सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
28 May 2012 - 4:16 pm

विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे
http://www.misalpav.com/node/21605
http://www.misalpav.com/node/21686
http://www.misalpav.com/node/21734
http://misalpav.com/node/21765

http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.

http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे.

आज शेवटचा बारावा डाव. अजून कोंडी फुटलेली नाही. दोघेही साडेपाच-साडेपाच गुण घेऊन बरोबरीत आहेत.
आनंद डाव जिंकून चौथ्यांदा विजेतेपद राखेल का मिळालेल्या पहिल्यावहिल्या (आणि कदाचित शेवटल्या) संधीचा पुरेपुर फायदा उठवण्याच्या जिगरीने बोरिस काही अफलातून चमत्कार करुन आनंदला धूळ चारेल आणि विजेतेपदाचा मुकुट त्याच्याकडून काढून घेईल?
का पुन्हा एकदा बरोबरी होऊन सामना टायब्रेकर मध्ये ढकलला जाऊन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली जाईल?
या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चला बघूयात डाव बारावा!

-चतुरंग

क्रीडाआस्वादलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

28 May 2012 - 4:33 pm | चतुरंग

आज ई४ ने सुरुवात केली!

श्रावण मोडक's picture

28 May 2012 - 4:36 pm | श्रावण मोडक

मी हे धागे नियमितपणे वाचत आलो आहे. तुम्हा मंडळींना दाद दिली पाहिजे. क्रिकेटच्या गर्दीत तर ही दाद थोडी वर्ग करून वाढवली पाहिजे.
_/\_
आता अखेरीनंतर प्रत्येकाने या बाराही डावांचं आपापलं आकलन थोडं समग्रतेनं लिहावं. मला (तरी) ते वाचायचं आहे. :-)

आहेत. मधूनच एकमेकांकडे नजर टाकताहेत. अंदाज घेणे सुरु आहे की कोणत्या खेळीने समोरचा आश्चर्यचकित होईल! :)

चतुरंग's picture

28 May 2012 - 4:46 pm | चतुरंग

आनंद बी३ असे प्यादे पुढे टाकून खेळलाय. उच्च दर्जाच्या सामन्यात याआधी १९९० साली खेळला गेलेला बोरिस स्पास्कीचा एकच डाव चेस डेटाबेसमध्ये आहे ज्यात ही खेळी पांढर्‍याने केलेली आहे. गेल्फंड आणि त्याच्या टीमने या खेळीच्या कंटीन्यूएशन्स कितपत अभ्यासल्या असतील? पुडहली खेळी कोणती असेल?

अमितसांगली's picture

28 May 2012 - 4:53 pm | अमितसांगली

मी आज पहिल्यांदाच चेस live बघत आहे आणि तुमचा वृत्तांत वाचत आहे..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2012 - 4:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मित्रहो, डाव मध्यपटावर हळू हळूहळू सरकत आहे. बोरीसच्या जी६ वर असलेल्या घोड्याला
आनंदनने वेसन घातली आहे. किमान आज आनंद बोरीसला जेरीस आणेल अशी अपेक्षा आहे.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

28 May 2012 - 5:09 pm | रमताराम

अतिशय विचित्र स्वरूपाच्या प्याद्यांच्या कोटामुळे (दोन डबल झालेली प्यादी) एकाच वेळी बोरिसला थोडा फायदा (मध्यपटावर नियंत्रण) आहे नि डोकेदुखीपण.

या प्याद्यांमुळे बोरिसचे दोन्ही उंट अडकून पडणार आहेत. ते तो कसे सोडवतो ते पाहणे मनोरंजक ठरेल. अर्थात त्यांचा पाठिंबा काढला तर प्यादी पडतात असा दुहेरी पेचही आहेच.

आनंदची पुढची संभाव्य खेळी घो-सी४ नि मग ई पट्टीतील अनाथ प्यादे मटकावणे. हे टा़ळायला एकतर बोरिसचा वजीर पुढे यायला हवा किंवा काळा उंट. उंट पुढे आला तर वजीर अडकणार. वजीर आला तर वजीर दीर्घकाळ रुतून बसेल प्याद्यांसाठी. मझा आ रहा है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2012 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> आनंदची पुढची संभाव्य खेळी घो-सी४
पैकीच्या पैकी मार्क देण्यात येत आहेत.

