नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
30 May 2010 - 10:03 pm

आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून
किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. :-)

ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत.
तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच. पण, भारतात जरा जास्तच आहे असे मला तरी वाटते.

असे प्रश्न आणि व्यक्ती समोरच्याला खुप अडचणीत आणतात किंवा समोरच्याला ओशाळवाणे वाटते किंवा मनोमन चीडही येते.

प्रश्न विचारूच नये असे नाही, पण बरेचदा समोरच्याला मुद्दाम डिवचण्यासाठी जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते चूक आहे.

हे ते लोक म्हणजे यात- शेजारी-पाजारी, ओळखीचे, नातेवाईक यांचा समावेश होतो...

हे लोक इतरांची इथ्यंभूत माहीती विचारतात आपली माहिती मात्र सांगत नाहीत.
"आपले ठेवायचे झाकून, इतरांचे बघायचे वाकून" असला प्रकार आहे तो.

खालील उदाहरणे बघा. तुम्हालाही असा अनुभव कधीना कधी आला असेलच-

(१) आजकाल मोबाईल वर कुणालाही कॉल केला की बहुतेक वेळा असे लोक प्रश्न विचारतात- "कुठे आहेस?" समोरचा व्यक्ती कुठे आहे हे जाणणे प्रत्येक वेळा आवश्यकच असते असे नाही. त्या व्यक्तीसोबत जर असे काही बोलायचे असेल की ज्याचा त्या व्यक्तीच्या "कुठे आहेस "शी काहीच संबंध नसेल तर उगाच विचारून त्या व्यक्तीला अडचणीत कशाला आणायचे? हां, जर तुम्ही त्या व्यक्तीला भेटायला जात आहात आणि शोधत आहात तर गोष्ट वेगळी!
काही माणसे तर हद्द करतात- मूळ बोलायचा मुद्दा बाजूला राहून ते समोरच्या व्यक्तीला विचारत बसतात-
"आजूबाजूला आवाज कसला येतोय?"
"कुठे पिक्चर मधे आहात वाटतं?"
"लग्नाची वरात चाललीय वाटतं तुमच्या जवळून!" :-)
"आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"
... गरज नाही विचारण्याची असं!
त्यापेक्षा सगळ्यात सोपं म्हणजे "कुठे आहेस?" विचारण्या ऐवजी- "नमस्कार! कसा आहेस? बिझी आहेस/आहात काय? ही वेळ बोलायला योग्य आहे का, की नंतर फोन करू?" असे आपण विचारू शकतो!
बाकी इतर चौकशा करायची गरजच काय?
(अपवाद- मित्र मंडळी, थट्टा मस्करीअसेल तर गोष्ट वेगळी..)

(२) सार्वजनीक ठीकाणी कुणी एस्.एम्.एस. वाचत असेल किंवा लिहीत असेल तर-
तसेच कुणी लॅपटॉपवर काही टाइप करत असेल तर,
सायबर कॅफेमध्ये शेजारच्या व्यक्तीच्या मॉनिटरवर,
झेरॉक्स काढायला येणार्‍या व्यक्तीचे खासगी कागदपत्रके, याकडे हे लोक ढुंकून बघण्याचा प्रयत्न करतात.

(३) हे लोक लग्न झालेल्या पण अजूनपर्यंत मूल नसलेल्या जोडप्याला प्रत्येकच भेटीत, फोनवर, समारंभात सर्वांसमोर "एखादी आनंदाची बातमी आहे का?" हेच विचारत
सुटतात. (यांच्या अशा "सुटलेल्या" प्रशनामागचा हेतू हाच की "सुटलेले "पोट यांना लवकर दिसावे :-) ) काही वेळा काही कारणास्तव एखाद्या जोडप्याला मूल होत
नसले तरी हे माहिती असूनही जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतात...

(४) बाहेर जात असलो की हे विचारतात -"कुठे? बाहेर चाल्लेत का? :-)
किंवा विचारतात-"कुठे चालले?" अगदी आवश्यकता नसली तरी विचारतातच!

