विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या दोन्ही भागाचे दुवे
http://www.misalpav.com/node/21605
http://www.misalpav.com/node/21686
http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.
http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे.
तिसर्या भागात नवव्या डावापासून सुरुवात करायची आहे.
आनंद आणी बोरिस दोघांची गुणसंख्या समसमान आहे. उरलेल्या चार डावात दोघांकडे दोन दोन वेळा पांढरी मोहोरी असणार आहेत. कालच्या डावात आनंदने बाजी मारुन आक्रमक झाल्याचे दाखवून दिले आहेच, बोरिस तर पहिल्यापासून शड्डू ठोकूनच खेळतोय त्यामुळे उरलेले चारही डाव रंगतदार होतील अशी आशा आहे.
-चतुरंग
प्रतिक्रिया
23 May 2012 - 10:58 am | संजय क्षीरसागर
फक्त शीर्षक डाव-९ असं हवं होतं, पटलं असेल तर संपादकांना रिक्वेस्ट करून पाहा (की तुम्हीच संपादक आहात?)
23 May 2012 - 11:34 am | रमताराम
भेटू चार-पाच तासांनी.
23 May 2012 - 4:31 pm | चतुरंग
बोर्डापाशी बसले आहेत. आर्बायटरनी घड्याळ सुरु केले आणि डाव सुरु!
23 May 2012 - 4:36 pm | चतुरंग
डी ४ सुरुवात परंतु आज आनंदने स्लाव कडे डाव न नेता निम्झो इंडियन कडे नेलाय! वेगवेगळी ओपनिंग वापरली जाताहेत. मजा आयेगा.
23 May 2012 - 4:40 pm | रमताराम
चांगलाच अग्रेसिव मूडमधे दिसतोय.
23 May 2012 - 4:44 pm | चतुरंग
पहिली मारामारी झाली. डावाची सुरुवात संपून डाव मध्याकडे सरकलाय. आता स्ट्रॅटेजिक खेळ्या सुरु झाल्यात.
बी ६ खेळून आनंदने पांढरा उंट मुख्य कर्णात बसवण्याची तयारी सुरु केली. बओरिसने जी५ मधे उंट बसवून घोडा पिन केला.
23 May 2012 - 4:47 pm | रमताराम
उंटाचा रोल महत्त्वाचा ठरणार असे दिसते. आनंदने मुख्य लाईन सोडून बी पट्टीतला उंट इतक्यात गमावण्याची घाई केली नाही, त्याऐवजी मध्यपटावरची प्यादी एक्स्चेंज केली. यावरून त्याने त्या उंटासाठी काही रोल निश्चित करून ठेवलेला दिसतो.
23 May 2012 - 4:56 pm | चतुरंग
सी३ मधला घोडा तसाच धरुन ठेवलाय त्यावरुन काही वेगळाच डाव दिसतोय. बोरिसने हत्ती अपेक्षेप्रमाणेच सी१ मधे आणलाय. अशा वेळी खेळाडूंचे सेकंड्स (टीममधले मदतनीस) असतात त्यांनी खेळलेले डाव सुद्धा महत्त्वाचे ठरतात. कारण त्यानुसार त्यांनी मदत केलेली असू शकते. प्रतिस्पर्ध्याची खेळी ताडणे हे कमालीचे अवघड होत जाते.
23 May 2012 - 4:48 pm | चतुरंग
कॉपीबुक स्टाईलने खेळ सुरु आहे. आता कोण आधी नवी खेळी करते बघायचे.
आता आनंद बहुदा घोडा डी७ मधे आणेल आणि हत्ती सी८ मधे बसवायचा प्रयत्न.
बोरिसची तयारी ई स्तंभात ताबा मिळवण्याची आहे. ई५ ह्या कमकुवत घरावर त्याचा डोळा आहे!
23 May 2012 - 5:04 pm | चतुरंग
त्याने या खेळीला बर्यापैकी वेळ घेतलाय (जवळपास १० मिनिटे). बोरिसने त्याल बहुदा किंचित धक्का दिलाय. आनंद कॉम्प्लिकेशन्स वाढवतो की टाळतो हे बघायचे आता!