>>>>> नि मग ई पट्टीतील अनाथ प्यादे मटकावणे.
दिलेले गुण वजा करण्यात येत आहेत.

बोरीसची सी५ आणि डी६ वरील प्यांदी घेता येत नाही.
घोड्याचा बळी द्यावा लागेल.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

28 May 2012 - 5:26 pm | रमताराम

बळी देऊन तर बघा, मस्त मझा येतोय. :)
अहो ई-५ प्यादे घ्यायचे आहे, अनाथ आहे ते. अर्थात घेण्याची वेळ येणार नाहीच. वजीर्/उंट कोणीतरी वाचवायला येईल किंवा पर्यायी अ‍ॅटॅक शोधून ही खेळी निकामी केली जाईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2012 - 5:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> बळी देऊन तर बघा, मस्त मझा येतोय.

हं तुम्ही तज्ञ मंडळी डाव्याच्या चार-पाच खेळीचं गणितं मांडता आणि
आम्ही शिकाऊ मंडळींना पटावरच्या एक दोन खेळीच ओळखता येतात :(

तरी तुम्हा लोकांच्या संगतीनं बरी प्रगती आहे. :)

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

28 May 2012 - 5:35 pm | रमताराम

अहो वर लिहिले की अनाथ प्यादे घेतोय आपण ई-५ चे. तुम्ही सी-प्यादे पहात होतात म्हणून आपले इवॅल्युएशन वेगळे झाले. आणि डी पट्टीत प्यादेच नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2012 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> आणि डी पट्टीत प्यादेच नाही.

हो ना राव. बी५ आणि सी६ वरच्या प्यांदीची गोष्ट होती ती माझ्याकडून लिहितांना चूक झाली.
तुमचा डोळा ई५ वर आणि आमचा तिकडे.

असो, पण आज मजा येत आहे. तेवढं बोरीसला लवकर खेळ म्हणावं

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

28 May 2012 - 5:15 pm | रमताराम

:). उठ बरं बाळा, सकाळ झाली शाळा आहे हं.

चतुरंग's picture

28 May 2012 - 5:17 pm | चतुरंग

चौरंग बोरिसला त्रासदाय्क ठरतो बहुदा!
वरती ररांनी म्हटल्याप्रमाणे दोन्ही उंट अडकून पडलेत त्याचे. आता बोरिस बहुदा उंट ई७ खेळून किल्लेकोटासाठी तयारी करेल..

रमताराम's picture

28 May 2012 - 5:23 pm | रमताराम

चा प्रतिवाद बहुधा उंट बी-२ ने केला जाईल कारण ई पट्टीतले तसेच जी पट्टीतले प्यादे वाचवण्याची धडपड करावी लागेल बोरिसला.

चतुरंग's picture

28 May 2012 - 5:22 pm | चतुरंग

आनंद पोझीशनल अ‍ॅडवांटेज मिळवून खेळतोय! उंट बी२ मधे बसवला की मुख्य कर्ण धरला जाईल. घोडा सध्या राजा आणि वजीर कोणत्याही बाजूला उडी मारु शकतोय. राजा किल्लेकोटात टाकला की हत्ती सुद्धा मोकळा होईल.

पुढल्या ४ खेळी डावाचे भवितव्य ठरवतील असा माझा कयास आहे!

शिवाय आजही बोरिस टाईमप्रेशरमधे जातोय की काय असे वाटते आहे. दहा खेळ्यांनाच ४८ मिनिटे खर्ची घातली आहेत त्याने. उलट आनंद ५ मिनिटात खेळून मोकळा झालाय...

राजो's picture

28 May 2012 - 5:30 pm | राजो

http://moscow2012.fide.com/en/live?g=20120528

इथे ही थेट प्रक्षेपण आहे..

हाफिसातून दिसत नाहिये :(
आता कोणाची पोजिशन बळकट वाट्टेय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2012 - 5:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> आता कोणाची पोजिशन बळकट वाट्टेय?

