भाग १ - http://www.misalpav.com/node/20503
भाग २ - http://www.misalpav.com/node/20510
भाग ३ - http://www.misalpav.com/node/20520
शिंदेच्या पाया पडताना विनोद म्हणाला होता " देश आणे धर्मासाठी काय पण सर! " गाडीतून वाड्याकडे जाता जाता, शिंदे विनोदचाच विचार करत होते. त्यांचा मानसपुत्रच बनला होता तो. विनोदच्या मुंबईच्या भानगडीनंतर महाराष्ट्रात रहाण अवघडच झालं होतं त्याचं, . आपण तेव्हढ्यासाठी त्याला इथं बेळगावात घेउन आलो. मुंबईत पक्षाच्या अधिवेशनात पहिल्यांदा भेटला तेंव्हा सामान्य कार्यकर्ता होता तो. पण इथे आल्यावर पहाता पहाता कार्यकर्त्यांचा अनभिषिक्त हृदयसम्राट बनून गेला, काय भाषण ठोकतो लेकाचा ! पब्लीक ला नुस्त वेड लावतो वेड. हाच बनू शकतो आपला राजकीय वारसदार. पोरीचं लग्न एकदाचं उरकून टाकलं की कौटुंबीक जवाबदारी संपलीच आपली. मग आपली सारी संपत्ती, सारी संचित पुण्यायी, सारा वेळ........ फक्त विनोदला राष्ट्रीय रा़जकारणात प्रस्थापित करण्यासाठीच वापरायचा. हो बेळगावातल्या विहिरीतला बेडूक बनवायचा नाही त्याला.गल्ली नाही दिल्ली.... काय हिंदीवर कमांड आहे बेट्याची ! आपणही लहान असताना असेच होतो. हिंदू एकता आंदोलन गा़जलं होतं ते फक्त आपल्या भाषणांमुळेच. पण कोणी रा़जकारणातला गॉडफादर न्हवता म्हणून....., नाहितर कमीत कमी भारताचा गृहमंत्री झालो असतो आज. आपला समाज नेता ड्रीव्हन आहे. चांगला कणखर नेता पाहिजे राष्ट्रीय पातळीवर तरच काही भविष्य आहे या देशाला. नाहीतर चीन पाकिस्तान आणी इथलेच गद्दार हिरवे साप .... वाट लावतील वाट. बरोबर एक वर्षाने लोकसभेची निवडणूक आहे. तोपर्यंत व्यवस्थित लाँच झाला पाहिजे विनोद. आपल्याला कुणी गॉडफादर मिळाला नाही पण विनोदचे गॉडफादर बनू आपण. काय मस्त प्लान आहे आपला....... पुर्या बेळगावची "ती" ठसठसती जखम.... आपल्या एका कामगिरीने मलम लावणार विनोद.... फक्त ६ महिने गायब करायचा विनोद ला त्यानंतर. आणी परत आणायचा तो हत्तीवरच्या मिरवणुकीतूनच....आणी मग थेट खासदारकी ला उभा करायचा. पक्षातल्या ओळखी कामी येणार कधी ? आणि ' त्या ' कामगिरीच्या बळावर सहज निवडून ही यील तो.
