विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे
http://www.misalpav.com/node/21605
http://www.misalpav.com/node/21686
http://www.misalpav.com/node/21734
http://misalpav.com/node/21765
http://www.misalpav.com/node/21778
http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.
http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे.
चौथा टाय्ब्रेकर सुरु होईल ५ मिनिटात! आनंद २-१ असा आघाडीवर आहे.
बोरीससाठी मस्ट विन सिच्यूएशन आणि आनंदसाठी फक्त ड्रॉ आवश्यक!
उत्कंठा शिगेला पोचली आहे. पुढल्या अर्ध्या तासात एक तर आनंद पुन्हा जगज्जेता होईल किंवा सामना पुढल्या ब्लिट्झ डावात जाईल!
प्रतिक्रिया
30 May 2012 - 5:21 pm | कवटी
धन्यवाद !
अत्ता तिसर्या म्याच चा रिझल्ट अपडेट झाला.
30 May 2012 - 5:24 pm | रमताराम
दोन्ही सायटी मेल्या रे. तिसरी एखादी सापडली का कोणाला?
30 May 2012 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इथेच जरा बरी परिस्थिती आहे. http://moscow2012.fide.com/en/live?g=20120530
-दिलीप बिरुटे
30 May 2012 - 5:27 pm | कपिलमुनी
आणि ट्रॅफिक वाढला
30 May 2012 - 5:25 pm | ऋषिकेश
या गेमचं समालोचन कुठल्यातरी रेडीयोवर व्हायला हवं होतं.. नेमके आम्ही घरी जायच्या प्रवासाची वेळ आणि ही एक आलीये! छ्या! :(
असो. बहुदा या धाग्यावर आनंदचे अभिनंदन करायला रात्री येईनच :)
तुम्ही मंडळी एंजॉय माडी (ते तुम्ही करालच, सल्ला उगाच! )
30 May 2012 - 5:30 pm | चतुरंग
बघ. अजून अर्धा तास.....
30 May 2012 - 5:35 pm | ऋषिकेश
नाही ना! जावंच लागेल
अजून १० मिन्टंच आहेत.. असो.
30 May 2012 - 5:27 pm | ऋषिकेश
डीएन ए च्या साईवर इथे लिहून आलंय
Dear viewers, the official server has crashed! We are not able to receive moves. Chess at its best!!
:( :( :( :(
30 May 2012 - 5:29 pm | ऋषिकेश
चालु झाला वाट्टं सर्वर! आता इथे दिसतेयः
http://moscow2012.fide.com/en/live?g=20120530
30 May 2012 - 5:29 pm | चतुरंग
http://moscow2012.fide.com/en/
इथे मला व्यवस्थित दिस्तंय!
30 May 2012 - 5:32 pm | परिकथेतील राजकुमार
च्यायला !
हे मिपाकर जातात तिकडे काड्या सारतात. आता काढा नवीन संस्थळ स्वतःचे कोणितरी आणि करा डेफर्ड लाईव्ह प्रक्षेपण.
30 May 2012 - 5:40 pm | चतुरंग
नाहीतरी तुला इंक्याफे चालवायचा अनुभव आहेच! :)
30 May 2012 - 5:33 pm | ऋषिकेश
(जणू काहि ठरल्याप्रमाणे) वजिरा वजिरी झाली! आता खरा खेळ सुरू होईल :)
30 May 2012 - 5:34 pm | चतुरंग
बोरिसला हळूहळू जाणिव व्हायला लागलेली असावी की आता संपत चालले आहे...फारसे काही करण्यासारखे नाही.
आनंद कोणतीही रिस्क घेणार नाही आणि त्याचा बचाव भेदणे अवघड आहे.
पण बोरिसचा चिवटपणा बघता अजूनही काही सांगता येत नाही!
30 May 2012 - 5:37 pm | चतुरंग
स्विडलरच्या मते काळ्याला विनिंग चान्सेस आहेत!
दोन उंटांचा फायदा कसा उठवता येतो आणि हत्ती कसे हलतात यावर बरेच अवलंबून आहे..
30 May 2012 - 5:41 pm | चतुरंग
वजिराच्या बाजूला प्याद्यांचा ब्लिट्झ क्रीग चालू केलाय!!