बोरीसची दोन्ही घोडे घेऊनही मला दहावी खेळी होईपर्यंत आनंदची पोझिशन बळकट आहे, असे म्हणता येत नाही. बाकी, मंडळी काय म्हणतात कोणास ठाऊक ?

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

28 May 2012 - 5:52 pm | चतुरंग

टाकून देऊ केले बोरिसने.पांढरा उंट मोकळा करुन घेण्यासाठीआवश्यक खेळी.
आता आनंदने कोणत्याही प्याद्याने हे प्यादे मरले तरी दुहेरी प्यादे निर्माण होते. घोड्याने मारले तर बरे राहील असे वाटते त्यामुळे आपसूकच ई५ प्याद्यावर हल्ला होईल आणि पांढर्‍याची प्याद्यांची फळी विस्कळित देखील होणार नाही!

चतुरंग's picture

28 May 2012 - 5:55 pm | चतुरंग

घोड्याने सी ५ मारता येईल परंतु ई५ ला काही धोका नाही कारण घोड्याने ई५ मारले तर वजीर डी४ मधे येतो आणि घोडा -हत्ती असा फोर्क बसतो!

खेळला आनंद घोड्याने प्यादे मारले!

रमताराम's picture

28 May 2012 - 6:01 pm | रमताराम

तसेही घोडा आता क्रिटिकल झालाय. डाव्या बाजूने बोरिसच्या वजीर-उंट दुकलीने राजावर हल्ला करायला याचा प्रतिरोध आहे. तो इतक्यातच ई-५ घेण्यासाठी जागा सोडू शकत नाही.

आनंद निश्चितच वरचढ स्थितीत आहे!
आता उंट बी २ असा हलवला की ई५ वरचे प्यादे धोक्यात येते! त्या प्याद्याला एफ ६ असा जोर दिला तर वजीर एच ५ असा अप्रतीम चेक येतो. कारण ह्या चेकनंतर जी ६ असा चेक काढला तर प्याद्यांचे स्ट्रक्चर आणखीन दुबळे होते. राजा हलवून चेक काढला तर किल्लेकोट करता येत नाही!

अमितसांगली's picture

28 May 2012 - 6:00 pm | अमितसांगली

थोड फार समजायला लागलय....

चतुरंग's picture

28 May 2012 - 6:03 pm | चतुरंग

कॉमेंटेटर व्लादिमीर क्रामनिक आहे! :)

चतुरंग's picture

28 May 2012 - 6:14 pm | चतुरंग

आता वजिरी वजिरी होईल का? आनंदसाठी ती फारशी चांगली नाही कारण त्यामुळे बोरिस त्याच्या प्याद्यांचा गुंता सोडवू शकतोय आणि मुख्य मोहरी पटावरुन गेली की डाव बरोबरीकडे सरकवणे बोरिसला सोपे जाईल!

प्रीत-मोहर's picture

28 May 2012 - 6:18 pm | प्रीत-मोहर

झालीच की वजिरावजीरी .....

फारसे काही पडलेले दिसत नाही! फक्त एका प्याद्याची आघाडी आहे. डाव एकतर लांबेल किंवा चटकन बरोबरी होईल! :(

रमताराम's picture

28 May 2012 - 6:29 pm | रमताराम

बोरिसने प्यादे ई-४ ला टाकून फोर्क का मारला नाही? मागच्या उंटामुळे आनंदचा हत्ती धोक्यात आला असता. ......

चतुरंग's picture

28 May 2012 - 6:28 pm | चतुरंग

चांगली खेळी कारण आता प्यादे ई४ असे चाल करुन आले तर हत्ती ई१ आणि प्यादे राजाला पिन होते. घोडा हलवायला वेळ मिळतो.

आता परवा टायब्रेकर. आनंद जलदगती बुद्धीबळात जगज्जेता आहे. त्याच्या तोडीला सध्या मॅग्नुस कार्ल्सनच असावा. आधी कास्पारोव होता!
परंतु इतक्या दबावाच्या सामन्यात एखाद्या खेळीनेही डाव पलटू शकतो.
मला तरी हा निकालाचा प्रकार फारसा पसंत नाही परंतु आता काही इलाज नाही.
जे जे होईल ते ते पहावे, चतुरंगी असो द्यावे समाधान! ;)

पैसा's picture

28 May 2012 - 8:49 pm | पैसा

फार टेन्शन येतं म्हणून मॅचेस बघायचं थांबवलं तर हे आणखीच काय?