(५) आपण काही वस्तू खरेदी केली की, आपल्याला ते विचारतात "केवढ्याला घेतली?" अगदी विचारतातच! यांना प्रश्न विचारल्याशिवाय राहावले जात नाही.
कींमत सांगताच बरोबर यांचे पुढचे वाक्य तयार- " महाग पडली हो तुम्हाला? अमुक ठिकाणी ही वस्तू फक्त इतक्यालाच मिळते.. मी आणली मागच्याच आठवड्यात! "
खरे खोटे तो दुकानदारच जाणो..!
किंवा- "बापरे! एवढी स्वस्त... अहो लवकर खराब होईल..आम्ही स्टॅण्डर्ड वस्तु आणतो!"(मात्र आमचे प्रश्न विचारण्याचे स्टॅण्डर्ड मात्र खालच्या दर्जाचे आहे..)
ते बोलणारच.
याउलट काही लोकांना नाही विचारलं तरी वस्तूंच्या किंमती सांगत बसण्याची हौस असते.

(६) एखाद्याला नोकरी लागताच बरोबर "पगार किती मिळतो?" हे ते अगदी वीजेच्या वेगाने विचारणार. तेही अगदी चार्-पाच लोकांसमोर.
अ- आणि सु- शिक्षीत दोन्ही प्रकारचे लोक असा प्रश्न विचारतात.
पगार ही खासगी गोष्ट असते. तो असा सऱळसरळ विचारूच नये (आणि आडमार्गाने सुद्धा!) कारण, जास्त - कमी कसाही असला तरी त्या व्यक्तीला ते सांगणे बरोबर
वाटत नाहीच. याउलट काही लोकांना नाही विचारलं तरी पगार सांगत बसण्याची हौस असते. नोकरदार व्यक्तींना अडचणीत आणाण्याचा हा त्यांचा मार्ग. मात्र, एखादा व्यापारी
(बिझिनेसमॅन) असेल तर त्यांना मात्र " तुमचा वार्षिक नफा, जमा खर्च किती असतो हो?" असे हे विचारायची हिंमत करतील का? (करतीलही बुवा! काही सांगता येत नाही त्यांचं!)
किंवा- "आता काय बुवा मज्जा आहे तुमची. तुम्ही आणि तुमची मिसेस दोन्ही नोकरी करतात. " असे काहींना म्हणतात.

(७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय. रस्त्यात कुणी नसले तरिही ते भोंगा वाजवतच
राहातात. ("ऑबसेसिव्ह कंपल्सिव भोंगा डीस ऑर्डर" हा रोग झाल्या सारखे) :-)

(८)सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रुमाल/हात न लावता शिंकणे; रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणे; वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करणे.

(९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे (न विचारता) सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर "विरजण " पाडून त्या व्यक्तीच्या मुड ऑफ करून त्याचे "दही" करतात. एखाद्याने विचारले तर गोष्ट वेगळी.. तसेच सिनेमा पाहून आल्यावर उगाच स्टोरी विचारत बसतात.

(१०) बँक, पोस्ट ऑफिस, रिझर्वेशन काउंटर येथे रांगेमध्ये हे लोक पेन सोबत आणत नाहीत. इतरांकडे मागतात. (कुणी पेन देता का पेन?) बरेचदा खिशाला लावलेला पेन विनंती करता करता काढून घेतात. आपला नंबर आला की प्रथम यांना शोधत बसावे लागते. (माझा पेन मला परत द्या)

जाहिरात-
माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या-
http://nimishthinkcity.blogspot.com/

विनोदसमाजराहणीविचारलेखअनुभवप्रतिक्रियावादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

30 May 2010 - 11:44 pm | योगी९००

आणखी काही..
१) जेव्हा तुमचे किंवा घरातल्या कोणाचे लग्नाचे बघत असले तर..जेव्हा जेव्हा भेट होईल तेव्हा तेव्हा असे लोक सर्वांसमोर प्रश्न विचारतात.."काय मग ठरले का..?" किंवा.. " परवा तो मुलगा/मुलगी पहायला आले होते ना..काय झाले त्याचे..?"

२) परदेशात निघालो किंवा कधी फोन केला तर पहिला प्रश्न "कधी येणार?" ..किंवा.."अजून किती दिवस आहात तिकडे?"

३) एखाद नोकरी बघत असेल तर.."लागली का नोकरी"..किंवा "start किती आहे..? इतकाच..? आमच्या बाबूला मात्र एवढा start मिळाला".

