भाग १ - http://www.misalpav.com/node/20503
भाग २ - http://www.misalpav.com/node/20510
भाग ३ - http://www.misalpav.com/node/20520
भाग ४ - http://www.misalpav.com/node/20532
भाग ५ - http://www.misalpav.com/node/20541
भाग ६ - http://www.misalpav.com/node/20603
भाग ७ - http://www.misalpav.com/node/20892
पेग पहिला
शिंदे सरांनी स्कॉचचे दोन लार्ज पेग बनवले. विनोद च्या ग्लासात थंड सोडा भरला. स्वतःच्या ग्लासात बर्फाचे तीन खडे टाकले फक्त. बर्फ ग्लासात घोळवत घोळवत ग्लास आदळला आणी म्हणाले " चिअर्स... विनोद तुला माहितिय ? ही चीअर्स ची प्रथा कशी सुरू झाली ते ? तसा तू या विषयात नवाच ! मी बर्याच गोष्टी ऐकल्यात चीअर्स बद्दल. युरोपातली प्रथा आहे म्हणतात. युद्धानंतर शत्रूपक्षातले जनरल लोक वाटाघाटी करायला बसायचे. त्यावेळी बिअर ढोसायचे. कधी कधी बिअर मधूनच एकमेकाना विषप्रयोग करायचे. त्यावर उपाय म्हणून चिअर्स आलं. चिअर्स च्या वेळी ग्लास आदळायचे.. मग दोन्ही ग्लासातली बिअर इकडे तिकडे मिसळते. विषप्रयोगाचा धोका टळतो. म्हणून ! चिअर्स ! "
विनोदनं पहिल्यांदा एक खणखणीत घोट ओढला. बाहीन ओठ पुसले. स्कॉच प्यायची ही पद्धत नव्हे खर तर. पण शेवटी दारू ती दारूच. अर्धा झालेला ग्लास टेबलावर ठेवत विनोद बोलला '' आपण जनरल तर आहोत सर; पण शत्रूपक्षातले नाही. तेंव्हा विषप्रयोगाचा धोका नाहीच ! आणी खरं युद्धही अजून सुरू व्हायचय.. "
" आणी रणांगणावर माझा सेनापती विजयी होणारच. तेंव्हा थ्री चीअर्स फॉर यू विनोद. पहिल्यांदा पत्रकाची केस निल करू देतो. केस निल झाली की, टार्गेट : उस्मान ची बहीण नाजरीन ... १८ वर्षाला सहा महीने कमी आहे वय तिच. उचलायची तिला. आणी मग हो गायब ६ महीन्यांसाठी. लग्नाच कायदेशीर वय झाल की सहा महीन्यानी बेळगावच्या नटेश्वर मंदिरातच धडाक्यात लग्न लावतो तुमचं. हिंदूची पोरगी पळवल्याचे परिणाम कळू दे साल्याना. त्यानंतर फक्त चार सहा महिन्यात लोकसभेची निवडणूक लागेल. चमत्काराला नमस्कार होतोच विनोद. आणी आपला हिंदू समाज मेल्या आईच दूध प्यालेला नाही. पराक्रमाला मतदान होतंच. हजारो भाषणांपेक्षा एक बाबरी काम करते आणी देशाचं सरकार बदलते. राजकारणात जनतेची नाडी कळली पाहीजे. मला बेळगावच्या मतदाराची नाडी माहितीय विनोद. शास्त्रीजींची सुनेत्रा उस्मान न पळवली आणी कट्यार खुपसली बेळगावच्या काळजात. ती जखम सांधणारा खासदार होणारच. आणी तुझी पक्षाकडून उमेदवारी फिक्स करायची जवाबदारी माझी ! तेंव्हा भावी खासदार श्री विनोदभाउ बडवे.. चीअर्स.. थ्री चीअर्स फॉर यू !" ग्लास उंचावत शिंदे म्हणाले; आणी मग त्यानी एक हलका सीप मारला.
गडबडलाच विनोद. खर तर त्याला त्याच्या आणी नियतीच्या प्रेम प्रकरणाविषयी सरांशी बोलायच होतं. पण सरांची गाडी वेगळ्याच रूळांवर धावू लागली होती. ही खासदारकीची गाडी विनोद सोडणार न्हवता. पण नियतीची मधुर साथसोबतही सोडू इच्छीत न्हवता. गोंधळलेल्या चेहर्यान सरांकडे बघत त्यानी ग्लास उचलला आणी एका दमात तो संपवत म्हणाला " जरा गोंधळलोय मी सर. आपल मागे बोलण झाल्यानुसार नाझरीनच्या मोठ्या बहिणीशी क्रीष्णान सूत जुळवलंवतं; तिला उचलायला आम्ही टीपू सुल्तान नगर पाशी गेलो आणी मग सगळा राडा झाला..."