23 May 2012 - 5:15 pm | रमताराम
उंट डी-३ मधे गेला. या अपेक्षित खेळीनंतर एखादी 'अनपेक्षित' खेळी 'अपेक्षित' आहे आनंदकडून. :)
23 May 2012 - 5:21 pm | चतुरंग
घोड्याची मारामारी झाली. आता आनंद वजीर सी ७ मधे हलवणार.
23 May 2012 - 5:22 pm | रमताराम
घोडा खाल्ला. आता बोरिसचे डी प्यादे बलवान झाले पण त्याच्या हत्तीचा सी पट्टीवर कब्जा मिळ्वण्याचा प्रयत्न फसला.
23 May 2012 - 5:25 pm | चतुरंग
प्यादे पुढे काढून बोरिसने डी५ ची धमकी दिली. कारण तिथे प्याद्यांची मारामारी झाली की हत्तीचा काळ्यावजिरावर थेट हल्ला होतो. आणि त्याला सी पट्टी सोडूण जायला लागते.
23 May 2012 - 5:36 pm | रमताराम
डी-५ ची शक्यता कमी आहे. प्याद्यांची मारामारी झाल्यावर आनंदचा वजीर डी-६ मधे येऊन बसेल. तसेच एफ मधील घोडा मोकळा असल्याने बोरिसच्या आयसोलेटेड प्याद्यावर तिघांचे प्रेशर राहील.
23 May 2012 - 5:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डावावर आणि तुम्हा दोघांच्या विश्लेषणावरही लक्ष आहे.
-दिलीप बिरुटे
23 May 2012 - 5:33 pm | चतुरंग
वेळ घेतोय. १४ खेळ्यांनाच ४७ मिनिटे झालीत. टाईमप्रेशरमधे यायला नको शेवटी!
23 May 2012 - 5:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उंट द्यायचे काही खास कारण ?
23 May 2012 - 5:39 pm | रमताराम
बोरिसच्याच प्याद्याला मधे यायला भाग पाडून मागे बसलेल्या हत्तीचे सी पट्टीवरील नियंत्रण संपुष्टात आणले. याउलट आपला हत्ती नि वजीराच्या सहाय्याने स्वतःच ती पट्टी बळकावली. यात आनंदचा वजीर सी पट्टीत आल्याने एफ पट्टीतील घोडाही हलता झाला.
23 May 2012 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स.
23 May 2012 - 5:49 pm | रमताराम
आता डी-५ थोडी आणखी कमकुवत होते आहे असे वाटते का? आनंद घो(डी)-ई५ असा फोर्क मारू शकतो. बोरिसचा वजीर ई-४ मधे येऊ शकत नसल्याने त्याला ई-२ किंवा थेट एच-३ अशी माघार घ्यावी लागेल. अन्य काही पर्याय दिसतात का? ई-३ ला घो(एफ)-जी-४ हे उत्तर डेडली असेल.
23 May 2012 - 5:58 pm | चतुरंग
डी ५ ने काळा वजीर डी६ मधे हलणार. जागेची उपल्ब्धता विरुद्ध मोहर्यांचे विकसित असणे असा तिढा काळ्यासमोर आहे. पांढर्याचे मध्यातले वर्चस्व तो मोहर्यांच्या समन्वयाने भरुन काढायचा प्रयत्न करतोय.
आनंद एच ६ खेळला. उंटाला हुसकावून लावणे. बोरिस उंट एच४ ला जाईल असे दिसते म्हणज एनंतर जी ३ ला ठाणे लावता येईल!
23 May 2012 - 6:06 pm | जे.पी.मॉर्गन
केवळ कौतुक भावनेनी हा प्रकार बघतोय ! आपल्याला ह्या खेळातलं घंटा काही कळत नाही पण हा खेळ खेळणार्या आणि आवडणार्यांचं अचाट कौतुक वाटतं ! "एकदा बघू तरी च्यायला काय प्रकार आहे ते" म्हणून ५-७ वेळा प्रयत्न केला पण काहीच झेपलं नाही. पण ही लढत एक उत्सुकता म्हणून बघतोय. तुमचं विश्लेषणही वाचतो आहेच! लगे रहो दोस्तों |
फकस्त आत्ता काही वेळापूर्वी त्या फिडेच्या साईटचा कॉमेंटेटर "I am slightly stunned" म्हणाला ! ते कसं काय असतं बुवा? एक तर पूर्ण हलून जा ऑर निवांत राहा! ;)
पण हा भारी प्रकार आहे!