आता टायब्रेकरच्या नियमांत नक्की काय बदल होतात?

आता नव्याने ड्रॉ काढला जाईल ज्यात प्रथम पांढर्‍याने कोण खेळणार हे ठरेल.
इलेक्ट्रॉनिक घड्याळाच्या सहाय्याने प्रत्येकी २५ मिनिटे देऊन सामना खेळला जाईल ज्यात प्रत्येक खेळीनंतर १० सेकंदाचा वाढीव वेळ दिला जाईल. असे ४ सामने खेळले जातील. यात निकाल लागला तर उत्तम.
अन्यथा पुन्हा नव्याने ड्रॉ काढले जाऊन रंग ठरतील. २ डावांचा एक सामना असे ५ सामने (म्हणजे एकूण १० डाव) खेळले जातील. ज्यात प्रत्येक डाव ५ मिनिटांचा असेल आणि खेळाडूला प्रत्येक खेळीवर ३ सेकंदाचा वाढीव वेळ मिळेल.
प्रत्येक दोन डावांमधे १० मिनिटांचा ब्रेक असेल.

दुर्दैवाने अजूनही निर्णय लागला नसेल तर मग "खल्लास" (सडन डेथ) डाव खेळला जाईल.
ज्यात ५ मिनिटांचा एकच डाव असेल. टॉस जिंकणारा खेळाडू स्वतःचा रंग ठरवू शकेल. पांढर्‍याला ५ मिनिटे आणि काळ्याला ४ मिनिटे मिळतील. ६० खेळ्यांनंतर प्रत्येक खेळीला ३ सेकंद वाढीव मिळतील. सामना बरोबरीत सुटल्यास काळा विजयी घोषित केला जाईल! :(

या सगळ्या घड्याळी चमत्कारांमुळे मला हा प्रकार अजिबात पसंत नाहीये. मारुनमुटकून सामन्याचा निकाल लावणे हाच उद्देश दिसतो. इथे खेळ संपतो आणि घड्याळाशी स्पर्धा सुरु होते! मुळात बुद्धीबळ हा यासाठी आहे का? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. २ तासात ४० खेळ्या हे एकवेळ मान्य आहे कारण अनिर्बंध काळ खेळ चालू राहणे देखील बरोबर नाही परंतु ही जलदगती बुद्धीबळ स्पर्धा नव्हे त्यामुळे नेहेमीच्या स्पर्धेचा निर्णय असा ब्लिट्झ स्पर्धेतल्या निकालाने घेणे हे पसंत पडत नाही. पण आता जे काही होईल बघणे इतकेच आपण करु शकतो!

आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे वेळेतला बदल.

हे सामने बुधवार दि. ३० मे रोजी मॉस्को वेळेनुसार दुपारी १२ वाजता सुरु होणार आहेत म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता, (आम्हाला लै तरास आहे कारण शिकागो वेळेनुसार पहाटे ३ वाजता उठून बसावे लागणार! मॅच आधी संपवायला काय झालं होतं गधड्यांनो? :()

सुमीत भातखंडे's picture

30 May 2012 - 12:08 pm | सुमीत भातखंडे

मला तरी हा निकालाचा प्रकार फारसा पसंत नाही परंतु आता काही इलाज नाही.

हा हा हा.....

काही दिग्गज खेळाडूंची खालील स्टेटमेंट्स बघा...(विकीपिडीयावरून)

१) Vladimir Kramnik - "Playing rapid chess, one can lose the habit of concentrating for several hours in serious chess. That is why, if a player has big aims, he should limit his rapidplay in favour of serious chess."

२) Anatoly Karpov - "Like dogs who sniff each other when meeting, chess players have a ritual at first acquaintance: they sit down to play speed chess."

३) Viswanathan Anand - "It is very difficult to play a single blitz game! You want to play for a long time. So I tend not to do that anymore."

