तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-१३

खुशि's picture
खुशि in भटकंती
26 Jun 2012 - 12:33 pm

आनन्द आश्रय धाम गोराग्राम-राजपिपला सुन्दर आश्रम.पहाटे ४ वाजता मन्दिरात पुजाभिषेकाला सुरवात होते,रुद्रपाठ,शिवमहिन्म स्तोत्रपाठ होतो त्यानन्तर होतो मधुर शन्खनाद,आरतीला यावे असा सन्देश शन्खनादाद्वारे देतात.तबला पेटी म्रुदुन्ग डमरु आणि झान्जा यान्च्या तालावर सुरेल आरती सुरु होते. तेथिल वेदशाळेतील विद्यार्थी हे सर्व करतात. अत्यन्त शिस्तशीर वातावरण असते. पुजारतीनन्तर चहापान होते आणि सर्वजण आपापल्या कामाला लागतात.
आम्ही मैय्या किनार्याने फिरायला बाहेर पडलो कारण नास्ता ८ वाजता मिळणार होता. सुर्योदय नुकताच झाला होता. प्राची गुलाबी लालसर रन्गाने न्हाउन निघाली होती. छान गार वारा सुटला होता अर्थात थन्डीही वाजत होती पण वातावरणात उत्साह भरुन ओसन्डत होता. आश्रमाच्या बगिच्यातील फुले सुन्दर उमलली होती सुगन्ध वातावरणात दरवळत होता. घाटावर उतरलो मैय्याच्या पात्रात पाणी कमी होते,थोड्याच दुरीवर सरदार सरोवर असल्याने पाणी सोडले तरच पात्रात पाणी असते पण तरिही अधुनमधुन असलेल्या खडकान्च्या कपारीमधुन अवखळपणे दूडु दुडू धावणारी जलरुपी नर्मदामैय्या सोनेरी उन्हाचे चमचमते परकर पोलके घातलेल्या अवखळ बालिके सारखी गोजिरवाणी दिसत होती. पात्रातिल दगडा खडकान्च्या आश्रयाने उभ्या रानवेली आणि त्यान्च्यावर उमललेली छोटी छोटी रन्गिबिरन्गी सुन्दर फुले जणू तिच्या सोनेरी परकर चोळीवरचा कशिदाच. कितीतरी वेळ आम्ही अनिमिष नेत्राने भान हरपुन बघत होतो.
नन्तर तसेच किनार्याने शुलपाणेश्वराच्या मन्दिराकडे गेलो.वाटेत हरिधाम दिसले,काल दुपारी तिथे भोजनप्रसाद घेतला होता.आश्रमाची मागची बाजु होती ही. मोठमोठ्या व्रुक्षान्च्या दाटीत लपले होते हरिधाम.आम्ही खालच्या बाजुला होतो आणि आश्रम उन्च टेकडीवर पण कम्पाउन्डला लावलेल्या रन्गिबिरन्गी बोगन्वेली सुन्दर दिसत होत्या. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे शुलपाणेश्वराच्या मन्दिराकडे जाणारा रस्ता तुटला होता त्यामुळे मन्दिरात न जाता आम्ही आनन्दधाम मध्ये परत आलो. नास्ता तयार होता. तो करुन खोलीत परत आलो,आता १२ वाजता भोजनाची घन्टा होइपर्यन्त काही काम नव्हते. कपडे धुणे राहिले होते कारण घाईघाईने आरतीला जावे लागले होते,कपडे धुतले. नन्तर नातेवाईकाना फोन केले.
दुपारी भोजनप्रसाद घेतल्यानन्तर थोडावेळ सन्ध्याकाळच्या स्वयम्पाकाच्या कामात मदत केली,तान्दुळ निवडले,भाजी निवडली अशी काहीबाही मदत. नन्तर खोलीत आलो.थोडावेळ विश्रान्ती घेतली. ह्यान्च्या जवळच्या पिशवीत माझ्यामते जास्त सामान होते म्हणजे त्यान्ची पिशवी जड आणि माझी हलकी,म्हणून सेटीन्ग बदलले आता आपापले सामान आपापल्या पिशवीत केले. बघू उद्या चालताना कळेल किति वजन आहे ते.
४ वाजता चहाची घन्टा झाली,चहा घेतला.तिथे इन्दिराबेन या बुजुर्ग महिलेची भेट झाली,त्या आधी या आश्रमाचे व्यवस्थापन पहात असत. आता व्रुध्दापकाळामुळे त्या निव्रुत्त जीवन शान्तपणे याच आश्रमात व्यतित करत आहेत.त्या उत्तम मराठी बोलतात कारण त्यान्चे लहानपण महाराष्ट्रातील डहाणू येथे गेले होते,त्यान्चे वडील तिथे स्टेशनमास्तर होते. आम्ही बराचवेळ गप्पा मारत होतो,त्यानी भारती ठाकुर,निवेदिता खान्डेकर आणि उष्प्रभा पागे यान्ची आठवण काढली.
सन्ध्याकाळी मुख्यमहाराजान्ची महन्त वियोगानन्द सरस्वती यान्ची भेट झाली ते बरेच वयस्क आहेत. त्याना प्रणाम केला. दोन दिवसानी येथे मोठा रुद्रयाग होणार आहे,सजावटीच्या कामात आम्ही दोघानी मदत केली. महाराज म्हणाले याग होईपर्यन्त रहा पण ते शक्य नव्हते. आज कार्तिक अमावास्या आहे,सन्ध्याकाळी दिपोत्सव केला होता.शुद्धतुपातील पणत्यान्च्या शान्त प्रकाशात सारा आसमन्त,मैय्याचे पात्र उजळून निघाले होते.डोळ्यान्चे पारणे फेडणारा नजारा होता.
उद्या देवदिवाळी. पुढे प्रस्थान. क्रमशः

