बडवा (१)

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
23 Jan 2012 - 10:24 pm

त्या पोलिसानी मागून विनोदला धरला. उचल्ला. एका हातात गचांडी आणी दुसर्या हातात गांडीवरची पैंट. विनोद च्या हातातली कुदळ गळून पडली होती. गळा आवळल्यान गोरा चेहरा लाल होऊ लागला. किश्या न ताबड्तोप हालचाल केली. विनोद ला अस धरल्यान खाड्कन रक्त चडलं त्याच्या डोळ्यात. किश्यान सरळ पोलिस इंन्स्पेक्टरच्या रोव्हॉल्वर ला हात घातला. त्याक्षणी इंन्स्पेक्टरन धाडकन विनोदला खालती आदळला. आणी किश्याच्या खणखणीत मुस्काडात ठेवून दिली. दोघाना सांगीतलं "नीचे बैठो''. आळीपाळीनं दोघाना चार चार लाथा लगावल्या. आदळला गेल्यान आधीच ओठ फाटला होता विनोदचा. रक्त वहात होतं तरीही दात ओठ चावत तो ओरडला '' जय भवानी'' ....... ''जय शिवाजी '' किश्यानही साथ दिली.

नीनू यारू ? मराठी ? संताप संताप झाला त्याचा. कानडी पाटी ऊखडतात काय? चांगली अद्दल घडवली पाहीजे ह्या शिवसेनावाल्याना. रात्रि टिपू सुलतान नगर मधली ड्युटी म्हणजे काहि ना काहि तरी लफड व्हायचच. इंस्न्पेक्टर बन्गोंडाला सवयच होती त्याची. पण त्याच्या कर्यक्षेत्रात एकही लफड फार मोठं होउ द्यायचा नाही तो. ही विशितली फाल्तू मराटी पोरं, आज अस्सा दांडू देउ त्याना की सारा बेळगाव याद राखेल.

इंन्स्पेक्टर साठी हिशोब सरळ होता. पोरं बडवायचि , साहेब तर खुश होइलच , पण कानडी पेपर मधे झक्कपैकी फोटो पण छापुन येइल. इंन्पेक्टर बन्गोंडा हि तशी अजब वल्ली होती. प्रामाणिक आणी हिरोइक तरुण. देशभक्त, कडक आणि स्वतच्या मायबोलिवर - कानडीवर जिवापाड प्रेम करणारा. पण तितकाच भडक आणि उथळ. टिपू सुल्तान नगरची जी कानडी पाटी हि पोर उखडू पाहत होती; त्या पाटीखालिच गाडावं साल्याना !.................पण ..... थोड्या लाथा हाणल्यावर बर वाट्लं त्याला. पोराच्याही थोबाडातून रक्त वाहत होतं. ........तेही पाहून राग थोडा कमी झाला त्याचा.

' बिचारं तरूण पोरगं, कपडे बरे होते... चेहराही चांगला गोरा गोमटा होता. बर्या घरचा वाटतोय . बरोबरचा मात्र गूंडय . विनाकारण या राजकारण्यांच्या नादि लागतात आणि करिअर खराब करून घेतात. चांगलं बडवून काढ्ल्याशिवाय अक्कल येणार नाही भडव्याना' .. असा विचार करत इंन्स्पेक्टर बनगोंडा चालू लागला, आणि त्या पाटी काढणार्या पोराना शिव्या घालत, त्यांची वरात पोलिस स्टेशन कडे ढकलू लागला.

दोन्ही पोरं जुना मार विसरून जणु काहि झालच नाही अशा थाटात छाति पुढे काढुन चालत होती. एकमेकाशी मराठीत बोलत होती आणी टाळ्या देउन हसत होती. ह्या बनगोंड्याला बिल्कूल भिक घालणार न्हवते ते. त्यांच्या मराठी गप्पांचा अर्थ काय असावा ह्याचा अंदाज करत इंस्पेक्टर त्याना ढकलत होता. पण त्यांची बेगुमान आणि निडर वागणुक त्याचा संताप वाढवत होती. ह्यांची कशी सालटी सोलावित? हा इंन्स्पेक्टर बन्गोंडाचा विचार पूर्ण होइपर्यंत ते सगळे पोलिस स्टेशन मधे पोचले होते. उद्या बेळगाव मधल्या पेपर मधे काय बातमी द्यायची याचा विचार करत बन्गोंड्यान दुकलीकडे रोखून पाहिल .......