४) Bobby Fischer - "Blitz chess kills your ideas."

सुमीत भातखंडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2012 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल धन्स. वेळेबद्दल सांगितलं त्याबद्दलही आभारी. नै तर आम्ही आपले भाप्रवे नुसार सायंकाळीच म्याच पाहणार होतो.

आज दुपारच्या म्याचा तरी आनंद जिंकेल अशी अपेक्षा. दैनिकातल्या बातम्यांनुसार आनंदने यापूर्वीचे डाव जिंकण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत, डाव बरोबरीला प्राधान्य दिल्याने आनंदवर बुद्धीबळ जगत नाराज आहे, म्हणे.

-दिलीप बिरुटे
(आभारी)

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 1:20 pm | भडकमकर मास्तर

आता धा मिन्टात म्याच सुरू होनार है... फटाफटा म्याच...

चेसमध्ली आय्पीएल वीस वीस जनु

कवटी's picture

30 May 2012 - 1:35 pm | कवटी

चालू झालि का?
मिपावर कॉमेंटेटर कोण आहे?
काहिच आवाज येईना अजुन?

रमताराम's picture

30 May 2012 - 1:42 pm | रमताराम

वामकुक्षीवर पाणी सोडायचे आम्हा पुणेकरांच्या अगदी जिवावर येत ब्वॉ. असो.
पहिल्या सामन्यात अजूनतरी क्लासिकल मूव्स होताहेत. आनंदला मध्यपटावर थोडा फायदा आहे. त्याचे बहुतेक मोहरे अ‍ॅक्टिव झाले आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2012 - 1:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद १६ व्या चालीपर्यंत काही ष्ट्राँग वाटत नाही. आनंद लैच पाणी पितोय. :)
वजिरावजीरी लवकर होऊ नये.

-दिलीप बिरुटे

मृत्युन्जय's picture

30 May 2012 - 2:00 pm | मृत्युन्जय

गेल्फंडने हत्ती आधी इ४ आणि मग वजीर बी ४ वर नेला तर त्याला फायदा होणार नाही का? तो प्रकार अडवण्यासाठी आनंदकडे काही मूव्ह दिसत नाही आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2012 - 2:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>गेल्फंडने हत्ती आधी इ४ आणि मग वजीर बी ४ वर नेला तर त्याला फायदा होणार नाही का?.
नक्कीच बेष्ट चाली आहेत. काय म्हणता रमतारम ?

-दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 2:05 pm | भडकमकर मास्तर

ए ४ प्यादे खेळायसाठी प्रचंड वेळ घेतला बोरीसने...

एकविसाव्या खेळीने बोरिसने जरी आनंदच्या वजीराला धोका निर्माण करण्याची धमकी दिली असली तर आपलेच दोन्ही हत्ती कोपर्‍यात अडकवले आहेत. आनंदला याचा फायदा उठवता येईल का हे पाहणे रोचक ठरेल.

मृत्युन्जय's picture

30 May 2012 - 2:15 pm | मृत्युन्जय

आनंदने वजीर बी ६ वर नेला तर ?

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 2:17 pm | भडकमकर मास्तर

आनंदने वजेर आत घुसवलेला आहे... परिस्थिती बरी दिसते

मृत्युन्जय's picture

30 May 2012 - 2:18 pm | मृत्युन्जय

काळा उंट जी ३ मध्ये? ही काय खेळी आहे? आता गेल्फंड ने डी ४ चे प्यादे उडवले तर? च्यायला या मोठ्या लोकांच्या खेळ्या काही झेपत नाहीत राव.

रमताराम's picture

30 May 2012 - 2:39 pm | रमताराम

हा उंट हलवण्याने ई पट्टीत बोरिसचा उंटही धोक्यात आला. त्यामुळे राजाने उंट घेतला तर आनंदने हत्तीने उंट घेऊन निर्णायक आघाडीची स्थिती आणली असती.
तुम्ही म्हणता ते डी-४ प्यादे घेतले असते तर याच उंटाने एच प्यादे मारून चेक दिला असता. मग वजीर आडवा येऊन पांढर्‍या घरातील उंटाच्या सहाय्याने राजाला मात देऊ शकला असता.

