तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-८

खुशि's picture
खुशि in भटकंती
22 Jun 2012 - 4:22 pm

बजरन्गकुटी सोयीस्कर नव्हती,पायाचे फोडही बरोबर नव्हते दोन दिवसतरी विश्रान्ती घेणे जरुरी होते म्हणून तिथुन मुक्काम हलवला आणि सुरभि हॉटेलमध्ये आलो.जेवणाचा डबा खुपच छान होता.दुसर्यादिवशी तर त्या भाऊने खीरपुरी दिली पैसे मात्र फक्त ३० रु. घेतले मी विचारले तर म्हणाला,ये तो सेवा है माताजी आप परिक्रमावासी हो इसलिये आज खीर पुरी बनायी,धन्य तो मध्यप्रदेश आणि धन्य तिथले लोक. सन्ध्याकाळी महाराष्ट्राच्या बस स्थानकावर गेलो म्हटले बघावे शहादा किती दुर आहे,जवळ जवळ पन्धरा तीन वारानी महाराष्ट्राच्या भुमीवर पाय ठेवत होतो मनात भावनान्चा कल्होळ उठला होता.बस जवळ कन्डक्टर साहेब उभे होते भाऊ! मी हाक मारली,एक नाही दोन नाही; पुन्हा हाक मारली तरी तेच एक नाही दोन नाही.भाऊ !! थोडी जोरात हाक मारली, क्काय्य आहे? कन्डक्टर साहेब एकदम खेकसले,आलो महाराष्ट्रात, मी म्हटले.म्हणजे काय म्हणजे काय?कन्डक्टर उवाच.काही नाही दोन पावले दुर मध्यप्रदेश्,तिथे इतके आदरातिथ्य,इतका मान.आणि इथे माझा महाराष्ट्र माझी मराठी तर अशी वागणुक.भाऊ,मला फक्त शहादा किती लाम्ब आहे हे विचारायचे होते मी काही तुमच्या बसमधुन फुकट न्या म्हणत नव्हते. मराठी म्हणुन आपुलकीच्या भावनेने भाऊ अशी हाक मारली होती कन्डक्टर साहेब. असो.असे आहोत आपण मराठी लोक.शिष्ठ्, दुसर्याची जराही कदर न करणारे.
पाय थोडे ठीक झाले होते,पहाटे स्नान पुजा आटपुन सुरभिचा निरोप घेतला.टपरीवर चहा घेउन विनोबा एक्सप्रेस निघाली स्वतःच्या राज्यातुन परिक्रमेच्या मार्गावरुन. वाटेत काही मोर्निन्गवाकला निघालेले लोक भेटले,थोड्या गप्पा झाल्या त्यानी बळेबळे १००रु. ह्यान्च्या खिशात कोम्बले तेवढीच मैय्याची सेवा ही त्यान्ची भावना.थोडावेळ आमच्या बरोबर चालले,थोडे पुण्य मिळेल असे म्हणाले,अशावेळी काय बोलावे हे सुचत नाही.डॉक्टर,वकील असलेले ते श्री अग्रवाल,चॉधरी भर रस्त्यात आमच्या पाया पडले.नर्मदामैय्याबद्दलचा हा भक्तीभाव आम्हाला मध्यप्रदेश्,गुजराथ मध्ये सर्व ठिकाणी पहायला मिळाला.दराखेड{ महाराष्ट्र सुरु}, रायखेड,सुखीनदी.सुलतानपुर फाटा,ब्राम्हणपुरी,चान्दसैली गावे गेली.९वाजले होते एका ढाब्यावर जवळच्या शेन्गदाणे गुळाचा नास्ताकेला चहा घेतला. शहादा अजुन १० कि.मि. होते. चला पुढे.धडगाव फाटा येथे गोमाई नदीवर धरण आहे. मनोई लोनखेडा आले,शहादा ५कि.मि. राहिले होते १२ वाजले होते,पोलिसचेकपोस्ट आले.बन्द होते,ओट्यावर थोडावेळ बसलो.कडक उन होते निघालो,पोहोचलो शहाद्याला.इथे परिक्रमावासीन्साठी काहीच निवास व्यवस्था नाही.सरदार सरोवर झाल्या पासुन आणि शुलपाणिच्या झाडितिल लुटीच्या आणि कठीण चढाईच्या रस्त्यामुळे ९५टक्के परिक्रमावासी शहादा-प्रकाशा मार्गेच जातात,वर्षातील ८ महिने लोक परिक्रमा करत असतात तरीही महाराष्ट्रात फक्त प्रकाशा येथे दगडूमहाराजान्ची धर्मशाळा आहे.सरकारने आणि धनिक मन्डळीनी याचा विचार करावयास हवा. असो. शहाद्याहुन प्रकाशा जवळजवळ २०कि.मि. आहे,तेवढे चालणे तेही कडक उन्हात शक्य नव्हते,रिक्षाने प्रकाशाला आलो.दगडुमहाराज भक्तनिवासात १२५रु.भरुन खोली घेतली.
भक्त निवास चान्गले आहे. एकादशी होती,भन्डार्यातील माताजी म्हणाल्या पटकन हातपाय धुवुन या.फराळाचे तयार आहे. अनायसे प्रकाशा या दक्षिणकाशी क्षेत्री उपवास घडला. ४ नम्बरच्या खोलीत आसन लावले,हातपाय धुवुन भन्डारग्रुहात गेलो.भगर दाण्याची आमटी,खिचडी,बटाट्याची भाजी,ताक असा छान बेत होता. खुपच दमलो होतो म्हणुन विश्रान्ती.
सन्ध्याकाळी केदारेश्वराचे दर्शन घेतले आणि पुष्पदन्तेश्वराचे दर्शनास गेलो. पुष्पदन्त गन्धर्वाने शिवमहिन्म स्तोत्राची रचना येथेच केली,त्यानी स्थापिलेले शिवलिन्ग म्हणजे पुष्पदन्तेश्वर. तापीनदीच्या तीरावर ही दोन्ही मन्दिरे आहेत. जवळच मुस्लिम प्रार्थनास्थळ आहे.दोन्ही धर्मातील अ‍ॅक्यतेचे प्रतिक. सुर्यास्तसमयी दोन्ही प्रार्थनास्थळान्वर सुर्य आपलीसोनेरी किरणे सारखीच पसरत होता जणू सन्देश देत होता,सर्वधर्म समानत्व स्वदेशी स्पर्श भावना. इतके सुन्दर आकाश.रात्रीच्या थन्डीचा मुकाबला करण्यासाठी प्रुथ्वीला दिलेली जणू सुन्दर,उबदार सोनेरी शाल. खुप खुप सुन्दर नजारा.किती डोळ्यात साठ्वू किती नको असे झाले होते. पुन्ह:पुन्हा देवचित्रकारापुढे नतमस्तक होत होतो कारण हा सुन्दर नजारा,हा सुन्दर आमचा देश पाहण्यासाठी त्याने आम्हाला डोळे आणि हे निरोगी शरीर दिले आहे. क्रमशः

प्रतिक्रिया

सुजित पवार's picture

22 Jun 2012 - 5:48 pm | सुजित पवार

लिहित रहा, वाचत राह्तो

पैसा's picture

22 Jun 2012 - 7:31 pm | पैसा

तुम्ही सगळ्या नोंदी ठेवल्यात हे बरं केलंत. नीट डिटेल वाचता येतंय. गूळ शेंगदाने हे उत्तम प्रकारे एनर्जी देतं. एवढं चालायला हवं तर असंच खाणं चांगलं!