30 May 2012 - 5:42 pm | ऋषिकेश
छ्या आनंद काय करतोय! त्याने ड्रॉच करायचा चंग बांधलेला दिसतोय!
जाऊ दे मी निघतो.. सायनिंग ऑफ
30 May 2012 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बोरीसचा एक उंट आणि एक हत्ती गारद व्हायला पाहिजे.
वाटल्यास त्यासाठी एका उंटाचा बळी गेला तरी चालेल
-दिलीप बिरुटे
(सावध)
30 May 2012 - 5:45 pm | चतुरंग
प्यादी पाचव्या/सहाव्या पट्टित आणून उंट पुढे शिरले तर आनंदला जड जाईल.
आता बोरीससाठी फक्त सुलतानढवा बाकी आहे त्यामुळे "मौत सामने खडी है, अब वो किसीसे नहीं डरता!" अशी सिच्यूएशन आहे!!
30 May 2012 - 5:48 pm | चतुरंग
उंट जी ५ खेळी थांबवली. कारण आनंद लगेच हत्तींची मारामारी करेल!
30 May 2012 - 5:49 pm | चतुरंग
सुरु झाले बोरिसचे!
जागा ताब्यात घेतोय तो आणि आनंदची घुसमट होते आहे परंतु हे दुधारी शस्त्र आहे. एकच चूक आणि डाव बोरिसवर उलटू शकतो.
आनंद शुड होल्ड हिज सीट!!
30 May 2012 - 5:51 pm | रमताराम
विडो दिसत नाही, पटही खूप उशीरा अपडेट होतोय. साले दोन्ही इंटरनेट वापरून फायले, दोन्ही बेक्कार. म्हणजे फिडेच्या सायटीवर काशी आहे.
30 May 2012 - 6:00 pm | चतुरंग
http://moscow2012.fide.com/en/live?g=20120530
इथे बघा ररा पट आणि खेळाडू दोन्ही मस्त दिसताहेत!!
30 May 2012 - 6:06 pm | रमताराम
पहिल्यापासून हीच लिंक वापरतोय.
आता झाले चालू व्यवस्थित. चेस्डम मात्र अजून गंडलंय. अर्थात आज तिथे काही अॅनलिसिस नसल्याने काही फार फायदा नाहीये.
30 May 2012 - 5:55 pm | चतुरंग
आनंदने पुन्हा एकदा प्याद्यांची फळी उभारली त्यामुळे वजिराच्या बाजूला पांढरा उंट निष्प्रभ झाला!
आनंदकडे कर्णातला काळा उंट आहेच त्यामुळे काळा उंटही सध्या फार काही करु शकेल असे वाटत नाही.
आनंदचा घोडा मात्र उड्या मारु शकेल एफ३ आला तर जी ५ वरच्या प्याद्याला धोका होतो.
30 May 2012 - 5:57 pm | चतुरंग
अवस्था अवघड झालेली असणार राव.
डावाकडे शांतपणे बघत बसायचं आणि एखादी मस्त मूव सुचली तरी काही बोलायचं नाही!!! छ्या...आपल्याला नाही जमणार ....
30 May 2012 - 5:58 pm | चतुरंग
आनंदचा घोडा आलाच पुढे एफ ३ आपुन ने बोला था!
30 May 2012 - 6:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी, बोरीसला वेळ कमी पडेल आणि तोपर्यंत जिंकता आले नाही तरी आनंदने डाव वाचवावा.
चौतीसव्या खेळीअंती मला आनंद पटावर मजबूत वाटतो.
-दिलीप बिरुटे
30 May 2012 - 6:20 pm | चतुरंग
हुर्रेरेरेरेरेरेरेर!!!
ड्रॉ झाला आणि आनंद चौथ्यांदा जगज्जेता!!!
30 May 2012 - 6:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंद जगज्जेता होईपर्यंत मिपावर आम्ही आपल्या आणि रमतारमशेठ बरोबर म्याच इंजॉय केला.
धन्स.
आनंदचं मनःपूर्वक अभिनंदन. :)
-दिलीप बिरुटे
30 May 2012 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
-दिलीप बिरुटे
30 May 2012 - 6:21 pm | निखिल देशपांडे
शेवटच्या काही क्षणात काय घडले काहीच कळले नाही :-)
पण ड्रॉ होउन आनंद जिंकल्याचे कळले.