कवटी's picture

30 May 2012 - 2:27 pm | कवटी

टाय

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 2:28 pm | भडकमकर मास्तर

पहिला डाव देवाला... रंगाकाका जागे झाले काय ? ते उठेपर्यंत ड्रॉ होत राहणार वाटतं?

रमताराम's picture

30 May 2012 - 2:45 pm | रमताराम

दोघेही रंगाकाका जागे होण्याची वाट पाहतायत. फोन करा, फोन करा नि उठवा त्यांना. अलार्म गंडलेला दिसतोय त्यांचा.

छोटा डॉन's picture

30 May 2012 - 2:30 pm | छोटा डॉन

अरे बाबांनो ही मॅच कुठे दिसतेय.
वर दिलेल्या लिंकमध्ये तर मला नुस्ती ढिगभर माहिती लिहलेले पेज दिसतेय, लाईव्ह टेलिकास्ट कुठे आहे ?

- डॉन्या आनंद

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 2:34 pm | भडकमकर मास्तर

http://moscow2012.fide.com/en/live?g=20120530

जहिराती संपल्या की मधून मधून म्याच सुद्धा दिसते इथे....

छोटा डॉन's picture

30 May 2012 - 2:37 pm | छोटा डॉन

सध्या चेस-बोर्ड दिसतो आहे स्टार्टिंग पोझिशनमधला.
बहुतेक पुढची मॅच अजुन सुरु व्हायची आहे.

मास्तरांचे आभार ...

- छोटा डॉन

कपिलमुनी's picture

30 May 2012 - 2:36 pm | कपिलमुनी

तुला कसे दिसायचे..पाप वाढले आहे ..परीक्रमेला जाउन ये ;)

पुढची म्याच लगेच १० मिन्टात चालु होणाराय ना?

रमताराम's picture

30 May 2012 - 2:43 pm | रमताराम

दोघांनी एकच बाजू खेळली आहे, वजीर दोनच मिनिटात गायबलेत. आपल्या डोस्क्याची मंडई होणार.

कपिलमुनी's picture

30 May 2012 - 2:55 pm | कपिलमुनी

अशी प्रतिष्ठीत मॅच पहिल्यांदाच लाईव्ह पहातो अहे ..

धन्यु

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 3:02 pm | भडकमकर मास्तर

आनंद बेस्ट पोझिशनमध्ये आहे... असे आम्हाला सारखेच वाटते ते असो...
पण आत्ता खरंच भारी आहे

चतुरंग's picture

30 May 2012 - 3:03 pm | चतुरंग

पहिला डाव बरोबरी झाली.
दुसर्‍यात आनंद भारी वाटतोय.

चतुरंग's picture

30 May 2012 - 3:12 pm | चतुरंग

राजावर हल्ला झालाय. एका प्याद्याची आघाडी आहे. घोड्याने घोडा मारला बोरिसने, आनंदने घोडा घेतला.उंटाचा चेक, आता प्यादे पुढे येईल.

चतुरंग's picture

30 May 2012 - 3:15 pm | चतुरंग

जबरा मूव!! बोरिस सॉलिड खेळला आता ए६ वर चेकची धमकी आणि घोडा पडेल आनंदचा.
आता प्यादे सी ४ खेळणे अत्यावश्यक.

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 3:17 pm | भडकमकर मास्तर

उंट सी ८ वर मागे घेऊन बोरीसने भक्कम बचाव केला आहे ....आता बरोबरी होते के काय?

कपिलमुनी's picture

30 May 2012 - 3:18 pm | कपिलमुनी

आय पी ल झक्क मारली ...

चतुरंग's picture

30 May 2012 - 3:22 pm | चतुरंग

बोरिस इथेही अ‍ॅग्रेरसिव आहे. राजाच्या बाजूची प्यादी रेटणे सुरु केले आहे. आनंद अडचणीत येणार बहुदा!

आता दुसरा हत्ती आला तर काही खरं नाही. आता वेळाचंच थोडं अ‍ॅडवांटेज आहे आनंदला बाकी बोरीस तुफान खेळतोय!