विनोद च्या डोळ्यात बघत आणी एका हाताने त्याची गचांडी धरत इंन्स्पेक्ट्रर बन्गोंडा ने विचारले -मराठी हं ?
निन्ना हेस्सार्येन्नू ? नाम क्या है तेरा ?

" विनोद बडवे ... और सुनो मराठी -- कानडी कुछ नही जानता मै. गर्व से कहो हम हींदू है. ये टीपू सुल्तान कटुवे का नाम नही चलेगा इधर.उसके नाम का सिर्फ बोर्ड ही नही निकालूंगा मै, उसके नाजायझ औलादोंको पाकिस्तआन भी भगाउंगा. जो उखाडना है उखाडले ....''

बनगोंड्याच्या हाताची पकड ढिली होत होती. आणी डोळ्यातला राग निवळत होता ......

(क्रमशः)

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

23 Jan 2012 - 10:36 pm | पक पक पक

जबराट्ट ! खतरनाक !! सुरुवात तर लय भारी हाय....

पक पक पक's picture

23 Jan 2012 - 10:38 pm | पक पक पक

राजे ! लवकर लवकर येउ द्या पुढ्चा भाग.....

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2012 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाहवा...राजे... मला अंदाज हाय,पुढच्या कथानकाचा... ;-)
तरी पण येऊ दे,,,मज्जा येतीये वाचायला

सुरुवात एकदम जबरदस्त आणि पुढच्या भागांची वाट पाहायला लावणारी. येवुद्या अजुन.

--टुकुल

शिल्पा ब's picture

24 Jan 2012 - 5:07 am | शिल्पा ब

एकदम जबराट सुरुवात!!! पुढचे भाग पटापटा टाका.

मराठमोळा's picture

24 Jan 2012 - 5:59 am | मराठमोळा

वास्तव...!
संपूर्ण प्रतिसाद शेवटल्या भागात. :)

मस्त सुरुवात, काहीच अंदाज येत नाहीये, एकदम दोन चार थ्रेड मोकळे सोडलेले आहेत त्यामुळं मजा येते आहे.

अन्या दातार's picture

24 Jan 2012 - 8:36 am | अन्या दातार

"क्लब क्रमशः" मध्ये अजुन एक वाढ नको. लवकर टाका पुढचे भाग.

मस्त, झकास, वेगवान.
पुढचा भाग लवकर येउंद्यात.

प्यारे१'s picture

24 Jan 2012 - 10:19 am | प्यारे१

अजून कुणा 'सेक्युलर' व्यक्तीने वाचलेलं दिसत नाहीये.... ;)

लवकर लवकर येऊ द्या. :)

नितिन थत्ते's picture

24 Jan 2012 - 10:50 am | नितिन थत्ते

ललित लेखन आहे असं वाटलं. लेखक या विचारांचा प्रसार करू पाहतो आहे असं म्हणण्यापुरेसं नाही. अजून क्रमशः भागात काय लिहितात हे पाहिल्यानंतर लक्ष घालूच. :)

किसन शिंदे's picture

24 Jan 2012 - 10:44 am | किसन शिंदे

लय भारी.. पुढचा भाग येऊ द्या पटकन.

राजघराणं's picture

24 Jan 2012 - 12:06 pm | राजघराणं

( सूचना : ही ललित कादंबरी आहे. रोज १ -२ भाग टाकले जातिल. आणि माझ्या राजकिय मतांचा प्रचार करण्यासाठी हि लिहिलेली नाही. माझी राजकीय मते कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांदलेली नाहीत. कादंबरीचा शेवट वाचण्याआधी लेखकाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करू नयेत, ही हात जोडून विनंती )

मी-सौरभ's picture

24 Jan 2012 - 3:13 pm | मी-सौरभ

ही सुचना प्रत्येक भागाच्या सुरवातीला पण टाका :)

मस्त जमलाय भाग १;
कादंबरी पुर्ण टंकुन तयार आहे असा समज झाल्याने बरे वाटत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jan 2012 - 2:07 pm | परिकथेतील राजकुमार

या धाग्यावरील कथेचा विषय मिसळपावच्या नियमावलीत बसतो का ? हे पाहून तो नियमात कसा बसतो याचा खुलासा संपादक मंडळाने करावा अशी नम्र विनंती.
अन्यथा संपादक मंडळाने हा धागा त्वरित उडवावा अशी माझी विनंती आहे.
येथील सर्व भाषीय सदस्यांचा योग्य तो मान राखून मिसळपाव वरील लेखन होत असते असा माझा समज किमान आत्तापर्यंत तरी होता.