23 May 2012 - 6:15 pm | चतुरंग
स्लाईटली स्टन्ड!! हे लै भारी!!!
हे म्हणजे मला "खेळी झेपली नाही" असं असावं बहुदा! ;)
जेपी, सचिन जितका तुमचा देव तितकाच आमचा विशी हा देव! आम्ही तिकडे पूजा बांधतो आणि इकडेही! :)
23 May 2012 - 6:39 pm | जे.पी.मॉर्गन
कार्पोव, कास्पारोव, विशी वगैरे लोकं लै भारी आहेत असं गुढघ्यायेवढा असल्यापासून ऐकत होतो... म्हटलं "विशी आक्रमक खेळतो" म्हणजे नक्की काय करतो बघुया म्हणून एक सामना टेकू देऊन बघायला बसलो तर हा महामानव आपला एका पंजात हनुवटी रुतवून थंड डोक्यानी मोहरे हलवत होता. म्हटलं जाऊदे आपलं कामच नाही. पण 'स्लाव्ह', 'सिसिलियन बचाव', 'नाजदॉर्फ, 'किंग्ज इंडियन' वगैरे शब्द ऐकल्यावर ज्या काही गुदगुल्या होतात त्यांचं श्रेय मात्र नि:संशयपणे विशीला!
23 May 2012 - 6:19 pm | रमताराम
फकस्त आत्ता काही वेळापूर्वी त्या फिडेच्या साईटचा कॉमेंटेटर "I am slightly stunned" म्हणाला ! ते कसं काय असतं बुवा? एक तर पूर्ण हलून जा ऑर निवांत राहा!
:). चं.प्र. देशपांडे यांचं एक नाटक आहे 'ढोलताशे' म्हणून. त्यातही असंच वाक्य होतं. कुणीसं म्हणतं 'मलाही हळूहळू त्याच्या वागण्याचा धक्का बसायला लागला आहे.' त्यावर अजित भुरे म्हणतो 'हळूहळू बसतो तो धक्का नसतो, धक्का असा जोरात बसतो.' :)
23 May 2012 - 6:07 pm | चतुरंग
मारणेही फारसे चांगले दिसत नाही. कारण दुसरा घोडा तिथे येऊन बसतो!
23 May 2012 - 6:19 pm | चतुरंग
काळा वजीर डी६ मधे आलाय . डी५ चे प्यादे पुढे ढकलावे की नाही या विचारात बोरिस आहे.
आता बोर्डाच्या मध्यात गळू अगदी ठसठसते आहे एखादी खेळी आणि ते फुटून वाहायला लागणार आहे! ;)
23 May 2012 - 6:24 pm | भडकमकर मास्तर
तुम्ही लोक कुठे पाहताय?
ती रशियन साईट झैराती दाखवतएय कधीची
23 May 2012 - 6:27 pm | चतुरंग
आता झैराती आहेत पण त्यावरच्या दुव्यावर पट आणि अॅनालिसिस दिसतंय.
23 May 2012 - 6:31 pm | रमताराम
अॅनालिसिसच्य दुव्यावर क्लिक करा
23 May 2012 - 6:34 pm | चतुरंग
डी ५ किंवा सी५ दोन्ही खेळणे अवघडच आहे. बघू काय होते.
23 May 2012 - 6:41 pm | चतुरंग
अपेक्षित मारामारी होऊन काळा हत्ती पुढे आला. बोरिस एक प्यादे कमी आहे. आता वजीर विरुद्ध दोन हत्ती अशी लढत होणार.
23 May 2012 - 6:47 pm | चतुरंग
बघूयात अंदाज चुकतोय का!
