मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे http://www.misalpav.com/node/21605 http://www.misalpav.com/node/21686 http://www.misalpav.com/node/21734 http://misalpav.com/node/21765 http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे. आज शेवटचा बारावा डाव. अजून कोंडी फुटलेली नाही. दोघेही साडेपाच-साडेपाच गुण घेऊन बरोबरीत आहेत. आनंद डाव जिंकून चौथ्यांदा विजेतेपद राखेल का मिळालेल्या पहिल्यावहिल्या (आणि कदाचित शेवटल्या) संधीचा पुरेपुर फायदा उठवण्याच्या जिगरीने बोरिस काही अफलातून चमत्कार करुन आनंदला धूळ चारेल आणि विजेतेपदाचा मुकुट त्याच्याकडून काढून घेईल? का पुन्हा एकदा बरोबरी होऊन सामना टायब्रेकर मध्ये ढकलला जाऊन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली जाईल? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चला बघूयात डाव बारावा! -चतुरंग

वाचने 26911 वाचनखूण प्रतिक्रिया 115

चतुरंग 30/05/2012 - 16:05
आणि पुढल्या डावात तो पांढरा आहे. परंतु ज्या प्रकारे बोरिस खेळतो आहे त्यावरुन अजूनही स्थिती सोपी नाही.

चतुरंग 30/05/2012 - 16:19
त्रासदायक ठरणार! लवकर काहीतरी करायला हवे. आता बी स्तंभात बोरिसची हत्तीची जोडी बसली तर अवघड होणार आहे. आनंदला तो जागेची टंचाई निर्माण करुन चोक करतोय.
काफी शातीर चालो से आनंद को कर रहे है परेशान !! कैसे बच पायेंगे आनंद बोरीस से ?? हार कि आग मे जलते बोरीस का करारा हमला ...आयिये देखते है :P

रमताराम 30/05/2012 - 16:42
आनंदने वजीरावजीरीचा प्रस्ताव देऊन किंचित वरचढ होण्याचा प्रयत्न केला आहे. बोरिसचे हत्ती नि उंट पाऽर दूर असल्याने आनंदने एक प्यादे देऊन राजाला एकटा पाडला आहे. वजीरावजीरी झाली तर बोरिसची स्थिती नाजूक होते.

In reply to by रमताराम

रमताराम 30/05/2012 - 16:45
एवढ्या वेळ आनंदच्या राजावर डूख धरून बसलेला हत्ती अखेर माघारी आला बोरिसचा. जियो आनंद. वजीरावजीरी झालीच. आता बोरिसला सगळी पोजिशन अनवाईंड करावी लागती आहे. आणि पुन्हा जेमतेम एक मिनिट उरले आहे आनंदच्या पंधरा मिनिटासमोर.

कपिलमुनी 30/05/2012 - 16:44
हो गया है ..कुछ तो जुगाड जल्दी करना पडैगा आनंद बाबु को .. एक प्यादा जास्त आहे बोरीस कडे..

ऋषिकेश 30/05/2012 - 16:45
नवा धागा प्लिज! गेल्या म्याचला लय धमाल आली. हाफिसातल्यांनाही ही लिंक दिल्याने आता अख्ख्या फोअरवर हेच ह्चालु आहे ;)

रमताराम 30/05/2012 - 16:49
मधली तीन प्यादी अशी मस्त बसली आहेत की मोहर्‍यांची देवाणघेवाण झाली की आनंदचे पहिल्या प्याद्याचा वजीर होणे टळत नाही. बोरिस काय उपाय काढतो पाहू या.

In reply to by रमताराम

चतुरंग 30/05/2012 - 16:51
कर्णात बसली आहेत. आणि आनंदचा घोडा सुद्धा मस्त पोझीशन पकडून आहे उंटा कुठूनही हत्तीवर हल्ला करता येत नाही! :)

चतुरंग 30/05/2012 - 17:07
मस्तच!! २-१ स्कोर आनंद फक्त एक ड्रॉ लांब आहे विजेतेपदापासून!!

५० फक्त 30/05/2012 - 17:08
काहीतरी झालं, दोघंही उठुन गेले, बहुधा बरोबरी झाली असावी. मला सुद्धा फार कळत नाही, पण शेवटी आनंद राजा आणि एक हत्ती घेउन जे खेळत होता, ते पहायला जाम भारी होतं.

ऋषिकेश 30/05/2012 - 17:11
छ्या! इथे स्क्रीन अजूनही ङंडलीये. असो. आता शेवटच्या टायब्रेकरसाठी तरी नवा धागा काढा हो .. नंतर आनंदचे अभिनंदनही तिथेच करूयात :)