खादाडमाऊ

टारझन's picture

31 May 2010 - 12:04 am | टारझन

(७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय.
हा हा हा .. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही, त्याला म्हंटलं , "काय गाव्वालं , आज इकडं कुटं मार्णींग वाकला ?"
:)

असो , लेख ओके ओके !!

शिल्पा ब's picture

31 May 2010 - 12:16 am | शिल्पा ब

काय टार्झनराव, मंग कंची बाईक हाय तुम्चाकड? साधी का आटो इस्टार्ट वाली?

इरजानाची येजन्सी घ्यात्लेली सिल्पा

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

टारझन's picture

31 May 2010 - 12:38 am | टारझन

आमच्या गाडी ला किकंच नाय ;) फक्त बटान मारुन स्टार्ट व्हती :)

ही आमची यामा , हिच्यावर आमचा शामा पेक्षा बी जास्ती जीव :)

Manoj Katwe's picture

31 May 2010 - 7:33 am | Manoj Katwe

कितीला घेतली ?
हि काय एवढी चांगली नाहीये, आमच्याकडे ह्या पेक्षा चांगली आहे. आम्ही जरा standard वापरतो
आमच्या गाडीला kick आणि button दोन्ही हाय आणि गरज पडली तर ढकलून सुद्धा start व्हतेया

रेवती's picture

31 May 2010 - 7:09 pm | रेवती

अर्रर्र! टार्‍या, हा रंग आहे कारे तुझ्या यामाचा? यापेक्षा तो दुसरा रंग बरा आहे रे!;)

रेवती

टारझन's picture

4 Jun 2010 - 8:51 pm | टारझन

यापेक्षा तो दुसरा रंग बरा आहे रे!

हॅहॅहॅ ... कोणत्या "रंगा" बद्दल म्हणालात ? :)

असो ... च्यायला आम्ही आमच्या गाडीचा रंग लाल असुन काही बोलत नाही , वर कोण तो "आमचीच लाल" म्हणतोय ? फाडा त्याची ....... पावती हो .. हेल्मेट नाही .. डायरेक्ट कवटी आहे =))

-(यामा) दरोज धावते

छोटा डॉन's picture

31 May 2010 - 12:42 am | छोटा डॉन

खुलासा :
तुम्ही बाईक पुण्यात चालवत होतात असे (सोईस्कर) गृहीत धरतो.

>>.. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही,
त्याचे १००% बरोबर आहे, काय चुक आहे त्याची ?
एक तर त्तुम्ही फुटपाथ सोडुन रस्त्यावर बाईक चालवताच का ?
शिवाय त्याने तुमच्या गाडीचा हॉर्न ऐकुन बाजुला का व्हावे ? हॉर्न तुमच्या गाडीचा, वाजवणारे तुम्ही, मग त्याने का बाजुला व्हावे ?
हे न पटणारे आहे, असो.

------
(रामशात्री) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

टारझन's picture

31 May 2010 - 12:50 am | टारझन

आगायायाया .... =)) =)) =)) =))
डाण्या , सहि चुकली लेका फक्त ... बाकी समदं आंक्षी बराबर हाय ..
ते (पादचारी) छोटा डॉण असे हवे. :)

-(बायका* प्रेमी) टारझन
* बाईक चे अनेकवचन आहे ते.

परिकथेतील राजकुमार's picture

31 May 2010 - 2:02 pm | परिकथेतील राजकुमार

शास्त्रीबुवांशी सहमत आहे.

रस्त्यावर पहिला हक्क हा पदचार्‍याचाच असतो.

*'टारझन तुम्हारा चुक्याच' असा लेख लिहावा काय ?*

©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

रेवती's picture

31 May 2010 - 7:10 pm | रेवती

हीहीही!
बरोबर म्हणताहेत डॉनसाहेब!;)
परवाच पुण्यात एक बाई आणि बाईकवाला भस्स्कन् जवळ येऊन थांबला. आता 'रामनाम' घेण्याची वेळ आली असे वाटल्याने मी पटकन् डोळे मिटले तर हा पठ्ठ्या हसायला लागला. आता वाटते, का म्हणून त्याने तरी बाईक हळू चालवावी?;)

रेवती

Pain's picture

31 May 2010 - 12:16 am | Pain

१, ४,५ फारसे आक्षेपार्ह नाहीत.