ग्लास संपवत शिंदे म्हणाले " प्लॅन चेंज विनोद... क्रीष्णा आणी तू दोघानी सय्य्दांच्या पोरी उचलायच्या. क्रीष्णाच लग्न लगेच लावायच. तू नाबालिक नाझरीन ला घेउन ६ महीने गायब रहायच. म्हणजे सहा महिने विषय मिडियात तापत राहिल. तिच लग्नाच कायदेशीर वय झालं की प्रकटायचं. आणी निवडून यायचं".
गोंधळलेल्या चेहर्यान विनोदने दोघांचे पेग भरले आणी म्हणाला " धक्का बसला सर."
पेग दुसरा
पुढचे दोन तीन घुटके मारताना शिंदे शांतपणे विनोदकडे पहात होते. म्हणाले " गडबडून जाउ नको विनोद.. मी अतीशय विचारपूर्वक योजना बनवलीय. तू नाझरीनला घेउन गायब व्हायच. पहिल्यांदा पोलीस तुला कुठे शोधतील ? बेळगावात. पण तू त्याना सापडणार नाहीस. कारण तू तेंव्हा पंढरपुरात असशील. तिथल्या गर्दीत मिसळलेला. तुझं वडीलोपार्जीत घर आहे तिथं. त्याबद्द्ल कोणालाही माहीत नाही. त्या घरी रहायचं मागच्या दारानं एन्ट्री घ्यायची आणी सुमडीत रहायचं वरच्या सोप्यावर. कार्यकर्ते शिधा पोचवतील तुला. बाकी पोलीस तुला शोधतील मुंबई पुण्यात पण त्याना काय मिळणार ? केळं ! बाकी पोरगी एकदा अठरा वर्षाची झाली की लावू वाजत गाजत लग्न. तेव्हा पहिल मिशन म्हणजे नाझरीनला फूस लावून पटवणे. बाकी ते जमेलच तुला. तुझ्यासारख्या देखण्या राजकुमाराची वाटच पहात असतात पोरी."
" सर तुमच्याशी नियतीबद्दल बोलायचं होतं थोडसं " विनोद चाचरत म्हणाला.
दोन पेग होत आले. शिंदे भावूक झाले. ग्लास संपवत शिंदे म्हणाले मला पण बोलायचय तिच्याविषयी. " बाकी तू आणी नियती मला मुलं दोन. दोघही दिसायला सुंदर सर्वगुणसंपन्न की काय ते ! पण मुकं लेकरू नियती. पोरीच्या बापाच्या चिंता कळायच्या नाहीत तुला विनोद. "
विनोदचं डोकं भणाणलं होतं. आपण कोण कुठले पोरके भटके. आपल्यासारख्या अनाथाला शिंदे सरानी मायेने जवळ घेतलं , शिकवलं, मुलगा मानलं, राजकीय वारसदार मानलं, त्यांच्या मुलीबद्दलच्या भावना कशा सांगाव्या त्याना ? त्यांच्या आपल्याबद्दलच्या योजनांवर पाणी कसं फिरवायच ? कस खेळायचं त्यांच्या आणी आपल्याही राजकीय स्वप्नांशी ?भानावर येत विनोद म्हणाला " नियतीबद्दल बोलत होता सर ... "
ग्लासातले बर्फखडे खुळखुळवत शिंदे म्हणाले. '' हो तिच्यासाठी स्थळ बघितल आज. स्थळ ऐकून धक्का बसेल तुला.. इंन्पेक्टर राजवीर पाटील ! मुलगा मोठा उमदा वाटला मला. पण पक्का .. हिंदुत्वाचा विरोधक. आधी मनवता वगैरे बडबडला. कशाला पायजे धर्मावरून भांडणं वगैरे वगैरे... त्यानंतर तेच तेच बामन बामन करत बसला, वेदोक्त प्रकरण बामनी कावा वगैरे.. मी विचारलं त्याला - हिंदुत्व बामणाला आंदण कुणी दिमक्तेदारी. काय आहे हिंदुत्व ?" शिंदेनीलं ? कोणी सांगितली ग्लास टेबलावर ठेवला.
