भाग १ - http://www.misalpav.com/node/20503
भाग २ - http://www.misalpav.com/node/20510
भाग ३ - http://www.misalpav.com/node/20520
भाग ४ - http://www.misalpav.com/node/20532
(शिंदे सरांपुढे आपले मुद्दे कसे मांडायचे याचा विचार करायचा होता त्याला. पण त्याला अतिताणानी झोप येत होती आणी चित्र - विचित्र स्वप्ने पडू पहात होती. - नियतीची स्वप्ने.)
चांगलंच फटफटलं होतं तेंव्हा. समोरच्या खिडकीतून प्रकाश येत होता. विनोदच्या डोळ्यावर आदळत होता. डोळे गच्च मिटलेले असले आणी समोर प्रकाश असेल तर वेगवेगळे रंग दिसू लागतात. सोनेरी - गुलाबी - लालसर - केशरी. रंगांची वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. संथ पाण्यात दगड टाकल्यावर निर्माण होतात तशी. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. त्या पाण्यात विनोद आपलं प्रतिबिंब पहायचा प्रयत्न करतोय. पण त्याला त्याचा चेहरा त्यात दिसत नाही.कारण त्या वर्तुळात फेर धरलाय नियतीनं. तिच्या अरंगेत्रम ला धरला होता तसाच. भरत नाट्याचे नवरस नवरंग उधळले जातायत.तिच्या बोटांच्या हालचालीत, डोळ्यांच्या विभ्रमात, हातांनी अवकाशात काढलेल्या रेखात एक ग्रेस आहे. तिच्या कमरेवर हात ठेवण्यात, नाराज झाली की ओठ मुडपण्यात, हसताना जमिनीकडे बघण्यात एक नजाकत आहे. तिच्या नेत्रकटाक्षात, तिनं विनोदला दिलेल्या आव्हानात, तिच्या पहिल्या चुंबनात बिजलीचा झटका आहे.
जो नस नस मे थी दौडी
बि़जली हमारी रगोंमे
हतवीर्य आज वह विद्युत
हिजड्यानो .........
"हिजड्यानो" तो म्हातारा ब्राह्मण ओरडला. अंग घामानी थबथबलंय त्याचं. त्याचा उजवा तुटका हात उंचावून पुन्हा किंचाळतो " हिंदूत एकपण मर्द पोरगा शिल्लक राहिला नाही काय ? " सूड घ्या. सूड. हाताला हात, पायाला पाय, डोळ्याला डोळा. मुली ला मुलगी. बदला घ्या बदला. अंगात आल्यासारखा तो घुमू लागतो. अर्धनारीनटेश्वरासारखा नाचू लागतो, गोल ,गोल. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. बर्फाचा खडा स्कॉच मधे टाकल्यावर निर्माण होतायत. " विनोद ही कामगिरी तुलाच पार पाडावी लागेल. बेळगावची ठसठसणारी जखम तूच सांधू शकतोस." शिंदे सरांचा ग्लास बोलतोय. बर्फ वितळतोय. स्कॉच चा रंग डायल्युट होतोय. चॉकलेटी - पिवळा - फि़क्कट - पांढरा. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. विनोद डोळे चोळत ऊठला. तेंव्हा दुपारचे तीन वाजले होते.
*******************************************************************************************************
आज शिंदे सरानी राजारामशास्त्री भागवताना घरी एका खास कामासाठी बोलावलं होतं. बेळगावातील सुप्रसिद्ध नटेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी आणी शिंदेंचे अध्यात्मिक गुरु. तेजस्वी गोरा वर्ण, गर्द निळ्या रंगाच सोवळं आणी त्यांच्या उघड्याबंब शरीरावर शोभणारं जानवं. शास्त्रींनी वाड्याचा उंबरठा ओलांडताच शिंदेंनी चरणस्पर्श केला. राजारामशास्त्रींनी डाव्या हातानेच आशिर्वाद दिला. हो कारण उजवा हात न्हवताच त्यांना.
मोहसीननी म्हणजेच उस्मान च्या भावानी कुर्हाडीच्या एका घावात त्यांचा उजवा हात मनगटापासून ऊडवला होता. त्यांची १९ वर्षाची कोवळी सुंदर पोरगी. सुनेत्रा तिचं नाव. घराण्याला बट्टा लावत आणी शास्त्रीजिंच्या संस्कारावर बोळा फिरवीत उस्मान च्या प्रेमात पडली. कोवळी नासमज पोर. एका कत्तलखाना चालवणार्या पोरात तिला काय दिसलं कुणास ठाउक ? शास्त्रींनी परोपरीनं समजावलं तिला. शिंदेही म्हणाले " पोरी असा वाह्यात पणा करू नकोस. तु म्हणशील त्या हिंदू मुलाशी लग्न लावून देतो तुझं. माझी सारी संपत्तीही त्याच्या नावे करतो. तू आणी नियती दोनीही माझ्या मुलीच."
"पण काका मी वचन दिलय उस्मान ला. माझ मन अर्पण केलंय त्याला." सुनेत्रा.
शेवटी ती अजिबातच ऐकत नाही म्हटल्यावर तिला घरातच कोंडून ठेवण्याचा सल्ला दिला होता त्यांनी शास्त्रींना.