23 May 2012 - 6:50 pm | रमताराम
दोन घोडे मध्यपटावर बोरिसच्या वजीराला कसे नाचवतात या तर्क करणे अवघड आहे. घोड्यांच्या पोजिशन्सचा तर्क करणे अवघड असते. आनंद एखादा आउट ऑफ द हॅट फोर्क मारून बोरिसला चकित करू शकतो. दोन घोडे एन्डगेममधे. ते ही मध्यपटात मोकळे.... बोरिस बी केअरफुल. :)
23 May 2012 - 6:53 pm | भडकमकर मास्तर
ग ळू फु ट ले
ग ळू फु ट ले
ग ळू फु ट ले
ग ळू फु ट ले
ग ळू फु ट ले
23 May 2012 - 7:05 pm | रामपुरी
होणार असं वाटतंय
23 May 2012 - 7:14 pm | चतुरंग
असमतोल टिकून राहणार आणी डाव बरोबरीत सुटण्याची शक्यता नाही.
बोरिस ए प्यादे रेटणार आणो घोड्याला डावात येऊ देण्यापासून जितके लांबवता येईल तितके बघणार.
23 May 2012 - 7:18 pm | चतुरंग
खेळण्यात दोघेही वाकबगार आहेत. आनंद तर अगदी गेलेल्या पोझीशन्स वाचवण्यासाठी प्रसिद्ध आहे!
अतिशय बारकाईने प्रत्येक पोझीशन अॅनालाईज करणे महत्त्वाचे. अनेक शक्यतांनी भरलेला डाव!
23 May 2012 - 7:20 pm | चतुरंग
आणि तटाभोवती घोडा फिरवत ठेवून वजिराला दूर ठेवायला बघणार.
एकदा का वजिराने प्याद्यांच्य तटाला भोक पाडले की डाव अवघड होणार आनंदला!
23 May 2012 - 7:22 pm | भडकमकर मास्तर
या शक्यतांमु ळे ड्रॉ लगेच व्हायचा नाही...
वाट पहावी लागेल...
23 May 2012 - 7:23 pm | रमताराम
इतक्या शक्यता समोर आहेत की त्यातली नक्की कुठली हे वीर उचलतात याचा तर्क करताना बीपीची गोळी घ्यायची वेळ आली. :)
23 May 2012 - 7:37 pm | मिहिर
आनंदने राजा एच ७ वरून जी ७ आणि नंतर पुन्हा एच ७ असा का हालवला? मला कारण कळले नाही!
23 May 2012 - 7:45 pm | भडकमकर मास्तर
हाहाहा... गेल्फंड ईइतका वेळ खातोय की आता खुर्च्या, आर्ट ग्यालरी.. आवडते कलाकार चित्रकार अशी चर्चसुरिरू झालीय...
23 May 2012 - 8:14 pm | रमताराम
With kings facing each other, I have my heart is in my mouth.
23 May 2012 - 8:18 pm | चतुरंग
आनंद सॉलिड डिफेन्स करतोय! बोरिस वेळात मागे पडलाय. साडेदहा विरुद्ध अडीच मिनिटे.
23 May 2012 - 8:27 pm | चतुरंग
घोड्याचा वापर करण्यात अतिशय चतुर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय! बोरिसला त्याचा बचाव भेदणं अशक्य दिसतंय.
23 May 2012 - 8:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकट्या वजीराला फिरवून फिरवून बोरीस आज दमून गेला.
आता पुढे काय ?
-दिलीप बिरुटे
23 May 2012 - 8:31 pm | भडकमकर मास्तर
दोघे रिझल्टसाठी कष्ट करताहेत हे पाहून आनंद वाटतो आहे...
आम्हाला आनंदचे पारडे जड वाटते आहे बुवा...
ते वेळाचे काय झले नक्की?
23 May 2012 - 8:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>ते वेळाचे काय झले नक्की?
वेळ वाढवून देतात की काय कोणास ठाऊक.
वेळ तर बोरीसच्या हातून केव्हाच गेली आहे.
23 May 2012 - 8:37 pm | चतुरंग
प्रत्येकी २तासात व्हायला हव्यात. त्या झाल्या आहेत.
मग एकेक तास वाढवून मिळतो. त्यात प्रत्येकी २० खेळ्या व्हायला हव्यात.
त्याप्रमाणे दोघेही पुढल्या १ तासात शिरले आहेत.