(७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय

पादचारीही काही कमी नसतात. बागेत फिरल्याप्रमाणे रस्त्यावर फिरणे, मनात येइल तेव्हा रस्ता क्रॉस करणे (डावी-उजवीकडे न पहाता), हिरवा सिग्नल मिळाल्यावर पुढे टपकणे वगैरे वगैरे.

(९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात.

तुमचे पैसे वाचले ना ! पुढच्यास ठेच, मागचा शहाणा !!
तसेही हल्लीचे हिंदी सिनेमे फार बकवास असतात्...

छोटा डॉन's picture

31 May 2010 - 12:38 am | छोटा डॉन

काही मुद्दे पटतील असे वाटले.
बाय द वे, बर्‍याच वेळा ह्या गोष्टी सापेक्ष असतात. असो.

>>वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने.
-१,
१००% असहमत ...
आम्हाला असे वरातीत रस्त्यावर नाचायला लै आवडते. त्यात एक वेगळीच मज्जा आहे हो,एकदा अनुभव तर घेऊन पहा ;)

बाकी आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, आज आमच्या गरिबाच्या मिपा/मीम वर कसे ? " ;)

बाकी सविस्तर नंतर :)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

कुंदन's picture

31 May 2010 - 10:17 am | कुंदन

आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, मिळाले का पैसे परत?"

भडकमकर मास्तर's picture

31 May 2010 - 1:57 pm | भडकमकर मास्तर

खरे तर हे वाचून हसू वगैरे येणार होतं पण आता इथे काहीही प्रतिक्रिया लिहिणं चूक.. नकोच ते...

II विकास II's picture

1 Jun 2010 - 7:09 pm | II विकास II

आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, मिळाले का पैसे परत?"
== सध्या आम्हालाही हाच प्रश्न विचारतात.
असतात, नशीबचे भोग. काय करायचे !!!

पांथस्थ's picture

31 May 2010 - 10:03 am | पांथस्थ

(८) तोंडाला रुमाल/हात न लावता सार्वजनिक थुंकणे, शिंकणे; वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने.

" सार्वजनिक थुंकणे" म्हणजे काय वो? आणि थुंकतांना तोंडावर रुमाल/हात ठेवुन कसे थुंकतात?

(९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात.

च्यामारी तुमचे पैसे वाचवले कि राव. उगा भंगार सिनेमा का बघावा? "जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून" बाकी ह्याचे स्पेशालिस्ट मिपावरती आहेत.

यादित भरः

१०. डोक्याला रुमाल/हाताला आवर न घालता सार्वजणिक संस्थळावरती (जसे मिपा) नको नको ते धागे टाकुन वाचकांच्या मुडचा ओफ करुन त्याचे दही घालतात/ आणंदावर विरजण घालतात.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

आपल्या प्रतिक्रियांवरून मला लक्षात आले की...
काही ठीकाणी अनवधानाने काही मुद्दे लिहायचे राहीले किंवा चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले, ते मी आता बरोबर केले आहेत. कृपया पुन्हा लेख वाचावा.
तसदी बद्दल क्षमस्व!
(उदा :
सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रुमाल/हात न लावता शिंकणे; रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणे; .. असा बदल केला आहे)

धन्यवाद!

माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या-
http://nimishthinkcity.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 May 2010 - 11:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> झेरॉक्स काढायला येणार्‍या व्यक्तीचे खासगी कागदपत्रके, याकडे हे लोक ढुंकून बघण्याचा प्रयत्न करतात. <<
याबाबतीत मी एकदा व्होडाफोनच्या दुकानातल्या माणसाला फैलावर घेतला होता. पोस्टपेड कनेक्शनसाठी बँकेच्या पासबुकाची कॉपी हवी होती. त्याने पहिलं पान बघायला मागितलं, पत्ता नीट लिहीला आहे ना बघायला आणि पुढची पानं उलटायला लागला. मी टोकलं. तर म्हणे, "तुम्हाला याची कॉपी द्यावी लागेलच कंपनीला, नाहीतर पोस्टपेड कनेक्शन कसं देणार ते!"
मी पासबुक आधी हिसकावून घेतलं, "तुम्ही कनेक्शन अ‍ॅप्रूव्ह करणार का कंपनीवाले? तुम्ही करणार नसाल तर माझ्या एकाही डॉक्यूमेंटमधे डोकावून पाहिलंत तर खबरदार! तुमचं काम डॉक्यूमेंट इथून तिथे पाठवायचं आहे तर उगाच भोचकपणा बंद करा."