दोन्ही हात मानेमागे ठेवत ते म्हणाले " मग मी राजवीरला त्याच्याच आजोबांची गोष्ट सांगीतली. त्याचे आजोबा नाना पाटलांबरोबर्चे स्वातंत्र्यवीर होते. ते कम्यूनिस्ट. पण निजामी राज्यातल्या रझाकरांची मस्ती उतरवायला. नानांची तूफान सेना धावली होती. ते हिंदुत्व "
"माझा देश. देशावरच प्रेम. देशद्रोह्यांची चीड म्हणजे हिंदुत्व. माणुसकी हाच खरा धर्म बरोबराय. घराला कुलुप घालू नये ही पण एक आदर्श गोष्ट आहे. पण जोपर्यंत या जगात खुनी आहेत बलात्कारी आहेत; तोपर्यंत घराला कुलुपांची आवश्यकता आहे. माणुसकी हाच खरा धर्म असला तरीही जोपर्यंत इस्लामी जिहादची दारू पिउन या डुकरांचा दहशतवादी नंगानाच या देशात सुरू आहे तोपर्यंत आम्ही हिंदुत्वाचे रणशिंग फुंकतच राहणार. शेंडीच्या गाठीत, जानव्याच्या दोरीत, गायीच्या मुतीत हिंदुत्व नाही. पुराणातल्या वांग्यात, तीर्थाच्या भांड्यात, उपासाच्या सांडग्यात हिंदुत्व नाही. वेदांच्या उक्तीत, यज्ञाच्या आगीत , ब्राह्मणांच्या पंगतीत हिंदुत्व नाही. देशद्रोह्यांची दाढी उपटायला मर्द हिंदूंची मूठ वळते त्यात हिंदुत्व आहे. सीमेवरच्या जवानांत , जवानांच्या हौतात्म्यात , त्यांच्या चीतेतल्या निखार्यात हिंदुत्व आहे. कारसेवकांच्या अंगारात हिंदुत्व आहे. वीरपत्नींच्या त्यागात - अश्रूत हिंदुत्व आहे. त्यांच्या डोळ्यातले एक थेंब पाणी लाख तरुणांचे रक्त उकळवते त्यात हिंदुत्व आहे. त्या उकळत्या रक्तात, रक्ताच्या नात्यात हिंदुत्व आहे. हिंदुचे बंधुत्व म्हणजे हिंदुत्व ! "
"मग काय म्हणाला राजवीर ?" पेग भरत विनोद ने विचारले.
पेग तिसरा
(क्रमशः)
प्रतिक्रिया
15 Mar 2012 - 7:46 pm | यकु
अरे, फार उशीर केलात.
कुठे होतात?
18 Mar 2012 - 10:44 am | राजघराणं
आता टाकेन पटापटा
15 Mar 2012 - 8:38 pm | हंस
छान जमलाय हा भाग, फक्त थोडा छोटा वाटतो, पुढल्या भागाच्या (आणि अर्थात मोठ्या) प्रतिक्षेत!
15 Mar 2012 - 9:41 pm | पैसा
मस्त गुंतागुंतीचा प्लॉट! छान!
15 Mar 2012 - 9:51 pm | जाई.
वाचतेय
15 Mar 2012 - 10:12 pm | अत्रुप्त आत्मा
हां....!अब आने लगा रंग...! अता पेटत्या होळीतुन नारळ खायला मजा येणार...!
15 Mar 2012 - 10:21 pm | प्रचेतस
भारी लिहिताय. पण फारच छोटे छोटे भाग टाकता राव तुम्ही.
16 Mar 2012 - 7:29 am | ५० फक्त
आता रंग भरतोय पण क्वांटिटि फार कमी आहे, खुप वेळ प्ण गेला आहे मध्ये.
16 Mar 2012 - 10:42 am | sneharani
वाचतेय!!
16 Mar 2012 - 1:23 pm | निश
मस्त लिहिल आहेत तुम्हि
16 Mar 2012 - 8:43 pm | ईन्टरफेल
खुपच छोटे भाग टाकतात राव आपन !
16 Mar 2012 - 11:43 pm | निनाद मुक्काम प...
तुमची कथा मला आवडली. त्यातील पात्रे त्यांची मानसिकता व त्याला साजेसे त्यांचे वर्तन हे तुमच्या लेखणीतून दमदारपणे उतरले आहे.
सध्या पाकिस्तान मध्ये जे हिंदू महिलांचे सक्तीने धर्मांतर करणे चालले आहे. हे पाहून तळ पायाची आग मस्तकात जाते.
पु ले शु
17 Mar 2012 - 1:26 pm | रणजित चितळे
आवडला. मोठाले भाग टाका की.
शेवटच्या परिच्छेदातली हिंदुत्वाची व्याख्या आवडली.