23 May 2012 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेळेच्या बाबतीत खेळाचे नियम बदलायला पाहिजेत.:)
-दिलीप बिरुटे
23 May 2012 - 8:41 pm | चतुरंग
पुढाकार त्याबाबतीत! :)
23 May 2012 - 8:46 pm | चतुरंग
घोडा एफ ६ ला जाणार मग जी ४ प्यादे पुढे सरकणार मग मारामारी. बोरिसच्या पदरी काही पडेल असे वाटत नाही.
23 May 2012 - 9:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बोरीस आनंदचा बचाव भेदून काढतोय.
डावाचा काय निकाल लागेल कोणास ठाऊक ?
23 May 2012 - 9:29 pm | चतुरंग
कसला सॉलिड डिफेन्स केला आनंदने!!
प्रत्येक बुद्धीबळपटूने हा डाव अभ्यासावा असाच आहे. बोरिसचे चिवटपणाने बचाव भेदण्याचे प्रयत्न करणे आणि आनंदने तितक्याच चिकाटीने अभेद्य बचाव करणे. एंडगेम थिअरीचे प्रात्यक्षिकच!! :)
24 May 2012 - 4:27 am | रामपुरी
हत्ती, घोडा विरुद्ध वजीर ज्यावेळी पटावर राहिले त्यावेळीच बरोबरी दिसत होती. एकतर प्यादी फार नव्हती आणि आनंदचे सगळेच मोहरे इतके समन्वयात होते ( विशेषतः हत्ती, घोडा आणि राजा) की पांढर्याला कुठूनही शिरकाव करायला जागा नव्हती. तरी गेलफंडने शेवटी आणखी प्यादी बळी देऊन शिरकाव करायचा प्रयत्न केला पण आनंदने तो हाणून पाडला. शेवटाच्या Ng8 आणि Kh8 या खेळ्या तर मस्तच.
चला आता पुढच्या डावात आनंदकडे पांढरे मोहरे. अॅडवांटेज आनंद :)
24 May 2012 - 10:32 am | ऋषिकेश
काल गेम पाहत होतो.. आज हे रश्रशीत समालोचन!
सध्या एकुणच मजा चालु आहे :)
24 May 2012 - 4:37 pm | चतुरंग
आज आनंदने ई४ ने सुररुवात केली! तिसर्याच खेळीला उंट बाहेर काढून आणि पुढच्याच खेळीला उंट आणि घोड्याची मारामारी करुन आनंदने इरादे दाखवून दिले की आज निकाल हवा आहे. बोरीसही तापलेला आहेच!
आज जुगलबंदी जोरदार होणार बुवा! :)
24 May 2012 - 4:43 pm | रमताराम
बोरिसचे ई-५ प्यादे खाण्याचे पहिले आव्हान आनंदने स्वीकारले आहे. यात आनंदचे मागचे राजाचे प्यादे धराशायी करुन राजा उघडा करण्याचा इरादा आहे बोरिसचा. आनंदने काय उपाय शोधून ठेवलाय त्यालाच ठाऊक.
24 May 2012 - 4:49 pm | भडकमकर मास्तर
गेम वकडातिकडा आणि ब्वेगळा सुरू झालाय... मस्त
24 May 2012 - 4:53 pm | रमताराम
घोडा पुन्हा ई-५ मधे न नेता मागे आणून अधिक धोक्यात का आणला आनंदने देव जाणे. बोरिसची प्यादी अधिक खोलवर घुसली आहेत. की त्यांना कोणत्याही पाठिंब्याविना पुढे यायला लालूच दाखवून आपल्या मोठ्या मोहर्यांची झटपट हालचाल करून त्यांना कोंडीत पकडायचे असा कावा असावा.
वजीरावजीरी लवकर होणार अशी चिन्हे आहेत.
24 May 2012 - 4:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बोरीसची डी पट्टीतली प्यांदी लैच पुढं सरकली.
आनंद, बंदोबस्त करावा लागतो.
-दिलीप बिरुटे
24 May 2012 - 4:56 pm | भडकमकर मास्तर
बोरीस जी २ आणि सी २ वगैरे प्यादे लक्ष ठेवून असेल काय?
भयंकर पोझिशन आहे...