30 May 2012 - 6:21 pm | भडकमकर मास्तर
धत्तड तत्तड धत्तड
30 May 2012 - 6:21 pm | रमताराम
आनंद रिटेन्स हिज टायटल. अभिनंदन आनंद.
30 May 2012 - 6:23 pm | चतुरंग
चारही फास्ट गेम्स मधे बोरिस बर्याचदा वरचढ होता परंतु काही कमकुवत खेळ्यांमुळे डाव जिंकू शकला नाही.
त्याच्या लढावू वृत्तीबद्दल शंकाच नाही. आनंदचे अभिनंदन!! मजा आली!
30 May 2012 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै तर मी म्हणनार होतो की बारा डाव आणि टायब्रेकरचे सामने जगज्जेता आपल्या लौकिकाला साजेसा खेळला का ? विजयाशी मतलब. :)
-दिलीप बिरुटे
30 May 2012 - 6:22 pm | बॅटमॅन
आनंद जगज्जेता!!!! आनंदाचे डोही आनंद तरंग :)
हे धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!!
पण गेल्फांडने टक्करपण चांगलीच दिली नै का लोक्स?
30 May 2012 - 6:22 pm | कपिलमुनी
४ वेळा जगजेत्ता ...
या सम हाच!!
30 May 2012 - 6:22 pm | निखिल देशपांडे
रंगाकाकांचेही या मालिके साठी अभिनंदन
माझ्या सारख्या मठ्ठ माणसाने पण चेस चा सामना बघितला
30 May 2012 - 6:43 pm | ५० फक्त
अगदी हेच , नायतर काय बिशाद आहे आपली या नादाला लागायची.
विश्वनाथन आनंद्चे शतशः अभिनंदन.
त्याचबरोबर श्री. चतुरंग, श्री. रमताराम , श्री. बिरुटे सर आणि बाकी सर्वांचे सुद्धा अभिनंदन.
30 May 2012 - 8:07 pm | प्रचेतस
हेच म्हणतो.
या सर्वांमुळे थेट प्रक्षेपणाइतकाच आनंद लुटता आला.
31 May 2012 - 12:04 am | मोदक
+१ हेच बोल्तो...
30 May 2012 - 6:55 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो.
(गेली काही वर्षे चेस-निरक्षर असलेला)
30 May 2012 - 6:26 pm | विसुनाना
आनंद रिमेन्स द चॅम्प --- ! पण बोरीस उत्तमच खेळला....
एक कळले नाही - बोरिसचा वेळ संपला असता तर शेवटचा सामनाही आनंदनेच जिंकला असता ना? त्याच्याकडे ४ पेक्षा जास्त मिनिटे शिल्लक होती तर बोरीस शेवटचे क्षण मोजत होता.
30 May 2012 - 6:34 pm | चतुरंग
आनंदने जिंकला असता पण तसं होत नाही कारण दोघेही काहीतरी न्यूट्रल मुव्ज करत राहतात आणि प्रत्येक मूवला १० सेकंदाची वाढीव वेळ असल्याने परपेच्युअल टाईम मिळत राहतो! :)
डावात कोंडी फुटायची शक्यता नसते. अशा वेळी ५० न्यूट्रल खेळ्या झाल्या तर डाव थांबवला जातो आणि अनिर्णित राहतो.
31 May 2012 - 11:51 am | विसुनाना
'परपेच्युअल टाईम' बद्दल माहित नव्हते. तरीही तांत्रिकदृष्ट्या आनंद वरचढच होता हे मान्य करावेच लागेल. शेवटच्या काही वेगवान खेळ्या (ज्यात आनंदचे एक अधिक असलेले प्यादे गेले) जरा जास्त योग्य झाल्या असत्या तर बोरीसचा वेळ नक्कीच संपला असता.
30 May 2012 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार
आनंदचे आणि त्याच्या चाहत्यांचे देखील.
30 May 2012 - 6:24 pm | भडकमकर मास्तर
कोणाला रशियन मध्ये कॉमेन्ट्री एइकायची असेल एचडी वर क्लिक करा...
मला अकरावीला पन्नास मार्कांचं रशियन नव्हतं ...
ज्यांना सोयीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा
30 May 2012 - 6:26 pm | पैसा
ररा, धन्यवाद! आणि आनंदचे अभिनंदन!
