रमा करायची असे मनात होते,रोज स्नान करताना गन्गेचयमुनेचैव गोदावरी सरस्वती,नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन सनिधम कुरु.असे म्हणत मैय्याची प्रार्थना करुन लवकर योग आण असे म्हणत असे.
११/११/२०११ला हा योग मैय्याने आणला.ओम्कारेश्वरपासुन परिक्रमा सुरु केली.जितेन्द्रशास्त्री गुरुजीनी सन्कल्प पुजा सान्गितली,पुजा कढई कन्यापुजन करुन नर्मदेहर केले,नगरपालिकेच्या कार्यालयातुन प्रमाणपत्र घेउन चालायला सुरवात केली.
वाटेत श्रीराम महाराज भेटले.{ गोन्दवलेकर महाराजान्चे भक्त;मैय्याच्या उत्तर किनार्यावर नावघाटखेडीला त्यान्चा आश्रम आहे.} ते म्हणाले, मोरटक्क्याला भोजनप्रसाद घेऊन येतो.पाठीवर जड पाठपिशवी,भरदुपारचे रणरणते उन पहिल्याच दिवशी दम निघाला.जैनधर्मशाळेत पोहोचेपर्यन्त सन्ध्याकाळ झाली.कबुल केल्याप्रमाणे महाराज भोजनाचा भलामोठा डबा घेउन आले छान भोजन झाले.आमच्याकडील बोजा बघुन महाराजानी काही सामान कमी करावे असे सुचवले,त्यानुसार काही सामान त्यान्च्या जवळ ठेवले.खुप दमलो होतो,सन्ध्याकाळची मैय्याची पुजारती करुन विश्रान्ती.
पहाटे उठून विहिरीवर थन्ड पाण्याने स्नान आटोपले,पुजारती करुन प्रस्थान ठेवले.रेल्वे पुलाखालुन मैय्याच्या किनार्याने वाटचाल सुरु केली.वाटेत एका भल्या माणसाने आधारासाठी काठी हवीच असे सान्गुन बाम्बुच्या काठ्या आम्हा उभयताना दिल्या.परिक्रमेत त्यान्चा खुपच उपयोग झाला.
टोकसरला गोमुखआश्रमात भोजनप्रसाद,प्रमाणपत्रावर शिक्का घेउन पुढे निघालो. हा गोमुखाआश्रम खुप सुन्दर आहे,निसर्गरम्य.येथे एका कुन्डात गोदावरी प्रकट झालेली आहे. पीतनगर,कान्करिया,मढी,अशी गावे पार करत वेळोवेळी गावकर्याकडुन होणारे आदरातिथ्य स्वीकारत सन्ध्याकाळी रावेरखेडीला श्रीमन्तान्च्या आश्रयाला पोहोचलो.श्रीमन्त थोरले बाजिराव यान्च्या समाधीचे दर्शन घेउन समोरच राहणार्या सरपन्चान्कडे आसन लावले.वान्गी-बटाटा भाजी भाकरी असे गावरान चवीचे सुग्रास भोजन मैय्याच्या क्रुपेने मिळाले.पुजापाठानन्तर गावकर्यान्बरोबर गप्पागोष्टी करुन बिनघोर झोपलो,प्रत्यक्ष पेशवे सरक्षणास असताना भीती कसली?

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

15 Jun 2012 - 2:22 pm | नाना चेंगट

कॉलिंग यकु !!

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jun 2012 - 3:59 pm | बिपिन कार्यकर्ते

खूप त्रोतक वाटतंय! डिट्टेल लिहा की!

खुशी तै / काकु
परिक्रमा ( लेख ) फारच थोडक्यात आटोपली वाटते ,जरा अजुन सविस्तर लिहायचे होते की ,की क्रमशः टाकायला विसरला आहात ?

Maharani's picture

15 Jun 2012 - 4:08 pm | Maharani

मला पण तसेच वाटते आहे...बहुतेक क्रमशः टाकायला विसरल्या असतील...

खुशि's picture

17 Jun 2012 - 4:56 pm | खुशि

नमस्कार पियुशा,
क्रमशः टाकण्याचे राहिले,नवीनच आहे ना. चुकभुल द्यावी-घ्यावी.

गोंधळी's picture

15 Jun 2012 - 11:00 pm | गोंधळी

हा स्वप्न व्रुतांत आहे का?

पुजापाठानन्तर गावकर्यान्बरोबर गप्पागोष्टी करुन बिनघोर झोपलो,प्रत्यक्ष पेशवे सरक्षणास असताना भीती कसली? ह्या नंतर तुम्हाला कोणि तरि नक्कीच झोपेतुन उठवले असणार.