24 May 2012 - 4:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वजिरावजीरी शिवाय पर्याय नाही.
आणि वजीरांशिवाय डाव पाहणे मला लै जड जाते. :)
24 May 2012 - 5:02 pm | संजय क्षीरसागर
सहमत!
24 May 2012 - 5:13 pm | चतुरंग
चतुरंगाच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव सोडते राणी केविलवाणी! ;)
24 May 2012 - 5:17 pm | भडकमकर मास्तर
अवांतर : य निमित्ताने या गाण्याचे रामदासांनी केलेले विडंबन आठवले....
24 May 2012 - 5:00 pm | चतुरंग
करुन खेळत जातात तसे वाटते आहे! घोड्याच्या उड्या मस्तच. आता वजिरावजिरी अटळ आहे.
काय डाव सुरु आहे! दोघांचा किल्लेकोट नाही, आनंदने तर सरळ राजा मध्यात ठेवलाय, वजीर स्मोरासमोर.
काळ्याचे प्याद्यांचे स्ट्रक्चर बोंबलले आहे. सी स्तंभात दुहेरी प्यादी आहेत. किल्लेकोट झालेला नाही. उलट पांढर्याचा उंट मुख्य कर्णात आहे. घोडा चांगल्या जागी विराजमान आहे. दुसर्या घोड्याच्या एका खेळीत दोन्ही हत्ती समन्वयात येतील अशी चिन्हे आहेत. आनंद निश्चितच काहीतरी सखोल योजना करुन आलेला आहे. क्या बात है!
24 May 2012 - 5:09 pm | रमताराम
पांढर्या मोहर्या असल्याने वजीर लवकर गमावण्याचा धोका पत्करणार नाही नि राजा ई-१ मधे नेईल असा होरा असावा बोरिसचा. तसे झाले असते तर पुढे आलेली प्यादी नि वजीर याच्या सहाय्याने त्याने आनंदला जेरीला आणला असता (सी-२ प्यादे धोक्यात आणून डाव्या बाजूला कल्ला केला असता). वजीरावजीरी झाली की अॅडवांटेज आनंद! मधल्या प्याद्यांना - त्यातही एका पट्टीत डबल झालेले - वाचवणे अवघड होईल. उंट किंवा घोड्याचा पाठिंबा घेऊन वजीराला जगवण्याचा प्रयत्न करेल बोरिस, पण आनंद एक्स्चेंज फोर्स करेल असा अंदाज आहे.
24 May 2012 - 5:17 pm | रमताराम
आपण वीस-पंचवीस मिनिटापूर्वीच बोल्लेलो आज वजीर लवकर खपणार. आनंद लै म्हजी लैच ड्याम्बिस मानूस हाय ह्ये पटलं.
24 May 2012 - 5:20 pm | ऋषिकेश
+१ या डावात केव्हाच खपलोय
24 May 2012 - 5:16 pm | ऋषिकेश
मला तर आज काही झेपतच नाहि आहे!
पहिल्यापासून प्रत्येक अंदाज चुकविल्यावर आता फक्त बघाय्चे ठरवले आहे :)
24 May 2012 - 5:29 pm | चतुरंग
राजा एफ १ असा नेणे हा आनंदचा उद्देश असावा.
बोरिस राजाच्या बाजूची मोहरी एकेक करुन बाहेर काढायला लागला आहे. तो किल्लेकोट करेल की नाही सांगता येत नाही कदाचित राजाच्या बाजूला करेल.
आनंदला मध्यात हत्ती आणायला जितके लांबवता येईल तितका बोरिसचा डाव सुरक्षित होत जाणार. दोन घोड्यांनी आनंद आज काहीतरी करामत दाखवेल! :)
येस! मला अपेक्षित असलेली घोडा डी२ खेळला आनंद!!
24 May 2012 - 5:32 pm | चतुरंग
किल्लेकोट केला बोरिसने (अर्थात आजच्या परिस्थितीत ह्याला किल्लेकोट म्हणणे म्हणजे मल्लिका शेरावतने अंगभर कपडे घातले आहेत असे म्हणण्यासारखं आहे!) ;)
24 May 2012 - 5:34 pm | रमताराम
ह्ये बाकी बरूबर बोल्ला तुमी. =))
24 May 2012 - 5:32 pm | रमताराम
लाँग कॅसल करून बोरिसने स्वतःचा राजा खंप्लिट नागवा केला. काय समजंना झालंय. कशापाय क्येल हे आसं. फकस्त हत्ती मधे आणला लवकर, पण त्यापाई राजा पारच नागवा झाला की.