30 May 2012 - 6:29 pm | मोहनराव
आनंदचे अभिनंदन!
30 May 2012 - 6:31 pm | उदय के'सागर
आनंदभाऊंचे हर्दिक अभिनंदन.... :)
आयुष्यात पहिल्यांदाच चेस चा सामना लाईव्ह फॉलो केला... हे केवळ 'चतुरंग' साहेबांमुळे... म्हणुन त्यांचे धन्यवाद :)
30 May 2012 - 6:33 pm | मृत्युन्जय
आनंदचे अभिनंदन. आनंदी आनंद झाला. :)
30 May 2012 - 6:33 pm | मृत्युन्जय
आनंदचे अभिनंदन. आनंदी आनंद झाला. :)
30 May 2012 - 6:36 pm | विकास
आनंदच्या यशामुळे आनंद झाला! :-)
30 May 2012 - 6:39 pm | वेताळ
दोघांचे अभिनंदन.........
30 May 2012 - 6:55 pm | सूड
+१
असेच म्हणतो.
30 May 2012 - 6:42 pm | मेघवेडा
झकास!
30 May 2012 - 6:46 pm | विसुनाना
बोरिस गेल्फंड भलताच आठ्याळ दिसतो आहे. सारखा सगळ्यांना दटावतो. आणि 'गिर्या तो भी टांग उप्पर' प्रमाणे मी चांगलाच खेळलो असे स्वतःच म्हणतो आहे.
याउलट आनंद मात्र अगदी साधेपणाने बोलत आहे.
30 May 2012 - 6:51 pm | निखिल देशपांडे
+१
असे वाटतय की प्रश्नांचे उत्तर न देता, एखादी चाल खेळायची आहे त्याला
30 May 2012 - 8:39 pm | रमताराम
तो तसाच आहे. परवाच्या कॉन्फरन्समधेही एका पत्रकाराने अकराव्या सामन्यानंतर 'पुढे जाऊन सामना ड्रॉ होणार या निर्णयावर दोघे खेळाडू इतक्या लवकर कसे आले, हे अगदी बुद्धिबळाच्या तज्ञांनाही न समजल्याने त्यांनी आणखी चार खेळ्या करून तो ड्रॉ कडे कसा जातो हे का दाखवले नाही?' असा प्रश्न विचारताच 'आम्ही इथे शिकवायला नाही अजिंक्यपदाचा सामना खेळायला आलोय. समजले नसेल तर इथे चाळीस-पन्नास बुद्धिबळपटू विश्लेषण करत बसले आहेत त्यांना विचारा.' असे उद्धट उत्तर दिले होते.
30 May 2012 - 6:52 pm | गोंधळी
विजयानंद आनंद.
30 May 2012 - 7:40 pm | ऋषिकेश
आनंदी आनंद गडे! ;)
आनंद चे मनःपूर्वक अभिनंदन! एखाद्या धीरोदत्त योद्ध्याप्रमाणे आनंद खेळला! त्याला सलाम!
रंगाशेट यांचेही आभार!
30 May 2012 - 8:14 pm | साधामाणूस
आनंदरावांचे अभिनंदन!
30 May 2012 - 11:38 pm | संजय क्षीरसागर
तुमच्यामुळे अशी संधी मिळाली
31 May 2012 - 9:45 am | मोहन
रंगाशेठ धन्यवाद आणि अभिनंदन. तुमच्यामुळे चेस लाईव्ह प्रथमच बघितला. क्रिकेट, हॉकी, फुट्बॉल पेक्षा वेगळाच आणि छान अनुभव दिल्या बद्द्ल धन्यवाद.
आणि हो, आनंदचे हार्दिक अभिनंदन.
31 May 2012 - 10:02 am | स्वातीविशु
विश्वनाथन आनंद चे चौथ्यांदा विश्वविजेता होण्यासाठी शतशः अभिनंदन. :) चतुरंगांना खुप धन्यवाद. :)
31 May 2012 - 12:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मिपावर सगळे जन आनंदचे विश्वविजेतेपद एकाने कमी का करून र्हायले बाप्पा ?
तो पाचव्यांदा विश्वविजेता झाला हाय नव्हे ?? चारदा कुटे ??