तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा - भाग ६

खुशि's picture
खुशि in भटकंती
21 Jun 2012 - 1:26 pm

पाटीगावात मनोज मालवीयच्या घरी उत्तम पाहुणचार झाला रात्री भोजनप्रसादासाठी दाल-बाटी आणि चुरम्याचे लाडू होते.मनोजच्या आईच्या हाताला अप्रतिम चव आहे. परिक्रमावासीची सेवा म्हणजे प्रत्यक्ष मैय्याची सेवा असे समजणारे हे कुटुम्ब आहे.
रोशनी आणि पार्थ तर आमची नातवन्डे असल्यासारखी आमच्याशी समरस झाली होती.ते आम्हाला घेउन गावातील साईबाबा मन्दिरात गेले लहानसे सुबक मन्दीर सुन्दर मुर्ती दर्शनाने समाधान झाले. नन्तर मारुती मन्दिरातही दर्शन घेतले.त्यान्ची शाळा बघितली.रोशनी शाळेच्या स्नेहसम्मेलनात डान्स करणार आहे,आम्ही तेव्हा आलेच पाहिजे असे तिने सान्गितले.आम्हीही हो नक्की येऊ म्हटले.
रात्री गावातील काही मन्डळी भेटायला आली. पाटीगाव या भागातली कापसाची मोठी बाजारपेठ आहे,आदिवासी भाग असुनही शिक्षणाचा भरपुर प्रसार झाला आहे,९०टक्के जनता साक्षर आहे.वगैरे गोष्टी समजल्या.आता पर्यन्तच्या प्रवासात मध्यप्रदेशातील लोक खुपच आतिथ्यशील आहेत्,परिक्रमावासी म्हणजे देवाचे रुप असतात अशी त्यान्ची धारणा आहे. नर्मदामैय्याचा नदी असा उल्लेख केलेला त्याना मुळीच आवडत नाही नदी मत कहो वो माता है हमारी,असे म्हणतात.समोर कुणी अनोळखी व्यक्ति आली तर साधे स्मितहास्यही न करणार्या मग आदरातिथ्य तर दुरची गोष्ट,अशा आपल्या सारख्या मराठी माणसाना तर माणुसकीने कसे वागावे याचा चान्गला धडा मिळतो परिक्रमेत.असो
पहाटे उठलो कारण आज बराच लाम्बचा पल्ला गाठायचा होता.स्नान पुजारती करुन खाली आलो तर पराठे दलियाची खीर असा नास्ता तयार होता.मुले झोपली होती त्याना जाग आली तर जाऊ देणार नाहीत म्हणुन अगदी गुपचुप नास्ता केला,सर्वान्चा निरोप घेउन निघालो पण... पार्थ उठलाच पाठोपाठ रोशनीही उठली मग काय जाऊ नका म्हणून भोकाड पसरले दोघानीही कमरेला मिठी मारली काहीकेल्या अ‍ॅकेनात,कसेबसे मनोजने त्याना बाजुला केले आम्ही लगेच परत येऊ असे आश्वासन दिले तेव्हा कुठे निघता आले.अगदी दिसेनासे होईतो नानाजी-नानीजी अशा हाका अ‍ॅकू येत होत्या आम्हालाही गलबलुन आले होते,मी तर रडतच होते.आम्ही दिल्लीहुन नाशिकला यायला निघालो की असेच द्रुश्य असते,खुशी आमची नात भोकाड पसरते,गुडिया मोठी आहे ती मुळूमुळू रडते,लग्नाला एवढी वर्षे झाली तरी राणीच्या {आमची मुलगी गीता} डोळ्यात पाणी तरारलेले असते,आमची अवस्थाही काही वेगळी नसते,असो खुपच विषयान्तर झाले.
भावपुर्ण निरोप घेऊन चालु लागलो.पाटी ते बोखराटा असा प्रवास करायचा होता.आवली,सावरियापानी ही गावे पार केली.जन्गल तुरळक होते ,रस्ताही चान्गला होता झपझप चालत होतो.साधारण १०कि.मि. चाललो असू,घाट सुरु झाला. खडा घाट दमछाक व्हायला लागली.उठत बसत पाणी पित मार्गक्रमणा करत होतो रस्त्यावर आम्हा दोघाशिवाय कुणी नव्हते १२ वाजले होते सकाळी केलेला नास्ता केव्हाच जिरुन गेला होता. मनोजच्या आईने बरोबर पराठे दिले होते,एका ओढयावर्च्या पुलाच्या कठड्यावर बसुन ते खाल्ले,थोडी विश्रान्ती घेउन चालु लागलो. झाडी कमी असल्याने उन खुप लागत होते बोखराटा ५कि.मि. पाटी दिसली,मी बसकणच मारली दुपारचे २ वाजुन गेले होते दोघेही खुप दमलो होतो डाम्बरी रोडमुळे बुटातही पाय पोळत होते बोखराटा येईपर्यन्त सन्ध्याकाळ झाली असती.मैय्या! नाही चालवत, कसे पोहोचणार? पाय ओढत चालत होतो कारण कुठे वस्तीचा मागमुसही नव्हता.आणि मागुन एक प्राथमिक आरोग्य केन्द्राची जीप आली,थाम्बली.ड्रायव्हर रवी कुमावत आणि विजय यादव उतरले,नमस्ते माताजी,नमस्ते बाबाजी .आम्ही बोखराटाला जात आहोत चला बसा गाडीत खुप दमला आहात आम्ही काही अ‍ॅकणार नाही तुम्हाला आमच्या बरोबर आलेच पाहिजे,असे म्हणून त्यानी आमच्या पाठपिशव्या त्यानी काढुन घेतल्या आणि आम्हाला जीपमधे बसायला भाग पाडले.त्यान्ची आपुलकी पाहुन काही बोलायला सुचलेच नाही. फक्त नर्मदे हर.
जिथे आम्ही जीपमध्ये बसलो तिथुन पुढचा घाट फारच कठीण होता,योग्यवेळी जीप पाठवली मैय्याने असेच म्हणावे लागेल.कितिही नाही म्हटले तरी तिच्या क्रुपेचा प्रत्यय आम्हाला पदोपदी येत होता.४ वाजता बोखराटाला पोहोचलो.रविने चहा दिला आणि गजानन मालवीय यान्च्या घरी सोडले.गजानन मालवीय यान्चे नाव बडवाणीला सन्जय पुरोहित यानी सान्गितले होते. आज मुक्काम बोखराटा. क्रमशः

प्रतिक्रिया

स्वराजित's picture

21 Jun 2012 - 1:51 pm | स्वराजित

नर्मदे हर !!!
आज चा भाग खुप छान आहे.

सुजित पवार's picture

21 Jun 2012 - 3:02 pm | सुजित पवार

तुम्च्याबरोबर मि सुध्धा परिक्रमा कर्तोय असा भास होतोय.

पैसा's picture

21 Jun 2012 - 6:35 pm | पैसा

छान अनुभव!

गणपा's picture

21 Jun 2012 - 6:43 pm | गणपा

लिहीत रहा.