माझं कनेक्शनचं कामही चटकन झालं! ;-)

अदिती

नितिन थत्ते's picture

31 May 2010 - 10:04 pm | नितिन थत्ते

स्विस ब्यांकेत पासबुक पण मिळतं वाट्टं. ;)

नितिन थत्ते

भाग्यश्री कुलकर्णी's picture

31 May 2010 - 12:01 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त लिहले आहे .असे अनुभव नेहमी येतात.

वेदश्री's picture

31 May 2010 - 12:15 pm | वेदश्री

१.
"कुठे आहेस?" - पृथ्वीवर!
"आजूबाजूला आवाज कसला येतोय?" - शांततेचा!
"कुठे पिक्चर मधे आहात वाटतं?" - नाही. सिनेमात आहे अशा कल्पनेत आहे!
"लग्नाची वरात चाललीय वाटतं तुमच्या जवळून!" - अय्या! कित्ती तो मनकवडेपणा!
"आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे..
३. "एखादी आनंदाची बातमी आहे का?" - आहे की. तुम्ही एक्स्पेक्टींग आहात ५६व्यांदा असे ऐकलेय!
४. "कुठे? बाहेर चाल्लेत का?" - नाही. घरात चाललेय.. १८० अंशातून!
५. "केवढ्याला घेतली?" - विचारून सांगते.. गिफ्टमध्ये मिळालेय ना!
६. "पगार किती मिळतो?" - मिळतो कसला हो? उलट नोकरीवर ठेवल्याबद्दल आम्हालाच पैसे द्यावे लागतात कंपनीला..!
९. "बघू नका, भंगार सिनेमा आहे" - तुम्ही भंगार विकत घेण्याचा कार्यक्रम कधीपासून सुरू केलात?

छोटा डॉन's picture

31 May 2010 - 7:10 pm | छोटा डॉन

एकदम क्लास उत्तरे आहेत ...

>> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे...
ऑ ???
अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ?
उगाच त्यावरुन 'महाभारत' व्हायचे ...
------
(पितामह)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

टारझन's picture

31 May 2010 - 9:41 pm | टारझन

>> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे...
ऑ ???
अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ?

हॅहॅहॅ .. सहमत आहे :)

------
(दु:शासन) टारझन

Pain's picture

31 May 2010 - 12:27 pm | Pain

बहुतांश हिंदी सिनेमे भंगार असतात आणि या असल्या लोकांमुळे ते फालतू चित्रपट बनवणार्‍यांचे फावते.

कानडाऊ योगेशु's picture

31 May 2010 - 1:46 pm | कानडाऊ योगेशु

त्यापेक्षा सगळ्यात सोपं म्हणजे "कुठे आहेस?" विचारण्या ऐवजी- "नमस्कार! कसा आहेस? बिझी आहेस/आहात काय? ही वेळ बोलायला योग्य आहे का, की नंतर फोन करू?" असे आपण विचारू शकतो!

ही तर क्रेडीट कार्ड/पर्सनल लोन गळ्यात मारणार्यांची ट्रेन्ड भाषा झाली हो.!
हे असे प्रास्तविक ऐकले की तोंडातुन आपोआप "नॉट इंटरेस्टेड" हे ट्रेन्ड उत्तर आपोआप बाहेर पडते.
त्यापेक्षा "कुठे आहेस?" लाखपटीने परवडले.
उगाच बिनबुडाची औपचारिकता नको.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

कानडाऊ योगेशु's picture

31 May 2010 - 2:02 pm | कानडाऊ योगेशु

(३) हे लोक लग्न झालेल्या पण अजूनपर्यंत मूल नसलेल्या जोडप्याला प्रत्येकच भेटीत, फोनवर, समारंभात सर्वांसमोर "एखादी आनंदाची बातमी आहे का?" हेच विचारत
सुटतात. (यांच्या अशा "सुटलेल्या" प्रशनामागचा हेतू हाच की "सुटलेले "पोट यांना लवकर दिसावे )

लग्न झालेल्या व मूल न झालेल्या जोडप्याला अजुन काय प्रश्न विचारु शकतो ते सांगा बरे.?
(विशेषतः त्या जोडप्याची तुमची जुजबीच ओळख असेल आणि दोघांनाही (तुम्हालाही आणि समोरच्या जोडप्यालाही) एकमेकांशी काय बोलावे हा प्रश्न पडत असेल तर.फक्त हसुन पुढे जाणे म्हणजे शिष्ठपणा दाखविल्यासारखे होते.)