प्रतिक्रिया

प्रास's picture

26 Jun 2012 - 1:29 pm | प्रास

छान चाललीय परिक्रमा!
पण आत्त्ता १२व्या नि १३व्या भागात गडबड झालीय. १२वा भाग दिसेना पण १३वा वाचतोय.
पैसा ताई, गणपा, प्रा. डॉ. वगैरे संपादकांशी संपर्क साधून दुरूस्ती करून घ्यावी ही विनंती.

उदय के'सागर's picture

26 Jun 2012 - 1:38 pm | उदय के'सागर

+१

बाकि हे हि छान हे.वे.सां.न., पु.भा.प्र., पु.भा.शु.

पप्पुपेजर's picture

26 Jun 2012 - 2:51 pm | पप्पुपेजर

चुकिने १३ झाले असेल!!!!

नमस्कार.
खरच हो चुकुन १३ लिहिले. आता १२ला वगळुनच टाकते.१४वा लिहिते.

सुप्रिया's picture

26 Jun 2012 - 1:59 pm | सुप्रिया

छान वर्णन! पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

JAGOMOHANPYARE's picture

26 Jun 2012 - 10:13 pm | JAGOMOHANPYARE

छान

बघा हं खुशिताई तुमच्या बरोबर आम्ही ही गोरा ग्राम पर्यंत पोहोचलो आहोत.
आता आमची परिक्रमा तुमच्या हाती. बघु कधी पोहोचवता आम्हाला परत घरी.
फक्त एक दुरुस्ती तुम्ही चौ च्या ऐवजी चॉ लिहिता आहात. तेव्हढ c+h+a+u=चौ करा. नाही उगाच माझी खोड म्हणौन सांगितल. लिखाण सुरेख, अन कोणताही आव न आणता केलेली परिक्रमा. मला पण जमेल का? अस वाटुन गेल बघ तायडे. तुमचा पायाचा फोड पण जरा कसा आहे तो सांगा. उगाच हुरहुर लागली.
पुलेशु.

नमस्कार अपर्णा अक्षय.
प्रतिसाद खुप आवडला.चौ कसे लिहावे कळत नव्हते,आता लिहिला ना बरोबर. पायाचे फोड बरे होतात विश्रान्ती मिळाली की आणि चाल पडली की परत होतात असेच होत राहिले सर्व वेळ.