कामगिरीचं सगळ कसं व्यवस्थित जमवून आणल होत आपण. पण ऐन वेळी तो बनगोंड्या तडमडला. पाटीची नस्ती भानगड करून ठेवली. त्यात त्या येड्झव्या किश्या ने पत्रक नेलं ! एव्हढ्या महत्वाच्या कामगिरीवर जातान बरोबर पत्रक काय घेउन जातो ? बावळट ! असो पण दाबू सहज केसेस. विनोदची केस लवकर निल करून घ्यायला पाहिजे. कामगिरी नंतर ६ महिने गायब रहावं लागणार त्याला... त्यावेळी केस चालू असेल तर ? ... तर तारखेला स्टेटस फरार दिसेल त्याचं.... नकोच ... त्यापेक्षा केस निल होइस्तवर पुढे ढकलावी कामगिरी. फालतूत आठवडा जाइल फुकट..... विचार करता करता ते ड्रायव्हरला म्हणाले. ती सेतुनिर्माण ची सीडी लाव रे. विनोदचीच कविता होती ती..त्याच्याच आवाजातली..पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात वाचली होती हि कविता त्यानी.... वेड लागलं होतं पबलिकला. ..... ही सगळी कामं नियती बघायची. पक्षाच्या आय. टी. विभागाची प्रमुखच होती ती. भाषणांच्या सीड्या बनवणं, यु ट्युब वर अपलोड करण वगैरे. तिला लांब नाही द्यायची फार.....बेळगावातलंच एखादं चांगलं खानदानी मराठ्याच घर शोधलं पाहिजे. आठवडाभर कामगिरी पुढे ढकलाविच लागणार आहे तर हा वेळ तिच्यासाठी स्थळं शोढण्यात सत्कारणी लावू. नंतरच्या भानगडींमधे वेळ नाही मिळायचा. त्यांची विचारमालिका तुटली ती सीडी च्या आवाजाने ...
सेतुनिर्माण....
स्वर्णीम पृश्ठ गतकालके
पढतेही कंपित हृदय, प्रस्फूर्त बाहुद्वय |
जो नस नस मे थी दौडी
बि़जली हमारी रगोंमे
हतवीर्य आज वह विद्युत
जीवन हुवा श्वानवत, या फूटी अपनी किस्मत|
किस्मत पे न रोते थे
खुद भविष्य अपना लिखते थे,
हस्तरेखाओंकी दिशा, मुट्ठी से बदलते थे |
ना कायरोंके...............
" पॉज कर पॉज कर" शिंदे म्हणाले.
शिंदेंचा मोबाइल वाजत होता. " बोला चौगुले साहेब." शिंदेंचे चौगुले नावाचे मामेभाउ बेळगाव पोलिसात एसीपी होते त्यांचा फोन होता. त्यांना टिपू सुल्तान नगर पोलिस चौकीत झालेला प्रकार कळला होता. " शिंदे साहेब... एवढ मनावर नका हो घेउ.. तो राजवीर पाटील आपलाच पोरगा आहे. पाहुण्यातला. आपल्या शरूताइंची मुलगी दिलीय त्याच्या भावाला.....".
कसल्यातरी विचाराने खुश होत शिंदे म्हणाले, " बर - बर.. आज त्याला घेउन ये जेवायला वाड्यावर............ नको नको संध्याकाळी नको. संध्याकाळी ५५५ चा कार्यक्रम आहे. दुपारीच आण"
आणी आनंदात शीळ घालत ड्रायव्हर ला म्हणाले " हं प्ले कर सीडी"
हस्तरेखाओंकी दिशा,
मुट्ठी से बदलते थे
ना कायरोंके बच्चे
वह चट्टानो से कट्टे मरहट्टे ही सच्चे |
चालक शिवशाही के,
गोपाल वे मुकुंद के
या खालसे गोविंद के,वानर हनुमंत के |
शिवाजी उनका राजा,राष्ट्र्धर्म रक्षण वादा |
परत एकदा पॉज कर. फोन परत वाजला होता. मुंबईचा लँडलाईन नंबर बघून त्यांनी तो कट केला.