(५) आपण काही वस्तू खरेदी केली की, आपल्याला ते विचारतात "केवढ्याला घेतली?" अगदी विचारतातच!
एखादी नवी वस्तु तुम्ही खरेदी केली आणि दुसर्याला दाखविली तर त्या दुसर्या व्यक्तिकडुन तुम्हाला काय अपेक्षित आहे बुवा.
त्यांनी काय फक्त वा वा छान छान असे म्हणणे..!
दुसर्या व्यक्तिच्या बाजुने विचार केला तर ती असेही म्हणेल की काही लोकांना उगाच नव्या वस्तु खरेदी करुन लोकांना दाखवायची फार हौस असते बुवा.
इनफॅक्ट आजकाल सर्वत्र होणारी फसवाफसवी पाहता हा प्रश्न तर अगदीच औचित्यपूर्ण ठरतो.कुठुन काय किती किमतीत मिळेल ह्याचा अंदाज येतो.विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बाबतीत तर फारच फसवाफसवी होण्याची शक्यता असते.

(४) बाहेर जात असलो की हे विचारतात -"कुठे? बाहेर चाल्लेत का?
कामात काम झाले तर बिघडले कुठे हो?
तुम्ही जिकडे जाणार असाल तिकडेच त्या विचारणार्यांचे काही काम असेल तर?
हा प्रश्न गैरवाजवी कसा?
बाहेर जाताना स्वतःहुन सांगुन जाणे उत्तम.
विशेषतः काही महाभाग घरात न सांगता बाहेर जातात आणि मोबाईल ही विसरतात.मग त्यांच्या मोबाईलवर आलेले कॉल अटेन्ड करा आणि कुठे गेला?कधी येणार असा प्रश्न आला तर काय उत्तर द्यावे हा प्रश्नच!

बाकी .. लोकांचे कशामुळे काय बिनसेल काही सांगता येत नाही बुवा..

सर्व उत्तरे ह.घ्या.
(भोचक वाचक) योगेश

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

निमिष सोनार's picture

31 May 2010 - 3:40 pm | निमिष सोनार

(मी विवाहीत असून मला सहा वर्षाचा मुलगा आहे)

हे सगळे अनुभव मलाच आले असून कंटाळून मी हे लिहिले आहे असे नाही. मित्रमंडळी, इतर नातेवाईक यांच्या अनुभवावर सुद्धा हे आधारित आहे.
आणि हो, सर्व उत्तरे ह. च घेतली आहेत मी...
:-)
डोंट वरी!

तुमचे मुद्दे बरोबर आहेत, माझा आक्षेप फक्त खालील प्रकारांना आहे-

(३) माझ्या ओळखीच्या जोडप्यांना असे अनुभव आलेत की, बरेचदा आमचा अजून विचार नाही असे सांगून टाकलेल्यांना सुद्धा पुन्हा पुन्हा असे प्रश्न विचारले जातात. तसेच, खुप चेकप होवून ही कुणात दोष नसूनही एखाद्या जोडप्याला मूल होत नाही असे माहिती असूनही, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारले जातात. हे चूक आहे.

(४) कुठे चालले असे उगाचच टोकू नये असे मला वाटते. नाट, नजर लागते. असो ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे!

(५) नवीन घेतलेली वस्तू उगाच याला त्याला प्रत्येकाला दाखवत बसणं, हा निदान माझा तरी स्वभाव नाही.
पण, मला असे अनुभव आलेत की, मी वस्तू न दाखवताही मला विचारेल जाते. एकदा मी बुट घेतले. घालून जात असतांना एकाने विचारले- "नवीन घेतलेत वाटते. केवढ्याला? कोठून घेतले...." वगैरे.. :-)

जाहिरात-
माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या-
http://nimishthinkcity.blogspot.com

निमिष सोनार's picture

31 May 2010 - 3:45 pm | निमिष सोनार

प्रश्न विचारूच नये असे नाही, पण बरेचदा समोरच्याला मुद्दाम डिवचणासाठी जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते चूक आहे.