खुशि's picture

17 Jun 2012 - 5:05 pm | खुशि

नमस्कार गोन्धळीजी,
हा स्वप्न व्रुतान्त नाही. रावेरला सरपन्चान्च्या घराच्या पडवीत झोपलो होतो,माझ्यासारख्या शहरात राहिलेल्या खेडेगाव क्वचितच पाहिलेल्या बाईसाठी हा अनुभव नवाच होता त्यामुळे आधी थोडी धाकधुक वाटत होती म्हणुन पेशव्यान्चे सानिध्य ही मनाची आमची आम्हीच घातलेली समजुत होती. आम्हाला नन्तर कुणीही झोपेतुन उठवले नाही.

क्रमशः नसल्याने गोंधळ झाला.

५० फक्त's picture

16 Jun 2012 - 6:58 am | ५० फक्त

नर्मदे माये कधी येशील इथं आंतरजालावरी, बहु झाले वर्णने तुझिया प्रदक्षिणेची, माते अवतार घे अन उद्धार एकदाच काय ते सर्वांशी.

नर्मदे माये कधी येशील इथं आंतरजालावरी, बहु झाले वर्णने तुझिया प्रदक्षिणेची, माते अवतार घे अन उद्धार एकदाच काय ते सर्वांशी.

हे असलं काही वचावचा वाट्टेल तिथे वाट्टेल ते आम्ही बोलत राहू पण स्वतःच्या बुडाला ताण देऊन तिथपर्यंत जाणार नाही.
कसें?
घ्या नमस्कार.

प्रत्यक्ष देव विविध रुपानी आम्हाला भेटायला येतो आहे म्हणल्यावर कोण नसत्या उचापत्या करा.

बरं ते राह्यालं तुम्ही कधी भेटताय बोला ? उगा नुसतं चेपुला अपडेट नको पुणें - बिईंग देअर.

खुशि's picture

17 Jun 2012 - 5:11 pm | खुशि

नमस्कार प्रेषक,
आपणाला माझे लेखन आवडलेले दिसत नाही; तरीही वाचल्याबद्दल धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2012 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

परिक्रमा नको.. धागे आवर....

५० फक्त's picture

16 Jun 2012 - 1:50 pm | ५० फक्त

त्यापेक्षा आपलं सरकार जसं हजला जाणा-यांची सोय करतं, तसं आपण केलं तर आंतरजालाशी संबंध पुढचे पाच वर्षे येणार नाही अशी व्यवस्था करुन या लोकांना नर्मदा परिक्रमा + ह्युंगत्सु परिक्रमा फ्री असं पॅकेज काढावं.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2012 - 3:31 pm | परिकथेतील राजकुमार

१००/- रुपायाचा निधी ताबडतोब घोषीत करण्यात येत आहे.

नाना चेंगट's picture

16 Jun 2012 - 3:34 pm | नाना चेंगट

माझ्यातर्फे १ रुपया जाहीर.

खुशि's picture

17 Jun 2012 - 5:19 pm | खुशि

नम्सकार.
आम्ही परिक्रमा आपल्या मात्रुभूमिचा काही भाग बघावा,लोकजीवन बघावे म्हणुन केली.आपल्या मदतीच्या अपेक्षेने नाही.आपल्याला लेख आवडलेला दिसत नाही,काही लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. आणि आवडले नाहीतर न वाचण्याचा आपला हक्क अबाधितच आहे नाही का?

खुशि's picture

17 Jun 2012 - 5:13 pm | खुशि

नमस्कार.
धन्यवाद.

मन१'s picture

17 Jun 2012 - 5:16 pm | मन१

+१

पण ह्या पराला काही पब्लिक "प्रतिसाद नको पण फटके आवर" म्हणेल त्याचे काय? ;)

आपला अनुभव मोकळेपणाने मांडावा ही आपणास विनंती.
सध्या जगन्नाथ कुंटे यांचे नर्मदे हर हे पुस्तक वाचत आहे,आपण आपला अनुभव विस्तारुन लिहल्यास अधिक आनंद होईल.

(नर्मदे हर)

गणपा's picture

16 Jun 2012 - 5:56 pm | गणपा

लेख फारच त्रोटक झाला आहे.
कदाचीत घाई घाईत चुकुन प्रकाशीत झाला असेल. पण इथे आलेल्या काही प्रतिसादांमुळे हे अपुर राहिलेलं लेखन कितपत पुर्ण होईल याची शंका वाटते.

आपल्या आधी मिपावर याच विषयावरचं लेखन येउन गेलय. वाचलं नसल्यास हे दुवे.
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा- २

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - ३

चौकटराजा's picture

18 Jun 2012 - 8:33 am | चौकटराजा

पण इथे आलेल्या काही प्रतिसादांमुळे हे अपुर राहिलेलं लेखन कितपत पुर्ण होईल याची शंका वाटते. ( गणपांची भीति )
इथे दिलाशाला तोटा नाही अन निराशेला देखील. खुशि जी आपण लिहित रहा. रोम वाज नॉट
बिल्ट इन अ डे !