*******************************************************************************************************
पहाटेचे पाच वाजत आले होते. इकडे विनोद चालत चालत रूम पर्यंत पोचला होता. त्याला झोप अनावर झाली होती. त्यानं धाडकन् पलंगावर अंग टाकलं. सरांच ५५५ खासच असायच . त्यांना कुणाशी अतीशय निवांतपणे ३-४ तास काही महत्वाच बोलायचं असेल तर त्याला हे आमंत्रण मिळे. मंद आवाजात पंचमदांची गाणी, प्युअर केन्टुकी स्कॉच चे पाच पेग आणी शेवटी पंचपक्वन्नांच जेवण. हो शुद्ध शाकाहारी होते ते. संध्याकाळी ५५५ च्या वेळेला शिंदे सरांपुढे आपले मुद्दे कसे मांडायचे याचा विचार करायचा होता त्याला. पण त्याला अतिताणानी झोप लागली आणी चित्र - विचित्र स्वप्ने पडू लागली. - नियतीची स्वप्ने.
५ पंचमदा
५ पेग प्युअर केंटुकी स्कॉच
५ पक्वान्ने
प्रतिक्रिया
27 Jan 2012 - 9:06 pm | विजुभाऊ
ते फोटो देऊन लेखन कशाला पात्तळ करताय?
अगोदरची मस्त लय या भागात थोडी संथ झाल्यासारखी वाटतेय भौ
27 Jan 2012 - 9:33 pm | दादा कोंडके
हा भाग खर्र झालाय. मास्तुरे सारखी प्रतिक्रिया राखून ठेवायला हवी होती असं वाटलं! :)
27 Jan 2012 - 9:38 pm | सुनील
ते फोटो देऊन लेखन कशाला पात्तळ करताय?
लेखात फोटो पाहिले की आम्हाला एक जुने व्यक्तीचित्र आठवते!
कथा चांगली चालली आहे. प्रत्येक भागात काहीतरी नवीन घडते आहे. असेच येऊदे.
अवांतर - केन्टकी बर्बॉन ठाऊक होती पण ही केन्टकी स्कॉच काही उमगले नाही. आणि ५ पेगनंतर चक्क पंचपक्वांनाचे जेवण? छ्या कायतरीच!
27 Jan 2012 - 10:53 pm | ५० फक्त
कथा लिहिताय का चित्रमालिका, नशीब आधीच्या भागात एक पाटी, एक पोलिस स्टेशन, एक निळा कागद वगैरे फोटो नाही टाकला ? लिहिताय चांगलं मग असले फोटो का टाकताय त्यात,
५५५ चं सिक्रेट अजुन दोन भाग ओढुन उत्सुकता वाढवता आली असती किंवा प्रत्यक्ष बैठकीच्या वर्णनात ते ओघवतं आलेलं जास्त भावलं असतं.
आणि जेवणाबद्दल म्हणाल तर पंचपक्वान्नं - पाच गोड पदार्थ या अर्थानं असेल तर त्या ताटात दोनच गोड पदार्थ दिसले , एक बहुधा श्रीखंड किंवा फ्रुट सॅलड असावं आणि दुसरे गुलाबजामुन, बाकी सजावट मात्र छान आहे हो.
27 Jan 2012 - 11:11 pm | शिल्पा ब
वाचायला सुरुवात होतेय तोवर संपलं पण. ते फोटो आणि कशाला उगाच!!
27 Jan 2012 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा
मागे मी म्हंटलवत कि नै... या भागात खिंड येणारे
खिंडित माणुस गोंधळतो... गोंधळलो कि नै आपण ह्या भागात ;-)
अता पुढच्या भागात अपल्याला कळेल ५५५ इथे का ओपन झालीये ते..?
बघा बघा कळतं कि नै ते.. !
क्रमशः.... ;-)
28 Jan 2012 - 12:04 am | आण्णा चेंगट
कथेपासुन ध्यान विचलीत होते आहे फोटोंमुळे.....
28 Jan 2012 - 10:46 am | किसन शिंदे
मालिका आतापर्यंत सुरूळीत चालु होती, पण या भागात थोडी स्लो झाल्यासारखी वाटली.
पुढचा भाग येऊ द्या पटकन.
28 Jan 2012 - 4:13 pm | राजघराणं
ब्येटर लक नेक्ष्ट टाइम