गेल्या वर्षीच्या शिवरात्रीला रात्री २ वाजता उस्मान शास्त्रींच्या घरात घुसला. बरोबर त्याचे पंचवीस भाउबंद होते. त्यांच्या हातात कुर्हाडी, कुदळी आणी तलवारी होत्या. सरळ उचलून खांद्यावर टाकलं त्यानी सुनेत्राला. शास्त्रीजी तिचा हात धरून ओढत होते त्याचवेळीच. खाट्कन कुर्हाड मारली मोहसीन नं.
शास्त्रींच्या तुटक्या हाताकडे बघवत नसे शिंदेंना. त्यांना बसायला खुर्ची देत शिंदे म्हणाले. शास्त्रीबुवा पत्रिका जुळवायचीय नियतीची. आमच्या तोलामोलाचं स्थळ आहे. पदरही जुळलाय. शिंदेनी दिलेली पत्रिका उचलताना शास्त्रींनी उपरण्याने कपाळावरचा घाम पुसला.
सर्रकन काटा आला शिंदेंच्या अंगावर. त्यांच्या डोळ्यांसमोर त्या वर्षभरापूर्वीच्या बैठ्कीचा प्रसंग उभा राहिला. बेळगावातल्या तमाम हिंदुत्ववाद्यांची बैठक भरली होती. घामाने डबडबले होते शास्त्रीजी तेंव्हा. आणी उपरण्याचा पदर पसरून सूडाची भीक मागत होते. परिस्थितीच तशी होती. बापाचा हात तुटूनही सुनेत्राने उस्मान सय्यद बरोबरच रहाण्याचा निर्णय घेतला होता. कायद्याने आता सज्ञान होती ना ती. हात तोडल्याबद्द्ल मोहसीन ला फक्त एक वर्षाची सजा सुनावली गेली. पण सय्यद पतिपत्नी सुखाने नांदत होते, गावातल्या सर्वात जुन्या मंदिराच्या मुख्य पुजार्याची ही दशा पाहून सारा बेळगाव हळ्हळला होता. हिंदुत्ववाद्यांच्या हृदयात खोल जखम झाली होती. काय करायचं ? ते ठरवायला बैठक भरली होती. किश्या म्हटला सर्व सय्यदांचे हात तोडू. विनोद म्हटला सय्यद रहातात ते अख्ख टीपू सुल्तान नगर जाळून टाकू. "मी सांगतो उपाय" शास्त्रीजी म्हणाले, शात्रीजी बोलायला उभे राहिले तेंव्हा त्यांच्या डोळ्यातून अंगार बरसत होता. अंग घामाने डबडबले होते. ते जी कामगिरी उपाय म्हणून सांगणार होते. त्यामुळे सारेच आवाक झाले होते. बेळगावातल्या एकाही हिंदूने असे क्रुत्य याआधी केलेले न्हवते.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
28 Jan 2012 - 7:51 pm | राजघराणं
जमलंय का या वेळी?
28 Jan 2012 - 8:20 pm | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय.
28 Jan 2012 - 10:01 pm | पक पक पक
लेखनचा झपाटा चांगला आहे....
28 Jan 2012 - 10:10 pm | शिल्पा ब
छान, पण भाग खुपच छोटा झालाय.
29 Jan 2012 - 1:13 am | अत्रुप्त आत्मा
५५५चं रहस्य उलगड्तय...पण तरी या भागात आंम्ही अंदाज लावायला जरा गरगरलोय...
पण तरिही १शक्यता अशी वाटते,,,की शास्त्रीजी सर्व हिंदू तरुणांना....
असो...! जी गोष्टं मनात अंदाज बांधुन अवतरतीये... तिच पुढल्या भागात वाचायला मिळणार,याची मनोमन खात्री बाळगुन... या भागापुर्तं आमच प्रतिक्रीया क्रमशः प्रकरण थांबवतो... :-)
(संपूर्ण इहवादी)-अत्रुप्त आत्मा
29 Jan 2012 - 6:20 am | टुकुल
मस्त जमलय. एक एक गोष्टी आता थोड्या थोड्या जुळवता येताहेत.
--टुकुल
29 Jan 2012 - 9:13 am | अप्पा जोगळेकर
मस्तच. पहिले दोन भाग तित्के अपील झाले नाहीत. पण आता कथा पकड घेतेय. पुढील भाग वाचण्यास उत्सुक
30 Jan 2012 - 11:47 am | राजघराणं
पुढचा भाग ३ दिवसांनी. सुट्टीवर हाय
2 Feb 2012 - 5:22 pm | राजघराणं
अजून ३-४ दिवस लागतील
2 Feb 2012 - 5:30 pm | मी-सौरभ
हे असं नाय कराच्च....
2 Feb 2012 - 5:42 pm | अन्नू
आमच्या सालखे सगलेच ब्लेक् घ्याय्ला लागले आता. :P
2 Feb 2012 - 10:39 pm | पैसा
छान! पण टेन्शन घेऊ नका, २ दिवसात भाग टाकायचा वगैरे. तब्ब्येतीत लिहा. वेग आणि कथेचा बाज टिकला पाहिजे, तसंच उरकून टाकलंय असंही कोणाला वाटता कामा नये. २/४ दिवस जास्त लागले तरी हरकत नाही. इथे एकेक वर्षाने पुढचे भाग टाकणारे अतिरथी महारथी आहेत.