छोटा डॉन's picture

31 May 2010 - 4:08 pm | छोटा डॉन

मला वारंवार छळणारे आणि वैताग आणणारे काही प्रश्न :

१. आयला, आज इतका लवकर कसा हापिसात ?
( आता मला सांगा एवढ्या उन्हाचे ११.३० / १२ ला हापिसात आल्यावर हा प्रश्न विचारणे माणुसकीला सोडुन नाही का ? )

२. अरे त्या टास्कचे काय झाले ? झाला का डिलिव्हर ?

३. दर शुक्रवारी हमखास विचारला जाणारा प्रश्न : काय मग, आज हाफ-डे का ?
( बर्‍याचदा हे विचारणारे आंतरजालीय मित्र असतात हा भाग अलहिदा )

बाकी अजुन आठवल तसे ....
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

इन्द्र्राज पवार's picture

31 May 2010 - 5:13 pm | इन्द्र्राज पवार

मी भवानी टँक येथे नेहमीप्रमाणे सकाळी स्विमिंग करीत होतो. त्याचवेळी तेथे आपल्या नातवाला घेऊन आलेले आमचे एक ज्येष्ठ पाहुणे मला पोहताना पाहुन म्हणाले, "अरे व्वा... इन्द्रा, काय पोहायला आलायं वाटतं?"

काय उत्तर देणार.... "नाही, फिरायला आलोयं बागेत" ???
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

रेवती's picture

31 May 2010 - 7:02 pm | रेवती

खी खी खी!
आणि ज्येष्ठ व्यक्ती असले कारणाने काही बोलताही येत नाही.

रेवती

धमाल मुलगा's picture

31 May 2010 - 6:17 pm | धमाल मुलगा

एक से एक उत्तरं!

खरंय, फालतु प्रश्न विचारुन कधीकधी डोकं पार भंजाळुन टाकतात लोक.

मला वैताग आणणारा प्रश्नः
(सोमवार ते शुक्रवार सर्वसाधारणपणे रात्री ९-९:३० पर्यंत माणुस हापिसात काम(!) करत असतो हे तसं सगळ्यांना ठाऊक असतं, पण्ण....)
एखाद्या दुपारी/संध्याकाळी आपण कामाच्या गडबडीत असताना फोन खणाणतो..
मी: हॅलो?
फोन करणारा/री: कुठेयस?
मी (मोठा नि:श्वास सोडत) :ऑफिस! आणखी कुठे असणार?
फोन करणारा/री : काय करतोयस?
(ह्या वाक्यावर, फोनमध्ये शिरुन समोरच्याचं कानठाळ रंगवण्याची तीव्र इच्छा दाबावी लागते.)
मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस?

बाकी, मी लहान असताना, "कुठे चाललात?" हा माझा तिर्थरुपांना विचारण्याचा नेहमीचा प्रश्न! आणि त्यांचं राग आवरुन द्यायचं नेहमीचं उत्तरः "खड्ड्यातल्या गणपतीला चाललोय." =))

श्रीराजे's picture

31 May 2010 - 7:03 pm | श्रीराजे

सहमत आहे

छोटा डॉन's picture

31 May 2010 - 7:05 pm | छोटा डॉन

>>मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस?
???
अरे पण तु वॉटरपोलो खेळायल पुण्यातुन खास बेबॉर्न स्टेडियम ( मुक्काम मुंबई ) इथे कशाला जातोस ?
पुण्यात सोय आहे की नेहरु स्टेडियम आणि सणस मैदानावर ...

तु एवढ्या लांब का जातोस रे ?

------
( चौकस )छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

धमाल मुलगा's picture

31 May 2010 - 7:10 pm | धमाल मुलगा

ओ निमिषभाऊ,
पाहिलंत ना? हे असे प्रश्न आम्हालाही विचारले जातात बघा...काय करायचं? :D

छोटा डॉन's picture

31 May 2010 - 7:11 pm | छोटा डॉन

पण हे असे प्रश्न वारंवार 'तुम्हालाच' का विचारले जातात हा मुद्दा खरोखर विचार करण्यासारखा आहे.

असो, लोक तुम्हालाच का विचारतात हो असे प्रश्न ?