आज या धाग्याला परवानगी दिली तर उद्या मुंबईत गुजराथ्यांना कसे ठोकावे असे धागे निघाले तर आश्चर्य वाटायला नको.

असे धागे २-३ दिवस न उडवता राहिले तर मिसळपावची प्रतिमा जनमानसात डागाळेल अशी खात्री आहे
बाकी संपादक मंडळ समर्थ आहे.
इति लेखनसीमा.

जर हा धागा नियमात बसत नाही तर यापेक्शा फडतुस* धागे मिपावर आहेत ते कसे?

या लेखामधुन कोणावरही चिखलफेक केलेली नाहीये
कोणाचाही अपमान केलेला नाहीये
कस कोणताही अपशब्द वापरलेला नाहीये
कसलिही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये.... कारण हे ललित मोदी लेखन आहे. असे मी नाही चाचा म्हणतात ;)

"आज या धाग्याला परवानगी दिली तर उद्या 'पायजम्याला नाडीच योग्य हे कसे पटवावे' असे धागे निघाले तर आश्चर्य वाटायला नको."
जर असा धागा निघाला कि "तो" धागा त्वरित उडवावा..."हा" नव्हे

* - यासाठी काहीच करु नये

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2012 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा

@या लेखामधुन कोणावरही चिखलफेक केलेली नाहीये
कोणाचाही अपमान केलेला नाहीये
कस कोणताही अपशब्द वापरलेला नाहीये
कसलिही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये...
प्यार्‍याच्या या मतास आमचे जोरदार समर्थन... अनुमोदन..सर्व काही

अवांतर---@स्वाक्षरी: लोक मिसळपाववरुन गेले तरी त्यांच्यातून मिसळपाव जात नाही. Wink>>>

नितिन थत्ते's picture

24 Jan 2012 - 4:01 pm | नितिन थत्ते

>>कारण हे ललित मोदी लेखन आहे. असे मी नाही चाचा म्हणतात

"आहे" असे म्हटलेले नाही. "वाटले" असे म्हटले. सध्या संशयाचा फायदा दिला आहे. "ललित" लिखाणाकडून "मोदी" लिखाणाकडे सरकले तर आक्षेप घेऊच. :)

परानं दुसर्‍या एका धाग्यावर आलेल्या प्रतिसादाचं 'चोप्य पस्ते' पाहून आम्ही पण तेच केलंय..... ;)
बघा पोरगी पटवायच्या धाग्यावर... पण आता आम्चेच ड्वाळे पाणवायलेत... :)
परा 'णामाणिराळा' तेल लावलेला पैलवान. ;)

आज या धाग्याला परवानगी दिली तर उद्या मुंबईत गुजराथ्यांना कसे ठोकावे असे धागे निघाले तर आश्चर्य वाटायला नको.

विजुभाऊ नामक इसम हा मुम्बैत रहाणारा मराठी बोलणारा गुजराथी आहे.

इरसाल's picture

24 Jan 2012 - 4:14 pm | इरसाल

अहो ते अव्ह्द सिरीयस्ली नका घेवु हो.....

प्रवाहा विरुध्ध प्रतिसाद दिला कि माणसं उच्चभ्रु होतात का..?

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jan 2012 - 2:24 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय... सुरूवात तर चांगली आहे.

विनायक प्रभू's picture

24 Jan 2012 - 2:35 pm | विनायक प्रभू

वाट बघावी लागेल पुढच्या भागांची.

दादा कोंडके's picture

24 Jan 2012 - 3:48 pm | दादा कोंडके

पुढचा भाग कधी?

sneharani's picture

25 Jan 2012 - 11:17 am | sneharani

वाट बघतेय, पुढचा भाग येऊ दे लवकर!

पियुशा's picture

25 Jan 2012 - 11:47 am | पियुशा

मस्त लिहिलय :)