कपिलमुनी's picture

30 May 2012 - 3:24 pm | कपिलमुनी

??

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2012 - 3:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोरीस काही ऐकेना आनंदला असं वाटतंय.
बाकी, रंगाशेठ झोपमोड करुन आल्यावरबरं वाटलं. :)

-दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 3:34 pm | भडकमकर मास्तर

पुन्हा परिस्थिती पालटली. ??? .... लै बेस्ट

कपिलमुनी's picture

30 May 2012 - 3:37 pm | कपिलमुनी

होणे अवघड आहे ...
ड्रॉ होणार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2012 - 3:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मजा येत आहे. :) पण मात केली तर आनंदच करेल.

-दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 3:48 pm | भडकमकर मास्तर

जिंकला आनंद.... लै बेस्ट
वेळेत गंडला बोरीस

चतुरंग's picture

30 May 2012 - 3:49 pm | चतुरंग

बोरिसने रिझाईन केला!

रमताराम's picture

30 May 2012 - 3:49 pm | रमताराम

बोरिस रिजाईन्स.

कपिलमुनी's picture

30 May 2012 - 3:51 pm | कपिलमुनी

इकडे तिकडे चोहिकडे :)

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 3:52 pm | भडकमकर मास्तर

पीटर स्वीदलर सुद्धा आपल्यासारखाच करत होता...

हां ... आता आनंद भारी.. मग बोरीसने वाचवला गेम... ड्रॉ... मग वेळेत गेला बोरीस... पराभव मान्य ...संपली म्याच

चतुरंग's picture

30 May 2012 - 3:58 pm | चतुरंग

अहो पटावरची पोझीशन आपल्याला समजायच्या आत यांच्या ४-४ खेळ्या झालेल्या असल्याने आपला मेंदू पोझीशन समजून घेण्याच्या रिकर्शनमधेच जातो! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2012 - 3:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता बाकीचे दोनही डाव आनंद नाही जिंकू शकला तर किमान त्याने ड्रॉ करावेत.
ड्रॉ च्या बाबतीत आनंदचं मोठं नाव आहे. [पळा आता. आलोच च्या घेऊन]

-दिलीप बिरुटे

पण का रिझाईन? मला वाटले टाईम अप झाला ...

चतुरंग's picture

30 May 2012 - 3:54 pm | चतुरंग

वजीर होणे थांबवू शकत नाही आता!

बोरिसने मला घाम फोडला होता! आनंदने डाव चांगलाच सेव केला आणि नंतर बोरिसला वेळाच्या कचाट्यात सापडवून चांगलाच उलटवला डाव.
पुढल्या डावात बोरिस पांढरा आहे. हा डाव बोरिसने जिंकलाच पाहिजे. जाम मजा येणार.

कपिलमुनी's picture

30 May 2012 - 3:56 pm | कपिलमुनी

निर्विवाद वर्चस्व असु दे की राव !!

रमताराम's picture

30 May 2012 - 4:00 pm | रमताराम

मुनिवरांशी सहमत.
आरं लै फाईट क्रिएट जाह्ली तर त्ये दोगं घंट हैती पर आमची हिकडे विकेट पडंल त्येचं काय. आदीच बीपीच्या गोळ्या खाऊन बसलोय म्याच फायला.

एखादा आयवी ड्रिप असला तर बघा राव आम्चं बीपी लैच खालीवर होतंय! ;)

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 3:59 pm | भडकमकर मास्तर

रंगाकाका जागे झाले...अआणि
अआनंद जिंकला...
पेढे वाटा आता....

आनंद काळा आहे.

पॉझीटीव बॉडी लँग्वेज!

भडकमकर मास्तर's picture

30 May 2012 - 4:12 pm | भडकमकर मास्तर

चेसाऐवजी दोघे कुस्ती खेळले तरी म्याच टफ होईल...

आनंदने बोरीसचा "पट काढला" .... अशी कॉमेन्ट्री करावी लागेल...

चतुरंग's picture

30 May 2012 - 4:14 pm | चतुरंग

पट काढला! लै भारी ष्लेश!! ;)

चालू झाला रे. गेल्फंड लै टाइम घेतोय सेकंड मुव्हला