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

धमाल मुलगा's picture

31 May 2010 - 7:28 pm | धमाल मुलगा

वस्तुतः हा मुद्दा अगदी विचार करण्याजोगा आहे. एका गहन विषयालाच आपण हात घातला असे म्हणल्यास वावगे ठरु नये.
आता माझ्या अल्पमतीनुसार मी जे काही आडाखे बांधले त्याप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. (वि.सु.: ह्या उत्तरासाठी आम्ही विकिपिडिया खंगाळला नाही, ऑनलाईन लायब्र्यांची पानं उचकली नाहीत, की कुणाला फोनाफोनी करुन आकडेमोड वगैरेची मदत घेतलेली नाही, त्यामुळे हे उत्तर विश्वासार्ह असेलच ह्याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. उत्तर आवडलं, ठीक! नाही आवडलं, तरीपण ऐकायचं :D )
तर, असे प्रश्न आमच्यासारख्यांनाच का विचारले जात असावेत ह्यावर आम्ही सखोल चिंतन केलं. त्यावरुन साधारणतः असं लक्षात आलं, की आम्ही अशा प्रश्नांना समोरच्याला "अरेरे, अ‍ॅग्गद्दी कॅसॅही असला आपल्यातलाच आहे. आपणच नाही लक्ष दिलं तर कोण आहे बिचार्‍याला? ह्यांना आपलं म्हणूया" अशा उदात्त दृष्टीकोनातुन उत्तरं देत रहातो, कधी विचारणार्‍याच्या वयामुळे, कधी भिडस्तपणामुळे इ.इ. अशामुळं होतं काय की, ह्या प्रश्नप्रसवविद्वानांना वाटते की, चला, कुणापुढेतरी जुदाईमधला परेशरावल होता येतंय...चान्स सोडता कामा नये."
तेच जर एखाद्यानं 'तुमचं चालु द्या. माझ्यापुरता विषय संपला" असं म्हणलं तर पुन्हा कशाला कोण हिंग लाऊन विचारायला जाईल अशा व्यक्तीला?

अहो, शेवटी आपण माणसं जोडतो, त्यांचं आपल्यावर प्रेम असतं, त्यातुन ते बिचारे असं काहीबाही विचारत बसतात. आम्ही जमेल तेव्हढी उत्तरं देतो प्रेमानं. न जमेल तेव्हा, "आज तुला फारच पातळ प्रश्न लागले आहेत रे.." असं म्हणुन कटवतो. :D

असो,
माझ्या ह्या संक्षिप्त आणि चिमुकल्या प्रतिसादातुन माझे मनोगत समजले असेल अशी आशा करतो आणि हा प्रतिसाद इथेच आवरता घेतो.

प्रतिसाद देण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री.निमिष सोनार, प्रश्न विचारल्याबद्दल श्री. छोटा डॉन, मिसळपाव.कॉम तयार केल्याबद्दल श्री.नीलकांत, मराठीत टंकनसुविधा देणारे गमभनकार श्री.ॐकार, इंटरनेट कनेक्शन वापरु दिल्याबद्दल आमची कुंपणी, त्या नेटवर्कवर मिपा उघडु देत असलेल्या सिस्टिम्स डिपार्टमेंट, मला शाळेत मराठी शिकवणारे श्री.भावे गुरुजी ह्या सर्वांचे मनापासुन आभार मानुन माझे चार शब्द संपवतो.

_/\_
जय हिंद, जय महाराष्ट्र!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 May 2010 - 10:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं बरं यादी पावली; पण संगणक बनवणार्‍या अ‍ॅलन ट्यूरीनला नाही का धन्यवाद?

असो. धम्या, तू वॉटरपोलो का रे खेळतोस, त्यापेक्षा कबड्डी खेळत जा! पैलवानांनी असे खेळ खेळावेत.

रेवती's picture

31 May 2010 - 7:07 pm | रेवती

निमिषभौ, लेखन आवडले.
आपण म्हणता त्याप्रकारचे प्रश्न विचारून लोक आपल्याला अडचणीत आणतात खरे! आपल्याकडे तर फुल्ल ष्टॉक आहे अश्या प्रश्नांचा (मला विचारलेल्या)! :)

रेवती

अहो, मग तो ष्टॉक शेअर करा की आमच्यासोबत...

बॅंक, रिझर्वेशन काउंटर, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी हे लोक आपल्याला पेन मागतात. आणि आपले भरायचे राहून जाते आणि पेन परत मिळेपर्यंत मनाची चलबिचल होते.....