24 May 2012 - 5:34 pm | चतुरंग
त्यात मला घरच्या तयारीचा भरपूर सहभाग वाटतो आहे. पुढच्या खेळीला आनंद आता राजा एफ १ मधे हलवणार का हे बोरिस हत्ती कुठे ठेवतो त्यावर ठरेल.
24 May 2012 - 5:39 pm | चतुरंग
त्याच्या सातही प्याद्यांची फळी कमितकमी उघडली आहे! काळ्याच्या डावात अनेक भगदाडे पाडून घोड्यांना कुठेही उड्या मारता येतील याची व्यवस्था करुन ठेवली आहे. पण त्याला प्रतिकार करायला बोरिसचे दोन उंट आहेत.
आनंदचा डाव अजूनही माझ्या लक्षात येत नाहीये!
24 May 2012 - 5:43 pm | चतुरंग
राजाच्या बाजूची प्यादी आता तो रोलर कोस्टर करत पुढे ढकलणार असे वाटते.
कारण एक हत्ती सोडला तर आनंदची जवळजवळ सगळी मोहरी राणीच्या बाजूलाच सभा भरवून बसली आहेत त्यंची पळापळ होऊ शकेल का?
24 May 2012 - 5:45 pm | रमताराम
प्याद्यांना फोर्क देईल? बहुधा नाही.
24 May 2012 - 5:50 pm | चतुरंग
पुढे सरकवायचे अशी आनंदची योजना आणि ते थोपवायचे ही बोरिसची! आताबहुदा हत्ती बी१ असा येईल.
फोर्क कसा?
24 May 2012 - 5:53 pm | चतुरंग
सी३ मधे येऊन बसला तर अवघड आहे!
24 May 2012 - 6:00 pm | रमताराम
आणावाच लागेल आनंदला. त्यातून हत्तीची पट्टी बंद होईल. :(
बोरिसने कॅसल केल्याकेल्या आनंदने घोड्याने सी-६ प्याद्यावर हल्ला केला असता तर पुढे डाव कसा उलगडला असता याचा विचार करतोय......
24 May 2012 - 6:04 pm | भडकमकर मास्तर
आणलाच..:
अवांतर : नुकतीच बोरीसने तक्रार केलेली आहे की रमताराम आनंदला सूक्ष्मात जाऊन शिकवत आहेत...
24 May 2012 - 6:15 pm | रमताराम
आम्ही सांगितलेलं ऐकायला लागला आनंद तर तो तर मार खाईलच वर आम्हालाही कायमचं सूक्ष्मात रहायची वेळ येईल.
घोडा - ई-४ ही अगदीच ऑब्वियस मूव होती हो. उगाच आम्ही कशी ओळखली म्हणून भाव खाऊन घेतोय.
24 May 2012 - 5:59 pm | प्रीत-मोहर
बी ४ ला आला.
24 May 2012 - 6:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अय्या, तुला बुद्धीबळ समजते ?? मस्तच ग, छानच ग, कसे जमते ग ??? ;-)
(काहीं जुने प्रसंग आठवून अंमळ हळवा झालेला) विमे
24 May 2012 - 6:06 pm | चतुरंग
तो बी४ मधे बसलाय.
आनंद आता मारामारी करेल का? कारण सी२ वरचे प्यादे दुबळे आहे तिथून हत्तीला फोर्क बसू शकतो!
आनंद मुद्दाम बोरिसला चाटण लावत पुढेपुढे आणतो आहे असे मला वाटते आहे कारण दिसणारे फोर्क इतके ऑब्विअस आहेत की ते लक्षात येणार नाहीत हे शक्यच नाही!
24 May 2012 - 6:10 pm | प्रीत-मोहर
पण सी२ मधल्या घोड्याला आनंदचा वजीर मारुच शकतो की.